"कर" आहे त्यालाच "डर" आहे…

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
24 Aug 2015 - 4:04 pm
गाभा: 

एक सतत छळणारा प्रश्न आज तुम्हाला विचारू इच्छितो…. आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का?

उत्पन्नाचा कर ,विक्रीकर,सेवाकर,मूल्यवर्धित कर आणखी इतर हजारो प्रकारचे कर भरून भारतीय माणसाच्या खिशात उरतं तरी काय ? बरं, इतकं करून, कर भरून आणि त्याच्या ओझ्याखाली मरून त्याचे सरकारकडून काही लाभ मिळावेत असं म्हणावं तर तेही नाही….

निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !! ह्यातच पुढची पिढी आपला एक नवीन अडथळ्यांचा प्रवास सुरु करते आहे …. सशक्त आणि सुजाण नागरिक घडणार कसे आणि कुठून ?

ज्यांना शक्य आहे ते सरळ परदेशाचा रस्ता धरतात …. भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे !! ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे…आयुष्यभर नोकरी करून त्या पैशात मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय …. आणि कसली अपेक्षा मनात धरून उमेदीने काम करत राहायचे?

ह्या सगळ्याचा सर्वोच्च त्रास मध्यमवर्गीय पांढरपेशांना जे सहज पकडले जाऊ शकतात …. गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच ….

जगावं तरी कोणत्या उत्साहाने ह्या ठिकाणी माणसाने ? की मेंढरांच्या कळपासारखं नाशिबात असेपर्यंत जगात राहावं आपल्याच नशिबाला दोष देत ? मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही का ह्या देशात?

पुनर्जन्माचे माहित नाही पण तो असलाच तर पुन्हा हेच रहाट गाडगं नको रे देवा !!

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

24 Aug 2015 - 4:12 pm | विजुभाऊ

मत देण्याचा हक्क फक्त कर देणारालाच दिला तर बराच फरक पडेल.
कर देणारे आणि न देणारे यांच्या मतांच्या संख्येची तुलना करा मग सममजेल मी काय म्हणतोय ते.
अर्थात सेल्स टॅक्स / एक्साईज वगैरे इन्डायरेक्ट करां बद्दल बोलत नाहिय्ये. फक्त इनकम टॅक्स बद्दल बोलतोय.

मत देण्याचा हक्क फक्त कर देणारालाच दिला तर बराच फरक पडेल.

म्हणजे भारतात फक्त दोनेक कोटीच मतदार राहतील :)

काळा पहाड's picture

25 Aug 2015 - 12:34 am | काळा पहाड

माझं या बाबतीत मत असं होतं की मताचं कॅल्क्युलेटेड स्वरूप हवं. जसं की पीएच्डी वाल्याला उदाहरणार्थ ७ मतं आणि ग्रॅज्युएट ला ४ मतं. १० वी पास न झालेल्याला एकच मत. जास्त शिकणारा जास्त विचार करतो किंवा त्याला करावा लागतो हे खरं आहेच.
दुसरं म्हणजे इन्कम्टॅक्स भरणार्‍याला जास्त मतं द्यायची. न भरणार्‍याला एकच मत.
सोशल सर्व्हिस चं रेकॉर्ड असणार्‍याला जास्त मतं. घरकोंबड्यांना एकच.
प्रॉपर्टी टॅक्स भरणार्‍याला जास्त मतं. झोपडपट्टी वाल्यांना एकच.
अशी कॅटेगिरी तयार करून मग माणसाला असणार्‍या मतांची बेरीज करून ती विचारात घेतली तर?

असंका's picture

25 Aug 2015 - 9:10 am | असंका

कंपन्या पण आयकर भरतात. त्यांना पण मताधिकार द्यायचा का ?

असंका's picture

25 Aug 2015 - 2:10 pm | असंका

_/\_

गॅरी ट्रुमन's picture

25 Aug 2015 - 12:44 pm | गॅरी ट्रुमन

पूर्वी मलाही वाटायचे की शिकलेले लोक निवडून आले तर जास्त चांगले होईल. पण गेल्या काही वर्षात शिकलेल्या लोकांनी जे दिवे लावले आहेत ते बघून तो भ्रम गळून पडला. दयानिधी मारन, अरविंद केजरीवाल इत्यादी गणंग चांगले शिकलेलेच आहेत.शिकलेले लोक चारसो-बिसी करायचे अधिक हुषार मार्ग शोधून काढतात तर अशिक्षित नेते त्या बाबतीत इतके पुढारलेले नसतात असे म्हणता येईल. आपले ममोसाहेब काय कमी शिकलेले होते.पण शेवटी रागासारख्याला कधीही पंतप्रधानपद आपण खाली करून देऊ असे म्हणालेच ना ते?पृथ्वीराज चव्हाण तर बर्कलेचे.तरीही राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि जातीयता त्यांनी उघड्या डोळ्याने बघितलीच की नाही?

गॅरी ट्रुमन's picture

25 Aug 2015 - 12:45 pm | गॅरी ट्रुमन

त्यामुळे शिकलेल्यांचे जजमेंट चांगले असते का हाच प्रश्न पडायला लागला आहे.

त्यामुळे शिकलेल्यांचे जजमेंट चांगले असते का हाच प्रश्न पडायला लागला आहे.
सहमत
भारतात लोकसंख्येच्या ५०% लोकांना( टक्केवारी पुढे मागे होईल मुद्दा लक्षात घ्यावा) गरिबी मुळे शिक्षण घेणे परवडत नाही. त्यांना अशिक्षितपणा मुळे मतदानापासून वंचित ठेवणे हे पटत नाही. कारण शिक्षण घेत आले नाही. हा संपूर्णपणे त्यांचा दोष म्हणता येणार नाही.
याच वेळेस अनेक नरपुंगव असे आहेत कि जे सुशिक्षित असले तरी त्यांना मताधिकार देणे हा लोकशाहीचा अपमान आहे. उदा. याकुब मेमन हा सी ए होता. परंतु दहशतवादी झाला आणि अख्या यंत्रणेला मरेपर्यंत (आणि मेल्यावरही) वेठीस धरले.
तेंव्हा एका माणसाला एक मत हे पटत नसले तरीही शिक्षित माणसाला जास्त मते आणि अशिक्षित माणसाला मताधिकार नाही हेही पटत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2015 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे

केवळ शिकलेले/अशिक्षित असेच नाही तर 'जजमेंट' बर्‍याच स्तरांवर चुकलेले आहे...

देशाची घटना तुरुंगात असलेल्या मतदाराला मतदान करू देत नाही पण त्याच तुरुंगात राहून तथाकथित नेता निवडणूकीला उभा राहू शकतो !

अश्याच बर्‍याच 'जजमेंट्स'च्या आधाराने गुन्हेगार पार्श्वभूमीचे नेते कायदे बनवणार्‍या आणि घटनाबदल करू शकणार्‍या सर्वोच्च स्थानासकट (लोकसभा) इतरत्रही घट्ट मांड ठोकून बसलेले असल्याने शासनात व समाजात सकारात्मक बदल घडवणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. :(

हुप्प्या's picture

25 Aug 2015 - 8:39 pm | हुप्प्या

निवडून आलेले लोक किती शिकलेले आहेत हा मुद्दा गौण आहे. त्यांना निवडून देणारे किती शिकलेले आहेत वा असावेत हा कळीचा मुद्दा आहे. जर जास्त शिकलेल्या लोकांच्या मताची किंमत जास्त असती तर कदाचित केजरीवाल निवडून आलाही नसता.

अडाणी लोकांच्या तुलनेत शिकलेले मतदार जास्त प्रगल्भ असतात असे मलाही वाटते पण त्याला पाठबळ देणारी उदाहरणे सुचत नाहीत.

गॅरी ट्रुमन's picture

25 Aug 2015 - 10:31 pm | गॅरी ट्रुमन

अडाणी लोकांच्या तुलनेत शिकलेले मतदार जास्त प्रगल्भ असतात असे मलाही वाटते पण त्याला पाठबळ देणारी उदाहरणे सुचत नाहीत.

असे वाटायचे गृहितक कोणते--मला वाटते की शिकलेले मतदार अधिक प्रगल्भ असतात असे वाटायचे गृहितक हे की शिकलेल्यांचे जजमेन्ट न शिकलेल्यांपेक्षा जास्त चांगले असते.मलाही पूर्वी तसेच वाटायचे. पण मतदारांच्या बाबतीत तशी उदाहरणे दाखवता येणे अर्थातच शक्य नाही.म्हणून ज्या शिकलेल्यांचे जजमेन्ट न शिकलेल्यांपेक्षा जास्त चांगले असतेच असे नाही याचे उदाहरण म्हणून निवडून गेलेल्यांचे उदाहरण दिले.मान्य आहे की मतदारांचे उदाहरण द्यायला हवे पण तसा विदा अर्थातच उपलब्ध नाही.

नाखु's picture

26 Aug 2015 - 5:14 pm | नाखु

पण साक्षर आणी सुशिक्षीत यातच खरी मेख असावी असे वाटते कारण आपली पूर्वसूरी मते-आदर्श पुन्हा तापासण्याची आवश्यक्ता वाटत नाही,अन्यथा वरील पैकी एकही उमेदवार पात्र नाही या पर्यायाला पाठींबा/जोरदार अनुमोदन असे काहीही दिसत नाही. सुशिक्षीत थोडे ४ हात लांब आणि उदासीनच राहतात मतदान प्रक्रियेपासून.

किमान २ वर्षे निवडणूक बूथवरील अनुभवी.

नाखुस पांढरपेशा

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2015 - 5:38 pm | गॅरी ट्रुमन

अन्यथा वरील पैकी एकही उमेदवार पात्र नाही या पर्यायाला पाठींबा/जोरदार अनुमोदन असे काहीही दिसत नाही.

याचे कारण वरीलपैकी कोणी नाही या पर्यायाला दात (teeth) नाहीत हे असेल का? समजा पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते नोटाला मिळाली तर निवडणुक रद्द होऊन नव्याने निवडणुक होणार असेल तरच नोटाला दात आहेत असे म्हणता येईल. सध्याच्या परिस्थितीत नोटाला मत देणे म्हणजे मतदानाला न जाण्यापेक्षा वेगळे नाही.या पर्यायाला पाठिंबा मिळत नाही त्याचे हे कारण असू शकेल का?

अस्वस्थामा's picture

26 Aug 2015 - 6:19 pm | अस्वस्थामा

पण क्लिंटन भौ.. ती मते टक्केवारीसाठी का होईना पण विचारात घेतली जातातच की. जे मतदानास जातच नाहीत त्यांची मते तशा अर्थाने ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
जरी अत्ता दात नसले तरी किमान एका ठिकाणी जरी असे "नोटा"ची टक्केवारी जास्त झाली उमेदवारांच्या मतापे़क्षा तर काय होते ते पहायला आवडेल. नव्हे तो एक प्रकारचा जनमताचा रेटाच असेल ना.

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2015 - 6:26 pm | गॅरी ट्रुमन

ती मते टक्केवारीसाठी का होईना पण विचारात घेतली जातातच की

हो बरोबर. पण त्याचा त्यापेक्षा जास्त उपयोग नसतो.

किमान एका ठिकाणी जरी असे "नोटा"ची टक्केवारी जास्त झाली उमेदवारांच्या मतापे़क्षा तर काय होते ते पहायला आवडेल. नव्हे तो एक प्रकारचा जनमताचा रेटाच असेल ना.

तसे झाले तर तो जनमताचा रेटा असेलच.पण जो उमेदवार विजयी घोषित झाला आहे तो "माझ्यापेक्षा नोटाची मते जास्त आहेत" या कारणामुळे खासदार/आमदार पदाचा राजीनामा द्यायची शक्यता फारच थोडी.तसा राजीनामा दिला गेल्यास मात्र या नोटाला दात मिळतील.

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 3:16 pm | पगला गजोधर

'शिकलेल्यांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या 'अशिक्षितांना' भडकावून रक्ताचे पाट वाहणारा एखादा पॉल पॉट निपजायचा…….
'पैशेवाल्यांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या गरिबांना भडकावून रक्ताचे पाट वाहणारा एखादा माओ निपजायचा…….
'कुलीन लोकांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या गरिबांना भडकावून फ्रेंच राज्यक्रांतीसारखी परिस्थिती यायची…….
'विशिष्ठ धर्मियांना' जास्त मताधिकार दिला तर कदाचित उद्या बाकीच्यांना भडकावून एखादा हिटलर किंवा एखादी अल कायदा / इसीस यायची…….

त्याऐवजी आपण जो कररुपी निधी देतोय त्या सरकारच्या लोकप्रतिनिधीला जाब विचारायला शिकलं पाहिजे.

लाख मोलाची बात.
+१०००००

खटपट्या's picture

24 Aug 2015 - 4:18 pm | खटपट्या

पंखा साहेब, भेटा कधीतरी. आता बसावेच लागणार.

खटपट्या's picture

24 Aug 2015 - 4:19 pm | खटपट्या

सोबत, गायब झालेल्या त्या टक्कूमक्कूशोनुला पण घेउन या..

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Aug 2015 - 4:30 pm | माम्लेदारचा पन्खा

ते मांत्रिकांनाच विचारावे लागेल !

नजर लावली त्या कोवळ्या निरागस बाळाला इथल्या जळक्या डोमकावळ्यांनी !

एक कच्ची कैरी कॅल्शियम कार्बाईडचे इंजेक्शन देऊन अवेळी पिकवली....

अस्वस्थामा's picture

24 Aug 2015 - 5:52 pm | अस्वस्थामा

एक कच्ची कैरी कॅल्शियम कार्बाईडचे इंजेक्शन देऊन अवेळी पिकवली....

अग्गागा .. (परत एकदा) बसवला टेंपोत.. :D

या प्रतिसादासाठी मामलेदारांना कच्ची कैरी फ्लेवर्ड चॉकलेट पैकेट गिफ्ट गिफ्ट गिफ्ट!

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 4:22 pm | मांत्रिक

आता बसावेच लागणार.
ब्रॅण्ड कोणता आहे?
गमतीत घ्या!

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 4:24 pm | मांत्रिक

मापंजी खूप मोठी व्यथा मांडली आहे मनातली. लोकसंख्या १५० कोटीकडे जात आहे. तेव्हा तर काय होईल विचारही करवत नाही.

खटपट्या's picture

24 Aug 2015 - 4:25 pm | खटपट्या

नाय वो मी नाय त्यातला. फक्त चखणा दाबून खातो आणि खीलवतो...

खेडूत's picture

24 Aug 2015 - 4:30 pm | खेडूत

भावना पोहोचल्या.

कांही वर्षांनी तुम्हाला त्याची सवय होईल आणि असे वाटणार नाही.

न झाल्यास:

१. शक्य असल्यास परदेशांत निघून जा - पण तिथे सगळं आलबेल आहे असं नाही. समस्या वेगळ्या आहेत इतकंच !

२. किंवा नोकरी न करता '' गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक'' यांच्यात सामील व्हा .

३. हल्ली प्रत्येक दहा वर्षांत परिस्थिती फारच बदलते. त्यामुळे फार दूरचा विचार कशाला करता?

४. पुनर्जन्म नसतो , यावर ठाम राहणं चांगलं. जर असता तर आपल्याला मागच्या वेळचं आठवलं असतं कदाचित. ते फीचर नसेल तर असलेला पुनर्जन्म निरर्थक नाही काय?

मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय?

आपल्याला मुंबई पुण्यातच घर का घ्यायचंय?

मी पुण्यात घेतलेलं घर भाड्याने दिलंय - घराच्या किमतीच्या ०.०१ % भाडं मिळतं - तेही करपात्र आहे ! मग भाड्याच्या घरातच राहिलेलं काय वाईट? गेल्या दशकात वाढलेली किंमत ही जमेची बाजू- पण विकत नाही तोपर्यंत निरर्थक. विकले तरी पुन्हा दुसरे घर घेणे आले. नाहीतर …

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 4:44 pm | संदीप डांगे

'जगायचं' असेल तर मुंबय सोडा.

फक्त 'जीवंत' राहून खुश असाल तर नको.

मदनबाण's picture

24 Aug 2015 - 7:03 pm | मदनबाण

+१
अगदी हेच म्हणावेसे वाटते !
दुनियाभरचा टॅक्स भरुन कमालिचे कष्टप्रद जीवन जगावे लागत आहे, आजचा भरवसा उध्याचे काय ? असे विचार मनात यावेत अशी परिस्थीती वाटते, सध्या डाळीचे भाव आणि रडवणारे कांदे चर्चेत आहेत ! दुष्काळ गंभीर आहे आणि बळीराजाच्या बळींची आकडेवारी काही केल्या थांबताना दिसत नाही ! :(
आज महाराष्ट्रात भयानक अवस्था असुन, राजकारणी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करताना पातळी सुद्धा सोडुन मोकळे झाले आहेत !
नाना आणि मकरंद यांनी बीडचा दौरा केला तेव्हा खरे बीड दर्शन या "पुरोगामी' महाराष्ट्राला घडले. :(

काय बातम्या वाचाव्यात हेच आजच्या काळात कळत नाही ! रोज बलात्कार, आत्महत्या, चोर्‍या, दुष्काळ सगळच भयानक ! :( हल्ली काय करावे आणि पहावे तेच कळेनासे झाले आहे ! :(
सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे आणि मरणे महाग ! :(

मदनबाण.....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Aug 2015 - 5:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे

सहमत.

आगदि मनातल बोल्लात. पण धिर सोडुन कसे चालेल? सकारात्मक विचार करा.

उगा काहितरीच's picture

25 Aug 2015 - 12:49 am | उगा काहितरीच

चांगल्या गोष्टी पण बघा ना राव !

विकास's picture

25 Aug 2015 - 6:05 am | विकास

या चर्चेत आलेल्या मतदानाच्या हक्कांसदर्भात रोगा पेक्षा इलाज भयंकर...असे म्हणावेसे वाटते.

समाजातील फक्त एकाच वर्गास मताचे अधिकार दिले अथवा अगदी त्यांच्या मताला जास्त मुल्य दिले तर एक विचित्र वर्गवाद आपण तयार करू. त्या शिवाय ज्यांच्याकडे पैसे आहेत, संपत्ती आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अधिक सत्ता आहे त्यांच्याकडे कालांतराने सगळीच सत्ता, त्यातील कायदे सगळेच एकवटणार आणि "नाहीरे" वर्गाचे हाल होणार. आधी जाती होत्या आता वर्ग येतील इतकाच फरक. यातून बाकी काही नाही तरी नविन उद्रेकाची तयारी होणार.

गॅरी ट्रुमन's picture

25 Aug 2015 - 10:45 pm | गॅरी ट्रुमन

+१०००००

ऋतुराज चित्रे's picture

25 Aug 2015 - 9:54 am | ऋतुराज चित्रे

मत देण्याचा हक्क फक्त कर देणारालाच दिला तर बराच फरक पडेल.

शेतकर्‍याला प्राप्तिकर नसल्यामुळे देशातील सर्वात मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहील, त्याचे नेतृत्व कोण करणार?

प्राप्तिकर न भरणार्‍यांना मतदानाचा अधिकार का नसावा? मी तर म्ह्णतो असं असेल तर मतदानाचा हक्क नसणार्‍याकडून सरकारने कोणतेही कर घेऊ नये.

तुम्हाला, तुमच्या जवळच्यांना सेफ्टी हवी असेल, तर कुणालातरी त्यासाठी खर्च करावा लागणार आहे. ज्याप्रमाणे नुसती दवंडी पिटून मधल्या चौकातल्या हंड्यात फक्त पाणीच जमा होऊ शकतं, दुध नाही, त्याप्रमाणे कठोर शासन/ डर असल्याशिवाय करही नाही आणि कुणालाच सुरक्षाही नाही.
त्यात खंत करण्यासारखं काये?

गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच ….

वाट्टेल ते!! नोकरी कुणाची करतात पांढरपेशे नोकरदार लोक? दुसर्‍यांना नोकरी देणारे व्यापारी, राजकारणी, बुवा/बाबा किती वेळा स्वतःला गहाण ठेवतात याची कल्पना नाही का तुम्हाला?

नुसते अलाहिदा नाही रहात ते. किंमत देतात त्या अलाहिदा रहाण्याची. एक व्यापारी, राजकारणी, बुवा, बाबा हे एक व्यवस्था उभी करतात. त्यात स्वतःला पूर्ण गुंतवून घेतात. ही १० ते ६ अशी आठ तासाची गुंतवणूक नाही. पूर्ण चोवीस तासांची गुंतवणुक आहे. आणि त्यामधून हे लोक इतर अनेक लोकांच्या- त्यात पुन्हा नोकरदारही आले, बुवा/बाबा आले, राजकारणीही आले- उपजीविकेची सोय करतात.

भ्रष्टाचाराला शिव्या देणं फार सोपं आहे. पण समजा, जर भ्रष्टाचार केला नाही तर ही व्यवस्था बंद पडेल आणि कमीत कमी एक निर्दोष माणसाची उपजीविका धोक्यात येइल अशा परीस्थितीत जर एखाद्याने भ्रष्टाचार केला तर तो दोष कुणाचा? नोकरदाराला माहित असतं सगळं. पटत नसेल, तर सोडून द्या ना ती नोकरी! तरीही तो नोकरी करतो ना तिथेच. तो नाही अलाहिदा राहिला?

माझ्या विचारसरणीत काही दोष असतीलही. भ्रष्टाचाराचं समर्थन मी करत नाही. फक्त ज्या पद्धतीने आपण सोडून बाकी सगळे भ्रष्टाचारी ही विचारसरणी बाळगली जाते अनेक नोकरदार पांढरपेशांकडनं ती माझ्या डोक्यावरनं जाते.

निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !!

रस्त्यावरचे खड्डे? निकृष्ट खाद्य? लोकलची गर्दी? ह्या समस्या आहेत? उद्या खायला मिळेल की नाही? रस्ता जाऊ दे, डोंगरवाटेवरनं किंवा नदी पार करून तरी कामावर जायला मिळेल की नाही? काही काम मिळेल की नाही? मला कुणी ठार तर मारून टाकणार नाही खालची मान वर केली म्हणून? हे काय आहे मग?

तुम्ही किंवा मीही, त्यांच्या समस्या सोडवू शकत नाही. पण कुणीतरी तरी सोडवायला हव्यातच ना? तो जो कोण आहे, त्याला तुम्ही कसं पटवून देणार की तुमची समस्या ही त्या समस्यांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे? मुळात तुमचं तुम्हाला तरी म्हणावंसं वाटेल का की तुमची समस्या एवढी मोठी आहे, की तुम्ही या देशावरच वैतागावं? कसल्या प्रश्नांनी स्वतःचा छळ करून घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे...

(आपण जुने सदस्य दिसत आहात. लहान तोंडी मोठा घास होत असल्यास क्षमस्व...!)

तुम्हाला, तुमच्या जवळच्यांना सेफ्टी हवी असेल, तर कुणालातरी त्यासाठी खर्च करावा लागणार आहे.

मान्य आहे पण आम्हाला सेफ्टी हवी म्हणून आम्ही आमच्या बरोबरच बाकीच्या लोकांनाही मिळतेय की… बाकीचेच काही करत नाहीत पण तरीही त्यांचे हक्क अबाधित आहेत …. त्यांचा भार समाजाच्या एकाच विशिष्ट वर्गावर येतोय हे पटत नाहीये …. हे म्हणजे घरच्या मोठ्या भावाने कमवून आणावे आणि उरलेल्या अख्ख्या परिवाराने हातपाय न हलवता आयतेच बसून खावे असं झालंय …

मुळात तुमचं तुम्हाला तरी म्हणावंसं वाटेल का की तुमची समस्या एवढी मोठी आहे, की तुम्ही या देशावरच वैतागावं? कसल्या प्रश्नांनी स्वतःचा छळ करून घ्यायचा हे तुमच्याच हातात आहे...

छळ असा ना तसा होतोच आहे …. ज्याची जळते त्यालाच कळते …. त्रागा तोच करतो जो सगळा भार एकटाच वाहून दबलेला असतो …देशावर वैतागायचं प्रमुख कारण हेच आहे की त्यातल्या समाजधुरिणांना ह्याच बाबतीत सोयीस्करपणे दिग्मूढ का व्हायला होतंय हे कळत नाहीये ….

त्यांचा भार समाजाच्या एकाच विशिष्ट वर्गावर येतोय हे पटत नाहीये …. हे म्हणजे घरच्या मोठ्या भावाने कमवून आणावे आणि उरलेल्या अख्ख्या परिवाराने हातपाय न हलवता आयतेच बसून खावे असं झालंय …

कसं? काहीतरी उदाहरण द्या ना कि कोण हातपाय न हलवता तुमच्या कष्टांवर मजा करतोय?

देशावर वैतागायचं प्रमुख कारण हेच आहे की त्यातल्या समाजधुरिणांना ह्याच बाबतीत सोयीस्करपणे दिग्मूढ का व्हायला होतंय हे कळत नाहीये

समाजधुरीण समाजाबाहेरचे असतात का? तुम्ही व्हा समाजधुरीण? (रच्याकने समाजधुरीण म्हणजे नेते असं समजून लिहितोय..मला ह्या शब्दाचा नक्की अर्थ माहित नाही.).

समस्या सांगू नका. समस्या माहित आहेत. त्यांची उत्तरं सांगा. समस्यांपासून दूर जायचं म्हणलं तर या उभ्या विश्वात कुठेतरी जागा मिळेल का?

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2015 - 5:55 pm | माम्लेदारचा पन्खा

काहीतरी उदाहरण द्या ना कि कोण हातपाय न हलवता तुमच्या कष्टांवर मजा करतोय?

तुम्हाला खरंच आजूबाजूची परिस्थिती दिसत नाहीये की तुम्ही मुद्दामून डोळेझाक करताय? जे चाललाय ते छान चाललाय असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग खुंटलाच संवाद ! राहायला भारतातलेच ना तुम्ही ? मुंबईत घुसलेले यच्चयावत घुसखोर, बांगलादेशी, नायजेरियन दिसत नाहीत का तुम्हाला ? अनधिकृत झोपडपट्टी मधली वीज, पाणी, रेशन कार्ड कुठून येतात? किती उदाहरणं देऊ? का पोसायचं आपण ह्यांना??

प्रश्न खूप आहेत हो, उत्तरंच नाहीयेत कुणाकडे !!

समस्या सांगू नका. समस्या माहित आहेत. त्यांची उत्तरं सांगा.

तुमचे शब्द ऑफिसातल्या बॉससारखे वाटतात ….
उत्तरं परिस्थितीसापेक्ष असतात …प्रश्न हा अस्तित्वाचा आहे आणि माणूस हा कळपात राहणार प्राणी असल्याने सगळ्या कळपानेच मिळून शोधायची उत्तरं !! मी कुणी नेता किंवा हुकुमशहा नाही पण जे चाललाय ते चूक आहे इतका कळतंय … तुम्हीही तुमची भर घाला की !

तुम्हाला खरंच आजूबाजूची परिस्थिती दिसत नाहीये की तुम्ही मुद्दामून डोळेझाक करताय? जे चाललाय ते छान चाललाय असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग खुंटलाच संवाद ! राहायला भारतातलेच ना तुम्ही ? मुंबईत घुसलेले यच्चयावत घुसखोर, बांगलादेशी, नायजेरियन दिसत नाहीत का तुम्हाला ? अनधिकृत झोपडपट्टी मधली वीज, पाणी, रेशन कार्ड कुठून येतात? किती उदाहरणं देऊ? का पोसायचं आपण ह्यांना??

प्रश्न खूप आहेत हो, उत्तरंच नाहीयेत कुणाकडे !!

मला मुंबईतली परीस्थिती माहित नाही हे तर खरंच आहे. पण एक कळतं मला, की जसे काही काही मुंबईकर काही काही लोकांना घुसखोर समजतात तसेच तुम्ही गोर्‍या लोकांच्या देशात गेल्यावर काही काही (!) लोक तुम्हाला घुसखोर समजतात. मागे एकदा अमेरीकेत एका शीख धर्मस्थळावर हल्ला झाला होता. त्यावेळी मी एका संघटनेबद्दल ऐकलं होतं- व्हाइट सुप्रीमसी. तुम्ही ऐकलंय का?

सगळ्या कळपानेच मिळून शोधायची उत्तरं

ग्रीस मधल्या सार्वमतासारखी?

तुमचे शब्द ऑफिसातल्या बॉससारखे वाटतात ….

मान्य...! एस बी आय च्या एका शाखेत मी ते वाचलं होतं. मी कधी कधी सोडून देतो ते वाक्य ती माझीच अक्कल असल्यासारखं.

पण त्याने काय फरक पडतो? कळप झाला की काय आपोआप उत्तरं सापडतात? कुणीतरी दोघे चौघे काहीतरी उत्तरं देतात आणि त्यातलंच एक निवडलं जातं ना? मुळात समस्या ज्यांना दिसतीये, जे मांडतायत, त्यांनी त्याच्यावर इतरांपेक्षा जास्ती विचार केलेला आहे म्हणूनच ते मांडतायत ना? की त्यांना असं वाटतंय की इतरांना कुणाला ही समस्या आहे हेच माहित नैये?

मुळात तुम्ही मांडलेले प्रश्न हे अत्यंत मर्यादीत स्वरूपाचे आहेत. मुंबई सोडली की प्रश्न संपले असे. आणि मुळ मुद्द्यापासून वेगळे आहेत. मी असं म्हणलो होतो - तुम्ही तो मुद्दा आणलात म्हणून - की स्वतः हातपाय न हलवता- "तुमच्या" कष्टांचा फायदा कोण घेत आहे?

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2015 - 7:38 pm | माम्लेदारचा पन्खा

उरलेले सगळे आयतोबा खातायत.....गुंड, राजकारणी,बुवा आणि फुकटे !!

उरलेले सगळे आयतोबा खातायत.....गुंड, राजकारणी,बुवा आणि फुकटे !!

यावर वाद घालणं अवघड आहे. आपण माझा मूळ प्रतिसाद वाचलेला नाही का? तरी एक प्रयत्न करतो...

किती गुंडांना पोसता तुम्ही? गुंड होणं म्हणजे काहीच न करणं असं वाटतं का तुम्हाला?

राजकारणी? राजकारणी आयतोबा? दिवसाचे अठरा अठरा तास जनसंपर्क ठेवणारे राजकारणी आयतोबा? तुमच्या दारासमोर रस्ता बांधायचा कि नाही, जवळ एयरपोर्ट असू दे की नको, शेतीला किती पाणी सोडावे, प्यायला किती सोडावे, अहो आयुष्याचा एक तरी पैलू आहे का असा, जिथे तुमच्या नकळत या राजकारण्यांच्या निर्णयांनी तुमचं अमाप भलं केलेलं नाही? वर जनता चांगलं न म्हणता वाईटच म्हणणार याची गॅरंटी - यापेक्षा नि:स्वार्थ सेवा कुणी केली असेल तर दाखवा!

बुवा? - एवढंच म्हणतो की हे संवेदनशील असून मी त्यावर भाष्य न करायचा नियम ठरवून घेतलेला आहे. फक्त मी त्यांना आयतोबा मानत नाही हे खरं.

शिवाय देश म्हणजे फक्त गुंड, राजकारणी, बुवा नाही. तुम्ही तुमच्यासारख्या इतर लोकांसाठी पण तर कष्ट करतच आहात ना? आता तुमच्या बागेमुळे संपूर्ण परीसराला शोभा येत असेल, तर तुम्ही ती बाग अजून सुंदर करणार की अर्र, त्या अमुक अमुकलाही माझ्या बागेचा फायदा होतोय म्हणून कुढणार? बाग तर तुमचीच रहाणार ना?

रच्याकने, "तुम्ही" कष्ट -(म्हणजे जे काय तुम्ही- तुम्ही स्वतः एक व्यक्ती म्हणून- करता ते) केले नाहीत तर यांचं पोषण होणार नाही असं तुम्हाला कशावरून वाटतं?

असो.....उडदामाजी काळे गोरे.....तुम्ही असल्या लाख फुकट्यांची भलामण करायलाच टपला आहात....चिंताच मिटली मग !....

मग चर्चाच नको? तुमच्याविरुद्ध मत मांडलं तर आता माझा वादासाठी वाद?
स्वतःला थोडाही त्रास झाला की डायरेक्ट देश सोडायच्या तयारीत असलेले लोक वाद तरी कसा नेटाने घालतील म्हणा...

असो. तुमची मर्जी.

फक्त एक सल्ला. एक तक्ता मांडा. त्यात मुबई आणि देशातील इतर भाग असे दोन भाग करा. त्या दोन्ही भागात आता त्या त्या भागात रहाण्याचे फायदे, तोटे मांडा. मुंबईत समस्या वेगळ्या असतील कदाचित पण मुंबईत सोयीसुविधा पण इतरांपेक्षा जास्त मिळतात असं माझं मत आहे. तुमची मतं शेअर केलीत तर आवडेल.

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2015 - 10:21 pm | माम्लेदारचा पन्खा

कनफ्युस्ड होऊ नका.... तुमचं वक्तव्य म्हणजे ना शेंडा ना बुडखा....

चर्चा नको असं कोण म्हणतंय? तुम्हीच इमारत गच्चीपासून बांधायला घेतलीये तर कोण काय करेल?

मी देश सोडतोय हे अगाध "ण्याण" तुम्हाला कुठून झालं देव जाणे? उलट मलाच तुम्ही करचुकव्यांचे प्रतिनिधी वाटायला लागला आहात....

मुंबई विषयी आकस बराच दिसतोय.... कशामुळे असावं हो असं ?

माझ्या पहिल्या प्रतिसादातलं "क्षमस्व" हे अनाठायी होतं, हे दाखवून दिलंत. धन्यवाद.
तुमची मर्जी.
मुंबईबद्दल माझ्या मनात आकस नाही. सोयी मिळतात हे मी कौतुकाने लिहिलं आहे. मला मुंबईबद्दल आणि मुंबईकरांबद्दल कमालीच्याबाहेर आदर आहे.
आपल्याइतका मागचा पुढचा विचार न करता अनोळखी माणसांबद्दल अपमानास्पद लिहिणारा मुंबईकर मात्र मी पाहिलेला नाही. स्वतःच्या चर्चेचे स्वतःच बारा वाजवून घेतलेत.

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2015 - 10:41 pm | माम्लेदारचा पन्खा

जरा अंदाज चुकला तुमचा.....क्षमस्व हे तुमचं तुमच्यासाठीच....

तुमची ष्टाईल आवडली बर्का..... आधी क्षमा मागून नंतर पाणी फिरवायचं..

असल्या गोष्टीने चर्चेचे बारा वाजण्या इतकी पोकळ चर्चा नाही चालू इथे !

तुम्ही मात्र उद्या बोला प्रकृतीला आराम पडल्यावर...आज खूपच तसदी घेतलीत...

चालू द्या तुमचं निर्रथक आत्मरंजन !

तुम्ही सातत्याने वैयक्तिक का बोलत आहात? मी तर आपल्याला ओळखतही नाही?

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2015 - 10:49 pm | माम्लेदारचा पन्खा

असो.... आमच्याकडून येथेच पूर्णविराम...

चर्चेच्या अनुषंगाने काही सुयोग्य आणि मुद्देसूद मुद्दा असेल तर जरुर बोला...

आणि स्वतःच अपमान करून स्वतःच असो म्हणून काही उपयोग नाही. ज्याचा अपमान केलेला आहेत त्याने असो म्हणायला हवं.

आपण शेंडा ना बुडखा म्हणलात म्हणून माझे मुद्दे तसे होत नाहीत. मुद्दे मांडलेले होतेच. त्यांना उत्तर द्या. लक्षात आले नसतील तर सभ्य भाषेत विचारा. मी परत सांगीन.

असंका's picture

25 Aug 2015 - 10:59 pm | असंका

हे काय आहे? शिव्यांचा कारखानाय का? कावीळ ? मला पिवळं दिसतंय?

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Aug 2015 - 7:40 pm | पुण्याचे वटवाघूळ

पण एक कळतं मला, की जसे काही काही मुंबईकर काही काही लोकांना घुसखोर समजतात तसेच तुम्ही गोर्‍या लोकांच्या देशात गेल्यावर काही काही (!) लोक तुम्हाला घुसखोर समजतात. मागे एकदा अमेरीकेत एका शीख धर्मस्थळावर हल्ला झाला होता. त्यावेळी मी एका संघटनेबद्दल ऐकलं होतं- व्हाइट सुप्रीमसी. तुम्ही ऐकलंय का?

काय अडाण्यासारखे आर्ग्युमेन्ट आहे हे. ऑस्ट्रेलियासारख्या देशात ज्या भारतीयांवर हल्ले झाले होते ते तिथे व्हिसा घेऊन गेले होते--त्यांच्या देशाच्या सरकारने दिलेला म्हणजे त्या देशात ते अधिकृतपणे गेले होते. इथे बांगलादेशी लोक तसे आले आहेत का?

मला मुंबईतली परीस्थिती माहित नाही हे तर खरंच आहे.

नसेल तर मग फुकाच्या गोष्टी करू नका.

स्वतः हातपाय न हलवता- "तुमच्या" कष्टांचा फायदा कोण घेत आहे?

अजून एक बिनडोकासारखे विधान. तुम्ही ज्या कुठच्या शहरात राहता त्या शहरात अजिबात खड्डे नाहीत किंवा कोणतीही नागरी समस्या नाही का? तसे एकही शहर भारतात नाही. म्हणजे नागरिकांनी भरलेल्या करांमधून रस्ते बांधणारे कॉन्ट्रॅक्टर किंवा महापालिकेचे कर्मचारी पैसे खाऊन फायदा घेत नाहीत का? सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा इनकम टॅक्स कमिशनरचे मोठेमोठे बंगले कधी आयुष्यात बघितले नाहीत का तुम्ही? ते त्या पगारातून येणे अशक्य आहे हे पण तुमच्यासारख्या अकाऊंटंटला कळत नाही का? डोळे उघडे ठेवले तर अशी शेकडो उदाहरणे सभोवताली दिसतील. इतकी साधी गोष्ट कळत नाही आणि निघाले जगाला अक्कल शिकवायला.

जरा असले काहीतरी

ओ ते मराठी इंग्रजी वाद पूर्ण करू या का आता? तुम्ही मध्येच गायब झालात गेल्या वेळी?

आज थोडा वेळ आहे राव, चला असू दे.

मागे एकदा अमेरीकेत एका शीख धर्मस्थळावर हल्ला झाला होता. त्यावेळी मी एका संघटनेबद्दल ऐकलं होतं- व्हाइट सुप्रीमसी. तुम्ही ऐकलंय का?

काय अडाण्यासारखे आर्ग्युमेन्ट आहे हे. ऑस्ट्रेलियासारख्या देशात ज्या भारतीयांवर हल्ले झाले होते

दादा नकाशा घ्या आणि नीट बघा जरा अमेरीका ऑस्ट्रेलियात नैये. अमेरीका म्हणजे एक वेगळा खंड आहे. ऑस्ट्रेलिया हा एक वेगळा खंड आहे. शीख धर्मस्थळावर जो हल्ला झाला, तो अमेरीकेत झाला. आणि वर माझ्या ऑर्गुमेंटला अडाणी म्हणताय...

आणि हल्लेखोर काय तुमचा व्हिसा बघून हल्ले करतात का? तो तुम्हाला घुसखोरच समजतो. व्हिसा असून सुद्धा! यात खरं म्हणजे आपण माझाच मुद्दा अधोरेखित केलेला आहेत. धन्यवाद. अडाणी म्हणे... कोण अडाणी सांगा आता?

मला मुंबईतली परीस्थिती माहित नाही हे तर खरंच आहे.

नसेल तर मग फुकाच्या गोष्टी करू नका.

अहो दादा, आता नाही माहित तर नाही माहित ना. आम्ही थोडीच पुण्याचे आहोत सगळ्या गोष्टी माहित असायला? पण काही काही गोष्टी तत्वाच्या असतात, त्या विशिष्ट माहितीशिवायही आणि माहिती झाल्यावरही बदलत नाहीत. त्याला फुकाच्या गोष्टी आपण समजू शकताल. एवढी ऐश मला परवडणारी नाही.

स्वतः हातपाय न हलवता- "तुमच्या" कष्टांचा फायदा कोण घेत आहे?

अजून एक बिनडोकासारखे विधान.

अहो साहेब हे कमीत कमी विधान नसून प्रश्न आहे एवढं तरी भान ठेवा. प्रश्न बिन्डोक वाटू शकतो आपल्याला. शेवटी आकलन ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे. जी गोष्ट एखाद्याला अत्यंत पवित्र वाटते, दुसर्‍याला ती गलिच्छ घाण वाटू शकतेच. पण सगळीच वैयक्तिक मते जगजाहीर करण्याचा आपला अट्टाहास पुण्यात शिष्टसंमत असेल असं काही मला वाटत नाही. असो.

तुम्ही ज्या कुठच्या शहरात राहता त्या शहरात अजिबात खड्डे नाहीत किंवा कोणतीही नागरी समस्या नाही का? तसे एकही शहर भारतात नाही. म्हणजे नागरिकांनी भरलेल्या करांमधून रस्ते बांधणारे कॉन्ट्रॅक्टर किंवा महापालिकेचे कर्मचारी पैसे खाऊन फायदा घेत नाहीत का? सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा इनकम टॅक्स कमिशनरचे मोठेमोठे बंगले कधी आयुष्यात बघितले नाहीत का तुम्ही? ते त्या पगारातून येणे अशक्य आहे हे पण तुमच्यासारख्या अकाऊंटंटला कळत नाही का? डोळे उघडे ठेवले तर अशी शेकडो उदाहरणे सभोवताली दिसतील. इतकी साधी गोष्ट कळत नाही आणि निघाले जगाला अक्कल शिकवायला.

समस्या नाहीत असा कुठलाही देश नाही, हा माझा मुद्दा आहे. जो वर आधीही कुणीतरी मांडलेला आहेच.

सरकारी अधिकार्‍यांवर सरसकट आरोप करण्याआधी दहा वेळा विचार करावा असा माझा - मी पुण्यामुंबई बाहेर असलो तरी- आपल्याला सल्ला आहे.

मला कुठली गोष्ट कळत नाही, ते आपण तेवढे स्पष्ट केलेले नाही. आणि मी कुठेही निघालेलो नाही. मी मराठीत लिहितो. आणि मराठीला जगात मराठी लोकही भाव देत नाहीत हेही जाणतो. तेव्हा मी काय जगाला अक्कल शिकवणार! तो मान मी आपल्यासारख्या प्रबुद्ध सांख्यिकी तज्ज्ञांसाठी सोडतो.

(हा वरचा प्रतिसाद फक्त पुण्याचे वटवाघूळ यांच्या वैयक्तिक आकसाने भरलेल्या प्रतिसादासाठी आहे.)

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Aug 2015 - 9:52 pm | पुण्याचे वटवाघूळ

आज थोडा वेळ आहे राव, चला असू दे.

तुमच्याकडे किती वेळ आहे यात इतरांना शष्प रस असायचे कारण नाही.

मुंबईत घुसलेले यच्चयावत घुसखोर, बांगलादेशी, नायजेरियन दिसत नाहीत का तुम्हाला ?
जसे काही काही मुंबईकर काही काही लोकांना घुसखोर समजतात तसेच तुम्ही गोर्‍या लोकांच्या देशात गेल्यावर काही काही (!) लोक तुम्हाला घुसखोर समजतात.

तेच. म्हणजे तुम्ही भारतात घुसलेल्या बांगलादेशींना आणि व्हॅलिड व्हिसा घेऊन त्या देशांमध्ये गेलेल्या लोकांना एका मापात तोलता. म्हणून....

अडाणी म्हणे... कोण अडाणी सांगा आता?

अर्थात तुम्ही.

दादा नकाशा घ्या आणि नीट बघा जरा अमेरीका ऑस्ट्रेलियात नैये

अशाच बिनडोकपणातून लिहिलेले विधान.मी वर म्हटले होते की ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये... वरून तुम्ही फक्त ऑस्ट्रेलिया हाच शब्द घेऊन त्यावर बोट ठेवलेत. ऑस्ट्रेलिया काय नी अमेरीका काय. माझ्या वाक्यात ऑस्ट्रेलियाच्या जागी अमेरीका लिहिले तरी मुद्दा बदलणार आहे का? हे पण तुम्हाला कळले नाही म्हणून...

अडाणी म्हणे... कोण अडाणी सांगा आता?

अर्थात तुम्ही.

आपला अपशब्दांचा स्टॉक फारच मर्यादित आहे.

मराठी इंग्रजी माध्यमवाला धागा वर आणू का आपल्या सोयीसाठी? कदाचित काही इंग्रजी अपशब्द सुचतील? आपण माझ्या प्रश्नाला उत्तर न देताच गायब झाला होतात ना तिथे?

आयला तुम्ही हे केलेलं लक्षातच आलं नाही माझ्या...बरं झालं आता लक्षात आलं.

अहो ज्या त्या प्रतिसादाखालीच जे ते प्रतिसादही तुम्ही लिहीना का आता? यातली काही वाक्य माझ्या आधीच्या प्रतिसादातली आणि संदर्भ सोडून आपण घेतली आहेत! अहो या वादावर काही बक्षिस वगैरे आहे का? केवढा आटापिटा हा?

हल्लेखोर हे विसा असला तरी तुम्हाला घुस्खोरच समजतात हे वाक्य तुम्ही क्वोटेशनमध्ये घेणार नाही. कारण त्याला उत्तर नाही ना तुमच्याकडे...

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2015 - 12:56 am | पिलीयन रायडर

नक्की वाद काय आहे हे विसरुन गेले इतकं काय काय लिहीलय..

पण मला कंफ्युज्ड अकौंटंट ह्यांचं आवर्जुन कौतुक ह्यासाठी करावं वाटतय की ते अजुनही मुद्देच मांडत आहेत, एकदाही वैयक्तिक आरोप न करता.

समोरच्या पार्ट्या मात्र अडाणी आणि अजुन काय काय बोलुन र्‍हायल्यात तरी तुम्ही तशा प्रतिवादांवर उतरला नाहीत ह्या बद्दल अभिनंदन!

पगला गजोधर's picture

26 Aug 2015 - 9:10 am | पगला गजोधर

तैअतिशय सुरेख मार्मिक निरीक्षण आहे तुमचे.

@कंफ्युज्ड अकौंटंट, सर कुठल्याही वैयक्तिक आकासाविना मुद्देसूद प्रतिक्रिया अतिशय संयमी भाषेत मांडण्याची आपली शैली, मला अतिशय भावली.
कृपया आपण विवेकी प्रतिसादकांनांच एन्टरटेन करावे, वैयक्तिक शिव्याशाप घालाणार्यांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती.

असंका's picture

26 Aug 2015 - 10:26 am | असंका

@ पिरा. आणि पग.

मला या अ‍ॅशुरन्सची फार गरज होती.

तो दिल्याबद्दल धन्यवाद...

_/\_

अर्धवटराव's picture

26 Aug 2015 - 9:04 pm | अर्धवटराव

अकौण्ट साहेबांनी हिशेब तपासणी पद्धतीनेच व्यवस्थीत मुद्दे मांडले आहेत.

अर्धवटराव's picture

26 Aug 2015 - 8:54 pm | अर्धवटराव

समस्येकडे बघायचा हा दृष्टीकोन महत्वाचा आहे.

संदीप डांगे's picture

25 Aug 2015 - 1:38 pm | संदीप डांगे

म्हणायला आपल्याकडे लोकशाही आहे पण लोकशाहीच्या धमन्यांतून रक्त मात्र जातनिहाय सरंजामशाहीचेच वाहत आहे. मतदानाचा हक्क कुणाला दिला काय न दिला काय, शेवटी हेच होणार आहे. आपले सरकार हे आपण दिलेल्या मतांनुसार चालते हा एक मोठा भ्रम आहे. किमान भारतातल्या कुठल्याही सरकारांमधे तुलनात्मक काहीच फरक अजून तरी दिसलेला नाही. संसदेत कायदे बनतात, विधायके मंजूर होतात. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी जरी आपल्या मतदारसंघावर अन्याय होत असेल तरी पक्षश्रेष्ठींच्या हुकूमावरून विधेयकांना, अर्थमंजुरींना समर्थन वा विरोध करतात. त्याने तिसरा पाय काढण्याचा प्रयत्न केला तर पुढल्या वेळेस त्यास टिकीट मिळणार नाही. त्याच्या ऐवजी दुसर्‍या पक्षाचा निवडून आलेला सत्तेत असेलच असे नाही. म्हणजे कशीही वजाबाकी, बेरिज, भागाकार, गुणाकार करा, उत्तर तेच येणार. म्हणून सामान्य मतदार या प्रक्रियेला कंटाळून आपल्या जातवाल्यांना मतदान करतो. त्याला तेवढे तरी समाधान हवे असते.

रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या बाबतीत मला एक नेहमी वाटते की या व्यवहारात किती माणसे गुंतली असतात, राजकिय नेत्यांशिवाय? तरी सगळ्यांचे बोट राजकिय नेत्यांकडे. आपण काहीच चुकीचे करत नाही असे सगळ्यांना वाटत असते. चुकीला हातभार लावून एकमेकांकडे बोट दाखवायला सगळे मोकळे. नेते/मंत्री सोडून द्या, ते नालायकच आहेत असं जाहीर आहे. मग बाकीचे त्यांच्या आदेशाप्रमाणे वागायला गुलाम आहेत का? सिस्टीमच्या नावाने भंडारा उधळून सगळ्यांना प्रसाद हवा असतो. आपल्या समाजाच्या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत असं कुणालाही वाटत नाही.

नेहमी नेहमी राजकिय नेत्यांचा स्केपगोट म्हणून वापर करण्याच्या पद्धतीचा आता कंटाळा आलाय. कधीतरी जनता आपल्या जबाबदार्‍या ओळखून आपणच निर्माण केलेल्या आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल की नाही? आपणच घाण करायची मग इथे कचर्‍याचा डोंगर झाला तरी मुन्शीपालटीवाले येत नाहीत म्हणून नेत्यांच्या नावाने बोंबा मारायच्या. बास करा आता.

फारएन्ड's picture

27 Aug 2015 - 6:32 am | फारएन्ड

वरच्या सरंजामशाही च्या मताशी सहमत आहे. अनेक ठिकाणी लोक कोणीतरी 'राजे' निवडून देतात असेच वाटते. एकदा निवडून दिला की भगवान भरोसे. कधी 'बदल' करायचा म्हणजे वेगळ्या पक्षाचा राजा निवडून द्यायचा.

रस्त्यावरचा खड्डा, एखादे ट्रॅफिक चा व्ह्यू अडवेल असे वाढलेले झाड असल्या गोष्टी महिनोन्महिने दुरूस्त होत नाहीत. पण त्यावरून शिव्या घालण्याव्यतिरिक्त सर्वसामान्य माणूस काहीही करत नाही. आणि बहुतेकांना हे दुरूस्त करायची जबाब्दारी कोणावर आहे हे ही माहीत नसते. मलाही नसायचे. आमच्या जवळच्या एका रस्त्यावरच महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, तेथून सुमारे ५० फुटांवर रस्ता अत्यंत वेडावाकडा खोदलेला व नंतर तेथे मिनि-टेकड्या होतील असा भरलेला. रोज तेथून जाताना लोक गाड्या जमतील तशा वळवून एकमेकांना अडवत, किंवा उंच भागावरून कशीबशी नेत येजा करत. पण माझा अंदाज आहे की त्या वॉर्ड ऑफिस पुढे दोन मिनीटे थांबून आत जाउन त्याबद्दल तक्रार करणारे फार नसतील (नाहीतर ते इतके दिवस तसे राहिले नसते). मी ही फार भारी आहे अशा उच्चासनावरून हे लिहीत नाहीये. मी एकदा गेलो त्यांना सांगायला की ते किमान सपाट करा. आता अशा ठिकाणी एकटा नागरिक म्हणून गेलात तर कुत्रे विचारणार नाही असा समज होता. त्यामुळे मी मेम्बर असलेल्या एका "संस्थेतर्फे" तेथे गेलो (त्या संस्थेचे ट्रॅफिक बद्दलचे काम मी अधूनमधून करत होतो तेव्हा, त्यामुळे ही तोतयागिरी नव्हती). या संस्थेला ओळखणारे बर्‍यापैकी लोक आहेत. त्यामुळे त्यांनी मला काय करावे लागेल ते नीट सांगितले. पण ज्यांच्याशी बोलायचे ते तेव्हा तेथे नव्हते. त्यानंतर मी कामासाठी बाहेरगावी गेलो व तेथून जाण्याची माझी गरज काही दिवस मागे पडली, व हे कामही. नंतर काही दिवसांनी ते झालेले होते (त्यात माझा काहीच हात नव्हता, कारण बहुधा तेव्हा ती तक्रार लेखी नोंदवली गेलेली नव्हती).

वॉर्ड ऑफिस, मनपाचा उद्यान विभाग वगैरे काही ठराविक विभाग आहेत जेथे ही कामे होऊ शकतात. एकदा गेलात तर लगेच होईल असे नाही. पण अशी कामे घेउन तेथे जात राहिलात तर ओळखी होतात, मग तुमची दखलही जास्त घेतली जाते (ऑफिस मधे असते, तसेच 'नेटवर्किंग' केले तर चांगले). आणि एखाद्या अशी कामे करणार्‍या संस्थेत सामील व्हा, त्याचे सभासद म्हणून जा, म्हणजे सहसा दखल घेतलीच जाते. आणि थोडी 'सर्कारी' स्टाइल सहन करण्याचा पेशन्स ठेवा :)

पैसा's picture

25 Aug 2015 - 1:45 pm | पैसा

रोज रात्री ६ तास गाढ झोप मिळाली पाहिजे, आणि ३ वेळा व्यवस्थित खायला. लै झालं. जेवढ्या अपेक्षा आणि गरजा कमी तेवढे सुखात रहाल.

" सकाळी पोट चांगलं खळखळून साफ व्हायला हवे "

पैसा's picture

25 Aug 2015 - 4:08 pm | पैसा

खरं आहे. ज्यांना बद्धकोष्ट असते ते लोक सहसा किरकिर करणारे, सतत टेन्शनमधे असतात. पिकु सिनेमाच बघा!

पगला गजोधर's picture

25 Aug 2015 - 4:21 pm | पगला गजोधर

@पिकू …१+…. ही ही ही

सुबोध खरे's picture

25 Aug 2015 - 8:09 pm | सुबोध खरे

प्रामाणिक कष्टाची किंमत
मी हिरानंदानी रुग्णालयात काम करीत असताना (२००७) आमच्या खात्याची स्वागत सहायिका रश्मी जिचा पगार ८ हजार होता. तिच्या यजमानांचा पगार १० हजार होता. तिने डोंबिवलीला स्टेशन पासून १५ मिनिटांच्या अंतरावर एक रूम किचनचे घर घेतले ३३० चौ. फुट. त्यासाठी तिला महीन आठ हजार हप्ता पडत होता. म्हणजे तिचा पूर्ण पगार इतका अह्प्ता ती पुढे वीस वर्षे भरणार होती.
त्याच दिवशी झोपडपट्टी वासियांचा मोर्चा निघाला. त्याच्या अग्रभागी राजकारणी होतेच. "आम्हाला झोपु योजनेत घर देणार ते २५० चौ. फुट नाही. ३३० चौ फूट मिळालेच पाहिजे" हे सुद्धा मुंबईत. म्हणजे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून वर शिरजोरी आहेच.
सरकारने आम्हाला सर्व फुकट दिले पाहिजे हि सवय अगोदरच्या सरकारांनी लावली याचे हे परिणाम.
आणी जी स्त्री प्रामाणिकपणे कष्ट करते तिला डोंबिवलीत स्टेशन पासून १५ मिनिटाच्या अंतरावर घर ते सुद्धा ऐन उमेदीतील सर्व पगार वीस वर्षे भरायचे.
उद्धवा अजब तुझे सरकार.

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2015 - 9:41 pm | माम्लेदारचा पन्खा

ह्याचसाठी जीव जळतो … का ही जीवघेणी क्रूर थट्टा ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Aug 2015 - 10:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्याचं भिकारचोट वृत्तीचा कंटाळा आलाय मला. साला कष्ट करायचे मरमर करायची आपण. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करांच्या नावाखाली दबुन जायचं. महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासुन फक्त पगाराची वाट पहायची एवढचं कनिष्ठ मध्यमवर्गियांचं आयुष्य झालेलं आहे. ह्या महिन्यात आजारी आई-बापाला दवाखान्यात न्यायचं का दुधाचं बिल द्यायचं अशीहि वेळ येते.

झोपडपट्टीवाल्यांना ना टॅक्स ना वीजबील ना पाणीपट्टी ना घरपट्टी. वरनं फुकटं घरं. व्वा!!! बरं ह्यांना गरिब म्हणावं तर झोपड्या झोपड्यांवर डिशटीव्हीच्या डिश दिसतात. हातामधे स्मार्टफोन दिसतात. हातात गळ्यात गावगुंडगोफ दिसतात. दारु नशापाण्यावर उडवायला पैसा असतो.

काही श्रीमंत लोकांकडे एवढा पैसा आहे की रोज दोन हातांनी उधळला तरी कमी पडणार नाही. कर मात्र किती भरतात? अगदी ते रोजगार निर्मिती करत असले तरी हे चुकीचचं नाही का?

गॅरी ट्रुमन's picture

25 Aug 2015 - 10:00 pm | गॅरी ट्रुमन

असे प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतात. तरीही काही लोक विचारतात की "कोण हातपाय न हलवता तुमच्या कष्टांवर मजा करतोय". असो.

मी एकट्यानेच विचारलंय तसं. अजून कुणी विचारल्याचं दिसत नैये. नै तुम्ही बहुवच्न वापरलंय ते आदरार्थी असेल तरी लोक हा शब्द एकवचनी असू शकत नाही. जरा दाखवता का अजून कुणी विचारलंय?

नै तर सरळ कबूल करून मो़कळे व्हा की मला सरळ उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून भलतीकडेच माझी वाक्य डकवून लोकांच्या नावावर खपवून मजा बघायचा प्लान होता.

आणि तुम्ही जसं भासवताय तसं त्या प्रश्नाचं उत्तर वरच्या प्रतिसादात मिळत नैये. तुम्हाला अजून स्पष्ट करायला आवडेल का?

अर्थात आपण काय बोलतो याचे भान न ठेवणार्‍या़ंकडून काय अपेक्षा ठेवायच्या म्हणा. बोलायची एक गोष्ट आणि विसंगती दाखवली कुणी की लाख वेळा सहमत व्हायचं! हाकानाका!

पगला गजोधर's picture

26 Aug 2015 - 9:23 am | पगला गजोधर

खरं आहे आपण म्हणता ते, तुमच्या-आमच्या सारख्या कायदेपालन करणाऱ्या लोकांना,
अशी अनधिकृत बांधकामे व त्याला मिळणारा राजाश्रय, पाहून, व्यथित व्हायला होते.
तुमच्या या मुद्देसूद प्रतिक्रियेच्या ताजमहालाला, माझ्या सारख्याकडून विटा लावणे म्हणा हव तर,
पण तुमच्या प्रतिक्रियेत अनधिकृत बांधकामाचे जे योग्य उदाहर आलेले आहे, तो फक्त ऐक प्रकार आहे
डी-ग्लाम अनधिकृत बांधकामाचा. त्याला पुरवणी म्हणून मी खाली ग्लामराइस्ज्ड अनधिकृत बांधकामाच्या उदाहरणाचे फोटो दाकावीत आहे.
.
.
.
.
cc1
.
.
.
.
cc2

सुबोध खरे's picture

26 Aug 2015 - 9:34 am | सुबोध खरे

प ग साहेब
आपण दाखविलेल्या दोन गोष्टीत गुणात्मक दृष्ट्या फरक आहे तो असा कि अशी पंच तारांकित अनधिकृत बांधकामे सरकारी जमिनीवर नसून स्वतःच्या जमिनीवर असतात पण सरकारी नियमाच्या बाहेर असतात.
झोपडपट्टीतील लोक सरकारी जमिनीवर घर बांधतात आणि त्याच्या जागी त्यांना सरकारकडून फुकट अधिक जागा हवी असते. मूळ मुद्दा गरिबांसाठी घरे देण्याचा नाही तर कोणतीही गोष्ट "आयुष्यभर" फुकट मिळवण्याबद्दल आहे.घराच्या बांधणीचा खर्च तरी त्यांच्याकडून वसूल केला गेला पाहिजे. मुंबईत कोणीही गरीब नाही.( मुंबईत बिगारी रुपये ५०० रोज घेतो). झोपु योजनेत फुकट मिळालेली घरे विकून परत झोपडीत राहायला जाणारे शेकड्यांनी आहेत. हे म्हणजे मूळ हेतूलाच हरताळ फासला गेल्यासारखे आहे. मिळेल ती सोय सरकारकडून लाटत राहायचे आणि वर सरकारने आमच्यासाठी काहीच केले नाही म्हणून माज दाखवायचा
गरिबीमुळे माणूस लाचार तरी होतो नाहीतर माजोरी तरी होतो हे श्री व्यंकटेश माडगुळकरानी १९४६ साली लिहून ठेवले आहे त्याची आठवण होते.

पगला गजोधर's picture

26 Aug 2015 - 9:57 am | पगला गजोधर

त्यामुळे माजोरीत गुणात्मक दृष्ट्या फरक आहेच,
साजूक माजोरीपण माजोरीच
झुंडशाही दाखवून कायदा मोडणारे ,
त्यासाठी राजकीय दबाव टाकणारे ,
कानाडोळा करणारे अधिकारी,
सर्वच हातात हात घालून या गोष्टी मागे नांदताहेत

ज्या देशात प्रत्येक धरमासाठी एक पक्ष आहे तेथे मतदान करुन प्रश्न सुटतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Aug 2015 - 10:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रश्णचिन्ह राहिलयं प्रतिसादात :)

NiluMP's picture

26 Aug 2015 - 1:46 pm | NiluMP

हि एकच ओळ टाईप करण्यासाठी मला 5 मिनिटे लागली त्यातही धर्म हा शब्द नीट टाईप करता आला नाही आणि म्हणुनच मी कोणत्याही लेखावर प्रतिक्रिया देत नाही.

सविस्तर प्रतिक्रिया हया weekend ला देतो.

दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन तुटून पडलेले बाजीप्रभू काय आवेशात असतील ते आज दिसलं.
-मावळा प्यारे

कितीही नाही ठरवलं तरी हा एक धागा वाचला गेलाच! वाईट वाटलं.
अगदी वैतागाचा कडेलोट होतो. पुण्यात तर वाहतुकीची पंचाईत बघितलीच आहे. मुंबैतील ऐकून आहे. असह्य प्रकार आहेत हे खरे. करणारा करत जातो आणि फायदा घेणारे सोकावतात. एनारायज आणि भारतातील बांगलादेशी वगैरेंची तुलना पटली नाही. कायदेशीर मार्गानं स्थलांतरीत होणं आणि बेकायदेशीर मार्ग वापरणं हा साधा फरक आहे. त्यांचे त्यांच्या देशात काय नि किती हाल होत असतील याची कल्पनाही नको! भार मात्र करदात्यांवर पडतोच! आणि नुसता पैशांचा प्रश्न आहे का? आयुष्य जगायलाच मिळत नाहीये हा वैतागही आहेच! आता मी या धाग्यावर काही वाचणारच नाही.

अजया's picture

26 Aug 2015 - 8:02 am | अजया

काही धागे वाचून नैराश्य येतं.कधी कोण कसं बदलणार या देशाला.आरक्षण,भ्रष्टाचार तर कधीच संपणार नाही बहुतेक:(
न वाचता डोळेझाक केली की बरं पडतं.

भ्रष्टाचार, खून, चोर्‍या, भांडणं, मारामार्‍या, वादावादी, गप्पा गोष्टी, उखाळ्यापाखाळ्या काढणं, शिवीगाळ करणं, ...., जेवण करणं...., प्रेम करणं, अडचणीतल्याला मदत करणं....

यातलं काय पूर्वी नव्हतं? यातलं काय उद्या नसेल?

वैतागाने, त्रागा करून सुटलेला एक प्रश्न दाखवा....

कर भरता म्हणजे काही फार भारी गोष्ट करत असल्यासारखं कसं बोलतात लोक इथले? तुम्ही ज्या सुरक्षित वातावरणात- 'समाजा'च्या कोशात- राहून उत्पन्न मिळवू शकता त्याची ती किंमत आहे.तुम्ही उत्पन्न मिळवता ते तुमचं एकट्याचं नाही. समाजाच्या जिगसॉ पझलमध्ये एका जागी तुम्ही फिट्ट बसू शकलात म्हणून ती किंमत तुम्ही वसूल करत आहात. त्या जागेवरून निघालात की तुमची किंमत किती? ... ज्या लोकांना तुमच्यासारखी मोक्याची जागा मिळू शकलेली नाही, त्यांच्यासाठी काही करणं दूर, सहानुभूती पण वाटेना का?

तुम्ही तुमच्या समाजापेक्षा जास्त चांगले असू शकत नाही. पक्की खूणगाठ बांधा. तुम्हाला समाजातल्या ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या एक तर बदलण्यासाठी प्रयत्न करा, किंवा मग दोष स्वतःकडेच असल्याची जाणीव ठेवा. काही लोक वेडीवाकडी गाडी चालवतात...याचा दोष तुमच्याकडे एक समाज म्हणून येतो. तुम्ही समाजापेक्षा चांगले असू शकत नाही याचं उदाहरण म्हणजे रस्त्यावर वेडीवाकडी गाडी चालवणार्‍याकडून होणार्‍या अपघातात तुमचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असूनही "अनेक लोक पुण्यात वेडीवाकडी गाडी चालवतात" यावर चर्चा करणे आणि इतर काहीच न करणे. ते चूक करतात आणि तुम्ही त्यांच्या चुकीकडे दुर्लक्ष करता. एक समाज म्हणून तुम्ही या समस्येचा भाग आहात आता. (यात मीही आलोच अर्थात...पण कुरकुर मी करत नैये. मी त्याबाबतीत नशिबावर सोडलंय स्वतःला.)

समाज रात्रीतनं बदलत नाही. कुणीच काहीच न करता तर अजिबातच बदलत नाही. बदल होत असेल तर कुणीतरी त्यासाठी काहीतरी केलेलं आहे, याची जाणीव ठेवायला हवी- हे मी राजकारण्यांना घातल्या जाणार्‍या शिव्यांच्या संदर्भात बोलत आहे. ते तुमच्या शिव्यांचे धनी होत आहेत फक्त. त्यांचे कष्ट एवढे मातीमोल करू नका.

चैतन्य ईन्या's picture

26 Aug 2015 - 7:23 pm | चैतन्य ईन्या

प्रश्न असा आहे कि करायचे कोणी आणि कुठून सुरवात करायची. सगळ्या चर्चेत एकाच मुद्द्याला धरून कीस पडला जातो आणि मग त्याला प्रत्त्युतर म्हणून तुम्ही कसे असे होतंय. म्हणजे गरीब झोपडट्टी विषय आला कि सुशिक्षित कसे करतात असे होतंय. खरी गोची आहे कि आहेत ते कायदे लोकांनी पाळावेत किंवा त्याची अमलबजावणी कशी करायची. इथेच खरी गोम आहे. कारण कायदे पाळायला लागले तर राजकारणी आणि बाबू लोकांची वरकमाई बंद होईल. बर ह्यांच्या जीवावर चालणारी अनेक दुकाने आहेत. म्हणजे बघा आरटीओ. तुम्हाला पटो अथवा न पटो एजंट गाठला कि काम होते. मग एजंट वाले लोक मारणार त्यांचा ह्याला विरोध. सुशिक्षित काय कमी आहेत का.एकेकाळी धनकवडी म्हणजे सुशीक्तींची झोपडपट्टी ह्या नावाने प्रसिद्ध होती. कारण तिथे सगळे नियम धाब्यावर बसवूनच बांधकामे झाली आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणता आहात त्यात तथ्य आहे पण लगाम कोण घालणार? सुरवात कुठून करायची. आता सगळेच सोकावले आहेत. जॉ उठतो त्याला आरक्षण पाहिजेल अथवा फुकटात काहीतरी मिळाले पाहिजेल. कारण बाकीच्यांना मिळते आहे. हे सगळे विचित्र आहे आणि जॉ त्यातल्यात्यात नियम पाळतो त्यालाच तुम्ही बोल लावायला लागलात कि तुम्हाला लोक असेच बोलणार.

काय समस्या आहेत! दुकाने! अहो दुकाने चालतात कारण लोकांना सगळं ताबडतोब हवं असतं. हे सांगायला दुसरं कुणी कशाला हवं? आपण लाच दिली नाही तर आपलं न्याय्य काम होत नाही असं काही नसतं. फक्त वेळ लागतो. थोडे कष्ट घ्यावे लागतात. थोडा संबंधित व्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. आणि ऑफ कोर्स चकरा माराव्या लागतात न कंटाळता.

लाच न देणारा समाज तयार केला की लाच न घेणारे सरकारी अधिकारी आणि राजकारणी आपल्याला मिळालेच असं समजा!

बाकी नका इतका त्रास करून घेत जाऊ या गोष्टींचा. पैसे ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने ते वाहत जातात. थोडी श्रद्धा आहे माझी इथे, की बिनकष्टाचा पैसा तुम्हाला सुख शांती देउ शकत नाही. तुम्ही पण असला एखादा फंडा शोधून काढा ज्याने तुमची या बाबतीतली घालमेल जरा कमी होइल. कसं?

हे सगळे विचित्र आहे आणि जॉ त्यातल्यात्यात नियम पाळतो त्यालाच तुम्ही बोल लावायला लागलात कि तुम्हाला लोक असेच बोलणार

हे खरं तर मला कळलं नाही वाक्य...तुम्ही मला म्हणत आहात का, की मी नियम पाळणार्‍यांना काहीतरी बोललो म्हणून मग मला लोक "असंच" (- म्हणजे कसं ) बोलणार? मी कुणालाच काहीच बोललेलो नाइये...आणि खरंतर मलाही कुणी काही बोललेलं आहे असं मला वाटत नैये... तर मग तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात?

चैतन्य ईन्या's picture

27 Aug 2015 - 1:59 pm | चैतन्य ईन्या

इतकी सरळ आहे का भौ? मला मामलेदार कचेरी मध्ये वडिलांचे नाव काढून आईचे नाव लावायचे होते. ७ वेळा चक्कर मारली. भाड्याने वर १००० रुपये होतील सांगितले. ते पण दिले वैतागून. मग पुन्हा ३ वेळा चक्कर मारली. टोटल १ वर्ष लागले आणि मी पुण्याबाहेर काम करत होतो. शेवटी वकील गाठला आणि त्याच्याकरावी त्याला दम दिला तेंव्हा काम झाले. माझ्यासारखे अनेक नाडलेले होते. त्यांचे पण काम झाले इतकेच पुण्य पदरात पडले. पोलीस भिक घालत नव्हते. इतके सरळ असते तर हि वेळ आली नसती.

म्हणून म्हटले कि तुम्ही मला सांगत असाल कि मी नियम पळून पुन्हा शांतचित्त राहावे तर कसे काय जमायचे. कोणी जास्त वैतागून तुम्हाला वैयक्तिक पातळीवर येवून बोलले म्हणून वरील वाक्य होते. जावू द्या. आपला आपला नजरिया. कोणाकडे जास्त पेशन्स असतो कोणाकडे कमी असतो.

तुम्ही मला सांगत असाल कि मी नियम पळून पुन्हा शांतचित्त राहावे तर कसे काय जमायचे. कोणी जास्त वैतागून तुम्हाला वैयक्तिक पातळीवर येवून बोलले म्हणून वरील वाक्य होते. जावू द्या. आपला आपला नजरिया. कोणाकडे जास्त पेशन्स असतो कोणाकडे कमी असतो.

हं. बरोबर आहे. नाही जमू शकत. तुम्ही ती सगळी विशेषणं इथे सगळ्यांच्या समोर माझ्यावर वापरा जी तुम्ही शांतपणा सोडून त्या सरकारी अधिकार्‍याच्या तोंडावर त्याच्याबद्दल वापरलीत.

अर्धवटराव's picture

26 Aug 2015 - 9:33 pm | अर्धवटराव

हा राजधर्म न पाळण्याचा परिणाम आहे.
राजा कालस्य कारणम्. आणि लोकशाहीत जनताच राजा आहे. राज्याच्या समस्येच्या गंभीरतेच्या प्रमाणात राजाची जबाबदारी वाढते. आपल्या लोकशाहीत जनतेला मालकीहक्कांबाबत तोडीफार (बरिचशी चुकीची) कल्पना आली आहे, पण राजधर्माच्या बाबतीत बोंब आहे.

राजकारण्यांचा भ्रष्टाचार, गुंडागर्दी, मनगटशाही, बेदरकारपणा वगैरे समस्या म्हणजे शक्तीचं एक प्रकारचं प्रकटन आहे. त्यात न्युसेन्स व्हॅल्यु भरपूर आहे कारण त्यामागे सामर्थ्य आहे. त्याला उतारा म्हणुन त्याहुन मोठं सामर्थ्य प्रकट झालं तरच हा प्रकार थांबेल. अन्यथा हात चोळत बसण्यापलिकडे काहि करता येत नाहि.

जनताच राजा! हे आवडलं. पटलं.

राजा कालस्य कारणम!

फारच सुरेख!

तुडतुडी's picture

26 Aug 2015 - 12:56 pm | तुडतुडी

आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का?>>>
नाही

ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे>>>
जमवायचं म्हनलं तर सगळं जमू शकतं . पण भारतीयांची शून्य इच्छाशक्ती , धाडसाचा अभाव ,केवळ आपण आणि आपलं कुटुंब ह्यांच्यासाठी पैसे कमावणं त्या बाहेर अजिबात डोकवून सुधा न बघणं ह्या गोष्टी कुढत जगण्यास भाग पाडतात. आरक्षणासाठी , पुरंदरेंना विरोध करण्यासाठी , संथारा व्रताच्या समर्थनासाठी समाज उत्स्फुर्तपणे आंदोलनं करतो तसा भ्रष्टाचारी नेत्याला धडा शिकवण्यासाठी , गुंडगिरी बंद होण्यासाठी पुढे येतो का ? नाही

कर भरणं म्हणजे की भारी करत नाही हे मान्य आहे हो . पण त्याचं आउटपूट लोकांना मिळत नाही ना . हे कराचे पैसे नेते भ्रष्टाचार करून लुबाडतात . नको त्या गोष्टीत हे पैसे खर्च होतात .

माझीही शॅम्पेन's picture

26 Aug 2015 - 7:18 pm | माझीही शॅम्पेन

मला वाटत प्रत्येक गोष्टीची कटकट करत बसण्यापेक्षा आपण स्वताहा ही परिस्थिती बदल्यासाठी काय करू शकतो ह्याचा विचार करा

उदा - एका मित्राने LGP सबसीडी सोडल्याची वॉट'सआप वर एका ग्रूप वर संगितल , तर एका नेही त्याच कौतुक केल नाही हेच मित्र अनेक फालतू धकल-पत्रावर सतत कळफलक बडवत असतात..

एक तर स्वताहा: बदला - आणि आजूबाजूला बदलायासाठी प्रयत्न करा नाही तर देश सोडून द्या (शक्य असेल तर) सोप्पाय :)

चैतन्य ईन्या's picture

26 Aug 2015 - 7:26 pm | चैतन्य ईन्या

चांगले आहे पण मी का सोडायची? जेंव्हा आपले नेते आणि त्यांची कुटुंबे फुकटात सरकारी खर्चाने राहणार. ह्यांना सगळे द्यायचे आणि आपण मात्र सोडायचे हे काही पटत नाही. तसे असेल तर सगळ्या यच्चयावत पुढारी लोकांची हि नको ती सबसीडी बंद करा. इतकेच आहे तर मोदी ह्यांनी आधी आपल्या सरकारातील मंत्र्यांना सांगावे आणि नुसते सांगू नये तर ते अमलात आणावे. शेवटी लोक लीडरला फॉलो करतात. थोडाकाळ लोक सोडतील पण बाकीचे फुकटात रहात असतील तर ह्याचा काहीही फायदा नाही.

प्रसाद गोडबोले's picture

27 Aug 2015 - 12:06 am | प्रसाद गोडबोले

कोणतीही सबसीडी न घेता ...
कोणत्याही प्रकारचे रिझर्वेशन न घेता ...
जातिच्या नावावर सरकारी स्कॉलरशिपा न घेता ...
समान नागरी अधिकार नसला तरीही ...
देशाकडुन कोणत्याही ट्रिपला फंडींग मिळत नसले तरीही ...
सर्व समाजाकडुन बामण बामण म्हणुन हिणावले जात असतानाही...
कोणत्याही प्रकारचा जातिभेद न मानताही जातियवादी म्हणवुन घावे लागले तरीही ...
आडव्या आलेल्या आर्टीओला कारण नसताना १०० रुपये सारावे लागले तरीही ...
टोलनाक्यावर निमुटपणे लूट भरुनही...
रोडटॅक्सने बांधलेल्या सुधारित खड्ड्यातुन गाडी चालवुनही...
पासपोर्ट्च्या वेरीफीकेशनला पोलिसांन्नी सौजन्य दाखवले नाही तरीही ...
सरकारी कार्यालयाबाहेरील दलालांची अडवणुक सहन करुनही...
अन कोणीच कोणतीच अकाउंटेबीलीटी घेत नसले तरीही ...
.
.
.
.
.

आज मी रीतसर ट्यॅक्स भरला ...
.
.
.

अन का ? का ? म्हणुन मनात त्रागा करणार्‍या मित्राला सांगितले : 'त्रागा करण्या पेक्षा अभ्यास कर लेका , पुढल्या वर्षी एच १ बी मिळवायचाय ना ? इथे २५% ट्यॅक्स भरण्यापेक्षा तिथे भर , ते किमान सोशल सिक्युरिटी तरी देतात '

एक सर्वसामान्य क्युतिया नागरिक ह्या पेक्षा वेगळे काय करु शकतो ?

असो , चला आता रेन्ट रीसीप्टची प्रिन्ट काढुन सही करुन करुन बॅन्गलोर ला पाठवायची आहे :)

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Sep 2015 - 11:07 am | माम्लेदारचा पन्खा

तुम्हाला कळलंय सामान्य नागरिकांना काय म्हणायचंय...

तुडतुडी's picture

27 Aug 2015 - 1:23 pm | तुडतुडी

एका मित्राने LGP सबसीडी सोडल्याची वॉट'सआप वर एका ग्रूप वर संगितल , तर एका नेही त्याच कौतुक केल नाही >>
आधी सबसिडी द्यायची आणि मग सोडायला लावायची . 'काय नाटक आहे ? ' असा प्रश्न विचारण्याची हिम्मत एकाने तरी दाखवली का .
एक सर्वसामान्य क्युतिया नागरिक ह्या पेक्षा वेगळे काय करु शकतो ?>>>
खि:क
ITR १ भरल्यावर ते e verification साठी विचारतंय . काय प्रकार आहे हो तो ?