देशातल्या सध्याच्या असुरक्षित वातावरणामुळे पत्नी किरण राव हिला मुलाच्या सुरक्षिततेची चिंता वाटत होती व आपण हा देश सोडावा का, असे तिने आपल्याला विचारले होते, हा गौप्यस्फोट आमीरने केला आहे. खरे तर तो एवढेच एक वाक्य बोलला नव्हता, तर त्याच्या पुढे मागेही बरेच काही बोलला. त्याचे चित्रपट जेवढे मन लावून पाहिले जातात तेवढे काळजीपूर्वक त्याचे विधान ऐकले अथवा वाचले असते तर पुढचा कोणता प्रश्न आणि टीका-टिप्पणी झालीच नसती. मात्र, विचारवंत असल्यासारखे तो उथळपणे काही तरी बोलला व त्याच्यावर जीव ओवाळून टाकायलाही मागेपुढे न पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांनी त्याला “लक्ष्य’ केले.काहींनी तर त्याच्या चित्रपटांचे दाखले दिले आहेत व खान असूनही या देशाने त्याला स्वीकारले याची आठवण करत त्याला भारत कसा सहिष्णू देश आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.माणूस बोलायच्या ओघात काहीतरी भावूकपणे बोलून जातो, तसा आमीरचा हा मामला कदाचित असू शकतो. त्याचे एवढे गंभीर परिणाम होतील याची त्याने अपेक्षा केली नसावी. तथापि, त्याला जे अभिप्रेत नव्हते तशा ताबडतोब प्रतिक्रिया व्यक्त करून त्याच्या टीकाकारांनी तरी काय साधले आहे? देशात गेल्या महिना-दीड महिन्यांत सगळीकडे बातम्यांचा जो मारा चालला होता, पुरस्कार वापसीचा जो कोलाहल माजला होता, त्यावर एकट्या आमीरनेच नाही तर भारतातल्या प्रत्येक सुज्ञ माणसाने चिंतन केले असणार आणि जेथे काही भूमिका मांडायची संधी मिळाली तिथे ती मांडली असणार. जकुमार हिरानीच्या “पीके’ या चित्रपटात आपल्या धर्मातल्या “बाबा’ संस्कृतीवर खुमासदार- मिश्कीलपणे कोरडे ओढण्यात आले आहेत. अडीच-तीन तासांचा तो चित्रपट काही जणांचा विरोध वगळता बहुतेक भारतीयांनी डोक्यावर घेतला. त्याचे कारण त्यातील नायकाची पार्श्वभूमी, मनोभूमिका प्रेक्षकांनी पूर्णपणे समजावून घेतल्या.
त्याच्या समर्थनासाठी पुढे आलेल्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या भूमिकांना काही अर्थ नाही. किंबहुना त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे. मात्र त्याच्या सहकलाकारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा आमीरनेही जरूर विचार करावा. देशात काही चुकीचे घडत असेल किंवा घडले असेल तर देश सोडायचा विचार करायचा नसतो तर तो बदलायचा प्रयत्न करायचा असतो, हे जे परेश रावल आणि अनुपम खेर या ज्येष्ठ कलाकारांनी त्याला सुचविले आहे, त्याचा त्याने निश्चितपणे विचार करावा.“अतिथी देवो भव:’च्या कॅम्पेनमधून अथवा “सत्यमेव जयते’मधून आमीरने भारतीयांना जे जे सांगितले ते सगळे त्यांना भावले, त्यांच्या मनावर बिंबले. त्यामुळे हा देश आणखी चांगला कसा होईल, यासाठीच त्याने प्रयत्न करायला हवेत, अशी त्याच्याकडून अपेक्षा
देश सोडायचा का जपायचा?
गाभा:
प्रतिक्रिया
25 Nov 2015 - 1:02 pm | सागरकदम
मी पयला
25 Nov 2015 - 1:05 pm | हतोळकरांचा प्रसाद
एकाच विषयावर दोन धागे उघडले गेलेले दिसतात!
सहमत! या माणसाचे चित्रपट बघणं मागेच बंद केलं आहे. स्वता:ला परफेक्शनिस्ट म्हणवणारा हा (लौकीकार्थिक) हिरो आजकाल आपले चित्रपट यशस्वी करण्यासाठी असले फालतू मार्ग वापरतो यातच सगळं आलं! नाना पाटेकर, अक्षय कुमार या खर्या हिरो मंडळींना सलाम करावा वाटतो.