फॉल कलर्स

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in मिपा कलादालन
29 Sep 2015 - 9:02 am

नमस्कार मंडळी,

अमेरिकेत आल्यावर निसर्गाची मला सर्वाधिक आवडणारी किमया म्हणजे फॉल (पानगळ) सीझनमधली रंगाची मुक्त उधळण. गेल्या काही वर्षात मी माझ्या कामचलाउ छायाचित्रण कौशल्याने जे काही दृश्यानुभव टिपू शकलो ते आज इथे तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. माझा हा प्रयत्न कृपया गोड मानून घ्या. फोटोज मोठ्या आकारमानामध्ये पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे.

अमेरिकेत नवा असताना बरोबरच्या मित्रांनी ऑरगन राज्यातली फॉल कलर्स पाहण्याचा बेत आखून सर्व बुकींग केले. आमच्या दुर्दैवाने त्या वर्षी फॉल कलर्स अंमळ उशीराने सुरू झाले व प्रत्यक्ष फारसे काही पाहायला मिळू शकले नाही. एका ठिकाणी जरा वाळकी पाने दिसली त्यापैकी एक पान कारच्या बॉनेटवर ठेवून फोटो काढला.

माझ्या हापिसच्या इमारतीमागच्या परिसरातले काही फोटोज

पुढचे दोन फोटोज मेपल ग्रोव्ह मिनेसोटा येथील राइस लेकच्या परिसरातले.

वुडबरी मिनेसोटा मधला एक गोल्फकोर्स

फॉल कलर्सने नटलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरापासून लांबवर डोंगराळ भागात जावे लागते. आमच्या शहरापासून चार साडेचार तासांच्या अंतरावर ल्युटसन माउंटेन्स हे ठिकाण आहे. फॉल कलर्सचा तीन चार आठवड्यांच्या जो कालावधी असतो त्यात दोन तीन दिवस जेव्हा नारिंगी रंग दिसतो तो सर्वोत्तम काळ असतो. चाकरमान्यांचे सुदैव असेल तर तो शनिवार रविवारी येतो. अन्यथा दोन विकांतांच्या दरम्यान संपून जातो. तसेच आभाळी वातावरणही रसभंग करते.

एके वर्षी गुरुवार व शुक्रवारी झालेल्या वादळामुळे अधिक वाळलेली नारिंगी रंगाची पाने उडून गेली अन तेव्हा शनिवारी आम्हाला दिसलेले ल्युटसन माउंटेन्स येथील फॉल कलर्स.

त्याच्या पुढल्या वर्षी नेमके शनिवार पर्यंत नारिंगी रंगाची पाने नाहीशी होऊन गडद तांबडा रंग दिसू लागला.

नागरी वस्तीच्या परिसरातही एखादे सुंदर झाड दिसते.

मेपल ग्रोव मिनेसोटा येथील वीव्हर लेकच्या परिसरातले एका संध्याकाळचे हे दृश्य.

सेंट पॉल मिनेसोटा येथील कॅपिटॉल ग्राउंड्सच्या परिसरातल्या काही फोटोजने समारोप करतो.

पाच दिवसांपूर्वीच उत्तर अमेरिकेतला फॉल सीझन सुरु झालेला आहे. उत्तर अमेरिकेतल्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी काढलेले फॉल कलर्सचे फोटोज या धाग्यावर किंवा स्वतंत्र धाग्याच्या स्वरुपात प्रकाशित करावे. पुढच्या काही आठवड्यांत मला संधी मिळाली तर मी देखील नवे फोटो काढून इथे प्रकाशित करीन.

अवांतरः आमच्या राज्याचे मॅप बेस्ड फॉल कॅलेंडर.

प्रतिक्रिया

रेवती's picture

13 Oct 2015 - 6:50 am | रेवती

a

चित्रगुप्त's picture

13 Oct 2015 - 7:00 am | चित्रगुप्त

वा, खूपच छान फोटो.
नुक्तेच नव-हंप-शहरातील मा-ऊंट वास-हिंग-तन पर्वतराजीत पानगळीचे रंग बघून आलो.

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2015 - 7:54 am | श्रीरंग_जोशी

रेवतीतै सुंदर आहेत फोटोज. नयनरम्य ठिकाणे आहेत तुमच्या अवतीभवती. फॉल कलर्सचा आस्वाद घेण्यासाठी नेमके कुठे जावे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल.

आमच्याही शहरात यंदा फॉल कलर्स छान रंगत आहेत.

हापिसच्या खिडकीतून दिसणारे हे दृश्य

हापिससमोरचा रस्ता

हापिसातून घरी जाताना एका गल्लीतले हे झाड. वीजेचा खांब नेमका मध्ये येतोय.

जे.जे.'s picture

13 Oct 2015 - 8:01 am | जे.जे.

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2015 - 8:05 am | श्रीरंग_जोशी

जे.जे. साहेब अप्रतिम फोटो आहे. तुम्ही पिकासा पेजचा दुवा वापरला आहे. त्याऐवजी त्या चित्राचा दुवा वापरायला हवा. संपादकांना विनंती आहे की वरचा प्रतिसाद संपादित करून हा दुवा जोडावा.

जे.जे.'s picture

13 Oct 2015 - 8:17 am | जे.जे.

धन्यवाद योग्य दुवा सुचवल्या आणि दिल्याबद्दल.

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2015 - 8:12 am | श्रीरंग_जोशी

लेखात विव्हर लेकचा एक फोटो आहे. त्याशेजारच्या गल्लीत फोन कॅमेर्‍याने काढलेला हा व्हिडिओ.

अजया's picture

13 Oct 2015 - 8:35 am | अजया

रेवती,श्रीरंग अगदी नेत्रसुखद फोटो.

खटपट्या's picture

13 Oct 2015 - 9:45 am | खटपट्या

खूप सुंदर फोटो श्री..

प्रीत-मोहर's picture

13 Oct 2015 - 3:13 pm | प्रीत-मोहर

खूप सुंदर फोटोज श्रीरंग, रेवाक्का आणि स्रुज. डोळे निवले अगदी

इन कम's picture

13 Oct 2015 - 7:11 pm | इन कम

सगळे फोटो मस्त आहेत.नयनरम्य उष्ण रंगसंगती

नूतन सावंत's picture

14 Oct 2015 - 5:56 pm | नूतन सावंत

रंगाभाऊ,रेवाक्का मस्त मेजवानी.

इडली डोसा's picture

14 Oct 2015 - 9:21 pm | इडली डोसा

ईन्डीयानातील ब्राउन कौंटी

.

.

इडली डोसा's picture

14 Oct 2015 - 9:22 pm | इडली डोसा

.

श्रीरंग_जोशी's picture

15 Oct 2015 - 8:16 pm | श्रीरंग_जोशी

हे फोटोज खूपच आवडले. प्रत्यक्ष फोटो पाहून इतकं भारावल्यासारखं वाटतय की प्रत्यक्षात जी अनुभूती मिळत असेल ती स्वर्गीयच म्हणायला हवी. माझ्या दुर्दैवाने अमेरिकेत इतकी वर्षे राहूनही एकदाही दोन दिवसांची रजा काढून निवांतपणे फॉल कलर्स नारिंगी असताना शहरापासून लांबवरच्या निसर्गाच्या सानिध्यात घालवता आले नाहीत.

भविष्यात ठरवून हे करणार हे मात्र नक्की.

इडली डोसा's picture

17 Oct 2015 - 8:12 am | इडली डोसा

हे स्टेट पार्क आमच्या गावाजवळच आहे त्यामुळे वरचेवर चक्कर मारता येते.

स्रुजा's picture

14 Oct 2015 - 9:48 pm | स्रुजा

वाह ! सुरेख !! हा रंग अप्रतिम दिसतो फॉल कलर्स मध्ये.

रेवती's picture

14 Oct 2015 - 10:04 pm | रेवती

सुरेख रंग इडली डोसा.

सौन्दर्य's picture

15 Oct 2015 - 12:05 am | सौन्दर्य

सर्वच फोटो एकापेक्षा एक सरस असे आहेत. मी ह्यूस्टनला (टेक्सास स्टेट) राहतो, इथे इतके विविध रंग बघायला मिळत नाहीत, कारण थंडीच फारशी नसते. संधी मिळाल्यास अमेरिकेच्या उत्तर भागाचा फेरफटका मारण्याची इच्छा आहे. श्रीरंग, इतक्या चांगल्या पोस्ट बद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

15 Oct 2015 - 8:30 am | मुक्त विहारि

आवडले

पिलीयन रायडर's picture

15 Oct 2015 - 2:45 pm | पिलीयन रायडर

काय फोटो आहेत आहाहाहाहा!!!!

हुकलं हो माझं थोडक्यात.... असो.. वापस कभी फॉलमे हामेरिका जायेंगे तो और भी देखेंगे!!

श्रीरंग_जोशी's picture

16 Oct 2015 - 9:39 am | श्रीरंग_जोशी

सर्व वाचकांचे, प्रोत्साहन देणार्‍या प्रतिसादकांचे तसेच एकाहून एक फोटोज टाकून या धाग्याला प्रेक्षणीय बनवणार्‍यांचे पुनश्च धन्यवाद.

आज माझ्या हापिसच्या परिसरात काढलेला हा एक फोटो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2015 - 1:30 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

फारएन्ड's picture

17 Oct 2015 - 7:07 am | फारएन्ड

अतिशय सुंदर फोटो आहेत. जबरी!

किल्लेदार's picture

17 Oct 2015 - 9:12 am | किल्लेदार

अल्गॉन्॑॑क्विन पार्क, कॅनडा

IMG_20151011_102303_HDR

IMG_20151011_114414_HDR

IMG_20151011_165758_HDR

किल्लेदार's picture

17 Oct 2015 - 6:53 pm | किल्लेदार

IMG_20151011_164624_HDR

IMG_20151011_125846_HDR

स्रुजा's picture

17 Oct 2015 - 8:47 pm | स्रुजा

अरे वा ! अल्गाँक्विन याही वर्षी समर ला हुकलं , पण तुमचे फोटो बघुन चुटपुट वाढते आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2015 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्विन्सटाऊन, न्युझिलंड

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2015 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

ब्ल्यू माऊंटन्स (ऑस्ट्रेलिया) कडे जाणारा रस्ता...

श्रीरंग_जोशी's picture

19 Oct 2015 - 10:29 pm | श्रीरंग_जोशी

किल्लेदार व डॉ. म्हात्रे यांनी टाकलेले नवे फोटोजही नेत्रसुखद आहेत.

हा एक फोटो ६ नोव्हेंबर २०१३ रोजी काढलेला आहे. त्या दिवशी मोसमातला पहिला दखल घेण्याजोगा हिमवर्षाव झाला होता. खरं तर नोव्हेंबर सुरु होण्यापूर्वीच पानगळ पूर्ण होऊन (रंग बदलणारी) झाडे निष्पर्ण झालेली असतात. पण एखादे झाड इतरांपेक्षा मंद गतीने बदलत असते. तसेच हे एक झाड, इतरांच्या काड्या झालेल्या असतानाही याची पाने अजून पिवळीच (त्यानंतर नारिंगी व गदड लाल होणे अपेक्षित).

दोन ऋतूंच्या खुणा स्पष्टपणे एकत्रित पाहायला मिळणे हा तसा दुर्मिळ योग :-) .

जुइ's picture

19 Oct 2015 - 11:43 pm | जुइ

डोळ्यांचे पारणे फिटले! एक से एक फोटो आहेत.