धरसोड
आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात.
आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते.
आजोबा आले की आई मला काम सांगणार.
पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची.
हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत.
“आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं.
“ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले.
भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल.
कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा.
आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग?
असंल कायतरी. जौंदे.
हेंनी चा सोडला, कापी पकाडली.
येक सोडलं की दुसरं कायतरी पकडायचं.
म्या असं काय केलं की आज्जी म्हन्ते “धरसोड”.
---
(अवांतर - शशक स्पर्धेतल्या कथा आता वाचणार आहे.)
Book traversal links for धरसोड
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खूप दिवसांनी आली आन्जी.
+१
:)
चांगली आहे.
आन्जी इज बॅक!
मस्त कथा
:)
मस्त :)
आन्जी आली आन्जी आली.
:)
छान आहे,आवडली.
:) नेहमीप्रमाणेच मस्तं !
+१
+१०.
छान स्टाइल
अरेव्वा!!
अरेव्वा!!
मस्त! आंजी स्मार्टए!
आन्जी आली, आन्जी रॉक्स !
आजोबा बहुतेक बकरीचं दुध पीत
मस्त शतशब्द कथा हो.. :)
लय मस्त...
शतशब्द कथा सुंदर
वा! एकदम खुमासदार.
अंजी स्मार्ट आहे ,
अवांतराशी सहमत. "मी कॉफी घेत
मस्त...
मस्त गोड शशक
अांजी आली का! भारी लक्ष हिचं
छोट्याशा आंजीच्या इवल्याशा
कापी
आंजीला भारी बाई उचापती..
कंपनीत
ही ही ही...आंजी खूप आवडली.
लई भारी.
सुंदर
धरसोड.
लहान मुलीचं निरागस भावविश्व
:)
ए आंजाक्का!!!!!!!!!!!! :)
भारी शशक. आंजी नेहमीप्रमाणेच
क्या बात ! एकदम आवडेश !
जादा दौलत होतं असल्यास
हाहाहा!
आभार
चांगलीय
चांगली आहे.