मंडळी,
२५ जानेवारीला कुडाळ किंवा कणकवलीला पोहोचायचे नक्की झाले आहे. सोबत पत्नी आणि मुलगा (वय वर्षे २) आहे. ट्रेकिंग आणि कामाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर कोकण, नाशिक परिसर फिरलो आहे. मात्र दक्षिण कोकणात आणि तेही कुटुंबासोबत जाण्याची हि पहिली वेळ आहे.
हातात ३० तारखेपर्यंत वेळ आहे. किमान ३ दिवस मालवण व दोन दिवस रत्नागिरी परिसर पाहण्याची इच्छा आहे. (यात बदल सुचवू शकत असाल तर अगदी हक्काने सांगावे) स्वतःचे वाहन रत्नागिरीत मिळेल.
सर्वात महत्वाचे म्हणजे मानस यांच्या धाग्यावर गवि यांचा अप्रतिम प्रतिसाद पाहिला आहे. त्यामुळे कोणती स्थळे आणि परिसर पहायचा आहे याचा अभ्यास झाला आहे. त्यांना व्यनीकरून काही महत्वाच्या नोंदीसुद्धा घेतल्या आहेत.
मात्र आपणाकडे राहण्याची उत्तम व्यवस्था असलेली (स्वतः अनुभवलेले) हॉटेल्स, गाडीवाले यांचे संपर्क, खाण्यासाठीची व फिरण्यासाठीची ठिकाणे तसेच काही सूचना असल्यास कृपया माहिती द्यावी (इथे अथवा व्यनीद्वारे).
धन्यवाद,
सौमित्र
प्रतिक्रिया
17 Dec 2015 - 3:25 pm | सतिश पाटील
तळाशील नावाचे एक बेट आहे मालवण जवळ. गुगलून नकाशात पाहावे .
तीन बाजूने पाण्याने वेढलेले. ( त्यामुळे त्याला बेट म्हणता येणार नाही , चूक कबूल. आय माय स्वारी बरका )
बोटीने ब्याक वाटर पार करावे लागते. १० मिनिट लागतात .
रस्त्याने २० किमीचा लांबीचा पल्ला पडतो.
घरापासून १० फुटांवर समोर प्रायवेट बीच. सकाळी डॉल्फिन माशे अंघोळ करताना दारातूनच दिसते.
२० फुट मागे ब्याकवाटर .
५० फुट डाव्या बाजूला पुन्हा प्रायवेट बीच.
अगदी जवळच देवबाग, तारकर्ली आणि शिंधुदुर्ग.
मित्राने बागेतील घरालाच रेसोर्ट्चे स्वरूप दिलेय.
अगदी ताजे माशे खायला मिळतात. त्या वासानेच मी स्वनियंत्रण गमावले आणि तिथून मांसाहारी होऊन परतलो.
केसरी रेसोर्त.
रुपेश -९४२१२६८५३४
( हि झैरात न्हवे )
17 Dec 2015 - 6:15 pm | खटपट्या
मासे अंघोळ करतात??
18 Dec 2015 - 10:59 am | सतिश पाटील
अहो खरच...
हे विशिष्ट जातीचे डॉल्फिन मासे आहेत. शतकातून एकदाच दर्शन देतात.
मी त्यांना पहिले तेव्हा ते साबण लावून अंघोळ करत होते.
नंतर टोवेल्ने अंग पुसून पुन्हा पाण्यात गुडूप झाले.
हे खरं वाटत नसल्यास खाली वाचा.
अहो अंघोळ करत होते म्हणजे, जलक्रीडा करत होते, शब्दशः अर्थ नका घेऊ, जरा गमतीने घ्या हो...
17 Dec 2015 - 4:49 pm | saumitrasalunke
धन्यवाद सतिशजी
17 Dec 2015 - 5:25 pm | चलत मुसाफिर
तळाशिलबद्दल इथे वाचा
https://chalatmusafir.wordpress.com/2013/07/08/momentary-moksha-at-talas...
18 Dec 2015 - 1:42 pm | कंजूस
वालावल ( कुडाळ -मालवण रोड) १८ किमी,तलाव, घामापुर तलाव चांगला आहे.पक्षी भरपूर .मोठे हॅानबिल इथे खूप आहेत.इमराल्ड डोव /पाचु कवडा दिसतो अधुनमधून.कुडाळात "झाण्ट्ये" यांचे काजूचे दुकान अवश्या पहा बाजारात.आता नवीन काजू नाही मिळणार.
वालावलला त्या सर्कसवाल्यांचे घर आहे अजून.
रत्नागिरीत किल्ल्याच्या पायथ्याशी एका म्युझिअमात मोठा देवमाशाचा सांगाडा आहे.शिरगावला( ६ किमी) सरकारी शोभिवंत मतस्यालय माशांची नर्सरी आहे.पावसकडे जाताना वाटेत "भाट्ये नारळ संशोधन नर्सरी" आहे.पावसला राहणे जेवणे फुकट असते.येथे पाच मिनीटावर एक पुरातन दगडी देऊळ अप्रतिम आहे.
20 Dec 2015 - 5:59 pm | यशोधरा
धामापूर ना?
20 Dec 2015 - 7:19 pm | कंजूस
होय,आता मात्र धामापुरच म्हणतात.वालावलचा तलाव वेगळा आहे आणि बाजुचे नारायणाचे देऊळ झी चोवीस तासवर दाखवले होते.करली खाडीजवळचे काळसे गावही रम्य आहे.
20 Dec 2015 - 5:54 pm | bela
गणेशगुळे - पावस पासून साधारण १० ते १२ कि.मी. वर सुंदर समुद्र किनारा आहे.गणपतीच मंदिर आहे
20 Dec 2015 - 5:55 pm | bela
गणेशगुळे - पावस पासून साधारण १० ते १२ कि.मी. वर सुंदर समुद्र किनारा आहे.गणपतीच मंदिर आहे