भाषांची गंमत

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in काथ्याकूट
24 Nov 2015 - 5:49 pm
गाभा: 

नमस्कार.
मिपावर प्रथमच लिहितोय. चुकल्यास समजून घ्यावे.

१. मराठीत आपण दात घासतो व धुतोही. पण म्हणताना फक्त दात घासतो. भांडी सुद्धा.
२. पेपर तपासणे हा शब्द मनोरंजक आहे. गुन्ह्याचा सुद्धा तपास करतात.
३. कन्नड आणि हिंदीत 'शिकणे' म्हणजे फक्त वाचणे (हिंदी - पढना, कन्नड - होद)
४. बंगाली भाषेत चहा खातात.
५. तर्कारी हा शब्द हिंदी आणि कन्नड मधे भाजीसाठी वापरतात.
६. बातम्या देताना इंग्रजीमधे बातम्या वाचतो असे सांगतात, मराठीमधे देत आहे असे सांगतात, आणि
हिंदीमधे ऐका अशी विनंती करतात.
७. कन्नडमधे शेवटचा आकार लुप्त असतो. उदा - अनुपमा हे अनुपम असे लिहितात.

भाषेविषयी अशा मनोरंजक गोष्टी तुमच्या कडे असतील तर जरुर या धाग्यावर लिहा.

प्रतिक्रिया

'पिंक' पॅंथर्न's picture

24 Nov 2015 - 5:58 pm | 'पिंक' पॅंथर्न

ते भाषांच ठिक आहे ... पण लेखनाचं पार वाट्टोळं केलं राव तुम्ही !!

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2015 - 5:59 pm | प्रसाद१९७१

ते भाषांच ठिक आहे

भाषा नाही हो, भाशा म्हणायचे...

शान्तिप्रिय's picture

24 Nov 2015 - 6:01 pm | शान्तिप्रिय

प्रथमच लिहितोय.
माफी असावी.

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2015 - 6:05 pm | प्रसाद१९७१

तुम्ही नावाप्रमाणे शांतीप्रिय असावेत.

माफी वगैरे मानण्याची इथली प्रथा नाही, आणि त्याची गरज पण नाही.

'पिंक' पॅंथर्न's picture

24 Nov 2015 - 6:06 pm | 'पिंक' पॅंथर्न

मी लहानपणी "भाषा" हा शब्द "भाषा" असाच शिकलोय !!

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2015 - 6:07 pm | प्रसाद१९७१

अहो पण लेखक भाशे बद्दल बोलतायत.

'पिंक' पॅंथर्न's picture

24 Nov 2015 - 6:09 pm | 'पिंक' पॅंथर्न

तो "भाषा" चा प्रतिसाद तुम्हाला द्यायचा होता चुकुन "शांतीप्रिय" ना गेला ...

सागरकदम's picture

24 Nov 2015 - 6:15 pm | सागरकदम

कोणाला ?

चित्रगुप्त's picture

24 Nov 2015 - 6:00 pm | चित्रगुप्त

लेखाचा विषय चांगला आहे आणि वाचकांनी प्रतिसाद दिल्यास खूप विस्तार होऊ शकतो . परंतु मुळात धागाकर्त्याने शुद्धलेखनाकडे नीट लक्ष देऊन, प्रकाशित करण्यापूर्वी लेखन अचूक होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे .

बबन ताम्बे's picture

24 Nov 2015 - 6:07 pm | बबन ताम्बे

कामवालीला कळायला नको हे. नाहीतर दोन कामांचे पैसे मागेल.
:-)

असंका's picture

24 Nov 2015 - 7:39 pm | असंका

=)) =))

दमामि's picture

25 Nov 2015 - 8:00 am | दमामि

:):)

शान्तिप्रिय's picture

24 Nov 2015 - 6:24 pm | शान्तिप्रिय

प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार
मिसळ्पाव सारख्या प्रसिध्ध सन्केत्स्थळावर पहिला लेख लिहिण्यास उतावीळ होतो.
ब्याकस्पेसने घात केला. हळू हळू शुद्द्धलेखन सुधारेल.
:)

कपिलमुनी's picture

25 Nov 2015 - 11:59 am | कपिलमुनी

क्रोम वापरत असाल तर मोझिला फायरफॉक्स वापरा, सोपा पडेल (?) सोपा जाईल , सोपा होइल !

शान्तिप्रिय's picture

24 Nov 2015 - 6:39 pm | शान्तिप्रिय

गुजराथीत वाहन हाकतात. इयत्तेला धोरण असा शब्द आहे.
मराठीत तूर्त हा शब्द आपण तात्पुरता या अर्थाने वापरतो. कन्नड मध्ये तूर्तू म्हणजे आपत्कालीन.

तिमा's picture

24 Nov 2015 - 6:40 pm | तिमा

घासलेली व विसळलेली भांडी पुसून ठेवण्याचेही तिसरे काम आहे. लादी-पोता मधेही केर काढणे व फरशी पुसणे ही दोन कामे आहेत. कपडे धुण्यांत कपडे धुणे व वाळत घालणे ही स्वतंत्र कामे आहेत.
ज्या दिवशी भारतात कामवाला/कामवाली मिळणार नाहीत किंवा परवडणार नाहीत त्याच दिवशी अच्छे दिन आले, असं म्हणता येईल.

त्याच दिवशी अच्छे दिन आले, असं म्हणता येईल.

तेव्ह्ढंच नाही, तर त्या कामवाल्यांन्ना स्वतःसाठी भांडी आणि कपडे धुवणयन्त्रे विकत घेणे आणि वापरणे परवडेल तेव्हा खरं....

जयन्त बा शिम्पि's picture

25 Nov 2015 - 6:05 am | जयन्त बा शिम्पि

हॉटेलात वेटर अन्नपदार्थ ' वाढतात ' आणि जंगलात झाडे ' वाढतात '
मी ' पुण्यात ' रहातो आणि लोकांनी ' पाप आणि पुण्यात ' फरक केला पाहिजे.

नाखु's picture

25 Nov 2015 - 8:47 am | नाखु

मागील २-३ आठवड्यातील मिपा रतीब लेख वाचा.. उलगडा होईल.

"काही लेख वाचाल तर वाचाल"
आणि काही लेख न वाचाल तर नक्की वाचाल... अता कसे वाचायचे ते तुम्ही ठरवा..

वाचलेला मिपाकर

परिकथेतील राजकुमार's picture

25 Nov 2015 - 10:29 am | परिकथेतील राजकुमार

पण मिपाकरांना सगळ्यात जास्ती कशाची धास्ती असेल तर,
"मिपावर प्रथमच लिहितोय. चुकल्यास समजुन घ्यावे."
ह्या ओळीची.

असंका's picture

25 Nov 2015 - 10:58 am | असंका

_/\_

शंभर टक्के सहमत....

आपले वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान चांगले असावे. अजून सविस्ताराने लिहावे. पुलेशु (पुढील लेखनास शुभेच्छा). शक्यतो काही दिवसांचा गॅप घेऊन टाकणे नाहितर अतिपरिचयातवज्ञा होईल.

आदूबाळ's picture

25 Nov 2015 - 12:50 pm | आदूबाळ

युनि०च्या पहिल्या दिवशी सगळ्या सहाध्यायांच्या आपसांत ओळखी व्हाव्यात म्हणून एक डिनर आयोजित केलं होतं. माझ्या शेजारी एक चिनी होता. इंग्लिशची बोंब - एक इलेक्ट्रॉनिक डिक्शनरी वापरून अडखळत अडखळत बोलत असे.

एकमेकांच्या फ्यामिलीची वगैरे चौकशी करून झाली. मला एक मुलगा आहे हे समजल्यावर त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला, "how many more are you allowed to produce??"

मला काय उत्तर द्यावं समजेना!

बॅटमॅन's picture

25 Nov 2015 - 1:07 pm | बॅटमॅन

अगागागागा =)) =)) =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Nov 2015 - 1:47 pm | हतोळकरांचा प्रसाद

मग तुम्ही काय उत्तर दिलं? (मला उगाचच वऱ्हाड निघालंय…मधलं "…अवर वावर प्रोडूस्ड" आठवलं)!

आता "प्रोड्यूस" म्हणून एकदम वैयक्तिक पातळीवर गेल्यावर काय उत्तर देणार? =)) ते कँटोनिझचं थेट भाषांतर होतं!

पण काही दिवसांनी "हाऊ मेनी आर यू अलाऊड..."चा उलगडा झाला. चीनमध्ये एकापेक्षा जास्त मुलं होऊन द्यायची असतील तर बर्‍याच सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात म्हणे.

सूड's picture

25 Nov 2015 - 3:45 pm | सूड

वाईट्ट!! =))

प्रत्येक भाषेला स्वत:च्या इडियॉसिंक्रसीज असतात हे तर आहेच, आणि एकच शब्दप्रयोग दोन भाषांत खूपच वेगवेगळ्या छटांनी होताना दिसतो. लाचार/ लाचारी याचा हिंदीत उपयोग मजबूर, डिपेन्डन्समुळे हात बांधले गेलेला असाच आहे पण मराठीत तो फारच केविलवाणेपणा, मिंधेपणा आणि प्रसंगी फेकलेला तुकडा खाऊन लोचटासारखा लांगूलचालन करणारा इतक्या रेंजमधे वापरला जातो. हिंदीत तितक्या मानहानीकारक अर्थाने तो नसावा.

लेखाचा विषय रोचक.

रुपी's picture

26 Nov 2015 - 12:00 am | रुपी

मी आधी मराठीतला "हैराण" आणि हिंदीतला "हैरान" यात गडबड करायचे. एकदा एका मैत्रिणीला कुठला तरी त्रासदायक अनुभव सांगताना "मै हैरान हो गई" म्हटल्यावर ती माझ्याकडे गोंधळून पाहायला लागली, मग लक्ष्यात आले की मी बहुतेक "परेशान" म्हणायला हवं होतं.

तसंच मराठीत "लाज" हा शब्द थोडा गोंधळात टाकणारा आहे. इंग्रजीमधल्या shame/ embarrassment सारखा नुसताच शब्द वाचून नक्की अर्थ कळत नाही.
(बाकी भाषांमध्ये अशी बरीच उदाहरणे आहेत.)