माझी कारवार मुर्डेश्‍वर भ्रमंती

समीर१२३४५६'s picture
समीर१२३४५६ in भटकंती
22 Dec 2015 - 2:41 pm

पावसाळयाचे दिवस होते. सहज म्‍हटलं बायकोला कुठेतरी फिरायला जाऊ, माझी ब-याच दिवसांची कारवार भ्रमंतीची इच्‍छा होती, जूलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात मी आणि मिसेस आम्‍ही दोघेही कारवार भ्रमंतीसाठी जायला निघालो. त्‍यासाठी सावंतवाडीतून बसची चौकशी केली. सकाळी 7.30 वाजता कदंबा बस होती, पण तिही फक्‍त मडगांव पर्यंत, तेथून पुढे आम्‍हांला दुसरी बस पकडावी लागणार होती.
ठरल्‍याप्रमाणे सावंतवाडी स्‍टॅंडवर मडगांव जाणा-या कदंबा बसमध्‍ये बसलो, सावंतवाडी ते मडगांव कदंबा बसचे तिकीट 70 रुपये आहे. तासा दिड तासात आम्‍ही मडगाव ला पोहोचलो, तेथे माझी मेहूणीही येणार होती, ठरल्‍याप्रमाणे ती मडगाव ला आली, आणि तिथून पुढे कारवार जाणा-या बसमध्‍ये आम्‍ही बसलो. कारवारला पोचेपर्यंत दूपार झाली होती, तिथून पुढे मेहूणीने सांगितले की मुर्डेश्‍वरला शंकराचे एक सुंदर मंदिर पाहण्‍यासारखे आहे, तिथे जाऊया, त्‍याप्रमाणे चौकशी केली, खरंतर तिथे आमची भाषा कोणालाच समजत नव्‍हती, त्‍यांना हिंदीही थोडी थोडीच येत होती, सरतेशेवटी आम्‍ही मुर्डेश्‍वर जाणा-या बसमध्‍ये चढलो, आणि इथून पुढे आमचा प्रवास सुरु झाला, हा बराच लांबचा व जरासा कंटाळवाणा प्रवास होता, परंतू कर्नाटक सरकारचे रस्‍ते व तिथली स्‍वच्‍छता एकदम चांगली होती. शेवटी संध्‍याकाळी आम्‍ही मुर्डेश्‍वरला पोहोचलो. एकंदर बसने एकाचे सुमारे 200 रुपये तिकीट होते.
मुर्डेश्‍वर मंदिर स्‍टेशनपासून अवघ्‍या 10 मिनिटांच्‍या अंतरावर आहे, तिथून आम्‍ही मंदिरात पोहोचलो.

मुर्डेश्‍वर मंदिर बाहय भाग

तिथे पाहण्‍यासारखे बरेच काही आहे. सर्वात मोठे आकर्षण म्‍हणजे शंकराची सर्वात मोठी आसनस्‍थ मुर्ती
महादेवाची भव्‍य मुर्ती
तिथून निसर्गाचे रुपही अत्‍यंत विलोभनीय असेच वाटत होते.
समुद्राचा फोटो
अशीच फिरती करुन थोडे बाजारात फिरलो, आणि तिथून स्‍टेशनला परतलो. स्‍टेशनवर रात्री उशिरा 2.30 वाजता नेत्रावती ट्रेन ने आम्‍ही परतलो.

प्रतिक्रिया

अप्रतिम फोटो, डोळ्यांचे पारणे फिटले

प्रवास वर्णनही सुंदर, भाराऊन गेलोय

प्रचेतस's picture

22 Dec 2015 - 5:04 pm | प्रचेतस

तारीफ़ करावी तितकी कमीच.

पद्मावति's picture

22 Dec 2015 - 4:27 pm | पद्मावति

सुंदर भटकंती. मंदिर फारच सुरेख दिसतंय.
शंकराचा फोटो फक्त खूप मोठा झालाय. त्याचा आकार कमी करता येईल तर पहा.

होबासराव's picture

22 Dec 2015 - 5:34 pm | होबासराव

:))

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Dec 2015 - 6:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

सदस्यकाळ
1 month 1 week

पु.ले.शु.

शंकरांची मूर्ती अप्रतिम टिपलिय!

जव्हेरगंज's picture

22 Dec 2015 - 9:05 pm | जव्हेरगंज

जमलं की!

भारीये.अजून उजवीकडून फोटो काढला असता तर शंकर देव कॅमर्यात( आपल्याकडेच ) बघतोय असं आलं असतं.ओंकारेश्वराच्या डोंगरावरही असाच आहे एक.देवळात प्रवेश नाही/ फोटो काढता येणार नाही वगैरे प्रश्न कायमचे सोडवलेत.

एक विनंती :- या भटकंती सदरातील लेखाला "संपादन" आहे ते वापरून धाग्यातच उरलेले फोटो आणि माहिती वाढवा.