गाभा:
आपण बर्याचदा MI६ अथवा जेम्स बॉंड बद्दल बऱ्याचदा वाचतो, ऐकतो पण मोसाद विषयी माहिती काहीच माहिती नाही ऑपरेशन रेड फाल्कन अथवा मोसाद विषयी मराठीत काही माहिती आहे का ? अशी माहिती असल्यास वाचनास अधिक मजा येईल त्या अनुषंगाने हा धागा निर्माण केला आहे.
प्रतिक्रिया
15 Sep 2015 - 3:33 pm | होबासराव
मंदार आंतरजालावर भरपुर माहिति आहे ह्याविषयि
15 Sep 2015 - 3:45 pm | महासंग्राम
हो भरपूर माहिती आहे पण ती एकत्रीत स्वरूपात आणि मराठीत वाचायला भेटली तर सोने पे सुहागा होइल.
15 Sep 2015 - 4:12 pm | चांदणे संदीप
इथे आपल्या बापूसाहेबांना विनंती करून झालेली आहे.
पाहूया ते कधी मनावर घेतात.
15 Sep 2015 - 3:41 pm | बाबा योगिराज
थोडी फार एकीव महिती आहे. अजुन महिती वाचायला आवडेल.
15 Sep 2015 - 4:19 pm | मोदक
मोसाद नाही.. पण म्युनीक मॅसेकर वरती एक लेखमाला आहे.
Munich Massacre...
Munich Massacre... (भाग २)
Munich Massacre... (भाग ३)
Munich Massacre... (भाग ४) - Operation Wrath of God
Munich Massacre... (भाग ५) - Operation Wrath of God
Munich Massacre... Operation Wrath of God - समाप्त.
15 Sep 2015 - 4:50 pm | महासंग्राम
वाह गणपती आधीच बाप्पाचा प्रसाद भेटला
15 Sep 2015 - 5:00 pm | प्यारे१
भालेराव मालक. कुठले तुम्ही?
आणखी काय काय 'भेटतं' तुम्हाला?
16 Sep 2015 - 9:18 am | महासंग्राम
तसे आम्ही विदर्भातले हमु पुण्यनगरी …
ताक़. माणसं सोडून सर्व काही भेटत आम्हांला.
16 Sep 2015 - 1:23 pm | नाव आडनाव
नगरला पण असंच आहे - सारं भेटतं.
16 Sep 2015 - 1:27 pm | होबासराव
नगर ले पन आलुबोंडा अन रस्सा मस्त भेटते ना राजेहो डिट्टो अकोल्या सारखा
16 Sep 2015 - 2:26 pm | कैलासवासी सोन्याबापु
रस्सा अन आलू बोंडे खाव त अकोल्याले मधु च्या अटी नाही तर श्रीगणेश वर यवतमाळ ले जाताना बोरी अरब ले बी झकास रस्सा आलू वडा भेटते!
16 Sep 2015 - 2:37 pm | होबासराव
मधु च हाटेल (सिव्हिल लाइन चौक) आपलच हाय ना (लय घरोबा हाय), तथिच तर पडिक असतो रोज सकाडी सकाडी. आलुबोंडा-रस्सा. गिल्लि मिसल आन नतंर कलाकंद.. घे दाब्बुन मंग काय भेट्टे :))
16 Sep 2015 - 2:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
अकोल्यातच हाय नाही मंग मुक्कामी तुम्ही होबासराव! लकी ब्वाय
16 Sep 2015 - 2:43 pm | होबासराव
नाहि ना राजा गणपति महालक्ष्मि साठि आलो..पुढल्या हप्त्यात वापिस पुन्याले..
16 Sep 2015 - 2:54 pm | प्यारे१
मोसाद च्या गुप्तहेरांना पण चिकन 'भेटवा'. ;)
21 Sep 2015 - 4:10 pm | महासंग्राम
मधु च नाव काहादल अगदी तोंडले पाणी सुटल अह्हां
21 Sep 2015 - 4:15 pm | होबासराव
मधु च हॉटेल आणि राठि पेढेवाला...आपुन त लय मजा केलि...सार्या वर्षाचा करसडा काढला :)
21 Sep 2015 - 4:20 pm | महासंग्राम
खरच नशीब काढल वो तुमी आता इथ पुण्यात अकोल्यासारखा आलुबोंडा-रस्सा भेटन म्हणजे मंगळावर पाणी सापडन्यासारख आहे.... ख्याख्याख्या
म्या येतोच दिवाळीत बादवे अकोल्यात एक कट्टा हून जाऊ द्यायचा का दिवाळीत सगळेच असतीन दिवालीले.
16 Sep 2015 - 2:52 pm | चिनार
सोन्याबापू..आपल्या उमरावतीत नमुन्याच्या गल्लीत बी भेटते ना राजेहो झ्याक आलुबोण्डे न रस्सा..
येजा कधी..खिलवतो
16 Sep 2015 - 2:56 pm | होबासराव
गड्डा हॉटेल हाय का अजुन ? तथी बि त तर्रि वाला रस्सा रायत जाय ना हो.
मिपाकर म्हणतिल मोसादच्या धाग्याचा पार आलुबोंडा केला आपण :))
16 Sep 2015 - 3:02 pm | चिनार
गड्डा हाय का नाही माहित नाही राजेहो..लय दिवसात चक्कर नाही..पोटापाण्यासाठी पुन्यात हाओ ना..
पन असल बहुतेक..तिथली मिसळ फ़ेमस हाय ना..आन आपल्याकडे मिसळीसोबत पाव नाही मिळत..नुसती हाना लागते..
16 Sep 2015 - 3:14 pm | बोका-ए-आझम
मस्तच. होबासराव पण अकोल्याकडचेच काय?
16 Sep 2015 - 3:26 pm | होबासराव
हो राजा आम्हि बि अठुल्लेच. पण आता १३ वर्ष झाले फिरतोय पोटापाण्यासाठि पहिले हैद्राबाद आणि गेलि १० वर्षे पुण्यनगरि. तरिपण शेवटि जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी (सावरकरांचि माफि मागुन कारण मि हे फक्त आपल्या गावा साठि वापरतोय)
15 Sep 2015 - 10:09 pm | मास्टरमाईन्ड
एकदम मस्त!
मस्त लेखन. जबरदस्त..
मी यापूर्वी एरिक बानाचा "म्युनिक" पाहिला आहे.
पण तुमची लेखमाला वाचताना पण "पाहिल्याचा" फील येत होता.
15 Sep 2015 - 4:36 pm | होबासराव
Wrath Of God....
commitment..Dedication...Determination
चुन चुन के मारा था.
16 Sep 2015 - 5:05 pm | बोका-ए-आझम
तर त्यात एव्हनर (एरिक बाना) शेवटी त्याच्या हँडलरला (जाॅफ्रे रश) हे सांगतो की इझराईलने जेव्हा आईकमनला अर्जेंटिनामधून उचललं आणि त्याच्यावर खटला भरून, आरोप सिद्ध करुन मग त्याला फाशी दिलं तेव्हा जगाने त्याचं कौतुक केलं पण Wrath if God मुळे आपल्यात आणि आपण ज्यांचा पाठलाग करतोय त्या अतिरेक्यांमध्ये फरक उरलेला नाही. मोसादमध्येही हा विचार प्रबळ होत होता (संदर्भ: Gideon's Spies by Gordon Thomas). शिवाय १९७४ मध्ये इजिप्तने इझराईलला योम किप्पूर युद्धात जबरदस्त हादरा दिला होता. नंतर जरी इझराईल त्यातून सावरलं आणि त्यांनी इजिप्शियन फौजांना मागे रेटलं तरी त्यांना हे कळून चुकलं की शांततेशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे इझराईलचे पंतप्रधान मेनॅचम बेगिन आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादात यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या मध्यस्थीने करार झाला. पण इतर अरब राष्ट्रांनी इजिप्तचा कित्ता गिरवला नाही.
15 Sep 2015 - 4:41 pm | मालोजीराव
म्युनिक चित्रपट पहा
16 Sep 2015 - 10:15 am | महासंग्राम
मालोजीराव आपले आद्य गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याविषयी माहिती वाचायला आवडेल तुमच्याकडून.
15 Sep 2015 - 4:44 pm | होबासराव
अवांतरः- कहुता प्रकरणात आपल्या पंतप्रधानांनि काय दिवे लावले होते हे आपल्याला माहित असेलच्...रॉ चि ३ वर्षांचि मेहनत पुर्ण वाया गेलि.. 'ते' एजंट एलिमिनेट केल्या गेले.
15 Sep 2015 - 4:48 pm | मी-सौरभ
मोदी का?
15 Sep 2015 - 5:12 pm | मालोजीराव
मोरारजी देसाई बहुतेक
15 Sep 2015 - 5:46 pm | होबासराव
ते रॉ एजंट तिथे वेष पालटुन केशकर्तनालयात ३ वर्ष काम करुन पाकिस्तानि सायंटिस्ट चे हेअर सँपल गोळा करत होते तेव्हा हे क्लिअर झाल कि पाकिस्तान हॅज नाउ द अॅबिलिटि टु एनरिच द युरेनिअम. आणि आपल्या पंतप्रधानांनि अगदि सरळ साधेपणाने (बावळटपणा म्हणायचय) जनरल झिया ना सांगितले कि "जनरल आम्हाला माहित आहे तुम्हि कहुता मध्ये काय करताय ते " बास एका दिवसात आय एस आय ने कहुतात रॉ एजंट हुडकुन काढले आणि एलिमिनेट केले.
15 Sep 2015 - 5:14 pm | अन्या दातार
कहुता प्रकरण? काय आहे हे?
15 Sep 2015 - 5:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पाकिस्तानची अणुभट्टी कहुता येथे होती.१९७८-८०च्य आसपासचे हे प्रकरण असावे.आपली माणसे तेथे घुसवायची असा रॉ चा प्लान होता.घटना घडून बराच कालावधी उलटला की पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे.
परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी होते. देसाई व वाजपेयी हे दोन्ही नेते पाकिस्तानचे आवडते होते.
15 Sep 2015 - 5:49 pm | होबासराव
माई ते तिथे ३ वर्ष आपल्या प्राणांचि पर्वा न करता काम करत होते.
पोपट्पंची करून घटनेची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांवर टाकायची जुनी खोड आपल्या नोकरशाहीला आहे.
तुम्हि तुमचि ओकारि चालु ठेवा.. फॉर यु आय रेस्ट माय केस.
17 Sep 2015 - 6:03 am | निनाद मुक्काम प...
माझ्या मते तो हस्तक मोक्याच्या आडावर कार्यरत होता
त्याच्या माहितीचा पुरावा किंवा सत्यता शोधण्यासाठी रॉ च्या हस्तकांनी मग केसांचे पुरावे भारत सरकारच्या स्वाधीन केले पण देसाई मुळे तो हस्तक पकडला गेल्या
मात्र तो हस्तक भारतीय होता की नव्हता ह्याबाबत अजून शाश्वत माहिती आंजा व सापडली नाही त्याचे पुढे काय झाले असेल ह्याची कल्पना करवत नाही
गुजराल ने तर अनेक वर्ष चालत असलेले कोवेर्ट
15 Sep 2015 - 5:40 pm | मालोजीराव
याचा पण संबंध इस्राइलशीच आहे, १९७७ साली रॉ चे एक महत्वाकांक्षी मिशन होते पाकिस्तानातील न्युक्लियर प्लांट्स उध्वस्त करायचे, पण पंतप्रधान मोरारजी झिया उल हक जवळ पचकले कि कहुता मधले तुम्ही करताय ते उद्योग आम्हाला कळलेत … रॉ नी आम्हाला तुमच्या न्युक्लियर वेपन प्लांट ची माहिती दिलीये म्हणून.
हा सगळा गौप्यस्फोट झाल्याने झिया उल हक नी लगेच यंत्रणा कामाला लावून पाक मधले रॉ एजंट्स शोधले आणि त्यांना मारले…मिशन फेल्ड !
सिमिलरली सेम ऑपरेशन इस्राइल ने राबवले आणि इराक मधले न्युक्लियर केंद्र १९८१ साली उध्वस्त केले…
15 Sep 2015 - 7:27 pm | बबन ताम्बे
हे म्हणजे वर्गातल्या मुलांसारखं झालं ! बाई बाई , तो बघा कॉपी करतोय पण मी तुम्हाला सांगणार नाही.
एव्ह्ढे आंतरराष्ट्रीय परीणाम करणारे ऑपरेशन, निश्चितच प्रचंड गुप्तता पाळावी असे ठरले असणार. आणि भारताचे पंतप्रधान झिया सारख्या बोक्यासमोर पचकतात? खरे आहे का हे?
15 Sep 2015 - 7:30 pm | प्यारे१
हँगओवर असेल. शिवाम्बु प्यायचे ना.
15 Sep 2015 - 7:32 pm | होबासराव
दुर्दैवाने खरे आहे.
15 Sep 2015 - 7:45 pm | बबन ताम्बे
प्यारेजी म्हणतात तसा शिवांबु हँगओव्हर असेल.
श्री. सुधीर काळे यांची इ-सकाळमधे पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर लेखमाला (भाषांतर) वाचलेली आठवते.
15 Sep 2015 - 7:56 pm | होबासराव
त्यांतं कांयं एंव्हंढें मुत्सद्दी तर आमचा अरविंदा सुद्धा हे.. केजरिवालांचा :)) ह.घ्या.
15 Sep 2015 - 7:59 pm | प्यारे१
>>> मुत्सद्दी
याची संधी बॅटमॅन ला सोडवायला सांगू.
आमचे प्रतिभास्थान कमी उंच आहे. ;)
16 Sep 2015 - 1:11 pm | बबन ताम्बे
कधीतरी वाचल्याचं आठवतंय. पाकडया विचारवंतांनी (?) लिहून ठेवलंय, भारतीय राजकारणी तहात हरतात.
पुरावा म्हणून माझ्याकडे दुवा नाही. अर्थात हे पाकडयांचे मत.
इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री निश्चितच अपवाद असतील.
21 Sep 2015 - 4:25 pm | बॅटमॅन
अम्म्म नक्की कुणाची सद्दी म्हणालात? =))
15 Sep 2015 - 5:23 pm | द-बाहुबली
मोसादवर एक पुस्तकच मराठीत उपलब्ध्द आहे. स्वारी नाव आठवत नाही... लायब्ररीत वाचले होते. मोसादच्या बहुतांश कारवाया डीटेल्समधे लिहल्या होत्या. मग ते दुसर्या देशाचे फायटर विमान पळवुन आणने असो की शत्रुला अणूबॉम्ब बनवता येउ नये म्हणून त्यांना युरेनीअम पुरवणारे जहाज बुडवणे असो. त्यांच्या अचाट क्लुप्तीचे अफाट कारनामे त्यात आहेत. पुस्तक शेवट पर्यंत खाली ठेववत नाही.
16 Sep 2015 - 11:42 am | मृत्युन्जय
पंकज कालुवालांचे पुस्तक आहे ते. इस्त्रायलची मोसाद असे नाव आहे
15 Sep 2015 - 5:26 pm | अभ्या..
छान कॅम्पेन. शिकायचे राहिले हे अॅडव्हर्टाईझिंगमध्ये.
15 Sep 2015 - 5:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
मोसाद बद्दल जास्त माहिती उपलब्ध नसणे हीच त्याच्या यशाची पावती नसावी काय??
15 Sep 2015 - 5:33 pm | होबासराव
बापु सहमत.
15 Sep 2015 - 5:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
तुमच्या त्या आय.बी व रॉ बद्द्लही काही माहिती नाही रे बापू. सी.आय.ए.ची वेब साईट आहे पण ह्यांची नाही.रॉ व आय.बी.चे लोक अजूनही पोस्ट्कार्ड वापरतात,ई-मेल वापरत नाहीत असे वाचले होते.
15 Sep 2015 - 5:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
सगळे तुमच्या जमान्यात भर्ती झालेले असतील माई! पण तुम्ही म्हणालात ते ही खरे आहे मी केंद्रासरकर किंबहुना अर्धसैनिक बलात असूनही मला त्या भूतांबड़दक काहीच माहिती नाही हो! सगळे आपले वाचिव माहिती
15 Sep 2015 - 5:53 pm | होबासराव
कुठल्याहि गुप्तहेर संघटने च्या बद्द्ल, त्यांनि राबवलेल्या ऑपरेशनबद्दल जास्त माहिति उपलब्ध नसणे ह्यातच त्या संघटनेच यश असत. आय एस आय सुध्द्दा एक वेरि प्रोफेशनल आणि कंपिटंट संघटना आहे.
17 Sep 2015 - 6:07 am | निनाद मुक्काम प...
माई गुगल काकांना त्रास द्या जरा रॉ वर बक्कळ पुस्तके सापडतील
15 Sep 2015 - 6:06 pm | जव्हेरगंज
यशस्वी गुप्तहेर संघटना तीच आहे ज्याची जगाला काहीच माहीती नाही.
मोसाद ची थोडीफार माहीती ऊपलब्ध असणे हे त्या संघटणेचे अपयश नव्हे काय?
15 Sep 2015 - 6:17 pm | द-बाहुबली
आपली वाक्यरचना संदिग्ध आहेच पण घटना घडवुन आणण्यात आलेले अपयश संघटनेचे अपयश नक्किच म्हणता येइल. उगा संघटनेबद्दल कुणाला माहीती नाही हे अशक्य. गुप्तहेर संघटनेतर्फे राबवले जाणारे एखादे मिशन अतिगोपनीय असु शकते पण आख्खी संघटनाच अतिगोपनीय करायची म्हणजे राम गोपाल वर्माच्या सत्या २ ला सुध्दा अशक्यप्राय आहे ते :)
15 Sep 2015 - 6:24 pm | कैलासवासी सोन्याबापु
२१व्या शतकाच्या सुरुवातीला माहिती चा स्फोट झाला आज तिचा इतका प्रचंड लोंढा आपल्या मोबाइल मधुन सुद्धा वाहताना दिसतो, अश्याकाळात संपुर्ण माहिती लपणे निव्वळ अशक्य आहे कारण काही न काही कारणाने कुठल्या न कुठल्या संबंधित संघटनेला नेट वर यावेच लागते, ती येते सुद्धा बरेचवेळी आपल्याला माहिती नसते आपण आपल्या आयुष्यात मग्न असतो अश्या अस्तित्वामुळे आलेली थोड़ी ऑनलाइन/ऑफलाइन माहिती ही त्या संघटनेच्या अपयशाचे द्योतक नाही म्हणली जाऊ शकत
शिवाय आजकाल जे साइकोलॉजिकल वारफेयर अर्थात मानसशास्त्रीय युद्ध असते त्यात पब्लिक डीलिंग चा एंगल सुद्धा असतो. शिवाय बरेच वेळी संघटना स्वतः स्वतःबद्दलच कंड्या पिकवते जेणे करून विरोधी किंवा शत्रु किंवा महितीची गरज असणारे ती विकणार व्यावसायिक लोकं हे मिसलीड होतील असे वाटते
15 Sep 2015 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
"आपल्याला हवी ती माहिती जगजाहीर करणे आणि इतर माहिती गुप्त ठेवणे" हे ज्या गुप्तहेर संघटनेला नीट जमते ती संघटना यशस्वी समजली जाते.
"हवी ती खरी (शत्रूच्या मनात धडकी भरवायला) आणि खोटी (शत्रूच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी) माहिती पसरवून शत्रूला सतत संभ्रमात ठेवणे" हे गुप्तहेर संघटनांच्या यशाचे मुख्य गमक असते.
15 Sep 2015 - 6:19 pm | होबासराव
बाहुबलि साहेब माझ्या वरिल वाक्यात कुठे संदिग्ध्ता आहे हो ?
15 Sep 2015 - 6:59 pm | द-बाहुबली
"एखाद्या संघटनेच्या अस्तित्वाची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे की "त्यांच्या कारवाया(मिशन्स) व कार्यपध्दतीची जगाला माहीती नाही", हे आपणास म्हणायचे आहे हे माझ्यापुरते स्पष्ट होत न्हवते म्हणून मी त्यात संदिग्ध्ता धरली.
15 Sep 2015 - 6:25 pm | खेडूत
मोसादने इराकची अणुभट्टी उध्वस्त केली त्याबद्दल इथे मराठीतून सुंदर माहिती आहे.
खरं तर ही सगळी मालिकाच ऐकण्यासारखी आहे!
15 Sep 2015 - 6:39 pm | होबासराव
कॉग्रेस च्या लाजिरवाण्या परभवामागे आणि भाजप च्या विजयामध्ये सुध्दा मोसाद आहे :- श्री श्री मोहन प्रकाश (खाँग्रेस लिडर)
असे मध्यंतरि कुठेस वाचलय :))
15 Sep 2015 - 7:07 pm | द-बाहुबली
अफवांचा विचार केला तर म्हणतात की कारण रशीयाची इस्त्राएलच्या विरोधी राश्ट्रांना असलेली उघड मदत व प्रत्यक्ष इस्त्रैलासुध्दा अण्वस्त्रसिध्द पाकिस्तानवर वचक ठेवेल असे(थोडक्यात हिंदुत्ववादी) सरकार भारतात यावे असे मनापासुन वाटत आले आहे. म्हणून इस्त्राइलची मदत परीणामी मोसाद रिसोर्सेसचे युटीलायजेशन सत्ताबदलात झाले नाही असे मानणे अवघड आहेच पण त्याहीपेक्षा दणकट पुरावा म्हणजे सत्तेत आल्यावर मोदीनीं पिटुकले राष्ट्रही भेट द्यायचे सोडले नाही पण दिर्घकाळचा मित्र, हितचिंतक, साथिदार रशिया दौर्यावर मात्र ते अजुनही गेले नाहीत (रशीयात गेले नाहीत असे न्हवे).
15 Sep 2015 - 6:53 pm | राही
१)रॉ काय किंवा अन्य कुठलीही गुप्तहेर संघटना काय हे लोक कधीही प्रकाशझोतात काम करीत नाहीत. त्यांनी पडद्याआड राहाणे हेच देशहिताचे असते. जर त्यांची कुठलीही कामगिरी वर्तमानपत्रातून चघळली जाऊ लागली तर खुशाल समजावे की ही त्यांनीच पेरलेली एक बेट आहे.
'रॉ'ने आतापर्यंत अविश्वसनीय असे काम केले आहे. फारच थोडे लोक ते जाणतात. रामेश्वरनाथ काव हे रॉचे पहिले अध्यक्ष (रॉ वेगळी झाल्यानंतरचे.) त्यांनी अगदी जेम्स बाँड इतकीच थरारक कामगिरी पार पाडली आहे.' रॉ--ऑल द काव'ज़ मेन ' हे पुस्तक मिळाले तर जरूर वाचावे. साधारण असे म्हणता येईल की बांग्लादेश युद्ध हे रॉ मुळे (आणि अर्थात तेव्हाच्या पंतप्रधानांचे कणखर नेतृत्व आणि तिन्ही दलांची नेत्रदीपक कामगिरी यामुळे) आपण निर्णायकरीत्या जिंकू शकलो होतो.
२)भारतात तीनही सशस्त्र दलांचे प्रमुखही माध्यमांमध्ये फारसे चमकत नाहीत. सरकारने निर्णय घ्यावा आणि सर्विसेसनी तो पाळावा अशी पद्धत आहे. शिवाय तीनही दलांचे अंतिम प्रमुख हे राष्ट्रपती असतात. कोणतेही दल अधिक वरचढ होऊ नये म्हणून केलेली ती तरतूद असते.
'मौनी' असणे हे बरेचवेळा फायद्याचे असते.
15 Sep 2015 - 9:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पण तुमच्या त्या सी.आय.ए.चे लोक अगदी उघडपणे काम करताना दिसतात.
https://www.cia.gov/careers/opportunities येथे तर अगदी पारदर्शी व्यवहर दिसतो.तांत्रिक कामासाठी उच्च प्रतीचे लोक येथे कामावर असतात असे वाचले आहे. त्यामानाने रॉ व आय.एस.आय. लाजाळू दिसतात.असो.
७०,८०च्या दशकात खरा भूकंप असो वा राजकीय उलथापालथ, बोट सी.आय.ए.कडे दाखवले जायचे.
15 Sep 2015 - 9:52 pm | आदूबाळ
The Kaoboys & R&AW: Down Memory Lane हे का ते पुस्तक?
15 Sep 2015 - 11:10 pm | अभ्या..
आदूबाळा, थोड्या वर्षापूर्वी माझ्या वाचनात एक मराठी पुस्तक आले होते. 'सत्तांध' . अरुण साधू अन स्व. अशोक जैन दोघांनी मिळून लिहिलेले. आणिबाणीनंतर इंदिराजी पायउतार झाल्यावर जनता सरकारने लिहवून घेतले असावे असा थोडासा आविर्भाव होता. आणिबाणी पूर्व अन नंतर अशा कालखंडाचा वेध त्यात घेतला होता. आणिबाणीत गाजलेल्या बर्याच जणांच्या (जगमोहन, व्हिसी शुक्ला, यशपाल शर्मा, यशवंतरावजी आणि इअतर बरेच मान्यवर) प्रत्यक्ष मुलाखती घेऊन हे पुस्तक सिध्द केलेले होते. यात रामनाथ (?) काओ यांच्या नेतृत्वाखाली गुप्तचर संघटनेला कसे राबवले गेले न त्यात कशा सुधारणा व विभाजन होत गेले त्याचा चांगला रेफरन्स होता. नंतर हे पुस्तक दुर्मिळ झालेय बहुतेक.
त्याकाळच्या बर्याच नेत्यांचे तेव्हाचे वर्तन आणि नंतरची वाटचाल पाहताना गरगरल्यासारखे होते हे निश्चित.
15 Sep 2015 - 7:14 pm | अमृतेश सराफ
बुकगंगा वर इस्रायलची मोसाद हे पुस्तक उपलब्ध आहे ; परंतु सध्यातरी ते "आऊट अॉफ स्टॉक " असे दर्शवित आहे.
16 Sep 2015 - 8:14 am | बोका-ए-आझम
हे जागतिक कीर्तीचे पत्रकार आहेत. त्यांनी लिहिलेलं Gideon's Spies हे पुस्तक मोसादवरचं सर्वात अधिकारवाणीने लिहिलेलं पुस्तक समजलं जातं. त्यात त्यांनी मोसादचा स्थापनेपासून ते आतापर्यंत असा धांडोळा घेतलेला आहे. त्यात अॅडाॅल्फ आईकमनचं अपहरण, म्युनिक हत्याकांडाचा बदला, नाझी वैज्ञानिकांना धमकावणं आणि वेळप्रसंगी त्यांची हत्या, सद्दाम हुसेन, इझराईलने इराकी अणुभट्ट्या १९८३ मध्ये उध्वस्त करणं, इराण, लेबनाॅन आणि पॅलेस्टाईन अशा अनेक प्रश्नांचा, मोसादच्या त्यातल्या भूमिकेचा आणि काही घोडचुकांचा उहापोह केलेला आहे. जरुर वाचा. मराठीत दुर्दैवाने असं लिखाण सापडत नाही. या पुस्तकाचा मराठी अनुवाद झालाय का ते माहित नाही. जर असेल तर फार छान.
16 Sep 2015 - 9:27 am | महासंग्राम
तुमच्या शब्दात भाषांतर वाचायला आवडेल. द स्केअरक्रो च केलत त्याप्रमाणे .
16 Sep 2015 - 10:31 am | सौंदाळा
याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे आणि वाचनीय पण
'हाउस ऑन गारीबाल्डी स्ट्रीट' असे मुळ पुस्तकाचे आणि (मराठी अनुवादाचेपण) नाव आहे. अनुवादक, प्रकाशक आठवत नाही.
16 Sep 2015 - 10:53 am | नाखु
पन्नाशी निमित्त धागा लेखकाचे व मोदकरावांचे अनुक्रमे "धागा चार आण्याचा प्र(ती)साद सव्व रुपयाचा"(चारोळी संग्रह) आणि "मोदकांचे २१ प्रकार (एक पाककल्ला पुस्तीका)" या बरोबरच गणपती आरतीचे संग्राह्य पुस्तीका आणि नारळ (पाणी असलेला) देऊन करण्यात येत आहे.
सत्कारार्थी
अभा मिपा संचालीत जेपी-मित्रमंडळ आणी तमाम बिनपावतीपुस्तक वर्गणी कार्यकर्ते.
16 Sep 2015 - 10:57 am | महासंग्राम
तुमच्या सत्काराने भरून पावलो फक्त आरतीच्या पुस्त्काएवजी ऎखादि युद्धकथा दिल्यास उत्तम ( युद्ध करण्याची खुमखुमी जास्त अजून काय )
16 Sep 2015 - 12:32 pm | बोका-ए-आझम
एका धाग्यावर दहशतवादाला पाठिंबा देणारे दुस-या धाग्यावर जेव्हा दुस-यावर दहशतवादाचा आरोप आणि तोही पुरावा नसताना करतात तेव्हा फार हसायला येतं बुवा. अजून येऊ द्या.
16 Sep 2015 - 12:38 pm | प्यारे१
ते विरोधी बाजूचे गुरुजी आहेत
16 Sep 2015 - 1:01 pm | होबासराव
ह्या असल्या कुजकट आणि संकुचित आत्म्यांसाठि, नाखु साहेबांनि फार छान लिहिलय.
सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर !
मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !
16 Sep 2015 - 5:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
या प्रतिसादा(काडी)मुळे वाढलेल्या ट्यार्पीसाठी धागालेखक आपला अत्यंत म्हंजे यक्दम अत्यंत आभारी होईल =))
16 Sep 2015 - 6:42 pm | प्यारे१
'नागपूर ला जन्मलेले संघिष्ट' नंतर फुलथ्रॉटल जिनियस यांचे आणखी एक मुक्ताफळ.
जस्ट अवेसोमे. :)
बाकी असं काही खरंच लोक करत असतील तरी वाईट वाटून घेण्याचं काही कारण आहे असं वाटत नाही.
आपल्यातले (असं म्हणावं का हा प्रश्न आहे खरं तर) काही अहिंसावादी आणि थंड रक्ताचे लोक आयसिस कडे वळताना पाहून वाईट वाटतं इतकंच.
16 Sep 2015 - 7:09 pm | मुक्त विहारि
.....आणखी एक मुक्ताफळ."
फुलथ्रॉटल जिनियस, उधळत असलेल्या ज्ञान कणांना, "मुक्ताफळे" असे म्हणू नये.
16 Sep 2015 - 7:58 pm | मुक्त विहारि
फुलथ्रॉटल जिनियस, ह्यांनी तर मौन व्रतच धारण केलेले दिसत आहे....
16 Sep 2015 - 8:26 pm | मुक्त विहारि
आलेले आहेत....
आता तरी मौन व्रत सोडतात का बघू.
16 Sep 2015 - 9:44 pm | बोका-ए-आझम
मध्यपूर्वेतले सगळेच लोक अतिरेकी आहेत असं कुठे म्हटलंय कोणी? आणि मोसादविषयी किंवा अमेरिकेविषयी इथे कोणाला उमाळा असेल असं वाटत नाही. उमाळा सहानुभूतीपायी येतो आणि सहानुभूती ही ना कधी इझराईलने मागितली आहे ना अमेरिकेने. त्याबद्दल असलंच तर कौतुक आहे.
16 Sep 2015 - 9:58 pm | विवेकपटाईत
विलेक्शन मध्ये डाव्या पक्षाचे तिकीट तुम्हाला मिळण्याची शक्यता....
16 Sep 2015 - 5:34 pm | चिनार
फक्त "असावे" असा म्हणून अंदाज व्यक्त करायचा असेल जागोबाजी माहुलकर सहकारी पतपेढी,मु. पो. शिरजगाव कसबा,ता. चांदूर बाजार, जि. अमरावती यांचा आयसिस संस्थेला आर्थिक पाठिंबा आहे असा माझा अंदाज आहे.
16 Sep 2015 - 7:04 pm | बोका-ए-आझम
श्री रोफलेश प्रसन्न प्रतिसाद आहे. एक चतुर चिनार बडे होशियार!
16 Sep 2015 - 12:27 pm | होबासराव
वारलो :))
16 Sep 2015 - 7:16 pm | मुक्त विहारि
फुलथ्रॉटल जिनियस, हे फार ज्ञानी व्यक्तीमत्व आहे.
पण ते आपले ज्ञान दुसर्याला देत नाहीत.
उदा.
http://misalpav.com/comment/reply/31763/712577
21 Sep 2015 - 5:00 pm | अमृत
http://www.misalpav.com/node/21475 खूप मागे लिहिला होता. वाचून बघा.
22 Sep 2015 - 12:15 pm | महासंग्राम
अमृत लेख आताच वाचला खूप मस्त झालाय
21 Sep 2015 - 8:54 pm | बोका-ए-आझम
मधला जो एकमेव इझराईली अधिकारी ठार झाला, त्याचं नाव जोनॅथन नेतान्याहू. इझराईलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा सख्खा मोठा भाऊ.
22 Sep 2015 - 12:17 pm | महासंग्राम
जोनॅथन नेतान्याहु कोणाच्या चुकीने मारला गेला या बद्दल अजूनही इस्त्रायल मध्ये वाद सुरु आहेत