'मिसळपाव डॉट कॉम' नावाच्या सोशल साइटचा दिवाळी अंक गेली अनेक वर्षं निघतो आहे. तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू. धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष. त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.
--------------------------
आजच्या मटामध्ये मेघनाताईंचा 'दिवाळी अंकांची ऑनलाईन आतषबाजी' हा लेख आलाय, त्यातील ही मिपा दिवाळी अंकाची दखल. हा पॅरा वाचून काही प्रश्न पडले म्हणून हा लेखन प्रपंच.
ढिस्क्लेमर :-
१) मेघनातै आणि आमचे काय वैर नाय. (गतसाली त्यांच्याकडून वट्ट रकमेचा लेखनाबद्दलचा चेक आपल्याला मिळालेला आहे.)
२) प्रा. डॉ. मिपा दिवाळी अंकाचे मुख्य संपादक असताना देखील 'तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन' असा उल्लेख केल्याने मला जळजळ झालेली नाहीये.
तर आता सुरुवात करतो.
तरुण-हौशी मंडळींनी केलेलं संपादन आणि लेखन ही या अंकाची जमेची बाजू.
ह्या अंकाचे संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने नक्की जमेची बाजू काय घडली हे कुठेही सांगण्यात आलेले नाही.
धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वाराही या दिवाळी अंकाला लागलेला दिसणार नाही. पण उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण हा या अंकाचा विशेष.
संपादन तरुण आणि हौशी लोकांनी केल्याने हे असे घडले आहे असे म्हणायचे असावे काय? धीरगंभीर विषय अंकात आले तर त्याला दखलपात्र म्हणता येईल काय? किंवा 'उत्तम' दिवाळी अंकाची व्याख्या नक्की काय असते? ६०+ वर्षाचे संपादक आणि उगाच जागतिक चर्चा, संस्कृतीचा उपापोह इ. विषय अंकात आले की त्याला दर्जा मिळतो?
ताईंनी म्हणल्याप्रमाणेच 'उत्साही, अनौपचारिक भाषा वापरणारं, दिलखुलास दाद देणारं, स्वागतशील वातावरण' हे पुरेसे नाही काय? 'धीरगंभीर चर्चात्मक विषयांचा वारा' जिथे वाहतो त्या संस्थळांची गेली काही वर्षे जी अवस्था आहे, ती योग्य संदेश देणारी नाही काय?
त्या मानानं तो तसा फार प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारा असेलच असं नव्हे. त्याच्या वाचकाचं वय मात्र निश्चितपणे कमी आहे, आणि ते प्रतिक्रियांमधून लगेच लक्षात येतं.
प्रोफेशनल वा प्रमाणलेखनाचे निकष काटेकोरपणे पाळणारे अनेक छापील दिवाळी अंक काही कालावधीत 'राम' म्हणायला लागले. अनेक उदाहरणे तर आपण जाणतोच. मुळात ई-दिवाळी अंकांना निकष कशाला हवेत? उत्स्फूर्त लेखन आणि मायमराठीची सेवा ही निकषांमध्ये बसवायचीच कशाला? मनमोकळे लेखन आणि नवलेखकांचा हुरूप हीच खरेतर अशा अंकांची देणगी असते. नावाजलेल्या लेखकांना आणि त्यांच्या 'दवणीय किंवा मला पहा फुले वाहा' प्रकारच्या लेखनाला कंटाळूनच गेली काही वर्षे वाचक सातत्याने नवलेखकांना आवर्जून वाचत आहेत. एखाद्या अंकात असे नावाजलेले लेखक नसतील तर त्याची पात्रता खालावते का?
आणि सगळ्यात खटकला तो वाचकांच्या वयाचा उल्लेख. फक्त प्रतिक्रिया देतात तेवढेच त्या अंकाचे वाचक असतात का? किती तरी लोक निव्वळ वाचनमात्र असतात. त्यात सर्व वयोगट आणि प्रोफेशनमधील वाचक असतात. त्यांना फक्त प्रतिक्रिया दिली नाही म्हणून गणतीत घ्यायचेच नाही का? मुख्य म्हणजे वाचकांचे वय आणि प्रतिक्रिया ह्यांचा संबंधच काय येतो? आणि वाचकांच्या वयाचा आणि अंकाच्या दर्जाचा संबंध काय? 'चांदोबा' आज सर्व वयोगटातील लोकं वाचतातच ना? का तिथे इयत्ता ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याने तुम्ही त्याला 'फक्त बालगोपाळांचे' असे मानणार आहात?
तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की मिपाकरांनो तुमचे वय काय? लेखात बौद्धिक का शारीरिक ते स्पष्ट केलेले नसल्याने, कृपया दोन्ही वयं सांगा.
प्रतिक्रिया
8 Nov 2015 - 7:59 pm | पैसा
चारचौघांत वय काय विचारता हो परा काका?
8 Nov 2015 - 8:01 pm | परिकथेतील राजकुमार
एक कुठले तरी सांगा की पण. ;)
8 Nov 2015 - 8:02 pm | पैसा
मेघनातै पुणेकर आहेत का?
(पळून जाते हां आता.)
8 Nov 2015 - 8:40 pm | गॅरी ट्रुमन
मग आपला परा काय चंद्रावरचा आहे का?
(चला मी पण पळतो आता :) )
8 Nov 2015 - 8:07 pm | टवाळ कार्टा
वय घेउन त्या माहितीचा काय उपयोग करणार आहात?
8 Nov 2015 - 8:10 pm | गॅरी ट्रुमन
तुच्छता दर्शविणारी स्मायली. अजून पाचशे वर्षांनी मानवी संस्कृतीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पराने गोळा केलेल्या विद्याचे महत्व समजून येईल.
रेफरन्स न कळल्यास व.पु.काळ्यांचे स्टॅटिस्टिक मराठे ऐकावे ही विनंती. (हे मिपावरील स्त्री सदस्यांनी वाचले नाही तरी चालेल :) )
8 Nov 2015 - 8:16 pm | टवाळ कार्टा
आयला...तुम्हीसुध्धा?? तुम्ची हि बाजू म्हैत नव्हती =))
8 Nov 2015 - 8:22 pm | परिकथेतील राजकुमार
ह्याला म्हणतात 'द्रष्टेपणा'. ;)
8 Nov 2015 - 8:09 pm | प्रचेतस
ह्या मेघनाताई कोण? कुणी पोक्त बाई आहेत काय?
8 Nov 2015 - 8:09 pm | सोत्रि
कोणा 'खास आयडींचे' वय जाणून घेण्याकरता चक्क एक लेख पाडण्याचा वयस्कर अट्टाहास का बौद्धिक दिवाळखोरी?
- (वयस्कर पुणेरी) सोकाजी
8 Nov 2015 - 8:21 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही जेष्ठ आहात का?
हा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे का?
8 Nov 2015 - 11:51 pm | विशाल कुलकर्णी
हा प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार आहे का
सोत्रिंच्या आगामी पुस्तकाला (चावडीवरचे कॉकटेल) मिळू घातलेला पुरस्कार परत करण्याच्या निर्णय सोत्रिनी घेतलेला आहे. त्यामुळे त्याना कुठल्याही मुद्द्यावर काहीही प्रश्न विचारण्याचा हक्क आपोआपच प्राप्त झालेला आहे परागुर्जी , उगाच शंका घेवू नये.
9 Nov 2015 - 5:29 am | सोत्रि
विशल्या, तुमाखमि!!
- (विशाल पुरस्कृत जेष्ठ) सोकाजी ;)
9 Nov 2015 - 5:33 am | सोत्रि
सुरूवातीला एकदा वय विचारल्यावर परत हा प्रश्न अस्थानी आहे! इतकं साधं तुमच्या ध्यानात येऊ नये?
अशाने मेघनाकाकूंच्या म्हणण्याला दुजोराच देताय की!!
- (अधिकारी) सोकाजी
8 Nov 2015 - 8:10 pm | मांत्रिक
मुद्दे छान मांडलेत. त्याबद्दल सहमत.
पण एक प्रश्न. माझ्या माहितीत, चांदोबा गेली ३-४ वर्षे तरी बंद आहे.चांदोबा नक्की मिळत असेल तर सांगा. मलाही आवडेलच वाचायला. सर्व जुन्या चांदोबांच्या डिजिटल काॅपीज archive.org येथे आहेत. हौशी वाचक येथे वाचू शकतात.
8 Nov 2015 - 9:05 pm | मांत्रिक
अर्र. या लिंकवरचे चांदोबाचे अंक उडवलेत. तीन ते चार महिन्यांपूर्वी मी येथूनच जवळजवळ जुने २०-२५ अंक डाऊनलोड केले होते. पण मोबाईलची स्टोअरेज कमी पडू लागल्याने पुन्हा डिलिट केले. मोठी चूक झाली माझ्याकडून. आता हा ठेवा पुन्हा मिळणे नाही...
एक अनमोल सांस्कृतिक ठेवा हरवला...
शेवटी शेवटी चांदोबातील लेख व चित्रे यांचा दर्जा राखता आला नव्हता. शंकर, चित्रा, जया यांची चित्रे आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. कुणाकडे आहे का असा जुन्या चांदोबाच्या अंकाचा संग्रह. विकत घ्यायची इच्छा आहे.
8 Nov 2015 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाचा या वर्षीचा दिवाळी अंक अजून प्रकाशित झालेला नसताना तो कसा असेल याबद्दल खात्रीचे मत पाहून (महाभारत फेम संजयाच्या एक पाऊल पुढे जाणारी) भविष्यातले लेखन वाचणारी दिव्यदृष्टी आस्तित्वात असल्याचा संशय येऊ लागला आहे ;) :) =))
तसेच, मुक्त संस्थळावरच्या वाचकांचे वय शोधून काढण्याचा अल्गोरिदम आस्तित्वात असल्याचाही संशय येतोय =))
8 Nov 2015 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
इतके दिवस खुबीने गुप्त ठेवलेले आमचे वय अश्या रितीने उघड झाल्याने ते सगळे श्रम व्यर्थ गेले की हो
8 Nov 2015 - 8:24 pm | गवि
+१..
अगदी, अगदी..
मेघनाताईने मिपाचं थोडं कौतुक, थोडं मूल्यमापन केलेलं असलं तरी एकंदरीत प्राध्यापक येरकुंडकरांच्या सत्कारातल्या भाषणाची आठवण झाली हे खरं.
8 Nov 2015 - 11:42 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो.
(जालीय इतिहासात सुवर्णफॉण्टाने लिहिल्या जाणार्या प्रसंगांचा फॅन) बॅटमॅन.
8 Nov 2015 - 8:15 pm | उगा काहितरीच
चंग्या अन् आम्ही सोबतच झेड पीच्या शाळेत जात होतो . पुढे हा चंग्या हठयोग शिकला अन चांगदेव म्हणून प्रसिद्ध झाला . आता यावरून आमचे वय लक्षात येत असेल तर चांगली गोष्ट आहे.
8 Nov 2015 - 8:18 pm | टवाळ कार्टा
म्हणजे तू माझ्या नंतरच्या बॅचचा की रे ;)
8 Nov 2015 - 8:40 pm | जेपी
उगा चा षटकार!!
_/\_
8 Nov 2015 - 8:51 pm | पियुशा
मेघना काकू किती वर्षाच्या आहेत नक्की ६० + काय ? ;) हे म्हणजे असय आपला तो बाब्या न दुसर्याच् ते कार्टा(टवाळ ) नै ब्र का ;) असो..... मिपा बाळस धरायला लागल काला टिका तो बनता है :)
8 Nov 2015 - 9:02 pm | लाल टोपी
मेघनाताई/काकूंचे मनःपूर्वक आभार त्यांच्यामुळे ब-याच दिवसांनंतर 'परा' लिहीते झाले. वेलेकम बॅक.
8 Nov 2015 - 9:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(मधलं वाक्य काढून) ही दोन वाक्यं एकत्र केली की मेघनाताईंना काय म्हणायचंय ते लक्षात येतं. बुढ्ढे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास असत नाहीत. उत्साह, अनौपचारिकता, दिलखुलासपणा ही मनाने तरुण असणाऱ्यांची लक्षणं असतात.
8 Nov 2015 - 10:41 pm | चिंतामणी
दिलखुलासपणा ही मनाने तरुण असणाऱ्यांची लक्षणं असतात.
एक सांगाल का वरचे वाक्य लिहीता आणि " बुढ्ढे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास असत नाहीत." असे सुद्धा म्हणता.
म्हणजे "जे उत्साही, अनौपचारिक आणि दिलखुलास नसतात ते बुढढे असतात" असा निष्कर्श काढायला हरकत नसावी. बरोबर?
9 Nov 2015 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबर.
आता मुखपृष्ठ किंवा दोन चित्रं पहा. 'मिसळपाव'च्या या वर्षीच्या अंकाची जाहिरात उजवीकडे दिसत आहे, त्यात दंगामस्ती, गंमत, उत्साह, घराबाहेर पडून करायची मौजमजा, असं दर्शवणारे फटाके आहेत. पार्श्वरंग काळा वापरूनही मला त्या फटाक्यांमधला लाल, निळा, हिरवा, पिवळा, सोनेरी उत्साह दिसतोय. 'रेरे'च्या अंकाचं मुखपृष्ठ पहा, वाचणाऱ्या दोन मुली दिसतात. त्यातून शांत, (बुढ्ढा) पोक्तपणा डोकावतो. त्यातले रंगही तसे फिकट, मातकट, किंचित पेस्टल प्रकारचे, शांत आहेत.
मिसळपावचा दिवाळी अंक फटाक्यांसारखा, उत्साहाने फसफसणारा असतो/असेल असं वाटतं का गपचूप, घरात लोळत पुस्तकं वाचणाऱ्यांतला असतो/असेल असं वाटतं?
8 Nov 2015 - 9:18 pm | चांदणे संदीप
म्हणजे बगा ते आपले प्रसिद्ध हंगल नाहीत का? ते माझ्यानंतरच्या पाचव्या भावाच्या वर्गातल्या मित्राच्या लहान बहीणीच्या मैत्रीणीच्या आतेभावाच्या लहान भावाच्या सोबत असलेल्या विडी कामगार युनियन संघाच्या अध्यक्षांचे मुलगे होत.
आता माझे वय सांगायची गरज नसावी!
Sandy (तसा मी अज्जून्न ल्हानैच्च!)
8 Nov 2015 - 9:22 pm | माम्लेदारचा पन्खा
(जी अजून उघड व्हायची बाकी आहे)....
गतवर्षीच्या अनुभवावरून आगामी अंकाचे सरसकटीकरण हा विषय नक्कीच दखलपात्र होऊ शकला असता पण
ह्याची चर्चा आल्यामुळे निर्धास्त झालोय.... रंगीत चित्रांपलीकडे काहीही न छापणार्या वृत्तपत्राची अशी बातमी किती जण वाचतील ही शंकाच आहे !!
8 Nov 2015 - 9:22 pm | मित्रहो
पैसे दिले तर दर्जा सुधारतो, आमच्या ज्ञानात अमूल्य भर पडली.
दुसरे म्हणजे जे ना-वाजलेले असत ते दर्जेदार असत.
पीचइ, झुकेरबर्ग बघताय ना, मोदी उगाचच म्हणत नाही Next Big thing is in India.
तुम्हाला किती पाहीजे, करुन देऊ.
8 Nov 2015 - 9:32 pm | जेपी
टक्या म्हणुन गेलाय,
Age is just a number
8 Nov 2015 - 9:36 pm | राजेश घासकडवी
च्यायला, वय कमी आहे असं म्हटल्याबद्दल तक्रार करतोय परा! भेंडी आपण तर सगळ्यांना आपण कॉलेजकुमार असल्याचंच सांगतो. फेसबुकचा प्रोफाइल पिक बदलण्याची लोक अहमहमिका बाळगतात. दर वेळी बदलला की साला 'मस्त, हॅंडसम हां, एकदम ष्टाइलमध्ये...' असे मेसेजेस पुर्षांना तर 'अय्या कित्ती गोड, सो स्वीट, काय सुंदर दिसत्येस गं - जळजळ, सुंदर' असे मेसेज बायकांना पडतात. पडतात म्हणजे खचच पडतो त्यांचा. पण या सगळ्या फुकटच्या प्रसिद्धीकडे पाठ फिरवून आपण गेली सहा वर्षं तोच फोटो ठेवलाय! का, तर आपलं वय वाढलंच नाही असा भास निर्माण करायला.
आणि हा परा लहान म्हटल्यावर खवळतोय! कोणाला कशाचं आन् कोणाला कशाचं!
8 Nov 2015 - 9:42 pm | कंजूस
मटा संवादमधला तो लेख इथे वाचा.
लेखकाचे नाव दिसत नाही.
8 Nov 2015 - 10:01 pm | चतुरंग
अंकाचं संपादन, प्रमाणभाषा वगैरेंबद्दलच्या कॉमेंट्स उथळ वाटल्या विशेषतः नवीन अंक अजून आला नसताना तर अवेळी केल्यासारख्या.
वाचकांच्या वयाबाबतचा अंदाजही असाच पोरकट आहे. तसेही ई-दिवाळी अंकाच्या वाचकांचे सरासरी वय हे कागदी अंकांच्या वाचकांच्या सरासरी वयापेक्षा कमी असण्याची शक्यता बरीच जास्त आहे कारण हे माध्यम हाताळण्यातला त्यांचा आत्मविश्वास, सवय इ.
एकूण दिवाळी अंकांचे संपादन हे यथातथाच असते हा शेराही अनावश्यक वाटला.
अनाहिताच्या रुची अंकाकडे बघून यथातथा संपादनातून हे काम होऊ शकेल असे नक्कीच नाही इतके कोणीही सांगू शकेल.
तेव्हा लेख लिहून त्यात ऐसीअक्षरे आणि रेषेवरची अक्षरे या संस्थळांची जाहिरात करण्यामागचा हेतू लक्षात न येण्याइतके मिपावाचकांचे वय कमी नाही इतके लक्षात घेतले तरी पुरे! :)
(बालके)रंगा
8 Nov 2015 - 10:57 pm | जव्हेरगंज
ऐसीअक्षरे आणि रेषेवरची अक्षरे या संस्थळांची जाहिरात करण्यामागचा हेतू लक्षात न येण्याइतके मिपावाचकांचे वय कमी नाही इतके लक्षात घेतले तरी पुरे! :)>>>>>>>>>>>
सो क्लॉऊडतै
8 Nov 2015 - 11:44 pm | बॅटमॅन
अंक न वाचता जुन्या प्रतिमेवर आधारित लेखन केल्यासारखे वाटले. वर गवि म्हणतात तसे ते प्राध्यापक येरकुंडकरांच्या भाषणाची आठवण आली.
9 Nov 2015 - 2:00 pm | गवि
येरकुंडकरांचं भाषण नव्हे रे मेल्या. भांबुर्डेकरांचं भाषण.
सत्कार येरकुंडकरांचा..
ते सरदार पंचपात्रीकरांच्या वाड्यात ज्यांचे वडील आहारविभागात सेवक होते नाही का?.. ते..
किंवा शिक्षणमंत्री ज्यांचे शाळूसोबती आहेत ते.
किंवा आता आरण्येश्वर कॉलनीतल्या प्रशस्त बंगल्यात तंगड्या पसरुन झोपाळ्यावर बसतात आणि रोज शिक्रण मटारउसळ खातात ते..
किंवा म्युन्सिपाल्टीच्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत (चि.) भांबुर्डेकरांना जे मास्तर शिकवायचे ते..
दिवस सुवर्ण नाही तरी जस्ती किंवा कथिलाक्षरांत कोरुन ठेवण्यास हरकत नाही. ;)
9 Nov 2015 - 2:03 pm | बॅटमॅन
हाहाहाहा रैट्ट.....गुरुवर्य येरकुंडकरांचा सत्कार म्हणजे विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार!!!! मित्रहो, ही घटना पुणे महानगराच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे. =)) =)) =))
9 Nov 2015 - 2:15 pm | टवाळ कार्टा
चक्क वाल्गुदस्वामी चूकले???? हिच्च घटना सोन्याच्या* अक्षरात लिहिण्यासारखी आहे
*खरे** सोने न मिळाल्यास सोन्या नावाच्या मुलाकडून लिहून घेण्यात यावे
**खरे म्हणजे खर्यांकडचे नव्हे...शुध्ध मराठीत पिव्वर :)
9 Nov 2015 - 2:17 pm | बॅटमॅन
गप्राव्रे =))
9 Nov 2015 - 2:55 pm | टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
9 Nov 2015 - 3:00 pm | नाखु
"सुवर्ण" संधी साधली तर !!!!
निरिक्षक नाखुस
चिमण हटेला गँग
8 Nov 2015 - 10:15 pm | सुबोध खरे
"मिपा च्या उलट "उपक्रम डॉट ऑर्ग" चा अंक उत्तम पण २०१२ नंतर बंद पडला."
याचा अर्थच हा आहे कि मिपा प्रवाही आहे आणि जास्तीत जास्त ज्ञान देण्याच्या प्रयत्न करणारे बंद पडले.
ज्ञानासाठी दिवाळी अंक का वाचावे? गुगल कशासाठी आहे?
ललित साहित्य हे कमी दर्जाचे मानणारे दुद्धाचार्य कमी नाहीत. त्यांची मते त्यांच्यापाशी.
कोणी आपल्या पाठीमागे "कानगोष्टी करतो आहे याचा अर्थच मी त्याच्या पुढे आहे" हे मानणारा मी आहे.
बाकी आम्ही तरुण आहोत हे ऐकून आनंदच झाला.
हाथी चलत अपनी चाल
कुत्ता भुकत हो तो भूकवा दे
8 Nov 2015 - 10:19 pm | चिंतामणी
परा
लगे रहो.
8 Nov 2015 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या रुमाल टाकून ठेवतो. :)
-दिलीप बिरुटे
(तरुण, [वाचनवयही तरुण] हौशी, स्मार्ट, आणि देखणा कट्टर मिपाकर ) ;)
8 Nov 2015 - 10:45 pm | सायकलस्वार
मिपाच्या अंकातली मिसळ कशी का असेना निदान ताजी तरी असते.
तिकडे 'वेशीवरची लक्तरे' नावाच्या अंकात मेजवानी देत असल्याचा आव आणून कधीच्या उष्ट्या पत्रावळीच वाढल्या आहेत.
8 Nov 2015 - 11:16 pm | जव्हेरगंज
तिकडे 'वेशीवरची लक्तरे' नावाच्या>>>>>>
10 Nov 2015 - 9:59 am | अत्रुप्त आत्मा
'वेशीवरची लक्तरे'
8 Nov 2015 - 10:45 pm | पैसा
म्हणजे मिपा फेसबुकच्या लैनीत बसते काय?
हे वाचले त्यावरून ताईंनी आधीचे अंक वाचले नसावेत असा निष्कर्ष बहुधा काढता येईल. श्री सुधांशु नूलकर हे प्रशिक्षित आणि अनेक छापील दिवाळी अंक तसेच पुस्तके, माहितीकोष यांचा अतिशय विस्तृत अनुभव असलेले मुद्रितशोधक स्वतःच्या घरचा अंक असल्यासारखे अगदी मनापासून मेहनतीने गेली तीन वर्षे मिपा दिवाळी अंकातील लेखांचे मुद्रितशोधनाचे काम जवळपास एकट्याने करत आहेत. त्यांनी हे काम या वर्षीही तसेच केले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी आहोत. आजपर्यंत मिपा दिवाळी अंकात काही खूप चुका असल्याचे कोणी निदर्शनाला आणून दिलेले नाही.
8 Nov 2015 - 11:00 pm | मुक्त विहारि
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/online-diwali-issue/a...
मिपाकरांचे वय कमी आहे, हे वाचून फार आनंद झाला.
कारण, कमी वयाचे बालक जास्त आनंदी, समाधानी आणि निर्मळ असते.
ह्या बाललीला कुणाला खोडकर वाटणे साहजीकच आहे.
(अज्ञानी आणि मिपाकरांच्या सानिध्यात समाधानी) बालक मुवि
8 Nov 2015 - 11:04 pm | याॅर्कर
हे पन्नाशीच्या,किंवा निदान चाळीशीच्या तरी पलीकडे आहेत हे मी खात्रीलायक सांगू शकतो.
8 Nov 2015 - 11:10 pm | मुक्त विहारि
गहनविचारी पंथातले दिसता....
8 Nov 2015 - 11:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
नै हो... अजून यौवनात मी ;) =))
8 Nov 2015 - 11:18 pm | मुक्त विहारि
+१
8 Nov 2015 - 11:23 pm | पियुशा
यॉर्कर दादा मी लहान आहे हो;=)
8 Nov 2015 - 11:33 pm | मुक्त विहारि
सगळेच मिपाकर वयाने लहान आहेत, हे एकदा मेघना ताईंनी सांगीतल्या नंतर आणि मटा सारख्या मित्राने, ते छापल्या नंतर, मिपाकर लहान आहेत हे मिपाकरांनी कशाला सांगायला पाहिजे?
9 Nov 2015 - 12:02 pm | टवाळ कार्टा
हे तू सांगित्ले नैस तरी सम्जते =))
9 Nov 2015 - 1:44 pm | याॅर्कर
याॅर्करदादा
--→बस्स कर ना पगली, अब बच्चे को रूलाएगी क्या?
8 Nov 2015 - 11:45 pm | वगिश
+२८ वय आहे. आधी खांडेकर मग वपु मग सावंत मग पुल मग कॉमिक्स मग मिपा असा प्रवास केला आहे मी.
8 Nov 2015 - 11:47 pm | एस
मागे या विषयावर संबंधितांशी जी चर्चा घडली होती त्याचे स्मरण करून देण्यासाठी खालील वाक्य लिहीत आहे -
"स्वतःची रेष मोठी करण्यासाठी दुसर्याची रेघ पुसण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही खुजे ठरता."
बाकी याविषयी मला काय म्हणावयाचे आहे हे संबंधितांपर्यंत नक्कीच पोहोचले असणार याची खात्री आहे. तेव्हढे सर्वच संबंधित सूज्ञ आहेत. तस्मात्, इत्यलम्.
9 Nov 2015 - 12:10 am | प्रचेतस
मिपाचा दिवाळी अंक किमान भाडोत्री लेखकांकडून लिहवून घेतला नाही ह्याचे नक्कीच समाधान आहे.
9 Nov 2015 - 12:18 am | लालगरूड
20 वर्षे
9 Nov 2015 - 12:21 am | कंजूस
चाळीस कमी ( शंभराला ).
चांगला लेखक म्हणजे काय हे ठरले की चांगले लेखन कोणते हे ठरवता येईल.
इतिहासकार राजवाडे म्हणतात- वाईत सापडलेल्या सामान्य लोकांच्या जमाखर्च नोंदी अस्सल निघाल्या आणि बखरिवर विश्वास ठेवता येत नाही कारण तो खाल्ल्या मिठाला जागून लिहिलेला खोटा स्तुतिपर इतिहास असतो.बाकी त्या संस्थळांचीच पाने चाळून पाहा काय चाल्लंय ते.बाकी पाडगावकरांनीही लिज्जत पापडाच्या प्रमोशनसाठी पावसाची कविता लिहीली होती हे ते मिश्किल हसत सांगतात.
9 Nov 2015 - 12:27 am | सर्वसाक्षी
मेघना भुस्कुटे यांनी पाहुणे संपादक म्हणुन मिपावर 'व्यायामाचे महत्व' असा काहीसा संपादकीय लेख लिहीला असल्याचे आठवते.
9 Nov 2015 - 9:15 am | अजया
मिपाला कायम यौवनात ठेवणार्या सदस्यांना सलाम.उगा जडबुध्दीचे म्हातारे चष्मे मिपाला नाहीत ही किती आनंदाची गोष्ट आहे.मिपाच्या वाढत्या आयुष्याप्रमाणे वय कमी होत जातंय! मिपा राॅक्स! !
रच्याकने- मिपावरच्या गोंधळाला मिपाच्या तारूण्यपीटिका म्हणता येईल का!तारुण्यात यायच्याच!!
9 Nov 2015 - 9:21 am | नाखु
वसुबारसेचे महत्व आणि आपली संस्कृती
नेमकीआदल्या दिवशी वसुबारस आणि "गाईंना" ओवाळणी झाली. तस आपल्या संस्कृतीत गाय आदी पशुधनाचं महत्व फार आहे. पण कधी कधी गाइअईही भाकड होतात शेतकर्यांना त्या पोसणे अवघड होऊन बसते. त्या मानाने कुत्री-मांजरे बरी असे आमचे हे म्हणतात असे असे माईंचे म्हणणे .
कुत्रे किंवा मांजर शक्यतो स्वतः पाळलेले नसावे उगा लळा लागतो. शेजार्याचे असेल तर उत्तम कुत्रे त्याच्या घराबरोबर आपल्याही घराची राखण करते की नाही.आणि मांजर उंदीर खाताना या घरातला-मालकाचा-दुस्र्याचा असा भेदभाव करीत नाही.
आमच्या काकूंचा कुत्रा फार धीट आहे. तो बाहेरच्यांनाच काय घरातल्यांनाही चावायला मागे पुढे पहात नाही,त्याचा आवाज ही आम्च्या गल्लीची खासीयत आहे. अवेळीच काय दिवसाही घरचा मालकही ह्याला मोकळा सोडलेला असेल तर जीव मुठीत धरून्च घरात येतो तेथे चोर यायची काय बिशाद !.त्यांची मांजरही फार मजेशीर आहे अगदी नेमाने तीच्या मित्रांबरोबर पार्कींह्ग मध्ये नाहीएतर गच्चीवर दंगा करते तेव्हढाच पोरा टोरांना विरंगुळा.त्यांनी पाळलेल्या पोपटाबद्दल मी काय बोलावे अगदी फर्मास वाणी हो त्याची. आणि मैना,बुलबुल,काका कुवा यांची मिजास तर काही औरच.म्हणून्च काकू मला फार आवडतात.
त्यात मैना मला दिसले की लगेच म्हणतेही ये शोभ्णा बैसना !!! मीही त्यांच्याकडे जातेच काकूही मला अगदी आवर्जून खाऊ देतात आणि सांगतात की अशीच आमच्या प्राणी संचयाची तारीफ करीत जा हो, तुला आणखी खाऊ देईन.
शोभे ना बसुकुठे
आता पहिली गोष्टः आमचे वयाबाबत बरीच मतमतांतरे आहेत्,जालावर काही जण काका,काही जण आजोबा,घरचे घोड्या तर शालेय मित्र भुस्नळ्या ,बैला वगैरे संबोधतात यावर आम्ही नक्की काय वयाचे याचा अंदाज येत असेल तर पहा.
10 Nov 2015 - 10:20 pm | सामान्य वाचक
नेमके आणि विषयाला धरून
10 Nov 2015 - 11:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
इक्त मारु नै कुणाला ;) =)
सही लैच सही हाय :)
9 Nov 2015 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जुन्या दिवाळी अंकांच्या लिंका कुठे सापडतील?
9 Nov 2015 - 10:03 am | मनीषा
वय हा सगळ्यांचाच अतिशय जिव्हाळ्याचा , आणि बर्याच वेळा जिव्हारी लागणारा विषय आहे.
माझे मिपावय - (अंदाजे) ८ वर्षे
खरं खरं वय --( ७५ उणे काही वर्षे )
9 Nov 2015 - 11:05 am | मितान
म टा सारख्या अर्धमराठी दैनिकातील कुणा अती उत्साही काकूंच्या लेखावर एवढे संशोधनपर गंभीर ललित लेखन होताना पाहून काय म्हणतात ते... हां... ड्वाले पानावले =))
9 Nov 2015 - 12:42 pm | खटपट्या
काहीही या ताईंचं. म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधी ते कसे असेल त्याचा स्वभाव कसा असेल वगैरे चालू आहे. बाळाचे आइ वडील खूपच तरुण असतील, बाळाचे मित्रही बरेच तरुण असतील. बाळ धीरगंभीर चर्चा करणार नाही फक्त खेळणार...
हायला बाळ आमचं, खेळवणार आम्ही, शी शू सगळं करणार आम्ही. यांना काय पडलीय? नका येउ बारशाला..
9 Nov 2015 - 1:19 pm | ऋषिकेश
तुम्ही कोणत्या लेखाबद्दल हा धागा काढलाय? लेखाचा दुवा मिळेल का?
या वर्षीच्या दिवाळी अंकावर लेख होता? कुठे बरं?
9 Nov 2015 - 1:23 pm | ऋषिकेश
सॉरी दुवा मिल्ळाला.
मला तर तो लेख आवडला. प्रतिसाद देणार्यांपैकी किती जणांनी तो लेख वाचला अशी शंका आली.
एकुणच जालावरील उपलब्ध अंकांबद्दल माहित नाही अशा वाचकांना त्याबद्दल माहिती करून देण्यासाठी उत्तम धांडोळा आहे. यावर्षीच्या अंकांचे परिक्षण नैये कै ते! उगाच काय हो दिवाळीच्या टेपा उडवायच्या असे धागे काढून! ;)
9 Nov 2015 - 1:30 pm | बॅटमॅन
हा प्रतिसाद म्हणजे हा लेख आणि इथले प्रतिसाद नक्की कशाबद्दल आहेत याची गल्लत झाल्याचे उत्तम उदाहरण आहे. चालायचेच.
9 Nov 2015 - 1:50 pm | ऋषिकेश
असेल बॉ! चालायचेच!
9 Nov 2015 - 1:54 pm | गणपा
आमचे वय..... कुणाला फाट्यावर मारायचे ते बरोब्बर ओळखता येण्या येवढे आहे. ;)
9 Nov 2015 - 9:23 pm | नूतन सावंत
मिपा वय- सहा वर्षे.खरे वय मिपा वाचायला लागल्यापासून कमीच होतंय.
9 Nov 2015 - 9:55 pm | सूड
कोण हया मेघनाबै? आणि कोणी का असेनात, अंक प्रसिद्ध होण्याआधीच टाकलेल्या पिंका बघून कवतिक करावं तितकं कमीच आहे.
10 Nov 2015 - 9:48 am | मेघना भुस्कुटे
काय रे बाबा! धड कौतुकही घेता यैना, हे बघून करमणूक झाली! बाकी 'रुची' विशेषांकावर धडधडीत 'रूची' असं लिहिलंय ते पाहिलं नि तरी लेख लिहिताना कर्सर मागे नेला, की बॉ, आपल्याच मंडळींची चारचौघांत शोभा नको... ते बरीक चुकलंच. बाकी चालू द्या! हॅप्पी दिवाळी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10 Nov 2015 - 8:30 pm | मांत्रिक
एक क्षुल्लक चूक असेल झालं. त्याचा एवढा भुस्सा कशापाई पाडताय? कोणतीही कमर्शियल मदत न घेता, वैयक्तिक प्राॅफिट न बघता केवळ मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनाचेच कार्य करताहेत ना? मग का उगाच छिद्रान्वेषीपणा?
10 Nov 2015 - 9:23 pm | स्रुजा
रुची आणि रूची वरुन तुम्ही शोभा करणार होतात ? ___/\___
मटा चा उपयोग आज काल या अशा लेखांसाठी होतो म्हणायचा !! बाकी काही नाही तरी अशामुळे मटाची रीडरशीप कमी होईल.
10 Nov 2015 - 5:12 pm | कवितानागेश
हा वयाचा विदा गोळा करून तुम्ही पुढे त्याचे काय करणार?
10 Nov 2015 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकायच्या आहेत असं मी मटात वाचलं.
-दिलीप बिरुटे
11 Nov 2015 - 12:23 am | कवितानागेश
मग ठिकेय!
परा, मी तुझ्या पेक्षा मोठीये रे. :)
10 Nov 2015 - 9:32 pm | सागरकदम
निम्मे मिपाकर आपले खरे वय सांगणार नाहीत ,बाकी समजून घ्या नाहीतर पोगो बघा
25 Nov 2015 - 5:36 pm | पर्नल नेने मराठे
गेले एनेक वर्हे १६
25 Nov 2015 - 6:22 pm | निराकार गाढव
ते सगळं ठीक आहे. पण या मेघनाचं वय काय आहे म्हणालास, राजकुमारा?

25 Nov 2015 - 8:03 pm | बॅटमॅन
ते वयबीय जाऊदे गाढवाच्या...अर्रर्रर्र स्वारी बरंका निराकारजी गाढवजी.
तुम्हांला इथे पाहून किती आनंद झाला ते एक तुमचे गुरुवर्यच जाणोत. येऊद्यात अता अजून काही खंग्री गोष्टी. _/\_
26 Nov 2015 - 11:55 am | अरिंजय
मुळातच स्वयंघोषीत स्टँडर्ड वगैरे असणारे 'मटा', 'सत्ता' वगैरे हे फक्त महानगरांमधील तथाकथित उच्च वगैरे वर्गा पुरते मर्यादीत आहेत. ते त्यांच्या विचारसरणी ने चालतात, चालु द्यावे. विझणारे दिवे विझु द्यावे, त्यात उगाच तेल टाकु नये.
"मिपा" सर्वसामान्य मराठी माणसाच्या 'खिशात' असणारे मुक्त व्यासपिठ आहे. मराठी भाषेचे, विचारांचे 'स्टॅन्डर्ड' आपण ठरवणार, ते नाही.
वयाबद्दल विचाराल तर शारिरीक वयाचे माहीत नाही पण मानसीक वय मात्र विशी - पंचविशीचे आहे. म्हणुनच "मिपा" वर उत्साह ओसंडुन वाहतो. त्याचेच प्रतिबिंब इथल्या लेखांमध्ये, प्रतिक्रियांमध्ये आणि भाषेमध्ये दिसुन येतो.
असो. जास्त काथ्याकुट नको. "मिपा" जसा आहे तसा आम्हाला आवडतो व असाच रहावा. चिरतरुण.
1 Dec 2015 - 11:28 am | नाखु
अट्टाहास
खरे रंग
बाकी चालू द्या....
1 Dec 2015 - 12:07 pm | चांदणे संदीप
हे भारीये!
1 Dec 2015 - 12:11 pm | अनुप ढेरे
धन्यवाद. छान लेख आहे!