कोशिंबिरी

अजया's picture
अजया in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:36 pm

.

* छायाचित्र कोलाज आंतरजालावरुन साभार

आपल्या मराठी जेवणात ताटाच्या डाव्या बाजूच्या पदार्थांचंही एक वेगळंच महत्त्व आहे. नुसतं बोट लावून चाखलं की जेवणाचा स्वाद आणि चव वाढवणारे हे पदार्थ. आजकालच्या डायेटवर लक्ष देऊन खाण्याच्या जमान्यात सॅलड्चं महत्व फारच वाढलंय. आपल्या कोशिंबिरीही हेच काम करतात आणि जेवणातली मजा वाढवतात. अशा या कोशिंबिरीचे काही प्रकार पाहूया.

रंगीत कोशिंबीर

साहित्य: एक वाटी प्रत्येकी मक्याचे वाफवलेले दाणे, मटार, डाळिंब, ओले खोबरे, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला, हिरवी मिरची घालून फोडणी.

कृती: सर्व जिन्नस एकत्र करून त्यात लिंबू पिळावे. मीठ, चाट मसाला घालून कालवून वरून फोडणी घालावी.

पंचामृत

साहित्यः पाव वाटी प्रत्येकी भाजलेले दाणे, खोबर्‍याचे तुकडे, मिरचीचे तुकडे, तीळ कूट, बेदाणे, चिंचेचा कोळ, गूळ, चवीपुरते मीठ, फोडणी.

कृती: कढईत हिंग, मोहोरी, हळदीची फोडणी करून त्यात मिरच्या घाला. त्यातच दाणे, खोबरे काप, बेदाणे घालून हलवा. थोडे पाणी घालून त्यात चिंचेचा कोळ, मीठ, गूळ आणि तीळकूट घाला. सरसरीत झाले की आच बंद करा.

लाल माठाच्या देठाची कोशिंबीर

श्रावणात आमच्या भागात प्रत्येक घरात लाल माठाच्या देठाचे प्रकार होतातच. त्याची ही कोशिंबीर.

साहित्यः माठाचे कोवळे देठ, ओलं खोबरं, मीठ, साखर, लिंबू.

कृती: सर्व एकत्र करून लिंबू पिळून घालावं. लगेच खायला घ्यावी.

मुळ्याचा चटका

साहित्यः एक वाटी मुळ्याचा कीस, पाव वाटी भिजवलेली हरभरा डाळ, एक हिरवी मिरची, मीठ, जिरे, कोथिंबीर, दही, साखर, फोडणी.

कृती: हरभरा डाळ वाटून घ्या. त्यात मुळ्याचा कीस, मीठ, मिरची, जिरे, साखर, कोथिंबीर घाला. दही घालून कालवा. त्यात फोडणी टाकून घ्या.

लाल भोपळ्याची कोशिंबीर

साहित्यः लाल भोपळ्याच्या शिजवलेल्या फोडी एक वाटी, दोन चमचे दाण्याचा कूट, मीठ, दही, साखर, तूप, जिरे, मिरची घालून फोडणी.

कृती: सर्व साहित्य एकत्र करून कालवा. त्यावर तूप, जिरे, मिरचीची फोडणी घाला. अशीच दुधी भोपळ्याचीही कोशिंबीर छान होते.

प्रतिक्रिया

माठाचे देठ प्रकार नवीन आहे. रंगीत कोशिंबीरही आवडली.

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2015 - 1:01 pm | प्राची अश्विनी

माठाचे देठ प्रथमच एकले, नक्की करून बघितली जाईल.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 2:19 pm | प्रीत-मोहर

Mast koshimbir. Mala swatahla jast avadtat. Lal math koshimbir karun baghen

त्रिवेणी's picture

16 Oct 2015 - 2:41 pm | त्रिवेणी

लाल माठच्या देठ ची koshambir माझ्यासाठी ही नविन आहे.

चटण्या कोशिंबीर फार आवडिचे पदार्थ.वरच्या रेसिपि वाचुनच तोपासु.
लाल माठाचि को.पहिल्यांदाच वाचतीये.नक्की करुन पाहन.

वेल्लाभट's picture

16 Oct 2015 - 5:50 pm | वेल्लाभट

माठाची नवीन आहे! मस्त.

वा वा, माठाची रेसिपी माहिती नव्हती. नक्की करणार.

अनन्न्या's picture

17 Oct 2015 - 10:59 am | अनन्न्या

पण आता अशी करून बघेन. मुळ्याचीही डाळ घालून नाही केली कधी. डावीकडचे प्रकार जास्त आवडतात.

वा वा..कोशिंबीरी खुप आवडतात.लाल माठाच्या देठाची कोशिंबीर नवीनच ऐकला..करुन पाहीन..

वा वा..कोशिंबीरी खुप आवडतात.लाल माठाच्या देठाची कोशिंबीर नवीनच ऐकली..करुन पाहीन..

कोशिंबिरींच्या अजून पाककृती अपेक्षित होत्या. तरी हेही नसे थोडके!

पंचामृत आणि लाल माठाच्या देठांची कोशिंबिर आवडले. मस्त!

मधुरा देशपांडे's picture

17 Oct 2015 - 7:14 pm | मधुरा देशपांडे

पंचामृत म्हणजे जीव की प्राण. अत्यंत आवडते. फक्त आम्ही त्यात तीळकुट नाही घालत. आता मीही घालेन.
लाल माठाच्या देठांची कोशिंबिर पहिल्यांदाच ऐकतेय.
अजुन कोशिंबिरीच्या पाकृ इथेच दिल्या सगळ्यांनी तर अजुन संग्रह वाढेल.

सगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी दणक्या आवडतात.
विशेषतः मुळ्याची किसून.
घरी गेल्यावर हे नवउद्योग होतीलच.

के.पी.'s picture

18 Oct 2015 - 6:55 pm | के.पी.

वरती सगळे म्हणताहेत त्याप्रमाणे माठ कोशिं. मेरेलियेभी नवीन आहे. ते देठ जरी कोवळे असले तरी करकरणार नाहीत का दाताखाली? मला शंका वाटतेय. अर्थात थोडीश्शी करुन बघेनच :)

नूतन सावंत's picture

18 Oct 2015 - 8:03 pm | नूतन सावंत

अजया,मस्त कोशिबिरी.
माझेही दोन पैसे.
लाल आणि दुधी भोपळ्याचे भरीत करते मी असेच,फक्त दाण्याचा कूट घालत नाही.मठाच्या कोवळ्या देठाचीही करते,पंत्यात कांदा असतोतो शक्यतो पांढरा घ्ययचा नि आयत्या वेळी कालवायची कोशिबीर.असली कातिल दिसते ना!
मुळ्याच्या कोशिम्बिरीत पालाही बारीक चिरून,कुस्करून रस काढून घालायचा त्यातही कांदा घालयचा.मस्त तर होतेच पण बद्ध्कोष्ठावरचा अक्सीर इलाज.

नूतन सावंत's picture

18 Oct 2015 - 8:08 pm | नूतन सावंत

माठाच्या असे वाचावे तसेच पुढे पण त्यात असे वाचावे कृपया.

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:33 pm | सामान्य वाचक

शिजवुन दही घालून केलेल्या प्रकाराला भरित म्हणतो आम्ही

या देठाच्या माठाची वेगळी भाजी मिळते इथे.तीन चार फूट लांब लांब देठं आणि कमी पानं.गणपतीत ,श्रावणात तर हमखास घरोघरी देठाची वाल घालून भाजी,कोशिंबीर असतेच.

कोशिंबीर हा माझा आवडता पदार्थ, करायला सोपा, खायला सोपा आणि पौष्टिक! या कोशिंबिरी नेहमीपेक्षा वेगळ्याच आहेत, नक्की करणार. धन्यवाद अजयाताई.
(अंकाची पीडीएफ आवृत्ती कधी येतेय याची वाट पाहतेय, या सगळ्या गोष्टी अतिशय उपयुक्त आहेत, त्यांच्या प्रिंट्स काढून ठेवणे मस्ट आहे.)

पद्मावति's picture

19 Oct 2015 - 11:44 am | पद्मावति

मस्तं कोशिंबीरी आहेत अजया. माठ आणि रंगीत कोशिंबीर कधी केली नव्हती आता, आता करीन.

सस्नेह's picture

19 Oct 2015 - 12:57 pm | सस्नेह

वेगळ्या कोशिंबिरी !
याबरोबरच काकडी, कोबी, गाजर, बीट इ. ही चालल्या असत्या.

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2015 - 8:10 pm | सानिकास्वप्निल

नेहमीच्या कोशिंबीरींना वेगळे आणि पौष्टिक ऑप्शन्स दिल्याबद्दल धन्यवाद ताई.
माठाची मी नक्की बनवणार.

__/\__

मांत्रिक's picture

20 Oct 2015 - 10:41 am | मांत्रिक

मस्त आहे संकलन.

कोशिंबीरी सगळ्याच आवडल्या.
माठाचे देठ माझी आई आधी वाफवुन घेते आणि मग मीठ, तिखट, दाण्याच्या कुट असे लावुन परतवते. शेवग्याच्या शेंगांसारखे चोखुन खायचे. मस्त लागतात ते देठ.

स्वाती दिनेश's picture

21 Oct 2015 - 8:33 pm | स्वाती दिनेश

हा माझा लाडका खाद्यप्रकार आहे. कित्येकदा भाजीपेक्षाही कोशिंबिरच जास्त खाते मी.
मुळ्याचा चटका.. आजीची आठवण करून दिलीस ह्या नावानेच..
रंगीत कोशिंबिर करून पाहिन.
स्वाती

कोशिंबिरींचे प्रकार आवडले. लाल माठाच्या देठांची कोशिंबीर नवीन आहे. मला फक्त अळूची देठी महित होती. रंगीत कोशिंबीरही छान दिसत असणार. करून पाहीन.

आज लाल माठ आणलाय. उद्या करते कोशिंबीर.
हे संकलन आवडलंच !आहारतक्त्यात घेत आहे.

विशाखा राऊत's picture

25 Oct 2015 - 3:31 am | विशाखा राऊत

मस्त लेख. नक्की करुन बघणार

नेहमीच्या कोशिम्बिरीन्पेक्षा हटके पाककृती आवडल्या .

पदम's picture

27 Oct 2015 - 7:53 pm | पदम

भोपळ्याचि कोशिम्बीर माहित नव्हती. खुप छान.

विशाखा पाटील's picture

28 Oct 2015 - 11:41 am | विशाखा पाटील

वा! हेल्दी फूड. कोशिंबिरी आवडतात. सर्व सामान दिवाळीत आणून ठेवण्यात येईल...:)

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:25 pm | कविता१९७८

वाह कोशिंबीर खुपच आवडता प्रकार, एकवेळ जेवान नसेल तर चालेल पण कोशिंबीर भरभरुन खाते.