पॅरिस हल्ला

DEADPOOL's picture
DEADPOOL in काथ्याकूट
15 Nov 2015 - 9:58 am
गाभा: 

चार्ली हेब्दो हल्ला ही फक्त सूचना होती!
१३ तारीख ही फ्रांस च्या इतिहासातील सर्वात काळी तारीख म्हणून मानली जाईल.
२००च्या वर म्रुत्यू आणि अनेक जखमी.
'धिस टाइम इट्स वार!'
भारतावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो.
क्रुपया आपले मत मांडा.

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 10:02 am | DEADPOOL

युद्ध सुरू झाले आहे

वाक्ये मोजली. एकूण सहा आहेत.

बादवे मुंबई कुठे भारताबाहेर येते का? भारतात असा हल्ला झालाय, वास्तविक पाहता असे बरेच दहशतवादी आत्मघातकी हल्ले भारतात झाले आहेत. असो.

बादवे मुंबई कुठे भारताबाहेर येते का? भारतात असा हल्ला झालाय,
वास्तविक पाहता असे बरेच दहशतवादी
आत्मघातकी हल्ले भारतात झाले आहेत. असो:>>>>>>>>
भारतात मुम्बईचा हल्ला हा पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला होता.
भारतात आइसिस कडून हल्ला होऊ शकतो.
आपल्या अवांतर माहितीसाठी मुम्बई भारतात येते.

मारवा's picture

15 Nov 2015 - 5:24 pm | मारवा

एस
लेखाच्या शब्दसंख्ये कडे नका बघु क्वांटीटी कडे नका बहु क्वालिटी कडे बघा.
लेख अर्क स्वरुपात सुत्रबद्ध आहे. एक आपली प्राचीन रीत आहे जसे पतंजली योगसुत्र
केवळ मुद्देसुदच फाफटपसारा टाळुन टु द पॉइंट अस लिहीण्यासाठी प्रतिभा लागते.
ती वरील लेखकाकडे आहे.
सहा वाक्ये बघा एकेक वाक्य महावाक्य आहे.
महाकाव्या चा दर्जा लाभलेलं हे शब्दलेणं आहे.
शेवटच वाक्य फार च विलक्षण आहे.
एस तुमचा टीकात्मक प्रतिसाद वाचुन खेद वाटला.

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 5:50 pm | DEADPOOL

थँक्स.
पण आम्ही शालजोडितले घेत नाही.
परत पाठवतो.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 10:10 am | मुक्त विहारि

माझे मत....

माझा स्वतःचा ब्लॉग परत एकदा अपडेट करावा, असे वाटत आहे.

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 12:04 pm | DEADPOOL

करा मग

मुक्त विहारि's picture

15 Nov 2015 - 5:39 pm | मुक्त विहारि

म्हणून एक मिपाकर म्हणून माझे मत दिले.....

पण...पण...पण...

मी मात्र तुम्हाला मत विचारले न्हवते....

असो,

आपल्यासारख्या सुज्ञांना अधिक सांगणे न लगे.....

याॅर्कर's picture

15 Nov 2015 - 10:18 am | याॅर्कर

का कुणास ठाऊस पश्चिम रांष्ट्रांविषयी कधी सहानुभूती वाटलीच नाही,अमेरिकेबद्दल तर अजिबात नाही.
.
.
.
सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन इसिसला संपवणे काही कठिण नाही,थोडं खर्चिक असेलही आणि काही काळाकरिता अस्थिरता पसरेल एवढचं.
काय झोल आहे ते नक्की कळत नाही.
.
.
.
.
हल्ल्याचा निषेध

गामा पैलवान's picture

15 Nov 2015 - 3:46 pm | गामा पैलवान

यॉर्कर,

>> का कुणास ठाऊस पश्चिम रांष्ट्रांविषयी कधी सहानुभूती वाटलीच नाही,अमेरिकेबद्दल तर अजिबात नाही.

पश्चिमी राष्ट्रे म्हणजे पश्चिम युरोप आणि अमेरिका असं तुम्हाला अभिप्रेत असावं.

त्याचं काय आहे की या राष्ट्रांतल्या सामान्य जनतेने नेहमीच युद्धांना विरोध केला होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत शांतताप्रेमी गटांची चळवळ बरीच जोरात होती. पण सत्ताधारी वर्गातल्या काही लोकांना युद्ध हवं होतं. हाच प्रकार युद्ध संपल्यावरही चालू राहिला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात जी युद्ध पश्चिमी राष्ट्रांनी लढली आहेत ती सगळी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध आहेत. उदा. : व्हियेतनाम, इराक, गांधार, यादी अपूर्ण. सत्ताधारी कंपू म्हणजे उर्वरित राष्ट्र नव्हे. अगदी भारतातले सत्ताधारीही काश्मिरी हिंदू नागरिकांचं शिरकाण उघड्या डोळ्यांनी बघत बसलेच ना? न्यूयॉर्कच्या असो वा माद्रिदच्या वा लंडनच्या वा पॅरिसच्या वा मुंबईच्या, भ्याड हल्ल्यांत मेलेले निरपराधच होते. आणि सर्बिया, इराक, युक्रेन व गांधारात मेलेलेही निरपराधच होते.

जगात सर्वत्र शांतताप्रेमी नागरिक सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यात अपयशी ठरलेत. म्हणून जगातले बहुतांश नागरिक सहानुभूतीस पात्र नाहीत असं समजावं का?

आ.न.,
-गा.पै.

का कुणास ठाऊस पश्चिम रांष्ट्रांविषयी कधी
सहानुभूती वाटलीच नाही,अमेरिकेबद्दल तर
अजिबात नाही.
.>>>>>>>>>>
संहारक शस्त्रास्त्रे ही यांचीच निर्मिती. अणुबाँबचा शोध यांचाच. मिसाईल यांनीच बनवले. दोन महायुद्ध यांच्या हव्यासापोटी झालीत.

भाऊंचे भाऊ's picture

16 Nov 2015 - 12:24 am | भाऊंचे भाऊ

सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन इसिसला संपवणे काही कठिण नाही,थोडं खर्चिक असेलही आणि काही काळाकरिता अस्थिरता पसरेल एवढचं.

इस्त्राएल ने अमेरीकेवर हल्ल्या नंतर स्पश्ट ऑफर दिली होती, अख्ख्या जगातला दहशत्वाद आमी मोडुन काढतो. तेसुधा आमचेच रिसोर्स वापरुन. तुम्ही कोणीही कसलीही साथ देउ नका अन महत्वाचे म्हणजे हे करताना कुठे मधे येउ नका. बोला आहे तयारी ? यावर अमेरिकेने काय उत्तर दिले असेल ?

काळा पहाड's picture

16 Nov 2015 - 12:44 am | काळा पहाड

बहुधा खरं नसावं. पण अशी ऑफर इस्त्रायलनं भारताला दिली होती असं ऐकलंय (काहुटा अणुभट्टी उडवण्याबद्दल).

मी आणखी सुद्धा एक ऐकलं आहे. अमेरिकेनं म्हणे मुस्लिम जगताला सांगितलं होतं की अमेरिकेवर पुन्हा हल्ला झाला तर एक अणुबाँब मक्केवर आणि एक मदिनेवर टाकू म्हणून. खरं खोटं अल्ला जाणे. पण बुश बाबाकडं बघता खरं सुद्धा असू शकतं.

भंकस बाबा's picture

16 Nov 2015 - 9:54 am | भंकस बाबा

इझराइल हा देश प्रखर धर्माभिमानी आहे. ते खुलेआम पलेस्टिनिना धमकावतात. ते बोलतात जर तुम्ही एक ज्यू मारलात तर आम्ही चार मारू, आणि चाळीस मारून दाखवतात. तसेपण ज्यूचि लोकसंख्या घटत आहे. त्याला कारण दहशतवाद नाही तर त्यांचा धर्मच आहे कारण ज्यू धर्मान्तरावर विश्वास ठेवत नाही. कोणीही ज्यू धर्मात प्रवेश करु शकत नाही त्यासाठी जन्माने ज्यू असणे आवश्यक आहे. यानी हम तो डूबेंगे पर साथमें आपको भी ले डूबेंगे। तसेपण ज्यू धर्माला खिंडार पाडणाऱ्या ख्रिचन् व् मुस्लिम धर्माविषयी ज्यू ना आकस आहेच. हिंदुस्तान वगळता जगात सर्वत्र ज्यू वर अत्याचार झाले त्यामुळे ज्यूचि सहानभूति नेहमीच भारताच्या बाजूला असते. २६/११ देखील नरीमन हाऊस वरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी इझराइलने भारताला खुली ऑफर दिली होती. पण अल्पसंख्यकाना वाइट वाटेल म्हणून ही ऑफर नाकारण्यात आली

एक सामान्य मानव's picture

16 Nov 2015 - 2:40 pm | एक सामान्य मानव

खूप दिवसांनी गावातल्या कट्ट्यावर बसल्यासारखं वाटलं. हे इस्त्राएल वगैरे लोक "स्पश्ट ऑफर"ची एक प्रत भाऊंना पाठवत असावेत.

भंकस बाबा's picture

16 Nov 2015 - 6:33 pm | भंकस बाबा

नरीमन हाउस हे मुंबईतील ज्यू लोकांचे उतरण्याचे एक केंद्र आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा तेथील सात ज्यूना बंधक बनवण्यात आले होते. हे बंधक नाटक तीन दिवस चालले. इझराइल जगातील प्रत्येक ज्यूचि नोंद ठेवत असतो. याच अनुषंगाने इस्राएलने भारताकडे कमांडो कारवाईचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारताने तो नाकारला कारण एकतर आपल्या देशात कमांडो असताना दुसऱ्या देशाकडून मदत घेणे नामुष्कीचे होते, शिवाय आपल्याकडिल अल्पसंख्यकाना इस्राईलची उपस्थिति नेहमीच खटकते.
आता राव तुम्ही गावच्या पिंपळाच्या पारावरून उतरून घरी गेल्यावर सांस-बहुच्या मालिका बघण्यापेक्षा जरा न्यूज़ चॅनेल बघत जाकी.
इस्राईलच्या ताकदिला कमी लेखु नका. ऑपरेशन थंडरबोल्ट बद्दल वाचा. चांगली माहिती आहे. अमेरिका नेहमी दुसऱ्या देशावर दादागिरी करत असते पण इस्राईलच्या पुढे ते थंड बसतात कारण अमेरिकन बैंकिंग व्यवस्थेवर ज्यूचें वर्चस्व आहे.

सुबोध खरे's picture

17 Nov 2015 - 10:11 am | सुबोध खरे

इस्रायल ने काहूटा वर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रस्ताव भारताला दिला होता हे सत्य आहे. (यात भारताला त्यांच्या लष्करी विमानांना जाताना आणि येताना इंधन आणि इतर सुविधा देण्याची मागणी केली होती.) कारण दोन दिवसातच पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादिर खान यांनी आमची सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवलेली नाहीत असे प्रकटीकरण केले होते. अर्थात हि त्यावेळेस दर्पोक्ती होती पण त्यानंतर मात्र पाकिस्तानने ती प्रक्रिया युद्ध पातळीवर हाती घेतली आणि आपल्या अणुबॉम्बची संख्या झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली.
भारतीय नेत्यांनी त्यावेळेस कबुतरे उडवण्याचा नाद लागल्यामुळे आणि कदाचित अणुयुद्धाला आणि अंतर्गत बंडाळीला तोंड फुटेल या भीतीने तो प्रस्ताव नाकारला होता.
इस्रायलच्या क्षमतेबद्दल आपल्याला शंका असण्याचे कारण नाही. ओसिराक येथील इराकची अणुभट्टी त्यांनी आतुन आणि बाहेरून स्फोट करून उडवून लावली होती.
https://en.wikipedia.org/wiki/Operation_Opera
अशाच तर्हेने सिमेंन्स कंपनीची इराणमधील अणुभट्टी अमेरिकेने आणि इस्रायलने त्यांच्या संगणक प्रणालीत विषाणू घुसवून निकामी केली म्हणून इराण अणुकेंद्र्कीय समन्वयासाठी तयार झाला.
https://en.wikipedia.org/wiki/Stuxnet

शलभ's picture

17 Nov 2015 - 12:59 pm | शलभ

छान माहिती.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Nov 2015 - 3:05 pm | अनिरुद्ध.वैद्य

मी बहुधा इथेच वाचले की तुर्भे आण्विक केंद्र उडवून टाकायची धमकी दिली होती?

या विषयीच एक बातमी हल्लीच आली होती :-

In fact: Did India plan a covert military attack on a Pakistani nuclear reactor?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tail wags the dog

भंकस बाबा's picture

15 Nov 2015 - 10:23 am | भंकस बाबा

यूरोपीय देशांना मुस्लिम आंतकवादाचि मोठी किमंत चूकवावी लागणार आहे. त्याला कारण आहे त्यांनी शर्णार्थिना दिलेला आसरा. हेच शरणार्थी पुढे जाऊन आंतकवादी बनणार आहेत. मला माझ्या बाजूला रहात असलेल्या अब्दुलचि वा रहिमचाचाची भीति वाटत नाही. पण त्यांचा धर्म जेव्हा बोलतो की सर्व जग इस्लाममय होणार आहे तेव्हा धर्मवेडापायी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2015 - 10:34 am | कैलासवासी सोन्याबापु

लोकांना युद्धाचे काय आकर्षण आहे माहिती नाही बुआ कालपासून सत्राशे साठ लोक दिसले तेच बोलताना "युद्ध सुरु झाले आहे" मुळात इंसर्जंसी प्रॉब्लम जेव्हा पासुन सुरु झाला तेव्हापासुन शहरी युद्ध सुरूच आहे एखादा ठळक हल्ला झाला की ते दिसुन पड़ते इतकेच अन खरोखरचं युद्ध सुरु होऊन दारापर्यंत पोचलं की घाबरगुंडी उड़ेल ती वेगळी

पॅरिस हल्ल्याबद्दल :-

पॅरिस च्या जनते बद्दल सहानुभूति अन दुःख पण हे विसरता कामा नये की ही फळे फ्रांस च्या जुन्या वसाहतवादी कर्माची आहेत बऱ्याचप्रमाणात!

काळा पहाड's picture

15 Nov 2015 - 12:07 pm | काळा पहाड

खरोखरचं युद्ध सुरु होऊन दारापर्यंत पोचलं की घाबरगुंडी उड़ेल ती वेगळी

मला वाटतं तुम्ही अजुन सुद्धा विसाव्व्या शतकातल्या मिलिटरी प्रमाणे विचार करता. सध्या युद्ध दारापर्यंत पोहचूच द्यायचं नसतं. आणि ते करणारे सगळेच म्हणजे न्युक्लीयर सायंटीस्ट्स, सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स, ड्रोन डिझायनर्स, अ‍ॅन्टी मिसाईल सिस्टीम डिझायनर्स हे सगळे अ-पारंपारिक सैनिकच आहेत. आणि हे जरी हातघाईची लढाई करू शकणार नसते तरी त्यामुळे त्यांचं महत्व कमी होत नाही. उलट येत्या काही दशकात रोबोट्स सैनिकांची जागा घेतील आणि पारंपारिक मिलिटरी फक्त रिझर्व कारणांसाठी वापरली जाईल. जो देश हे करत नाही (उदाहरणार्थ इराक) तो नष्ट होतो. जो हे करतो (उदाहरणार्थ अमेरिका) तो जगावर राज्य करतो. तेव्हा तुमच्या पेशाबद्दल (आणि तुमच्याबद्दल) आदर ठेवून असं म्हणावंसं वाटतं की लोकांना पारंपारिक युद्धाचं आकर्षण नाही पण शत्रूला रिमोट कंट्रोलनं नष्ट करण्याचं आकर्षण आहे आणि ते वाढत जाणार आहे. शिवाय शत्रू ला कसं नामोहरम करायचं याचा विचार प्रत्येक नागरिकानं करायला हवा. ते फक्त मिलिटरीचं काम असण्याचे दिवस गेले. जसं तुम्ही राजकारणाबद्दल, साहित्याबद्दल, शहरांबद्दल, विकासाबद्दल आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलता तसं बाकीचे नागरिक युद्धाबद्दल बोलत असतील तर तुम्हाला वैषम्य का वाटावं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2015 - 12:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

वैषम्य वगैरे जाणवले का? :O असल्यास दोष माझ्या अभिव्यक्ति चा समजा, तुमच्यामाहिती करता म्हणून सांगतो मला त्यागोष्टीचे अजिबात वैषम्य नाही उलटे सैनिकी कार्यकलापासंबंधी नागरिकांचे वाढते ज्ञान हे एकार्थी उत्तमच लक्षण वाटते मला , आता थोड़े नागरिक सैन्य अन नागरिक आयुष्यातली सैनिकी वृत्ती ह्याच्या बद्दल, मुळात तुम्ही सांगितले ते बहुतांशी बरोबरच आहे, तरीही ड्रोन डिज़ाइनर, प्रोग्रामर वगैरे किमान ट्रेनिंग घेतलेले असले तर त्यांचे सल्ले ऐकायला ही उत्तम वाटतात, मला कोणी ही युद्धावर शास्त्रोक्त बोलले तर आवडते ९०% वेळा त्यातुन काहीतरी मला ही शिकता येते, पण दुर्दैवाने कित्येक म्हणजे बहुसंख्य वेळी हे फ़क्त भावनिक पातळी वर असते अन त्या बहुसंख्य भावनिक नागरिक सैनिकांच्या तोंडून "टाका एकदाचा अणुबॉम्ब अन करा खेळ खलास" वगैरे आंदोलने ऐकू येतात, म्हणून मी माझे वेगळे मत नोंदवले,

बाकी ड्रोन डिज़ाइनर, प्रोग्रामर प्रभुति मंडळी उत्तम कार्य करतातच हे वेगळे सांगणे न लगे तरीही त्यांच्या ज्ञानातून तयार झालेली ही अव्वल कलाकारी वापरून मिशन एक्सीक्यूट करायला मात्र आजही विसव्या शतकाच्या लाइन अन फ़ाइल सिस्टम मधे ट्रेंड डिफेन्स फोर्सेजच लागतात इतके मात्र मी नक्की म्हणेन, बाकी येत्या काही दशकांत रोबोट्स वगैरे वगैरे मला आज तरी अशक्य वाटते नपेक्षा ड्रोन मागे ही(उत्तम डिज़ाइन असणारे) विसव्या शतकातल्या कालबाह्य सैनिकांच्या जागी कुशाग्र बुद्धिमान तांत्रिक हैंडलर असताना सुद्धा हॉस्पिटल्स अन लग्नाच्या वराती वर त्यांनी बॉम्ब पाडणे बंद केले तरी मिळवले येत्या काही दशकांत म्हणे मी.

ता.क. :- आपण माझ्या विषयी माझ्या पेशाविषयी जो आदर दाखवत होता/आहात त्याबद्दल मी सदैव आपला ऋणी होतो/राहेन ह्याबद्दल शंका न बाळगणे

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 7:44 pm | DEADPOOL

बापू ही रोबाटिक् आर्मी आई रोबोट, आपला रजनीकांत रोबोट आणि आइरन मॅन मुळे लोकप्रिय झाली.

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 9:56 pm | DEADPOOL

घ्या ते आर्मी रोबोट्चे चित्र देखील आई रोबोट मधलेच !!!!!!!!!!!

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 12:11 pm | DEADPOOL

बापू याचे एकच उत्तर "सत्ता "

हे मात्र अंतिम सत्य आहे.आजही शिवाजी घडावा दुसर्‍याच्या घरात सैन्यात मुलगा असावा पण शेजार्‍याचा ही मानसिकता मात्र तशीच्या तशी आहे. नाहीतर जे ओंबाळेंना जमल ते मुंबई हल्ल्यात सापडलेल्या अथवा घटना स्थळी असणार्‍या हजारो मुंबईकरांना नक्की शक्य होत पण सामान्य माणुस प्रतिकाराकरीता उतरलाच नाही तो फक्त सरकारला शिव्या घालत होता आणी सशस्त्र सेनादलाची वाट पहात होता अन्यथा ११ विरोधात काही लाख प्रमाण जरा जास्तच व्यस्त होत नाही

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Nov 2015 - 12:07 am | अनिरुद्ध.वैद्य

पॅरिस च्या जनते बद्दल सहानुभूति अन दुःख पण हे विसरता कामा नये की ही फळे फ्रांस च्या जुन्या वसाहतवादी कर्माची आहेत बऱ्याचप्रमाणात!

>>

भरपूर जनता असेच म्हणतेय ... पण का कुणास ठाऊक, फ्रांसच्या वसाहती मला अरेबीयात सापडल्याच नाहीत. कुठे होत्या ते सांगितल्यास आभारी राहील.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 9:50 am | कैलासवासी सोन्याबापु

फ्रांस च्या इजिप्त ला चिकटुन असलेल्या मैंडेट (वसाहती)

.

फ्रांस च्या लिवांट व अनातोलिया प्रदेशातील वसाहती

.

आता मुद्दा उरतो फ्रांस ची वसाहतवादी कर्मे

तर, पहिले एक अगदी प्रार्थमिक निरिक्षण ते म्हणजे असे की आजही जगात जिथे जिथे अशांतता पसरलेली आहे तिथे कुठल्या न कुठल्या यूरोपियन वसाहतवादी देशाने घाण करून ठेवलेली आहेच तुम्ही उदाहरण दखल वर उल्लेख केलेला लिवांट प्रदेश पहा (इस्राएल पलेस्टाइन किंवा पर्यायाने इस्राएल अरब जगत,इजिप्त प्रॉब्लम) किंवा अगदी भारत पाकिस्तान प्रॉब्लम बलूचिस्तान कश्मीर प्रश्न (ब्रिटिश देणगी).

आपला मुख्य मुद्दा आहे मध्यपूर्वेतली फ्रेंच पापे, वर पाहिल्याप्रमाणे लिवांट चा भूमध्य समुद्री किनारा (आजचा लेबनॉन अन इस्राएल) हे पूर्णपणे फ्रेंच ताब्यात होते अन मधला इजिप्त सोडता पार लीबिया अल्जीरिया अन मोरक्को म्हणजे पश्चिम अफ्रीकन किनार्यापर्यंत फ्रेंच वर्चस्व होते, तरीही इजिप्त मधे ब्रिटिश अन फ्रेंच ह्यांचा ख़ासा रस त्याचे कारण म्हणजे सुएज कालवा, तो कालवा बांधताना ब्रिटिश लोकांनी तांत्रिक मदत इजिप्त ला केली करार बहुतेक हा की बांधकाम वसूली होइस्तोवर कालवा अन तिथून कोणाला जावु द्यायचे हे ठरवण्याचा हक्क ब्रिटिश लोकांना असणार होता, कावा हा की काहीही करता फ्रेंच लोकांस कालवा वापरता येऊ नये जेणे करून त्यांना पार केप ऑफ़ गुड होप (दक्षिण अफ्रीका) ला वळसा घालुन यायला भाग पडावे ज्यामुळे पूर्वेकडील फ्रेंच वसाहती (इंडोचायना म्हणजे वियतनाम थाईलैंड लाओस कंबोडिया सुमात्रा) मधुन येणारा मसाला त्यांना हाय ऑपरेटिंग कॉस्ट्स मुळे महाग विकावा लागावा म्हणजे थोडक्यात मसाला व्यापारात ब्रिटिश एकाधिकार अबाधित राहावा.

ही झाली पूर्वपीठिका, आता आपण वळु आजच्या पॅरिस हल्ल्या कड़े किंवा लंडन सबवे बॉम्बिंग कड़े
तर वरती बोलल्या प्रमाणे सुएज ताब्यात हवा होता दोघांनाही मग त्यासाठी साम दाम दंड भेद ओघाने आले ह्या निती मधे एक निती होती इजिप्त अस्थिर ठेवणे जेणे करून तुला न मला घाल कुत्र्याला होईल अन ह्यातुन दोन्ही यूरोपियन पावर्स ने मुस्लिम ब्रदरहुड कड़े साफ़ दुर्लक्ष केले कारण पाहुण्याच्या काठीने साप मेला तर उत्तमच न? ही मुस्लिम ब्रदरहुड म्हणजे आजच्या सगळ्या दहशतवादी संघटनांची आजी बरंका ! बिन लादेन चा आज्या हिच्या आद्य कार्यकर्त्यातला एक होता ह्यावरुन अन जैस्मिन क्रांति मधली आजही त्यांनी मारलेली मुसंडी ह्यावरुन घ्या समजून काय ते परिणाम आज यूरोप हल्ले ते निर्वासित प्रोब्लेम्स मधुन भोगतो आहे अन त्यांच्या कर्माची फळे ते भोगत आहेत म्हणून मला विशेष कणव येत नाही त्यांची

फ्रांस ने तर पुढे जावुन स्वतःचीच वसाहत असलेल्या एलजीरियान नागरिकांस दिलेली द गॉल ह्यांच्या काळातील सपत्न वागणूक सुद्धा आहेच पण त्या मुद्द्यावर मला विशेष माहिती नाही म्हणून नो कॉमेंट्स

DEADPOOL's picture

16 Nov 2015 - 10:48 am | DEADPOOL

बापू हा प्रतिसादाच् वरीजीनल लेख म्हणून टाका.
अप्रतिम मांडणी!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 11:06 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो डेडपूल साहेब माझा इतका अभ्यास नाही अजुन झालेला अजुन थोड़े डिटेल्स अन अभ्यास जमा झाला की मग पाहु स्वतंत्र लेखाचे, तोवर तुमच्याच धाग्यावर धिंगाणा करतो (तुमची परमिशन गृहीत धरुन)

DEADPOOL's picture

16 Nov 2015 - 11:54 am | DEADPOOL

फुल्ल अथोरिटी !!!!!!!!

बोका-ए-आझम's picture

17 Nov 2015 - 10:16 am | बोका-ए-आझम

अल्जीरियामध्ये अनेक फ्रेंच नागरिक राहात होते. त्यांची तिथे मालमत्ताही होती. दुस-या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये अमेरिकन पाठिंब्यावर जे चौथं प्रजासत्ताक स्थापन झालं त्याला अल्जीरियन प्रश्न हाताळता आला नाही. नंतर चार्ल्स डी गाॅल यांच्या नेतृत्वाखाली पाचवं प्रजासत्ताक स्थापन झालं. ही राजवट अल्जीरियावरचा फ्रेंच हक्क अबाधित ठेवेल अशी अल्जीरियन फ्रेंच जनतेची आणि तिथल्या फ्रेंच सैन्याची अपेक्षा आणि खात्री होती. पण फ्रान्सला भेडसावणाऱ्या आर्थिक प्रश्नांमुळे डी गाॅलनी अल्जीरियाला स्वातंत्र्य दिलं. तिथल्या फ्रेंच नागरिकांना आणि काही सेनाधिका-यांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी फ्रान्सविरुद्ध बंड पुकारलं. OAS ही संघटना त्यातून निर्माण झाली. डी गाॅल अाणि त्यांच्याशी एकनिष्ठ फ्रेंच लष्कर आणि पोलिस यांनी ही बंडाळी निष्ठुरपणाने मोडून काढली. त्यात सर्व पश्चिमी युरोपियन देशांनी फ्रान्सला सहकार्य केलं. आणि त्यामुळे OAS च्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी इतरत्र हातपाय पसरले. काही जण आफ्रिकेतील यादवी युद्धांमध्ये लढायला गेले उदाहरणार्थ बाआफ्रा, सिंबा, झैरे,इत्यादी. काही जणांनी मध्यपूर्वेतील देशांचा रस्ता पकडला. अशा लोकांना पेरोलवर ठेवणारा पहिला हुकूमशहा म्हणजे लिबियाचा मुअम्मर गद्दाफी आणि दुसरा म्हणजे सीरियाचा हफीझ अल असद. सध्या तिथे असलेल्या बाशर अल असदचा बाप.
सुन्नी अरबांमध्ये दक्षिणी अरब उदाहरणार्थ सौदी, येमेन, सुदान इथले लोक आणि उत्तरी अरब उदाहरणार्थ लिबियन, लेबानीज, सीरियन, जाॅर्डेनियन असा फरक नेहमीच राहिला आहे. वहाबीझम हा दक्षिण अरबांमधून उदयास आला. अल कायदा, अल शबाब (सोमालिया), बोको हराम (नायजेरिया) हे दक्षिणी अरब. आयसिस हे उत्तरेकडील अरब. यांना एकेकाळी लिबियाचा पाठिंबा होता. लिबियाच्या Mukhabarat या गुप्तचर संघटनेने पाश्चिमात्य देशातल्या अनेक गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांना मदत केली होती, उदाहरणार्थ बाडर-माइनहाॅफ गँग, आय.आर.ए., रेड ब्रिगेड. इत्यादी. आणि Mukhabarat चे प्रशिक्षणकर्ते म्हणजे सोविएत रशियाची K.G.B. त्यामुळे आयसिस हे फक्त फ्रेंचांचं पाप आहे असं म्हणणं थोडं एकांगी आहे. त्याला शीतयुद्धाचाही संदर्भ आहे. In fact, स्वतः केजीबी एजंट राहिलेल्या पुतिन यांचा रशिया आयसिसविरुद्ध यशस्वी होण्याचं एक कारण तेही आहे. गुरु को पता है कि चेला क्या करेगा!

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2015 - 10:45 am | कैलासवासी सोन्याबापु

सुभान अल्ला बोका भाऊ _/\_

दंडवत घ्या आमचा

अल्जीरियन लोकांबद्दल मी उड़ता रेफेरेंस दिला होता अन त्यातले मला जास्त माहिती नाही हे ही बोललो होतो तस्मात् अल्जीरिया प्रॉब्लेम बद्दल इतके साद्यांत सांगुन माझी ज्ञानवृद्धी केल्याबद्दल खुप आभार हे वे सां न ल

तुम्ही जी "नेक्स्ट स्टेप इन जेनेसिस ऑफ़ आयसिस एंड ओवरऑल इस्लामिक टेररिज्म" सांगितली ती सुद्धा अतिशय माहितीपूर्ण आहे अन वसाहतवादी यूरोपियन लोकांनी पेटवलेली ही मशाल पुढे त्यांच्यातलाच असंतुष्ट गट (पक्षी OSA) अन दक्षिणेकड़ील समुद्रांत शिरकाव नसलेल्या रशिया सारख्या अस्वस्थ अस्वलानी कशी अजुन धुप घातली हे सुद्धा रोचक आहे अन jigsaw मधे एक एक तुकडा जोडल्या जावा तशी आहे!

Thanks once again

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Nov 2015 - 3:14 pm | अनिरुद्ध.वैद्य

दंडवत! __/|\__

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Nov 2015 - 3:11 pm | अनिरुद्ध.वैद्य

ही भानगड माहितीच नव्हती :) मी आपल इंडोनेशियात फ्रेंच वसाहती होत्या समजून चाललोय. धन्यवाद!
सारे ब्रिटीश उचापती ;)

बोका-ए-आझम's picture

19 Nov 2015 - 3:42 pm | बोका-ए-आझम

इंडोचायनामध्ये. म्हणजे आजचा लाओस, कंबोडिया आणि व्हिएटनाम. १९५४ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला. डाॅ.हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखालील व्हिएटनामी सैन्याने फ्रेंचांचा दिएन बिएन फू या ठिकाणी निर्णायक पराभव करुन हा भाग स्वतंत्र केला. इंडोनेशियावर डचांचं राज्य होतं. त्याला डच ईस्ट इंडीज असं नाव होतं. मला वाटतं १९६० च्या आसपास इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळालं. चूभूद्याघ्या.

बांवरे's picture

16 Nov 2015 - 10:19 am | बांवरे

फळे फ्रांस च्या जुन्या वसाहतवादी कर्माची आहेत बऱ्याचप्रमाणात!

असे का ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 10:36 am | कैलासवासी सोन्याबापु

वरील प्रतिसाद वाचा

सध्या युद्ध दारापर्यंत
पोहचूच द्यायचं नसतं. आणि ते करणारे सगळेच म्हणजे
न्युक्लीयर सायंटीस्ट्स, सॉफ्टवेअर
प्रोग्रामर्स, ड्रोन डिझायनर्स, अॅन्टी मिसाईल
सिस्टीम डिझायनर्स हे सगळे अ-पारंपारिक सैनिकच
आहेत.+१

विवेकपटाईत's picture

15 Nov 2015 - 1:11 pm | विवेकपटाईत

कालच आंतरजालावर पॅरिस बाबत माहिती पहिली. गेल्या जानेवारी महिन्यापासून ज्यू लोकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढू लागले होते. ज्यूंचे पलायन हि सुरु झाले होते. फ्रांस सरकार या कडे कानाडोळा करीत होती. ज्यू लोकांना फ्रांस असुरक्षित वाटतो आहे, २०१४ मध्ये ७००० आणि २०१५ मध्ये आत्ता पर्यंत १०००० (अंदाज) ज्यूंचे फ्रांस मधून पलायन झाले.
According to the JTA, 2014 saw 105 violent attacks and 423 anti-Semitic incidents. So far in 2015, the French Jewish community has suffered 241 violent attacks against Jews, within the overall 851 anti-Semitic incidents, more than double last year's figures. Other European countries reported similar increases including the Netherlands, UK, and Belgium.
http://forward.com/news/breaking-news/213546/anti-semitic-incidents-doub...

फ्रांस मध्ये ९% मुस्लीम जनसंख्या आहे, निवडणुकीच्या वेळी त्यांचे महत्व आहे, ज्यू फ्रांस सोडून गेले तर बरंच होईल असे अनेकांना वाटत असेल. ज्यू गेले तर जेहादी लोक शांत राहतील. सरकारने सख्त कार्रवाई केली नाही. सरकारचा हलगर्जीपणा भोवला.

आपल्या देशात हि हाच प्रकार सुरु आहे, परिणाम आपल्यालाही भोगावे लागणार आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2015 - 1:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

इजराइल ने फ्रांस सोडुन मातृभूमी उर्फ़ इजराइल ला परतु इछिणाऱ्या फ्रेंच ज्यु लोकांस उघड आमंत्रण दिल्याचे ऐकिवात होते त्यांना इसरायली नागरिकता वगैरे देण्यात येणार होती असे ऐकिवात आहे डिटेल लिंक वगैरे कोणाला मिळाल्यास जरूर पोस्टावी

पुष्करिणी's picture

16 Nov 2015 - 3:44 am | पुष्करिणी

़जगाच्या पाठीवर कुठेही असणारा ज्यू हा इस्राइल चा बाय डिफॉल्ट नागरिक असतो आणि कधीही तिकडे जाउ शकतो. इट इज अ‍ॅन ओपन इन्व्हाइट.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Nov 2015 - 1:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपल्या देशात हि हाच प्रकार सुरु आहे, परिणाम आपल्यालाही भोगावे लागणार आहे.

मोदी आलेत न आता...

विवेक ठाकूर's picture

15 Nov 2015 - 2:11 pm | विवेक ठाकूर

विप यांच्यासारखा सदस्य असं लिहीतो म्हणजे आश्चर्य आहे .

नांदेडीअन's picture

15 Nov 2015 - 2:12 pm | नांदेडीअन

paris

हे ट्विटर हॅंडल फक्त एक ‘बॉट’ आहे, पण याचा मोघम अंदाज बघा किती खरा ठरलाय.
A spooky coincidence indeed !

माझ्या मते हे morphed आहे

गामा पैलवान's picture

16 Nov 2015 - 12:59 pm | गामा पैलवान

नांदेडीअन,

रोचक ट्विटचित्रं आहे. आज दोन दिवस होऊन गेलेत पण माध्यमांत एकही प्रेत दिसलं नाही. हा योगायोग समजावा का? शार्ली एब्दोच्या वेळेसही एकही प्रेत दिसलं नव्हतं. हा काय प्रकार चाललाय?

आ.न.,
-गा.पै.

चिरोटा's picture

16 Nov 2015 - 1:19 pm | चिरोटा

प्रेते दाखवण्याचा,प्रेताच्या बाजूला उभे राहून माईक घेऊन ओरडण्याचा प्रकार आपले मिडियातले लोक करतात.

DEADPOOL's picture

16 Nov 2015 - 1:27 pm | DEADPOOL

हो

अविनाशकुलकर्णी's picture

15 Nov 2015 - 2:49 pm | अविनाशकुलकर्णी

हो ना वापस करायला पुरस्कार पण आता राहिले नाहित

सागरकदम's picture

16 Nov 2015 - 12:12 am | सागरकदम

१३ tarikh?
kahi chuktey ka ?

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 11:09 am | बॅटमॅन

हल्ला वगैरे वाईटच, पण अलीकडे युरोपियन लोकांबद्दल काडीचीही सहानुभूती वाटत नाही. आपल्या कर्मानेच मरणार आहेत ते सगळे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 11:11 am | कैलासवासी सोन्याबापु

गॉथम नरेश सही बोला! डिट्टो भावना!

DEADPOOL's picture

16 Nov 2015 - 1:58 pm | DEADPOOL

गॉथम नरेशाचे स्वागत.

तुमचा ट्रॉय वरील धागा माझा अतिशय आवडता.

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 2:01 pm | बॅटमॅन

धन्यवाद डेडपूलजी. :)

भंगार प्रस्तावनेच्या काकू धाग्यावरील उत्तम प्रतिसाद वाचतेय.

बाजारात भंगारला सुद्धा भाव मिळतो.

मात्र आपणाला भाव मिळत नसल्याने आपणांस ही कल्पना सुचली असेल.

३ दिवस आणि काही तासांच्या आपल्या मिपा आयुष्यात आपण "मला भाव मिळत नाही" हा निकष काढला आहे इतकेच अधोरेखित करु इच्छिते.

बाकी चालू द्या आपलीच थोपटून घेणे.

DEADPOOL's picture

16 Nov 2015 - 10:05 pm | DEADPOOL

हा निष्कर्ष ३ दिवस आणि काही तासांच्या सदस्य आयुष्यात काढलेला नाही.
सहा वर्षांच्या वाचक आयुष्यात काढलेला आहे

इथे धाग्याचा काश्मिर करण्याची इच्छा नाही. व्यनि केला आहे.

नीलमोहर's picture

16 Nov 2015 - 1:05 pm | नीलमोहर

अशा किती हल्ल्यांचे निषेध करणार..

आयएस पाश्चिमात्य राष्ट्रांविरोधात न्युक्लियर त्सुनामी प्लॅन करत आहे अशी बातमी कालच वाचली.
असं काही खरंच घडलं तर त्याचे परिणाम किती महाभयंकर होतील कल्पना करवत नाही.
आयएसचा चेहरा असलेला जिहादी जॉन मारला गेला म्हणतात ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट.

निरापराध लोकांबरोबरच प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असणार्‍या कलाकृतींचाही विनाश करत सुटलेल्या
या विध्वंसक प्रवृत्तीचा शेवट लवकर व्हावा हीच इच्छा.

व्हेनिस ऑफ द सँड्स म्हणुन ओळखल्या जाणार्‍या Palmyra या सीरियन शहरामधील प्राचीन अवशेषांचा
आयएसने केलेला विध्वंस:
१. http://www.theguardian.com/science/ng-interactive/2015/oct/05/palmyra-wh...

२.http://www.theatlantic.com/international/archive/2015/09/rubble-palmyra-...

बाबा पाटील's picture

16 Nov 2015 - 1:08 pm | बाबा पाटील

हा कुठल्याही देशाच्या पायाच असतो, जे युरोपियन राष्ट्रांनी केले ते जगभरातील सगळीच राष्ट्रे करतात्,काही महिन्यांपुर्वी मा.संरक्षणमंत्र्यांनी डिप असेट विषयी एक वक्तव्य केले होते ते एकदा आठवावे,जर शेजारचे राष्ट्र अस्थिर नाही केले तर ते तुम्हाला आज ना उद्या नष्ट करेल. पाकिस्थान काय अथवा भारत काय अथवा अमेरिकेसह युरोपियन राष्ट्र काय प्रत्येक जण स्वतःच वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो, फक्त स्वतःच्या भुमीवर हे युद्ध येवु न द्यायचा प्रयत्न कधी कधी फसतो हे मुंबई आणी पॅरिसच्या हल्ल्याने स्प्ष्ट झाले कारण एक यशस्वी हल्ला होण्यापुर्वी १०० हल्ले रोखले गेले असतात फक्त ते आपल्या सारख्या सामान्यांना कधीच माहिती होत नाही. बाकी शुन्य

अनुप ढेरे's picture

16 Nov 2015 - 1:31 pm | अनुप ढेरे

एक यशस्वी हल्ला होण्यापुर्वी १०० हल्ले रोखले गेले असतात फक्त ते आपल्या सारख्या सामान्यांना कधीच माहिती होत नाही. बाकी शुन्य

सहमत आहे.

संदीप डांगे's picture

16 Nov 2015 - 1:10 pm | संदीप डांगे

सोन्याबापूंशी बाय डीफाल्ट सहमत....

आयसिस ला पुढे करून अमेरिकन शस्त्रौत्पादक मंडळींचे हे कृत्य आहे. आयसिस ने जे 'कारण' पुढे करुन हल्ल्याची जबाबदारी घेतली त्याच्यावरूनच हे किती पुचाट 'अलिबाय' आहे हे लक्षात येतं. अमेरिकन शस्त्रौत्पादकांना काहीही करुन जग पेटत ठेवायचं आहेच. सर्व दहशतवादी संघटनांना मिळणारी शस्त्रास्त्रे कुठून येतात हे कळले तरी खरा बोलविता धनी कोण हे समजुन येईल. आयसिस इज जस्ट अमेरिका इन डिस्गाइज.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 1:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

सहमत! आयसिस चे काही फोटो म्हणजे मूर्खपणाची कमाल वाटली मला

वास्तविक पाहता प्रत्येक मुस्लिम हा नमाज अदा करताना काब्याच्या दिशेने तोंड करतो अरबी मधे चार दिशा म्हणजे
१ मशरिक़ (पुर्व)
२ मग़रिब (पश्चिम)
३ शुमल (उत्तर)
४ जुनुब (दक्षिण)

अर्थात काब्याच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या देशांतले लोक मग़रिब म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून नमाज अदा करतात तसेच पश्चिमेकडले पूर्वेकडे उत्तरे कडले दक्षिणे कड़े अन दक्षिणेकडले उत्तरेकड़े तोंड करतात, म्हणजेच एखाद्या विशिष्ट देशातले मुस्लिम एखाद विशेष दिशेला तोंड करुनच नमाज अदा करतात

मी पाहिलेला एक फोटो म्हणून मला विचित्र वाटला कारण त्यात हे "आयसिस चे धर्मयोद्धे" चक्क एकमेकांना काटकोनात सल्लाह अंथरुन नमाज ला उभे होते, हे अशक्य आहे नॉर्मल इस्लामिक संकेतानुसार

अर्थात हे बेसिक निरिक्षण आहे माझे अजुन काही प्रकार असल्यास मला माहिती नाही

संदीप डांगे's picture

16 Nov 2015 - 2:14 pm | संदीप डांगे

आयसिसचे सगळेच सुरुवातीपासून संशयास्पद आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या बातम्या येतात, कृत्ये होतात (की फक्त दाखवल्या जातात), त्यांची कारणे, त्यांचा प्रभाव वाढत असल्याची एक अनामिक दहशत पसरवली जाते ते बघता हा एक उत्तम मार्केटींग प्रोजेक्ट आहे. अगदी असेच काही वर्षांपुर्वी तालिबान बद्दल पसरवले जात होते. तेव्हाही तालिबान भारतात कधीही येऊन धडकेल अशी सार्वर्त्रिक दहशत भारतीयांमधे होती. ह्या दहशतीचा फायदा घेऊन अमेरिकन कंपन्या त्यांच्या उत्पादनांचे उत्तम पुल मार्केटींग करू शकतात. एक असाही कयास आहे की हे सगळे आयसिसचे सैनिक इसलामचे उत्तम ट्रेनिंग दिलेले, अफगाणिस्तानमध्ये डीप्लॉय केलेले नंतर काढून घेतलेले वा कृत्रिमरित्या शहिद झालेले अमेरिकन सैनिक आहेत. आयसिसचे उद्देश व जन्मकथाही बर्‍याच गोलमटोल आहेत.

माझ्यामते तरी अमेरिकेने आयसिसचा नुसता बागुलबुवा उभा करून जगाचा मनोभंग चालवला आहे. त्याबद्दलच्याच बातम्या सतत पेपरात येत असतात. गेल्या काही महिन्यात आयसिसबद्दल जागतिक चर्चा(!) थंडावल्या आहेत हे लक्षात येताच पॅरिस हल्ला झाला. यात संशयास्पद काही दिसू नये म्हणून लेबनॉनवरही हल्ला झाला.

(!) थोडे अवांतरः फेसबुक हे अमेरिकन हेरगिरीसाठीचे एक उत्तम आधुनिक आयुध असून याद्वारे जगभरच्या नागरिकांच्या मनात काय चालले आहे याचा धांडोळा घेत आपल्याला हवे तेच विचार जगभर पसरवायचे हे फेसबुकचे उद्दिष्ट आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा एक ज्यू असणे हा निव्वळ योगायोग नाही. फेसबुकसारखे हजारो अप्लिकेशन्स असतांना केवळ फेसबुक इतके पुढे जाणे नॅचरल सिलेक्शन नसून क्राफ्टेड अटेम्प्ट आहे. फेसबुकचा उदय आणी न्यु वर्ल्ड ऑर्डर याबद्दल कधी सविस्तर लिहिन. (काहींच्या मते 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' हा मानसिक रुग्ण असलेल्यांचा कपोलकल्पित विचार - कन्सपिरसी थेरी - आहे. असो.)

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2015 - 2:16 pm | टवाळ कार्टा

न्यु वर्ल्ड ऑर्डर याबद्दल लिहाच :)

चिरोटा's picture

16 Nov 2015 - 5:08 pm | चिरोटा

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा एक ज्यू असणे हा निव्वळ योगायोग नाही

म्हणजे हे सगळे त्याने विद्यार्थी दशेत ठरवले होते? पचवायला अवघड वाटते.गूगलचे संस्थापकही ज्यू आहेत. मायकेल डेल(डेल लॅपटॉपवाले) पण ज्यु आहेत.
ऑरॅकल ह्या मोठ्या डेटाबेस कंपनीचे संस्थापकही ज्यू आहेत.
(ओपन सोर्स चळवळीचे प्रणेते रिचर्ड स्टॉलमॅन पण ज्यू आहेत).

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 5:31 pm | वेल्लाभट

च्यायला !

प्रसाद१९७१'s picture

16 Nov 2015 - 5:42 pm | प्रसाद१९७१

अहो ज्यु लोक हुशार आणि कर्तृत्ववान असतात हे मान्य करा. कम्युनिझम चे जनक पण ज्युच आणि भांडवलदार पण ज्युच. आइनस्टाईन ज्युच आणि फ्रॉईड पण ज्यु. पुण्यातल्या ससुन हॉस्पीटल चा डेव्हिड ससुन सुद्धा ज्युच. पैसे मिळवतात आणि प्रचंड दान पण करतात.
नोबेल मिळवणार्‍या लोकांच्यात ज्युंचे प्रमाण लक्षणीय रीत्या जास्त आहे ( फक्त गोर्‍या युरोपीय आणि अमेरिकन लोकसंख्या तुलना करुन बघितली तरी ).

लोकमत दिवाळी अंकातला मधला तेल-अवीव बद्दल चा लेख वाचा.

तरी काहींना रानटी लोकांबद्दल फारच प्रेम असते, हे दुर्दैव..

गॅरी ट्रुमन's picture

17 Nov 2015 - 10:41 am | गॅरी ट्रुमन

कपाळाला हात मारणारी स्मायली

अगदी असेच काही वर्षांपुर्वी तालिबान बद्दल पसरवले जात होते. तेव्हाही तालिबान भारतात कधीही येऊन धडकेल अशी सार्वर्त्रिक दहशत भारतीयांमधे होती.

च्यायला इथे आपल्या संसदभवनावर हल्ला झाला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, आय.आय.एस.सी बंगलोर इत्यादी अनेक ठिकाणे टारगेट झाली तरी आपले लोक असेच म्हणणार. सांगून टाका की डांगे साहेब की संसदभवनावरील हल्ला हा पण एक पूल मार्केटिंग होता म्हणून.

एक असाही कयास आहे की हे सगळे आयसिसचे सैनिक इसलामचे उत्तम ट्रेनिंग दिलेले, अफगाणिस्तानमध्ये डीप्लॉय केलेले नंतर काढून घेतलेले वा कृत्रिमरित्या शहिद झालेले अमेरिकन सैनिक आहेत.

हो तसाच असाही कयास आहे की लष्करे तोयबा मध्येपण हिंदू राष्ट्रवादीच भरले आहेत. हाफिज सईद हा पण रेशीमबागेत संघाच्या शाखेत जायचा. काश्मीर खोर्‍यातून तीनेक लाख हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी हिंदू राष्ट्रवाद्यांनीच हाकलून लावले कारण त्याचे निमित्त करून नंतर मुस्लिमांविषयी कटूता वाढवता येईल.

माझ्यामते तरी अमेरिकेने आयसिसचा नुसता बागुलबुवा उभा करून जगाचा मनोभंग चालवला आहे.

आणि अमेरिकेचा बागुलबुवा उभा करून इस्लामी दहशतवादाकडे जाणूनबुजून डोळेझाक करून तुम्ही नक्की कोणाचा मनोभंग चालवला आहेत?

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हा एक ज्यू असणे हा निव्वळ योगायोग नाही. फेसबुकसारखे हजारो अप्लिकेशन्स असतांना केवळ फेसबुक इतके पुढे जाणे नॅचरल सिलेक्शन नसून क्राफ्टेड अटेम्प्ट आहे.

कैच्याकै. असे प्रतिसाद लिहून ज्यू लोकांची कल्पनाशक्ती आणि डोकी कशी चालतात हे तुम्हाला माहित नाही हे तुम्ही जगजाहिर केले आहेत. इन्व्हेस्टमेन्ट बँकींगमध्ये गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले इत्यादी अनेक बँका आहेत त्या सगळ्या बँकांचे संस्थापक अगदी झाडून ज्यू होते. क्वांटम मेकॅनिक्स हे क्षेत्र उभे करण्यामध्ये बहुसंख्य ज्यू लोक होते. मग ते आईन्स्टाईन असतील की हायसेनबर्ग. हे सगळे पुढे आले ते पण क्राफ्टेड अ‍ॅटेम्टमुळेच का? असले काहीतरी लिहिण्यापूर्वी जरा माहित करून घ्या हो.

स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर असला गुडघ्यातला प्रतिसाद मिपावर येईल असे खरोखरच वाटले नव्हते.

आपल्या लोकांचा असाच अ‍ॅटिट्यूड राहिला तर बहुदा १००-२०० वर्षांनी मार्टिन निमोलरच्या धर्तीवर कोणीतरी पुढील गोष्ट लिहिणारा मिळेल (की तो पण मिळायचा नाही कुणास ठाऊक)

First they came for Punjabi Hindus and Sikhs, and I did not speak out---
Because I was not a Punjabi Hindu or a Sikh

Then they came for Kashmiri Hindus, and I did not speak out---
Because I was not a Kashmiri Hindu

Then they came for Assamese Hindus, and I did not speak out---
Because I was not an Assamese Hindu.

Then they came for me-- and there was no one left to speak for me.

संदीप डांगे's picture

17 Nov 2015 - 12:02 pm | संदीप डांगे

धन्यवाद! आपल्या विचारांपेक्षा विरुद्ध विचार हे नेहमी गुडग्यातूनच येतात ह्या तुमच्या दर्पोक्तीबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा वातावरणात मी अजून काही लिहिणे म्हणजे स्वतःचा अजून जास्त अपमान करुन घेणे आहे. त्यामुळे असो. मिपावर कुणी मुस्लिम आयडी का नाहित व असलेले इथे का लिहित नाहीत ह्या प्रश्नाचं आज उत्तर मिळाले. त्याबद्दलही धन्यवाद!

कॉन्स्पिरसी थेरीला कवटाळून बसल्यावर असे प्रतिसाद येणारच की. त्यात नवीन ते काय?

शलभ's picture

17 Nov 2015 - 1:11 pm | शलभ

+१
संदीप डांगे, जे बोलताय ते प्रूव करा मग. पळू नका.

बॅटमॅन,

संदीप डांग्यांचा प्रतिसाद कपटसंशयी (=कन्स्पिरसी थियरी) म्हणून झटकून टाकण्यापूर्वी थोडा वेळ द्यावा म्हणून सुचवेन. आधुनीय युरोपात यहुद्यांचे योगदान वादातीत आहे. पण म्हणून त्यामुळे इतर युरोपीय लोकांचं मत बदलत नाही. डांग्यांनी दिलेला प्रतिसाद केवळ त्यांचा स्वत:चा नसून त्यामागे युरोपातले वेगवेगळ्या देशांतले वेगवेगळ्या कालखंडातले बरेच लोक आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी म्हणून सुचवेन.

आ.न.,
-गा.पै.

बॅटमॅन's picture

17 Nov 2015 - 8:14 pm | बॅटमॅन

अख्ख्या जगात जे चाल्लंय त्यामागे ज्यू लोकांचे कपटकारस्थान आहे ही लै जुनी थेरी आहे ओ. त्यामागे ज्यूफोबिया आणि दुस्वास आहे. संदीप डांग्यांवर हे आरोप नाहीत, युरोपियन्सवर आहेत. तीच थेरी ते मांडताहेत म्हणून तसे म्हणालो इतकेच.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2015 - 9:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

गॉथम नरेश,

ज्यु किंवा फॉर दैट मॅटर कोणाचाही दुस्वास करणे वाईटच हे तुमचे मत "सर मथ्थे दे" सरकार फ़क्त कोणाचा ही अतिरेकी कैवार घेणे ही वाईट (तुम्ही ज्यूंचा किंवा संदीपभाऊ मुस्लिमांचा घेताय असा माझा आरोप वैग्रे अजिबात नाही!) फ़क्त आता विषय आहे म्हणून मते मांडतो आहे इतकेच, ज्यु किती बिच्चारे हे काहीसे पटत नाही ठीक आहे त्यांची प्रॉमिस्ड लँड त्यांनी मिळवली वगैरे सगळे ठीक पण मुळात हे लोक विचाराने अन कर्माने आत्यंतिक असतात हुशारी अतिरेकी, कर्तृत्व सुद्धा तितकेच उत्तुंग, धर्म पाळायचा हे ठीक मान्य आहे पण आज त्याच धर्मपालनाच्या हेतुने भारतीय किंवा फॉर दैट मॅटर जगातले सगळे मुस्लिम जसे सेल्फ inflicted अन सेल्फ created ghetto मधे आत्ममग्न राहतात अन त्यासाठी जगाला दूषण देतात भूतकालात ज्यु सुद्धा तसेच वागले आहेत, माझे वाचन अतिशय अल्प आहे बॅटमॅन भाई पण जितके वाचले (ते चुक असल्यास सुधार करा) त्यानुसार माझे आकलन हे की ज्यूंवर खरोखर अन एकमेव अत्याचार म्हणजे पहिले एक्सोडस अन मोसेस ने लाल समुद्रावर दांडके आपटुन पुर्ण गुलाम परत कनान प्रदेशाकडे नेले ते फ़क्त, त्या नंतर ज्यु जेव्हा जिथे जिथे हाणल्या गेले ती अन आज मुस्लिम जिथे जिथे मार खातात ती सगळी कारणे synonymous वाटतात, एखाद्या देशात (रशिया ते प्रशिया) राहताना लोकल संस्कृती पेक्षा आपल्या प्रॉमिस्ड लँड अन कॉमण्डमेंट्स ना अतिरेकी महत्व किंवा पेहराव अन खाणेपिणे संबंधी अट्टाहासपुर्ण वर्तन (स्वतःचे वेगळे एरिया ठेवणे, अन अलाइड एक्टिविटी) इत्यादी, शिवाय त्यांना प्रॉमिस्ड लँड मिळाली अन त्यांनी ती मिळवायला काही दहशतवादी सहारा घेतला नाही हे कौतुकास्पद आहे (घेतला असल्यास तसे संदर्भ सांगणे) त्यांचा असलेला मुस्लिम किंवा इतर (कॅथॉलिक) धर्मियांचा असलेला बखेड़ा अन हिंदुंनी त्यांच्यावर अत्याचार न केल्यामुळे त्यांना नैसर्गिक मित्र मानणे म्हणा किंवा त्यांच्या मुस्लिमविरोधात आपल्या सुप्त किंवा उघड मुस्लिम विरोधी किंवा इस्लामोफोबिक भावाचे शमन पाहणे हे मला तितकेसे रुचत नाही असे नमूद करतो

काही चुक बोलून गेलो असलो तर माफ़ी मागतो

काही माहिती नसल्यास ती ससंदर्भ पुरवाल अशी अपेक्षा

(जिज्ञासु अन समतोल रहायच्या यत्नातला) बाप्या

बापू.. तुमचे प्रतिसाद खरोखरी माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद.

एकच सुचवतो आहे* - इतके पण "ओव्हरपोलाईट" होवू नका. तुमच्याकडे माहिती आहे, येथे देत आहात. चुक असेल तर लोकं सांगतीलच. मग सुरूवातीलाच माफी वगैरे कशाला?

* हे माझे वैयक्तीक मत आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2015 - 10:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

मोदक भाई,

प्रथम आभार, माहिती खुप आधी वाचली आहे ती रिट्राइव करताना फ्रैगमेंट्स मधे येऊ शकते म्हणून कंसातील डिस्क्लेमर टाकले, बाकी ओवर पोलाइट म्हणाल तर असे आहे की तुमच्या सारखे किंवा बॅटमॅन अन संदीप डांगे सुद्धा म्हणा आपले लोक जोडणे कठीण असते अन तोडणे/तुटणे सोपे म्हणून आगाऊ काळजी :)

वर्षाचा दीड ते सहा महीने १९००० फुटांवर एकही मानवी शब्द थेट न ऐकता राहिले की होते असे माणसे अन त्यांच्यातला चांगुलपणा सतत दिसू लागतो इतकेच! :D :D

वर्षाचा दीड ते सहा महीने १९००० फुटांवर एकही मानवी शब्द थेट न ऐकता राहिले की होते असे

__/\__

बोका-ए-आझम's picture

17 Nov 2015 - 11:11 pm | बोका-ए-आझम

ज्यू धर्मीय लोकांवर झालेल्या अत्याचारांमध्ये हॉलोकॉस्टचा उल्लेख पण केलेला नाहीये तुम्ही. जवळजवळ ७० टक्के ज्यू - युरोपमधले - नाझींनी मृत्यूछावण्यांमध्ये मारले. त्याच्या आधी जेव्हा रशियावर आक्रमण केलं तेव्हा लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया या बाल्टिक देशांमधल्या ज्यूंना नाझींनी खास तयार केलेल्या भरारी पथकांनी ( जर्मन भाषेमध्ये EINSATZGRUPPEN ) ठार मारलं. युक्रेन देशाची राजधानी कीव्हपासून जवळ असलेल्या बाबी यार या ठिकाणी एका दिवसात ३२००० ज्यूंना पॉल ब्लोबेल या नाझी अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. लहान मुलं - अगदी तान्ही मुलंसुद्धा नाझींनी सोडली नाहीत. मुस्लिमांवर किंवा दुसऱ्या कुठल्याही धर्मीय लोकांवर असले अत्याचार कधीही झाले नव्हते. मृत्यूछावणीत पाठवण्यापूर्वी ज्यूंना घेट्टोमध्ये ठेवलं जायचं. ती एक प्रकारची कैदच होती. आणि आपण म्हणतो की ज्यू हे आर्थिकदृष्ट्या नेहमीच इतर जमातींना (इथे जमात हा शब्द TRIBE या अर्थी नसून मानवी समूह या अर्थी वापरलेला आहे) वरचढ होते. पण हॉलोकॉस्टमध्ये मारले गेलेले ज्यू हे सर्वसामान्य किंवा गरीब होते. श्रीमंत ज्यूंकडून नाझींनी भरभक्कम खंडणी उकळून त्यांना जर्मनीतून बाहेर जायची परवानगी दिली होती. जे मागे राहिले ते सर्वसामान्य किंवा गरीब ज्यू. रशियामध्ये झारशाही असताना ज्यूंविरुद्ध सामुहिक हत्याकांडं, ज्यांना pogrom असं म्हणतात, ती झालेली आहेत. आणि हे सगळं चालू असताना जगाने बघ्याचीच भूमिका घेतली होती. असे अत्याचार दुसऱ्या कुठल्या मानवी समूहावर झाले असतील असं वाटत नाही. आणि जर जगाने ज्यूंना दिलेली ही शिक्षा आहे असं म्हटलं तर मग ती ज्यूंच्या गुन्ह्यांच्या मानाने फार जास्त आणि भयंकर आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Nov 2015 - 6:09 am | कैलासवासी सोन्याबापु

बोका भाऊ,

होलोकॉस्ट च्या उल्लेख न करण्या बद्दलच एकार्थाने पुर्ण सकॉमेंट होती बघा, कारण ज्यु म्हणले की होलोकॉस्ट हे इतके एग्रेसिवली मार्केटेड स्टेटमेंट झाले आहे की बस! बरं त्याची संहारकता (जी तुम्ही सार्थ आकड्यांत मांडली आहे) कमी आहे किंवा सरसकट ज्यु कत्तली जस्टिफाई करणे हा माझा उद्देश तेव्हा ही नव्हता अन आता ही नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. मुद्दा खुप साधा आहे इतक्या क्रूर कत्तली का झाल्या? ह्या प्रश्नाची एकदा अन फ़क्त एकदा "हिटलर हा एल सिफलिस रोगी ज्यु द्वेष्टा होता" ह्याच्या पालिकडली कारणमीमांसा शोधणे होय, आता ह्याच चेन मधे आलेला गामापैलवान ह्यांचाच प्रतिसाद पहा, प्रॉमिस्ड लँड मिळवायला ज्यूंनी केलेली हत्याकांड जी मला माहिती नव्हती ती ह्या योगे चर्चेच्या लूप मधे आली न? मला असे काहीतरी अपेक्षित आहे अर्थात त्या न्यायाने तुमचा होलोकॉस्ट चा उल्लेख सुद्धा एक पैलू आहेच पण तो खुप वोसिफेरॉसली पुश केलेला आहे असे वाटते. अन करोत काही हरकत घेणारा मी कोण होतो त्यावर? मी काही अश्राप ज्यूंचे जीवन जगलो नाहीये मी फ़क्त त्याच्या एक अब्जांश पाहिले आहे ते ही श्चिण्डलर्स लिस्ट किंवा डायरी ऑफ़ एन फ्रैंक च्या माध्यमातून , मला व्यक्तिशः जे काही म्हणायचे आहे ते म्हणजे इतकेच की ज्यु अतिशय हुशार जमात आहे त्यांनी पराकोटी चे अत्याचार सहन केले आहेत अगदी मान्य, पण ते अगदी बिच्चारे वगैरे नाहियेत तर जागतिक दर्जावर एक अतिशय हिशेबी अन कैल्कुलैटिव जमात म्हणून प्रसिद्ध आहेत, पण आज त्यांचे ग्लोरिफिकेशन करणाऱ्या भारतीय लोकांत बेसिक ज्ञान सुद्धा नाही होलोकॉस्ट चे, बहुसंख्यांच्या मते अन ज्ञानात असलेला इजराइल म्हणजे निर्मिती पश्चात इजराइल योम किप्पुर वाला इजराइल शत्रुंनी वेढलेला इजराइल धर्माभिमानी इजराइल "बघा बघा इतका चिमुकला देश पण मियाँ लोकांस आवरत नाही" हे जहरी कौतुकच जास्त असते मला असे अर्धज्ञान आधारित अंध कौतुक धोकादायक वाटते , ते मुस्लिम द्वेष करतात म्हणून ते आपले नैसर्गिक मित्र किंवा भारताचा भाऊ इजराइल वगैरे घोषणा मला निरर्थक वाटतात कारण त्यायोगे आपण बुद्धिमान ज्यु लोकांचा फायदा काहीच घेत नाही आहोत फ़क्त मी माझ्या पहिल्या कॉमेंट मधे म्हणल्या प्रमाणे आपला इस्लामोफोबिया शमनार्थ त्यांच्या कारवायांकडे पाहत आहोत, जे माझ्यामते प्रचंड धोकादायक आहे अन समतोल नाही काही काही कॉमेंट्स मधे मुस्लिम एरवी खुप खेळीमेळी ने राहतात अन धर्माचे नाव काढले की बिथरतात असे उल्लेख आहेत जे १००% सत्य आहेत , असे अनुभव ज्यूंमधे नसतील अशी आपल्या धर्माभिमानी भोळ्या लोकांची अपेक्षा असते पण मुळात तसे असते का? अजिबात नाही गंमत म्हणून पुण्यात राहणाऱ्या कोणीही एक प्रयोग करून पहा जमेल तसे कॅम्प मधे ओहेल डेविड सिनेगॉग उर्फ़ लाल देवळात जावुन या आत घेतात का ते सांगा! आपल्या ह्या मुस्लिम विरोधी नैसर्गिक मित्राचे सोवळे ओवळे हे वहाबी इस्लाम इतकेच कड़क असते असे आढळून येईल.

बोका-ए-आझम's picture

18 Nov 2015 - 9:01 am | बोका-ए-आझम

होलोकाॅस्ट हे निर्विवाद सत्य आहे हेही खरं आहे आणि इझराईलच्या निर्मितीनंतर लगेचच त्याच्या गळ्याला नख लावण्याचे प्रयत्न केले गेले हेही तितकंच खरं आहे. इझराईलच्या खेळाडूंना, ज्यांचा दहशतवादाशी आणि अतिरेक्यांशी काहीही संबंध नव्हता, त्यांना म्युनिकमध्ये मारलं गेलं. अरब राष्ट्रांची बाजू आपण घेतली पण त्यांनी काश्मीरसंदर्भात नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आपण आता इझराईलला पाठिंबा दिला तर त्यात काही गैर आहे असं अजिबात नाही. तशीही अरबांची बहुतेक सगळी संपत्ती (काही दुबई, ओमानसारखे अपवाद वगळता) ही तेलामुळे आहे. ते संपल्यावर त्यांचं परत त्यांच्या आधीच्या रानटी अवस्थेकडे जाणं अगदीच अशक्य नाही. आणि मलाही तेलाच्या जोरावर जगाला वेठीला धरणाऱ्या (उदाहरणार्थ १९७३ चा आॅईल शाॅक) अरबांविषयी सहानुभूती अजिबात नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Nov 2015 - 9:29 am | कैलासवासी सोन्याबापु

अरे बापरे माझा प्रतिसाद अरबांना सहानुभूति द्या पद्धतीचा झाला की काय! मला तसे म्हणायचे नाहीये उलट मी म्हणतोय सहानुभूति कोणालाच नको फ़क्त थंड व्यव्हार हवा rubbing the backs as per time demands! असे काहीसे कोणासाठीच भावनाशील होऊन हशील नाही (स्वहित सोडुन) :)

जयंत कुलकर्णी's picture

18 Nov 2015 - 9:37 am | जयंत कुलकर्णी

जर्मन बेकरीच्या आधी मी स्वतः लालदेवळात जाऊन आलेलो आहे. तेथे ज्या बाई होत्या त्यांनी मला सर्व सिनेगॉग फिरवून दाखविले. नंतर गेलो असता ते बघण्यासाठी आधी परवानगी काधावी लागते असे कळले.

फक्त माहितीसाठी.

सुबोध खरे's picture

18 Nov 2015 - 10:10 am | सुबोध खरे

बापूसाहेब
तसे पाहिले तर आज तुम्हाला पारश्यांच्या अग्यारीत प्रवेश नाहीच. माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट हि आहे कि ज्यू लोक बाटवाबाटवी करीत नाहीत कि आपला धर्म दुसर्यावर लादत नाहीत. त्यांचा धर्म त्यांच्या पुरताच मर्यादित आहे. कुठेही ज्यू लोकांनी त्यांच्या साठी खास अधिकार मागितल्याचे माझ्या वाचनात नाही. जर ते अतिशय हिशेबी अन कैल्कुलैटिव जमात म्हणून आहेत तर आपल्याकडे मारवाडी बनिया किंवा सिंधी लोक त्यांच्या दोन पावले पुढे आहेत म्हणून आपल्याकडे या लोकांचे शिरकाण झालेले नाही.भारत सोडला तर पश्चिमेकडे अख्ख्या मध्यपूर्वेत इस्रायलपर्यंत लोकशाही असलेला किंवा आधुनिक मुल्ये मानणारा देश नाही. आणी भारताच्या पूर्वेला सुद्धा मुस्लीम बहुल देशांची परिस्थिती फारशी चांगली नाही.
राहिली त्यांचे सोवळे ओवळे त्यांच्या घरापुरते मर्यादित असते. त्यात ईश्वर निंदा केली तर फाशी किंवा तत्सम अशा गोष्टी नाहीत.

गॅरी ट्रुमन's picture

18 Nov 2015 - 11:46 am | गॅरी ट्रुमन

मुद्दा खुप साधा आहे इतक्या क्रूर कत्तली का झाल्या?

युरोपात ज्यू द्वेष (अ‍ॅन्टी सेमेटिझम) ही बरीच जुनी गोष्ट आहे. ज्यू लोकांचे घेटो विविध युरोपिअन शहरांमध्ये अनेक शतके होते.ज्यू घेटो ही काही हिटलरने आणलेली संकल्पना नाही. युरोपात ज्यू लोकांविरूध्द दुस्वास का होता? तर येशू ख्रिस्ताला पकडून नंतर क्रूसिफिकेशन झाले त्यासाठी तत्कालीन काही ज्यू लोक जबाबदार होते!! या प्रकाराला Jewish deicide म्हणतात. ही अगदी अलीकडच्या काळापर्यंत कल्पना प्रचलित होती. १९६५ मध्ये व्हॅटिकनमध्ये झालेल्या बिशपांच्या संमेलनात तत्कालीन पोपने Jewish deicide चुकीचे आहे हे जाहिर केले. The Christian Response to the Holocaust या पेपरमध्ये अमेरिकन काँग्रेसमन रॉबर्ट ड्रिनानने म्हटले आहे---

"While modern antisemitism was born from the racist and nationalistic theories of the last century,it cannot be wholly divorced from the context of Christian-Jewish relations in European history, particularly in what Jules Isaac has called "the teaching of contempt" in Christian circles and the popular emphasis on Jewish culpability for the death of Christ."

माझ्याकडे जे.एस.टी.ओ.आर चे सब्स्क्रिप्शन असल्यामुळे हा पेपर मला डाऊनलोड करता आला.

तेव्हा ज्यूंवर अन्याय झालाच नव्हता असे म्हणणे अयोग्य आहे असे मला वाटते.

ज्यू लोकांनी संकटाचे रूपांतर संधीत कसे केले हे बघणे रोचक ठरेल. बँकिंग आणि फायनान्समध्ये ज्यू लोक मोठ्या प्रमाणावर आहेत त्याचेही ऐतिहासिक कारण आहे. बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याच भावंडांना (पक्षी इतर ख्रिस्ती लोकांना) व्याजावर पैसे कर्जाऊ देण्यावर (usury) बंदी आहे आणि अर्थातच कुणालाही पैसे कर्जाऊ देताना व्याज घेता येत नसेल तर ते बिझनेस मॉडेल चालायचे नाही.त्यामुळे सुरवातीला ख्रिस्ती लोक या बिझनेसमध्ये उतरू शकत नव्हते. पण ज्यू हे ख्रिस्तींचे "भावंड" नसल्यामुळे ज्यू लोकांना मात्र ख्रिस्ती लोकांना पैसे व्याजावर कर्जाऊ देण्यास काहीच अडचण नव्हती. व्हेनिसमध्ये जगातील पहिली बँक ७००-८०० वर्षांपूर्वी चालू झाली. ती बँक म्हणजे ज्यू घेटोतून एक ज्यू मनुष्य (नाव विसरलो-- अ‍ॅसेन्ट ऑफ मनी या पुस्तकात त्याचे नाव दिले आहे. ते तपासायला हवे) व्हेनिसमध्ये एका कालव्याच्या काठी टेबल टाकून पैसे कर्जाऊ देत असे. त्यातूनच ज्यूंमध्ये ही परंपरा सुरू झाली. अशाप्रकारे संकटाचे संधीत रूपांतर ज्यूंनी केले होते.

ज्यू लोक बिच्चारे वगैरे नाहीत असे म्हटले जाते. इथेही म्हटले गेले आहेच. शतकानुशतके घेटोमध्ये राहायला लागूनही, होलोकॉस्टसारख्या भयंकर घटनेत इतकी प्रचंड हानी होऊनही, दोनेक हजार वर्षे युरोपातील विविध देशांमध्ये भटकायला लागूनही "My next Saturday's prayer will be in Jerusalem" असे प्रत्येक शनीवारच्या प्रार्थनेच्या शेवटी म्हणायची विजिगीषू वृत्ती ज्यू समाजाकडे आहे. त्याबद्दल त्यांना मानलेच पाहिजे. आपल्याकडे मात्र दादरी, गेलाबाजार गुजरात अशा घटना झाल्यानंतर मात्र अल्पसंख्यांक कित्ती कित्ती बिच्चारे असे म्हणायची चढाओढच लागते. असो.

दुसरे म्हणजे ज्यू लोक त्यांची दाढी, वेशभूषा इत्यादींविषयी अगदी पराकोटीचे काटेकोर असतात असेही म्हटले गेले आहे. पण केवळ ज्यू म्हणून जन्माला आल्यामुळे शतकानुशतके ज्या समाजावर अन्याय होत आला आहे ते अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह बनले तर त्यात आश्चर्य कसले?

गामा पैलवान's picture

18 Nov 2015 - 3:11 am | गामा पैलवान

बापूसाहेब,

>> त्यांना प्रॉमिस्ड लँड मिळाली अन त्यांनी ती मिळवायला काही दहशतवादी सहारा घेतला नाही हे कौतुकास्पद आहे
>> (घेतला असल्यास तसे संदर्भ सांगणे)

१९४८ साली इझरायल उत्पन्न करतांना फिलीस्तिनी अरबांवर भयानक दहशतवादी आक्रमणे आणि कत्तली केल्या गेला. यांतलं दीर-यासीन चं हत्याकांड अतिशय बदनाम आहे.

शिवाय आज इझरायलच्या नावाखाली जे ज्यू फिलीस्तिनी जमीन बळकावून बसले आहेत त्यांचे पूर्वज मध्य आशियाई होते. ते पारंपरिक यहुदी नव्हेत. प्राध्यापक अल्फ्रेड लिलीयेन्थाल नामे ज्यू तत्ज्ञानेच हे सिद्ध केले आहे.

जे जुन्या ज्युदियामधून हाकलले गेले ते सेफार्दी होते. याउलट आज फिलीस्तिनी जमीन बळकावणारे अश्केनाझी खज्जर आहेत. खज्जर ही एक भटकी जमात होती. तिचा राजा सहाव्या/सातव्या शतकात यहुदी झाला. म्हणून ती पूर्ण जमात स्वत:ला यहुदी मानत असते. तिचा अब्राहम, मोशे, जेकब, सॉलोमन, इत्यादिंशी कसलाही भावनिक संबंध नाही.

आ.न.,
-गा.पै.

बॅटमॅन's picture

18 Nov 2015 - 11:50 am | बॅटमॅन

येस- काही अंशी ती कारणे सिनॉनिमस म्हणता येतील खरी, पण एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे गेली शेकडो-हजारो वर्षे अनेक देशांत सेकंड क्लास सिटिझन्स म्हणून ज्यू राहत आलेले आहेत. ख्रिश्चन युरोपात त्यांच्यावर हिटलरच्या शेकडो वर्षे अगोदरपासून खूप अत्याचार झाले. त्याच्या मुळाशी वेगळे राहणे हेच कारण आहे असे वाटत नाही. स्वतःची वैशिष्ट्ये वेगळी राखणे हे अत्याचाराचे कारण होऊ शकत नाही. भारतात वाढल्यामुळे उपासनापद्धतींमधले वैविध्य राखून मिक्स होणे हे आपणा सर्वांना ऑब्व्हियस वाटते. युरोपात तसे नव्हते. ते लोक आत्ता आत्ता सुधारलेत, नायतर इस्लामिक अत्याचारांची वर्णने सुसह्य वाटावीत असे अत्याचार त्यांनी केलेले आहेत. दोन अब्राहमिक धर्म जेव्हा टक्करतात तेव्हा बर्‍याचदा तो संघर्ष रक्तरंजित होतो. सांस्कृतिक वेगळेपण राखणे म्हणजे 'अँटी-नॅशनल' (ही संज्ञाही या संदर्भात कालविसंगत आहे कारण तेव्हा नेशन स्टेट या संकल्पनेचा उदय झालेला नव्हता) राहणे नव्हे हे युरोपच्या पचनी पडणे अवघडच होते असे वाटते. विशेषतः धार्मिक संदर्भात, कारण धर्म आणि पॉलिटिक्स हे मध्ययुगीन युरोपात इस्लामच्या हजारपटीने एकमेकांशी निगडित होते. त्यामुळे यात ज्यूंचा दोष नाही असे माझे मत आहे.

मुसलमानांची गोष्ट तशी नाही. सेकंड क्लास सिटिझन म्हणून राहण्याची त्यांना सवय नाही. शिवाय धार्मिक पगडा गेला तरी सपाटीकरणाचा युरोपियन हव्यासही गेलेला नाही. अगोदर ख्रिश्चन करू पाहत, आता सेकुलर लिबरल वगैरे करू पाहतायत. पण हव्यास सारखाच आहे.

बाकी इस्राएल मुसलमान देशांशी लढते म्हणूनच त्यांना साथीदार मानणे हे अर्थातच चूक आहे. कुठल्याही देशाचा जिथवर होईल तिथवर फायदा करून घ्यावा. सांस्कृतिक एकात्मता, साम्य, प्राचीन संबंध, इ. गोष्टींचे मस्कापॉलिश पाहिजे तेव्हा अन पाहिजे तसे वापरता येते. लागेल तसे ते वापरावे अशा मताचा मी आहे.

प्रसाद१९७१'s picture

18 Nov 2015 - 12:28 pm | प्रसाद१९७१

बापू - आदरपूर्वक असहमती तुमच्या ज्युंना आणि मुसलमानांना एकाच तराजुनी तोलण्याच्या प्रयत्नांना. ज्यु लोक इतर समाजात मिसळत नाहीत ( मुख्य म्हणजे "बेटी" व्यवहार करत नाहीत ), पण हा काही अपराध नाही.
उलट ज्यु कधीच मुसलमानांसारखे दुसर्‍यांना बाटवत नाहीत. तसेच ज्यु इतर समाजापासुन वेगळे राहिले का इतर समाजाने त्यांना वेगळे ठेवले कायम हे ही बघा. ज्युंचे घेट्टो हे मध्ययुगीन काळापासुन अस्तीत्वात आहेत.

युरोप मधल्या सर्व देशांमधे, त्या त्या देशाची भरभराट ( आर्थिक, वैज्ञानिक आणि अगदी सांस्कृतिक सुद्धा ) करण्यात ज्युच आघाडीवर राहीले आहेत. ज्यु हे त्यांच्या स्वताच्या आणि बाकी सर्व समाजाला कायम वैचारिक प्रगतीकडे घेउन जात आले आहेत. त्यांची तुलना सर्व समाजाला सातव्या शतकात नेणार्‍यांशी करु शकत नाही .

ज्युं बद्दल चा युरोपियन लोकांना असलेला राग हा मत्सरातुन आला असावा.

गॅरी ट्रुमन's picture

18 Nov 2015 - 11:59 am | गॅरी ट्रुमन

गापै,

चर्चा ज्यूंवर भरकटली असल्यामुळे मी पण एक प्रतिसाद ज्यूंवर आताच लिहिला आहे. पण माझा मुळातला मुद्दा कॉन्स्पिरसी थिअरीशी तितकासा निगडीत नाही. ज्यूंचा सगळे काही वाईट होते त्यात हात आहे असे म्ह्टले किंवा अगदी समजा ज्यूंऐवजी अ‍ॅन्डिज पर्वतातील कुठल्या भटक्या जमातीचा जगात जे काही चालते त्यात हात आहे असे म्ह्टले असते तरी त्यात डोक्याला शॉट लागावा असे काहीच नाही. लोकशाही आहे. प्रत्येक माणूस आपल्याला पाहिजे त्या कल्पना लढवू शकतो. मुद्दा असा आहे की भारतात तालिबानी फोफावतील ही कपोलकल्पित कल्पना बाहेरच्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पसरवून दिली आहे असे इथे म्हटले गेले त्यामुळे मात्र डोक्याला जबरदस्त शॉट गेला.

१३ डिसेंबर २००१ रोजी आपला देश संसदभवन हल्ल्यासारख्या महाभयंकर प्रकारातून कसा काय वाचला हेच समजत नाही. खरं तर फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळच ओलीस ठेवले जायचे त्यावेळी.आणि त्या जोरावर ते हरामखोर आपल्याला पाहिजे त्या मागण्या मान्य करून घेऊ शकले असते. भगवंताचीच कृपा म्हणायची की असले काही झाले नाही. इतके सगळे होऊनही तालिबानी शिरजोर होतील ही कपोलकल्पित भिती आणि ती पण अन्य कोणीतरी पसरवलेली असे कुणाला वाटूच कसे शकते कोणाला? हजार-बाराशे वर्षात काय झाले हे माहित असायची अपेक्षा नाहीच. पण निदान गेल्या २०-२५ वर्षात काय झाले आहे, काश्मीरातून तीन लाख लोकांना नेसत्या वस्त्रानिशी केवळ हिंदू म्हणून कसे हाकलले गेले, "कश्मीरमे पंडित नही पंडितानिया रहेंगी" (कशाकरता ते विचारू नका) अशा स्वरूपाच्या घोषणा त्या हरामखोरांनी आपल्या नाकावर टिच्चून दिल्या होत्या इत्यादी गोष्टी तरी दुर्लक्षित केल्या जाऊ नयेत ही अपेक्षा तर नक्कीच आहे आणि तशी अपेक्षा ठेवली तर त्यात काय चूक आहे?

खरं सांगायचे तर भारताला असली कसलीच भिती नाही आणि या सगळ्या कल्पनांचे बुडबुडे इतरांनी सोडले आहेत अशा प्रकारचे काहीतरी वाचले आणि डोक्याला लै शॉट गेला बघा.

असो.

अर्धवटराव's picture

18 Nov 2015 - 1:40 pm | अर्धवटराव

याला उपाय काय ?
याला म्हणजे कॉन्स्पिरसी थेअरीला नाहि बरं.. तशा थेअर्‍या मिपावर अंधश्रद्धी वैज्ञानीक धागे प्रसवतात तशा येतच राहतील... मूळ समस्येला उपाय काय ?? (आमच्या मते एकच... तमसो मा ज्योतिर्गमय. पण हा बुरसटेला, अंधश्रद्धाळु आणि बावळट असा पौराणीक उपाय झाला. त्यात वैज्ञानीक सत्य अजीबात नाहि)

वाळुत डोकं खुपसून बसणं म्हणजे आत्मघात आहे. कुठल्याही प्रकारचं युद्धशास्त्र म्हणजे रोगाचा उपद्रव आटोक्यात आणण्याचा क्षीण प्रयत्न झाला. आर्थीक बाजुने केलेले उपाय म्हणजे दिवास्वप्नच. आयला मग उरलं काय ??

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Nov 2015 - 2:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

बोक्या भाऊ, गैरी ट्रूमन साहेब, गापै, बॅटमॅन भाऊ, डॉक्टर साहेब

तुमचे अनेक आभार , बरीच नवी माहिती मिळाली अन माझा तर्क नीट लाइन मधे आणायला बरीच मौलिक अन तार्किक एडिशन झाली ज्ञानात आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार

गॅरी ट्रुमन's picture

18 Nov 2015 - 4:24 pm | गॅरी ट्रुमन

वाळुत डोकं खुपसून बसणं म्हणजे आत्मघात आहे. कुठल्याही प्रकारचं युद्धशास्त्र म्हणजे रोगाचा उपद्रव आटोक्यात आणण्याचा क्षीण प्रयत्न झाला. आर्थीक बाजुने केलेले उपाय म्हणजे दिवास्वप्नच. आयला मग उरलं काय ??

खरं आहे. या प्रकाराला अटकाव घालायला हातात उपाय तसे बरेच कमी आहेत. कधीना कधी डोक्यात प्रकाश पडेल अशी अपेक्षा आणि आशा करण्याव्यतिरिक्त फार काही राहिले आहे असे वाटत नाही. पण तरीही शहामृगासारखे वाळूत डोकं खुपसणारे लोक मात्र प्रचंड डोक्यात जातात.

चैतन्य ईन्या's picture

17 Nov 2015 - 8:15 pm | चैतन्य ईन्या

फेसबुक आणि बाकीचा इथे काही डांगे साहेबांनी मांडला आहे तो कॉन्स्पिरसी थेरी आहे कि एकदम सत्य आहे? बाबो हे पचनी पडणे अवघड आहे. विन्ग्लंड देशात अनेक वर्ष काढल्याने हे पचनी पडणे खरोखर कठीण आहे. वेपन्स ऑफ मास डीसट्रकशन वगैरे खरोखर कॉन्स्पिरसी थेरी होती आणि अनेक लोकांनी त्यावर आवाज इथेच उठवला होता. पण हे जरा अति लॉजिक आहे डांगे ह्यांचे. पटले नाही अजिबात. बराचश्या कंपन्या ह्या खरोखर अत्यंत कल्पल बुद्धीतून तयार झाल्या आहेत. दुर्द्वाईने आपल्याला त्याची कदर नाही आणि आपल्याकडे तशी ईकोसिस्टिम नाहीये. त्यामुळे आपल्याला हे सगळे खोटे वाटणे कदाचित साहजिक असावे. आपल्याकडे जुगाड त्यालाच महत्व पण उत्तम गोष्ट करणे आपल्याला झेपत नाही.

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 7:42 pm | DEADPOOL

मिपावर
कुणी मुस्लिम आयडी का नाहित व
असलेले इथे का लिहित नाहीत ह्या प्रश्नाचं आज
उत्तर मिळाले. त्याबद्दलही धन्यवाद!
>>>>>>>>
विषय भरकटत नेऊ नका!

मिपावर कुणी मुस्लिम आयडी का नाहित व असलेले इथे का लिहित नाहीत ह्या प्रश्नाचं आज उत्तर मिळाले.

मुस्लिम आयडी आहेत. थोडा शोध घ्या. लगेच मिळतील.

संदीप डांगे's picture

17 Nov 2015 - 11:13 pm | संदीप डांगे

मोदकजी,

तुमचा रोख मोगा उर्फ दरेकर यांचे कडे असेल तर माझे मत एवढेच की तो आयडी मुस्लिम नाही. काड्या टाकून मजा घेणे आणि सिरिअसली एखादी वेगळी, दुसरी बाजू मांडणे यात फरक आहे.

तरीही या मुद्द्यावर आतापर्यंत आपण सर्व सदस्यांनी केलेल्या चर्चेबद्दल धन्यवाद. मुद्दा उपस्थित केल्याशिवाय चर्चा कशी होणार? त्याबद्दल इतरांना एक वेगळा पैलूही असू शकतो व त्यावर मंथन घडू शकते हे कळून येते. मी इथे जी कन्स्पिरसी थेरी मांडतोय ती माझी स्वतःची वैयक्तिक मते नसून जगात काही लोक खरोखर असे विचार मांडतात. आजवर मी जे बघितले की लोक कंपु बनवून राहतात. मुस्लिमहेटर्स व मुस्लिमजगत यांचे स्वतःचे वेगवेगळे फोरम्स आहेत व ते कधीही एकमेकांच्या फोरम्सवर आपल्या बाजू मांडून चर्चा करत नाहीत. समविचारींमधे वैचारिक मैथुनाचा आनंद घेणे एवढेच त्यांचे कर्तव्य. घट्ट बसलेले समज सहजासहजी कोणीच सोडू शकत नाही. त्यामुळे कोणीच दुसर्‍या विचाराच्या संस्थळावर जाऊन असले काथ्याकूट करत नाहीत. मिसळपाववर हे सगळे मांडण्याचा माझा कायम एकच हेतू आहे की काही वेगळे विचार, भले ते असत्य, मिथ्या, कपोलकल्पित कथा, दंतकथा, मान्यता असू देत पण मांडायचे. लोकांना काय चिरफाड करायची ती करू देत. पण मी, संदीप डांगे, म्हणून इथे टंकतोय म्हणजे तेच माझे विचार आहेत असे प्रत्येक बाबतीत नसते. ना मी अमेरिकाद्वेषी आहे ना मुस्लिमप्रेमी. किंवा उलटही.

तुमचा रोख मोगा उर्फ दरेकर यांचे कडे असेल तर

त्या आयडीकडे रोख नाही. धन्यवाद.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Nov 2015 - 10:58 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावर कुणी मुस्लिम आयडी का नाहित व असलेले इथे का लिहित नाहीत ह्या प्रश्नाचं आज उत्तर मिळाले.

आम्हाला पण सांगा की.
काये ना, आम्ही कधी आयडीच्या मागची जात शोधायचा प्रयत्नच केला नाही बघा!

बाकी, डांगे म्हणजे बामण काय हो? एक अण्णा डांगे आहेत, तुमचे कोण ते?

संदीप डांगे's picture

17 Nov 2015 - 11:23 pm | संदीप डांगे

काये ना, आम्ही कधी आयडीच्या मागची जात शोधायचा प्रयत्नच केला नाही बघा!

अच्चं जालं का.. बलं बलं, आपण त्या ताईंना, दादांना शांगू हां, त्यांना सगळ्यांचे जातीधर्म पक्के माहित आहेत हां... दोन्त वली...

परिकथेतील राजकुमार's picture

17 Nov 2015 - 11:26 pm | परिकथेतील राजकुमार

अच्चं जालं का.. बलं बलं, आपण त्या ताईंना, दादांना शांगू हां, त्यांना सगळ्यांचे जातीधर्म पक्के माहित आहेत हां... दोन्त वली...

मग ताई दादांनाच येउ देत की इकडे. तुमच्या लडीवाळ थेअरी लेखनापेक्षा काहीतरी वेगळे तरी वाचायला मिळेल.

संदीप डांगे's picture

17 Nov 2015 - 11:53 pm | संदीप डांगे

अच्छा तर आपणांस मुस्लिम-बॅशिंगच वाचायचे आणि चर्चायचे आहे तर...? तेच वर म्हणत होतो. सिद्ध करण्याबद्दल धन्यवाद!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2015 - 10:12 am | परिकथेतील राजकुमार

खीक!

वेल्लाभट's picture

18 Nov 2015 - 11:26 am | वेल्लाभट

हाहाहाहाहा

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Nov 2015 - 11:05 am | पुण्याचे वटवाघूळ

फेसबुक हे अमेरिकन हेरगिरीसाठीचे एक उत्तम आधुनिक आयुध असून याद्वारे जगभरच्या नागरिकांच्या मनात काय चालले आहे याचा धांडोळा घेत आपल्याला हवे तेच विचार जगभर पसरवायचे हे फेसबुकचे उद्दिष्ट आहे.

'

मला वाटते की मिसळपावसुध्दा अमेरिकन सरकारचेच हेरगिरीचे अत्याधुनिक साधन आहे. मिपावर सगळे सदस्य काय लिहित असतात त्याकडे अमेरिकेचे बारीक लक्ष असते. बुश प्रशासनाच्या शेवटच्या दिवसात बुशबाबाला फारसे काम नव्हते तेव्हा २००८ मध्ये विसोबा खेचरना बुशने व्हाईट हाऊसमध्ये बोलावून घेतले होते हे माहित नाही का? मिसळपावमध्ये अमेरिकन इन्व्हॉल्व्हमेन्ट इतकी जुनी आहे.

सर्व दहशतवादी संघटनांना मिळणारी शस्त्रास्त्रे कुठून येतात ?
खरच प्रत्येक हल्ल्याच्या नंतर हाच प्रश्ण पडतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2015 - 2:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

दोन रस्ते रायतेत गाववाले

१ अमेरिकन असल्याचे (असला म्हणजे गोळा बारूद) चे ब्लॅक मार्केटिंग ह्याचा रस्ता सेंट्रल अन साउथ अमेरिकन ड्रग कार्टेल्स थ्रू किंवा अलास्का थ्रू असतो

२ सोवियत रशिया फुटल्या नंतरच्या गोंधळात गायब झालेली हत्यारे ज्यांचे कुठलेच ऑडिट नाही किंवा खानेसुमारी झालेली नाही

३ तीसरा मार्ग राजमार्ग म्हणजे एकमेकांच्या प्रभावक्षेत्रातल्या बंडखोरांस विरुद्ध सरकारांनी लाडाकोडाने हत्यारे पुरवणे

कपिलमुनी's picture

17 Nov 2015 - 11:56 am | कपिलमुनी

Lord Of War

हा चित्रपट बघा .

सुबोध खरे's picture

17 Nov 2015 - 12:05 pm | सुबोध खरे

Around 100 million Ak-47s are circulating around the world, with 47 national armies utilizing the weapon. Russia has stated that it only accounts for 10 to 12 percent of the sales of the weapon, with the rest being unlicensed and counterfeit copies.
counterfeit production of AK-47s stems from the fact that the inventor of the AK-47 Mikhail Kalashnikov “never patented the rifle’s design – the thought had never occurred to him or anyone else under the Soviet regime.
http://www.havocscope.com/tag/counterfeit-weapons/
http://www.havocscope.com/black-market-prices/ak-47/
http://www.havocscope.com/tag/arms-trafficking/

DEADPOOL's picture

16 Nov 2015 - 2:25 pm | DEADPOOL

बापू या विषयावर बोलण्याचा अधिकार तुमचाच!!!!!!

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 3:47 pm | वेल्लाभट

जी२० बैठक चालू असलेल्या तुर्कस्तानातही आत्मघातकी हल्ला झालाय म्हणे आज
http://www.usnews.com/news/world/articles/2015/11/15/turkey-suicide-bomb...

उगा काहितरीच's picture

16 Nov 2015 - 3:57 pm | उगा काहितरीच

फ्रान्सने म्हणे हवाई हल्ले चालू केलेत.

काळा पहाड's picture

16 Nov 2015 - 4:22 pm | काळा पहाड

भारत आंतरजालावरच्या आयसिस समर्थकांवर कारवाई सुरू करणार असल्याच्या बातम्या आहेत. मोगा उर्फ हितेशचं नाव मिपातर्फे नॉमिनेट करा.

संदीप डांगे's picture

16 Nov 2015 - 4:30 pm | संदीप डांगे

'मिलिटरी प्रीसीजन'ने केल्या जाणार्‍या हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्येकवेळी 'पासपोर्ट' सापडणे... मजेशीर आहे.

अत्रन्गि पाउस's picture

17 Nov 2015 - 12:34 am | अत्रन्गि पाउस

हा मुद्दा मलाही खटकला होता

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 7:42 am | DEADPOOL

'मिलिटरी प्रीसीजन'ने केल्या
जाणार्या हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्येकवेळी
'पासपोर्ट' सापडणे... मजेशीर आहे.>>>>>>१

विकास's picture

17 Nov 2015 - 8:16 am | विकास

यात मजेशीर असे काहीच नाही. दोन शक्यता असतात. पहीली सरळसोट धरली जाणारी म्हणजे ती दहशतवादी व्यक्ती त्या पासपोर्ट असलेल्या देशातून आलेली आहे अशी. मात्र ही शक्यता सरकारी यंत्रणा गृहीत धरत नाहीत. या संदर्भात देखील धरली गेली नाही असेच येथे माध्यमात वाचले/ऐकले. त्यामुळे ते सतत "कथीत" असेच म्हणताना ऐकले. ते पासपोर्ट आणि डिएनए वगैरे प्रकाराने (फोरेन्सिक) चाचणी करून झाल्यावर मगच ते जे काही असेल ते ठरवतात.

तरी देखील अशा बातम्यांचे परीणाम घडायचे ते घडतातच. उदा. मॅसेच्युसेट्स आणि जॉर्जिया या (किमान) दोन राज्यांच्या गवर्नर्सनी सिरीयन निर्वासितांना घेणार नाही असे सांगितले. (मॅस गर्वर्नरने ओबामा सरकारने निर्वासितांना देशात घेताना कुठली तपासणी - प्रीस्क्रिनिंग करणार आहेत ते सांगावे असे सांगितले आहे.)

संदीप डांगे's picture

17 Nov 2015 - 11:54 am | संदीप डांगे

विकासजी, हे सगळे 'सायकॉलॉजिकल वॉर' आहे. तुम्ही देत असलेले विश्लेषण हे बुद्धिमंत, विचारी, प्रत्येक गोष्टीचा शेवटपर्यंत माग ठेवून निष्कर्ष काढणार्‍या लोकांसाठी ठिक आहे. पण सामान्य लोक फक्त बातम्यांमधे पासपोर्टचा उल्लेख वाचतात. जुजबी संबंध लावून मेमरी फिक्स करतात. अशाच छोट्या छोट्या बिनमहत्त्वाच्या वाटणार्‍या बातम्यांनी एक मोठी अदृश्य पण मजबूत प्रतिमा शत्रूपक्षाबद्दल तयार केली जाते. पासपोर्टचा उल्लेख करून बातमीदार गोत्यात येत नाही. कारण त्यावर कोणी प्रश्न विचारले तर 'कथित' हे बिरुद लावलेलेच असते. पण बातम्या आपले काम अचूक करून जातात.

जेव्हा माध्यमांचं सर्व जग काही मूठभर लोकांच्या हाती आहे तेव्हा समोर येणार्‍या बातम्यांवरच पूर्ण विश्वास मी तरी ठेवत नाही. बातम्यांशिवाय आपल्याकडे घडलेल्या घटनेबद्दल काहीही पुरावा नसतो. जंगलामधे विरप्पन मारला ही बातमी आली म्हणून तो मेला असे मानायचे. खरोखर विरप्पन जीवंत आहे, की आधीच मेला, की त्यात अजून काही गौडबंगाल आहे, याचे सत्य आपणा पर्यंत पोचूच शकत नाही.

माझे आयसिसबद्दलचे मत वरच मांडले आहे. आयसिसने इजरायलवर एकदाही हल्ला केला नाही. सर्व मुस्लिम जगताची सहानुभूती पॅलेस्टाइनकडे असतांना त्याबद्दल आयसिसची भूमिका अजून समजली नाही. आयसिस इज अ क्राफ्टेड टेररीजम. आयसिसचा फुलफॉर्म माहित आहे का असे विचारणारे अमेरिकाप्रेमातून बाहेर येतील तेव्हा स्वच्छ डोळ्यांनी बघणे शक्य होईल.
आयसिस नेहमी इजरायलच्या शत्रूंवरच का हल्ले करते याचे उत्तर कुणी जाणकार देत असेल स्वागत आहे.

भंकस बाबा's picture

18 Nov 2015 - 12:52 am | भंकस बाबा

इस्राएल वर कशा प्रकारे हल्ला करावा इसिसने?
इस्राएलच्या आसपास असलेल्या एका इस्राएलच्या दोस्त राष्ट्रचे नाव सांगावे आपण.
आपल्या भारतात असलेला दहशतवाद कोणी क्राफ्ट केला आहे?
संदीपजी आतातरी माना की हे धर्मवेड आहे. मी स्वतः एका मुस्लिम वस्तीत राहतो. माझ्या शेजारील मुस्लिम जीवाला जीव देणारे आहेत. पण धर्माची गोष्ट निघते तेव्हा ते काय बोलतात हेच त्यांना कळत नाही.जगातील घडणारी प्रत्येक घटना ही कुराण वा हदीस मधे आधीच नोंद झालेली असते हयावर प्रत्येक मुस्लमानाची श्रद्धा असते. त्यामुळे कयामतची वेळ आली आहे सांगून ह्यांना आरामात भड़कवु जाऊ शकते.
गोवंशहत्याबन्दीला माझा विरोध आहे. पण गाई बैल मारून त्यांची मुंडकि दर्शनी भागात मांडणार्याच्या मानसिकतेला तुम्ही काय म्हणाल .
एक उदाहरण देतो काही दिवसांपूर्वी आमच्या भागात असलेल्या एका मंदिरात एकाने भरधाव गाडी घुसवली. गाडी चालवणारा मुस्लिम होता.धड़क इतकी जबरदस्त होती की मंदिराची लोखंडी जाळी तोडून गाडी आत घुसलि आतील चार माणसे जबर घायाळ झाली. उपस्थित असलेल्या इतर माणसानी त्या चालकाला चोप दिला पोलिस केस झाली. प्रकरण संपले. आता हीच स्थिति तुम्ही उलटी करुन बघा . म्हणजे मशिद आणि हिन्दू वाहनचालक . तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल?

संदीप डांगे's picture

18 Nov 2015 - 1:14 am | संदीप डांगे

माझ्या शेजारील मुस्लिम जीवाला जीव देणारे आहेत. पण धर्माची गोष्ट निघते तेव्हा ते काय बोलतात हेच त्यांना कळत नाही.जगातील घडणारी प्रत्येक घटना ही कुराण वा हदीस मधे आधीच नोंद झालेली असते हयावर प्रत्येक मुस्लमानाची श्रद्धा असते. त्यामुळे कयामतची वेळ आली आहे सांगून ह्यांना आरामात भड़कवु जाऊ शकते.

यासाठी धन्यवाद!

मुस्लिमवस्तीत फक्त तुम्हीच राहता असा काहीसा आपला गैरसमज आहे. असो. कळव्यात मी अगदी मशिदीसमोरच्या बिल्डिंगीत राह्यलोय एक वर्ष. नाशिकमधे एक वर्ष मुस्लिम वस्तीत ऑफिस होते, तेही एका मुसलमानाचे. तुम्हाला होत असलेला त्रास मला कधीच झाला नाही. याला काय म्हणावे?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 1:25 am | टवाळ कार्टा

पण सगळीकडेच अशी चांगली माणसे भेटतील असेही नाही

संदीप डांगे's picture

18 Nov 2015 - 2:14 am | संदीप डांगे

टका, मला अगदी हेच म्हणायचे आहे आणि असते. पण सरसकटीकरणाने, ब्रेनवॉशिंगने आपण एखाद्या समूहाबद्दल एक प्रतिमा बनवुन घेतो आणि त्याच प्रतिमा आपल्या मनातून बाहेर प्रक्षेपित होतात. मग आपल्याला सर्व जग तसेच भासू लागते.

एक उदा. नाशिकमधे दुधबाजार नावाचा खास मुस्लिम एरिया आहे. माझ्या मेव्हण्याने त्या एरिआबद्दल भयंकर काय काय सांगितले, की तिकडून जातांना कुणाशी काही वादावादी झाली तर ते लोक सरळ कापुन टाकतात वैगेरे... आता असे काय काय भयंकर ऐकले की कोण कसला जातो तिकडून. बरे कधी जाण्याची वेळ आलीच तर जीव मुठीत धरुन जायचे, कुठे काय खुट्ट होऊ नये ही दक्षता. हीच ती 'दहशत'. जी मेव्हण्याच्या 'रीपोर्टींग'ने माझ्या मनात झालेली. पण नेहमीच तिकडून येणेजाणे सुरु झाल्यावर नेहमीसारखाच बाजार असलेला तो रस्ता जाणवला. त्यात कधीही वावगे आढळले नाही की घडले नाही. पण मला एकही अनुभव नसतांना उगाच मनात भीती राहतेच. मग कधीकाही चिमूटभर झाले तरी पराचा कावळा व्हायला वेळ लागत नाही.

दुसरं असं की मुस्लिम भागात ऑफिस असतांना काही तिथली रहिवासी मुलं बारा-चौदा वयोगटाची खेळता खेळता माझ्या पार्क केलेल्या कारवर अंग टाकुन द्यायचे, खेटून उभी राहायची. त्यांना ओरडून हाकालायची हिंमत होत नव्हती. न जाणो आपण ओरडलो आन कुठून हे यांचे माय-बाप तलवारी घेऊन येऊन आपली खांडोळी करायचे. ही 'दहशत'. पण एकदा हिंमत करून ओरडलो तर ती मुले नंतर कधीच कारच्या वाटेला गेली नाहीत. असले प्रकार इतर वस्तीतल्या मुलांकडूनही होतात, त्यांनाही ओरडलो आहे. तिथे ही भीती नसते. पण त्यांचे पालक अंगावर येण्याचे चान्सेस भरपूर असतात. (मुंबईत एवढ्यातच कुणा ड्रायवरने मुलास ओरडले म्हणून त्याच्या पालकांनी ड्रायवरला बेदम चोपला अशी बातमी बघितली.)

आतिवासताई, बिका, पेठकरकाका व इतर अनेक सन्माननीय मिपासदस्य मुस्लिमदेशांमधे राहून, जवळून अनुभव घेऊन आहेत. त्यांचे अनुभव माझ्यापेक्षा लक्षपटीने मोठे आणि प्रभावी आहेत. त्यांच्या लिखाणातूनही आपल्याला ही चांगली माणसे, देश दिसतातच. पण इकडे काही आयडींना 'मुस्लिमांमधे चांगले काही असू शकते' हे म्हटले की मिर्च्या झोंबतात. त्यांच्यासाठी मुस्लिम हे कायम रानटी, तलवार बाहेर काढून अ-मुस्लिमांच्या गळ्याचा घोट घ्यायला टपलेले, चार बायका करणारे असलेच काही असतात. आता असतात तर असू देत बापडे. मी तरी यापुढे याविषयावर एक शब्दही लिहणार नाही असे ठरवले आहे. ज्यांना जे विचार घट्ट धरून बसायचे आहे ते असू देत. त्यांच्यातल्या विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला की मिर्च्या झोंबतात हे कळले आहे. तस्मात्... या विषयाला यापुढे .... राम राम.

जगात बर्‍याच प्रकारचे लोक असतात. सरसकटीकरण टाळावे याच मताचा मी आहे. बाकी जैसी जिसकी सोच.

त्यांच्या धर्माविरुद्ध काही बोलून बघा काय होतं ते. आणि तोच मुख्य फरक आहे. एरवी अतिशय चांगले वागणारे हे लोक मात्र धर्मासंबंधी काही असलं की एकदम कट्टर होतात. अर्थात सगळेच लोक असे आहेत असं नाही पण प्रमाण मात्र इतर धर्मियांपेक्षा नक्कीच बऱ्यापैकी जास्त आहे. हिंदू देवतांची नग्न चित्रे काढली गेली, चित्रपटांमध्ये चेष्टा केली गेली पण हिंदूंनी एवढा कडवा प्रतिकार केला नाही, उलट PK सारखे चित्रपट तर शेकडो कोटींचा धंदा करून गेले. पण तेच ए आर रेहमाननी नुसतं एका चित्रपटाचं संगीत दिलं तर मात्र फतवा निघाला.

हेच सरसकटीकरण हिंदूंबद्दल पण नको हेच म्हणणं आहे. एका दादरी घटनेनी समस्त हिंदू, रा. स्व. संघ आणि भाजप कम्युनल झाले. पण मुंबई दंगल, २६/११, संसदेवरील हल्ला, मुंबई लोकल मधील स्फोट, ९/११, शर्ली हेब्डो मधील हत्याकांड, आत्ताचे हत्याकांड आणि इतर बरीच हत्याकांडे, सामुहिक बलात्कार हे होऊन सुद्धा मुसलमान मात्र शांतताप्रिय. जरी अगदी त्या त्या घटनांच्या वेळी एखाद्या दहशतवादी संघटनेनी जबाबदारी घेतली असेल की ज्या संघटनेत फक्त एकाच धर्माचे लोक आहेत, तरी पण तो धर्म आणि ते लोक मात्र शांततेचे दूत.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 3:19 am | टवाळ कार्टा

सहमतीबद्दल धन्यवाद
पण सगळेच एरीआ असे नसतात याबद्दल तुम्हीसुध्धा सहमत व्हाल
वर जे लिहिलेत त्याप्रमाणे चांगला अरीआ एरीआ कोणता आणि दुसरी काळी बाजू असणारा एरीआ कोणता हे कशावर पारखून घेणार?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 3:22 pm | टवाळ कार्टा

यावर प्रतिसाद नाही??

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Nov 2015 - 5:21 am | कैलासवासी सोन्याबापु

एक उदा. नाशिकमधे दुधबाजार नावाचा खास मुस्लिम एरिया आहे.

काय आठवण दिली राव! कोकणी दरबार नामे खाद्य तीर्थक्षेत्र इकडेच आहे न हो?

विंग्रजीत आहे. भाषांतर करायला वेळ मिळाला नाही. तरी आपल्या या धाग्याशी सुसंगत आहे म्हणून इथे टाकतोय.
*from facebook*

A German's View on Islam - worth reading because this is by far the best explanation of the Muslim terrorist situation I have ever read. His references to past history are accurate and clear. The author of this email is Dr. Emanuel Tanya, a well-known and well-respected psychiatrist--a man, whose family was German aristocracy prior to World War II, and owned a number of large industries and estates. When asked how many German people were true Nazis, the answer he gave can guide our attitude toward fanaticism.

'Very few people were true Nazis,' he said, 'but many enjoyed the return of German pride, and many more were too busy to care. I was one of those who just thought the Nazis were a bunch of fools. So, the majority just sat back and let it all happen. Then, before we knew it, they owned us, and we had lost control, and the end of our world had come.

My family lost everything. I ended up in a concentration camp and the Allies destroyed my factories.'

We are told again and again by 'experts' and 'talking heads' that Islam is the religion of peace and that the vast majority of Muslims just want to live in peace. Although this unqualified assertion may be true, it is entirely irrelevant. It is meaningless fluff, meant to make us feel better, and meant to somehow diminish the specter of fanatics rampaging across the globe in the name of Islam.

The fact is that the fanatics rule Islam at this moment in history. It is the fanatics who march. It is the fanatics who wage any one of 50 shooting wars worldwide. It is the fanatics who systematically slaughter Christian or tribal groups throughout Africa and are gradually taking over the entire continent in an Islamic wave. It is the fanatics who bomb, behead, murder, or honor-kill. It is the fanatics who take over mosque after mosque. It is the fanatics who zealously spread the stoning and hanging of rape victims and homosexuals. It is the fanatics who teach their young to kill and to become suicide bombers.

The hard, quantifiable fact is that the peaceful majority, the 'silent majority,' is cowed and extraneous. Communist Russia was comprised of Russians who just wanted to live in peace, yet the Russian Communists were responsible for the murder of about 20 million people. The peaceful majority were irrelevant.

China's huge population was peaceful as well, but Chinese Communists managed to kill a staggering 70 million people.

The average Japanese individual, prior to World War II, was not a warmongering sadist. Yet, Japan murdered and slaughtered its way across South East Asia in an orgy of killing that included the systematic murder of 12 million Chinese civilians, most killed by sword, shovel, and bayonet.

And who can forget Rwanda, which collapsed into butchery. Could it not be said that the majority of Rwandans were 'peace loving'?

History lessons are often incredibly simple and blunt. Yet for all our powers of reason, we often miss the most basic and uncomplicated of points: peace-loving Muslims have been made irrelevant by their silence. Peace-loving Muslims will become our enemy if they don't speak up, because like my friend from Germany, they will awaken one day and find that the fanatics own them, and the end of their world will have begun.

Peace-loving Germans, Japanese, Chinese, Russians, Rwandans, Serbs, Afghans, Iraqis, Palestinians, Somalis, Nigerians, Algerians, and many others have died because the peaceful majority did not speak up until it was too late.

Islamic prayers have now been introduced into Toronto and other public schools in Ontario, and, yes, in Ottawa too while the Lord's Prayer was removed (due to being so offensive?! To whom? Not to the vast majority of Canadians!).

The Islamic way is only peaceful until the fanatics move in.

In Australia, and indeed in many countries around the world, many of the most commonly consumed food items have the halal emblem on them. Just look at the back of some of the most popular chocolate bars, and at other food products in your local supermarket. Foods on aircraft have the halal emblem, just to appease the privileged minority who are now rapidly expanding throughout the world.

In the U.K, the Muslim communities refuse to integrate and there are now dozens of ?no-go? zones within major cities across the country that the police force dare not intrude upon. Sharia law prevails there, because the Muslim community in those areas refuses to acknowledge British law.

As for we who watch it all unfold, we must pay attention to the only group that counts -- the fanatics who threaten our way of life.

Anyone who doubts the seriousness of this issue and just deletes this email without sending it on, is contributing to the passiveness that allows the problems to expand.

So, I beg you, extend yourself a bit and send this on and on and on in the hope that thousands, world-wide, read this, think about it, and send it on - before it's too late . . .. because we remained silent.

भंकस बाबा's picture

18 Nov 2015 - 8:48 am | भंकस बाबा

अशा अनेक घटना आहेत ज्या मी इथे देण्याचे टाळत आहे. शाब्दो अर्ली च्या घटनेनंतर मला एकहि मुसलमान या घटनेचा विरोध करताना दिसला नाही. जो विरोध होता तो मगरीचे अश्रू होते. अगदी कालची बातमी घेतली तरी आझम खान चे बोलणे हे मुस्लिम मनाचे प्रतिनिधित्व करते. ओवेसिने देखील वेगळ्या भाषेत पेरिस वरील हल्ल्याचे समर्थन केले आहे. हिंदू नेत्यांनी कितीही आरङाओरडा केला तरी हिन्दू टोकाची भूमिका घेत नाही. गुजरातचे उदाहरण देऊ नका. गुजरातमधील जनतेला विचारा. क्रिकेटमधे पाकिस्तान जिंकले की अहमदाबाद मधे दीवाळी साजरी होत होती. गुजराती तसे प्रतिकार करण्यात नेहमी मागेच् असतात. पण गोधराच्या घटनेने इतक्या वर्षाचा संताप उफाळून आला.
मुस्लिमाचा कैवारि म्हणवण्यार्या आजम ख़ानने मुज्झफरनगर दंगलीच्या वेळी सोईस्कर मौन बाळगले होते. का? कारण तेथील बहुसंख्य मुस्लिम शिया होते. आजही भारतात शिया मुस्लिमाना राजकारणात मानाचे स्थान नाही. हिन्दू धर्मातील अनुसूचित जातिना आरक्षण असते. तुम्ही हां शियाचा चेंडू आरक्षण मुद्द्यात् टाकून बघा. सुन्नी मुस्लिम देश पेटवण्याची भाषा करतील. सर्वाना समान मानणार्या मुस्लिम धर्मात ९२ (चु.भू.दया.घ्या.)अलग अलग जाती आहेत. हे मुस्लिम आपल्याच जमातीने बांधलेल्या मशीदित जातात. आपल्याला कोणत्याही देवतेचे देऊळच काय चर्च वा दर्गा पण पाया पडायला चालतो.
अगदी आत्ता पण सीरियन निर्वासिताना यूरोपियन राष्ट्र आसरा देत आहेत. गड़गंज श्रीमंत असलेली मुस्लिम राष्ट्र यांना लांबच ठेवत आहेत कारण ते त्यांच्या जमातीचे नाही आहेत ना!

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Nov 2015 - 11:19 am | पुण्याचे वटवाघूळ

'मिलिटरी प्रीसीजन'ने केल्या जाणार्‍या हल्ल्याच्या ठिकाणी प्रत्येकवेळी 'पासपोर्ट' सापडणे... मजेशीर आहे.

संदीपराव, तुम्ही कधी परदेशात गेला आहात की नाही हे माहित नाही. पण असा मुद्दा तुम्ही काढत आहात त्याचाच अर्थ तुम्ही बाहेर गेला नसावात असे वाटते.

अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसेन्स तर सर्वत्र आपल्याजवळ असतेच. ते फोटो आय.डी म्हणून चालते. अशी फोटो आय.डी कधी लागेल हे काहीच सांगता येत नाही. बडवायझर विकत घ्यायची असेल किंवा पबमध्ये जायचे असेल तर ती आय.डी दाखवावी लागेते (वय १८ पेक्षा जास्त आहे हे प्रूव्ह करायला). अशी आय.डी कधी दाखवायला लागू शकते. युरोपात इतक्या प्रमाणात रेफ्युजी आले आहेत तेव्हा पासपोर्ट दाखवून आपले रेफ्युजी स्टेटस सिध्द करायला अडचण पडणार नाही. रेफ्युजींच्या नावावर भलतेच कोणी घुसले आहेत का हे तिथले पोलिस चेक कशावरून करत नसतील? अशावेळी पोलिसांना दाखवायला पासपोर्ट गरजेचा आहेच.आणि वेळेआधी जर पोलिसाने पकडले तर हल्ला करता येणार नाही हे गणित कशावरून नसेल? म्हणून कशावरून त्याने पासपोर्ट बरोबर ठेवला नसेल?

संदीपराव, जरा नाशिकच्या बाहेर पडून बघा. जग बरेच मोठे आहे.

संदीप डांगे's picture

19 Nov 2015 - 10:18 pm | संदीप डांगे

वटवाघुळजी, माझ्या ज्ञानावर/फिरण्यावर पराकोटीचा विश्वास दाखवल्याबद्दल शतशः धन्यवाद!

काही बातम्या देतो:
गार्डीयन
One of the most chilling details from the Paris attacks is that the passport of a Syrian refugee was found on or near the body of a dead suicide bomber. The Greek government has subsequently said that someone using the passport was among the refugees who landed in the Greek islands in early October, and the Serbian government says the passport was again used to cross its southern border a few days later.

This development has increased fears of Isis infiltrators among the thousands of desperate refugees arriving in Europe. Allies of the German chancellor, Angela Merkel, have voiced security concerns over her open-door policy and one, the Bavarian finance minister Markus Söder, told a German newspaper: “The days of uncontrolled immigration and illegal entry can’t continue just like that. Paris changes everything.”

The new government in Poland is using the news as a reason to back out of an agreement to take in several thousand Syrians. And the front page of the British newspaper the Mail on Sunday stated definitively that the attackers “sneaked into Europe as fake Syrian refugees”.

अलजझिरा अमेरिका : दिनांकः १७ नोव्हेंबर २०१५
Confusion over a Syrian passport found near the body of one of the six suicide bombers who blew themselves up in Paris last week mounted after investigators on Tuesday said there are indications the travel document actually belongs to a Syrian regime soldier.

Far-right political groups across Europe and the governors of several U.S. states have presented the discovery of the passport as an argument against resettling more of the refugees currently streaming out of conflict zones in Syria, as well as other parts of the Middle East and Africa.

News agency Agence France-Presse quoted a source close to the French investigation as saying the passport — in the name of Ahmad al-Mohammad, born in the Syrian city of Idlib on Sept. 10, 1990 — may have belonged to a soldier loyal to Syrian President Bashar al-Assad, whose forces are battling the Islamic State in Iraq and the Levant (ISIL) and several other armed groups.

द गार्डीयन : दिनांक १७ नोव्हेंबर २०१५
Serbian police have arrested a man carrying a Syrian passport with the same details as one found near the body of one of the Paris suicide bombers, police sources told the Guardian.

The passport bears the same name and details – but a different photograph – as the document found near one of the men who attacked the Stade de France. Serbian officials said that they believe both passports are fake, but added that they are working with French investigators to establish the origin of the documents.

French police found a passport in the name of Ahmad Almohammad, 25, near the body of one of the men who attacked France’s national football stadium on Friday.

http://www.theguardian.com/world/2015/nov/17/serbian-police-arrest-man-w...

http://www.bbc.com/news/blogs-trending-34835005

"Let me underline, the profile of the terrorists so far identified tells us this is an internal threat," Federica Mogherini, the High Representative for Foreign Affairs and Security Policy/Vice-President of the European Commission, said after a meeting with EU foreign ministers. "It is all EU citizens so far. This can change with the hours, but so far it is quite clear it is an issue of internal domestic security."

All Paris Attackers Identified So Far Are European Nationals

आता तुमच्याच प्रतिसादानुसार आता माझे गुडघ्यात असलेल्या डोक्यात खालील प्रश्न उपस्थित झाले आहेत.

१. मी वापरलेला 'मिलिटरी प्रीसीजन' हा शब्द आपण वाचलाच नाही का? मिलिटरी प्रीसीजननुसार असे हल्ले करायचे असतील तर त्याची पुर्वतयारी कैक महिने आधी झालेली असते. त्याबद्दल लागणार्‍या बारिक सारिक गोष्टींची तपशीलात पुर्तता केली जाते. अशी पुर्तता हल्ला शंभरटक्के (काहीही म्हणजे काहीही झाले तरी) यशस्वी होण्यासाठी असते. तेव्हा पासपोर्ट बाळगणे हा हल्लेखोरांना आवश्यक अशी गोष्ट असेल तर ते कुठल्या देशाचा पासपोर्ट वापरतील व का?

२. पोलिस कधीही चेक करू शकतात म्हणून सर्व फ्रेंच नागरिक (यात सर्व वंशाचे, रंगाचे, वर्णाचे, वर्णनाचे आले) आपले पास्पोर्ट घेऊन आपल्याच देशात फिरतात का?

३. 'परदेशस्थ वा एलियन' दिसणारे मनुष्यबळ अशा हल्ल्यांसाठी वापरले जाते का? वापरले जात असेल तर कुठेही चेकिंग होऊ शकते म्हणून त्यास चुकवण्यासाठी तेवढे ट्रेनिंग आणि सक्षम कागदपत्रे संबंधितांजवळ असतात. ह्या हल्ल्याच्या वेळी ती नसतील हे का नाकारावे? त्यासाठी त्यांना सीरीयन पासपोर्टच वापरायची काय गरज पडावी?

४. हल्लेखोर वा हल्ल्याचे सूत्रधार स्वतःचेच लोक धोक्यात येतील असे कागदपत्र जवळ बाळगून हल्ले करायला जाण्याइतकी बाळबोध असतील असे वाटते का?

५. सुसाईड बॉम्बरच्या जवळ दुसराच कोणी जेन्युइन रेफ्युजी नसेल हे कशावरुन?

६. जो पासपोर्ट सापडला आहे त्याचा खरा मालक दुसरीकडेच प्रवास करतांना आढळला आहे, त्याबद्दल माहिती आहे काय?

७. हल्ल्यासंबंधीच्या बातम्या आणि त्यातली विसंगती घरबसल्या मला जालावरून कळत असेल तर देशोदेशी फिरण्याचे काय प्रयोजन असावे बरे?

तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हमखास देऊ शकत असाल याचा मला दुर्दम्य विश्वास आहे कारण आपण सारे जग फिरला आहात, सर्वज्ञ आहात. मज पामरास असे सर्वज्ञ होण्यासाठी जगभ्रमंती करावी लागेल त्यासाठी द्रव्यस्वरुप मदत आपण जरूर कराल अशी अपेक्षा आहे. माझ्याकडे पासपोर्ट नाही त्यामुळे आता आधी त्याची तयारी करतो. तुम्ही मदतनिधी उभार्‍याच्या तयारीला लागा.

ट्रेड मार्क's picture

20 Nov 2015 - 12:56 am | ट्रेड मार्क

'इस'चे किंवा कुठल्याही दहशतवादी संघटनेचे बहुतेक सगळे लोक्स अश्या हल्ल्यांसाठी ट्रेन केलेले असतात. त्यात सगळ्या रेफ्युजींमुळे गोंधळ असणारच. त्याचा फायदा जास्त झाला असावा.

फ्रेंच नागरिकांकडे कुठल्या न कुठल्या स्वरुपात फोटो आयडी असणारच ड्रायविंग लायसेंस, स्टेट आयडी ई ई. पोलिस तुम्हाला कधी पण तुमची ओळख सिद्ध करा म्हणून सांगू शकतात. तुम्हाला वरील दोन पैकी एक किंवा ते नसल्यास तुमचे पारपत्र दाखवणे आवश्यक असते.

युरोपमध्ये सर्वात जास्त मुस्लिम फ्रान्स मध्ये आहेत, त्यामुळे ते अगदीच एलियन आहेत असे फ्रेंच लोकांना वाटत नसेल.

मुळात 'इस'ने जबाबदारी स्वीकारल्यावर तुम्ही कशासाठी एवढे समर्थन करताय? 'इस'नी आधी पण जाहीररीत्या सांगितलंय की रेफ्युजींच्याबरोबर ते 'इस'च्या लोकांना (मुद्दाम अतिरेकी म्हणत नाही, उगाच भावना दुखवायच्या कोणाच्यातरी) पण घुसवणार आहेत. आणि त्यांनी ते केलं पण!

एखाद्या विचारधारेचा अथवा समुहाचा विरोध करताना आपण समर्थन कोणाचं करतोय याचं भान ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं.

उर्वरीत मुद्द्यांचे पुण्याचे वटवाघूळ उत्तर देतीलच.

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 3:08 am | संदीप डांगे

मुळात 'इस'ने जबाबदारी स्वीकारल्यावर तुम्ही कशासाठी एवढे समर्थन करताय?

मी नक्की कशाचं समर्थन केलंय हे तुम्ही माझ्या पोस्टमधे दाखवू शकाल काय? आयसिसने जबाबदारी स्विकारली यात दुमत कुठे आहे? पण आयसिस जे दिसते ते नाही असा माझं म्हणणं आहे. यामागे अजून काही वेगळं असू शकतं. "विकिलिक्स व अन्य काहींच्या दाव्यानुसार आयसिस हे अमेरिकेने बनवलेलं, त्यांच्या तालावर नाचणारं भूत आहे, ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेस इराक, इराण, सिरिया आदी प्रांतांमधे कायम युद्धजन्य वातावरण ठेवायचं आहे. त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते आवश्यक आहे." यात 'दहशतवादाचं समर्थन' मी करतोय असं काही लोकांना दिसलं. तो त्यांचा प्रश्न.

'इस'नी आधी पण जाहीररीत्या सांगितलंय की रेफ्युजींच्याबरोबर ते 'इस'च्या लोकांना (मुद्दाम अतिरेकी म्हणत नाही, उगाच भावना दुखवायच्या कोणाच्यातरी) पण घुसवणार आहेत. आणि त्यांनी ते केलं पण!

'सिरीयन पासपोर्ट हल्लेखोराजवळ सापडले' ह्या बातमीचा संदर्भ वरिल वाक्याशी जरूर आहे. पण माझ्या ह्या प्रश्नाशी नाही. 'मिलिटरी प्रीसिजनने केल्या जाणार्‍या हल्ल्यांमधे हल्लेखोराचा 'पासपोर्ट' कसा सापडतो?'

एखाद्या विचारधारेचा अथवा समुहाचा विरोध करताना आपण समर्थन कोणाचं करतोय याचं भान ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं.

मी इथे कुणाचाही विरोध वा समर्थन करत नाही हे वरच्या प्रतिसादांमधेच लिहलंय. मला जाणवलेल्या विसंगतींवर भाष्य करतो. तसेही विरुद्ध बाजू/पैलू/माहिती मांडणे म्हणजे ती मान्यच असणे असे नसते. ज्यात विसंगती जाणवते त्याच्या विरूद्ध पार्टीतच असले पाहिजे असे काही आहे का? तुम्हाला मी कुठल्या विचारधारेचा वा समुहाचा विरोध वा समर्थन करत आहे असे वाटले व का? बुश साहेबांनी म्हटल्याप्रमाणे 'जे आमच्यासोबत नाहीत ते सर्व दहशतवादी', किंवा केजरीवालप्रमाणे, 'जे आपवाले नाहीत ते सर्व भ्रष्टाचारी' असे काही?

अवांतरः
१. नासाने मंगळावर पाणी शोधल्याची घोषणा नेमकी त्याच दरम्यान केली जेव्हा इस्रोच्या मंगळयानाने मंगळकक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आणि इस्रोने यानाकरवी मिळालेल्या माहितीचे वितरण सुरू केले.

२. काही निष्पाप भारतीयांना अमेरिकन औषध कंपन्यांनी गिनिपिग (प्रयोगाचे उंदिर) म्हणून वापरले.

या दोन घटनांमागे काहीच कन्स्पिरसी नाही असे बाळबोध लोक समजण्यास मोकळे आहेत.

ट्रेड मार्क's picture

20 Nov 2015 - 4:06 am | ट्रेड मार्क

एकूण सूर मला 'इस'ने केलेल्या हल्ल्यात त्यांची चूक नाही असा वाटला. अमेरीकेनी उभं केलेलं भूत वगैरे जरी असलं, जरी त्यांच्या (अतिरेक्यांच्या/ संघटनांच्या) खांद्यावरून अमेरिका बंदूक चालवत असली तरी ते अतिरेकी/ संघटना पण तेवढेच दोषी आहेत. कोणी एवढे दुधखुळे आहे का की अमेरीकेनी खेळणी सांगून खरी शस्त्रास्त्र दिली आणि हे फक्त खेळत होते ती खरी आहेत हे मात्र लोक मेल्यावर कळलं? कोणी एखादा गुन्हा करायला उद्युक्त केलं म्हणून प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्याचा गुन्हा माफ नाही होऊ शकत.

हा हल्ला मिलिटरी प्रीसिजनने केला असं खरं तर वाटत नाही. प्लानिंग तर नक्कीच असणार पण अगदी ६ महिने प्लान करून आणि सराव करून आले नसावेत. विसंगती तर जगात सगळीकडे भरून राहिलीये. त्यामुळे नुसता पासपोर्ट कसा काय सापडला ही विसंगती फारच किरकोळ आहे. एवढे महिने कुर्दीश लोकांवरील अत्याचाराच्या चित्रफिती, ज्यात कित्येक लहान मुलींवरील बलात्काराच्या कहाण्या, लहान मुलांचे मृतदेह, बघून कोणाची मने द्रवली नाहीत. पण एका आयलान च्या फोटोमुळे मात्र सगळं बदललं. सिरीया मधील मुस्लिम लोकांना सामावून घ्यायला बाकी एकाही मुस्लिम देशानी दार पण नाही उघडलं पण पूर्ण वेगळी संस्कृती असणाऱ्या लोकांनी मात्र त्यांना सामावून घ्यावं ही अपेक्षा ह्या खऱ्या विसंगती आहेत.

या आणी इतर या विषयाशी संबंधीत धाग्यांवर तुम्ही जर जास्त प्रतिवाद करताना दिसता म्हणून आपलं वाटलं की समर्थन तर करत नाही? म्हणून जरा समजून घ्यावं म्हणलं. समर्थन करत नाही हे समजल्यावर आनंद झाला.

अवांतर मात्र अती अवांतर वाटलं, त्यामुळे तो पूर्णतः वेगळा मुद्दा आहे.

डांगेजि तुम्हाला काय म्हणायचे आहे हे आत्ता कुठे आम्हाला कळू लागले आहे. मान्य इसीस अमेरिकेने पैदा केलेले भुत आहे. मान्य मुस्लमानाची छवि बिघडवण्यासाठी यूरोपियन देश पासपोर्ट नीती वापरत आहेत. पण त्याने मुळ प्रश्न कुठे बाजूला होतो? इसिसच्या कारवायामुळे अमेरिकेचे देखील नुकसान होत आहे पण त्याहून जास्त नुकसान अरबांचे होत आहे. पडलेल्या तेलाच्या किमतिनि अरबांचे देखील कंबरडे मोडले आहे. मग का नाही अरब एकजुट होऊन इसीस चा प्रतिकार करत नाहीत? कारण त्यांच्या जनतेचा इसिसला छुपा पाठिंबा आहे. परम्परागत वैरी असणारे सौदी अरेबिया व् इस्राईल इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चेला तयार होतात यातच सर्व आले. अमेरिका जर मुस्लिमाना संपवण्यासाठी इसिस चा वापर करत असेल तर आगीत तेल मुस्लिमच टाकत आहेत. सौदी, पाकिस्तान, अमीरात हे देश खुल्या मनाने कधीच बोलत नाहीत की आम्ही शियाना आमच्यात् सामावून घेऊ. मरताहेत तर मरुदेत हीच भावना या देशाची आहे. जर आपल्या धर्माच्या एका पंथाबाबत अशी विचारसरणी असेल तर बाकी दुनिएबाबत काय असेल?

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 7:31 pm | संदीप डांगे

मुस्लिम संघटना आयसिसचा विरोध करत आहेत. ओवेसीचेही वक्तव्य बघावे. पण होतंय काय, ह्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही. मिळाली तरी हे त्यांचे 'मगरीचे अश्रू आहेत' असे म्हटले जाते. मग नेमकी काय अपेक्षा असावी मुस्लिमांकडून?

आयसिस मुस्लिमांनाच मारत असतांना आयसिसचे समर्थन सर्वच मुस्लिम करत आहेत हे विधान पटत नाही. डॉ. झाकिर नाईकची सुद्धा खिल्ली मुल्लामौलवी उडवतात. इस्लाममधे बराच सावळा गोंधळ आहे. मुख्य म्हणजे हे सगळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रबिंदूत आले आहे. त्यामुळे ह्या चर्चा घडतात, लोक पुर्वग्रह, बायस्ड दृष्टिकोनातून चर्चा करतात.

याउप्पर मी असे म्हणेन की जौदे न आपल्याला काय करायचे. माझे मत/समर्थन/दृष्टिकोन काहीही असेल तरी रॉ/आयबी/तत्सम काही मला अ‍ॅक्शनप्लान बनवायला सांगणार नाहीत. दहशतवादी संकटाचा सामना करण्यास आपल्यापेक्षा ते जास्त समर्थ आहेत. त्यांना खरे काय ते माहित असेल, आपला देश वाचवायला ते योग्य त्या अ‍ॅक्शन घ्यायला तयार आहेत. आपण इथे चिखलफेक, द्वेषाचे राजकारण खेळून नक्की काय होणार?

काही लोक म्हणतात कन्स्पिरसी थेरीला कवटाळून बसू नका. आता देशोदेशीचे गुप्तचर विभाग आपण काय करत आहोत आणि काय करणार आहोत याची जाहिरात तर करत नाहीत. मग देशप्रमुखांकडून/अधिकृत व्यक्तिंकडून जे 'अधिकृत' वक्तव्य दिले जाते तेच अंतिम सत्य आहे असे कसे मानायचे?

प्रदीप's picture

20 Nov 2015 - 6:23 pm | प्रदीप

२. पोलिस कधीही चेक करू शकतात म्हणून सर्व फ्रेंच नागरिक (यात सर्व वंशाचे, रंगाचे, वर्णाचे, वर्णनाचे आले) आपले पास्पोर्ट घेऊन आपल्याच देशात फिरतात का?

कुठल्याही विकसित देशात तेथील स्थायिकांना (residents) देशाने दिलेले आय. डी. कार्ड सदैव बरोबर बाळगावे लागते. त्याचप्रमाणे बाहेरून काही दिवसांसाठी आलेल्या इतर सर्वांना (म्हणजे जे रेसिडंट्स नहीत त्यांना) त्यांचा पासपोर्ट सदैव जवळ बाळगणे जरूरी असते. हे कधीही, कुठेही पोलिस अथवा तत्सम सरकारी यंत्रणेचा अधिकारी मागू शकतो. Schengen चे नागरीक असलेल्यांना व तेथे बाहेरून आलेल्यांना हे लागू होते.

सदर घटनेच्य संदर्भात ज्या बातम्या येत आहेत, त्यात असे वाचनात आले की तो जो पासपोर्ट तेथे सापडला, त्याच व्यक्तिच्या नावाने एकंदरीत ६ रजिस्ट्रेशन्स युरोपांत अलिकडे आलेल्या स्थलांतरीतांनी केलेली आहेत. कोण जणे, अशा अजूनही केसेस असण्याची शक्यता आहे.

ती व्यक्ति तो पासपोर्ट मुद्द्दाम तिथे जवळ बाळगून होती, ज्यायोगे तपास भरकटला जावा अशी शक्यता येथे असावी. ह्यात तुमच्या १,३,४ व ६ ह्या प्रश्नांची उत्तरे यावीत.

५-- ह्या सर्व सध्य शक्यताच आहेत, त्याबद्दल सध्या ठामपणे काहीच सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही म्हणता ती शक्यताही असावी.

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 6:58 pm | संदीप डांगे

प्रदिपजी,
चर्चेबद्दल धन्यवाद!
तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. तुम्ही आता जे म्हटलंय की "जशा बातम्या येत आहेत त्यावरून पासपोर्टबद्दल ठामपणे काही म्हणता येत नाही" ते आता हळू हळू बातम्या दुसर्‍या-तिसर्‍या पानावर गेल्यानंतर येतात. पण हल्ल्याच्या दिवशी ठळक अक्षरात जिकडे तिकडे पहिल्या पानावर सिरिअन पास्पोर्ट सापडल्याची बातमी मोठ्या जनसमुदायावर मोठा मानसशास्त्रिय परिणाम करणारी असते. आता तो पासपोर्ट आणी त्याची खरी कथा हळू हळु मागे पडून जाईल. पण हा परिणाम पुसल्याजात नाही. वर्तमानपत्रे 'मालकांच्या आदेशानुसार' बरंच काही छापतात. त्याबद्दल हा मुद्दा होता.

प्रदीप's picture

20 Nov 2015 - 7:03 pm | प्रदीप

वर्तमानपत्रे 'मालकांच्या आदेशानुसार' बरंच काही छापतात. त्याबद्दल हा मुद्दा होता.

अगदी डाव्या विचारसरणीच्या, आणि ज्यांना माझ्यासारखे काहीजण 'ब्लीडींग हार्ट्स' म्हणतात, अशा वर्तमानपत्रांनीही तो उल्लेख तसाच केला होता. मला वाटते (नक्की ठाऊक नाही, पाहिलेले नाही, एक शक्यता केवळ) त्या सर्वांनी तो उल्लेख एकाद्या न्यूज एजन्सीने प्रसृत केलेल्या बातमीवरून केलेला असावा.

शब्दबम्बाळ's picture

17 Nov 2015 - 7:05 pm | शब्दबम्बाळ

Tuesday 1 April 2014

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 10:51 am | DEADPOOL

जेव्हा मुम्बई वर हल्ला झाला होता, तेव्हा एकही पश्चिमी देशाने पाकिस्तानवर कड़क कारवाईची मागणी केली नव्हती.

यांचा दुटप्पीपणाच आज यांना घातक ठरतोय

प्रसाद१९७१'s picture

17 Nov 2015 - 11:31 am | प्रसाद१९७१

जेव्हा मुम्बई वर हल्ला झाला होता, तेव्हा एकही पश्चिमी देशाने पाकिस्तानवर कड़क कारवाईची मागणी केली नव्हती.

यांचा दुटप्पीपणाच आज यांना घातक ठरतोय

हल्ला भारतावर झाला ना, मग भारतानी काय ती कारवाई करायला हवी होती. पश्चिमी देश कशाला काही करतील. उलट ते म्हणत असतील की भारताला च काही करायचे नाही तर आम्ही तरी कशाला काही करु?

तुडतुडी's picture

17 Nov 2015 - 11:18 am | तुडतुडी

इथे आपण अमेरिका , युरोप , इस्रैल ची राजकीय धोरणं ह्यांची फ्रांस च्या हल्ल्याच्या अनुषंगाने चर्चा करतोय पण खुद्द इसीस ने ह्या हल्ल्याचं जे कारण सांगितलं त्यावर कोणीच बोलत नाहीये . "व्याभिचार्यांचा खात्मा " हे कारण त्यांनी दिलेलं आहे . कुरण , हदीस , शरियत चे नियम न पाळणार्यांना इस्लाम विरोधी समजलं जातं. व्यभिचारी समजलं जातं .त्याप्रमाणे न वागणार्यांना शिरच्छेद , हातपाय तोडणे , बलात्कार अश्या शिक्षा दिल्या जातात . म्हणून तर थोडी चूक झाली तर आपल्याच मुस्लिम बांधवांना हे लोक संपवत आहेत . आणि मुक्त जीवन जगणार्यांना नास्तिक , व्यभिचारी समजून त्यांच्यावर हल्ले होतायेत .

अल्पसंख्यकाना वाइट वाटेल म्हणून ही ऑफर नाकारण्यात आली.

हेच तर दुर्दैव आहे ह्या देशाचं. अल्पसंख्यकाना काय आवडत काय नाही ह्याची किती काळजी घेतली जाते . तरी असहिष्णुता म्हणून बोंबा चालूच आहेत . आता बहुसंख्यांकांनी ह्यांच्या घरचं धुनी भांडी करावं अशी अपेक्षा असावी .

मला तरी वाटतं भारताला इसीस चा धोका एवढ्या लवकर नाहीये . पण तरीही जम्मू काश्मीर मध्ये मधून मधून फडकणारे इसीस चे झेंडे बघता धोक्याची शक्यता नाकारता येत नाह.

इस्राइल बद्दल बोलायचं झाल्यास इस्रैल आणि प्यालेस्टीन ची निर्मिती एकाच वेळी झाली आहे . पण आज इस्राइल कुठल्या कुठे गेलं आहे आणि प्यालेस्टीन कुठ आहे . भारत पाक ची निर्मिती सुधा एकाच वेळी झाली . पण आज भारताने पाक च्या तुलनेत कितीतरी अधिक प्रगती केली आहे . आणि पाक भारताचा शेजारी नसता तर आपण सुधा बरेच पुढे गेलो असतो . असो . ज्यूंवर ख्रिश्चन , मुस्लिम आणि रोमनांनी खूप अत्याचार केलेत . पण मुस्लिम सोडून इतरांनी इतिहासाला मागे टाकून स्वताही प्रगती केली आणि दुसर्यालाही करू दिली . ज्यू असो किवा पारशी किवा शीख ,भारतीयांनी कधीही इतर धर्मियांवर अन्याय केला नाही. ज्यांनी ज्यांनी वाईट काळामध्ये आश्रय मागितला अश्यांना सामावून घेतलंय.

कपिलमुनी's picture

17 Nov 2015 - 12:12 pm | कपिलमुनी

पण आज भारताने पाक च्या तुलनेत कितीतरी अधिक प्रगती केली आहे

असा म्हणू नका ! पिछले ६० साल मे क्या किया ? असा विचारत जगभर हिंडणारे तोंडघशी पडतील

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Nov 2015 - 12:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

मुनिवरांचा सात्विक चिमटा =)) =))

कालिंदी's picture

17 Nov 2015 - 1:13 pm | कालिंदी

<<<<अमेरिकन असल्याचे (असला म्हणजे गोळा बारूद) चे ब्लॅक मार्केटिंग ह्याचा रस्ता सेंट्रल अन साउथ अमेरिकन ड्रग कार्टेल्स थ्रू किंवा अलास्का थ्रू असतो >>>

हे नीटसे कळले नाहि. अमेरिकन अस्त्रे काळ्या बाजारात कशी पोहचतात? कुठल्याही सस्त्रात्रे बनवणार्याला त्यान्चे ऑडिट देणे बन्धन कारक असेल ना. म्हणजे अमेरिकन कम्पनीने बनवले तर त्या कम्पनीला अमेरिकन सरकारला सान्गावे लागत असेल ना अमुक इतके बनवलेत, इतके विकलेत इतके स्टॉक मध्ये आहेत वगैरे. मग काळ्या बाजारात कशी पोहचतात ही शस्त्रे? सरकारच्या छुप्या पाठिम्ब्याने का? जेन्युइन ली प्रश्न पडलाय. प्लीज जरा विस्ताराने सांगणार का सोन्याबापु?