लिखित पुराव्याने सिद्ध होणाराच खरा इतिहास असे मानले तर ज्या राष्ट्रात परकीय आक्रमकांनी इतिहास नष्ट केला लिखित इतिहास ठेवायची प्रथा नव्हती ,किवा जुने दस्त ऐवज, इतर खाणाखुणा काळाच्या ओघात नष्ट झाल्या त्या संस्कृतीना इतिहासच नव्हता असे मानायचे का ? जिर्ण पिवळ्या कागद पत्रांनी सिद्ध होणारा फक्त इतिहास आणि लोककथा , वदंता, आख्यायिका या द्वारे प्रकट होणारा इतिहास हा इतिहास नाही असे का . आशिया खंड कायम युध्यमान राहिला , सत्तेत स्थित्यनतरे झाली आणि ज्याला इतिहासाची साधने असे रूढ अर्थाने म्हणता येईल ती नष्ट झाली . युरोप त्या मानाने स्थिर राहिला नंतर युरोपिअन जेथे जेथे गेले तेथे जेते म्हणुन म्हणून गेले अन्य आक्रमक जेथे जेथे गेले तेथे त्यांनी इतिहासाची साधने नष्ट केली . पण मोखिक कथा आणि अख्यायीकांच्या रुपात इतिहास राहिला त्यामुळे या देशांना खरा इतिहास नाही असे म्हणणे सयुक्तिक वाटते का ?
कॅस्पियन (कश्यप) समुद्रास खेटून व तुर्कस्तान, इराण आणि रशियांच्या सिमेस लागुन असलेल्या अझेरबैजन नामक देशातल्या एका अग्नी मंदिरात असलेला एक संस्कृत देवनागरी शिलालेख, या शिलालेखाची सुरुवात 'श्री गणेशाय नम:' ने सुरु होते..असे अनेक शिलालेख या परिसरात असल्याने हिंदू धर्माची व्याप्ती एकेकाळी किती होती हे लक्षात येते.
संदर्भ- इतिहासाच्या पाउलखुणा
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 9:32 am | संदीप डांगे
फोटो दिसत नाही
21 Nov 2015 - 9:43 am | प्रचेतस
अक्षरवाटीका बघता शिलालेख जवळपास शिवकालीन असल्याचे जाणवतच होते. संवत १८०२ अस्पष्टसे दिसतेय.
अधिक शोध घेता https://en.wikipedia.org/wiki/Ateshgah_of_Baku इथे अजून माहिती मिळाली. इस. १७४५ म्हणजे अगदी अलीकडचाच लेख आहे हा.
21 Nov 2015 - 11:40 am | एस
दुव्याबद्दल धन्यवाद! अतेश्गाह मंदिराबद्दलची माहिती रोचक आहे. एकदा आवर्जून भेट द्यायला हवी असे हे ठिकाण आहे.
21 Nov 2015 - 2:54 pm | राही
गेल्या एक दोन वर्षांत या प्रदेशातल्या एके काळच्या पारसी झोराश्ट्रियन वस्तीविषयी आणि त्यांच्या फायरटेम्पलविषयी एक लेख मुंबईच्या एका प्रथितयश दैनिकात आला होता. सुमारे २५०-३०० वर्षांपूर्वी इथे पारसी लोकांची व्यापारानिमित्ताने चलती होती तेव्हा हे मंदिर सुस्थितीत आणि जागते होते, नंतर पारसी वस्ती राहिली नाही तेव्हा मंदिर अडगळीत पडले. काही काळाने वायव्यसीमा भागातल्या हिंदू व्यापार्यांचे जाणेयेणे सुरू झाले तेव्हा त्यांनी या मंदिराचा पुनर्वापर सुरू केला, डागडुजीही केली. एकोणिसाव्या शतकात भारतातल्या पारसी लोकांनी मंदिराला मदत केली होती असाही उल्लेख त्यात होता.
ते हेच मंदिर की काय हे मात्र सांगता येत नाही.
22 Nov 2015 - 11:57 am | माहितगार