गाभा:
दहावा घालण॑ म्हणजे काही फार चा॑गली गोष्ट आहे अस॑ म्हणण्याच॑ धाडस निदान मी तरी करू शकत नाही...
पण मला सा॑गा की, जर आपल्या आयुष्यातुन काही दिवस कायमचे गेलेले असतील तर त्या॑चा दहावा घालून त्या॑ना तिला॑जलि द्यायला काय हरकत आहे...???
आम्ही सगळ्या मित्रा॑नी मिळुन आमच्या आयुष्यातुन कुठलेही कारण न देता निघून गेलेल्या मुली॑बरोबर व्यतीत केलेल्या दिवसा॑चा दहावा घालायचा ठरविलेले आहे...
तरी आमच्या या ठरवावर मि. पा. वरील सदस्या॑नी मते द्यावीत असे मला वाटले म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप करत आहे.....
प्रतिक्रिया
18 Jan 2008 - 8:23 pm | प्राजु
पण दहावा घालून तुम्ही त्या मुलीसोबत घालवलेले क्षण विसरू शकणार असाल तर जरूर घाला.
आपण दहावा घालतो ते गेलेल्या व्यक्तीला विसरण्यासाठी नव्हे तर तिच्या आत्म्याच्या शांती साठी अशी माझी तरी समजूत आहे. ( चुकीचे असल्यास मिपाकरांनी प्रकाश टाकावा). आणि तुमचे प्रेम खरे होते तर तिचा दहावा करण्याचा गोष्टि का? उलट ती असेल तिथे सुखी राहुदे अशी प्रार्थना करा.
बाकी प्रेम करणे आणि ते मिळणे ह्या फार नशिबाच्या गोष्टी असतात.
- प्राजु.
18 Jan 2008 - 9:12 pm | छत्रपति
प्राजु...,
तु म्हणतियेस ते अगदी बरोबर आहे. आपण दहावा घालतो ते गेलेल्या व्यक्तीला विसरण्यासाठी नव्हे तर तिच्या आत्म्याच्या शांती साठी. पण जर एखादी गेलेली व्यक्ती कि॑वा तिची आठवण त्रासदायक असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यातुन पुर्णपणे काढुन टाकणेच योग्य नाही का???
18 Jan 2008 - 8:25 pm | अरविन्दनरहरजोशी
अरविन्द
अगदी उत्तम योजना आहे. गेलेले दिवस आणि माणसे यांचा दिवस घातलेलाच बरा नाहीतर भूत होवुन मागे लागतील?
18 Jan 2008 - 8:50 pm | वरदा
हे काय भलतच जिवंत माणसांचा १० घालण्यापेक्षा नवीन मुली शोधुन वॅलेंटाईन डे एन्जॉय करा ना.....
18 Jan 2008 - 9:16 pm | छत्रपति
वरदा...,
मी त्या माणसा॑चा दहावा घालायचा अस॑ नाही म्हणलो ग॑.....,
आणि राहिली गोष्ट व्हॅले॑टाइन डे ची... सध्या तरी माझी कोणीच व्हॅले॑टाइन नाहीये....,
(प्रेमाचा भूकेला) छत्रपति.
18 Jan 2008 - 10:32 pm | झंप्या
नविन व्हॅलेंटाइन शोधताना ती पायघोळ चुडीदार आणि दोन्ही खांद्यावर ओढणी घेणारी शोध रे! ;)
19 Jan 2008 - 10:39 am | सखाराम बाइंडर
वरच्या कमीजाबद्दल काय?
खरा डॉन (बाकीचे क्लॉन)
20 Jan 2008 - 1:16 pm | झंप्या
अरे माज्या क्लॉना,
मी वर सलवार म्हणालो नाही रे,चुडीदार म्हणालो.
चुडीदार म्हणजे त्यान दोन्ही येते बहुदा!! :)
आणि 'क्लॉन' नाही रे 'क्लोन'!!!
तुझाच,
-सबका डॉन एक
18 Jan 2008 - 9:17 pm | प्राजु
पण जर एखादी गेलेली व्यक्ती कि॑वा तिची आठवण त्रासदायक असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यातुन पुर्णपणे काढुन टाकणेच योग्य नाही का???
मी ही तेच सांगते आहे. माझा पहिला प्रतिसाद नीट वाच. तुला जर दहावा घालून तिला किंवा तिच्या सोबत व्यतित केलेल्या क्षणांना पूर्णपणे आणि कायमचे विसरणे शक्य आहे असे वाटत असेल तर दहावाच काय पण शंभरावा सुद्धा घाल..
- प्राजु.
18 Jan 2008 - 9:22 pm | छत्रपति
आभारी आहे...,
तुझ्या कडून या उत्तराची खर॑च अपेक्षा नव्हती....
18 Jan 2008 - 9:30 pm | वरदा
दहावा घालुन विसरता येते कुणाचीही आठवण्...ऐ.ते. न.
माझा वॅलेंटाईन आहे माझ्याजवळ ३ वर्षापासून....तु दुसरी शोध की कुणी.....www.shadi.com, www.marathimatrimony.com
कर बघु प्रोफाईल तयार....कदाचित मिळेल अजुन आहेत बरेच दिवस...
दहावं घालण्यापेक्षा चांगलं काम आहे हे.....
18 Jan 2008 - 9:55 pm | मी भुइनळा
कल्पना उत्तम आहे.... पण खर॑च अस करुन त्या मुली॑च्या आठवणी विसरता येतील का???
म्हणजे हे म्हणायच॑ का कि आपण कधी खरे प्रेम केलेच॑ नाही का?????
18 Jan 2008 - 10:48 pm | झंप्या
भुइनळ्या नाव आवडलं रे
-मी सुतळीबाँब
18 Jan 2008 - 10:46 pm | झंप्या
'नववा.. त्या गेलेल्या दिवसांचा' असं शिर्षक कसे वाटतं?
18 Jan 2008 - 11:36 pm | पेशवे बाजीराव तिसरे
छत्रपति आपल्या भावना जोरात पोचल्या.. पण माझ्या मते दहावा ह्या जगातुन गेलेल्या आपल्या व्यक्तिचा घालतात.. दिवसांचा नाही.. पण कल्पना छान आहे आवडली.. पण एक छोटीशी शंका आहे.. त्या निघुन गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींना तुम्ही तिला॑जलि देऊ शकला आहात काय? जर तसे नसेल तर ह्या दहाव्याला काहीच अर्थ ऊरत नाही.. मग हा विधि फक्त लोकांकडुन दया मिळवण्याचा एक निष्फळ प्रयत्न म्हणुन राहील.. आणी दुसरी गोष्ट अशी की जी व्यक्ती आपली असते ती कधीच आपल्या आयुष्यातुन जात नाही... आणी ज्या व्यक्ती जातात त्या कधीच आपल्या नसतात.. मग अशा व्यक्तींबरोबर घालवलेल्या दिवसांचा हिशोब कशाला ठेवायचा आणि १०/१३ वा तरी कशाला घालायचा...
19 Jan 2008 - 4:22 pm | विकि
प्रेयसीच्या नावाने दहावा घालणे म्हणजे प्रेमाचा अपमान करण्यासारखे आहे. जे झाले ते झाले असे म्हणून पुढे चालत राहा. आयुष्यात अश्या गोष्टी होतच असतात. पण छत्रपती तुला प्रेयसी तर होती आम्हाला तर ती देखील नव्हती .
है अपना दिल तो आवारा ना जाने किसपे आयेगा.................
आपला(आजन्म ब्रम्हचारी)
कॉ.विकि
19 Jan 2008 - 5:48 pm | किशोरी
आठवणी चांगल्या असतील तर त्यांचा दहावा कशाला घालायचा? कटु आठवणींना तिलांजली दिली तर समजु शकते,
पण असे करुन आठवणी खरच पुसल्या जातील का,पण तरीही तुम्हाला चांगले वाटणार असेल तर जरुर घाला दहावा
शेवटी माणसाने आनंदी राहने महत्वाचे!!
27 Jan 2008 - 8:31 am | सुधीर कांदळकर
विसावा घ्या म्हणजे दहावा घालायचे खूळ निघून जाईल.