डोनट्सचा इतिहास

जुइ's picture
जुइ in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:58 pm

डोनट्सचा इतिहास-जुइ

नमस्कार,

विशेष अंक काढायचा आहे असे कळल्यावर आणि तोही रुची या विषयाशी निगडित असणार हे कळल्यावर माझी चांगलीच गोची झाली. असे वाटले, अरे आपल्याला तर पाक कौशल्यातील लिहिण्यासारखे काहीच येत नाही. मग या विषयावर आपण काय लिहू शकतो? काही तरी लिहिण्याची खूप इच्छा होती पण विषय आपल्याला झेपणारा हवा असेही वाटत होते. शेवटी एक दिवस चेपू वर एक बातमी दिसली "डोनट डे", अरेच्या ही काय भानगड आहे. मग ती बातमी वाचली आणि ठरले की यावरच आपण लिहायचे.

तर जाणून घेऊयात "डोनट डे" ही काय भानगड आहे. ७ जून १९३८ रोजी पहिला राष्ट्रीय डोनट दिवस अमेरिकेत साजरा केला गेला. लष्करातील एका तरुण डॉक्टर Morgan Pett याला एका ठाण्यावर पाठवण्यात आले. तिथे जाताना रस्त्यातल्या एका बेकरीतून डोनट्स विकत घेऊन गेला. ठाण्यावरील जखमी सैनिकांवर उपचार करताना त्याने प्रत्येकाला एक डोनट दिले. त्याच्या रुग्णांपैकी एक लेफ्टनंट जनरल सॅम्युअल गेअरी याच्याबरोबर मिळून जखमी सैनिकांसाठी निधी गोळा करायला सुरुवात केली ज्यातून प्रत्येक जखमी सैनिकाला एक डोनटही दिला हात असे. या निधी संकलनात पुढे Salvation Army ने देखिल भाग घेतला. १९३८ सालापासून सॅल्वेशन आर्मी आजही डोनट डे चा उपयोग निधी गोळा करण्यासाठी करते.

१९१७ साली अमेरिका पहिल्या महायुद्धात सहभागी झाली. त्यावेळी सॅल्वेशन आर्मीतर्फे काही लोक माहिती गोळा करायला फ्रांसला पाठवण्यात आले होते. त्यांच्या अहवालात असे मांडण्यात आले होते की अमेरिकन सैनिकांसाठी काही कॅन्टिन्स सुरू करावीत. ज्यामध्ये बेकरी चे पदार्थ, डिटर्जंट व स्टेशनरी पुरवण्यात यावी.

सदर सूचनेनुसार कॅन्टिन्सचा उपक्रम सुरू करण्यात आला. अशा कॅन्टिन्सला 'हट्स' हे नाव दिले गेले. यामध्ये प्रत्येकी ६ स्वयंसेवकांपैकी ४ महिला असत. अशा हट्स अमेरिकेत आर्मीच्या ट्रेनिंग सेंटर्सजवळ उभारल्या जात.

NDD

सॅल्वेशन आर्मीचे जवळजवळ २५० स्वयंसेवक फ्रांसला गेले. त्यांच्या हट्स आता युद्धभूमीजवळील ओसाड इमारतींतून चालवल्या जात. त्यामुळे या हट्स मधून ताज्या पदार्थांचे उत्पादन करणे अवघड जाऊ लागले. त्यावर उपाय म्हणून सॅल्वेशन आर्मीच्या दोन स्वयंसेविका Margaret Sheldon आणि Helen Purviance यांनी अधिक सुटसुटीत पर्याय म्हणून डोनट्स पुरवायचे ठरवले.

ही कल्पना लगेच लोकप्रिय झाली आणि बरेच सैनिक सॅल्वेशन आर्मीच्या या हट्सला भेट देऊ लागले. Margaret Sheldon एकदा असे लिहिले आहे की आज मी २२ पाय बनवले, ३०० डोनट्स आणि ७०० कप कॉफी केली. लवकरच या स्वयंसेविका सैनिकांमध्ये "Doughnut Dollies" या नावाने प्रसिद्ध झाल्या.

हेलनने लिहून ठेवलेल्या नोंदीप्रमाणे सुरवातीला डोनट तळायची शेगडी लहान असे व तळण्याकरिता गुडघ्यातून वाकावे लागे. तरीही दिवसाला दीडशे डोनट्स तयार करण्यात येत असत. नंतर मात्र दिवसाला आठ हजार डोनट्स तयार करण्यापर्यंत मजल पोचली. सुरवातीचे डोनट्स हे डोनट्स सारखे दिसत नसत कारण त्यावेळी डोनट कटरचा वापर केला जात नसे. ती पुढे असेही सांगते की त्यावेळी हटबाहेर लागलेल्या रांगेतील पहिला सैनिक म्हणाला की हे जर युद्ध असेल तर ते असेच चालू राहो!

आता पाहूयात या डोनट्स चा नंतर प्रसार कसा झाला. १९५० साली विल्यम रोसेनबर्ग यांनी क्वीन्सी मॅसेच्युसेटस डंकीन डोनट्स ही बेकरी सुरू केली. या बेकरीचे रूपांतर फ्रंचायझी तत्त्वावर चालणार्‍या कंपनीमध्ये झाले. स्थापना झाल्यापासून सुमारे ११,००० रेस्टॉरंट्स ३३ वेगवेगळ्या देशांमध्ये सुरु झाले आहेत.

क्वीन्सी येथील डंकिन डोनट्सच्या पहिल्या दुकानाचा सध्याचा फोटो.

DD

ओल्ड फॅशन्ड डोनट्स

विविध प्रकारचे डोनट्स

सर्व माहिती व फोटोज जालावरून साभार.

मिसळपावरीलः- डोनट्सची पाकृ

प्रतिक्रिया

पैसा's picture

16 Oct 2015 - 11:27 am | पैसा

मस्त माहिती आणि जुन्या फोटोंनी जाम मजा आणलीय!

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 4:32 pm | प्रीत-मोहर

मस्तच

पद्मावति's picture

16 Oct 2015 - 9:00 pm | पद्मावति

डोनट डे विषयी पहिल्यांदाच कळलं. रंजक इतिहास आहे. मस्तं लेख जुई.

सानिकास्वप्निल's picture

16 Oct 2015 - 10:03 pm | सानिकास्वप्निल

छान माहिती जुइ.
डोनटचा इतिहासाबद्दल छान माहिती मिळाली या लेखाच्यानिमित्ताने.
फोटो पण यम्मी!!

स्रुजा's picture

16 Oct 2015 - 11:24 pm | स्रुजा

फार च रंजक आणि नवीन माहिती कळली, डंकिन डोनट्स आवडले बरं का मला तुमच्या देशातले. खास जाऊन खाउन आलो मागच्या ट्रिप ला. डोनट्स चा इतिहास या निमित्ताने लिहिण्याचा विचार फार च अभिनव.

अनन्न्या's picture

17 Oct 2015 - 11:16 am | अनन्न्या

डोनटस हा प्रकार कधी पाहिला नाहीय, पण तुझे वर्णन वाचून खाऊन पाहावासा वाटतोय. फोतोंमुळे लेखाला आणखी मजा आली.

मधुरा देशपांडे's picture

17 Oct 2015 - 6:48 pm | मधुरा देशपांडे

लेख आवडला जुइ.

अजया's picture

18 Oct 2015 - 11:04 pm | अजया

रोचक आणि रंजक लेख!

खूपच छान माहिती आहे. या 'हट्स' म्हणजे आपल्याकडील 'सीएसडी कँटीन' असतात लष्करासाठी त्यांच्या पूर्वसुरी म्हटल्या पाहिजेत.

डोनट हे गोड असल्यामुळे एव्हढे आवडत नाहीत. तरीपण त्यांचे फोटो आवडले.

गिरकी's picture

19 Oct 2015 - 9:55 am | गिरकी

यम्म यम्म यम्म …

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 12:25 pm | मांत्रिक

थोडक्या शब्दांत छान माहिती दिलेली आहे. डोनट्स पण खास दिसताहेत.

इशा१२३'s picture

19 Oct 2015 - 12:39 pm | इशा१२३

मस्त माहती.डोनट्स आवडता प्रकार.फोटो पाहुन तोपासु.

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 7:05 pm | प्यारे१

थोडक्यात आवरता घेतलाय काय?
आवडला.

डोनट्स डे बद्दल माहित नव्हते. चांगली माहिती कळाली.

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2015 - 9:40 pm | स्वाती दिनेश

छान माहिती! डोनट्सचा इतिहास रंजक आणि रोचक !
स्वाती

नूतन सावंत's picture

24 Oct 2015 - 10:51 pm | नूतन सावंत

जुई,रंजक माहिती.सेपिया आणि कृष्णधवल प्रकाशचित्रांनी लेखाला रंगत आणली आहे.

नूतन सावंत's picture

24 Oct 2015 - 10:53 pm | नूतन सावंत

जुई,रंजक माहिती.सेपिया आणि कृष्णधवल प्रकाशचित्रांनी लेखाला रंगत आणली आहे.

छान ! कितीतरी पदार्थ नुसते खाण्यापूर्त माहित आहेत त्यामागचा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद .

पिलीयन रायडर's picture

26 Oct 2015 - 2:41 pm | पिलीयन रायडर

डोनट खाल्लाय.. पण आवडला नाही फारसा..
पण लेख आवडला!

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:06 pm | कविता१९७८

छान माहीती.

रंजक इतिहास आहे. डोनट डॉलीजचा कामाचा आवाका चकित करणारा आहे.

तुषार काळभोर's picture

2 Nov 2015 - 4:49 pm | तुषार काळभोर

म्हणजे एका हातात कॉफीचा मग व दुसर्‍या हातात डोनट असं चित्र उभं राहतं.
(खरं खोटं अंकल सॅम जाणोत)