सुमारे २ वर्षापूर्वी झी मराठीवर "होणार सून…" हि मालिका सुरु झाली. त्यातील वर्तमान घडामोडीं या काहीशा अचंबित करणाऱ्या वाटल्या आणि मनात घोळत राहिल्या. त्यातच भारतीय तसेच अन्य पुराणे यातील काही कथा वाचण्याचा वा हिस्ट्री अथवा दूरदर्शन वरील मालिकात पाहण्याचा योग येउन गेलेला. आणि अलीकडेच youtube वर crash course biology ची सिरीज पहिली. आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे -
१. ४ वर्षाचे गरोदरपण अथवा pregnancy cycle अस्तित्वात असावे.
२. पुराणातील एक कथा अशा प्रकारची असल्याचे दूरदर्शन वरील कोणत्याशा मालिकेत दाखवल्याचे अंधुकसे आठवते. "जान्हवी" हि त्या कथेतील महिलेचा अंशावतार असावी .
३. प्रत्येक संस्कृतीत अनेक पुराण कथा असतात. त्यावर आधारित अनेक मालिका निघतात व निर्माता/दिग्दर्शक त्यात कायपण कथा घुसडतात.
४. मालिकेमध्ये ज्याप्रमाणे श्री-जान्हवी आणि परिवारावर एकावर एक संकटे येतात, प्रश्न निर्माण होतात, त्यावरून श्रावणातील अनेक कथांची आठवण होते.
५. मालिकेमध्ये अनेक ठिकाणी "काहीही हां श्री" असा उल्लेख येतो. हा उल्लेख 'श्री' ची अतितीव्र विनोदबुद्धी व जान्हवीचा निरागस स्वभाव याचा परिपाक असावा. या उल्लेखांमुळे दर्शकांची WA वर विनोदी संदेश पाठवण्याची ईच्छाशक्ती वाढीस लागते व अशी व्यक्ती त्या-त्या ग्रुप वर "काहीही हा (व्यक्तीचे नाव)" अशी दाद मिळण्यास पात्र होते.
६. मालिकेत जरी जान्हावीचे वडील गुडघ्यांना तेल लावतात, बऱ्याच अंशी कला पुढे मान नाईलाजाने तुकवत असतात. पिंट्या देखील बंडखोरी करण्याचा प्रयत्न करत असला तरी कलापुढे बऱ्याच अंशी त्याचे काही चालत नाही. किंबहुना कलासारख्या बेरकी स्त्री पात्रांमुळेच भारतीय मालिका जगतातील अनेक मालिका वर्षानुवर्षे चालवणे शक्य होते.
७. In short, Our daily soaps are co-source of various funny WA forwards. भारतीय दूरदर्शन-मालिकांतील अनेक मुल्ये आणि ट्यार्पीशिद्धांत यांना सिद्ध करणारी हि मालिका आहे असे माझे मत बनले.
आपणास काय वाटते ?
प्रतिक्रिया
5 Nov 2015 - 1:34 pm | जातवेद
का बघता?
5 Nov 2015 - 1:40 pm | कपिलमुनी
मिपाचे माबोकरण होत आहे काय ?
5 Nov 2015 - 2:47 pm | नाखु
प्रश्न आहे का वैधानीक इशारा !!!
5 Nov 2015 - 1:42 pm | चित्रगुप्त
ही जान्हवी कोण ?
5 Nov 2015 - 1:43 pm | याॅर्कर
आणि आता
.
.
खीक्क
5 Nov 2015 - 1:46 pm | एस
तिकडचा प्रतिसाद इथे कॉपीपेस्ट समजावा! (सहमती या अर्थाने!)
5 Nov 2015 - 3:10 pm | होबासराव
चिनार ने एक छान धागा काढला होता ह्याच विषयावर :)
5 Nov 2015 - 3:13 pm | मोदक
ओ दादानू.. कशाला असल्या गोष्टींवर वेळ वाया घालवताय? तायक्वांदो / किक बॉक्सींगवर एखादा झकास लेख लिहा की.
5 Nov 2015 - 4:26 pm | मित्रहो
जान्हवीचे नांव ग्रिनीज बुकात नोंदले गेल्याचे कालच वाचले, (कशासाठी हे सांगायला नको) त्यासाठी तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. मधल्या काळात काही हं श्री चे टुकार विनोद वाचून ज्यांनी ज्यांनी आपल्या नावापुढे श्री लावणे बंद केले होेते ते आता परत अभिमानाने श्री लावायला लागले आहेत. रामानंद सागरच्या रामायणातील रावणानेही श्री मत कहो उसे च्या ऐवजी कौन है श्री असे विचारले म्हणतात. बातमी आता प्राण्यांपर्यंत पोहचली असून अप्पूघरातील हत्तींनी तातडीने सभा बोलविली आहे.इतके सारे होत असताना आपण टीआरपीच्या नावाने का रडायचे.
दोनच दिवसापूर्वी अॅनी हॉलविषयी लिहिले होते. त्यात एक वाक्य होते कॅलिफोर्नियात ते कचरा बाहेर फेकत नाहीत तर त्याचा टिव्ही शो करतात. जग इतके पुढे जात असताना आम्ही कशाला मागे राहायचे. हम किसीसे कम नही. कचऱ्यातून कला म्हणतात ती हीच, हल्ली तर शाळेतच त्याचे प्रोजेक्ट वगेरे असातात.
5 Nov 2015 - 4:36 pm | म्हसोबा
लोकांना कळालेलं नाही. हा टुकार लेख बहुतेक Inception , स्वर्ग आणि अध्यात्म या अतिशय उच्च पातळीवरच्या विचारांच्या लेखाचे विडंबन आहे.
स्वतःला काही चांगले लिहिता आले नाही की लोक असली टुकार विडंबने पाडतात.
5 Nov 2015 - 7:51 pm | परिकथेतील राजकुमार
हे शब्द तुमचे आहेत का ज्ञानदेवांचे?
5 Nov 2015 - 8:35 pm | याॅर्कर
परत तेच→→खी खी खी.
7 Nov 2015 - 3:15 am | रमेश आठवले
---१. ४ वर्षाचे गरोदरपण अथवा pregnancy cycle अस्तित्वात असावे.---
हे शक्य असावे.
पाकिस्तानात पाकिस्तान पीपल्स पार्टी (ppp) या पक्षाच्या बेनाझीर भुत्तो या त्यांच्या अंता पर्यंत अध्यक्ष होत्या . त्या दोन वेळा तेथी वझीर ए आझम ही झाल्या होत्या. या कार्यकालात त्या सारख्या गरोदर रहात असत. त्यामुळे ppp या पक्ष नावाचा सविस्तर उच्चार तेथे permanently pregnant president असा होऊ लागला होता.
7 Nov 2015 - 10:34 am | उगा काहितरीच
मिपावरपण या मालिकेची चर्चा होत आहे , यातच या मालिकेचे यश आहे . एवढे बोलून मी माझे दोन वाक्ये संपवतो. जय झीमराठी ! जय मिपा !!