[शतशब्दकथा स्पर्धा] कोण...?

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in स्पर्धा
13 Aug 2015 - 7:49 pm

ती आत शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कणाकणाने जवळ येत होता.

हा बाहेर दोन गोजिर्‍या पोरांना कसलीशी गोष्ट सांगत होता.

'...ह्यांना आपल्याला एकट्याने सांभाळायचंय, आपण कुठेच कमी पडू नये...'
याच विचारात असतांना नर्सने आत बोलावले.

आत डॉक्टर बोलले, "त्यांना त्रास नको व्हायला..."

तो शेजारी बसला, हात हातात घेतला. तिने उठण्याचा प्रयत्न करताच त्याने बजावले, हालचाल नको.
तेवढेही श्रम झेपले नाहीत. रया अजून बिघडली.

क्षणाक्षणाला चेहरा फिकटतोय. प्राण एकवटून बोलली, '' मला.... तुला.. सांगायचंय... "

“शांत राहा, बोलू नकोस”.

शब्द बुडबुड्यासारखे फुटलेच, "... आपल्या दोन मुलांपैकी.... एक.... तुझं नाही."

जणू वीज कोसळली,

"कोण...? कोणता मुलगा माझा नाही...?"

तिला गदागदा हलवत तो विचारत राहीला,

पण...

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

13 Aug 2015 - 7:56 pm | किसन शिंदे

बापरे!!

+१

नूतन सावंत's picture

13 Aug 2015 - 8:02 pm | नूतन सावंत

पडछाया या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटाची कथा याच कल्पनेवर आधारित आहेq

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 8:13 pm | संदीप डांगे

हो का? असा काही चित्रपट आहे हे खरंच मला माहित नव्हतं. धन्यवाद! :-)

आता जालावर शोधल्यावर 'बाई माझी करंगळी मोडली' हे प्रसिद्ध गाणं त्यातलं आहे हे कळलं, मिळाला तर जरूर बघेन.

तशी ही कल्पना जुनीच असण्याची शक्यता आहे खरी. लहानपणी कधी-काही वाचलं बघितलं तर तेच नवं सृजन म्हणून मनात आकार घेतं. इथंही तसंच झालं असावं. पण शंभर शब्दात बसवता बसवता घाम फुटला हेही खरंच.

चांदणे संदीप's picture

13 Aug 2015 - 11:17 pm | चांदणे संदीप

जुने मराठी चित्रपट अगदी कोरले गेलेत मनावर.
ह्या चित्रपटाच्या क्लायम्याक्सने अगदी बी.पी. वाढवला होता त्यामुळे तुमचा सिक्वल काय असेल याची उत्सुकता आहे, म्हणूनच तुमच्या कथेला +१.

संदीप डांगे's picture

14 Aug 2015 - 1:07 pm | संदीप डांगे

सिक्वल मनात धरून लिहिलं नाहीये. हि कथा इथंच संपते. पण सिक्वल लिहायचा असेल तर कल्पनेला भरार्‍या मारायची खूप संधी आहे.

एक सिक्वल आकार घेतोय पण बघू कसं जमतं ते...

चिगो's picture

14 Aug 2015 - 1:03 pm | चिगो

पण शंभर शब्दात बसवता बसवता घाम फुटला हेही खरंच.

ह्याचसाठी कथेला +१..

ह्या चित्रपटाची कणेकरांनी 'माझी फिल्लमबाजी' मध्ये खेचलीपण आहे. तसेच सुशिंच्या 'बंदीस्त' ह्या कादंबरीची कल्पनापण त्यांना ह्याच सीनवरुन स्फुरली, असं त्यांनी लिहीलंय.

पैसा's picture

13 Aug 2015 - 8:04 pm | पैसा

+१

मस्त कथा!

नूतन सावंत's picture

13 Aug 2015 - 8:16 pm | नूतन सावंत

हो खरच .त्यासाठीच +१

ऐऐऐऐऐऐऐऐऐऐ!!! डांगेजी इतका अन्याव का कथानायकावर;)
+१ कलात्मक कलाटणीसाठी!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2015 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

खटपट्या's picture

13 Aug 2015 - 8:30 pm | खटपट्या

+१

नाव आडनाव's picture

13 Aug 2015 - 8:52 pm | नाव आडनाव

+१

प्रचेतस's picture

13 Aug 2015 - 9:21 pm | प्रचेतस

+१

टुंड्रा's picture

13 Aug 2015 - 9:32 pm | टुंड्रा

+१

राघवेंद्र's picture

13 Aug 2015 - 9:34 pm | राघवेंद्र

+१

तीरूपुत्र's picture

13 Aug 2015 - 9:53 pm | तीरूपुत्र

+१

इशा१२३'s picture

13 Aug 2015 - 10:00 pm | इशा१२३

+१

शलभ's picture

13 Aug 2015 - 11:26 pm | शलभ

+१

प्यारे१'s picture

13 Aug 2015 - 11:47 pm | प्यारे१

+१

अनन्त अवधुत's picture

13 Aug 2015 - 11:51 pm | अनन्त अवधुत

+१

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 6:51 am | अत्रुप्त आत्मा

+१

असा मी असामी's picture

14 Aug 2015 - 9:49 am | असा मी असामी

+१

जगप्रवासी's picture

14 Aug 2015 - 10:40 am | जगप्रवासी

+१

विवेक्पूजा's picture

14 Aug 2015 - 10:46 am | विवेक्पूजा

+१

gogglya's picture

14 Aug 2015 - 10:50 am | gogglya

+१

तुडतुडी's picture

14 Aug 2015 - 12:38 pm | तुडतुडी

काय मूर्ख बाई आहे . कथेसाठी +१ . ह्या संकल्पनेवर भलीमोठी भयकथा वाचली होती . जुने मराठी चित्रपट आता कुठल्याच च्यानेलवर लागत नैत का ओ ?तू नळी वर बघावे लागतात . गेल्या आठवड्यात 'अशीच १ रात्र होती बघितला ' :-)

निमिष सोनार's picture

14 Aug 2015 - 12:45 pm | निमिष सोनार

असं कुणी कुणासोबत करू नये.

संजय पाटिल's picture

14 Aug 2015 - 1:03 pm | संजय पाटिल

+१

सौन्दर्य's picture

14 Aug 2015 - 1:46 pm | सौन्दर्य

शिरीष कणेकरांच्या 'माझी फिल्लमबाजी'मध्ये ऐकलेला हा किस्सा आहे. तरीदेखील शतशब्दांच्या चौकटीत सुंदर बसवलात. +१ म्हणूनच.

मृत्युन्जय's picture

14 Aug 2015 - 6:41 pm | मृत्युन्जय

+१

ऋतुराज चित्रे's picture

15 Aug 2015 - 8:02 pm | ऋतुराज चित्रे

कुठलीही आई आपला मृत्यु समोर दिसत असताना असले गुपित सांगुन मुलांचे भविष्य धोक्यात घालनार नाही. कथा येथे संपली असे लेखक म्हणतोय म्हणुन कथा अजिबात पटली नाही.

संदीप डांगे's picture

15 Aug 2015 - 8:38 pm | संदीप डांगे

शब्दांची मर्यादा असल्याने धक्कातंत्र कळले नसल्यास क्षमस्व. तिला गुपित उघड करून सांगायचे होते. पण त्याने रागावून काही विचार न करता तिला गदागदा हलवून (जे करणे घातक होते) नकळत तिचा मृत्यू घडवून आणला. हाच ट्वीस्ट आहे. 'स्वतःच सिद्ध होणारी भविष्यवाणी'. तीला शांतपणे बोलू दिले असते तर जास्तीत जास्त अजून पाच-दहा वाक्यं तरी बोलू शकली असती. त्यातले गुपित कदाचित कुणावरही अन्याय न करणारे असू शकले असते. सगळ्यांचेच पुढचे आयुष्य अजून सुखकर करणारे असू शकले असते. तिला समाधानाने मरायचे असेल तर...

म्हणून म्हटले की शक्यता अनंत आहेत. कुठलीही शक्यता लेखकाने व्यक्त न करता वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून देणे हीपण एक कलाच आहे. ह्या शशकला उत्तरार्ध नाही. तो वाचकाच्या मनात पूर्ण होऊ शकतो. मी लिहला तर ते माझे इंटरप्रीटेशन झाले. तुम्ही लिहाल तर ते तुमचे. तुम्हाला आत्ता तो सुचला नसेल म्हणून आवडली नसेल कदाचित. पण याबाजूने थोडा विचार कराल तर आवडेल असं वाटतं.

अन्या दातार's picture

15 Aug 2015 - 9:23 pm | अन्या दातार

+१

जयनीत's picture

15 Aug 2015 - 10:04 pm | जयनीत

+1