हात-पाय तोडले पाहिजेत!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
15 Jan 2008 - 3:22 pm
गाभा: 

मुंबईतील जुहू भागात नववर्षदिनाच्या जल्लोषात मुलींचा विनयभंग झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना नुकतीच घडली. योगायोगाने तिथे उपस्थित असलेल्या, हिंदुस्तान टाईमस च्या सतीश बाठे आणि प्रसाद गोरी या दोन पत्रकारांनी झाल्या प्रकाराची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणि हिंटा मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली. या छायाचित्रात आरोपींचे चेहेरेही स्पष्ट दिसत आहेत.

थोरल्या आबासाहेबांच्या राज्यात, मुंबईसारख्या स्त्रियांकरता सुरक्षित समजल्या जाणार्‍या शहरात अशी घटना घडते ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. मुंबईसारख्या शहरात ही स्थिती तर खेडोपाडी काय परिस्थिती असेल? स्त्रियांच्या विनयभंगाची/बलात्काराची सगळीच काही प्रकरणं पुढे येत असतील असंही नव्हे!

नववर्षाचा जल्लोश, त्यात मुलामुलींची थोडीफार जवानीतली थट्टामस्करी समजण्यासारखी आहे. परंतु भररस्त्यात मुलींचे कपडे फाडण्यापर्यंत जर कुणाची मजल गेली असेल/जात असेल तर अश्या आरोपींचे हातपाय तोडले पाहिजेत किंवा त्यांचे लिंग जाहीरपणे कापून टाकले पाहिजे असे माझे मत आहे. आपले मत काय?

तात्या.

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

15 Jan 2008 - 3:32 pm | धमाल मुलगा

तात्या, मी तुमच्या मताशी १००% सहमत आहे.

एकदा अशी जबरी शिक्षा झाल्याशिवाय हे लि॑गपिसाट सरळ होणार नाहीत.
आणि तो, "स्वच्छ पा॑ढर्‍याशुभ्र" कपड्या॑तला सैतान पाहा जरा कसा विकृत आन॑द ओसा॑डून वाहतोय त्याच्या तो॑डावरून.

आखाती देशात असल्या शिक्षा असतात अस॑ ऐकलय. राजा॑नी जशी कोपरापासून हात कलम करायची शिक्षा दिली होती तस॑ करायला हव॑.

विकि's picture

18 Jan 2008 - 5:28 pm | विकि

ज्या पुरोगामी म्हणुन मिरवणार्‍या महाराष्ट्रात हा प्रकार घडला त्या प्रकाराचा सर्वप्रथम निषेध.
झाला प्रकार निंदनीय असला तरी मानसशास्राच्या हिशेबाने इथे पहाणे उचित ठरेल. जिथे हा प्रसंग घडला तिथे त्या युगुलाचे शारीरीक(लैंगिक) चाळे सुरू होते असे ऐकावयास आले आहे. ते पाहून जमावाचा तोल गेला असेल असे दिसते (३१ डिसेंबर दारू प्यायल्यामुळे अधिकच)
माणसात लैंगिंक विकृती का येते ते कळत नाही.वासनेवर खरोखरच इलाज नाही आहे का?अश्या लैंगिक प्रकृतीने पछाडलेल्या व्यक्ती भावनात्मकदृष्ट्या अपरीपकव असतात. साधारण १५ ते २२ वयोगटातील मुलांना (वयोगट वाढूही शकतो) सेक्सबाबत फार आकर्षण असते.त्यातून असे प्रकार घडतात. यावर उपाय काय, हातपाय तोडणे हे नक्कीच नाही.कायदा कठोर केला पाहीजे.
आणि आपण यावर उपाय शोधला पाहीजे.
आपला
कॉ.विकि

बहुरंगी's picture

15 Jan 2008 - 3:57 pm | बहुरंगी

नव वर्षाच्या दिनी झालेली घटना अतिशय लाजिरवाणी होती. या वरुन बाहेरील जगताचे मुंबई बद्दल मत अजुन खराब झाले असेल तर त्यात नवल ते काय. २४ तास जागे असलेले शहर असा ज्या नगरीचा आवर्जुन उल्लेख होतो त्या नगरी मध्ये अशी विकृत घटना घडणे या वरुन आणि त्या नंतर झालेले वाद, संवाद, प्रतिक्रिया बघता हि नगरी किती असुरक्षित आहे याची जाणिव होते.
पोलिसांची बघ्याची भुमिका, न्याय संस्थेमधिल त्रुटी, राजकीय हस्तक्षेप या मुळे या विकृत मानसिकतेला खतपाणी घालण्याचे काम चोख बजावले जाते. या साठी सर्वसामान्य जनतेनेच ठोस (क) पावले उचलणे गरजेचे आहे. पण कसे ??? मोठा प्रश्न आहे. कारण सध्या, आरोपीला शिक्षा न होता निरपराधांनाच वेठीस धरले जाते.
आपला,
बहुरंगी मिसळे

सहज's picture

15 Jan 2008 - 4:15 pm | सहज

अशी लैंगीक हिंसा, लहान मुलांना हिंसक इजा करणार्‍यांना तसेच रंगे हाथ व अत्यंत सबळ पुरावा असलेल्यांना दुसर्‍या दिवशी अशी जाहीर चौकात शिक्षा करायची वेळ हीच आहे.

i m god's picture

15 Jan 2008 - 4:40 pm | i m god

आजकाल काही भरंवसा उरला नाहीये....उद्या कदाचित हे सगळे त्या वर्तमानपत्राचे घडवून आणलेले स्टिंग म्हणूनही बाहेर येईल.

बरे हे असे फोटोज छापून काय साधले त्यांनी - स्वतःचा खप वाढवला नी त्यासाठी त्या दोन मुलींच्या नी त्यांच्या मित्रांच्या सोशल लाईफ शी खेळलेच ना ते.. नुसते चेहर-या भोवती धुसर करून काही होते का .. जे त्या मुलींना ओळखतात ते सहज ओळखणारच की त्यांना आता किमान सहा महिने तरी त्या मुलींना अशा लोकांच्या कुत्सित नी भोचक नजरांचा सामना करावा लागणार.

सुनील's picture

15 Jan 2008 - 7:03 pm | सुनील

मुंबईत अशी घटना घडावी याचे एक मुंबईकर म्हणून लाज वाटते.

दीड कोटींच्या शहरात काही हजार पोलीस सर्वत्र नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. मला आश्चर्य वाटते ते इतर बघ्यांचे! कुणालाच कसे वाटले नाही की त्या मुलींच्या मदतीला जावे?

त्या वार्ताहरांनी फोटो काढले म्हणून काही जणांना अटक तरी करता आली. ते जर नसते तर?

हात-पाय तोडण्याच्या शिक्षा पाश्चिमात्य देशांत आहेत? तेथे असे प्रकार का होत नाहीत? याचा नीट अभ्यास झाला पाहिजे.

मध्ययुगीन कायदे आणून परिस्थिती बदलणार नाही तर, आहेत त्याच कायद्यांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तरी पुष्कळ काही साध्य होईल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

15 Jan 2008 - 8:04 pm | ऋषिकेश

ही बाब लाजिरवाणी आणि पाशवी आहे याबद्दल सहमत!

>>: त्या वार्ताहरांनी फोटो काढले म्हणून काही जणांना अटक तरी करता आली. ते जर नसते तर?
खरंतर त्या वार्ताहरांनाही सौम्य शिक्षा झाली पाहिजे/समज दिलि गेलि पाहिजे असे माझे मत आहे. समोर काहितरी घडतेय ते रोखायचे सोडून फोटो काय काढत बसता? ते नागरीक आधी आणि वार्ताहर नंतर आहेत!

>>हात-पाय तोडण्याच्या शिक्षा पाश्चिमात्य देशांत आहेत? तेथे असे प्रकार का होत नाहीत?
इथेही असे प्रकार सर्रास होतात व कोणताही देश विनयभंग रोखु शकला आहे असे वाटत नाहि. हि विकृती जगात आहे!

असो.
या पाशवी कृत्य करणार्‍यांचा निषेधकरावा तितका कमीच आहे. या प्रकरणात "निष्पक्ष चौकशी" होऊन या नराधमांस कायद्याने शक्य असलेली सर्वोच्च शिक्षा व्हावी असे वाटते!

-ऋषिकेश

प्रकाश घाटपांडे's picture

17 Jan 2008 - 7:35 pm | प्रकाश घाटपांडे

<<खरंतर त्या वार्ताहरांनाही सौम्य शिक्षा झाली पाहिजे/समज दिलि गेलि पाहिजे असे माझे मत आहे. समोर काहितरी घडतेय ते रोखायचे सोडून फोटो काय काढत बसता? ते नागरीक आधी आणि वार्ताहर नंतर आहेत!>>

जमावाला 'धड' असते 'डोके' नसते. मला वाटते वार्ताहाराने आपले काम चोख बजावले आहे. वार्ताहार 'नागरिक' म्हणुन हे रोखू शकला असता काय ? त्याने तसा प्रयत्न केला असता तर तो वार्ताहार म्हणुन करु शकणारे कामही करु शकला नसता. त्याची असहायता लक्षात घ्या. त्याने काढलेले फोटो हे प्रायमाफेसी पुरावाच आहेत. हे जर त्याने काढले नसते तर त्या प्रसंगाला दस्ताऐवजात बंदिस्त करता आले नसते. या आधारे पोलिस स्वतः फिर्यादी होउन केस करु शकतात. त्यासाठी संबंधित स्त्री ची गरज नाही. अशा अनेक घटना घडतात पण त्याची नोंदच होत नाही. वार्ताहार हा काही सर्वशक्तिमान हिरो नव्हे. मूळ प्रश्न समाजमनाचा आहे. कामातुराणाम न भयं न लज्जा | समुहात 'वाहती गंगा आहे हात धुउन घ्या ' अशी मानसिकता तयार होते. मनुष्य मूलतः पशुच आहे. (जनुकिय शास्त्रानुसार देखिल) कुठलेही क्रौर्य समर्थनीय नाही. पण त्याची प्रेरणा ही नैसर्गिकच आहे. गुन्ह्याला प्रवृत्त करणारे अनेक घटक हे पोलिस खात्यच्या आवाक्यात नसतात.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

17 Jan 2008 - 7:53 pm | विसोबा खेचर

मला वाटते वार्ताहाराने आपले काम चोख बजावले आहे. वार्ताहार 'नागरिक' म्हणुन हे रोखू शकला असता काय ? त्याने तसा प्रयत्न केला असता तर तो वार्ताहार म्हणुन करु शकणारे कामही करु शकला नसता.

प्रकाशदादांशी सहमत आहे....

तात्या.

ऋषिकेश's picture

17 Jan 2008 - 8:44 pm | ऋषिकेश

वार्ताहार 'नागरिक' म्हणुन हे रोखू शकला असता काय ? त्याने तसा प्रयत्न केला असता तर तो वार्ताहार म्हणुन करु शकणारे कामही करु शकला नसता
हं! या प्रसंगात आपले म्हणणे योग्य आहे. मला पटले. माझी मागणी मागे घेतो :)

पण...
(थोडे अवांतर:)
हल्लीच्या काहि उतावीळ वार्ताहरांचा विचार करता हे प्रसंगावर ठरवावे. एक उदा. सांगतो. मधे एक स्त्री लोकल आणि स्टेशनच्या फटीत अडकून गेली. एक पत्रकार महाशय तिला मदतीचा हात द्यायचा सोडून छायाचित्रण करत बसला. या प्रसंगी मात्र, रेल्वे सुरक्षेतील त्रूटी उघड करण्यासाठी तिला वाचवण्यापेक्षा तिला मरतानाचे छायाचित्रण करणे हे त्याचे कर्तव्य होते असे वाटत नाहि.

असो.
-ऋषिकेश

राजे's picture

15 Jan 2008 - 8:42 pm | राजे (not verified)

हात पाय जरुर तोडा पण त्याच बरोबर असे का होत आहे आपले युवक असे हिंसक तथा व्यभिचारी का होत आहेत ह्याचा ही शोध घेतला पाहीजे, ह्या घटने नंतर देखील कमी कमी ३ अशा घटना घडल्या आहेत (हरियाना, राजस्थान तथा केरळ मध्ये) असे का होत असावे ह्याचा ही विचार करावा लागेल, ह्या मध्ये टीव्ही तसेच नव नवीन मालिकांचा तर हात नसावा ?
छायाचित्रे पाहू तर असे वाटत नाही की ही सर्व मंडळी अशिक्षित आहेत अथवा अनपढं आहेत पण हे राक्षस जरुर आहेत ह्यानां ना कानून व्यव्स्थेचे अथवा पोलिसांचे भय आहे... पण वर लिहल्याप्रमाणे त्यांच्या चेहरावर एक अतेरिकी आनंदाची छटा आहे असे का आहे ?

आजच चुकून मी पंजाब केसरीचा समाचार पत्र पाहीले तर दुस-याच पानावर एका युवकाचे मस्तकविरहित तुकडे तुकडे केलेले शरिर तर शेवटून दुस-या पानावर अर्धनग्न विदेशी अभिनेत्रीचे चित्र तसेच अजून काही विचित्र बातम्या हे काय आहे का आहे ? ह्याचा वाचक कोण आहे ? टिव्ही पाहा तेथे देखील ..दुरदर्शन सोबत सर्व-दर्शन चालू आहे का ? ह्याचा विचार करावा...

एक गोष्ट / अनुभव : काही दिवसापुर्वी एका जुन्या मित्राला भेटलो कमीत कमी ५ वर्षानंतर. पाच एक वर्षापुर्वी त्याने दिल्ली मध्ये एका मार्केट मध्ये कामसुत्र विषयक सीडी विकण्याचे दुकान चालू केले होते तेव्हा त्याच्याकडे एक स्कुटर होती व आज जेव्हा तो भेटला तेव्हा त्याच्याकडे दोन कार (एक तर सफारीफुल लोडेड) दोन दुकाने व स्वत:चे घर आहे... मी चाट पडलो व विचारले कोठून पैसा आणलास तर तो विचित्र हसत म्हणाला "अबे, सीडी अभी भी बेचता हूं"

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

ती फक्त विकृती असते.
नैतिकता जशी प्रत्येकाच्या मनात असते, तसेच प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात एक पशूही दडलेला असतो.
वेळ, काळ व संधी बघून तो डोकं वर काढत असतो. आपण करतो आहे ते वाईट की चांगलं ते प्रत्येकाला समजतं. मनावर जर बुद्धीचा आणी विवेकाचा ताबा असेल तर वाईट घडण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. एकवेळ अशिक्षित लोक हे करणार नाहीत पण सुशिक्षित करु शकतात हे आपण पाहतोच आहे. कारण सुशिक्षित आणी सुसंस्कृत ह्यात फार मोठा फरक आहे.

खरंतर त्या वार्ताहरांनाही सौम्य शिक्षा झाली पाहिजे/समज दिलि गेलि पाहिजे असे माझे मत आहे. समोर काहितरी घडतेय ते रोखायचे सोडून फोटो काय काढत बसता? ते नागरीक आधी आणि वार्ताहर नंतर आहेत!
ह्या ऋषिकेशच्या मताशी मी सहमत आहे. तुमची पहिली जबाबदारी काय आहे ह्याचं भान असणं म्हणजे सुसंस्कृतपणा.

मध्ययुगीन शिक्षांनी काम होणार नाही. हात-पाय किती जणांचे तोडणार? तुम्ही स्वतः पोलीस किंवा न्यायव्यवस्थेमधे किंवा मंत्री असलात तर तुम्ही काय करु शकता?
तुम्ही स्वतः त्या घटनेच्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केले असते - ५०-६० जणांच्या बेभान जमावाला भिडू शकता तुम्ही? त्यात सामील असणार्‍यांचे तुम्ही नातलग असलात तर तुमची प्रतिक्रीया काय असेल?असे अनेक प्रश्न आहेत ज्याची प्रामाणिक उत्तरे पचायला अवघड आहेत.

स्वस्तातला पैसा, चैनबाजी, घरातल्या मोठ्यांच्या वागण्यात असलेली विसंगती, ह्यातून तथाकथित गोष्टींना मिळणारे अवास्तव महत्व असे अनेक कंगोरे ह्याला आहेत. मुलं/मुली एकदम एकाएकी बिघडत नाहीत.
पण ती बिघडत आहेत हे समजायला मोठे जागेवर आणी भानावर असायला हवेत!

अशी एखादी घटना सर्वाना खडबडून जागे करते, त्यावर चर्चा झडते आणी मग थोड्याच दिवसात आपण सारे विसरून जातो.
ह्या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी, त्यांच्या पालकांचीही जातीने चौकशी व्हावी, त्यातून कित्येक अवैध कृत्ये वर येतील अशी शंका घ्यायला जागा आहे.
पण त्याचबरोबर आपण आपल्या व आपल्या मुला/मुलींच्या बाबतीत अधिक सजग, अधिक सावध व्हायला हवे तरच असे प्रकार टाळायची आशा आहे.

चतुरंग

अरविन्दनरहरजोशी's picture

17 Jan 2008 - 5:47 pm | अरविन्दनरहरजोशी

अरविन्द
कायद्याची भिती नाही व पोलीस खाते काहीहि करू शकत नाही हा विस्वास त्यामुळे असे प्रकार होतात.जनतेने कायदा हातात घेतला तर पुन्हा ओरड होतेच.
आलिया भोगासी असावे सादर.

श्री's picture

17 Jan 2008 - 7:21 pm | श्री

वरील सर्वान्च्या मतांशी मी सहमत आहेच परतु सार्वजनिक ठिकाणि आपण स्भ्यतेने वागायला हवे. वरील ठिकाणि दारु पीउन ती जोड्पी रस्त्यावर धिन्गाणा घालत होती, याचा त्या लोकानी गैरफायदा उचलला.
जेव्हा रसत्याने १ माणुस चालतो त्याला डोके असते पण त्याचे कळपात रुपान्तर झाले कि त्याला डोके उरत नाही , तो वाहवत जातो.
आपण जमावा मध्ये असल्यावर स्वताला सेफ समजतो आणी वरिल घटना, दंगली घड्तात.

मागे मराठा मन्दिर सिनेमा समोर भर् दिवसा १ बाईला जिवन्त जाळ्ले कोणीहि वाचवायला पुढे आले नाहि.. का ?

मुंबईत जो तो घाईत असतो, चालती गाडी पकडायाला धावतो पण कोपरयात जरा गर्दी दिसली कि २ मि. थांबुन वाकुन बघतो, कारण त्याला तमाश्यात इंटरेस्ट असतो.
आता ज्याने त्याने आत्मचिंतन करणे मह्त्वाचे, पुढील काळ अत्यंत कठीण आहे.
कालाय तसम्ये नमः

किशोरी's picture

17 Jan 2008 - 7:44 pm | किशोरी

जो काही प्रकार झाला तो खरच नींदनीय आहे,मागील वष्री पण अशीच घटना घडली होती,
त्याचा काय निकाल लागला देवाला महित! अशा विकृत लोकांना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे,
बरेच लोक अशी घटना झाली कि मुलींना दोष देवुन अशा पाषवी लोकांचे सर्मथन
करतानाच दिसतात्,टी.व्ही वरील एक प्रतीक्रीया तशीच होती.मन खिन्न होवुन जाते असे ऐकुन
बाजुला असनारया कुणालाच कसे वाटले नाही की त्या मुलींच्या मदतीला जावे?
अशा घटना संस्काराच्या कमीची जाणीव करुन देतात..अशा गुन्ह्यासाठी कडक शिक्षा व्हायला हवी
एक मुलगी म्हनुन देवाजवळ हीच प्रार्थना की कोनत्याही मुलीच्या आयुष्यात अशी दुर्दैवी घटना घडु नये!

वरदा's picture

17 Jan 2008 - 10:39 pm | वरदा

ह्या मुलींच्या कपड्यांकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. एकीचा स्कर्ट गुड्घ्यावर तर दुसरीची जीन्स तितकीच टाईट...मुलगी म्हणून हेही वाटतं की मुलींनीही नीट राहीलं तर हे प्रकार कमी होणार नाहीत का?

चतुरंग's picture

18 Jan 2008 - 12:03 am | चतुरंग

तुमच्या मताशी मी सहमत आहे. एकूणच कायद्याचा, पोलिसांचा धाक कमी होत चाललेला आपण सर्व रोज पहात, वाचत असतो.
असे असताना सूज्ञ माणसाने शहाणपणाचे वर्तन करणे अपेक्षित आहे. आपल्याला कशापासून धोका असू शकतो ह्याचं भान ठेवता यावं ही अपेक्षा गैर नाही.
पण आपल्याला कशाला असे होईल, किंवा आपल्याला कोण काय करतंय ह्या भ्रमापायी आफत ओढवू शकते.

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

18 Jan 2008 - 12:44 am | इनोबा म्हणे

या मताशी मी सहमत आहे,
बर्‍याच वेळा मुलींच्या कपड्यावरून असले फालतू लोक ती मुलगीही 'तसलीच' आहे असे समजतात आणि त्यातून हे असले प्रकार घडतात.गेल्या वर्षी गेट वे ऑफ इंडीयासमोर असाच एक प्रकार घडला होता,त्या प्रसंगीही मुलगी तोकडे कपडे घालून व मद्य पिऊन नृत्य करीत होती.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील दोन्हीही मुली व मुले हे मुळचे मुंबईचे नसून गुजरातचे आहेत,थर्टी फर्स्टच्या पार्टीकरीता ह्या मुली मैत्रिणीच्या घरी जात आहोत असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या.आता यात काही प्रमाणात या मुलींचाही दोष आहे ना!.

एकलव्य's picture

22 Jan 2008 - 10:43 am | एकलव्य

ह्या मुलींच्या कपड्यांकडे कुणाचं लक्ष गेलं नाही.

चित्र बघितले आणि त्यावर लिहिलेले शेरेही वाचले.

सदर चित्रातील दोन्हीही मुलींचे कपडे बिलकुल प्रक्षोभक किंवा छचोर वगैरे वाटले नाहीत. वरदाताई - आपली काळजी ठीक आहे. पण या चित्रावरून तरी ह्या मुलींना अगदी तिळमात्रही दोष देता येणार नाही.

"हातपाय तोडा" चा काथ्याकूट चाळला. (ह्या टवाळांना बेड्या जरूर ठोकाव्यात)
अंगठाबहाद्दर

विसोबा खेचर's picture

18 Jan 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

आपले मुद्दे वाचले, परंतु असे अनेक मुद्दे जरी मांडले तरी भर रस्त्यात मुलींचे कपडे फाडल्याच्या कृत्याचे समर्थन कशानेही होऊ शकत नाही असे माझे मत आहे!

तात्या.

चतुरंग's picture

18 Jan 2008 - 3:10 am | चतुरंग

मी व्यक्त केलेल्या मतात तुम्हाला समर्थन कुठे दिसले?
घडलेली घटना घृणास्पदच आहे. ती घडवणार्‍यांना शासन व्हायलाच हवे.
ती घटना का घडली ह्याची आपण कारणे शोधतो आहोत.

वरदा म्हणते आहे -
मुलगी म्हणून हेही वाटतं की मुलींनीही नीट राहीलं तर हे प्रकार कमी होणार नाहीत का?

आता मुलींनी कसेही कपडे घालावेत, ते ठरवणारे आम्ही कोण आणि तरीही लोकांनी नीटच वागले पाहिजे हे तत्वतः बरोबर असेलही.
पण नशेतल्या कामातुरांना अशा कपड्यांनी उत्तेजन मिळू शकते हे नाकारता येईल का?
तुम्ही घर उघडं टाकून जाणार आणि नंतर चोरी झाली म्हणून बोंब मारणार - ते म्हणतात ना - "मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा." तशातली गत झाली!

ह्यात चोरीचं समर्थन करायचं नाहीये पण शेवटी त्या मुलींना आणि त्यांच्याबरोबर इतरांनाही मनस्ताप, मानहानी ह्याला सामोरे जावे लागलेच ना? (नशीब, तेवढ्यावरच निभावलं!)
आपली सुरक्षितता कशाने वाढू शकेल ह्याचा विचार त्या मुलींनीही करायला हवा इतकेच माझे म्हणणे आहे.

चतुरंग

जरा खालील प्रश्नांची उत्तरे द्या -

१. मध्यंतरी बातमी होती की राष्ट्रपतींच्या गावी महिलेवर बलात्कार! ती बाई कोणतेही तथाकथित छचोर कपडे घालणारी नव्हती. तेव्हा या घटनेसमर्थ काही विधाने आहेत काय?

२. घर उघडं टाकलं तर चोरी होते पण बाई म्हणजे उघड घर आहे जे बोंबलू शकत नाही ? आणि समोरची स्त्री जेव्हा नको सांगते किंवा रडते तेव्हा ही तिला त्रास देऊन वर कारणे
शोधणार्‍यांना काय म्हणावं?

३. या मुलींनी कमी कपडे घातले नसते तर त्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागलेच नसते याची गॅरंटी देता काय? देत नसल्यास त्या मुलींनी असे कपडे घातले म्हणून त्यांना अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागले असे कसे म्हणता?

४. उद्या पुरूष आखूड चड्डी घालून बाहेर पडला, (निदान भारतात) म्हणून २-४ स्त्रियांनी मिळून त्याला नको त्या ठीकाणी हात लावल्याचे दृष्य सर्रास दिसते काय? मग पुरुषांना लायसन्स कोणी दिलं?

विसोबा खेचर's picture

18 Jan 2008 - 9:02 am | विसोबा खेचर

तेजरावांशी सहमत!

चतुरंगकाका, द्या आता उत्तर!

तात्या.

इनोबा म्हणे's picture

18 Jan 2008 - 12:55 pm | इनोबा म्हणे

तेज,
छेडछाड व बलात्कारासारख्या घटना या विकृतीतून घडतात,बर्‍याचदा हा गुन्हा त्यावेळी असणार्‍या परिस्थितीमुळे घडतो.तुम्ही कितीही कठोर शिक्षेची तरतूद करा पण त्यांना जरब बसवणे कठिण नव्हे तर अशक्य आहे. आपल्यातील भिन्नलिंगी प्राण्याबद्दल सर्वच प्राण्यांना आकर्षण असते आणि कधीकधी हे आकर्षण वासनेत बदलते.

मी जवळून अनुभवलेली ही घटना :

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील प्रभात रस्त्यावरील एका निर्जन ठिकाणी एक जोडपे बसले होते,दोघेही परप्रांतातील व विद्यार्थी होते.त्यावेळी पोलीसी गणवेशातील एक व्यक्ती तिथे आली.त्याच्या अशा अचानक येण्यामुळे ते दोघेही घाबरले.त्या व्यक्तीने मुलाकडे महाविद्यालयाच्या ओळखपत्राची मागणी केली तेव्हा त्याने ते वसतीगृहावर असल्याचे सांगीतले व त्याच्या सांगण्यानुसार ओळखपत्र आणण्याकरीता वसतीगृहाकडे गेला.त्यानंतर या व्यक्तीने मुलीला पोलिस चौकीत न्यायच्या निमित्ताने आपल्या दूचाकीवरून पुणे विद्यापीठाच्या अवारातील झाडीत नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला.(आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुणे विद्यापीठाच्या दरवाजाला अगदी खेटूनच पोलिस चौकी आहे व याच दरवाजातून तो तिला आवाराच्या आत घेऊन गेला होता.)
घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीने मुलीला तिथेच सोडून पोबारा केला.ज्यावेळी मुलगी पुन्हा प्रभात रस्त्यावर आली त्यावेळी तिने तत्काळ प्रभात पोलिस चौकीतील पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली.गुन्हा नोंदवण्यापुर्वी प्रभात पोलिसांनी चौकीजवळच्याच (म्हणजे माझ्याच) दूरध्वनी केंद्रावरून मुलीच्या पालकांशी संपर्क साधून गुन्हा नोंदवण्याची खात्री करुन घेतली(बर्‍याच वेळा बलात्कारीत मुलीचे कुटुंबीय गुन्हा नोंदवण्याबद्दल टाळाटाळ करतात) त्यावेळी त्या मुलीने स्वतःच्या तोंडाने सांगितलेली ही हकीगत.
नंतर मुलीच्या सांगण्याप्रमाणे त्या व्यक्तीचे रेखाचित्रही बनवण्यात आले,त्याच्या वर्णनाशी मिळता जूळता पोलिस खात्याचा कर्मचारी आढळून आला नाही.आजतागायत त्या गुन्हेगाराचा तपास लागू शकलेला नाही.
या घटनेवर आधारीत स्मिता तळवलकरांचा 'सातच्या आत घरात' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

विकेड बनी's picture

18 Jan 2008 - 4:27 pm | विकेड बनी

विनूभाऊ

माझा ४था प्रश्न काय विचारतो हे सूक्ष्मपणे पहा.

आता तुमच्या वाक्यातील मी केलेला बदल बघा -

छेडछाड व बलात्कारासारख्या घटना या पुरूषांतील विकृतीतून घडतात,बर्‍याचदा हा गुन्हा त्यावेळी असणार्‍या परिस्थितीमुळे घडतो.तुम्ही कितीही कठोर शिक्षेची तरतूद करा पण पुरूषांना जरब बसवणे कठिण नव्हे तर अशक्य आहे. आपल्यातील भिन्नलिंगी प्राण्याबद्दल सर्वच प्राण्यांना आकर्षण असते आणि कधीकधी पुरूषांचे हे आकर्षण वासनेत बदलते.

आणि म्हणून स्त्रियांना अजूनही 'सातच्या आत घरात' या असे सांगावं लागतं.

आता वरील वाक्यांचा अर्थ सर्वच स्त्रिया सोज्वळ असतात असा घेऊ नये पण पुरूषांवर सर्रास बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होत नाहीत हो!

तेव्हा, मला वाटतं पुरूष म्हणून प्रत्येकाने आपल्या प्यांटीत (खिशात हो!) काय जळतंय ते आधी पहा आणि मग बायकांवर टिका करा.

मुंबईतल्या कॉलेजात शिकणार्‍या ६-७ मुली त्यातल्याच एकीच्या कोकणात असलेल्या बंगल्यावर मौजमजा करायला जातात.
सकाळी दूधवाला येतो त्याला पकडून त्या त्याचा लैंगिक छळ करतात. त्याच्यावर बलात्काराचाही (!) प्रयत्न होतो.
कशीबशी सुटका करून तो पोलिसांकडे जातो.
नंतरच्या चौकशीमधे उच्चभ्रू घरातील त्या मुली रात्रभर अश्लील चित्रपट बघत, दारु पीत तिथे धिंगाणा घालत होत्या हे समजले.
त्या केसचे पुढे काय झाले समजले नाही - पण आपण अंदाज करु शकतो.

आता ह्या घटनेबाबत काय म्हणणार?
पुरूष इतके बलात्कार करतात मग आम्हीही एखादा केला तर कुठे बिघडले??? असे समर्थन चालेल का - नक्कीच नाही .
परंतू शारीरिक दृष्ट्या स्त्री ही पुरुषापेक्षा ह्या घटनांना जास्त बळी पडते हे सत्य आहे. त्याची कारणे अनेक आहेत. सूज्ञांना थोड्या विचारातून त्याची जाणीव होऊ शकेल.

एखाद्या वर्षाची मुलगी किंवा अगदी ६० वर्षांच्या आजीवर देखील बलात्कार होतात. आणि त्यातले बहुसंख्य (७०% हून जास्त) हे ओळखीतल्या पुरुषाकडून होतात - काका, मामा, वडील, आजोबा, चुलत/मावस भाऊ! हे अत्यंत विदारक सत्य आहे. ही विकृती माणसाच्या अस्तित्वाइतकीच जुनी आहे.

आता ह्या विषयावर लिहिणे मी थांबवतो आहे.

चतुरंग

विकेड बनी's picture

19 Jan 2008 - 3:27 am | विकेड बनी

मी वर म्हटलेच आहे की सर्वच बायका काही सोज्वळ नसतात पण सोज्वळपणा ही बायकांची मक्तेदारी तरी का असावी?

आपण जी घटना लिहिली ती १०-१२ वर्षांपूर्वीची असूनही लक्षात का राहिली यावर विचार करा. कारण ती अपवादात्मक/ युनिक/ निराळी होती. याचप्रमाणे गेल्या ६ महिन्यांत कोणा कोणावर बलात्कार झाले ते सांगा, येईल सांगता? कारण स्त्रीने मर्यादा पाळल्या नाहीत तर पुरूष बलात्कार करणारच अशी निर्ढावलेली भावना बरेचजण पाळतात.

शारिरीक दृष्ट्या इ. म्हणाल तर घरात बरेचदा आई किंवा बहिणीला अनवधानाने अपुर्‍या कपड्यांत पाहिले जाते मग सरसकट पुरूष त्यांच्यावर बलात्कार किंवा विनयभंग करतो का हो? असेही महाभाग असतात म्हणे पण त्यांचे समर्थनही करणारे भेटले तर काय बोलावे.

पुन्हा तेच.

एखाद्या वर्षाची मुलगी किंवा अगदी ६० वर्षांच्या आजीवर देखील बलात्कार होतात. आणि त्यातले बहुसंख्य (७०% हून जास्त) हे ओळखीतल्या पुरुषाकडून होतात - काका, मामा, वडील, आजोबा, चुलत/मावस भाऊ! हे अत्यंत विदारक सत्य आहे. ही विकृती पुरुषाच्या अस्तित्वाइतकीच जुनी आहे.

आणि जोपर्यंत ते पुरूष माणसाच्या कातड्याखाली वावरण्याचे सोंग करत राहतील तोपर्यंत बायकांची सुटका नाही.

असो, बोलणे थांबवायला माझीही हरकत नाही.

अघळ पघळ's picture

19 Jan 2008 - 5:57 am | अघळ पघळ

हे हे हे!!
...आणि तेव्हापासून चतुरंग साहेबांची दूधवाला बनण्याची धडपड चालू आहे!!
विनोदाचा भाग सोडा.. पण स्त्रियांपासून पुरुषांना बलात्काराची भिती असणे हा मुद्दा हास्यास्पद आहे.

-- अघळ पघळ

हिन्दी मासिक हन्स २००० जानेवारी चा अन्क जरूर वाचावा. खूप अभ्यासपूण ले़ख आहेत. विनन्ती

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jan 2008 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे

हा अंक कोठे सहज उपलब्ध आहे? आपल्याला आवडलेला लेख आपण स्कॅन करुन येथे उपलब्ध करुन दिलात तर बरे होईल.
प्रकाश घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2008 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा घटनेला जवाबदार कोण ? या पेक्षा अशा विकृत लोकांना दहशत बसण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागडे करुन त्यासाठी जी ही विकृती सुचलेली असते तितका भाग चिंध्यांनी गुंडाळून पेटवून दिला पाहिजे किंवा लोहाराच्या भट्टीत लाल झालेल्या लोखंडी सळईने डागण्या दिल्या पाहिजे असे वाटते.

"स्वच्छ पा॑ढर्‍याशुभ्र" कपड्या॑तला सैतानाच्या आनंदाला पाहून भडकलेला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jan 2008 - 9:56 am | प्रकाश घाटपांडे

महाभारतातला द्रौपदी वस्त्राहरणाचा प्रसंग आठवा. त्यातील प्रसंगाच्या छटा, त्याचे विविध अन्वयार्थ, त्यातील सुसंगती, अर्थात विसंगती ही . द्रौपदीने भिष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर असे अनेक लोकांना याचा जाब विचारला तेव्हा काय झाले.? 'हस्तिनापुरचे भले झाले पाहिजे' हे असहाय उत्तर, वा मुकस्तब्धता. राजसत्तेच्या उन्मादासमोर विद्वत्ता असहाय होते. दुर्योधन, दु:शासनासमोर मयसभेत झालेली फजिती व द्रौपदीने केलेला अपमान या गोष्टीचा बदला हेच डोळ्यासमोर होते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ना! समुह उन्मादासमोर संवेदनाशिलता, मानवता,सजगता, समता,बंधुता वगैरे गोष्टी बोथट होतात. survival is truth. याला कुणी कातडी बचाव असे देखिल म्हणतात. पण ते वास्तव आहे हे नाकारुन चालणार नाही.
थोडक्यात महाभारतापासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत, आजही चालत आहेत, इथुन पुढेही चालत राहणार आहेत. ( याचे समर्थन होउ शकत नाहि हे सावध वाक्य टाकावेच लागते ) सत व असत प्रवृत्ती चा लढा हा अनादि अनंत आहे.

अवांतर - महाभारत प्रत्यक्ष घडले असेल्/नसेल हा भाग अलहिदा. इतिहास म्हणुन नव्हे पण हा कादंबरिचा विषय म्हणुन तरी मराठी लेखकांनी जिवंत ठेवला. 'हा जय नावाचा इतिहास आहे - आनंद साधले ' वाचनीय आहे.
प्रकाश घाटपांडे

मनस्वी's picture

18 Jan 2008 - 11:46 am | मनस्वी

तेज, प्राध्यापक, तात्यांशी सहमत.

आज मुलगी व्यवस्थित पंजाबी ड्रेस घालून जरी बाहेर पडली, तरी तिच्याकडे काही सुशिक्षित दिसणारे पुरुष विकृत नजर किंवा काहीवेळेस गलिच्छ comment pass करायला कचरत नाहीत.

त्यावेळेस वाटते की त्यांचे डोळे बाहेर काढावेत.

प्राध्यापकांनी सांगितलेली शिक्षा १००% योग्य आहे.

विकि's picture

18 Jan 2008 - 2:43 pm | विकि

हा प्रसंग आणि चर्चा तात्याला अर्धा महिना उलटुन गेल्यावर का आठवला ते कळत नाही. वास्तविक घटनेच्या दुसर्‍या दिवशीच उत्स्फुर्त प्रतिक्रिया मिपा वर दिली गेली पाहीजे होती ती कोणीच दिली नाही त्यात मीही आलो. तो पर्यंत आपण झोपा काढत होतो.असे का झाले.
आपला
कॉ.विकि

वरदा's picture

18 Jan 2008 - 6:23 pm | वरदा

माझं म्हणण हे नाही की चांगले कपडे घालणार्‍यांवर असा प्रसंग येत नाही. पण मग त्यांचे दुसरे प्रोब्लेम्स असतील. पण ह्या अशा खूप मुली मी रोज गाडीत पाहायची. उगाच कमी कपडे घालायचे, रात्री उशिरा पर्यंत शॉपिंग करायचं, गाडीत मुद्दाम जेन्ट्स डब्याकडे पाहून हा माझ्याकडे बघतोय तो बघतोय म्हणुन टाईमपास करायचा आणि स्टेशन्वर त्या मुलाने थांबवलं तर किती नालायक आहे म्हणून बोंब मारायची. असल्या मुलींना ही मुलं जास्तं त्रास देणार हे उघड नाही का? पायघोळ पंजाबी, दोन खांद्यावरुन घेतलेली नीट ओढणी अशा मुलींवर हा प्रसंग खरच आलेला मी अजुन ऐकला नाही. असेल एखाद वेळि पन ह्या मुलींपेक्षा ऩक्कीच शतपटीने कमी. कारण चांगल्या घरातल्या मुलींना त्रास देताना १० वेळा विचार करतात ही लोक सुद्धा. आता ही विक्रूती सिनेमामुळे वाढ्ते म्हणताना? मग ह्या मुली हिरॉईन सारखे कपडे घालतात आणि हि मुलं स्वतःला हीरो समजतात तर फक्त त्यांचच का चुकलं? मला वाट्टं कुठे कधी भटकावं, कसं रहावं हे जर मुली शिकल्या तर ५०% तरी कमी होतिल हे प्रकार. बाकी काही विक्रुती तर जगाच्या पाठीवर सगळिकडेच आहे. आपल्या मुंबईलाच कशाला बोला?

विकेड बनी's picture

19 Jan 2008 - 5:07 am | विकेड बनी

पायघोळ पंजाबी, दोन खांद्यावरुन घेतलेली नीट ओढणी अशा मुलींवर हा प्रसंग खरच आलेला मी अजुन ऐकला नाही. असेल एखाद वेळि पन ह्या मुलींपेक्षा ऩक्कीच शतपटीने कमी.

याचा अर्थ तुमची माहिती, वाचन दुर्दैवाने अतिशय अपुरी/रे आहे याची खात्री बाळगा.

चांगल्या घरातल्या मुलींना त्रास देताना १० वेळा विचार करतात ही लोक सुद्धा.

काय म्हणता? वाचून हसावं का रडावं ते कळत नाही.

वरदा's picture

19 Jan 2008 - 7:56 am | वरदा

माझं वाचन कमी आहे हे मान्य पण माझ्या नात्यात किंवा मैत्रीणीत असं कधी झालं नाही आणि रूपारेल मधल्या ३ मुलींचं ह्याच प्रकार मी कॉलेजला असताना झाल्याचं ऐकलं आणि त्या मुली खरच ह्या चित्रातल्या मुलींसारख्याच कपडे घालायच्या. शाळेपासून कितीतरी अभ्यासात लक्ष नसणार्‍या मुलींना गावच्या दादाने हे असले प्रकार केलेले माहीतेयत...मी किवा माझ्या बा़कीच्या मैत्रीणीसुद्धा तिथेच रहायचो पण वेळेत घरी यायचो आणि असं काहीही झालं नाही. मी विक्रुती नाही असं अजिबात म्हणत नाहीये पण आपण नीट राहू शकतो आणि प्रमाण कमी करू शकतो असं सांगतेय...मुलीही बर्‍याच प्रकारांनी ह्या प्रकारांना प्रोत्साहन देणार्‍या असतात कधी कधी असं मला सांगायचंय्....रोज कॉलसेंटर मधल्या मुलींचं बोलंणं ऐकायचे मी तिथे होते तेव्हा गाडीत् वाशी ला जायचे तेव्हा..त्यांच्या बोलण्यात मुलं सोडून काही दुसरा टॉपिक नसायचाच. एका वेळी किती मुलांना फिरवते हे सांगायला त्यांना अभिमान वाटायचा..ह्या मुलांना हे समजल्यावर ते भरकट्ल्यासारखे वागले तर पोलिसात द्यायलाही त्या तयार्....चक्कं खेळ वाटायचा त्यांना सगळा....

विकेड बनी's picture

19 Jan 2008 - 9:32 am | विकेड बनी

बाई,

काय बोलताहात ते जरा तपासून पहा. चित्रांतील मुली कशा होत्या याची तुम्हाला काही माहिती नाही, केवळ कपडे पाहून आपण वाट्टेल ते आरोप सुरू केलेत. मग स्वतःचा सोज्वळपणा दाखवायला सुरुवात केली. ९०% स्त्रियांना पुरूषांच्या वाईट नजरा आणि स्पर्शांचे बळी व्हावे लागते.
माझ्या नातेवाईकांत असे झाले आहे का हा प्रश्न विचारण्यापेक्षा पायघोळ अंगरखे घालणार्‍या तुमच्या मैत्रिणींना विचारा की गर्दीत पूल चढताना, रेल्वे स्टेशनाच्या गर्दीत, बाजारात पुरूषांनी स्पर्श केले आहेत का नाही?
चित्रातल्या मुलींनी कोणतेही कामुक किंवा वाह्यात कपडे घातलेले नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे आणि त्याचबरोबर तुमची मते मध्ययुगीन किंवा तालिबानी, अफगाणिस्तानाला शोभून दिसणारी नक्कीच आहेत.

कृपया वैयक्तिक टिकाटिप्पणी नको - संपादक

झंप्या's picture

19 Jan 2008 - 10:04 am | झंप्या

कृपया वैयक्तिक टिकाटिप्पणी नको - संपादक

बिरुटेसर निदान तुमच्या टिकाटिप्पण्या तरी शुद्धलेखनचे नियम पाळणार्‍या करा बरका!! तुमच्या घराच्या नावासारखे नको!!!:-)
(बिरुटे फॅन) सबका डॉन एक

अरे आपापसातील भांडणं आणि वाद आवरा रे..:)

असो, वरील सर्वांचे प्रतिसाद आणि चर्चा वाचल्यानंतरही झाल्याप्रकाराचे कुठल्याही म्हणजे कुठल्याही बाबतीत समर्थन होऊ शकत नाही असे माझे म्हणणे आजही कायम आहे...

हिंदुस्तान टाईमस हे एक अतिशय चांगले, दर्जेदार आणि आघाडीचे वृत्तपत्र आहे आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या वरील छायाचित्रांसारखे रंगे हाथ आणि सज्जड पुराव्यांच्या आधारे संबंधित आरोपींना अत्यंत क्रूर शिक्षा व्हावी असे माझे मत आजही कायम आहे...

तात्या.

विकि's picture

19 Jan 2008 - 1:30 pm | विकि

या निदर्शने करा. संगणकावर बसून चर्चा करणे सोपे आहे समजले का?
तात्या तर हातपाय तोडायला निघाला आहे . अरे तात्या भारतात लोकशाही आहे ते विसरलास की काय. आरोपींवर अरोप सिद्ध व्हायचा आहे. असे प्रकार काय आजच घडत आहेत काय. त्या पत्रकारांनी केवळ प्रसिद्धीसाठी फोटो खेचलेत असे वाटत आहे . आणि दुसर्‍या दिवशी इलेक्टोनिक्स मिडीयाने नेहमीप्रमाणे या प्रकरणावर हैदोस घातल्याने प्रकरणाला भलतीच प्रसिद्धी मिळाली हे आपणास माहीत असेलच.
त्यामुळे कपडे फाडले काय नाही फाडले काय असे प्रकार पुढे होतच राहणार. यंत्रणा सक्षम झाली पाहीजे.
आपला
कॉ.विकि

सुनील's picture

22 Jan 2008 - 12:36 am | सुनील

अशा प्रसंगात गुन्हेगारांना शिक्षा व्हायची असेल तर कायद्यात योग्य ते बदल होणेदेखील आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारा एक लेख आजच्या मटात आला आहे. त्याचा दुवा -

दुवा

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 9:20 am | सुधीर कांदळकर

षंढ झाला आहे. एकाहि अपराध्याला कोणी झोडपला नाही. गणपती व नवरात्सोत्सवात धूडगूस घालणे, भगवा खांद्यावर घेऊन दादागिरी करणे, धर्म खतरे मे म्हणून फालतू कारणांसाठी दंगल करणे एवढीच या समाजाची पुरुषार्थाची व्याख्या आहे. सांगलीच्या तरूणीला पेटवणारा तरूण सांगलीतच राजरोस राहात होता. त्याला त्या तरूणीच्या घरच्यांनी देखील धडा शिकवला नाही. त्याचे हातपाय तोडले असते तर तोडणारा कोर्टात नक्कीच सुटला असता. परंतु ती धमकच आपल्या समाजात नाही.

विसोबा खेचर's picture

27 Jan 2008 - 11:20 am | विसोबा खेचर

कांदळकर साहेबांशी सहमत आहे...

तात्या.