ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.
चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.
नुकताच अशोक नगर, मध्य प्रदेशला एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.
दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती वर लक्ष गेल. भारत मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.
थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.
अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५५ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हया कडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत. शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारत मातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....
आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली. एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते.(त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात) . लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.
थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.
हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात. एमवे आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल ( तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर त्याचे मानसिक समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.
मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य मानू लागले आहे. दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो .
प्रतिक्रिया
13 Sep 2015 - 10:58 am | कैलासवासी सोन्याबापु
व्हाइट मॅन्स बर्डन थ्योरी अजुन काय!
13 Sep 2015 - 11:48 am | उगा काहितरीच
ही जाहिरात समजावी का ?
13 Sep 2015 - 11:53 am | कैलासवासी सोन्याबापु
ज्जे बात!!
15 Sep 2015 - 9:52 am | नाखु
उगा काहीतरीच हं श्री !!!!
प्रायोजीत पुरवणी वाचक नाखुदा
13 Sep 2015 - 12:16 pm | कंजूस
एका अशाच जाहिरातबाजीच्या तेलाच्या बॅाटलवर चक्क आइपी ग्रेड पॅरफिन ओइल लिहिलेले आहे.खाद्यतेल-खोबरे ,एरंड,तिळ वगैरे नसल्याने कोंडा होण्याचा प्रश्नच येत नाही.
13 Sep 2015 - 4:35 pm | विवेकपटाईत
१. कंपनी ग्राहकांना धोका देत नाही आहे, ग्राहकच लेबल वाचणार नाही तर त्याचाच दोष.
२. कमिशनचे आमिष - १० रुपयांची वस्तू १०० विकत घेणे/ विकणे - दोष कुणाचा.दुर्भाग्य म्हणजे शिकलेले लोक ह्या जाळ्यात अटकतात. ६ लाखांवर जास्त सदस्य असून हि केवळ ५००० सदस्य दहा ते वीस हजार महिना कमवीत असेल. अधिकांश सदस्य भक्त गाजरा कडे पाहत निरर्थक वस्तू विकत घेत राहतात. सामान्य मध्यमवर्गीय परिवाराला ४००० रुपयांचे प्रसाधन सामग्री (साबण, शेम्पू, इत्यादी लागत नाही). या कंपनीचे (nutrilite कंपनीच्या ) महागाच्या वस्तू म्हणजे प्रोटीन पावडर, विटामिन गोळ्या (बाजारापेक्षा अत्यंत महाग). (लहान शहरातले डॉक्टर या कंपनीचे सदस्य बनतात- ग्राहकांच्या (रोगींच्या) डोक्यावर मारल्या जातात).
बाकी
16 Sep 2015 - 12:21 am | एस
बरोबर आहे. चांगला लेख.
16 Sep 2015 - 8:27 am | नाखु
सहमत
स्वस्त आणि मस्त इतकेच बोलून माझे ४ शब्द संपवतो.
नाखु
13 Sep 2015 - 5:45 pm | द-बाहुबली
मला आपले ते आल्म ड्रॉप्स हेअर ऑइल आवडते त्यात वेजीटेबल ऑइल, विटामिन इ, व बदाम इसेंस असतो. मस्त सुंगंध येतो बदामाचा बराच वेळ. फार महागही नाही. लांब केस ठेवायला अजिबात आवडत नाही पण तरीही झोपायच्या आधी लावतो. तेवडॅच बरे वाटते.
16 Sep 2015 - 7:19 am | असंका
अहो ब्रॅन्ड नाव तरी सांगा. आम्ही पण बदाम तेल वापरतो म्हणून म्हणलं. त्यात बदामाचा सेंट असतो होय फक्त?
16 Sep 2015 - 5:43 pm | द-बाहुबली
आपला बजाज.
15 Sep 2015 - 2:17 pm | मदनबाण
रामदेव प्रॉडक्ट्सचा माझा अनुभव तरी चांगला { अजुन तरी } आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
16 Sep 2015 - 2:27 am | अर्धवटराव
दंतकांती टुथपेस्टचा अनुभव फार चांगला आहे.
16 Sep 2015 - 2:35 am | स्रुजा
तरी तो माणुस नुसताच ओळखीचा होता तुमच्या. ज्याचे नातेवाईक अॅमवे किंवा तत्सम एजन्सी घेत नाहीत तो सर्वात सुखी.
16 Sep 2015 - 2:12 pm | मांत्रिक
हा हा हा! मस्तच पंच!
मलाही अनुभव आलाय! उगाच काही पण वस्तु घ्यायला लावतात.
16 Sep 2015 - 8:34 am | बोका-ए-आझम
यांच्यावर लिहा ना पटाईतसाहेब. बाकी सगळ्यांना नेऊन टाका बारा गडगड्यांच्या विहिरीत. तुम्ही दिल्लीवाले असल्यामुळे धौला कुअां पण चालेल.
16 Sep 2015 - 8:07 pm | विवेकपटाईत
धौला कुआं - इथे कुआं तर नाहीच फक्त धूळ माती आन वाहनाच्या धुर्या चा आनंद अनुभवायला मिळेल. प्रचंड संख्येत वाहनांची रेलचाल इथेच बघायला मिळेल.
16 Sep 2015 - 1:05 pm | प्यारे१
मागच्या वेळी (नोव्हेंबर १४) केके ट्रॅव्हलच्या गाडीनं घरुन एअरपोर्टला जाताना सहप्रवाशांबरोबर गप्पा सुरु झाल्या. एक जोडपं मलेशिया का सिंगापूर ला जात होतं.
त्यातल्या नवरोबानं बॅगा उतरवल्यावर माझा क्लास घेतला अॅमवेबद्दल. जवळपास अर्धा तास खिंड लढवत होतो. जाताना शेवटी घरचा नंबर दिला.
परवा साहेबांनी त्या नंबरवर व्हत्सप्प करुन चौकशी सुरु केली होती. चिकाटी मानली पाहिजे.
16 Sep 2015 - 9:02 pm | सुबोध खरे
प्यारे बुवा
आमच्या एका चिकट नातेवाईकाने मला अम्वे ची उत्पादने विकत घ्यायची गळ घातली. मी त्याला सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितले कि बाबारे यात तुझा नफा किती तितके पैसे मी तुला असेच देतो उगाच नको असलेली उत्पादने माझ्या गळ्यात घालू नको. त्यावर त्याने बरीच बडबड केली पुढे काही दिवस माझ्याशी बोलत नव्हता मग सर्व काही सुरळीत झाले. आजतागायत मी स्वतः एकही अम्वे चे उत्पादन घेतलेले नाही.
भीड भिकेची बहीण असे आमची आई म्हणते. भीड बाळगून तुम्ही एखादे उत्पादन गळ्यात घालून घ्यायचे आणी नंतर त्या माणसाला शिव्या घालत बसायचे यापेक्षा त्या माणसाने मला शिव्या घातलेल्या मला चालतात. आणी नाती टिकवून ठेवणे हि काही माझी एकट्याची जबाबदारी नाही. खिशातून अनावश्यक खर्च करून नाती टिकवून ठेवणे मला जमत नाही
16 Sep 2015 - 9:31 pm | प्यारे१
>>> आजतागायत मी स्वतः एकही अम्वे चे उत्पादन घेतलेले नाही.
तुलनात्मक रित्या अॅम्वे या कंपनीची उत्पादनं चांगली वाटतात.
(माझा दुरान्वये संबंध नाहीये अॅम्वेशी पण काही गोष्टी कुणा़ कुणाकडे वापरल्यात त्यावरुन वाटतं.)
16 Sep 2015 - 10:05 pm | विवेकपटाईत
त्यांच्या उत्पादित वस्तूंवर दिलेले उल्लेख वाचा. कुणाच्या हि सहज लक्ष्यात येईल अधिकांशी उत्पादने निकृष्ट दर्जाचे आहेत. (कदाचित सर्वात निकृष्ट दर्जाचे आमला ओईल इम्वेचेच असेल) शिवाय ज्या दर्जाच्या वस्तू दुसर्या कंपन्या १०० रुपयात विकतात त्याच दर्जाची एमवे उत्पादने ४०० ते ५०० रुपयाच्या खाली मिळणार नाही. ( अमेरिकन कंपनीचा नफा. एमवेचा नफा, सदस्यांचा ४० टक्के नफा (अर्थात त्यातला अधिकांश नफा एमवेच्या खिशातच जातो).
16 Sep 2015 - 10:10 pm | प्यारे१
शक्यता नाकारता येत नाही.