"वार्याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना.
महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच.
"मग सांगीतेलस ना तुझ्या घरच्यांना ?"
.....
"धडाधडा बोल घुमेपणा सोड आता."
"मला धीरच होत नाही, सांगायला"
" पण कधीतरी कळणारच ना मग तूच सांगीतलेले चांगले ,तेही लगेचच"
"अरे याचे परिणाम काय होतील माहीतीयत ना ? तू सांगीतल का त्यांची संमती ?"
" सांगीतल्येय आणि मी स्वछंदी माझा निर्णय मीच घेतो, माहीतेय घरच्यांनाही !"
...
पडद्याच्या धक्क्याने पडलेली तस्वीर उचलताना डोळ्यातील पाणी बोटांबरोबर तस्बीरीला कधी लागले ते तीलाही कळले नाही.
तस्बीरीतले दोघे खरे आपल्यालाच बघतायेत का भास आहे नुसता.
============
उत्तरार्ध :
तस्बीरीत कसे अगदी एक्मेकांत विरघळल्यासारखे आणि उमलणार्या फुलासारखे प्रसन्न. पण आता इतकी टोकाची फरपट ? परतीचे दोर तर मागे नाहीतच या प्रेमविवाहात. मग पुढे ? दाराची बेल कर्कश्श वाजत राहीली.
"आई $$$$ तुम्ही !!! या ना, पण तो नसतो इथे हल्ली !"
"माहीत्येय म्हणूनच आलेय "
"पण इथला पत्ता..."
"ते महत्वाच नाही तुझे कपडे आवरून सामान घे आणि चल घरी"
"घरी ? कुठे?? आणी तुम्हाला कुणी....."
"सगळं घरी गेल्यावर सांगते. माझ्या लेकाला तुला मुक्त करायचं ना मग तूच त्याला सोड कायमचा, आणि ..."
पण आई मी कुठे जाऊ ?
कुठे म्हणजे? माझ्याकडे, लेक आपल्या आईकडेच येणारना !
घट्ट मिठीत आईच्या मायेचा रंध्रानुभव डोळ्यातल्या अश्रूंनी बाहेर पडत होता तर "अहो आई" स्वतःच्या डोळ्यातील अश्रूंना मुक्त करीत होत्या
प्रतिक्रिया
25 Aug 2015 - 11:01 am | नाखु
दुरुस्ती करणे स्पर्धेतून हटवणे.
नजर्चुकी क्षमा नाखुस
25 Aug 2015 - 11:55 am | प्यारे१
खासच! सतराशे साठ खाष्ट सासवांच्या (एवढ्या खाष्ट नसतात खरंतर, सुनांच्या मनातच जास्त असतात) गोष्टी पेक्षा ही एक गोष्ट वाचावी.
25 Aug 2015 - 12:04 pm | अद्द्या
:)
25 Aug 2015 - 12:09 pm | एस
छान आहे.
25 Aug 2015 - 7:23 pm | प्रचेतस
उत्तम समारोप.
26 Aug 2015 - 6:59 am | अत्रुप्त आत्मा
+१
25 Aug 2015 - 7:43 pm | बहुगुणी
अर्थात्, पूर्वार्धाचा उत्तरार्धाला संदर्भ आहेच, पण उत्तरार्ध आधिक आवडला, किंबहुना, मला वाटतं की उत्तरार्ध on its own एक सशक्त शतशब्दकथा आहे.
26 Aug 2015 - 12:01 am | पैसा
अगदी असेच!
कथा आवडली!
25 Aug 2015 - 7:43 pm | बबन ताम्बे
आवडली कथा.
25 Aug 2015 - 7:54 pm | यशोधरा
आवडली कथा.
26 Aug 2015 - 12:13 am | पिलीयन रायडर
आवडली..
26 Aug 2015 - 11:52 am | नूतन सावंत
ही सासू पाहून माझी आई आठवली. मुलासुनेच्या भांडणात मुलाला घराबाहेर काढणारी आणि त्याने आत्महत्या केल्यवर भिरभिरलेली.
कथा म्हणून सुरेख.
28 Aug 2015 - 11:47 pm | तुमचा अभिषेक
ओह्ह.. खरेच..
ही कथाही आवडली
26 Aug 2015 - 12:02 pm | gogglya
अश्या विषयांवर मालीका का बनवत नाहीत मराठी निर्माते ?
26 Aug 2015 - 2:24 pm | अन्या दातार
:)
26 Aug 2015 - 4:22 pm | माधुरी विनायक
कथा आवडलीच. सत्य कथा असेल तर सोन्याहून पिवळे...
26 Aug 2015 - 4:28 pm | इशा१२३
आवडली
26 Aug 2015 - 4:50 pm | मुक्त विहारि
+१
जबरदस्त कथा....
(आमच्या एका ओळखीच्या घरात घडलेली कथा.त्यामुळे जास्त आवडली.)
27 Aug 2015 - 12:39 pm | तुडतुडी
मस्त अश्या गोष्टी प्रत्यक्षात सुधा घडतात . काही महिन्यांपूर्वी बातमी वाचली होती
27 Aug 2015 - 9:36 pm | रातराणी
+१
सकारात्मक गोष्ट आवडली
29 Aug 2015 - 4:35 pm | शिव कन्या
सुन्दर ! +१ +१