५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५

गणेशा's picture
गणेशा in काथ्याकूट
10 Feb 2015 - 2:07 pm
गाभा: 

(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अ‍ॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे)

प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो. आणि या मुद्द्यांना प्रश्न विचारले तरी मी उत्तर देवु शकत नाही. कारण ते आप कसे करणार हे येणारा काळच दाखवेल. आपण जसे मोदी.. फडणवीस सरकारचे कारभार पाहतो आहोत आण इथे बदल घडवतील असे म्हणतो आहोत तसेच येथे ही केजरीवाल हे करतील असे वाटते..

--------------------

किती तरी आरोप झेलत, भगोडा आणि स्वार्थी अहंकारी अशी विभुषणे घेवुन ही गेली १ वर्षे आपले काम इमानदारीने करत अरविंद केजरीवाल लढत राहिले.
टीव्ही वर दाखवलेल्या फुकट देणारे हे सरकार असेन अशी टीका ही करण्यात आली. आपण ही फक्त त्याच न्युज पाहत त्यांना दुषणे देत असु ही.. कारण खुद्द मोदी जी पंतप्रधान झाले होते.. त्यांच्या अच्छे दिन च्या वाद्यापुढे हे असले फुकट नको असेच आपले मत होते.. पण आपण त्या न्युज च्या पलिकदे कधी जावुन बघितले का असा प्रश्न मनात येतो.. दिल्लीतील जनतेला तुम्ही बटाटे कांद्याच्या भावा साठी आप ला निवडुन दिले असे आपण सर्रास बोलतो.. कदाचीत ते बरोबर असतील आणि आपण फक्त जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो.. आपल्या बुद्धीचा वापर आप कशी सामान्य पार्टी आहे त्यात काय येव्हडे असे बोलतो .. पण कदाचीत प्रामाणिकते बरोबरच विश्वास .. सादगी आणि मुद्दे या जीवावर दिल्लीत आता ५ साल केजरीवाल

७० अ‍ॅक्शन सुत्री कार्यक्रम आणि माझी मते मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे:

१. दिल्ली जनलोकपाल बिल

ह्या ज्ञलोकपाल बिलाबाबत वेगळे म्हणता येइल की आप चे म्हणणे आहे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि विधायक सगळे लोकपाल च्या कक्षेत येतील. सरकारी अधिकार्‍यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहीती द्यावी लागील. लोकपाल ला भ्रष्टाचार आरोपी लोकांवरती केस चालवण्याचा आणि जॉच करण्याचा अधिकार असेन. सर्व सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर सुरु केले जातील

या गोष्टींना विरोध करण्याचे तसे कारण नाहीये .. पण बघुयात.

२. स्वराज विधेयक

स्थानिक नागरिकांना, तिथले काही प्रश्न सोडवायचे असल्यास त्यांच्या म्हणण्याने सचिवलायची परवानगी घेवुन ते प्रश्न सोडवले जातील ( जसे की नगरसेवक काम करु शकतात तसे, फक्त हे स्थानिक लोक निर्नय घेतील मोहल्ला सभा आणि स्थानिक नागरीक असोशीएशन द्वारे. त्यांना काही प्रमाणात फंड ही दिला जाईन. हा नागरिक ना सुक्ष्म अधिकार असला तरी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जागृत करण्यासाठी चांगले पाउल वाटते.

३. दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा-
दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संविदानिक कक्षेत राहुन आम आदमी प्रयत्न करणार आहे, त्या बरोबरच केंद्रा च्या अंडर असणारे दिल्लीतील पोलिस आनि इतर हे दिल्ली सरकारच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला जाईन.

- भाजप बर्याच दा छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीस अनुकुल आहे. लोकसभेला पण त्यांनी दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु असे अश्वासन दिलेले आहे. त्यामुळॅ या गोष्टीला जर संविधानिक कक्षेत राहुन केंद्राने ही मदत केली तर दिल्ली नक्कीच पुर्ण राज्य होयील.
याचे फायदे तोटे असतीलही. परंतु दिल्ली सरकारच्या कक्षेत त्यांचे पोलिस दल असायलाच हवे असे मला वाटते. स्वताचे पोलिस दल नसेन तर बर्याच गोष्टींवर सरकारला केंद्रावर अवलंबुन रहावे लागेल आणि हे चुकीचे आहे.

४. वीज बिल अर्धे -
हे सर्वांना माहीतीच आहे पुन्हा येथे लिहित नाही, फक्त वीज मुफ्त नाहिये ५० % कटोती आहे , हे कृपया लक्षात ठेवावे. आणि माझ्या अंदाजानुसार पहिल्या ४०० युनिट मधेय ही कटोती आहे.
आणि मिटर घोटाळे आणि त्यामुळॅ परेशान नागरिकांना त्यांचे पृओब्लेम लवकर सोडवण्यास सरकार जबाबदार असेन.

५. वीज कंपण्यांचे ऑडिट

5.डिस्कॉम चे स्वतंत्र ऑडिट- आप वीज कंपण्यांचे ऑडीट करणार आणि विध्जानसभेत मांडुन पुन्हा बिजबिलाबाबत पुनर्गठण केले जाईन .
- ऑडीट बद्द्ल कंपण्या कोर्टात वगैरे जाणे मला योग्य वाटत नाही, जर तुम्ही बरोबर असाल तर ऑडीट काही तुम्हाला भ्रष्ट ठरवणार नाही. पण तुमच्या चुका समोर यायला नको असे वाटते आहे का ?
ऑडीट होणे हे चांगलेच आहे, याला विरोध कोणाचा नसावा असे वाटते.

६.. स्वताचे इलेक्ट्रीक पावर स्टेशन

आप स्वता दिल्लीत पॉवर स्टेशन उभारुन दिल्लीची ६२००MW वीज पुरवण्याचे उद्धीष्ट साध्य करेल आणि राजघाट व बवाना सांयंत्र चे ही कुशलतापुर्ण अध्यायन करेल.

७. वीज वितरण कंपण्यांचे प्रतिस्पर्ध्यांची सुरुवात
प्रतिस्पर्धी आल्याने व्यव्स्थीत सेवा आणि योग्य वीज दर यामध्ये नागरीकांचा फायदा होयील असे आप ला वाटते. त्या साठी ते अश्या कंपण्यांना प्रोत्साहीत करतील . जसे मोबाईल सर्विसेस चे झाले आहे, तसेच त्यांना वीज क्षेत्रात हवे आहे.


८. सोलर सिटी बनवण्याची योजना

घर, सोसायटी उद्योग आणि इतर ठिकाणी सओर उर्जेच्या मार्फत वीज घेवुन २०२५ पर्यंत जरुरत च्या २० % वीज मिळवण्याचे ध्येय
आणि हे धोरण असने काही जास्त तोट्याचे आणि वइरोध करण्याजोगे नक्कीच नाही. आपण्ही आपल्या येथे ही हे करु शकतो.

९ पाण्याचा अधिकार आणि १०. मोफत पाणी

हा मुद्दा ही सर्वांना माहिती आहेच लिहित नाही, परंतु . पाईप कनेक्शन हे सीवेज नेटवर्क मध्ये जोडण्याचे काम आप करेन आणि पाणी सप्लाई आणि वितरण प्रणालीची जोच आप करुन व्यव्स्थीतता आणण्याचे काम आप करेन

११.निष्पक्ष और पारदर्शी पानी मूल्य निर्धारण-
पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा जास्तीच्या पाण्यासाठी चे मुल्य योग्य ठवले जाईन आणि दरवर्षी १० % पाण्याच्या मुल्यांमध्ये वाढ आप थांबवणार आणि कधी वाढ करायची असेन तर विचार-विमर्श नुसारच ती वाढ केली जाईन
आम आदमी पार्टी सस्ती व स्थायी कीमत पर दिल्ली के सभी नागरिकों को पीने के पानी की सुविधा मुहैया कराएगी। पानी की दरों में अनिवार्यत: सालाना 10 प्रतिशत की बढ़ोतरी के प्रावधान को समाप्त करेगी और किसी भी तरह की बढ़ोतरी विचार-विमर्श के बाद ही की जाएगी।


१२. मुनक नहर मधुन पाणी
-

दिल्ली हरियाणा पेक्षा ही अतिरिक्त पाण्याची हकदार आहे । उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार दिल्लीला जास्त पाणी मिळावे या साठी आप कायद्याच्या चौलटीत राहुन प्रयत्न करणार

१३, जल संवर्धन वाढवण्यावर जोर -
जल संचयन, विहिरींचे पुनर्भरण, मिटी जल संरक्षण संबंधी जोडल्या गेलेल्या योजनांना पाठपुरवठा आप करेन आणि मोहल्ला सभेच्या द्वारेच जवळील झरे, तळी आणि इअतर जल संचयांना पुनर्जिवीत करेन

१४ . पाणी माफियांच्या विरुद्ध कारवाई -
आप राजनैतिक आधार घेतलेल्याठेकेदार आणि पाणी माफियांविरुद्ध कारवाई करुन, पारदर्शी टैंकर पानी वितरण प्रणाली विकसित करेन . सक्र्य टँकर ची अनुसूची ऑनलाईन आणि मोबाईल वर उबलब्ध केली जाईन

१५ यमुना पुनर्जीवित-

यमुना नदि चे जीवनदायीनी म्हणून पुनर्जीवन करतानाच, औद्योगीक आणि अनोपचारीक पाणी यमुनेत मिसळण्यास सरकार रोक लावेल.

प्रतिक्रिया

लॉर्ड फॉकलन्ड's picture

22 May 2015 - 2:24 pm | लॉर्ड फॉकलन्ड

अगदी.

दिल्ली सरकार राजस्थानच्या शेतकर्‍याला दिल्लीत आणून त्याच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहून त्याला आत्महत्येचं नाटक करायला लावतंय आणि त्यात त्याचा जीव गेल्यावर त्याच्या टाळूवरचं लोणी ओरपतंय.
दिल्ली सरकार मुख्य सचिवांच्या कार्यालयाला कुलुप लावण्याचा पोरकटपणा करतंय.
दिल्ली सरकार मुख्य सचिव पदासाठी ज्या व्यक्तीचं नाव सुचवतंय त्याच व्यक्तीवर २ दिवसांनी कोणतेही पुरावे नसताना वीज कंपन्यांशी साटंलोटं करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतंय.
दिल्ली सरकार आपल्याला जे जे विरोध करताहेत त्यांची बाऊन्सर्सकरवी झडती घेऊन त्यांना मारहाण करून पक्षातून हाकलून देतंय.... इतकी भारी कामं सुरू असल्यावर पोट्,पाठ्,हात,पाय,केस्,नखे असे सगळेच दुखेल.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

22 May 2015 - 4:05 pm | ईश्वरसर्वसाक्षी

ले.गव्हर्नर मोदी का व्हाइसराय है:- उगपुरुश
आता मात्र शब्द खुंटले (माझेच)

किति दिवस असे ह्यच्यावर नाहि तर त्याच्यावर आरोप करणार आहेत हे लोक ? आय माय स्वारि पुढिल ५ वर्ष तरि त्याना ते करण्या पासुन कोणि पराव्रुत्त नाहि करु शकणार. पुर्ण राज्याचा दर्जा नसला तरि ह्याला कोणितरि (गुलामांपैकि) सांगा रे कि ह्याला जनतेने मुख्यमंत्री पदि बसवलय, किमान त्याचि तरि तमा बाळग.

#पांचसालकेजरीवाल (लगे रहो, तुम हसाना जानते हो और हम हसना, अभि पांच साल तो ये लगा हि रहेगा )

काळा पहाड's picture

22 May 2015 - 4:26 pm | काळा पहाड

जगातला सर्वात चांगला विनोद कोणता? तर ज्यावेळी दुसरा घसरून पडतो त्यावेळी घडतो तो. इथे तर पूर्ण दिल्लीच घसरून पडतेय आणि हा विनोद पूर्ण ५ वर्ष चालणार आहे. दिल्लीवर पूर्ण भारतातली जनता हसत असेल. पाच वर्ष तरी हा मनोरंजक तमाशा मोफत पहायला मिळणार आहे.

नांदेडीअन's picture

25 May 2015 - 5:46 pm | नांदेडीअन

Lt Governor must act on the ‘aid and advice of the council of ministers’ and that ‘mandate of the people must be respected by the Lt governor in respect of matters which fall within the domain of the Legislative assembly.
- Delhi High Court

The NCT of Delhi shall not be administered by the President through the Lieutenant Governor in respect of matters over which the Legislative assembly of the NCT has authority to make laws.
- Delhi High Court

Central government's notification of restricting the jurisdiction of the ACB was ‘wrong.’
- Delhi High Court

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 12:29 pm | नांदेडीअन

दोन गोष्टी

१. केजरीवाल सरकारला १०० दिवस पूर्ण झाले :
त्यानिमित्त त्याने ओपन कॅबिनेट बैठक घेतली.
ज्यात त्याचे सर्व कॅबिनेट मंत्री, चीफ सेक्रेटरी आणि ऑफिसर्स उपस्थित होते.
यात प्रत्येक मंत्र्याला बोलायची संधी मिळाली, प्रत्येक मंत्र्याने आपण काय केलं, काय करत आहोत आणि पुढचा प्लान काय आहे हे सांगितलं.
शेवटी केजरीवाल बोलला, ज्यात त्याने फक्त पब्लिकच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली.
आम्ही हे करत आहोत हे उपकार नाहीत किंवा आम्ही तुमच्यासाठी फार काही करत आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आलो आहोत असेही नाही.
आम्ही जे करत आहोत त्याची फक्त माहिती देण्यासाठी ही मिटिंग आहे असे सांगण्यास तो विसरला नाही.
यात त्याने एकदाही शीला दीक्षित सरकारच्या निकम्मेपणावर किंवा मागील सरकारच्या नाकर्तेपानावर एक शब्दही काढला नाही.

२. मोदी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले
त्या निमित्ताने भाउंनी मथुरेत (आणखीन एकदा) भव्यदिव्य भाषणाचा घाट घातला.
त्यात मोदीसरकारचा कोणताही मंत्री नव्हता.
हे बाबाजी एकटेच होते.
भाषणाची सुरुवात मन्नू सरकारला शिव्या देऊन झाली.
ते असते तर किती वाईट झालं असतं याची भीती दाखवली गेली आणि मी आलो म्हणून मी कसा तारणहार ठरलो याची स्वत:च दवंडी पिटली.
निम्मा वेळ मागच्या सरकारला शिव्या देणे, निम्मा वेळ न केलेल्या कामाचे क्रेडीट घेणे आणि फेकाफेकी यात गेला.
यात दुसऱ्या कोणत्याही मंत्र्याचे किंवा अधिकाऱ्याचे नाव त्यांनी घेतले नाही.
सगळे काही स्वत:च करत आहोत, सगळीकडे स्वत:च चौकीदारी करत आहोत, आपण गरिबांचे रखवाले आहोत, आपण श्रीमंतांसाठी काम करत नाही इत्यादी नेहमीची यशस्वी फेकाफेक आणि "मी मी मी माझं.. ' इत्यादी करून त्यांनी भाषण आटोपले.
काही कोणाचे ऐकून घेतले नाही, काही कोणाचे प्रश्न घेतले नाही.
स्वत: जे पोतं आणलेलं ते ओतलं आणि गेले.
मौज वाटली.
यात कोणाचेही समर्थन/विरोध नाही, जे पाहिलं ते लिवलं.
तुम तुम्हारा सोचो और ठरवो

Written by - Prashant B Nimbalkar

श्रीगुरुजी's picture

26 May 2015 - 3:49 pm | श्रीगुरुजी

>>> यात प्रत्येक मंत्र्याला बोलायची संधी मिळाली, प्रत्येक मंत्र्याने आपण काय केलं, काय करत आहोत आणि पुढचा प्लान काय आहे हे सांगितलं.
शेवटी केजरीवाल बोलला, ज्यात त्याने फक्त पब्लिकच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली.

गजेंद्रसिंहाला आत्महत्या करायला लावण्याचं नाटक कसं फसलं आणि त्यात खरोखरच तो कसा गेला हे सांगण्यास ते विसरलेले दिसताहेत.

गजेंद्रसिंहाकडे सापडलेलं पत्र हे त्याने लिहिलेलेच नव्हते हे सांगण्यास देखील ते विसरेलेले दिसताहेत.

त्याच्या लटकत्या मृतदेहासमोर पुढील ७५ मिनिटे भाषण करताना कशी मज्जा आली हेही सांगायला ते विसरलेले दिसताहेत.

योगेंद्र यादव, प्रशांत भूषण इ. ना पक्षाच्या बैठकीत झडती घेऊन बॉडीगार्ड्सकरवी कशी मारहाण करून हाकलून लावलं हेही सांगायला ते विसरलेले दिसताहेत.

मुख्य सचिव फक्त १० दिवसांच्या रजेवर गेल्यावर राज्यपालांनी फक्त त्या १० दिवसांकरीता शकुंतला गम्लीन यांची नेमणूक केल्यावर आपण त्यांच्यावर कसे खोटे आरोप केले आणि दुसर्‍या एका सचिवाच्या केबिनला कुलुप लावून आपण त्यांची कशी गम्मत केली हेही सांगण्यास ते विसरलेले दिसताहेत.

आपण बॉडीगार्ड घेऊन गजेंद्रसिंहाच्या घरी गेल्यावर त्याचा योग्य तो परीणाम कसा झाला ते संजय सिंहांनी सांगितलं का?

गजेंद्रसिंह जायच्या काही दिवस आधी आपलं आणि त्याचं फोनवरून काय संभाषण झालं ते सांगण्यास सिसोदिया विसरलेले दिसताहेत.

आजतक वर आपण ढसाढसा रडण्याचा कसा उत्कृष्ट अभिनय केला हे सांगण्यास आशुतोष विसरलेले दिसताहेत.

एकंदरीत बर्‍याच गोष्टी ते सांगायला विसरलेले आहेत.

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 4:23 pm | नांदेडीअन

केजरूके गुलाम या टॉपिकवर एक चक्कर टाका ना प्लिज.

चिनार's picture

26 May 2015 - 5:06 pm | चिनार

या धाग्यावर माझ्या प्रतिसादाला तुम्ही उत्तर दिले नाही. अर्थात तुम्हाला प्रतिसाद न देण्याचा साक्षात्कार झाल्याचे वाचून मी शांत बसलो होतो.
http://www.misalpav.com/comment/reply/30890/696975
पण इथे अजूनही तुम्ही सक्रीय दिअत आहात म्हणून आठवण करून दिली.

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 5:40 pm | नांदेडीअन

केलाय तुम्हाला तिकडे रिप्लाय.

श्रीगुरुजी's picture

26 May 2015 - 7:21 pm | श्रीगुरुजी

सगळ्या धाग्यांवर चक्कर टाकलेली आहे. धागा बदलला म्हणून मी वर दिलेली वस्तुस्थिती बदलत नाही.

पिंपातला उंदीर's picture

26 May 2015 - 9:02 pm | पिंपातला उंदीर

ते काय करायचं ते आप बघून घेईल . एकंदरीत आप विरोधकांनाच आप ची जास्त काळजी दिसतेय .

आमच्या वरील प्रतिसादाची प्रेरणा इथ

http://www.misalpav.com/comment/699589#comment-699589

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 11:01 pm | नांदेडीअन

sml

नांदेडीअन's picture

4 Jul 2015 - 12:03 pm | नांदेडीअन

Delhi Janlokpal Bill final draft completed.
Bill to be sent to Central Govt through LG for approval.
- ANI News

नांदेडीअन's picture

4 Jul 2015 - 12:07 pm | नांदेडीअन

Lokpal 2.0 to get more teeth: AAP gets ready to unveil new and improved anti-corruption bill
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3148958/Lokpal-2-...

नांदेडीअन's picture

19 Jul 2015 - 12:20 pm | नांदेडीअन

mohallaclinic

नांदेडीअन's picture

19 Jul 2015 - 12:21 pm | नांदेडीअन

Delhi government to launch 'aam aadmi' canteens in Delhi, provide meal for Rs 5
http://www.ibnlive.com/news/india/delhi-government-to-launch-aam-aadmi-c...

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2015 - 6:31 pm | श्रीगुरुजी

अम्मा जयललिताने सुद्धा 'अम्मा कॅन्टीन' या नावाने १ रूपयात इडली-साम्बार देणारी कॅन्टीन्स सुरू करून २-३ वर्षॅ लोटली. एकन्दरीत किमान २५-३० रुपये किम्मत असलेल्या वस्तू मतदारान्ना अत्यल्प दरात देण्याची लालूच दाखविणे हे तामिळनाडू मॉडेल केजरीवाल दिल्लीत सुरू करताना दिसत आहेत. करदात्यान्च्या पैशातून उधळपट्टी करून मतदारान्ना लालूच दाखविणे व फुकटेगिरीची सवय लावणे आणि आपण गरीबान्चा मसीहा असल्याचा आव आणणे यात केजरीवाल कुशल आहेत.

एक शन्का. अशी कॅन्टीन चालविताना जो तोटा होणार आहे, तो कोठून भरून काढणार? केजरीवाल स्वतःच्या खिशातून देणार का आआप देणग्या गोळा करून तोटा भरून काढणार का करदात्यान्च्या पैशावर डल्ला मारणार?

अर्धवटराव's picture

19 Jul 2015 - 8:29 pm | अर्धवटराव

अशा व्यवहारांमधे तोटा झालाच पाहिजे असं काहि नाहि. ना नफा-ना नुकसान तत्वावर असे उपहारगृह चालवता येतं. फार मोठ्या प्रमाणात उद्योग केल्यास अधिक उत्तम.
पण इथे मुद्दा थोडा वेगळा वाटतोय. स्माजवादी विचारसरणीचे असे उद्योग पुढेमागे सरकारच्या गळ्यातली धोंड बनतात. अगोदरच पैशाची चणचण असणार्‍या सरकारने असले उद्योग इतक्या लवकर करु नयेत. असो.

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2015 - 9:56 pm | श्रीगुरुजी

५ ते १० रूपयात उत्तम, पोषक जेवण देणे म्हणजे कॅन्टीन तोट्यातच चालणार.

एक जुने वाचलेले आठवले. तुम्ही एखाद्याला रोज फुकट मासे देण्यापेक्षा त्याला मासे पकडणे शिकविले तर तो स्वतःच्या पायावर उभा राहून फुकट घेण्याची सवय लागणार नाही.

अर्धवटराव's picture

20 Jul 2015 - 12:11 am | अर्धवटराव

नीट प्लॅनींग केल्यास १० रुपयात एक वेळचे 'पोषक' अन्न शक्य आहे. तिथे अगदी दिल्लीवाल्यांची चटपटीत डीश अपेक्षीत नाहि.

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Jul 2015 - 10:52 am | पुण्याचे वटवाघूळ

च्यायला तुम्हाला दहा रूपयात पोषक डिश प्लॅन करता येत असेल तर सांगा ना आम्हालापण. जरा खर्च कमी करीन असे म्हणतो :)

बाकी दहा रूपयात पोषक जेवण शक्य आहे हे वाचून संजय निरूपम आणि कोण कोण १ ते २२ रूपयात जेवण शक्य आहे असे म्ह्णायचे त्याची आठवण झाली.

अर्धवटराव's picture

20 Jul 2015 - 11:20 pm | अर्धवटराव

आमचे सरकार येऊ देत. तुम्हालाच फुड मिनिस्टर करतो :)

पोषक जेवण म्हणजे एकदम ताटभर, चमचमीत अन्न नाहि. दहा रुपयात एक समोसा खाण्यापेक्षा नारळ/केळी/दलीया खाल्लं तरी ते जास्त पोषक असतं. आणि सरकार नामक यंत्रणेला चार ठिकाणच्या योजना एकत्र करुन, ग्रॉस लेव्हलला अन्न प्रक्रिया करुन १० रुपयात पोटाला बर्‍यापैकी आधार देणारं अन्न बनवणं कठीण नाहि. एकदम तड लागेस्तो जेवण मिळणार नाहि त्यातुन, पण कुपोषण होणार नाहि हे नक्की.

नांदेडीअन's picture

19 Aug 2015 - 9:16 pm | नांदेडीअन

CAG findings a shot in the arm for Kejriwal govt
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/CAG-findings-a-shot-in-the...

बिजली कंपनियों ने घाटे को 8 हजार करोड़ बढ़ाकर बताया: CAG
http://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/other-news/discoms-infl...

गॅरी ट्रुमन's picture

20 Aug 2015 - 2:19 pm | गॅरी ट्रुमन

तेच म्हटले हे आपटर्ड ही बातमी येऊनही कुठे गायब आहेत.

दिल्लीतील ३ डिसकॉमने accumulated तोटा २० हजार कोटी रूपये आहे असे म्हटले होते ( संदर्भः http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/CAGs-discom-audit-over-but... ). तो आकडा ८ हजार कोटींनी फुगवून दाखवला म्हणजे accumulated तोटा १२ हजार कोटी रूपये होता यावर तर शिक्कामोर्तब झाले. म्हणजे या कंपन्या तोट्यात होत्या हे नक्की. तसे असेल तर महान युगपुरूषजी श्री.रा.रा अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे होते की या कंपन्या तोट्यात नाहीत तर फायद्यात आहेत . पुरावा हवा आहे का? हा घ्या--- http://www.ndtv.com/cheat-sheet/delhis-electricity-scam-exposed-claims-a... . यातील तिसरा आणि चौथा मुद्दा बघा.

३. Mr Kejriwal says that in 2010, Brijnder Singh, who was head of the Delhi Electricity Regulatory Commission (DERC), which decides electricity prices, found that distribution companies (DISCOMS) were making large profits because inefficiencies in the supply had been contained. Mr Kejriwal says that the chair of the DERC wanted power prices to be slashed by 23%.

४. He alleges that power companies projected losses of nearly 600 crores for the years 2010-11 and wanted prices increased. The chairman of the DERC, however, reportedly found their profits would add upto nearly 3000 crores and wanted power rate slashed by about 20%.

म्हणजे तोट्यात असलेल्या कंपन्यांकडून दिलेल्या वीजेचे बिल अर्ध्यावर आणून त्यांचा तोटा अजून वाढत जाणार नाही का? केजरीवालांचे वीजेचे बिल अर्ध्यावर आणायच्या बेसिसलाच कॅग ऑडिटने नख लावले आहे. म्हणजे खरे तर केजरीवाल तोंडावर आपटले आहेत या कॅगच्या रिपोर्टमुळे. पण कसे असते काहीही झाले तरी जितं मया किंवा गिरा तो भी टांग उपर ही आपटर्डांची प्रवृत्ती जायची नाही.

रच्याकाने तुमचे महापुरूष लालू यादव सामील असलेल्या आघाडीला बिहारमध्ये पाठिंबा देत आहेत त्याचे काय?

तुमचा भ्रष्टाचारविरोधी असल्याचा बुरखा टराटरा फाटला आहे हे मान्य करा.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 2:32 pm | श्रीगुरुजी

>>> तेच म्हटले हे आपटर्ड ही बातमी येऊनही कुठे गायब आहेत.

हे आपटार्ड आपण देणार असलेली बातमी न वाचताच, केवळ शीर्षक बघून इथे लिन्क देतात. नंतर मिपावरील एखाद्या सदस्याने लिंकमधील बातमी पूर्ण वाचून केजरीवाल आणि कंपनीचा खोटारडेपणा उघडकीला आणल्यानंतर हे आपटार्ड कोणताही प्रतिवाद न करता पुढील काही दिवस अज्ञातवासात जातात. थोड्या दिवसांनी पुन्हा येऊन नवीन लिंक देऊन निघून जातात.

यांनीच काही आठवड्यांपूर्वी असा दावा केला होता की दिल्लीचे पोलिस आआपच्या नेत्यांना मारण्याचा प्रयत्न करीत आहेत व आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी एका चित्रफीतीची लिंक दिली होती. यांच्या दाव्यानुसार आआपचे दिलिप पांडे बोलत असताना पोलिसांनी त्यांच्यावर व्हॅन घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. मी ती चित्रफीत पूर्ण पाहिल्यावर असे उघडउघड दिसून आले की ती चित्रफीत वेगवेगळ्या २-३ चित्रफितींचे तुकडे जोडून व एडीट करून मॉर्फ केलेली आहे. दिल्ली पोलिसांवर म्हणजेच पर्यायाने भाजप सरकारवर खोटे आरोप करण्यासाठी आआपवाल्यांनीच ती बनावट चित्रफीत तयार केली. हे मी सविस्तरपणे मांडल्यावर हे आपटार्ड इथून गायब झाले ते काल उगवले.

तुम्ही वर जी माहिती लिहिली आहे ती वाचल्यावर हे आता पुढील काही दिवस मिपावर फिरकणार नाहीत. २-३ आठवड्यांनी पुन्हा एकदा येऊन नवीन लिंक देऊन गायब होतील.

अर्धवटराव's picture

20 Aug 2015 - 8:27 pm | अर्धवटराव

रच्याकाने तुमचे महापुरूष लालू यादव सामील असलेल्या आघाडीला बिहारमध्ये पाठिंबा देत आहेत त्याचे काय?

केंद्रात मोदींना रोखायला केजरीसाहेब राज्यात लालुंशी आघाडी करत आहेत. हाए का नाय डोक्यालिटी :)

गॅरी ट्रुमन's picture

22 Aug 2015 - 2:34 pm | गॅरी ट्रुमन

अहो नांदेडिअन, एक महत्वाची बातमी द्यायला तुम्ही विसरलातच की.

Arvind Kejriwal’s Aam Aadmi Party had nothing to do with CAG audit of discoms

http://www.financialexpress.com/article/industry/companies/arvind-kejriw...

याचे कारण दिल्लीतील डिस्ट्रीब्युशन कंपन्यांचे कॅग ऑडिट करायचा निर्णय शीला दिक्षित यांच्या सरकारने २०११ मध्ये घेतला होता. आणि हे खुद्द दिल्ली सरकारचे वकिल राजीव धवन यांनी म्हटले आहे असे या बातमीत दिले आहे.

एक तर या ऑडिटमुळे केजरीवाल तोंडावर जोरदार आपटलेले आहेतच. आणि हे ऑडीट शीला दिक्षित यांच्या सरकारने करायचा आदेश दिला होता तरी त्याचे श्रेय लाटायचा प्रयत्नही केजरीवाल आणि आपटर्ड गॅन्ग कडून झाला आहे. याविषयी तुम्ही काहीही लिहाल ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे. आतापर्यंत विविध चर्चांमध्ये अनेक मिपाकरांनी काही स्पेसिफिक प्रश्न विचारले होते तरी त्याला बगल देऊन मधूनमधून मिपावर अवतीर्ण होऊन नव्यानव्या लिंका देण्याव्यतिरिक्त तुम्ही फार काही सकारात्मक चर्चा केल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा तुम्ही याविषयी काही लिहिणार नाहीच ही खात्री आहेच. पण तरीही आम आदमी पक्षवाले नक्की कोणत्या थराला जाऊ शकतात आणि किती ढोंगी होऊ शकतात हे इतर मिपाकरांसाठी लिहित आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 1:48 pm | श्रीगुरुजी

हा माणूस स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एवढा हपापलेला आहे की स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठी याने स्वातंत्र्यदिन सुद्धा सोडला नाही.
__________________________________________________________________________________________

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 2:32 pm | प्यारे१

अशी नावं बनवणं वगैरे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत बसून आदेश दिलेला असतो का?

माझ्या मते असं स्वतः कुणी सांगत नसावं.
कुणातरी स्वामीनिष्ठ कार्यकर्त्याला वाटलं असेल कि स्वातंत्र्यदिनी आपण जास्त शोबाजि करु.
त्यानं केली असणार शाळकरी पोरांना नि त्यांच्या मास्तर, हेडमास्तरांना धरुन.
ऐन कार्यक्रमात कोण म्हणणार बाबांनो माझं नाव का लाल करताय म्हणुन?

यात केजरीवाल बद्दल प्रेम वगैरे काही नाहीये, एक साधा प्रश्न आहे.
एवढ्या मायन्युट डीटेल मध्ये मुख्यमंत्र्यांशी कार्यक्रम डिस्कस होतो का असा. (नाव 'त्यांचं' असल्यानंतर व्हायलाच हवा खरं तर) मला 'आपटे/ टार्ड' म्हणू नये.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 2:40 pm | श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन's picture

20 Aug 2015 - 2:43 pm | गॅरी ट्रुमन

एवढ्या मायन्युट डीटेल मध्ये मुख्यमंत्र्यांशी कार्यक्रम डिस्कस होतो का

पण १५ ऑगस्टला हा प्रकार लक्षात आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या नाहीत आणि जे काही चालू आहे ते बघत राहिले याचाच अर्थ त्यांचा मूक पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले? शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 'अरविंद केजरीवाल' हे नाव त्या रंगाचे कपडे घालून तयार केले आहे. तेव्हा मुलांनी रॅन्डमली बसावे म्हणजे कुठचाच पॅटर्न दिसणार नाही एवढे म्हणता येत नव्हते का माननीय मुख्यमंत्र्यांना? तसे करणे शक्य नसेल (समजा इतकी मुले उठणार आणि इतरत्र बसणार म्हणजे बराच गोंधळ होईल या शक्यतेमुळे) निदान भाषणात तरी हा प्रकार परत होणार नाही हे बघा असे सांगता आले असते की नाही?

आणि या माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करून बघाच--कसे एकामागोमाग एक हिंदी सिनेमे बघायला वेळ आहे त्यांच्याकडे.इतका वेळ आहे त्यांच्याकडे. मग शाळेला सूचना ते वेळ नाही म्हणून देणार नाहीत हे तरी शक्य वाटत नाही.अन्य कुठले कारण असले तर माहित नाही.

कपिलमुनी's picture

20 Aug 2015 - 2:47 pm | कपिलमुनी

Image

गॅरी ट्रुमन's picture

20 Aug 2015 - 2:49 pm | गॅरी ट्रुमन

मग याच न्यायाने शीला दिक्षित यांच्या कार्यकाळातही भ्रष्टाचार होता मग केजरीवालांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार असला तर काय बिघडले असेही म्हणता येईल. बरोबर की नाही कपिलमुनी?

कपिलमुनी's picture

20 Aug 2015 - 3:02 pm | कपिलमुनी

हा माणूस स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एवढा हपापलेला आहे की स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठी याने स्वातंत्र्यदिन सुद्धा सोडला नाही.

श्रीगुरुजींनी असा आरोप केला होता. आणि या गोष्टी मुख्यमंत्र्यांना विचारून करत नाहीत. ही दिल्ली मधील एक प्रथा आहे आणि श्री गुरुजींनी "स्वतःचा उदोउदो" करण्याचा आरोप केला होता.

आणि इथे भाजपाचा मुख्यमंत्री असता तरी हीच प्रथा पाळली गेली असती आणि केजरीवाल यांचा हा मुख्यमंत्री म्हणून पहिला स्वातंत्र्यदिन होता. या प्रकारबद्दल त्यांनी नंतर ट्विटर वर लिहिले आहेच.
"Some school students made visual formation of my name during independence celebrations. I was not at all aware that students wud do this .I am told it has been a practice in del govt to form visual formation of whoever chief guest is (CM or LG) ,I agree this is a wrong practice. I will stop this practice forthwith "

भ्रष्टाचार आणि मानवंदना यातला फरक समजून घ्या

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 8:23 pm | श्रीगुरुजी

>>> ही दिल्ली मधील एक प्रथा आहे

मुनीवर्य,

प्रथा? ही प्रथा नक्की कधी सुरू झाली आणि किती वर्षांपासून सुरू आहे?

१९९३-१९९८ या काळात दिल्लीत भाजपचे सरकार होते. त्यात सुरवातीला मदनलाल खुराना आणि नंतर साहेबसिंग वर्मा हे मुख्यमंत्री होते. त्या काळातले असे फोटो दिसले नाहीत. बहुतेक भाजपही ही जुनी प्रथा त्या ५ वर्षात मोडीत काढली असावी.

किंवा, ही प्रथा काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली असावी.

बरोबर ना मुनीवर्य?

>>> आणि इथे भाजपाचा मुख्यमंत्री असता तरी हीच प्रथा पाळली गेली असती

कशावरून? भाजपचे मुख्यमंत्री ५ वर्षे असताना असे काही झाल्याचे दिसत नाही.

>>> आणि केजरीवाल यांचा हा मुख्यमंत्री म्हणून पहिला स्वातंत्र्यदिन होता.

पहिला स्वातंत्र्यदिन म्हणजे पहिली मंगळागौर, पहिला पाळणा असे काही होते का की ज्यामुळे लगेच स्वतःचे कौतुक करून घ्यावा?

>>> या प्रकारबद्दल त्यांनी नंतर ट्विटर वर लिहिले आहेच.
"Some school students made visual formation of my name during independence celebrations. I was not at all aware that students wud do this .I am told it has been a practice in del govt to form visual formation of whoever chief guest is (CM or LG) ,I agree this is a wrong practice. I will stop this practice forthwith "

"I was not at all aware that students wud do this" - असत्य

".I am told it has been a practice in del govt to form visual formation of whoever chief guest is (CM or LG) " - असत्य

अर्थात अंतर्बाह्य खोटारडे असलेल्या केजरीवालांकडून सत्याची अपेक्षाच नाही.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 8:36 pm | श्रीगुरुजी

>>> भ्रष्टाचार आणि मानवंदना यातला फरक समजून घ्या

मानवंदना आणि मॅनेज केलेला स्वतःचा उदोउदो यातला फरक समजून घ्या.

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 4:30 pm | प्यारे१

कपिल धन्यवाद!

एक प्रथा आहे. विषय मिटला.

विकास's picture

20 Aug 2015 - 4:34 pm | विकास

भ्रष्टाचार देखील प्रथा आहे. :(

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 4:46 pm | प्यारे१

केजरीवाल हा इसम माझ्या डोक्यात प्रचंड जातो.

फक्त आत्ताच्च याच्च परेडबाबतच्च प्रथा हाच्च एवढाच्च विषयच्च आहे!
धन्यवाद.

भ्रष्टाचाराबाबत काही बोलायचं नाही.
तरीही तुमच्या नवीन धाग्यावर काही दोन चार चांगले प्रतिसाद तुम्हाला देईन एवढं नक्की सांगतो.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 8:24 pm | श्रीगुरुजी

>>> एक प्रथा आहे. विषय मिटला.

अशी कोणतीही प्रथा नव्हती.

प्यारे१'s picture

20 Aug 2015 - 8:40 pm | प्यारे१

ओके केजरीवाल खोटं बोलले. नेहमीच बोलतात. विषय संपला.

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 10:44 pm | श्रीगुरुजी

बरोब्बर. विषय संपला.

विकास's picture

20 Aug 2015 - 8:53 pm | विकास

असेच अजून काही फोटो...

Bharat

68th I Day

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 10:46 pm | श्रीगुरुजी

मोदी स्वतःचाच उदोउदो करीत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. कारण, जय आणि भारत ही मोदींचीच पाळण्यातील नावे आहेत.

प्यारे१'s picture

21 Aug 2015 - 12:00 am | प्यारे१

बास की राव! थोडक्यात गम्मत असते.
विकास रावांनी ती चित्रं मुद्दाम फरक दाखवून देण्यासाठीच टाकलीत. विकास यांचे लेखन कधीतरी वाचावं म्हणजे त्यांचा झुकाव समजेल.

विकास's picture

21 Aug 2015 - 12:54 am | विकास

आम्ही नाही झुकत जा! ;)

टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते।

सत्य का संघर्ष सत्ता से,
न्याय लड़ता निरंकुशता से,
अँधेरे ने दी चुनौती है,
किरण अन्तिम अस्त होती है।

दीप निष्ठा का लिए निष्कम्प
वज्र टूटे या उठे भूकम्प,
यह बराबर का नहीं है युद्ध,
हम निहत्थे, शत्रु है सन्नद्ध,
हर तरह के शस्त्र से है सज्ज,
और पशुबल हो उठा निर्लज्ज।

किन्तु फिर भी जूझने का प्रण,
पुन: अंगद ने बढ़ाया चरण,
प्राण-पण से करेंगे प्रतिकार,
समर्पण की माँग अस्वीकार।

दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते;
टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते।

----------------
सन्माननीय कवीराज सांगायला हवेत का?

अर्धवटराव's picture

21 Aug 2015 - 1:19 am | अर्धवटराव

म्हणजे हे विनोदी काव्य आहे तर :)

प्यारे१'s picture

21 Aug 2015 - 1:24 am | प्यारे१

अरे काय हे? अर्धवटराव, नका करु असं.
आणि विकासराव बघतोय बरका. मागच्या १६ मे पासून बघतोय तुमचं वागणं.

विकास's picture

21 Aug 2015 - 1:34 am | विकास

बघाना! मी कवीराजांना "सन्माननीय" म्हणले आहे. ते विनोदी कसे असेल? :)

विकासराव बघतोय बरका. मागच्या १६ मे पासून बघतोय तुमचं वागणं.

जो पर्यंत गावात शोभा होत नाही तो पर्यंत हे वागणं चालू राहील. ;)

कपिलमुनी's picture

20 Aug 2015 - 8:07 pm | कपिलमुनी

प्रशांत निंबाळकर यांच्या चेपुवरुन साभार

श्रीगुरुजी's picture

20 Aug 2015 - 8:33 pm | श्रीगुरुजी

अंतर्बाह्य लबाड असलेल्या केजरीवालांची लबाडी इथेही दिसून येते. "See how media reporting and few bhakts spreading nonsense" हे त्यांचे वाक्य म्हणजे त्यांची प्रसिद्धी उघडकीला आणणे म्हणजे nonsense अशी त्यांनी मखलाशी केली आहे.

त्यांची दुसरी लबाडी म्हणजे हे वाक्य "When BJP Najeeb Jung hoists the national flag ... no one cares". या वाक्यातून त्यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांना थेट भाजपत ढकलून दिले आहे. नजीब जंग हे आयुष्यात कधीही भाजपमध्ये नव्हते आणि आतासुद्धा ते भाजपत नाहीत. त्यांना दिल्लीच्या राज्यपालपदी काँग्रेसने नेमले होते, भाजपने नाही. परंतु आपल्या चुकीचे समर्थन करण्यासाठी ते (१) शीला दिक्षित व नजीब जंग यांनी केलेल्या चुकीचा आधार घेत आहेत आणि (२) भाजपचा कोणताही संबंध नसलेल्या नजीब जंगांवर भाजपचा शिक्का मारून आपल्यासारखेच भाजपही वागला असा खोटा दावा करीत आहेत.

अर्थात केजरीवालांच्या लबाडीचे आश्चर्य अजिबात वाटत नाही. लबाडी हेच त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जे शीला दिक्षितांनी केले तेच केजरीवाल करीत आहेत कारण काँग्रेस आणि आआप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आआप ही काँग्रेसचीच 'बी' टीम आहे.

गॅरी ट्रुमन's picture

20 Aug 2015 - 8:42 pm | गॅरी ट्रुमन

त्यांची दुसरी लबाडी म्हणजे हे वाक्य "When BJP Najeeb Jung hoists the national flag ... no one cares". या वाक्यातून त्यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांना थेट भाजपत ढकलून दिले आहे. नजीब जंग हे आयुष्यात कधीही भाजपमध्ये नव्हते आणि आतासुद्धा ते भाजपत नाहीत. त्यांना दिल्लीच्या राज्यपालपदी काँग्रेसने नेमले होते, भाजपने नाही. परंतु आपल्या चुकीचे समर्थन करण्यासाठी ते (१) शीला दिक्षित व नजीब जंग यांनी केलेल्या चुकीचा आधार घेत आहेत आणि (२) भाजपचा कोणताही संबंध नसलेल्या नजीब जंगांवर भाजपचा शिक्का मारून आपल्यासारखेच भाजपही वागला असा खोटा दावा करीत आहेत.

पण केजरीवाल म्हणतात की नजीब जंग हे मोदींचे एजंट आहेत म्हणून. मग विषय संपला. नजीब जंग भाजपचेच आहेत :)

दत्ता जोशी's picture

20 Aug 2015 - 5:23 pm | दत्ता जोशी

केजरीवाल कोन्ग्रेस आणि भा जप लोकांच्या इतक्या तिरस्काराचा का विषय आहे हे मला न उमगलेले कोडे आहे. मी कोणत्याही पक्षाचा पंखा नाही. त्यातल्यात्यात भाजपा थोडेफार विकासाची दिशा देवू शकेल अशी भाबडी आशा मला आहे. पण आप जर दिल्लीत चांगले काम करू शकले ( against all odds ) तर सर्वच राज्यात आणि सर्वच पक्षांवर एक दबाव राहील. दिल्लीत मागच्या वेळी भाजपा आणि कोन्ग्रेस ने आपवर जी अभूतपूर्व चढाई केली ते पाहता मला असे वाटते कि सध्या दिल्लीत आप ठीक ठक काम करीत असावी. आप जरा जरी चुकली कि सगळे जण ( इन्क्लुडिंग मेडिया) हल्ला बोल तुटुन पडणार हे नक्की. जर अशा भुईथोपट नकारात्मक बातम्या फारश्या दिसत नाहीयेत त्यावरून असा निष्कर्ष निघू शकतो कि आपने अजून तरी विरोधकांच्या हातात कोलीत दिलेले नाही.

नांदेडीअन's picture

20 Aug 2015 - 10:39 pm | नांदेडीअन

AAP 2.0 के 6 महीने पूरे, पढ़िए रिपोर्ट कार्ड
http://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/aap-government...

गॅरी ट्रुमन's picture

21 Aug 2015 - 10:45 am | गॅरी ट्रुमन

जरा गजेंद्र सिंगला पण कसे मारले, तामिळनाडूमधील पेपरांमध्ये आपचे सरकार कसे चांगले काम करत आहे याच्या हिंदीतून जाहिराती कशा दिल्या, दिल्ली पोलिस दिल्ली राज्य सरकारच्या अधिकारात यावेत यासाठी एकही अधिकृत मागणी न करता थेट टिव्हीवरून जाहिराती करून मागणी करायचे ढोंग कसे केले, कधी सचिवांच्या नियुक्तीवरून तर कधी हिंदी चित्रपटे बघून त्यावर ट्विट करून तर कधी अन्य कुठल्या कारणावरून सतत प्रसिध्दीझोतात राहायची कला कशी आत्मसात केली याविषयीही जरा लिहा की. तसेच दिल्लीतील सफाई कर्मचार्‍यांना पगार द्यायला पैसे नव्हते पण जाहिरातींसाठी आहेत, एफ.टी.आय.आय मधील गुंडांना दिल्लीत बोलावून त्यांची सोय लावायला पैसे आहेत या सगळ्या गोष्टींवरही लिहा की.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2015 - 2:27 pm | श्रीगुरुजी

+१

>>> या सगळ्या गोष्टींवरही लिहा की.

या सगळ्या गोष्टी रीपोर्ट कार्ड मध्ये कशा येतील? केजरीवाल किती प्रसिद्धीपराङ्मुख आहेत हे माहिती आहे ना? म्हणून आपणच त्यांची महान कामे जगासमोर आणूया.

(१) जनतेच्या पैशातून केजरीवालांनी स्वतःला ७ खोल्यांचा बंगला घेतलेला आहे. या बंगल्याचे वीजेचे बिल दरमहा फक्त रू. १,२५,००० (अक्षरी - एक लाख पंचवीस हजार) च्या आसपास आहे. केजरीवाल जे महान कार्य करीत आहेत त्या तुलनेत इतके किरकोळ बिल म्हणजे चणेफुटाणे समजले पाहिजेत.

(२) गजेंद्रसिंहला फूस लावून दिल्लीत आणून केजरीवाल आणि कंपूने त्याला आत्महत्या करायला लावल्यावर त्याच्या नावाने बनावट चिट्ठी लिहून ठेवली आणि त्याच्या फासावर लटकत्या मृतदेहानुसार ही टोळी तब्बल ७५ मिनिटे भाषणबाजी करीत होती. नंतर त्याच्या कुटूम्बियांनी तोंड उघडू नये म्हणून यांचे संरक्षण मंत्री संजय सिंह आपल्या बाऊन्सर्सची गॅन्ग बरोबर घेऊन गजेंद्रसिंहच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना धमकावून आले.

(३) याच बाऊन्सर्सनी आआपच्या पक्ष अधिवेशनात योगेंद यादव, प्रशांत भूषण, मारूती भापकर व इतर अनेकांना मारहाण करून पक्षातून हाकलून लावले. ही गुंडगिरी सुरू असताना केजरीवाल बंगलोरमधील पंचतारांकीत रीसॉर्ट मध्ये आराम करीत होते.

(४) शकुंतला गॅम्लीन यांची हंगामी सचिवपदावर नेमणूक झाल्याचे पत्र देणार्‍या सचिवाच्या कार्यालयाला केजरीवालांनी कुलुप लावून त्यांना काम करण्यास प्रतिबंध केला.

(५) डॉक्युमेंट फोर्जरी केलेल्या जितेंद्र सिंग तोमरला याच केजरीवालांनी मंत्री केले व अखेरपर्यंत ते त्याचे समर्थन करीत होते.

(६) दिलीप पांडे, अलका लांबा इ. ची नौटंकी यांच्या आशिर्वादाने सुरू आहे.

(७) भ्रष्टाचार संपविण्यासाठी २१ व्या शतकात जंबूद्विपात महावतार धारण करणारे युगपुरूष केजरीवाल यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी लालू-नितीश यांच्या भ्रष्टाचारी युतीशी हातमिळवणी केली आहे.

(८) दूरदर्शनवरून आपला उदोउदो करणार्‍या प्रदीर्घ जाहिराती केजरीवाल जनतेच्या पैशातून दाखवित आहे. स्वतःचा उदोउदो करण्यासाठी करण्यात येणार्‍या जाहिरातींसाठी यांनी अंदाजपत्रकात प्रतिवर्ष तब्बल ५२६ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
.
.
.

लिहावे तितके थोडेच आहे. केजरीवालांच्या अगाध लीलांवर लवकरच "अरविंदलीलामृत" नावाचा ग्रंथ बाजारात येणार आहे.

अर्धवटराव's picture

21 Aug 2015 - 7:21 pm | अर्धवटराव

ट्रुमन साहेब.

केजरीवालांची नितीशकुमारांसोबत आघाडी मला कळत नाहि. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने येनकेन प्रकारेण पिएम शी जुळवुन घ्यावं हि सरळ पॉलिसी होती. केंद्रीत सत्तेने सुरुवातीला कितीही दुजाभाव दाखवला तरी काहि काळानंतर केंद्राशी हितोपयोगी संबंध स्थापणे सहज शक्य आहे. केंद्र आपला आडमुठेपणा सोडायला अजीबात तयार नाहि असं म्हणावं काय ?

दिल्ली विधानसभेत झालेल्या बिहारी मदतीची परतफेड करायला केजरीसाहेबांना इतकं ओपनली नितीशकुमारांशी गळाभेट घ्यायची गरज नाहि. लालु आणि काँग्रेसशी युती केल्याचा डाग केजरीसाहेब धुवुन काढतील अशी नितीशकुमारांची निती म्हणावी तर बिहारमधे आआपचं वारं कधि घुमलं नाहि. मोदिंचा विजयरथ रोखण्याचं पुण्य मात्र शाबीत आहे.
केजरीवाल आतापासुन तिसर्‍या आघाडीच्या प्रयोगाला लागले म्हणावं तर नितीशकुमार सोडल्यास ममताबाई आणि पटणायक हे दोनच प्राणि आआपच्या सोवळ्या राजकारणात खपुन जातील. तिथेही पटणायक तळ्यात-मळ्यात असतात व ममता आल्या तर लालभाई येणार नाहि हे उघड आहे. तसंही आतापासुन तिसर्‍या आघाडीच्या प्रयोगात लक्ष घालणं म्हणजे हाती आलेल्या विधानसभेचं वाटोळं करणं आहे.
मग केजरीसाहेब इतका उतावीळपणा का दाखवत असावे? तो त्यांचा स्वभाव आहे म्हणावं तर यापुर्वी त्याचं बील योगेंद्र यादवच्या नावे फाडण्यात आलय. शिवाय त्याचा दुष्परिणाम देखील झाला नाहि.

दिल्लीत काहि चांगलं करायचं असेल तर उगाच मोदिंना डिचवणं टाळायला हवं. एकीकडे मोदिंशी लढण्यात शक्ती वाया जात असताना कुठलंही थेट सामर्थ्य जमा होण्याची शक्यता नसलेलं बिहारी राहकारण केजरीसाहेब का खेळत असावे ? कुठल्या ग्रेटगेमचा हा भाग आहे ? दिल्ली नगरपालिकेच्या निवडणुका ?

काळा पहाड's picture

22 Aug 2015 - 11:30 pm | काळा पहाड

कुठला ग्रेटगेम? काहीही म्हटलं तरी पॉलिटिशियन हुशार असतात आणि मिठ्ठास बोलतात (अपवादः जितेंद्र आव्हाड, नटवर सिंग, पप्पू इत्यादी, पण बहुतांशी तरी संबंध राखून असतात).

हे यडंय. दिल्लीशी जुळवून घ्यायचं सोडून दररोज नाटकं करतंय. लोकानी पण कुर्‍हाडीवर पाय मारलाय. भोगतील त्याची फळं ते.

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2015 - 1:15 pm | श्रीगुरुजी

>>> AAP 2.0 के 6 महीने पूरे, पढ़िए रिपोर्ट कार्ड

किती वेळा टाकताय? आधीही हीच लिंक दिली होती. इतर सर्वांनी दुर्लक्ष करूनसुद्धा परतपरत तेच टाकताय इथे.

नांदेडीअन's picture

21 Aug 2015 - 10:27 pm | नांदेडीअन

किती वेळा टाकताय? आधीही हीच लिंक दिली होती. इतर सर्वांनी दुर्लक्ष करूनसुद्धा परतपरत तेच टाकताय इथे.

आधी कधी टाकली होती मी ही लिंक ?
कृपया निदर्शनास आणून द्यावे म्हणजे मी रिपिट झालेला पोस्ट उडवण्याची विनंती करेन संपादक मंडळाला.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2015 - 12:02 am | श्रीगुरुजी

क्षमस्व! एका दुसर्‍या पानावर हीच लिंक मी पाहून वाचली होती आणि काही वेळातच इथे पण दिसली. त्यामुळे तीच लिंक परत आली असा समज झाला. पुन्हा एकदा क्षमस्व!

नांदेडीअन's picture

21 Aug 2015 - 10:31 pm | नांदेडीअन

bihar

याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी लालूंच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेलीच, तर सर्वप्रथम त्याचा विरोध आप पक्षाचे समर्थकच करतील याची मला खात्री आहे.

अर्धवटराव's picture

21 Aug 2015 - 11:16 pm | अर्धवटराव

काहितरी लोचा आहे.लोकसत्ताने हि बातमी खोडसाळपणे दिली असावी काय? कि केजरीसाहेब फक्त लालु (आणि काँग्रेस? ) साठी मतं मागणार नाहि, पण नितीशकुमार अ‍ॅण्ड पार्टीसाठी प्रचार करतील? इन दॅट केस केजरीवाल जास्तच हिपॉक्रसी दाखवताहेत... बघु.

विकास's picture

22 Aug 2015 - 12:06 am | विकास

खालील चित्रफितीतली जी हवी ती घ्या आणि सुखात रहा...

दिल्ली को पूर्ण राज्य और बिहार को विशेष दर्जा दो!

इथे आषुतोष मात्र म्हणतात की आमच्याशी कोणी प्रेमाने वागणार असेल तर आम्ही पण प्रेमाने वागू. मात्र आम्ही कुणासाठी मते मागणार नाही! ;)

अर्थात आआप ने असे पण म्हणले आहे की आम्ही भाजपाच्या विरोधात मते मागू म्हणून!

इतकी स्पष्ट आणि पारदर्शक भुमिका कुठल्याही राजकीय नेत्याने अथवा पक्षाने घेतली नसावी! ;)

अर्धवटराव's picture

22 Aug 2015 - 12:15 am | अर्धवटराव

हम्म्म्म... याबद्दल आमचा पास :)

या आणि आतापर्यंत घडलेल्या इतर लहान-मोठ्या घटनांवरुन मला एक प्रश्न पडायला लागला आहे... आआप/केजरीवाल जे काहि करताहेत ते भारतातल्या एकुणच स्वच्छ राजकारणाची मर्यादा आहे कि केजरीवाल या माणासाची??? माणसाची मर्यादा म्हणावं तर इन जनरल अशी अनेक उदाहरणं दिसतील. राजकारणाची मर्यादा म्हणावं तर ते दाहक वास्तव स्विकारायला मन तयार होत नाहि :(

विकास's picture

22 Aug 2015 - 2:57 am | विकास

केजरीवाल हे साक्षात मर्यादापुरषोत्तम आहेत.

म्हणजे, थोडक्यात - या पुरुषाच्या उत्तमपणाला मर्यादा आहेत... =))

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2015 - 12:54 pm | श्रीगुरुजी

>>> या पुरुषाच्या उत्तमपणाला मर्यादा आहेत

परंतु त्यांच्या माकडचेष्टांना आणि ढोंगीपणाला कोणतीच मर्यादा नाही.

गॅरी ट्रुमन's picture

22 Aug 2015 - 12:29 pm | गॅरी ट्रुमन

याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी लालूंच्या उमेदवारांच्या प्रचाराला गेलीच, तर सर्वप्रथम त्याचा विरोध आप पक्षाचे समर्थकच करतील याची मला खात्री आहे.

याला वेड पांघरून पेडगावला जाणे म्हणतात.हे म्हणताना म्हणणार की यांनी नितीश कुमारांशी हातमिळवणी केली आहे आणि लालूंशी यांचा संबंध नाही. आणि हे स्वतः उमेदवार उभे करणार नाहीत पण भाजपचा पराभव व्हावा यासाठी प्रचार करणार!! दोन मुद्दे आहेतः

१. अ=ब आणि ब=क असेल तर त्याचा अर्थ अ=क असाच होतो. म्हणजे हे नितीश बरोबर आणि नितीश लालूबरोबर याचा अर्थ हे सुध्दा लालूबरोबरच आहेत.उगीच कसलीतरी मल्लीनाथी करू नका. केजरीवाल नितीशबरोबर आहेत हे नक्कीच सिध्द झालेले आहे.तरीही नेहमीच्या आपटर्डांनी त्याचा विरोध सोडाच त्याच्याविरूध्द अवाक्षर काढल्याचे ऐकिवात नाही.

२. हे म्हणे भाजपविरोधात प्रचार करणार. बिहारमध्ये भाजप आघाडी आणि लालू-नितीश आघाडी हे उघड-उघड दोनच पर्याय आहेत.म्हणजे हे भाजपचा पराभव व्हावा यासाठी प्रचार करणार म्हणजेच त्याचा फायदा लालू-नितीशला होणार हे न कळण्याइतके इतर लोक दुधखुळे नाहीत.

म्हणे केजरीवाल हे बिहारमध्ये भाजपविरोधात घराघरांमध्ये प्रचार करणार आहेत असेही कुठल्याशा हिंदी न्यूज चॅनेलवर दाखवत आहेत. तसे केजरीवालांनी केल्यास आश्चर्य वाटणार नाही.म्हणजे हे दिल्लीचे मुख्यमंत्री. दिल्लीत चांगले प्रशासन देणे वगळता इतर सगळ्या गोष्टी करायला यांना वेळ आहे.आणि ढोंग आणि नाटकीपणा इतका की काही विचारूच नका. बिहारमध्ये एखाद्या घरात थोबाडात खायला लागली किंवा अंगावर शाई उडवली गेली तरी परत फुकटची प्रसिध्दी मिळवायला आणि स्वतःला व्हिक्टिम म्हणून प्रोजेक्ट करून मोदी सरकारविरूध्द गरळ ओकायला हे परत मोकळे.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2015 - 12:52 pm | श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन,

+१

http://indianexpress.com/article/india/politics/in-the-works-arvind-kejr...

वरील बातमीत खालील वाक्ये स्पष्टपणे लिहिली आहेत.

AAP leader and Delhi Chief Minister Arvind Kejriwal will campaign against the BJP in the run-up to the Bihar assembly polls.

JD(U) secretary general and Rajya Sabha member K C Tyagi told The Indian Express that Kejriwal will share a public platform with Nitish Kumar. “He has also promised to depute his party workers to supplement our poll drive,” he said.

>>> बिहारमध्ये एखाद्या घरात थोबाडात खायला लागली किंवा अंगावर शाई उडवली गेली तरी परत फुकटची प्रसिध्दी मिळवायला आणि स्वतःला व्हिक्टिम म्हणून प्रोजेक्ट करून मोदी सरकारविरूध्द गरळ ओकायला हे परत मोकळे.

थोबाडात खायला नाही लागणार. आआपच्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगून आपल्याला थोबाडीत मारायला सांगणार किंवा आपल्या अंगावर शाई उडवायला सांगणार आणि तसे मॅनेज केल्यावर भाजपवर आरोप करणार.

दत्ता जोशी's picture

22 Aug 2015 - 10:22 am | दत्ता जोशी

२०१५ च्या दिल्ली निवडणुकीची पार्श्वभूमी रोचक आहे असं मला वाटतं. २०१३ मध्ये विद्यमान कोन्ग्रेस ची धुलाई करत २८ जागा मिळालेली आप. कोन्ग्रेस आणि भाजपने आपचा बिमोड करण्यासाठी केलेला झंझावाती प्रसार. सत्ता सोडून " पळुन" गेलेली आप. केजारीवालांची लोकांना पुर्ण बहुमत देण्यासाठी केलेली आळवणी. २०१४ मध्ये राज्या राज्यात भाजपचा दौडणारा विजय रथ. लोकसभेला दिल्लीकरांनी भाजपला दिलेला भरघोस प्रतिसाद. या पार्श्वभूमीवर आपला मिळालेलं अभूतपूर्व यश. विधानसभेला भाजपला भरभरून मते देणारी दिल्ली जर राज्यसभेत आपला संपूर्ण पाठींबा देत असेल तर दिल्लीकर मूर्ख म्हणावेत का? आप लबाड कि सच्ची याची खरी कसोटी पुढच्या निवडणुकीतच लागेल. तो पर्यंत वाट पाहू.

अर्धवटराव's picture

22 Aug 2015 - 11:03 am | अर्धवटराव

हि विधानसभा-राज्यसभा काय भानगड आहे ?? कुठल्या विधानसभेत भाजपला पाठिंबा दिला दिल्लीने ?

प्यारे१'s picture

22 Aug 2015 - 11:37 am | प्यारे१

लोकसभेला भाजपला भरभरून मते देणारी दिल्ली जर विधानसभेत 'आप'ला संपूर्ण पाठींबा देत असेल तर दिल्लीकर मूर्ख म्हणावेत का?

असं वाक्य असायला हवंय ना जोशी????

कपिलमुनी's picture

22 Aug 2015 - 2:35 pm | कपिलमुनी

अर्थात !
ईथे अक्कल फक्त एक-दोघांनाच आहे.
त्याची खाजवली नाही की बाकीचे मूर्ख आणि खोटारडे

दिल्लीकर मूर्ख नसले तरी फुकटे असावेत.

एकंदरच आआप समर्थपणं* उभा राहीला असता तर प्रस्थापित पक्षांच्याहून वेगळा आणि मुख्यत्वे चांगला एक पर्याय भारतीय मतदारांना मिळाला असता. आ आ प च्या अपरिपक्वतेमुळं (की आणखी काही?) एका चांगल्या संकल्पनेचं वाटोळं होताना आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांना पर्याय नाही म्हणून त्याच वळचणीला मतदारांना उभं राहावं लागणं हे सगळं बघून खरंच वाईट वाटतंय. केजरीवाल डोक्यात जातो तो मुख्यत्वे त्यामुळे.

*समर्थपणं म्हणजे एखाद्या चांगल्या प्रोजेक्टप्रमाणं सरकार चालवणं.
इन्फ्लो आऊटगो सगळं व्यवस्थित, सुशासन आणि प्रशासन दोन्ही नेटकं.
उगाच अकारण मोकळं सोडणं नाही कि मुद्दाम त्रास देणं नाही.

गॅरी ट्रुमन's picture

22 Aug 2015 - 3:10 pm | गॅरी ट्रुमन

आ आ प च्या अपरिपक्वतेमुळं (की आणखी काही?) एका चांगल्या संकल्पनेचं वाटोळं होताना आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांना पर्याय नाही म्हणून त्याच वळचणीला मतदारांना उभं राहावं लागणं हे सगळं बघून खरंच वाईट वाटतंय.

केजरीवालांचा बाकी काही नाहीतरी एक परिणाम नक्कीच जाणवेल. भविष्यात कोणीही भ्रष्टाचार विरोध, सुशासन वगैरे मुद्दे घेऊन राजकारणात आले तर त्याला लोक गांभीर्याने घेणार नाहीत. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे प्रचंड नुकसान अरविंद केजरीवाल या माणसाने केले आहे.

केजरीवाल डोक्यात जातो तो मुख्यत्वे त्यामुळे.

माझ्यासाठी तरी कित्येक कारणे आहेत केजरीवाल डोक्यात जायची :) किंबहुना केजरीवाल डोक्यात न जायचे कारण शोधायला गेले तर ते मिळायचे नाही :)

(अण्णांच्या एप्रिल २०११ मधील पहिल्या उपोषणापासून अण्णा-केजरीवाल जोडगोळीचा आणि त्यांनी फैलावलेल्या अराजकतेचा कडवा विरोधक) गॅरी ट्रुमन

प्यारे१'s picture

22 Aug 2015 - 5:17 pm | प्यारे१

आण्णा साधे आहेत हो.... त्यांची समजूत जुने मुख्यमंत्री आरामात काढायचे. ;)
चाणक्य तर केजरी साहेब होते ना रामलीला वर.

इरसाल's picture

22 Aug 2015 - 3:44 pm | इरसाल

आजकाल कोणी " अण्णा" म्हटलं की मला तो सुनिल शेट्टी आठवतो बघा "आन- मेन अ‍ॅट वर्क" मधला

दत्ता जोशी's picture

22 Aug 2015 - 10:03 pm | दत्ता जोशी

काहीही असो. "केजरीवाल" हि सगळ्याच प्रस्थापित पक्षांची दुखरी नस आहे हे मात्र खरं. सध्या भारतातील राजकारण इतक्या खालच्या थराला जावून लाथाळ्या करीत आहेत कि त्यापासून दूर राहिलेलंच बरं!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Aug 2015 - 12:15 am | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य बोललास रे दत्ता. भाजपा,कॉन्ग्रेसला 'आप'ला खाउ की गिळू असे झालेय तर तिसरे व डावे ह्यांना त्यांचे अस्तित्व संपत चाललेय म्हणून अरविंदची मदत हवीय. चाणक्य पोल वाले काय म्हणतात ?त्यांचे अंदाज अनेक्वेळा बरोबर येतात असे म्हंटले जाते.

नांदेडीअन's picture

23 Aug 2015 - 7:49 am | नांदेडीअन

Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh
nsg

विकास's picture

23 Aug 2015 - 9:28 am | विकास

जामिन मिळणे याचा अर्थ कोर्टाने निर्दोष म्हणून जाहीर करणे आणि पक्षी सुटणे असा आहे का?

आणि हो या दुसर्‍या केसचे काय झाले?

Delhi High Court gives last chance to AAP MLA Surender Singh in forged degree case

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2015 - 8:31 pm | श्रीगुरुजी

>>> Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh

नांदेडिअन,

जरा बातम्या नीट लक्ष देऊन वाचा आणि तुमचं इंग्लिशचं ज्ञानही वाढवा.

या बातमीत खालील वाक्ये आहेत.

"it has been averred that this case is actuated by political vendetta. Thus, no prejudice is likely to be caused to the prosecution in case the accused persons are admitted to bail," the court said.

averred या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ claimed / alleged / said असा आहे. "it has been averred that this case is actuated by political vendetta" या वाक्याचा मराठीत "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे असे सांगण्यात आले आहे" असा अर्थ होतो.

"हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे सुरिंदर सिंग यांनीच मॅजिस्ट्रेट समोर सांगितले. खालील वाक्ये पहा.
Singh alleged before metropolitan magistrate Gomati Manocha that the case against him was politically motivated and was being pursued to "stifle and embarrass the ruling party (AAP)".

याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे सुरिंदर सिंग यांनी स्वतःच मॅजिस्ट्रेट समोर सांगितले आहे. मॅजिस्ट्रेटने तसे प्रमाणपत्र दिलेले नाही. तसेच "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे मॅजिस्ट्रेटने मान्य सुद्धा केलेले नाही. किंबहुना जामिनावर निर्णय देताना मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीश एकतर्फी आणि खटल्याच्या सुनावणीत पक्षपाती वाटतील असे मतप्रदर्शन करूच शकत नाहीत. जर मॅजिस्ट्रेटना "हा खटला राजकीय सूडभावनेतून भरला गेला आहे" असे जामिन देताना वाटले असेल व त्यांची तशी खात्री होउन ते मान्य केले असेल तर त्यांनी तातडीने हा खटला रद्द केला असता. ते न करता त्यांनी फक्त जामिन दिला आहे कारण ज्या कलमांखाली खटला भरला आहे ती कलमे जामीनप्राप्त आहेत.

त्यामुळे निव्वळ जामीन मिळाला म्हणून हुरळून जाऊन विजयोत्सव साजरे करण्यासारखे काहीही झालेले नाही. परंतु तुमच्यासारख्या आआपच्या अंधभक्तांनी लगेचच "Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh" असे दिशाभूल करणारे वाक्य लिहून टाकले. इथे न्यायालयाने राजकीय सूडभावना आहे असे मान्य केलेले नाही. राजकीय सूडभावनेतून गुन्हा दाखल केला आहे असा सुरिंदर सिंगानी दावा केला आहे व न्यायालयाने फक्त तेवढाच उल्लेख केला आहे. राजकीय सूडभावना आहे किंवा नाही यावर न्यायालयाने कोणतेही मतप्रदर्शन केलेले नाही.

अवतारी महापुरूष केजरीवाल सुद्धा सुरिंदर सिंगांना जामीन मिळाल्यावर लगेच हुरळुन गेले आणि आपल्या उपजत लबाड स्वभावाला अनुसुरून त्यांनी लगेच खालील ट्विट केले.

Modi govt gets Commando Surinder arrested. In less than 24 hrs, he gets bail. What is Modiji trying to achieve?

२४ तासांच्या आत जामीन मिळाला म्हणजे गुन्हेगार निर्दोष ठरतो अशी केजरीवालांची समजूत असावी. खुनासारख्या अनेक भयंकर गुन्ह्यात गुन्हेगार जामिनावर सुटुन मजेत असतात. इथे तर फक्त मारहाणीचा गुन्हा आहे. त्यात जामीन मिळाला यात विशेष ते काय आणि जामिन मिळाल्यावर लगेच ट्विट करून मोदींना शिव्या कशाला द्यायच्या?

केजरीवाल आपल्या पक्षातील गुन्हेगार मंत्र्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली की लगेच मोदींना दोषी धरतात. मात्र आपल्या पक्षातील गुन्हेगार हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे गृहित धरून ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. जितेंद्र तोमरच्या अटकेनंतर आआपवाल्यांनी असाच तमाशा करून राजनाथ सिंह व मोदींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. परंतु तोमरने सर्वच कागदपत्रे बनावट तयार केली हे लक्षात आल्यावर न्यायालयाने त्याला तब्बल ४९ दिवस तुरूंगात ठेवले होते आणि शेवटी तपास पूर्ण झाल्यावर ४९ दिवसांनी त्याला जामीन मिळाला. त्याला जामीन मिळाल्यावर केजरीवाल ट्विट करून मोदींना शिव्या द्यायला का बरे विसरले?

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2015 - 9:05 pm | श्रीगुरुजी

मॅजिस्ट्रेटने उच्चारलेली प्रत्यक्ष वाक्ये - "it has been averred that this case is actuated by political vendetta"

हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीचे शीर्षक - "Court admits political vendetta, grants bail to AAP’s Surender Singh "

मला आश्चर्य वाटतंय ते हिंदुस्तान टाईम्सचं. मुद्दामच ही दिशाभूल करणारी बातमी दिलेली दिसतेय. मॅजिस्ट्रेटने "averred" असा शब्द वापरलेला असताना (ज्याचा अर्थ आरोपीने असा दावा केलेला आहे/असा आरोप केलेला आहे/असे सांगण्यात आले आहे असा होतो), बातमीच्या शीर्षकात "admits" (ज्याचा अर्थ न्यायालयाने असे मान्य केले आहे/असे कबूल केले आहे असा होतो)असा शब्द वापरून वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे ,

डँबिस००७'s picture

23 Aug 2015 - 8:46 pm | डँबिस००७

गॅरी ट्रुमन आणि गुरुजी,

आता मायबोलीवरसुद्धा येऊन ह्या आआपची पोल खोल कराच !!

अरविंद केजरीवाल या गृहस्थाला कोणत्याही कायदे आणि पध्दतींची कशी अजिबात चाड नाही आणि प्रत्येक वेळी स्वतःच सर्वगुणसंपन्न आणि इतर कोणाला काही कळत नाही असे समजून प्रत्येक ठिकाणी स्वतःचेच घोडे दामटायच्या त्यांच्या कार्यपध्दतीला कोर्टाने चांगलेच फटकारले आहे.

मटामधील बातमीनुसार---

"दिल्लीसाठी लोकायुक्त वा उपलोकायुक्त नियुक्त करण्यासाठी १९९५ मध्ये एक कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार, माजी मुख्य न्यायाधीश किंवा ७ वर्षे उच्च न्यायालयात न्यायाधीशपद भूषवलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. सर्वप्रथम केंद्रीय कायदा मंत्रालयाशी चर्चा करून पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या काही व्यक्तींची नावं निश्चित करावी लागतात. ही नावं नंतर विरोधी पक्षनेते, नायब राज्यपाल व मुख्य न्यायाधीशांच्या समितीकडं पाठवली जातात. ही समिती सर्व नावांवर चर्चा करून कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब करते.

केजरीवाल यांनी मात्र यातील कोणतीही प्रक्रिया न अवलंबता स्वत:च्या पसंतीचा एकच उमेदवार निवडला. त्या उमेदवाराच्या नावाची फाइल त्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी यांच्याकडं पाठवली.....हे प्रकरण न्या. रोहिणी यांच्यापुढं आलं असता त्यांनी केजरीवाल सरकारला खडे बोल सुनावले. कायद्यानुसारच लोकायुक्त पदावरील व्यक्तीची निवड व्हायला हवी, असं स्पष्ट करत न्यायालयानं केजरीवाल सरकारची फाइल परत पाठवून दिली."

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/hc-chief-justice-objects-t...

केजरीवालांनी ज्याचे नाव लोकायुक्त म्हणून सुचवले होते तो मनुष्य यांच्या व्याख्येप्रमाणे भ्रष्ट नसलेला (पक्षी आआप समर्थक) असणार हे सांगायला कुणा ज्योतिर्विदाची गरज नाही. काय म्हणता नांदेडीअन?

विकास's picture

24 Aug 2015 - 4:51 pm | विकास

केजरीवालांनी केले म्हणजे ते बरोबरच असणार....

न्या. रोहीणींचा लेखनिक त्या दिवशी रजेवर होता, म्हणून तात्पुरता पंतप्रधान कार्यालयातून एक पाठवला. त्याने रोहिणी जी काय सांगतात यापेक्षा मोदींना काय हवे ते टंकले. त्यामुळे असे लिहीले गेले आहे. हे सगळे मोदींमुळे होते हे किती वेळेस सांगायचे?

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 8:14 pm | श्रीगुरुजी

आपल्याला अनिर्बंध माकडचेष्टा करता याव्यात, भरपूर चित्रपट पाहता यावेत, सतत ट्विट्स टाकता यावेत, मोदींविरूद्ध भरपूर आरडाओरडा करता यावा, आपण या व्यवस्थेचा बळी आहोत आणि सर्व जग आपल्याविरूद्ध एकवटले आहे असा कांगावा करता यावा म्हणूनच केजरीवालांनी दिल्ली सरकारमध्ये स्वतःकडे कोणतेही खाते किंवा मंत्रीपद घेतलेले नाही. जनतेच्या पैशांची मनसोक्त उधळण, कायदे/नियम/घटना इ. सर्व धाब्यावर बसवून मनमानी कारभार, ढोंगीपणा, जनतेचा विश्वासघात, स्वपक्षातील गुन्हेगार आमदारांना संरक्षण, इतरांवर खोटे आरोप, कांगावा ... एवढेच फक्त ते करीत आहेत.

त्यामुळे त्यांनी लोकपाल निवडताना कोणतेही नियम्/कायदे/पद्धती न पाळणे यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखे नाही.

कपिलमुनी's picture

25 Aug 2015 - 6:04 pm | कपिलमुनी

काळा पैसा परत आणण्याच्या कलटीनंतर दुसरी जबरदस्त पलटी

भारतीय जनता पक्षाने कधीही म्हटले नव्हते "अच्छे दिन" येतील.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2015 - 7:35 pm | श्रीगुरुजी

>>> काळा पैसा परत आणण्याच्या कलटीनंतर दुसरी जबरदस्त पलटी

पहिली पलटी कधी मारली? आय मीन काळा पैसा परत आणण्याच्या विषयावर कधी पलटी मारली?

कपिलमुनी's picture

26 Aug 2015 - 1:10 am | कपिलमुनी

पलटीबद्दल बोला

विकास's picture

26 Aug 2015 - 1:27 am | विकास

अच्छे दिन कुठे आलेत हे मोदी आणि मोदी सरकारला सामान्य जनताच काय पण काँग्रेसचे युवराज पप्पुश्री राहूल गांधी देखील विचारत आहेत. त्यावरून एक नक्की आहे, की आधी अच्छे दिन कधी बघितल्या नसल्याने सर्वांना ते बघण्याची घाई झाली आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2015 - 2:12 pm | श्रीगुरुजी

तेच बोलतोय मी. पलटीबद्दलच विचारतोय.

कपिलमुनी's picture

26 Aug 2015 - 2:47 pm | कपिलमुनी

वरती जो दुवा दिलाय ना, अचछे दिन वाला त्याबद्दल बोला ओ !

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2015 - 11:41 pm | श्रीगुरुजी

त्या प्रतिसादात दोन जबरदस्त पलट्यांचा उल्लेख आहे. पहिली पलटी नीट समजल्यानंतरच दुसर्‍या पलटीबद्दल बोलणे संयुक्तिक ठरेल.

विकास's picture

27 Aug 2015 - 12:36 am | विकास
श्रीगुरुजी's picture

27 Aug 2015 - 8:12 pm | श्रीगुरुजी

आम आदमी पक्ष हा काँग्रेसचाच 'ब' संघ आहे हे मी पूर्वीच लिहिले होते. २०१३ मधील दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर आआपच्या केजरीवालांनी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केल्यावर हे स्पष्ट झाले. निवडणुकीपूर्वी शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचारावर बेंबीपासून कंठशोष करणारे केजरीवाल काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्यावर शीला दिक्षितांवर कारवाई करायला टाळाटाळ करायला लागले तेव्हा काँग्रेस आणि आआपचं साटंलोटं अजून प्रकाशात आलं. २०१५ च्या दिल्ली विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीत काँग्रेसने आआपला वॉकओव्हर दिल्यावर तर काँग्रेस आणि आआपच्या संबंधांविषयी तिळमात्रही संशय उरला नाही.

आआपचा अभिनयसम्राट आशुतोषच्या खालील लेखावरून आआप आता काँग्रेसची तळी उचलायला लागला आहे हे दृग्गोचर होईल.

http://www.rediff.com/news/column/ashutosh-no-longer-pappu-he-has-namo-t...

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवालांनी जदयुच्या नितीशकुमारांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि भाजपला पराभूत करण्यासाठी आपण कोणालाही मदत करू असे सांगितले आहे. जदयुने लालूचा राजद आणि काँग्रेसशी युती केली आहे. म्हणजे पर्यायाने आआपने लालू आणि काँग्रेसला सुद्धा पाठिंबा दिलेला आहे.

नांदेडीअन's picture

28 Aug 2015 - 9:44 am | नांदेडीअन

In 30days, 550 cases received, 12 SHOs summoned, 100 meetings held, 60 letters written. DCW off to a flier.
www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3213465/After-month-DCW-...

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2015 - 12:53 pm | श्रीगुरुजी

सगळं खोटं. आआपवाल्यांनी आजवर जे जे दावे केलेत, इतरांवर जे जे आरोप केलेत ते सगळे खोटे निघालेत. दस्तुरखुद्द केजरीवालांपासून तोमर, अलका लांबा, दिलीप पांडे, राखी बिड्ला आणि आता सरबजीतवर आरोप करणारी जसलीन कौर यांचे सर्व दावे आणि इतरांवरचे आरोप खोटे सिद्ध झालेत. आयुष्यात कधीही खरं न बोलता कायम खोटंच बोलायचं याच अटीवर आआपमध्ये प्रवेश मिळतो.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 10:57 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांना आपल्याविरूद्ध कोणीही चकार शब्द काढलेला सहन होत नाही. आधी योगेंद्र याद्व आणि प्रशांत भूषण झाले आणि आता धर्मवीर गांधी आणि हरविंदर खालसा यांना केजरीवालांनी झाडूने झटकून टाकले आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-suspends-two-punjab-mp...

गॅरी ट्रुमन's picture

30 Aug 2015 - 2:31 pm | गॅरी ट्रुमन

केजरीवालांना आपल्याविरूद्ध कोणीही चकार शब्द काढलेला सहन होत नाही. आधी योगेंद्र याद्व आणि प्रशांत भूषण झाले आणि आता धर्मवीर गांधी आणि हरविंदर खालसा यांना केजरीवालांनी झाडूने झटकून टाकले आहे.

डॉ. धर्मवीर गांधी हे पतियाळामधील आदर देण्याजोगे नाव आहे असे ऐकले आहे. त्यांनी केजरीवालला पहिल्यांदा प्रभू आणि योया यांना पक्षातून काढून टाकले त्यावेळी विरोध केला होता. कदाचित लालू-नितीशशी हातमिळवणी करायलाही त्यांनी विरोध केला असेल म्हणून आता त्यांना काढून टाकण्यात आले असले तरी आश्चर्य वाटायला नको. धर्मवीर गांधींबरोबर आआपमधील शेवटचा सेन्सिबल नेता बाहेर गेला आहे आणि आआपमध्ये केजरीवाल सारखे ढोंगी आणि नाटकी तसेच भगवंत मान सारखे जोकर्स यांनाच स्थान आहे हे परत एकदा अधोरेखित झाले आहे.

नांदेडीअन's picture

30 Aug 2015 - 2:59 pm | नांदेडीअन

How AAP’s education agenda in Delhi is setting an example for other states
http://www.thenewsminute.com/article/how-aap%E2%80%99s-education-agenda-...

नांदेडीअन's picture

24 Sep 2015 - 8:17 pm | नांदेडीअन

elect

नांदेडीअन's picture

9 Oct 2015 - 4:57 pm | नांदेडीअन

Arvind Kejriwal sacks his own Delhi cabinet minister over corruption charges
http://www.firstpost.com/india/arvind-kejriwal-sacks-his-own-delhi-cabin...

"I can understand that this is not an issue for those MLAs who have millions of rupees stashed away. There are many in our party too. It is also not an issue for those MLAs who are getting a cut in every financial deal happening in their constituency. It is important for those who are honest, and AAP MLAs are honest. Though I am also not denying that there are honest MLAs in other parties, their number is miniscule.A salary hike is important for honest politics and clean politics. A salary hike is important for an honest MLA if we want him to live with dignity and self-respect"
जबराट...लय जबरा... बाकि पार्टिया करे तो साला कॅरेक्टर ढिला है!! ग्रीस पेक्षा वाईट अवस्था होणार आहे दिल्लि ची.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2015 - 9:01 pm | श्रीगुरुजी

दिल्लीतील वीज वितरण कंपन्यांचे लेखापरीक्षण करण्याचा आदेश कॅगला दिल्ली सरकारने दिला होता. परंतु कॅगला असे लेखापरीक्षण करण्याचा अधिकार नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

आपल्या सरकारला उच्च न्यायालयाने झटका दिला आहे असे वरकरणी केजरीवाल म्हणत असले तरी त्यांना या निर्णयामुळे मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत असणार. कारण या लेखापरीक्षणानंतर आपण आधीच निम्म्यावर आणलेले वीजेचे दर अजून कमी करू असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले आहे (प्रत्यक्षात भाव कमी केल्यावर काही दिवसांनी त्यात ६% वाढ झाली आहे). आधीच कमी केलेल्या वीजेच्या दरामुळे वीज कंपन्यांवर खूप परीणाम झाला होता. त्यामुळे यापुढे दर अजून कमी करणे शक्य नव्हते. आता या न्यायालयाच्या निर्णयामुळे दर कमी करण्याच्या अप्रिय निर्णयापासून केजरीवालांची आपोआप सुटका झाली आहे.