बघण्यासारखे -
१. स्वा. सावरकर स्मारक - भगूर.
२. दादासाहेब फाळके स्मारक - पांडवलेणी जवळ.
३. गारगोटी संग्रहालय - सिन्नर.
४. सोमेश्वर - गंगापूर रोड.
५. सुला वायनरी - गंगापूर रोड.
६. गंगापूर धरण - गंगापूर रोड.
७. जुने नाशिक - जुनी मंदिरे .
खरेदी करण्यासारखे -
१. तिबेटीयन मार्केट - गरम कपडे, चप्पल व बूट साठी प्रसिद्ध.
२. लेव्हीट मार्केट - देवळाली कॅम्प - कपडे, घड्याळे, कस्टम च्या वस्तू इ.
३. सिटी सेंटर मॉल - सर्वच नामांकित आउटलेट्स .
खाण्यासारखे - (३ दिवसांत) शाकाहारी
१. अंबिका मिसळ (पंचवटी), व्वा मराठी मिसळ - (पाथर्डी फाटा), साधना मिसळ (बारदान फाटा)
२. शौकीन भेळ - नेहरू उद्यान समोर.
३. जयंत सामोसा - लेखानगर, सिडको.
४. सायंतारा - साबुदाणा वडा (भद्रकाली, जुने नाशिक.)
५. पांडे मिठाई - लस्सी जम्बो ग्लास मध्ये (मेन रोड, नाशिक)
६. तिबेटीयन मार्केट - चायनीज साठी प्रसिद्ध. (वेज आणि नॉन वेज)
७. कापसे कुल्फी - सिडको.
खाण्यासारखे - (३ दिवसांत) मांसाहारी
१. कोकणी दरबार - मुघल जेवण एकदम भारी (भद्रकाली, जुने नाशिक)
(खिमा आणि रुमाली रोटी १ नंबर)
२. महाराष्ट्र दरबार - बिर्याणी आणि मटणाचे अप्रतिम प्रकार (सातपूर आणि गंगापूर रोड.)
३. तिबेटीयन मार्केट - चायनीज साठी प्रसिद्ध. (वेज आणि नॉन वेज)
(श्री. पालवे यांचेकडे एकदम झक्कास चायनीज भेटते.
४. सोनाली - मटन भाकरी (सिडको)
५. जयदुर्गा - खिमा पाव, मिसळ पाव (कॅनडा कॉर्नर)
६. बार्बेक्यू विलॆ - लाईव ग्रिल पदार्थ. (भुजबळ फार्म कॉर्नर)
७. आठवण हॉटेल - चिकन जंगली कबाब साठी प्रसिद्ध (इंदिरा नगर रोड )
पिण्यासारखे -
१. सुला वायनरी
२. सोम वायनरी
३. अजून बर्याच वायनरी आहेत.
शहरात फिरायला सीटी बसेस आहेत का? ऑटो मीटरनी चालतात काय? डिसेंबरमधे थंडी फार असते काय? कृपया मार्गदर्शन करावे. सोबत ४ वर्षांचा मुलगा असेल तर त्याला आवडेल असं काही आहे काय अजुन?
१. सिटी बस हव्या तेवढ्या आहेत.
२. ऑटो अजूनही शेअर पद्धतीनेच चालतात. (OLA कॅब पर्याय आहे.)
३. थंडी साधारणतः ७ ते ८ डिग्री असते (रात्री ४ पर्यंत जाते).
४. छोटू साठी नाशिक महानगरपालीकेचे "तारांगण" आहे. "बिग बँग" मधेही बरेच खेळाचे प्रकार आहेत.
शामसुंदर मिसळ, तरीही अंबिकेमातेच्या दर्शनाशिवाय पर्याय नाही.
बुधाची जिलबी
सायंताराजवळचाच राउतचा डबल जीरा मसाला सोडा
आदर्श सामोसा, राणेनगर
शौकीनच्या भेळेपेक्षाही त्याची थंडगार झटका पाणीपुरी जबरदस्त आहे.
रविवार कारंजाजवळचं अननस सरबत विथ आईसक्रीम
पांडेचीच मलई बर्फी
मेनरोडवर्च एक मिठाईचं दुकान आहे, नाव लक्षात नाही पण तिथली कढी भेळ आवर्जून खावी अशीच.
हो अगदी बरोबर..
पण त्यांना ३ दिवसात फक्त ६ जेवणंच घेता येतील.
म्हणून हे निवडक ....
### आणि एक आनंदाची बातमी. ###
औरंगाबाद मधील दिवाण देवडी भागातील प्रसिद्ध श्री भोलेशंकर (अप्पा) ची भेळ आता नाशकात उपलब्ध.
येवलेकर मळा, कॉलेज रोड. (फिरते वाहन आहे - "अप्पा चाट " नावाने)
** 'शौकीन' भेळ - आपका कुछ खरा नाही अभी. आपको लई डेंजर प्रतिस्पर्धी आयेला है..
..
मनसे चे ३ माजी आमदार म्हणजे
१. स्व.उत्तमराव ढिकले साहेब (यांचे हॉटेल नव्हते)
२. हेमंत अप्पा गोडसे (ते अभियंता आहेत)
३. वसंत भाऊ गीते (यांचे असू शकते, पण 'साहेबा' नाही. साहब शाहू खैरे यांचे आहे)
नाशिक मधे फिरण्यासाठी Justnashik.com ह्या संकेतस्थळाची मदत घ्या. अतिशय नि:पक्षपाती पणे सदर संकेतस्थळ नाशिक मधिल खाद्यपदार्थ, फिरण्याच्या जागा, कार्यक्रम यांची माहिती देते.
नाशिकला जात असाल तर पाववडा (वडापाव नाही ) जरूर खावा. हा असा प्रकार मुंबई किवा पुण्यात मिळत नाही.
नाशिक शहरात बर्यापैकी हातगाडी वर मिळणारा प्रकार आहे. गरमा-गरम कढई तून नुकताच काढलेला असावा.
~ नाशिककर.
नाशिक नगरीत आपले स्वागत आहे. मी आशा करतो की आपली यात्रा यशस्वी झाली असेल. जर नसेल तर व्य.नि. करा. मी नाशिक टुरिजमवरच काम करत आहे. आपणांस आपल्या वेळेनुसार व आवडीनुसार टूर-प्लान करून हवा असेल तर एक मिपाकर म्हणून विनामूल्य दिला जाईल. वर दिलेल्या अनेक प्रतिसादांमधे अनेकांनी बरीच उपयुक्त आणि योग्य माहिती दिली आहे. प्रत्यक्ष भटकंतीवर असतांना काही मदत लागणार असेल तर व्य.नि तून माझा फोन नंबर घेऊन ठेवा.
रच्याकने, आपण कुठे राहता तसेच नाशिकमधे नेमके कधी व काय कारणाने येणार आहात ते सांगितले नाही....?
मी आपल्या व्य.नि. तून झालेल्या चर्चेनुसार एक ढोबळ प्लान बन्वला आहे. इथे टाकण्यामागचा हेतु की इतर सदस्यांनापण माहित होईल व जाणकार अजून अचूक मार्गदर्शन करू शकतील. खादाडीचे स्पॉट्स एस. योगी यांनी टाकले आहेतच. त्यांचे प्रतिसाद व मी दिलेला प्लानची सांगड घालून आपण छान अनुभव घेऊ शकाल अशी आशा आहे. कार्यक्रम भरगच्च आहे. ठिकाणांची यादी जास्त असल्याने शिस्त व वेळ पाळणे आवश्यक ठरेल. (इथे फोटो टाकण्याचा मोह आवरत आहे कारण फोटो योग्य न्याय देऊ शकत नाहीत)
अजुन काही मदत लागल्यास कळवणे.
दिनांक २४-१२-२०१५
१. दुपारी ५ ते संध्याकाळी ७: जुने नाशिक (रामकुंड, काळाराम मंदीर व परिसर)
२. संध्याकाळी ७ ते पुढे: खादाडी
दिनांक २५-१२-२०१५
१. सकाळी ६ वाजता चांदवडला प्रस्थान
२. सकाळी ७ वाजता चांदवडची रेणुका माता मंदीर
३. सकाळी ८ वाजता अहिल्याबाई होळकरांचा रंगमहल.(दूरुस्ती चालू आहे. पण पाहण्यालायक आहे)
४. सकाळी ८.३० वाजता नंदूरमध्यमेश्वरसाठी प्रस्थान
५. सकाळी १० वाजता नंदूरमध्यमेश्वर पक्षीदर्शन (मोसम सुरु होतो आहे. जास्त पक्षी दिसणार नाहीत)
६. सकाळी ११ वाजता सिन्नरसाठी प्रस्थान.
७. दुपारी बारा वाजता सिन्नर गाठणे : गोंदेश्वर मंदीर.
८. दुपारी १ वाजता: भोजन (गोंदेश्वर मंदीर परिसरात वनभोजनाचा आनंद घेऊ शकता. स्वच्छता पाळणे आवश्यक.)
९. दुपारी २ वाजता: गारगोटी संग्रहालय, सिन्नर. (६० रुपये माणशी - चार जणांचा गृप हवा > तुमचे तीन गृप होतील.)
१०. दुपारी ३.३० वाजता: नाशिककडे प्रस्थान.
११. दुपारी ५ वाजता: सुला वाईन, वाईनरी टूर आणि वाईन टेस्टींग (१५० ते २५० माणशी)
१२. संध्याकाळी ६.३० वाजता: गंगापूर धरणावर फेरफटका.
१४. संध्याकाळी ७.३० पासुन पुढे: खादाडी.
दिनांक २६-१२-२०१५
१. सकाळी ७ वाजता: त्र्यंबकेश्वर मंदीर
२. सकाळी ८.३० वाजता: अंजनेरीची भग्न जैन मंदीरे (सौजन्यः प्रचेतस)
३. सकाळी १०.३० वाजता: पांडवलेणी व दादासाहेब फाळके स्मारक.
४. दुपारी १ वाजता: भोजन.
५. दुपारी २ वाजता: कॉल ऑफ.
प्रतिक्रिया
27 Oct 2015 - 7:36 pm | B amol
नाशिक म्हणायचे आहे मला.
27 Oct 2015 - 7:38 pm | द-बाहुबली
डोळे उघडे ठेवाल तर दोन दिवसात बरेच काही बघुन घ्याल म्हणायचे आहे मला. ;)
27 Oct 2015 - 7:58 pm | B amol
'बरेच' मधे काय काय येइल ते सान्गितल तर बर होइल.
27 Oct 2015 - 8:25 pm | खेडूत
!
यातलं जमेल तेव्ह्डं बघा म्हणायचं आहे मला..!
27 Oct 2015 - 8:34 pm | मोदक
http://www.superbminerals.com/
27 Oct 2015 - 8:54 pm | कंजूस
आता एमटिडीसीने कुंभ निमित्त छान अंक काढला होता त्यात सर्व काही आहे.पिडीएफचा QCR code होता.
नाशिक गडकिल्ले
धार्मिक स्थळे
टुअर इत्यादी
ठेवणीसाठीचा अंक.
27 Oct 2015 - 10:01 pm | सागरकदम
संपादकांना सांगून नशिक चे नाशिंक करून घ्या
27 Oct 2015 - 11:15 pm | टिनटिन
देवळालीला आहे. फक्त वेळ बघून जा. आमचा १५ ऑगस्टला पोपट झालेला.
28 Oct 2015 - 4:43 pm | इरसाल
मग तुम्ही पुन्हा टिनटिन केव्हा झालात ?
28 Oct 2015 - 1:18 pm | एस.योगी
सर्वात आधी ३ दिवसाचं नियोजन करून या..
बघण्यासारखे -
१. स्वा. सावरकर स्मारक - भगूर.
२. दादासाहेब फाळके स्मारक - पांडवलेणी जवळ.
३. गारगोटी संग्रहालय - सिन्नर.
४. सोमेश्वर - गंगापूर रोड.
५. सुला वायनरी - गंगापूर रोड.
६. गंगापूर धरण - गंगापूर रोड.
७. जुने नाशिक - जुनी मंदिरे .
खरेदी करण्यासारखे -
१. तिबेटीयन मार्केट - गरम कपडे, चप्पल व बूट साठी प्रसिद्ध.
२. लेव्हीट मार्केट - देवळाली कॅम्प - कपडे, घड्याळे, कस्टम च्या वस्तू इ.
३. सिटी सेंटर मॉल - सर्वच नामांकित आउटलेट्स .
खाण्यासारखे - (३ दिवसांत) शाकाहारी
१. अंबिका मिसळ (पंचवटी), व्वा मराठी मिसळ - (पाथर्डी फाटा), साधना मिसळ (बारदान फाटा)
२. शौकीन भेळ - नेहरू उद्यान समोर.
३. जयंत सामोसा - लेखानगर, सिडको.
४. सायंतारा - साबुदाणा वडा (भद्रकाली, जुने नाशिक.)
५. पांडे मिठाई - लस्सी जम्बो ग्लास मध्ये (मेन रोड, नाशिक)
६. तिबेटीयन मार्केट - चायनीज साठी प्रसिद्ध. (वेज आणि नॉन वेज)
७. कापसे कुल्फी - सिडको.
खाण्यासारखे - (३ दिवसांत) मांसाहारी
१. कोकणी दरबार - मुघल जेवण एकदम भारी (भद्रकाली, जुने नाशिक)
(खिमा आणि रुमाली रोटी १ नंबर)
२. महाराष्ट्र दरबार - बिर्याणी आणि मटणाचे अप्रतिम प्रकार (सातपूर आणि गंगापूर रोड.)
३. तिबेटीयन मार्केट - चायनीज साठी प्रसिद्ध. (वेज आणि नॉन वेज)
(श्री. पालवे यांचेकडे एकदम झक्कास चायनीज भेटते.
४. सोनाली - मटन भाकरी (सिडको)
५. जयदुर्गा - खिमा पाव, मिसळ पाव (कॅनडा कॉर्नर)
६. बार्बेक्यू विलॆ - लाईव ग्रिल पदार्थ. (भुजबळ फार्म कॉर्नर)
७. आठवण हॉटेल - चिकन जंगली कबाब साठी प्रसिद्ध (इंदिरा नगर रोड )
पिण्यासारखे -
१. सुला वायनरी
२. सोम वायनरी
३. अजून बर्याच वायनरी आहेत.
28 Oct 2015 - 1:27 pm | अमृत
शहरात फिरायला सीटी बसेस आहेत का? ऑटो मीटरनी चालतात काय? डिसेंबरमधे थंडी फार असते काय? कृपया मार्गदर्शन करावे. सोबत ४ वर्षांचा मुलगा असेल तर त्याला आवडेल असं काही आहे काय अजुन?
28 Oct 2015 - 1:35 pm | एस.योगी
१. सिटी बस हव्या तेवढ्या आहेत.
२. ऑटो अजूनही शेअर पद्धतीनेच चालतात. (OLA कॅब पर्याय आहे.)
३. थंडी साधारणतः ७ ते ८ डिग्री असते (रात्री ४ पर्यंत जाते).
४. छोटू साठी नाशिक महानगरपालीकेचे "तारांगण" आहे. "बिग बँग" मधेही बरेच खेळाचे प्रकार आहेत.
28 Oct 2015 - 1:38 pm | अमृत
_/\_
वाखूसाआ.
28 Oct 2015 - 1:28 pm | प्रचेतस
उत्तम माहिती.
खादाडीच्या शाकाहारी पर्यायांत अजून काही..
शामसुंदर मिसळ, तरीही अंबिकेमातेच्या दर्शनाशिवाय पर्याय नाही.
बुधाची जिलबी
सायंताराजवळचाच राउतचा डबल जीरा मसाला सोडा
आदर्श सामोसा, राणेनगर
शौकीनच्या भेळेपेक्षाही त्याची थंडगार झटका पाणीपुरी जबरदस्त आहे.
रविवार कारंजाजवळचं अननस सरबत विथ आईसक्रीम
पांडेचीच मलई बर्फी
मेनरोडवर्च एक मिठाईचं दुकान आहे, नाव लक्षात नाही पण तिथली कढी भेळ आवर्जून खावी अशीच.
28 Oct 2015 - 5:04 pm | मी ओंकार
सुरती फरसाण नाव आहे दुकानाच कढी भेळ उत्तम मिळते तिथे.
28 Oct 2015 - 5:50 pm | भुमन्यु
मेन रोड वरचं का?
29 Oct 2015 - 11:02 am | प्रचेतस
हो बरोबर.
सुरती फरसाणच ते.
28 Oct 2015 - 1:42 pm | एस.योगी
हो अगदी बरोबर..
पण त्यांना ३ दिवसात फक्त ६ जेवणंच घेता येतील.
म्हणून हे निवडक ....
### आणि एक आनंदाची बातमी. ###
औरंगाबाद मधील दिवाण देवडी भागातील प्रसिद्ध श्री भोलेशंकर (अप्पा) ची भेळ आता नाशकात उपलब्ध.
येवलेकर मळा, कॉलेज रोड. (फिरते वाहन आहे - "अप्पा चाट " नावाने)
** 'शौकीन' भेळ - आपका कुछ खरा नाही अभी. आपको लई डेंजर प्रतिस्पर्धी आयेला है..
..
28 Oct 2015 - 2:03 pm | एस.योगी
१. किशोर भाईची दाबेली - काठे गल्ली सिग्नल (फक्त सायंकाळी)
२. बुधा हलवाई - जिलेबी, पक्का पेढा (जुने नाशिक)
३. विश्रांती - जबरदस्त चहा (सराफ बझार, नाशिक)
४. हाजी टी - इराणी चहा (खडकाळी, नाशिक)
५. इच्छामणी वडा पाव - सोमाणी गार्डन जवळ, नाशिक रोड.
६. अकबर सोडा - जुने नाशिक.
७. हाजी दरबार, छोटे मिया - जुने नाशिक.
८. विहार मिसळ - गंगापूर रोड.
९. कृष्णाविजय मिसळ - गंगापूर रोड.
१०. शिवप्रसाद मिसळ - एन. डी. पटेल रोड (BSNL समोर)
११. खानदेश - गंगापूर रोड.
१२. राणा साबुदाणा वडा - जम्बो साबुदाणा वडा (नाशिक रोड)
१३. नक्षत्र चायनीज - चिकन क्रिस्पी लाजवाब (दत्त मंदिर, नाशिक रोड.)
१४. शेगाव कचोरी - इंदिरा नगर.
१५. Sandy Receipe - अंड्याचे १८८ प्रकार (उपनगर, नाशिक रोड)
१६. आशा हॉटेल - लस्सी (नाशिक रोड स्टेशन)
१७. समर्थ वडा - वडा पाव, दाल वडा (रेजिमेंटल प्लाझा कॉर्नर, नाशिक रोड.)
१८. ला सानी - शोर्मा बढीया (लाईफ लाइन कॉर्नर, भाभानगर.)
१९. सिटी सेंटर जवळ कॉर्नर ला भाजी वाला आहे.
२०. गोविंदा मिसळ - भुजबळ फार्म कॉर्नर.
२१. इनायत कॅफे - बिर्याणी मस्त. (इंदिरा नगर कॉर्नर)
२२. हिरवा मसाला मिसळ - बग्गा स्वीट्स जवळ.
२३. हॉटेल साक्षी - मिसळ, वडा रस्सा (सारडा सर्कल)
२४. पुरोहित - शाकाहारी थाळी.
२५. वंदन - मटन थाळी, आणि बरेच काही. (सावरकर नगर)
28 Oct 2015 - 2:07 pm | एस.योगी
**सिटी सेंटर जवळ कॉर्नर ला भाजी वाला आहे.
भाजी ऐवजी 'भजी' वाचावे...
28 Oct 2015 - 2:58 pm | एस.योगी
'शिंदे मेस' - अप्रतिम घरगुती मटन आणि चिकन (पवननगर, सिडको)
28 Oct 2015 - 3:13 pm | एस.योगी
'गोमंतक' - 'जम्बो खेकडा' सह सर्व प्रकारचे मासे निव्वळ अप्रतिम (गंगापूर रोड)
28 Oct 2015 - 5:06 pm | मी ओंकार
'गोमंतक' बंद झालय, गेल्या काही खेपात दिसले नाहि.
29 Oct 2015 - 10:47 am | एस.योगी
'गोमंतक' बंद झाले ?
मला माहित नाही..
इतक्यात जाणे झाले नाही...
माहितीसाठी आभार...
28 Oct 2015 - 2:06 pm | एस.योगी
अजून सांगतो आठवेल तसं ...
28 Oct 2015 - 2:30 pm | प्यारे१
मनसे च्या माजी आमदारांचं कुठलं हॉटेल ते?
बसायला बाजा, लोड वगैरे आहेत ते.
अॅम्बियन्स भारी आहे एकंदर.
28 Oct 2015 - 2:54 pm | एस.योगी
"किनारा"
सावित्रीबाई फुले चौक (मुंबई नाका)
28 Oct 2015 - 2:58 pm | प्यारे१
नाही. काही वेगळं नाव आहे.
28 Oct 2015 - 3:02 pm | भुमन्यु
हॉटेल साहेबा, महामार्ग बस स्टँडच्या बाहेर.
28 Oct 2015 - 2:58 pm | रषातु
HOTEL SAHEBA...
28 Oct 2015 - 3:03 pm | एस.योगी
बसायला बाजा, लोड वगैरे आहेत ते.
(अशी व्यवस्था फक्त 'किनारा' मध्येच आहे. 'साहेबा' मध्ये नाही आठवत कधी बाज आणि लोड वगैरे असल्याचं...)
28 Oct 2015 - 3:10 pm | एस.योगी
मनसे चे ३ माजी आमदार म्हणजे
१. स्व.उत्तमराव ढिकले साहेब (यांचे हॉटेल नव्हते)
२. हेमंत अप्पा गोडसे (ते अभियंता आहेत)
३. वसंत भाऊ गीते (यांचे असू शकते, पण 'साहेबा' नाही. साहब शाहू खैरे यांचे आहे)
28 Oct 2015 - 3:21 pm | प्यारे१
नितिन भोसले का कोणी होते ना?
28 Oct 2015 - 3:31 pm | प्यारे१
https://www.zomato.com/nashik/makalu-bar-and-restaurant-college-road
हे म्हणतोय. मकालु. वेगळं नाव असल्यानं विसरलो होतो.
28 Oct 2015 - 3:42 pm | एस.योगी
हो तेच ते
मकालू ...
28 Oct 2015 - 4:56 pm | B amol
दिलेल्या माहिती बद्दल मी आपला आभारी आहे.नाशिक टुरचे नियोजन करण्यास मदत होईल.धन्यवाद.
28 Oct 2015 - 5:00 pm | मी ओंकार
नाशिक मधे फिरण्यासाठी Justnashik.com ह्या संकेतस्थळाची मदत घ्या. अतिशय नि:पक्षपाती पणे सदर संकेतस्थळ नाशिक मधिल खाद्यपदार्थ, फिरण्याच्या जागा, कार्यक्रम यांची माहिती देते.
28 Oct 2015 - 5:12 pm | B amol
वायनरीला भेट देउ शकतो काय?
28 Oct 2015 - 5:18 pm | B amol
वायनरीला भेट देउ शकतो काय?
29 Oct 2015 - 10:45 am | एस.योगी
हो, भेट देता येते.
या लिंक वर जा...
http://sulawines.com/Visit/
28 Oct 2015 - 10:32 pm | रेवती
व्यवस्थित माहिती दिलिये. छानच!
29 Oct 2015 - 11:18 pm | ससू
नाशिकला जात असाल तर पाववडा (वडापाव नाही ) जरूर खावा. हा असा प्रकार मुंबई किवा पुण्यात मिळत नाही.
नाशिक शहरात बर्यापैकी हातगाडी वर मिळणारा प्रकार आहे. गरमा-गरम कढई तून नुकताच काढलेला असावा.
~ नाशिककर.
30 Oct 2015 - 6:09 pm | भुमन्यु
एक्दम पेर्फेक्ट सांगितलत
1 Nov 2015 - 1:59 am | संदीप डांगे
नमस्कार बी अमोल,
नाशिक नगरीत आपले स्वागत आहे. मी आशा करतो की आपली यात्रा यशस्वी झाली असेल. जर नसेल तर व्य.नि. करा. मी नाशिक टुरिजमवरच काम करत आहे. आपणांस आपल्या वेळेनुसार व आवडीनुसार टूर-प्लान करून हवा असेल तर एक मिपाकर म्हणून विनामूल्य दिला जाईल. वर दिलेल्या अनेक प्रतिसादांमधे अनेकांनी बरीच उपयुक्त आणि योग्य माहिती दिली आहे. प्रत्यक्ष भटकंतीवर असतांना काही मदत लागणार असेल तर व्य.नि तून माझा फोन नंबर घेऊन ठेवा.
रच्याकने, आपण कुठे राहता तसेच नाशिकमधे नेमके कधी व काय कारणाने येणार आहात ते सांगितले नाही....?
संदीप डांगे.
(हल्ली मुक्कामः नाशिक)
3 Nov 2015 - 11:31 pm | B amol
डांगे साहेब, नाशिक सहलीचे नियोजन डिसेंबरमधे आहे.तरी नियोजनासाठी आपल्या मदतीची गरज आहे.
3 Nov 2015 - 11:31 pm | B amol
डांगे साहेब, नाशिक सहलीचे नियोजन डिसेंबरमधे आहे.तरी नियोजनासाठी आपल्या मदतीची गरज आहे.
4 Nov 2015 - 5:00 pm | आनंदराव
आयला, एवढ्या सगळ्या ठिकाणी जाऊन खायचे म्ह,टले तर किमा एक महिना तरी नाशकात रहावे लागेल.
8 Nov 2015 - 12:30 pm | संदीप डांगे
नमस्कार अमोल,
मी आपल्या व्य.नि. तून झालेल्या चर्चेनुसार एक ढोबळ प्लान बन्वला आहे. इथे टाकण्यामागचा हेतु की इतर सदस्यांनापण माहित होईल व जाणकार अजून अचूक मार्गदर्शन करू शकतील. खादाडीचे स्पॉट्स एस. योगी यांनी टाकले आहेतच. त्यांचे प्रतिसाद व मी दिलेला प्लानची सांगड घालून आपण छान अनुभव घेऊ शकाल अशी आशा आहे. कार्यक्रम भरगच्च आहे. ठिकाणांची यादी जास्त असल्याने शिस्त व वेळ पाळणे आवश्यक ठरेल. (इथे फोटो टाकण्याचा मोह आवरत आहे कारण फोटो योग्य न्याय देऊ शकत नाहीत)
अजुन काही मदत लागल्यास कळवणे.
दिनांक २४-१२-२०१५
१. दुपारी ५ ते संध्याकाळी ७: जुने नाशिक (रामकुंड, काळाराम मंदीर व परिसर)
२. संध्याकाळी ७ ते पुढे: खादाडी
दिनांक २५-१२-२०१५
१. सकाळी ६ वाजता चांदवडला प्रस्थान
२. सकाळी ७ वाजता चांदवडची रेणुका माता मंदीर
३. सकाळी ८ वाजता अहिल्याबाई होळकरांचा रंगमहल.(दूरुस्ती चालू आहे. पण पाहण्यालायक आहे)
४. सकाळी ८.३० वाजता नंदूरमध्यमेश्वरसाठी प्रस्थान
५. सकाळी १० वाजता नंदूरमध्यमेश्वर पक्षीदर्शन (मोसम सुरु होतो आहे. जास्त पक्षी दिसणार नाहीत)
६. सकाळी ११ वाजता सिन्नरसाठी प्रस्थान.
७. दुपारी बारा वाजता सिन्नर गाठणे : गोंदेश्वर मंदीर.
८. दुपारी १ वाजता: भोजन (गोंदेश्वर मंदीर परिसरात वनभोजनाचा आनंद घेऊ शकता. स्वच्छता पाळणे आवश्यक.)
९. दुपारी २ वाजता: गारगोटी संग्रहालय, सिन्नर. (६० रुपये माणशी - चार जणांचा गृप हवा > तुमचे तीन गृप होतील.)
१०. दुपारी ३.३० वाजता: नाशिककडे प्रस्थान.
११. दुपारी ५ वाजता: सुला वाईन, वाईनरी टूर आणि वाईन टेस्टींग (१५० ते २५० माणशी)
१२. संध्याकाळी ६.३० वाजता: गंगापूर धरणावर फेरफटका.
१४. संध्याकाळी ७.३० पासुन पुढे: खादाडी.
दिनांक २६-१२-२०१५
१. सकाळी ७ वाजता: त्र्यंबकेश्वर मंदीर
२. सकाळी ८.३० वाजता: अंजनेरीची भग्न जैन मंदीरे (सौजन्यः प्रचेतस)
३. सकाळी १०.३० वाजता: पांडवलेणी व दादासाहेब फाळके स्मारक.
४. दुपारी १ वाजता: भोजन.
५. दुपारी २ वाजता: कॉल ऑफ.
धन्यवाद!
8 Nov 2015 - 4:51 pm | संदीप डांगे
प्रवासाचा मार्ग व अंतराचा अंदाज.
१. पहिला दिवस नाशिकमध्येच : एकूण १० किलोमीटरच्या आत.
२. दुसर्या दिवसाचा प्रवासमार्ग : अंदाजे २०० किलोमीटर
३. तिसर्या दिवसाचा प्रवासमार्गः अंदाजे १०० किलोमीटर
(मार्गदर्शक नकाशे टाकलेले दिसत आहेत का?)