खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट.????????????

सागरकदम's picture
सागरकदम in काथ्याकूट
10 Nov 2015 - 9:28 pm
गाभा: 

तसा मी मिपा वर नवीन आहे पण दारोज नवीन काहीतरी ऐकतोय
मागे कोणी मिपाकरांचे वय काढले ,आत्ता तर अजून एक निदर्शनास आले आहे

मिसळपाव
www.misalpav.com
खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती असं घोषवाक्य असणारी ही साइट खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या साइटवर सदस्य झालेली अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचे खाद्यपदार्थांशी निगडित अनुभव, आठवणी, एखाद्या पदार्थाचा फसलेला अनुभव, झकास जमलेल्या एखाद्या पदार्थाच्या रेसिपीचं रहस्य, इतरांनाही तो पदार्थ करता यावा यासाठीच्या टिप्स, पर्यटन स्थळाला भेट दिलेल्यांनी तिथली खासियत असलेल्या डिशबद्दल सांगितलेली माहिती, अशा अनेक अंगांनी ही वेबसाइट रंगतदार झाली आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनं या साइटवरचं लेखन असल्यामुळं, रेसिपी या प्रकारात तुम्हाला रुची नसली तरी कधीतरी विरंगुळा म्हणूनही या साइटला भेट द्यायला हरकत नाही. कारण खाद्यसंस्कृतीच्या शेअरिंगबरोबरच, साहित्य, चर्चा, काव्य, तंत्रजगत, भटकंती, इत्यादी विविधांगी सदरं असल्यामुळेही ही साइट रंजक आहे. खास दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेला रुची विशेषांक तर विशेष वाचनीय असाच आहे.

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-story-in-madhurima-about-websit...

पण मिपा आधी पासून साहित्याला समर्पित होते कि खाण्यासाठे फक्त ?

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

10 Nov 2015 - 9:38 pm | जव्हेरगंज

मिपा आधी पासून साहित्य/पाकृ/चर्चा/भटकंती/व इतर सर्व विषयांना समर्पित होते :)

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 9:42 pm | सागरकदम

पण ह्यात फक्त खाद्य संस्कृतीला होते असे लिहिले आहे
हि सरळ दिशा भूल आहे

कोण हे धृतराष्ट्राचे अवतार?

अगं दिव्य दृष्टी आहे , दिव्य भारती !!

प्रदीप's picture

11 Nov 2015 - 12:11 pm | प्रदीप

बाकी काही म्हणा, मिपावर अधूनमधून जे अवतार प्रकटतात, ते (मर्यादित स्वरूपात) करमणूक करतात. त्यांच्या आवेशापुढे 'हा कोण सांप्रति नवा अवतार' असे म्हणायची पाळी येते. आता बरेचदा हे अवतार, जुन्या नावाचे नवे अवतार असतात, ते वेगळे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2015 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा साहित्य, ललित लेखन, कथा, कविता , खाद्य, वाद, संवाद, माहितीपूर्ण देवान घेवाण यासाठी तर मिपा प्रसिद्ध नाही असं माझं मत आहे. :)

अवांतर : दिवसभर ऑनलाइन राहिल्यानंतर मिपावर काही तरी काथ्याकुट टाकावा वाटलं याचं कौतुक वाटलं. येत जा. दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा...!

अशा सर्वांना एक अभिनव विरोध म्हणुन आपण त्यांचे इ-मेल आय डी मिळवुन
एकेक १० चांगले लेख निवडुन लिंक पाठवा अभियान सुरु करु
म्हणजे ते डाळी गिफ्ट पाठवण्याचा कार्यक्रम सध्या काँग्रेसवाले करतात तस काहीस.
म्हणजे त्यांना कळेल और भी है मिपापर बहोत कुछ
भास्कर चंदावरकरांना एक मोठी खंत होती मला फक्त घाशीराम कोतवाल चा संगीतकार म्हणुनच ओळखता
तशीच काहीशी खंत मिपा फक्त खाना खजाना आहे अस काहींना वाटतं हे वाचुन वाटली

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 10:33 pm | सागरकदम

त्यांना मोकळ्या दाही दिशा पाठवावे

चांदणे संदीप's picture

10 Nov 2015 - 10:47 pm | चांदणे संदीप

'मोकलाया दाही दिशा' पाठवा!
;-)

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:43 pm | टवाळ कार्टा

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2015 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

आंतरजालावरचे (आणि इतर कुठलेली) लिखाण हे मुख्यतः लेखकाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब असते हे काही जणांना समजत नाही... आणि मग...
बडे आंतरजालपे ऐसे छोटे छोटे मानसिकता / अज्ञान प्रकट करनेवाले किस्से होते रहते है । =)) =)) =))

======

या कारणाने का होईना, पण एखादा नवीन वाचक मिपावर आला तर केवळ पाकृच नाही तर इतर अनेक वैशिष्ठ्ये पाहून मिपाला चिकटून राहील... म्हणजे मिपाचा फायदाच झाला ना ! :)

आम्ही पण असेच अपघाताने मिपावर आलो आणि मिपाकर बनून राहीलो :) ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2015 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे...

विनाकारण स्तुतीसुमने उधळली जाऊ लागली किंवा टीका होऊ लागली की समजा की तुम्ही आपले स्थान बळकट केले आहे.

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 1:01 am | सागरकदम

माझे पण स्थान बळकट आहे

चीव्तीव चे धन्यवाद

होबासराव's picture

10 Nov 2015 - 11:05 pm | होबासराव

विनाकारण स्तुतीसुमने उधळली जाऊ लागली किंवा टीका होऊ लागली की समजा की तुम्ही आपले स्थान बळकट केले आहे.


वाह क्या निरिक्षण है :)

उगा काहितरीच's picture

10 Nov 2015 - 11:52 pm | उगा काहितरीच

मिपाची दखल घेत आहेत तर लोक !
तात्यांनी लावलेले रोपटे चांगलेच डेरेदार होत आहे . एक सामान्य मिपाकर म्हणून अभिमान वगैरे वाटतो आहे .;-)

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 12:30 am | बोका-ए-आझम

आलेल्या मूळ लेखाचं शीर्षक हे ' खाद्यसंस्कृती टिकवणारे ब्लाॅग्ज' असं आहे. मिपाचं नावच खाद्यपदार्थाचं आहे. इथे लाॅगिन झालेल्या लोकांची नावंही ' हाॅटेलात आलेली माणसं ' अशी दिसतात. काही आयडी - उदाहरणार्थ आमचे अत्रुप्त गुर्जी, झालंच तर गवि, संजोपराव, प्रास, स्वतः तात्या उर्फ विसोबा खेचर यांनी खाणे आणि खिलवणे यावर अफलातून लेख लिहिले आहेत. असातसाच लेख कुणी पाडला तर त्याला जिलबी असंच नाव आहे इथे. त्यामुळे मिपा हे खाद्यसंस्कृतीला वाहिलेलं आहे हा गैरसमज आहे हाच एक मोठा गैरसमज आहे. हादडणे आणि बदडणे इथे सारख्याच उत्साहानं होतं. पाठीत घातले जाणारे आणि ताटात गरमागरम वाढले जाणारे यांना धपाटे हा एकच शब्द वापरणाऱ्या रसिक महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीला जपण्याचं काम करणाऱ्या मिपाचा कोणी खाद्यसंस्कृतीमध्ये उल्लेख न करता फक्त राजकारण, तंत्रजगत, क्रीडा, कला यासाठीच उल्लेख केला तर गैरसमज झालाय असं म्हणता येईल.
चला, एवढा प्रतिसाद देऊन भूक लागली. एक प्लेट मिसळ आण रे भाऊ. तर्री मारून. कांदा आणि लिंबूत कंजूषी नको!

पैसा's picture

11 Nov 2015 - 12:45 am | पैसा

त्यांची मोठी चूक म्हणजे मिपा हा ब्लॉग नाही. ते स्वायत्त संस्थळ आहे.

पण मिपा ही 'सोशल साईट' आहे म्हणे!

ज्या माध्यमांमधून एकमेकांशी देवाणघेवाण करता येते त्या माध्यमांना सामाजिकशास्त्रांचे अभ्यासक 'सोशल मिडीया' असं म्हणतात. संस्थळं/वेबसाईट्स हा माध्यमांचा एक भाग झाला. मिपा हे त्यांपैकी एक. त्यामुळे 'सोशल साईट' हे विशेषण अग्राह्य नव्हे.

असो. या प्रतिसादामागचं मुख्य कारण, 'मधुरिमा'च्या मुख्य संपादिकेला ह्या धाग्याचा दुवा पाठवत आहे.

प्लीज, हे समाजकार्य जरा लवकर करा ! कसंय ताई, चुका वेळेवर कळालेल्या उत्तम :)

सहमत.चांगल्या कामाला उशीर नको अजिबात. धन्यवाद आगाऊ.( धन्यवादाला आगाऊ म्हंटलं आहे)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2015 - 7:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मितान आणि अजया, तुमचे प्रतिसाद येण्याआधीच तिला इमेल केलं होतं. मिपाकरांच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचल्याचं उत्तरही तिच्याकडून आलं.

---

बोका-ए-आझम यांचा दृष्टिकोन आवडला.

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 10:04 pm | सागरकदम

आणि माझा दृष्टी कोण ?

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:24 pm | टवाळ कार्टा

head in mouth

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 10:45 pm | सागरकदम

चिव तीवचा फोटू नका हो तकू

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2015 - 8:53 am | बोका-ए-आझम

.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Nov 2015 - 10:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

एका घरातल्या गोष्टी तिसर्‍या संबंध नसलेल्या घरातल्या व्यक्तीने चौथ्याचं घरात पोहोचवणे ह्यास मराठी भाषेमधे खालील वाक्प्रचार उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वाक्यात उपयोग करा.

१. काड्या सारणे
२. लावालाव्या करणे
३. भोचकपणा करणे
४. नाक खुपसणे

वाक्प्रचाराचा अर्थ वरच्या प्रतिसादामधे आहेच त्यामुळे त्याला ० मार्क्स असतील. वरच्याच प्रतिसादातल्या वाक्यांमधे वाक्प्रचार वापरल्यास अर्धे मार्क वजा होतील. वाक्यात योग्य उपयोग करणार्‍याला संपुर्ण मार्क्स आणि सडेतोड प्रतिसाद देणार्‍या उत्तरास दुप्पट मार्क्स मिळतील हो....!!!

रच्याकने मराठी आंतरजालाने कृपया एकमेकांचा आदर ठेउन उणीदुणी काढु नयेत हि विनंती. चुका दाखवा काही हरकत नाही. पण त्यांच्या कुचेष्टा करणे काही पटलं नाही. असो.

आपल्या तक्रारी पौड फात्य्वर तक्रार पेटीत टाका
फाट्यावर मारण्यात येतील

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:39 am | टवाळ कार्टा

कित्ती चावायचं =))

चावत लोकांवर कारवाई व्हायलाच पाहिजे

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 10:06 am | बोका-ए-आझम

पण त्यांनी फक्त शीर्षकातच हा घोळ घातलाय. प्रत्यक्ष लेखात वेबसाईट हाच शब्द आहे. मला तर मिपाचं नाव पहिलं असल्याचा आनंद झाला बुवा.

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 10:23 am | सागरकदम

पण मिपा फक्त खाण्य्साठी आहे असे लिहिले त्याला आक्षेप नाहीये ?

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 1:20 pm | बोका-ए-आझम

मिसळपाव
www.misalpav.com
खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट. मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती असं घोषवाक्य असणारी ही साइट खवय्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या साइटवर सदस्य झालेली अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींचे खाद्यपदार्थांशी निगडित अनुभव, आठवणी, एखाद्या पदार्थाचा फसलेला अनुभव, झकास जमलेल्या एखाद्या पदार्थाच्या रेसिपीचं रहस्य, इतरांनाही तो पदार्थ करता यावा यासाठीच्या टिप्स, पर्यटन स्थळाला भेट दिलेल्यांनी तिथली खासियत असलेल्या डिशबद्दल सांगितलेली माहिती, अशा अनेक अंगांनी ही वेबसाइट रंगतदार झाली आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीनं या साइटवरचं लेखन असल्यामुळं, रेसिपी या प्रकारात तुम्हाला रुची नसली तरी कधीतरी विरंगुळा म्हणूनही या साइटला भेट द्यायला हरकत नाही. कारण खाद्यसंस्कृतीच्या शेअरिंगबरोबरच, साहित्य, चर्चा, काव्य, तंत्रजगत, भटकंती, इत्यादी विविधांगी सदरं असल्यामुळेही ही साइट रंजक आहे. खास दिवाळीनिमित्त तयार करण्यात आलेला रुची विशेषांक तर विशेष वाचनीय असाच आहे.

तुम्ही जो दिव्यमराठीवर मिपाचा परिचय वाचलात आणि ज्याचा दुवा दिला आहे, तो हाच आहे, बरोबर? संपूर्ण परिचयात कुठेही मिपा ' फक्त ' खाण्यासाठी असलेली वेबसाईट आहे असं म्हटलेलं नाही. तुम्ही असा निष्कर्ष कशावरून काढलात ते मला समजलं नाही. कदाचित तुम्ही वाचलेली आणि या लिंकमध्ये नसलेली माहिती असेल. तर मग कृपया ती लिंकही द्यावी.

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 1:26 pm | सागरकदम

१) खाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरू करण्यात आलेली मिसळपाव ही एक लोकप्रिय वेबसाइट.

२) बाकी तुम्ही वाचले तरी ह्यात मिपा चा वापर फक्त खाण्यासाठी होतो असे ळीलेय

३) रुची विशेषांक दिवाळी निमित आहे ?

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 2:30 pm | बोका-ए-आझम

२) बाकी तुम्ही वाचले तरी ह्यात मिपा चा वापर फक्त खाण्यासाठी होतो असे ळीलेय

तेच तर विचारतोय. कुठे?

बाकी रुची विशेषांक हा १५ आॅक्टोबर या जागतिक अन्नदिनानिमित्त होता पण याच्यावरुन मिपा हे ' फक्त ' खाण्यासाठी आहे असा निष्कर्ष काढण्याचं कारण समजलं नाही बुवा. लेखिका खाण्याशी संबंधित ब्लाॅग्ज आणि वेबसाईट्स यांच्यावर लिहित असताना त्यांनी मिपाबद्दल लिहिलं कारण मिपावर खाद्यसंस्कृतीची देवाणघेवाण किंवा जे काय होतं ते चांगलं आहे असं त्यांना वाटलं. आता हे त्यांचं मत असू शकतं. हा त्यांचा प्रामाणिक समज असू शकतो किंवा गैरसमज पण त्यांनी मिपाचा वापर फक्त खाण्यासाठी होतो असं कुठे म्हटलंय ते मला तरी दिसलं नाही.

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 4:37 pm | सागरकदम

आधी १ल्य आणि ३ र्या चे उत्तर द्या
मग बोलू निवांत

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 9:37 pm | बोका-ए-आझम

हो आणि नाही.

मांत्रिक's picture

12 Nov 2015 - 9:41 am | मांत्रिक

:) :) :)

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 12:57 am | सागरकदम

मागे कोणीतरी सोसिल नेट्वर्किंग पण म्हटले होते

उचकावण्याची नस सापडली आहे "सागरकदम" तुला.

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 9:57 am | सागरकदम

मी कोणाला उचाकाऊ व का उचकाउ दादा ?

आता बोला.........!!

जेपी's picture

11 Nov 2015 - 9:59 am | जेपी

फोटो दिसत नाहीत

कवितानागेश's picture

11 Nov 2015 - 12:58 pm | कवितानागेश

काय चुकले?
एकमेकांचे डोके खायला येतोच की आपण इथे! ;)

खार म्हणले तरी चालेल माऊली

कवितानागेश's picture

13 Nov 2015 - 12:29 am | कवितानागेश

खार खाये मिपाके दुश्मन!
आपण डोकीच खाऊ काथ्याकूट करकरून.. :)

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 1:18 am | सागरकदम

चिव तीव मिपाचा दुश्मन आहे ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Nov 2015 - 10:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्यास वाढवं. (तेवढा वेळ मिळाला तर).

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 10:36 am | सागरकदम

चोराच्या मनात चांदणे

जव्हेरगंज's picture

11 Nov 2015 - 1:38 pm | जव्हेरगंज

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

जव्हेरगंज's picture

11 Nov 2015 - 1:41 pm | जव्हेरगंज

अरेच्च्या ज्या संदर्भाने लिहीले होते तो संदर्भच गेला उडुन .:):):)

सागरकदम's picture

11 Nov 2015 - 1:46 pm | सागरकदम

परत लिहा कि टंकून

परिकथेतील राजकुमार's picture

11 Nov 2015 - 10:36 pm | परिकथेतील राजकुमार

काही काळापूर्वी मिपा मद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून ओळखली जायची. गेले ते दिवस आणि बुधवारच्या रात्री.....

बुधवारच्या रात्री जागी चुकून वेगळाच refernce वाचला

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2015 - 9:43 pm | टवाळ कार्टा

हैला...ओल्या कट्ट्याला म्हैलामंडळ??? सोवळेपणाचे डोहाळे कधीपासून लाग्ले मग????

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 11:37 pm | सागरकदम

कुठे कुठे

पाषाणभेद's picture

13 Nov 2015 - 9:32 am | पाषाणभेद

>>> काही काळापूर्वी मिपा मद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून ओळखली जायची. गेले ते दिवस आणि बुधवारच्या रात्री....

खरंय.

जुन्या मिपाची आठवण जावून असल्या प्रकारे नविन मिपा उदयाला आले असं म्हणायचं.

राजेश घासकडवी's picture

13 Nov 2015 - 10:33 am | राजेश घासकडवी

तात्यांच्या काळात दर आठवड्यात एकदा 'या अमुक अमुक बाईबरोबर एंजॉय करूया हा तमुक तमुक पदार्थ' म्हणत एखाद्या चमचमीत खाद्यपदार्थाचा आणि सेक्सी बाईचा फोटू असायचा. त्यामुळे कदाचित असा गैरसमज झाला असेल. तरी बरं, त्यावरून काही जास्त टोकाचा गैरसमज झाला नाही ते. ;)

कोणीतरी कुठल्यातरी अंकात मिपाविषयी काहीतरी गैरसमज पसरवतो, तर आपण मिपाकरांनी उगाच कशाला अंगाला लावून घ्यायचं? सहा आंधळ्यांना हत्ती वेगवेगळा जाणवतो तसंच समजायचं, आणि हाथी चले अपनी चाल म्हणत चालत राहायचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2015 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्याच्या काळातल्या काही गोष्टी खर्रच मी मिस करतो. खाणं पिणं, आणि अमुक बै गच्च भरलेली, त्या चड्ड्यातल्या नट्या आणि उगं काही शेरोशायरी, आ़ज हिच्याबरोबर मिटींग आहे अन काय आहे. सालं रंगीला माणुस होता तात्या. :)

कधी त्या टॉलीवूडच्या उघडया पाघड्या नट्या, काही साड्यांवरच्या उगं आकार उकार अधोरेखीत करणारी छायाचित्रं....अरारा...गेले ते दिवस. आता तेवढ्याच साठी गुगलला विचारावं लागतं टॉलीवूडमधे नवीन काय आलंय म्हणुन. ;)

>>>>आपण मिपाकरांनी उगाच कशाला अंगाला लावून घ्यायचं? सहा आंधळ्यांना हत्ती वेगवेगळा जाणवतो तसंच समजायचं, आणि हाथी चले अपनी चाल म्हणत चालत राहायचं.

१०००% सहमत.

कोण ती बाई तीला हे मिपाकर फुकट भाव देतात. माझ्या डोक्यात जातात ही प्रकरणं. आता ती बै थेट पुढच्या दिवाळीत दिसेल 'समांतर रेषेवर काढलेली त्रिकोणं'' आणि त्याला चिटकवलेली ''अशी कशी गं तुझी ही अक्षरं'' असं काय जाहिरातीला येईल. अमुक वाचा अन धमुक वाचा, हे लै भारी अन ते लै भारी. अरे ती बै कै बी विकायला घेऊन आली तर ढुंकुन बघायचं नै विषय संपतो. बरं तिच्या टोपलीत काय असतं. कुठली जांभळं, कुठली करवंदं, केळी, बरं ती बाई आणते कुठून ? तर ती माल उचलते मिपावरचाच. फक्त नाव होतं केळी विकणार्‍या बैचं. नै का. :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2015 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चुकीने दोन धाग्यावरचे विषय प्रतिसादात एकत्रीत आले आहेत.... संपादकांना वेळ असेल तर जरा प्रतिसाद जिथल्या तिथे नेऊन टाकतील काय ? :)

-दिलीप बिरुटे

माझ्याच धाग्यावर का असे होतेय राव ?
तरी पण राहू ध्या
memoranda

नाखु's picture

14 Nov 2015 - 5:53 pm | नाखु

कंटाळा येतो राव परत उत्तर द्य्यायचा

ह्या धाग्यावरील हे गाणे पहा आणि ठरवा एकदा काय ते?

तरी ही नाही समजले तर एका कट्ट्याला हजेरी लावा आणि सगळ्या शंकाची समूळ शस्त्रक्रिया करून घ्या.

खुलासा संपला

अमित सांगलीच सागर कदम बनून आलेत तेव्हा निवांत रहा