ओल्या नारळाचे लाडू

पियुशा's picture
पियुशा in दिवाळी अंक
30 Oct 2015 - 11:29 am

.
.
साहित्य :
१) ओल्या नारळाचा कीस - ३ वाट्या
२) पिठीसाखर - २ वाट्या
३) मनुका - हव्या तितक्या
४) मिल्क पावडर - २ चमचे (ऐच्छिक)
५) दूध - १ वाटी
६) मलई - ३ मोठे चमचे (ऐच्छिक)

कृती :-
नॉनस्टिक पॅनमध्ये १ वाटी दूध घालून त्यात नारळाचा कीस घालून मंद आचेवर परतत राहायचा.
दूध आटत आलं की त्यात मलई घालायची. त्यामुळे नारळाचा कीस नरम पडतो. मग त्यात अनुक्रमे पिठीसाखर, मिल्क पावडर आणि मनुका घालून पुन्हा ५ मिनिटं मंद आचेवर परतत राहायचं. मिश्रण गोळा होऊ लागलं की काढून घ्यायचं. थोडं गार झालं की लाडू वळून घ्यायचे. हे लाडू कडक होत नाहीत, कारण आपण साखरेच्या पाकात नाही बनवलेत. पिठीसाखर वापरलीय. त्यामुळे मऊ होतात. घरातल्या आजी-आजोबांनासुद्धा खाता येतात.

.
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

क्या बात !! पोरगी सुगरण झाली :) सुरेख फोटो पिश्वी... उचलुन एक एक तोंडात टाकावासा वाटतोय :)

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2015 - 6:31 am | बिपिन कार्यकर्ते

झाली म्हणजे? आहेच्चे! दिवाळीच्या दिवशी असं नै बोलाच्चं!

बादवे, खरेखुरे लाडू कधी देणारेस पिवशे?

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 6:42 am | कविता१९७८

मस्तच ग, चविष्ट असतील यात काही शन्का नाही

श्रीरंग_जोशी's picture

10 Nov 2015 - 6:48 am | श्रीरंग_जोशी

छानच दिसत आहेत खोबर्‍याचे लाडू. मला खूप आवडतात.

सुटसुटीत पाककृती आवडली. फक्त कृतीचेही फोटोज हवे होते.

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 9:23 am | नूतन सावंत

सुगरण पियू.लाडू सुरेख दिसताहेत आणि सुरेखच लागतील याचीही खात्री आहे.

इशा१२३'s picture

10 Nov 2015 - 9:46 am | इशा१२३

तोपासु फोटो.
पियु कधी देतीयेस लाडु....

पियुसारखेच गोड दिसत आहेत लाडू!

Maharani's picture

10 Nov 2015 - 2:20 pm | Maharani

झकास गं..करुन पाहीन..

हाहा's picture

10 Nov 2015 - 2:29 pm | हाहा

फोटो एकदम तोंपासु आलाय.

दिपक.कुवेत's picture

10 Nov 2015 - 2:43 pm | दिपक.कुवेत

मिल्कमेड घालून अजून छान होतात असं एकलय.

भुमी's picture

10 Nov 2015 - 6:57 pm | भुमी

टेंम्प्टीग झालेत लाडू , सोप्पी कृती ,आवडली.

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2015 - 8:38 pm | स्वाती दिनेश

लाडू छानच दिसत आहेत ग,
स्वाती

मनिमौ's picture

11 Nov 2015 - 9:42 am | मनिमौ

बाकी तु सुगरण आहेसच. लाडु एकदम यम्मी दिसताहेत

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 10:26 am | प्रीत-मोहर

तोंपासु फोटो पिवड्या!!!!

Mrunalini's picture

11 Nov 2015 - 2:24 pm | Mrunalini

आवडेश. :)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Nov 2015 - 2:30 pm | अत्रुप्त आत्मा

जिल्बुचा नारळ लाडू

पद्मावति's picture

11 Nov 2015 - 2:32 pm | पद्मावति

यम्मी लाडू. मस्तं दिसताहेत.

मधुरा देशपांडे's picture

11 Nov 2015 - 2:32 pm | मधुरा देशपांडे

मस्त पाकृ आणि फोटो. सोप्पे वाटताहेत. करुन बघेन.

पैसा's picture

12 Nov 2015 - 1:49 pm | पैसा

नारळाच्या वड्या करतात तसेच लाडू करायची ऐड्या आवडली!

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 5:03 pm | सानिकास्वप्निल

सोपी, सुटसुटीत पाककृती आवडली पियुशा :)

हासिनी's picture

19 Nov 2015 - 10:48 am | हासिनी

पिवडे तुला चक्क लाडू वळता यायला लागले?? भारीच ;)
फोटो मस्त आलाय!