स्मरण शक्ति लयाला जात चालली आहे काय

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in काथ्याकूट
20 Oct 2015 - 11:17 am
गाभा: 

शाळेत ३० पर्यंत पाढे असत.ई.६वी७वी,तच १२/१५चे पाढे विसरले,
ते पूना:पाठ करण्याचा प्रयत्न झाला नाही, आवश्यकताहि पडली
नाही. १९, २९ चे पाढे शिक्षकांनाही येत नसत . पावकी , सवायकि, औटकी
हा प्रकारहि पूर्वीच्या प्राथमिक शिक्षणात होता, तेहि सोइस्कररित्या विसरलं
गेलं.अर्थात त्याची फारशी गरजहि पुढच्या आयुष्यात कधी लागली नाही. पण
मनातल्या मनात ते करता यायचं,४७ निम्मं,६८ पाव ,किंवा ९२ सव्वा ६० दीडं,
जेव्हां एकदम सांगायचो तेव्हां समोरच्याला आश्रर्य वाटायचं.
माहीत नाही ,इंग्रजी माध्यमाच्या शाळातून पूर्वी किती पर्यंत टेबल शिकवली ,
जायची म्हणजे पाठांतर करून घ्यायचे आज किती ,व काय असते ,कसे असते,
अभ्यास क्रमात .थोडे तरी पाठांतर शिल्लक आहे कि नाही.
तरूण पिढीला,साध्या सोप्या हिशोबाला कालक्युलेटर लागतो ,ऊद्या काँम्युटर
लागल्यास नवल वाटायला नको .
या नवीन गाजेट्सनी स्मरण शक्ती लयाला चालली आहे.
कोणत्याहि मोठ्या बेरजा मी हातीच करतो ,माझ्या पत्नीला ,आजहि २९ पर्यंतचे पाढे
तोंड पाठ आहेत .
या विषयावर चर्चा व्हावी असे मला वाटते .

प्रतिक्रिया

कच्छी वाणी तोंडी सामानाची बेरीज पटकन करतात.

गामा पैलवान's picture

20 Oct 2015 - 12:45 pm | गामा पैलवान

दिवाकर कुलकर्णी,

तुम्हाला पाढे पाठ असतील तर तुमच्या मुलांना जरूर शिकवा. जमल्यास बाकीच्या मुलांकडूनही फावल्या वेळात म्हणवून घ्या. मुलांची स्मरणशक्ती तल्लख होते.

माझेही एक ते तीस पाढे पाठ आहेत. मी इंग्लंडला राहायला असतो. इथे ज्या वयात दोन, पाच आणि दहा चे पाढे यायची अपेक्षा असते त्याच्या बऱ्याच आधी आमच्या बालकाचे तीस पर्यंत पाढे तोंडपाठ होते. ते पाहून शिक्षकांना आश्चर्य वाटलं. हे सारं फक्त एका वर्षात झालं. तेही घरून शाळेत जातांना पंधरा मिनिटं लागतात त्या वेळेत पाढे घोकून. लहान मुलांची ग्रहणशक्ती अतिशय तल्लख असते. तिचा वापर करून घेतला पाहिजे. तो जर वेळच्या वेळी झाला नाही तर पुढे होणं अवघड असतं.

पोराला पावकी, निमकी, सवायकी, दीडकी, औटकी वगैरे शिकवायची आहे. पण त्यालाच उत्साह नाही. मात्र तोंडी हिशेब जमतात म्हणून मीही फारसा आग्रह धरला नाही. म्हणून बदल्यात त्याच्याकडून एक ते पन्नास पर्यंतचे वर्ग तोंडपाठ करून घेणार आहे. पुढे शंभर पर्यंत वाढवेन.

आ.न.,
-गा.पै.

आमच्या बालकाचे तीस पर्यंत पाढे तोंडपाठ होते
आपले अभिनंदन.
मला ते अजिबात करवून घेता आले नाही.

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 4:03 pm | बोका-ए-आझम

मला अजूनही १ ते १०० पाढे पाठ आहेत आणि त्याचा शाळेत आणि नंतर, अगदी अजूनही प्रचंड फायदा होतो.

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 6:41 pm | टवाळ कार्टा

१००??? बाब्बौ

बाबा योगिराज's picture

20 Oct 2015 - 12:47 pm | बाबा योगिराज

मला तुमचे विचार पटतात. जितके जास्त अपन गुणकयंत्रचा वापर करू तितकी आपली तोंडी बेरीज वजाबाक़ी करण्याची क्षमता ही कमिच होत जाणार.

या उलट दुकांदारांच, दररोज हिशोब करताना आकड्यांचा खेळच असतो. त्यामुळे मोठे मोठे हिशोब सुद्धा पटकन करता येतात.

माझ्या मते प्रत्येकचि हिशोब करण्याची एक पद्धत असते आणि ती हळू हळू अनुभवातुन विकसित होत जाते. या मध्ये स्मरणशक्तिचा फार मोठा हात असतो. हिशोब करताना आपन खुप वेळा जुने अनुभव सुद्धा वापरतो.

जसे की ७२ रु ची एक वस्तु या प्रमाणे मी जर २,३ किंवा ४ वास्तु विकल्या तर आधी मी सगळे ७० जोड़त असे व नंतर राहिलेले २.
उदा:- ७२ रु. च्या ४ वस्तु असतील तर मी सगळ्यात आधी ७०x४=२८० करायचो आणि नंतर २x४=८ करायचो सगळ्यात शेवटी दोन्ही आकड्यांची बेरीज २८०+८=२८८ करायचो.(हे मनातल्या मनात करायचो बर्का. गुणकयंत्रावर नाही. हुश्श्.)

परंतु सध्या तर पाठांतर केल्या सारख झालय ७२x४ कुणी विचारल की लगेच २८८ सांगितल जात.

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 1:47 pm | प्यारे१

माझंही थोडंफार असंच असतं.

९४*७८ चं सा धारण ठोकताल्यातलं उत्तर ९०*८० म्हणजे ७२०० च्या आसपास कुठेतरी असणार हा झटकन समजणारा विषय. त्यातून इकडे ३२० वाढवून तिकडून १८८ वजा करायचे म्हणजे जमतं. आणखी जवळ म्हणून ७४०० च्या आसपास असं काहीतरी.

हे लिहीता लिहीता सुचलेलं.

अगदी असंच! तोंडी हिशेब असेच करता येतात पटपट.
पण तरीही स्मरणशक्ती चांगलीच म्हणता येणार नाही एवढं खरं.म्हणजे पाढे पाठ असणे आणि स्मरणशक्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
इंग्रजी माध्यमातून शिकणार्या माझ्या मुलालाही शाळेत पाढे पाठ करावे लागलेले आहेत.हे इंग्रजी माध्यम कुठून आणलं मधेच!

चौथा कोनाडा's picture

21 Oct 2015 - 9:19 am | चौथा कोनाडा

अबॅकस साधारण पणे याच पद्धतीने गणित करते.

अबॅकस मण्यांची पाटी या साठी उपयोगी पडते. पाच वर्षांपुर्वी अबॅकस वर्गाची प्रचंड क्रेझ आली असताना माझ्या पोराला या वर्गाला घातले होते. वेळे अभावी त्याला क्लास सोडावा लागला.

अर्थात वारंवार कागद न वापरता स्मरणाच्या जोरावर सतत गणन करत राहिलात तर अबॅकस क्लासची गरज नाही असे माझे मत आहे.

याॅर्कर's picture

20 Oct 2015 - 1:41 pm | याॅर्कर

पाठांतर(घोकमपट्टी) आणि स्मरणशक्ती या दोन गोष्टींचा काहीही संबंध नाही.

-मुळात आजची तरुण पिढी आणि आधीची पिढी यामध्ये तुलना करून तरूण पिढीला कमी लेखणे अयोग्य आहे.

-पाढे,पावकी-दीडकी वगैरे घोकून तोंडपाठ करणे आणि वेळ पडल्यास आठवून चटकन सांगणे म्हणजे स्मरणशक्ती उत्तम आहे असे काही नाही.

-काळाची गती आणि होणारा विकास,तसेच होणारे परिवर्तन हे त्या काळाची गरजच असते.त्यामुळे कॅल्क्युलेटर,कंप्युटर(हे माणसानेच बनवलयं) या गोष्टींची मळमळ जुन्या जाणत्या लोकांनी करून घेऊ नये.

-मुळात पाठांतर म्हणजे काय?मला वाटते गोष्टींमागे एक विशिष्ट तंत्र/सूत्र/गणित असते, त्याआधारे ती गोष्ट लक्षात ठेवावयाची असते.पोपटपंची काय कामाची?

_____("तरूण पिढीतला" अवघ्या 22 वर्षाचा याॅर्कर)

तर्राट जोकर's picture

20 Oct 2015 - 2:28 pm | तर्राट जोकर

सहमत.

लोक स्मरणशक्तीला बुद्धीमत्ता का समजतात हे काय कळले नाही. पूर्वीच्या काळी ही घोकंपट्टीची आवश्यकता होती कारण कॅल्सी नव्हते. विनापाठांतरही गणिती आकडेमोड होते, पण वेळ जास्त जातो. पाठांतरामुळे वेळ वाचतो म्हणून पाठांतराचे कौतुक होते. एकपाठी, द्विपाठी, त्रिपाठी असे पाठांतराचे प्रकार होते. त्यात एकपाठीला जास्त मान होता. कारण त्यामुळे जास्त वेळ वाचत असे. अजून जास्त वेळ वाचवण्यासाठी व मोठ्या प्रमाणात गणिती आकडेमोड करण्यासाठी कॅल्सी निघाले. लोक आळशी किंवा मूर्ख झाले म्हणून नाही. कॅल्सी हे एक साधन आहे. वापरकर्त्याला वापरच करता आला नाही तर कितीही मोठे गॅजेट शून्य मूल्याचे आहे. गॅजेटवरून प्रतिभा ठरवणे कसे काय बरोबर..? त्याचप्रमाणे स्मरणशक्तीवरून बुद्धीमत्ता ठरवणे हेही कसे बरोबर असेल?

हेनरी फोर्डबद्दल असाच एक किस्सा आहे की त्याला लोक तो जास्त शिकलेला नाही म्हणून हिणवायचे. त्याने तल्लख स्मरणशक्तीची किती माणसे पाहिजेत, आता उभी करतो. असा उलटा सवाल करून हिणवणार्‍यांची हवा काढली होती. असा काहीसं घडल्याचं म्हटलं जातं. पूर्ण किस्सा जालावर मिळेल.

लॉजिक क्लिअर असेल तर बरेचदा कॅल्सीची गरज पडत नाही. पण गणिती आकडेमोडीपेक्षा जास्त महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा कॅल्सीची आवश्यकता आहेच, कारण ती बुद्धीचे लक्ष विकेंद्रीत होण्यापासून वाचवते.

लेखातला नव्या पिढीला हिणवण्याचा भाव पटला नाही.

तल्लख स्मरणशक्तीची किती माणसे पाहिजेत, आता उभी करतो

किस्सा माहित नव्हता, पण कुठल्या गोष्टीला नक्की किती महत्त्व द्यायचे हे माहित असणारे असे लोक बघितले आहेत. सहमत.

पण गणिती आकडेमोडीपेक्षा जास्त महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा कॅल्सीची आवश्यकता आहेच, कारण ती बुद्धीचे लक्ष विकेंद्रीत होण्यापासून वाचवते

अगदी परफेक्ट.
फारच सुंदर.

असं लिहून उगाच भाव खायची गरज नाही. एके काळी आम्ही तर १८ वर्षांचे होतो :)

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 1:54 pm | प्यारे१

>>> एके काळी

पाटील ते आद्य काळकर्ते र रा कुठे असतात हो हल्ली?

म्हणून वाद घालायची इच्छा नाही.
तरीसुद्धा आपण तरूण असताना भाव खाल्ला नाहीत काय?
बिनाभाव म्हणजे 'फुकट'च नाही का?

___ __ _(22)

लालगरूड's picture

11 Nov 2015 - 4:18 pm | लालगरूड

20 o_O

चर्चा? वरती जे काय लिहिलंय त्यातल्या कुठल्याही दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध दिसत नाही. चर्चा करणार कशावर?

पाढे पाठ केलेत, मग विसरलात, आणि त्याने तुम्हाला काही फरकही पडला नाही, यावर चर्चा बाकीच्यांनी का करायची?

पावकी , सवायकि, औटकी हा प्रकारहि पूर्वीच्या प्राथमिक शिक्षणात होता, तेहि सोइस्कररित्या विसरलं
गेलं. अर्थात त्याची फारशी गरजहि पुढच्या आयुष्यात कधी लागली नाही.

ज्या गोष्टीवाचून गैरसोय होत नाही, ती का शिकायची/पाठ करायची? हे आपल्या लेखात स्पष्ट होत नाही...मग चर्चा कशी करायची?

पण मनातल्या मनात ते करता यायचं,४७ निम्मं,६८ पाव ,किंवा ९२ सव्वा ६० दीडं

आधी म्हणालात विसरलं गेलं... मग म्हणता मनातल्या मनात करता यायचं! जी गोष्ट विसरली आहे ती मनातल्या मनात कशी करता येते?

माहीत नाही ,इंग्रजी माध्यमाच्या शाळातून पूर्वी किती पर्यंत टेबल शिकवली जायची म्हणजे पाठांतर करून घ्यायचे आज किती ,व काय असते ,कसे असते, अभ्यास क्रमात .थोडे तरी पाठांतर शिल्लक आहे कि नाही.

इंग्रजी माध्यमाचा इथे काय संबंध?

तरूण पिढीला,साध्या सोप्या हिशोबाला कालक्युलेटर लागतो ,उद्या काँम्युटर लागल्यास नवल वाटायला नको .या नवीन गाजेट्सनी स्मरण शक्ती लयाला चालली आहे. कोणत्याहि मोठ्या बेरजा मी हातीच करतो ,माझ्या पत्नीला ,आजहि २९ पर्यंतचे पाढे तोंड पाठ आहेत .

आज कॅल्सी लागतो, तर उद्या काँप्युटर लागेल असं म्हणणं म्हणजे अकारण हिणवून दाखवायचा प्रकार आहे. आमचे शाळेत एक सर असे विनोद करायचे. - आज याच्या शेजारी बसलास, उद्या कुणाच्याही शेजारी बसशील!!! सगळी मुले धोधो हसायची आणि मागे मग त्यांना नावं ठेवायची.

पुन्हा त्याचा स्मरण"शक्ती"शी संबंध कसा हे स्पष्ट केलेलं नाहीय. लोक कॅल्क्युलेटर वापरतात म्हणजे त्यांना कॅल्क्युलेटरशिवाय बेरीज करताच येणार नाही, हे मान्य करणं जरा अवघड आहे. अनेक कारणांनी कॅल्क्युलेटर वापरणं भाग पडतं. कॅल्सीवर केलेल्या बेरजांचा पडताळा बघणं सोपं जातं

चर्चाविषय मांडताना थोडातरी अभ्यास आवश्यक आहे साहेब - म्हणजे तो लेखात दिसायला हवा. अन्यथा मनातल्या शंका/प्रश्न असा वेगळा धागा आहे तिकडे हे प्रश्न मांडा.

आदूबाळ's picture

20 Oct 2015 - 2:27 pm | आदूबाळ

+१

मुळात तोंडी हिशोब / आकडेमोड येणं गरजेचं का आहे हेच मला मुळात समजत नाही. स्मरणशक्तीवर इतका जोर का दिला जातो?

द-बाहुबली's picture

20 Oct 2015 - 2:34 pm | द-बाहुबली

लोक कॅल्क्युलेटर वापरतात म्हणजे त्यांना कॅल्क्युलेटरशिवाय बेरीज करताच येणार नाही, हे मान्य करणं जरा अवघड आहे.

बरोबर आहे कॅल्क्युलेटर शिवाय बेरीज करायची सवय नसल्याने तो नसेल तर काही काळ जड जाइल पण सराव पुरेसा झाल्यावर ते तोंडी गणीतं करु शकतीलच की. उगाच का इश्यु केलाय लेखकाने ?

अद्द्या's picture

20 Oct 2015 - 2:35 pm | अद्द्या

पाढे पाठ आहेत म्हणजे बुद्धिमान आहात हे कसं समजलं ?

आणि मुळात "पाठ " केलं म्हणजे बुद्धिमान झालो हे का समजतात लोक देव जाणे. . पाढ्यांचा उपयोग का कुठे कधी कसा करावा हे मुलांना समजतंय . हि हुशारी .
तोंडी गणित करता येणं चांगलीच गोष्ट आहे . पण मग त्यासाठी संगणक आणि त कॅल्सी असताना स्वतःला ताण का द्या ?

हे म्हणजे . पूर्वी आम्ही जात्यावर पीठ दळायचो , पण आजकाल गिरणीत जातात लोक . किंवा बाजारातून पीठच विकत आणतात . या प्रकारचं वाक्य झालं .

बस दळत तुम्ही जात्यावर . आम्ही घेतो रेडीमेड आणि कामं पटापट उरकून पुढल्या कामाला लागतो .

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2015 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

घोकंपट्टी, मग ती आकड्यांची असो की अक्षरांची, नेहमीच प्रचंड नावडती वाटली आहे. शिक्षण चालू असताना, १५००-२००० पानांची पुस्तके १५-१५ वेळा वाचली असे अभिमानाने सांगणार्‍या सहाध्यांबद्दल कौतूक वाटले पण त्यांचे अनुकरण करण्याचे कधीच मनात आले नाही.

परंतू, घोकंपट्टी केली नाही म्हणून कधी फारसे अडलेही नाही. एखादी गोष्ट घोकण्यापेक्षा ती समजावून घेण्याने तिचे सार मनावर जास्त बिंबते आणि त्या गोष्टीचा व्यवहारात सहज उपयोग करता येतो असा अनुभव आहे... घोकंपट्टीने हे व्यावहारीक समिकरण जमेलच असे नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2015 - 2:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

"घोका आणि ओका" यापेक्षा "समजून घ्या आणि व्यवहारात आणा" हे तत्व जास्त आवडते.

अभिजीत अवलिया's picture

21 Oct 2015 - 9:25 am | अभिजीत अवलिया

सहमत ....

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2015 - 2:46 pm | प्रकाश घाटपांडे

पाढ्यांचा दुसरा उपयोग म्हणजे चित्तविचलक तंत्र. अनावश्यक वा अनिष्ट विचार मनात येत असतील तर त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी पाढ्यांचा वापर करावा असे कॉग्निटीव्ह बिहेव्हिअर थेरपी मधे सांगतात. रामरक्शा भीमरुपी वा अर्थवशीर्ष वा तत्सम काहीही चालते.

चिरोटा's picture

20 Oct 2015 - 2:46 pm | चिरोटा

थोडे तरी पाठांतर शिल्लक आहे कि नाही.

अनेक शाळांमध्ये अजूनही पाठांतरावर भर दिला जातो.अर्थात न समजून केलेल्या पाठांतराला,घोकंपट्टीला अर्थ नाही.पण पाच वर्षाच्या बहुतांशी मुलाना संस्कृत श्लोकांचा अर्थ समजून घेऊन पाठ करणे खूप जड जाईल.तेव्हा अशा ठिकाणी नुसते पाठांतर सोपे आहे.पाढ्यांचेही तेच आहे.पाठ करून नंतर त्यांना समजाऊन सांगितले तर जास्त फायदा आहे.
मुलाखतीत एखाद्या अभियंत्याने १५ x ४ साठी कॅल्क्युलेटर काढला तर किती कंपन्या कामावर घेतील?
अनेकवेळा उत्तम डॉक्टरांचे,वैज्ञानिकांचे,अभियंत्यांचे पाठांतर्/स्मरणशक्ती सरासरीपेक्षा चांगली असल्याचे दिसून येते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2015 - 2:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

२३ आणि २७ च्या घातपाढ्यांची आठवण येउन अंमळ हळवा झालो.

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2015 - 4:10 pm | टवाळ कार्टा

१९ आणि २९ पण :(

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 4:16 pm | प्यारे१

सोपं आहे रे लक्शात ठेवायला. २० आणि ३० चा पा ढा (पक्षी २ आणि ३ चा) येतो ना?

२० एके २०, २० दुणी ४०
१९ म्हणजे २० ला एक कमी. १९ एके १९
१९ दुणी ? २० दुणी ४० ना? मग त्यातून २ कमी.
२० त्रीक ६० ना? त्यातून ३ कमी म्हणजे १९ त्रिक ६०-३=५७

१९ साते ???? वीसा साते चाळासे १४० मधून सात वजा -७ =१३३

२९ सक्खं? ३०अ सखं ऐंसाशे वजा सहा -६ = १७४

झटकन जमतं. :)

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2015 - 4:22 pm | टवाळ कार्टा

हेच्च करायचो पण तोपर्यंत हातावर छडी बसायची :(

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 4:25 pm | प्यारे१

तोपर्यंत चाल म्हणायची मग....

आदूबाळ's picture

20 Oct 2015 - 4:39 pm | आदूबाळ

सतरा. बहुत भयंकर.

गामा पैलवान's picture

21 Oct 2015 - 1:49 am | गामा पैलवान

लोकहो,

एकेकांचं म्हणणं वाचलं. रोचक विधाने आहेत. काही विधानांवर टिपणी करेन म्हणतो.

१.
>> "घोका आणि ओका" यापेक्षा "समजून घ्या आणि व्यवहारात आणा" हे तत्व जास्त आवडते.

हे मत पाढ्यांच्या बाबतीत लागू पडंत नाही. एकदा केलेले पाढे पुढे आयुष्याभरासाठी कामी येतात. मुळात गुणकयंत्र आणि पाढ्यांची सांगड घालणेच चुकीचे आहे. दोघांचा उपयोग गुणाकार/भागाकार करण्यासाठी होतो हे खरं असलं तरी याव्यतिरिक्त दोघांचा काहीही संबंध नाही. पाढे म्हणजे अंकांची तोंडओळख असते. पाढ्यांतून अंक एकमेकांशी कसे संबंधित असतात याची जाणीव होते. अंकांची समज विकसित होणे म्हणजे 'समजून घ्या आणि व्यवहारात आणा' याची पहिली पायरी गाठणे होय.

२.
>> बस दळत तुम्ही जात्यावर . आम्ही घेतो रेडीमेड आणि कामं पटापट उरकून पुढल्या कामाला लागतो .

पीठ गिरणीतून दळून घेतल्याने वेळ वाचतो असा अर्थ सूचित होतोय. पाढे पाठ असल्याने असाच वेळ वाचतो. कोण ते गुणकयंत्र बाहेर काढणार, सुरू करणार, कळी दाबणार आणि उत्तर काढणार! तेव्हढ्या वेळात तीनचार आकडेमोडी सहज होतील.

३.
>> -मुळात पाठांतर म्हणजे काय?मला वाटते गोष्टींमागे एक विशिष्ट तंत्र/सूत्र/गणित असते, त्याआधारे ती गोष्ट
>> लक्षात ठेवावयाची असते.पोपटपंची काय कामाची?

विशिष्ट तंत्र वा सूत्र वा पद्धती अमूर्त (=अॅबस्ट्रॅक्ट) असतात. पाढे मूर्त आहेत. (अवांतर : सहा वर्षाच्या मुलाला मूर्त पाढ्यांशी जवळीक साधणं सोपं आहे.)

४.
>> पाठ करून नंतर त्यांना समजाऊन सांगितले तर जास्त फायदा आहे.

मान्य. पण नंतर समजावून सांगायची वेळ सहसा येत नाही. मुलं आपणहून शोध घेतात. स्वानुभव आहे. म्हणून पाढ्यांची निव्वळ घोकंपट्टी केली तरी फायदा आहे.

आ.न.,
-गा.पै.

चतुरंग's picture

21 Oct 2015 - 2:46 am | चतुरंग

आकड्यांचे परस्पर संबंध समजणे महत्त्वाचे. मुलं आकड्यांशी खेळू शकली पाहिजेत त्यातून ती स्वतःची समज वाढवतात. वेगवेगळे आकडे पटींमधून जाताना कुठे आणि का क्रॉस होतात याचा परस्पर संबंध फार रंजक असतो.
फक्त स्मरणशक्ती व्यतिरिक्त गणितातल्या इतर संकल्पना आणि भूमितीतल्या कोन, बाजूंची लांबी अशांमधले संबंध समजावून घेणे सुद्धा यातून सोपे होते.

एक चांगला विषय काढलात. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताप्रमाणे युज इट आॅर लुज इट अशी परीस्थिती निर्माण होते.

मोबाईल नं ची काय परीस्थिती घ्या. मलातरी फक्त बायकोचा नं पाठ आहे,बाकी सर्वांचे नंबर मोबाईलमधेच आहेत.म्हणूनच मो.हरवला की व्यक्ती गलीतगात्र होते.

2 वर्षांपुर्वी प्रयोग म्हणून स्मृती-व्यायाम म्हणून मी आंतरजालावरुन ऐकून /वाचून व नंतर लिहून गीतेचा 15 वा अध्याय पाठ केला होता.

स्मृतीवर आणखी काम /चर्चा व्हायला हवी.

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2015 - 9:28 am | टवाळ कार्टा

बाकी विषयांतले पाठांतर नक्को पण पाढे पाठ हवेच्च...शाळेत गणिताचे पेपर अर्धा/पाउण तास आधी सोडवलेले आहेत पाढे पाठ होते म्हणून ;)...उरलेल्या वेळात मग उरलेले जास्तीचे प्रश्न सोडवून टाकायचो =))

दिवाकर कुलकर्णी's picture

23 Oct 2015 - 12:39 am | दिवाकर कुलकर्णी

कोण म्हणतंय ,स्मरण शक्ति म्हणजे बुध्दिमत्ता ,
पण साध्या दोन चार आकड्याच्या बेरजेसाठी
दुकानदाराला केल्सी लागतो,ही वस्तुस्थिति आहे,
९न्८,१७न्५ २२न्५ २७न्६ ३१ अशी सुध्दा सोपी
आंकडेमोड येऊ नये ,हे कशाचे लक्षण आहे,
अलिकडच्या तरुण पिढीला,कॉम्प्पुटर चांगला
समजतो ,गणिताचे बेसिक्स, फर्स्ट प्रिन्सिपल्स् ते विसरत
चालले आहेत,
बैक त कोणत्याहि नवीन पिढीतल्या क्लार्क ने सेंव्हिग
बैक खात्याचे व्याज हाती काढून दाखवावे, त्याना व्याज
हे सिस्टम नी काढायचं येव्हंडंच माहित आहे,ना त्याना प्रॉडक्टस
(कच्चे)माहित आहेत,ना त्याना त्याच्या मागचं गणित माहित आहे,
हे मी माझ्या अनुभवावरुन सांगतो, दुकानदाराकडून एकदिवस
केल्सी काढून घ्या ,किंवा बेंकेत अर्धा तास सिस्टीम डाऊन असू द्या,त्यांची
भंभेरी ऊडालेली आपण पाहू-पाहतो,
नवीन तांत्रिक गेजेट्समुळं डे टू डे लागणारी बुध्दिमत्ता व त्या अनुषंगाने
स्मरण शक्ति क्षीण होते आहे असे मला वाटते
मी स्वता गुणाकार भागाकारासाठी अंकलिपी,लॉग टेबल ,स्लाइड रुल,फेसिट मशीन्स,
केल्सी ते कॉंम्पुटर सर्व वापरले ,वापरतो परंतु मला आजहि अंकलिपी जवळची वाटते

चतुरंग's picture

23 Oct 2015 - 12:48 am | चतुरंग

३३ पण असू दे मुद्दा लक्षात आला! :)

सुबोध खरे's picture

23 Oct 2015 - 10:44 am | सुबोध खरे

स्मरणशक्ती म्हणजेच बुद्धिमत्ता नव्हे हे जरी खरं असला तरी स्मरणशक्ती हा बुद्धिमत्तेचा एक अविभाज्य भाग असतो. उदा. उत्तम वकील असेल तर तो न्यायालयात आपली मते मांडताना दुसर्याने केलेल्या युक्तिवादाचे खंडन करताना चांगल्या स्मरणशक्तीच्या जोरावर अगोदर दिलेले वरच्या न्यायालयांचे निकाल उद्धृत करून उत्तम खंडन करू शकतो.
एक साधे उदाहरण म्हणून देत आहे. एक अमेरिकन क्ष किरण तज्ञ आपल्या काही महत्त्वाच्या केसेस पुण्यातील एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात दाखवत होता. तेंव्हा त्याने पोटाचा एक एक्स रे दाखवला. तो पाहून मी ताबडतोब त्याला कोकेनमुळे अन्त्ररोध(INTESTINAL OBSTRUCTION DUE TO COCAINE LUMPS) हे सांगितले. त्याला प्रचण्ड आश्चर्य वाटले. परंतु एका भारतीय वंशाच्या युरोप मधल्या डॉक्टरने ए एफ एम सी मध्ये अशीच केस काही वर्षापूर्वी दाखवली होती. कोलंबिया मधून कोकेन ची तस्करी करणारे लोक रबराच्या रसात( LATEX) कोकेनचा गोळा बुडवून गिळतात. रबराचे आवरण असल्याने त्यावर पाचक रसाची क्रिया होत नाही. हा तस्कर विमानाने अमेरिकेत दाखल होतो. क्ष किरणाच्या तपासणीमध्ये काहीच येत नसे. आणी दुसर्या किंवा तिसर्या दिवशी हे कोकेन संडासच्या वाटेने बाहेर पडले कि ते रबराचे आवरण काढून ते कोकेन १०० पट किमतीला विकत असत. या तस्कराचे असे काही गोळे एकात एक अडकून आतडे बंद झाले होते आणी पोट प्रचंड फुगले होते. त्याचा हा एकस रे होता. केवळ स्मरणशक्तीने मी ते उत्तर एक मिनिटात सांगितले त्यामुळे भारतीय डॉक्टर*( आणी त्यांच्या बुद्धीमत्ते बद्दल) त्याला प्रचंड आदर निर्माण झाला.
जुन्या एकदा पाहिलेल्या आजारामुळे बरेच डॉक्टर पटकन रोगनिदानाकडे जाऊ शकतात. शेवटी जर तुमची स्मरणशक्ती अशक्त असेल तर पूर्वीच्या अनुभवाचा तुम्ही उपयोग करू शकत नाही.
मुलभूत गणित, पाढे पाठ असल्याचा आयुष्यात नक्कीच फायदा होतो. गीतेचे श्लोक तुम्हाला नुसते पाठ झाल्याने फायदा होणार नाही पण जर पाठ असलेल्या श्लोकांचा अर्थ तुम्ही नंतर समजून घेतलात तर त्याचा आयुष्यभर फायदा होऊ शकतो.
मला घोकंपट्टी जमली नाही( हा माझा अवगुण आहे आणि त्याची मी शेखी मिरवत नाही) परंतु ज्यांना ती जमली त्यांचा फायदाही झालेला आहे. केवळ मला ती जमली नाही म्हणून तिला नावे ठेवणे मला पटत नाही. माझ्या माहितीत असलेली एक हकीकत --एकाने घोकंपट्टी करून महत्त्वाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि आय ए एस झाला आणि त्यःच्या पेक्षा जास्त कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मुलगा आय आर एस मध्ये गेला. पण आता आयुष्यभर तो आय ए एस पेक्षा खालच्या दर्ज्यावर राहील
तेंव्हा पाठांतर आणि ते करण्याची क्षमता याला कमी लेखणे बरोबर नाही असे मला वाटते.
अशीच परिस्थिती भरपूर अभ्यास करन्याबद्दल आहे. मी एका जागी बसून मन मॊडून अभ्यास करू शकत नाही पण असे करू शकलेले लोक आयुष्यात माझ्यापेक्षा खूप वर गेलेले मी पाहतो आहे. त्यामुळे घासून अभ्यास करणे, पाठांतर करणे हे अवगुण नसून गुणच आहेत आणि कोल्ह्याला द्राक्षे आंबट या न्यायाने त्याला नावे ठेवणे हि फ्याशन झाली आहे. काही मुले अतिशय हुशार असतात आणि अगदी कमी अभ्यासावर त्यांना उत्तम गुण मिळतात. अशा मुलांच्या संगतीने इतर कमी मुलांचे नुकसान झालेले दिसते. कारण त्याच्या नडला लागून हि मुले अभ्यास करीत नाहीत. ते मुल पुढे निघून जाते आणि मग हि मुले घासून अभ्यास करणाऱ्या मुलांना दुषणे देत फिरतात. हे अनुभवातून आलेला शहाणपण आहे.

ते कोकेनचं उदाहरण फारसं पटलं नाही. तुम्हाला त्याविषयातलं ज्ञान होतं म्हणून कधीतरी पाहिलेलं स्मरणात राहिलं. ज्ञान --> स्मरणशक्ती हे कित्येक क्षेत्रात बघायला मिळतं. टायरकडे एक नजर टाकून मेकॅनिक "बारक्या, चार नंबरचा पाना घे रे, तिसर्‍या फळीवर उजवीकडे..." वगैरे सांगतोच की. ही काही शुद्ध घोकंपट्टी नव्हे.

सुबोध खरे's picture

23 Oct 2015 - 12:50 pm | सुबोध खरे

घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती नक्कीच नव्हे. कदाचित मी आपल्याला दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे पटवण्यात अपयशी ठरलो.
दुर्दैवाने लोक या दोन्ही गोष्टी एकाच आहेत हे समजतात. लहान मुलं गीतेचा अध्याय पाठ करतात ती घोकंपट्टी. आणी कोकेनचे उदाहरण दिले ती स्मरणशक्ती. म्हणजेच पाठ करणे, ते समजून घेणे आणी योग्य वेळेस त्याचा वापर करता येणे हि स्मरणशक्ती आहे. असे मला म्हणायचे आहे.

बाबा योगिराज's picture

23 Oct 2015 - 1:58 pm | बाबा योगिराज

बरोबर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Oct 2015 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती नक्कीच नव्हे.
+१००

आणि घोकंपट्टी अथवा स्मरणशक्ती म्हणजे आकलन असेही नक्कीच नाही. परंतू तरीही या तिघांची सरमिसळ करून गोंधळ होण्याचे / करण्याचे प्रमाण लक्षणिय आहे :)

तर्राट जोकर's picture

23 Oct 2015 - 6:11 pm | तर्राट जोकर

प्रतिसादाशी सहमत.

घोकंपट्टी आणि स्मरणशक्ती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सतत एकच एक कृती करून मेंदूला एक सवय जडते. सवयीने गोष्टी आठवतात. त्याला स्मरणशक्ती वा हुशारी म्हणणे योग्य नाही. दोन वस्तू, घटना, इत्यादींमधला संबंध जोडता येणे, एकाच्यामुळे दुसरी आठवणे, योग्य गोष्ट योग्य ठिकाणी आठवणे ही हुशारी.

यात एक गंमत सांगतो. मोठी मुले आम्हा लहानांसोबत हा गेम करायची. बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ, बे पंचे दहा असा पाढा आपण जनरली म्हणतो. मोठी मुले, वयस्कर मंडळी एखाद्या लहानग्याला पकडून पाढे पाठ आहेत का..? असे विचारायचे. त्याने हो म्हटल्यावर बोलायचे, बघ बरं मी उलट सुलट कसे ही विचारेन. ह्यालाही होकार आल्यावर त्यांचे सुरू व्हायचे. सांग बे एके..? = बे, बे दुने = चार, तीन त्रिक= नउ, बे आठी = सोळा, बे पाची= पंधरा....!!!! इथे मुलगा पकडल्या जायचा. 'पाची'च्या नंतर पंधरा हे नादमय सवयीमुळे येते. स्मरणशक्तीमुळे नाही. इथे मुलगा दोन गुणिले पाच हे गणित मांडत नाही. फक्त आवाजाच्या नादाने शब्द लक्षात ठेवतो. बहुसंख्य लोकांना पाठ्यपुस्तकातल्या कविता पाठ होत नाहीत पण भिकारमधली भिकार गाणी पाठ असतात. त्याचे स्मरणात राहण्याचे कारण वेगळे आहे. प्रत्येक गोष्ट स्मरणात राहण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रिय पद्धती असतील. मला तो सगळा शोध इथे मांडणे शक्य नाही. पण घोकंपट्टी, स्मरणशक्ती, हुशारी आणी ज्ञान ह्या सर्व संज्ञा वेगवेगळ्या असाव्यात असे वाटते.

चतुरंग's picture

23 Oct 2015 - 5:02 pm | चतुरंग

Memory and Intelligence
Your memory, especially your working memory, can significantly influence your “intelligence”. That is, your memory affects your ability to quickly and easily retrieve and apply stored information in situations when you need to solve a problem – and your ability to solve problems is often defined as intelligence. Therefore, memory and intelligence are almost like two sides of the same coin.
For example, people who are seen as being good at maths are often able to solve problems in their head and the reason they can do this easily is because they can quickly retrieve stored information which allows to solve the problem successfully. They are not necessarily more “intelligent” overall but rather, they are able to store mathematical data in their long-term memory and retrieve it quickly when they need it. However, the two are linked and improving your memory can help you to display what is commonly seen as “intelligence”.

बुद्धीबळाच्या संदर्भात लिहिताना मी मागे लिहिले होते ते प्रतिसाद इथे वाचता येईल -
http://misalpav.com/comment/518304#comment-518304
http://misalpav.com/comment/518829#comment-518829

-रंगा

द-बाहुबली's picture

23 Oct 2015 - 5:40 pm | द-बाहुबली

मी सुधा फक्त बुध्दीबळ खेळाचाच विचार करत होतोत. स्मरणशक्ती तिव्र असणे इथे अतिशय उपयोगी पडते. कारण सोंगट्यांच्या पोजीशनचा पॅटर्न एकदा मेमराइज झाला की नको असलेली वेरिएशन चटकन दुर्लक्षीत करुन योग्य चाल निवडायला जास्त वेळ, ताकत व क्षमता उपलबध्द होते ज्याचा परिणाम उत्कृश्ट विरोधी चाली निवडण्यात (रचण्यात) होतो.

हुशारी ही स्मरणशक्ती व अनुभव (व परिणामी कल्पनाशक्ती) यांचा परिपाक असते

बाजीगर's picture

24 Oct 2015 - 5:16 am | बाजीगर

सुबोध खरे यांनी खुपच मुद्देसूद व छान मांडलय.100% सहमत.

दिवाकर कुलकर्णी's picture

11 Nov 2015 - 3:18 pm | दिवाकर कुलकर्णी

मिपा च्या एका अन्य लेखावरील प्रतिक्रिया इथं पणं उचित ठरते
पंधरा वीस वर्षापुर्वी एका
जयन्त बा शिम्पि - Wed, 11/11/2015 - 14:27
पंधरा वीस वर्षापुर्वी एका नावाजलेल्या व्रुत्तपत्रात मी एक लेख वाचला होता. त्यामध्ये ९८१ भागिले ९ असा साधा प्रश्न विचारण्यात आला होता. वर्गातील सर्वच्या सर्व म्हणजे ३४ मुलांचे उत्तर आले १९ ! ! मग परिक्षकाने दहा शिक्षकांना हाच प्रश्न विचारला. त्यांचेही उत्तर आले १९ ! ! अगदी अलिकडे मी ट्रेनमध्ये प्रवास करतांना अनेकांना हाच प्रश्न मुद्दाम विचारतो. बहुतेकांचे उत्तर १९ येते. नंतर चूक लक्षात आणून दिल्यावर ही एव्हढी जीभ बाहेर काढून , " अरेच्चा , हे आमच्या लक्षातच आले नाही " असे म्हणून मोकळे. एका एम ए झालेल्या मुलीस हाच प्रश्न विचारल्यावर तीने चटकन कॅल्कुलेटर बाहेर काढावयास सुरवात केली. मी तिला म्हणालो, " प्रश्न तुला विचारला आहे, कॅल्कूलेटरला नाही ! " ओशाळली बिचारी ! तीचेही उत्तर चुकलेच शेवटी ! पाढे नाहीत, पडताळा म्हणजे काय हेही ठावूक नाही,
परवा एका दुकानात काही वस्तू घ्यावयास गेलो होतो. अडीच रुपयाची एक वस्तू , मला तीन घ्यावयाच्या होत्या. दुकानदाराला मुद्दामच विचारले, " किती पैसे होतील ? ". त्याने कॅल्कूलेटर वर आकडेमोड करुन " अचूक " उत्तर दिले, ' सर, सात रुपये पन्नास पैसे ' ! ! आम्ही ' अडीचकी शिकलो असल्याने , तीन अडचे साडेसात ' असे चटकन मनात उत्तर तयार करतो. असा सर्वत्र आनंदी आनंद आहे .! !

Log in or register to post comments

संदीप डांगे's picture

11 Nov 2015 - 3:39 pm | संदीप डांगे

काका, तुम्ही खरंच खूप हुशार आहात हो... तुम्हाला नोबेल मिळायलाच पायजेल.

उलट ह्या प्रश्नाचे उत्तर चुकण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्याला पाढे येत असल्याचा फाजिल आत्मविश्वास. नौ एके नौ आणि नवं नवं एक्याऐंशी असं केल्यामुळेच उत्तर चुकीचं येतंय. पाढे येणे आणि पडताळा घेणे / न घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यांनी पटकन १९ उत्तर दिलं त्यांना उघड उघड पाढे पाठ होतेच. त्यांनी फक्त पडताळा घेतलेला नैये.

तुम्ही दिलेल्या उदाहरणांतून असं सिद्ध होत आहे, की पाढे पाठ करून सुद्धा उत्तर चुकीचं येउ शकतं...आपली स्मरणशक्ती सिद्ध करण्यापेक्षा उत्तर अचूक येणं याला जास्ती महत्त्व असते व्यवहारात. मग शेवटी काय करावं?

जयन्त बा शिम्पि's picture

11 Nov 2015 - 10:22 pm | जयन्त बा शिम्पि

खरं म्हणजे ९८१ ची विभागणी ९ जणांमध्ये केली तर किमान प्रत्येकाच्या वाट्याला १०० पेक्षा अधिक यावयास हवेत हा साधा तर्क ही ज्यांना जमला नाही , त्यांचे उत्तर १९ च येणार ! पडताळ्याचा संबंध येतोच तो असा. पाढे नुसते पाठ असुन उपयोग नाही, त्याचबरोबर भाजक, भाज्य, भागाकार, व बाकी हे सुद्धा ठावूक असावयास हवे. त्यालाच पडताळा म्हणतात. उत्तर अचूक येण्यासाठी , पाढे पाठ असावयास हवेत, पडताळा जमविता आला पाहिजे, आणि ह्यासाठी स्मरणशक्ती ची काहीही आवश्यकता नाही, असे कसे म्हणता येइल ? स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु कां समजू नयेत ?

आणि ह्यासाठी स्मरणशक्ती ची काहीही आवश्यकता नाही, असे कसे म्हणता येइल ?

असं म्हणतंयच कोण?

मुळात आपण जो प्रश्न विचारत आहात तो ९८१ वाला, तो असे फसवे प्रश्न मुद्दाम विचारले जातात तस्ल्या प्रकारचा आहे- ते मेंदूला फसवणारे प्रश्न आहेत. १०० मधले ९० लोक अशा प्रश्नांना चुकीची उत्तरं देतात. त्यांचा इथे संबंधच काय?

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2015 - 10:33 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या हॅकिंग आणि बेटिंगच्या धंद्यात फक्त बोटाच्या इशार्‍यांना महत्त्व असते.
कशाला मरायला ते पाढे आन पाठांतर.

पाठांतर, पाढे ह्या मध्ये मास्टर असल्याने कोणी लगेच आकाशाला गवसणी घालत नाही आणि येत नसेल तर अपयशाच्या गर्तेत कोसळत नाही. प्रत्येकाच्या स्मरणशक्तीचा, बुद्धीचा एक आवाका असतो. उगा चार पोर तीस पर्यंत दट्ट्या हाणतात म्हणजे आपल्या पोराने पण हाणायला पाहिजे असे काही नाही.

संदीप डांगे's picture

11 Nov 2015 - 10:43 pm | संदीप डांगे

जौदे हो, यशाची मध्यमवर्गीय स्वप्ने आहेत ती.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2015 - 10:45 pm | परिकथेतील राजकुमार

यशाची मध्यमवर्गीय स्वप्ने

चपलख __/\__

संदीप डांगे's picture

11 Nov 2015 - 11:50 pm | संदीप डांगे

बाकी, हे 'स्मरणशक्ति लयाला जात चालली आहे काय?' काय प्रकार आहे? म्हणजे 'लयाला जात आहे काय?' किंवा 'लयाला चालली आहे काय?' यापैकी एक पाहिजे ना?

नै काही लोक एक अक्षर इकडचं तिकडे झालं की आकांडतांडव करतात, त्यांच्या हे अजून लक्षांत कसें आलें नांही म्हणतों मीं?

जयन्त बा शिम्पि's picture

12 Nov 2015 - 5:21 am | जयन्त बा शिम्पि

९८१ भागिले ९ हा फसवा प्रश्न कसा काय म्हणता येईल ? साधा भागाकार आहे तो ! !
फसवा प्रश्न असा असतो --" एक चादर वाळण्यासाठी जर दोन तास लागतात , तर
चार चादरी वाळण्यासाठी किती तास लागतील ? " यात सुद्धा उत्तर देणारा असा उपप्रश्न
विचारु शकतो कि चारही चादरी एकाच वेळी वाळत घातल्या की वेगवेगळ्या वेळी ? " त्यानुसार
उत्तर बदलू शकते ! !

म्हणजे आपल्यापुरता आपण ह्या धाग्याच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला आहे, त्याचं उत्तर मिळवलेलं आहेत- की स्मरणशक्ती लयाला जात चालली आहे का? तर नाही, ती आधीच लयाला गेली आहे. जितक्या लोकांना हा प्रश्न विचारलात त्या सगळ्या लोकांची स्मरणशक्ती नष्ट झालेली आहे, म्हणूनच त्यांनी या साध्या भागाकाराचं चुकीचं उत्तर दिलं ना?

माझं म्हणणं बरोबर आहे ना?