फॉल कलर्स

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in मिपा कलादालन
29 Sep 2015 - 9:02 am

नमस्कार मंडळी,

अमेरिकेत आल्यावर निसर्गाची मला सर्वाधिक आवडणारी किमया म्हणजे फॉल (पानगळ) सीझनमधली रंगाची मुक्त उधळण. गेल्या काही वर्षात मी माझ्या कामचलाउ छायाचित्रण कौशल्याने जे काही दृश्यानुभव टिपू शकलो ते आज इथे तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. माझा हा प्रयत्न कृपया गोड मानून घ्या. फोटोज मोठ्या आकारमानामध्ये पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे.

अमेरिकेत नवा असताना बरोबरच्या मित्रांनी ऑरगन राज्यातली फॉल कलर्स पाहण्याचा बेत आखून सर्व बुकींग केले. आमच्या दुर्दैवाने त्या वर्षी फॉल कलर्स अंमळ उशीराने सुरू झाले व प्रत्यक्ष फारसे काही पाहायला मिळू शकले नाही. एका ठिकाणी जरा वाळकी पाने दिसली त्यापैकी एक पान कारच्या बॉनेटवर ठेवून फोटो काढला.

माझ्या हापिसच्या इमारतीमागच्या परिसरातले काही फोटोज

पुढचे दोन फोटोज मेपल ग्रोव्ह मिनेसोटा येथील राइस लेकच्या परिसरातले.

वुडबरी मिनेसोटा मधला एक गोल्फकोर्स

फॉल कलर्सने नटलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरापासून लांबवर डोंगराळ भागात जावे लागते. आमच्या शहरापासून चार साडेचार तासांच्या अंतरावर ल्युटसन माउंटेन्स हे ठिकाण आहे. फॉल कलर्सचा तीन चार आठवड्यांच्या जो कालावधी असतो त्यात दोन तीन दिवस जेव्हा नारिंगी रंग दिसतो तो सर्वोत्तम काळ असतो. चाकरमान्यांचे सुदैव असेल तर तो शनिवार रविवारी येतो. अन्यथा दोन विकांतांच्या दरम्यान संपून जातो. तसेच आभाळी वातावरणही रसभंग करते.

एके वर्षी गुरुवार व शुक्रवारी झालेल्या वादळामुळे अधिक वाळलेली नारिंगी रंगाची पाने उडून गेली अन तेव्हा शनिवारी आम्हाला दिसलेले ल्युटसन माउंटेन्स येथील फॉल कलर्स.

त्याच्या पुढल्या वर्षी नेमके शनिवार पर्यंत नारिंगी रंगाची पाने नाहीशी होऊन गडद तांबडा रंग दिसू लागला.

नागरी वस्तीच्या परिसरातही एखादे सुंदर झाड दिसते.

मेपल ग्रोव मिनेसोटा येथील वीव्हर लेकच्या परिसरातले एका संध्याकाळचे हे दृश्य.

सेंट पॉल मिनेसोटा येथील कॅपिटॉल ग्राउंड्सच्या परिसरातल्या काही फोटोजने समारोप करतो.

पाच दिवसांपूर्वीच उत्तर अमेरिकेतला फॉल सीझन सुरु झालेला आहे. उत्तर अमेरिकेतल्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी काढलेले फॉल कलर्सचे फोटोज या धाग्यावर किंवा स्वतंत्र धाग्याच्या स्वरुपात प्रकाशित करावे. पुढच्या काही आठवड्यांत मला संधी मिळाली तर मी देखील नवे फोटो काढून इथे प्रकाशित करीन.

अवांतरः आमच्या राज्याचे मॅप बेस्ड फॉल कॅलेंडर.

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

29 Sep 2015 - 9:07 am | संजय पाटिल

वा!!! अप्रतीम फोटो!!

कोमल's picture

29 Sep 2015 - 9:25 am | कोमल

गोल्फकोर्स भन्नाट.
फोटू आवडेश.

माझ्या मोबाइलवर सर्व फोटो लोड व्हायला एक दिवसतरी लागेल. तूर्तास फक्त प्रतिसाद दिल्याची नोंद देऊन ठेवतो.

मित्रहो's picture

29 Sep 2015 - 9:30 am | मित्रहो

फोटो छान आहेत

खेडूत's picture

29 Sep 2015 - 9:46 am | खेडूत

गरेट!
या असल्या वातावरणाचं नेहेमीच अप्रूप वाटत आलंय.
अनेक वर्षे विदेशात प्रवास केला, पण अमेरिका राहिलीच.
आता टूरिस्ट म्हणून नक्की येईन.

ब़जरबट्टू's picture

29 Sep 2015 - 9:57 am | ब़जरबट्टू

किती सुन्दर फ़ोटो..
हे सर्व खरच असते,, आतापर्यंत फ़ोटो एडिटींग वाटायचे..
अप्रतिम आहे.. प्रत्येक फ़ोटो वालपेपर आहे..

मांत्रिक's picture

29 Sep 2015 - 10:20 am | मांत्रिक

वा जोशीकाका! काय नशीबवान आहात! अप्रतिम फोटो!

सर्वसाक्षी's picture

29 Sep 2015 - 10:57 am | सर्वसाक्षी

सुंदर चित्रं.

एक विनंती. शेवटुन तिसर्‍या चित्राच्या स्थळाला आणखी दहा पंधरा दिवसांनी अवश्य भेट द्या आणि हेच चित्र टिपा, खाली लाल नारिंगी पानांनी झाकलेली हिरवळ फार छान दिसेल.

पद्मावति's picture

29 Sep 2015 - 11:06 am | पद्मावति

वॉव...मस्तं.
राइस लेकही फारच सुंदर दिसतोय, आरश्यासारखा.

मदनबाण's picture

29 Sep 2015 - 11:09 am | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Ashai Mugam" ft. Vidya Vandana :- Shankar Tucker

काय सुंदर आहेत सर्वच फोटो.प्रत्यक्ष बघणे म्हणजे आनंदसोहळाच असेल!

इशा१२३'s picture

30 Sep 2015 - 6:31 pm | इशा१२३

+१
अप्रतिम फोटो

इशा१२३'s picture

30 Sep 2015 - 6:31 pm | इशा१२३

+१
अप्रतिम फोटो

केशरी, लाल, पिवळा, हिरवा, अबोली, प्रत्येक रंगाच्या किती त्या वेगवेगळ्या छटा आहेत,
नशीबवान आहात खरंच !!

बाबा योगिराज's picture

29 Sep 2015 - 11:28 am | बाबा योगिराज

भेष्ट.

तिमा's picture

29 Sep 2015 - 11:39 am | तिमा

New England

New England

अनिता ठाकूर's picture

29 Sep 2015 - 11:46 am | अनिता ठाकूर

वॉsssssव!!!! नेत्रसुखद! नयनरम्य!!

मधुरा देशपांडे's picture

29 Sep 2015 - 12:57 pm | मधुरा देशपांडे

सुंदर!!

सस्नेह's picture

29 Sep 2015 - 1:04 pm | सस्नेह

फारच रम्य परिसरात राहता बॉ तुम्ही !

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Sep 2015 - 1:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा आमच्या रजायनामधील फॉल सीझनचा फोटो

a

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2015 - 8:31 pm | श्रीरंग_जोशी

सर्व वाचकांना व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.

फॉल कलर्स प्रत्यक्ष पाहायला मिळणे ही खूपच आनंददायी गोष्ट आहे. मला अशी संधी दर वर्षी मिळते यासाठी मी नशिबाचे आभार मानतो.

खेडूत - अमेरिकेला अवश्य भेट द्या.
सर्वसाक्षी - हो, नक्की प्रयत्न करीन त्या ठिकाणी यंदाचा फॉल भरात असताना जाण्याचा.
तिमा - दोन्ही फोटोज न्रेत्रसुखद आहेत. नेमके ठिकाण कोणते?
राजेंद्र मेहेंदळे - वाह, तुम्ही वर टाकलेला कॅनडातला हा फोटो अप्रतिम आहे.

या धाग्यावर यापुढे येणार्‍या फॉल कलर्सच्या फोटोजची प्रतीक्षा आहे.

संपादकांना विनंती - या प्रतिसादातला फोटो मूळ प्रतिसादात टाकावा व रुंदी ही प्रमाणात आणावी.

तिमा's picture

30 Sep 2015 - 4:57 pm | तिमा

तिमा - दोन्ही फोटोज न्रेत्रसुखद आहेत. नेमके ठिकाण कोणते?

न्यू इंग्लंड हाय ते! आम्ही बोस्टनहून गेलो होतो, २००९ साली.

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2015 - 7:49 pm | श्रीरंग_जोशी

न्यू इंग्लंड या बाबतीत एकदम श्रीमंत प्रदेश आहे.

हाय हाय! मोहोब्बतें शिणुमाची आठवण होऊन डोले पाणाव्ले...

कविता१९७८'s picture

29 Sep 2015 - 9:16 pm | कविता१९७८

वाह मस्तच , छान प्रकाशचिञणे

Jack_Bauer's picture

29 Sep 2015 - 9:34 pm | Jack_Bauer

श्रीरंग, छान आहेत पिक्स. न्यूयॉर्क च्या जवळ fall colors साठी काही ठिकाणे माहित असतील तर कृपया सुचवशील का?

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2015 - 10:06 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे फॉल कलर्सचा आस्वाद घेण्यासाठी न्यु हॅम्पशर राज्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते.
New Hampshire Foliage Tracker

परंतु जवळ जवळ सर्वच राज्यांत (अर्थात दक्षिणेकडली सोडून) आपल्या तारखा जुळून आल्यास ऐन भरातले फॉल कलर्स पाहायला मिळतात.

न्यु यॉर्क राज्यात नायागरा व बफेलो सोडल्यास कुठे फिरलो नाहीये. जालावर शोधले असता हे काही उपयुक्त दुवे मिळाले.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा..... केवळ नेत्रसुख.. पण मला मात्र पाण्याजवळ असलेलेच सगळे फोटो जास्त भावले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2015 - 2:13 am | डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक वरचढ फोटो पाहून डोळे निवले !!!

तिमा आणि राजेंद्र मेहेंदळे यांचेही फोटो अप्रतिम आहेत !!!

आमच्याकडे अजून म्हणावे असे रंग सुरु झाले नाहीयेत. आज एक झाड किंचित गुलाबी दिसतय. जरा रंगपंचमी सुरु झाली की फोटू देते.

कल्पक आणि समयोचित धागा, पंत. तुमचे आणि प्रतिसादात आलेले फोटो छान आहेत. हा माँट्रीअल चा एकः

montreal

पानगळ व्हर्माँट :

vermont

ek paan

गॅटिनो पार्कः

gatineau park

व्हर्माँटः

vermont

vermont

vermont

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2015 - 8:10 am | श्रीरंग_जोशी

वाह, क्या बात हैं!! हे फोटोज तर स्वतंत्र धाग्यासाठी उपयुक्त होते (आहेत) :-) .

अगोदरच्या प्रतिसादात एक लिहायचे राहून गेले. बरेचदा शहरातही हायवेशेजारच्या टेकड्यांच्या उतारावर अप्रतिम फॉल कलर्स दिसतात. परंतु त्या ठिकाणी पोचून फोटोज काढणे शक्य नसते. रस्त्याने जाता येता ते दृश्य जमेल तेवढे डोळ्यांत साठवून घ्यावेसे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Oct 2015 - 6:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं फोटो. एक आणि तीन नंबरचा भयानक आवडण्यात आलेला आहे.

वा वा वा ! डोळे निवले फोटो बघून :)

सुबोध खरे's picture

30 Sep 2015 - 11:57 am | सुबोध खरे

असेच म्हण्तो

खुप सुंदर रंगांची उधळण.

लाल टोपी's picture

30 Sep 2015 - 1:53 pm | लाल टोपी

रंगाजी, रंगांची सुरेख उधळण आवडली.

कपिलमुनी's picture

30 Sep 2015 - 8:01 pm | कपिलमुनी

तिथे असलेली भरपूर झाडे हा कौतुकाचा विषय आहे.
एवढ्या संख्येने झाडे असल्याने फॉल कलर छान दिसत आहेत.

सानिकास्वप्निल's picture

30 Sep 2015 - 9:04 pm | सानिकास्वप्निल

सुंदर!! सगळेच फोटो आवडले.
विविध रंगछटा पाहून मन प्रसन्न झाले :)
धन्यवाद.

कवितानागेश's picture

30 Sep 2015 - 9:26 pm | कवितानागेश

अप्रतिम !

किती सुंदर! एकदा पहायलाचं हवे फॉल कलर्स!

पैसा's picture

8 Oct 2015 - 11:22 am | पैसा

फारच सुंदर! इतरांचे फोटोही खूप सुंदर आलेत! पानगळती म्हणजे उदासवाणा ऋतु खरे तर! पण एवढा रंगीत, सुंदर असेल तर बघायला हरकत नाही.

हा धागा कस काय सुटला ? असो एक नम्बर फोटो आहेत सगळे अजुन्ही भर घाला :)

रेवती's picture

13 Oct 2015 - 6:24 am | रेवती

a

रेवती's picture

13 Oct 2015 - 6:25 am | रेवती

a

रेवती's picture

13 Oct 2015 - 6:26 am | रेवती

a

रेवती's picture

13 Oct 2015 - 6:26 am | रेवती

a

रेवती's picture

13 Oct 2015 - 6:27 am | रेवती

a

सर्व चित्रे व्हाईट माउंटन नॅशनल फॉरेस्ट.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Oct 2015 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रंगाण्णा फोटो खुप सुंदर आलेत.