ऑफिस मध्ये सोशल साइट्स वापरणे

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
12 Nov 2015 - 9:18 am
गाभा: 

मला वाटते या विषयावर यापूर्वी भरपूर चर्चा झालेली आहे , पण तरीही मूळ समस्या तशीच असल्याने आज हा विषय मांडत आहे .

खाजगी उद्योग अथवा सरकार (Employer) हा आपल्याला ऑफिस मध्ये त्यांचे काम करण्याचा पगार देतो . म्हणजे कामाचे जे तास असतील तेवाढे तास आपण ऑफिसचे काम करण्यास बांधील असतो .

असे असताना ऑफिस मध्ये फेसबुक /whatsapp / व इतर मराठी सोशल साइट्स वापरत टाइमपास करणे हे नैतिक दृष्ट्या अयोग्य वाटते .

असे असताना देखील अनेक लोक ऑफिस-अवर्स मध्ये सोशल साइट्स वापरत असतील तर त्या गोष्टीवर उपाय काय ?

सोशल साइट्स ब्लॉक करणे अथवा मोबाइल jammer लावणे / ऑफिस मध्ये मोबाइल वापरण्यास बंदी करणे अशा टेक्निकल उपायाऐवजी Employees नीच मनापासून हे तत्त्व किंवा business ethics / professional work culture चा भाग म्हणून स्वत:हून सोशल साइट्स ऑफिस अवर्स मध्ये टाळल्या पाहिजेत असे माझे मत आहे ...

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

12 Nov 2015 - 9:28 am | मांत्रिक

Employees नीच मनापासून
एम्प्लाॅयीज नीच की मन नीच? :)
ह.घ्या.

मांत्रिक's picture

12 Nov 2015 - 9:39 am | मांत्रिक

समजा सोशल साईट्स बॅन केल्या तरी ज्याला काम करायचेच नाही, तो दुसरा काहीतरी मार्ग शोधणारच. आणि ज्याला काम करायचं आहेच, तो इतर टवाळक्या करतसुद्धा काम पूर्ण करणारच...

sagarpdy's picture

12 Nov 2015 - 11:08 am | sagarpdy

हेच !

सागरकदम's picture

12 Nov 2015 - 10:55 am | सागरकदम

माझा अनुभव तर अजून वीचित्र
IT MNC मध्ये होतो
संगणक दिला नाही ,बसायची जागा नाही,प्रोजेक्ट तर नाहीच पण ९ तास बसायचे हाफीकात

कामगारांना असे उद्योग (ऑफिस मध्ये सोशल साइट्स वापरणे) करावे लागत असतील तर हा संपूर्णपणे मॅनेजमेंट चा दोष आहे.

[कामगार संघटनेचा विजय असो]

मांत्रिक's picture

12 Nov 2015 - 11:39 am | मांत्रिक

हायला भन्नाटच प्रतिसाद!
मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात टाकायलाच पाहीजे हे वाक्य!!!