[शतशब्दकथास्पर्धा] भेट

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in स्पर्धा
13 Aug 2015 - 10:50 am

चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरताच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती.

पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली.

ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?”

त्यालाही ओळख वाढवायचीच होती. दोघे बाहेरच्या बागेत बाकावर बसले.गप्पा रंगल्या.हातात हात आले.नववर्षाच्या गार वाऱ्यात तिचा हात जास्तच थंड लागल्यामुळे त्याने आपला कोट तिच्या अंगावर पांघरला.पहाटे तिला घरी पोचवले.

आता कोट घेण्यासाठी तो आला होता.दार उघडण्याऱ्या वृद्धाने उदास हसत स्वागत केले. दारासमोरच्या भिंतीवर तिचा फोटो त्याच्याकडे पाहून हसत होता.फोटोसमोर मेणबत्ती जळत होती.

प्रतिक्रिया

नाव आडनाव's picture

13 Aug 2015 - 10:58 am | नाव आडनाव

+१

जडभरत's picture

13 Aug 2015 - 11:10 am | जडभरत

+१
छानच कलाटणी दिलीत!
पाककृतींबरोबर आता भयकथा लिखाणात पण जोरदार स्वागत! :)

यशोधरा's picture

13 Aug 2015 - 11:11 am | यशोधरा

बाप्रे!!

सौंदाळा's picture

13 Aug 2015 - 11:11 am | सौंदाळा

+१

अविनाश पांढरकर's picture

13 Aug 2015 - 11:12 am | अविनाश पांढरकर

+१

पियुशा's picture

13 Aug 2015 - 11:12 am | पियुशा

+१

मुक्त विहारि's picture

13 Aug 2015 - 11:19 am | मुक्त विहारि

+१

नाखु's picture

13 Aug 2015 - 11:35 am | नाखु

जोरकस (उशीराची भरपाई अशीही)

भयचकित नाखुस

अनन्त अवधुत's picture

13 Aug 2015 - 11:45 am | अनन्त अवधुत

+१

किसन शिंदे's picture

13 Aug 2015 - 11:45 am | किसन शिंदे

+१

एक प्रश्न आहे.

नायिका जेव्हा नायकाला चर्चमध्ये भेटते तेव्हा ती भूतच असते कि नायक तिला घरी सोडून जेव्हा परत कोट आणायला जातो त्या मधल्या काळात तिला अपघात झालेला असतो?

सीक्वेलची अर्थात् पुढील भागाची वाट पहा! :-)

बायदवे, +१.

अर्थातच नायिका जेव्हा नायकाला चर्चमध्ये भेटते तेव्हाच ती भूत असते!
कारण नायक तिला घरी सोडून जेव्हा परत कोट आणायला जातो त्या मधल्या काळात तिला अपघात झालेला असतो? असे म्हटले तर फ्युनेरल विधी, जमलेले नातेवाईक वगैरे उल्लेख आला असता ना?
रच्याकने: भूत असलेली नायिका चर्च मध्ये जाईल ह्याला रामसे बंधूंनी तर नक्कीच जोरदार आक्षेप घेतला असता, कारण त्यांची सगळी भुते अगदी ईमानदारीत देऊळ, चर्च, साधु, संत यांना फार्फार घाबरत असत. होली वॉटर अंगावर पडल्यावर तर त्यांना भाजल्यागत वेदना होत म्हणे. त्या मानाने हॉलीवूडची सध्याची भुते फार बेकार! मरता म्हणून मरत नाहीत. मेली-मेली म्हणूस्तोवर पुन्हा कुठून तरी उपटतात. खरंच त्या मानाने रामसे बरे!

किसन शिंदे's picture

13 Aug 2015 - 12:40 pm | किसन शिंदे

>>>>चर्चच्या न्यूइयर पार्टीत शिरतच तिने त्याचे लक्ष वेधले. ती त्याच्याकडे ओळखीचे हसत होती.

पार्टीतल्या लोकांशी बोलत तिच्यापर्यंत येताच तिने उठून त्याचे स्वागत केले.एव्हाना थिरकू लागलेल्या डान्सफलोअरवर त्यांनी प्रवेश केला.धून संपली.

ड्रिंक्सचे ग्लास हातात घेऊन विसावले.अचानक ती म्हणाली ,”थोडावेळ बाहेर फिरायचं?”<<<<

यात फ्युनरलचा आणि नातेवाईकांचा कुठेच उल्लेख दिसत नाही.

प्यारे१'s picture

13 Aug 2015 - 12:52 pm | प्यारे१

चर्चची न्यू इयर पार्टी आहे.
जागा चर्चच असेल असं नाही...

बाकी मेल्यानंतर तरी गप्प बसावं की 'माणसानं'(लिंगनिरपेक्ष शब्द आहे. योग्य तो अर्थ घ्यावा)

चिगो's picture

13 Aug 2015 - 1:13 pm | चिगो

बाकी मेल्यानंतर तरी गप्प बसावं की 'माणसानं'(लिंगनिरपेक्ष शब्द आहे. योग्य तो अर्थ घ्यावा)

हा हा हा हा.. =)) पण असं कसं? 'इच्छा-वासना' अतृप्त राहील्यानंच तर आत्मा 'भुत' होतो, असा फंडा आहे ना?

अजया's picture

13 Aug 2015 - 11:52 am | अजया

+१

इशा१२३'s picture

13 Aug 2015 - 11:55 am | इशा१२३

+१

तुडतुडी's picture

13 Aug 2015 - 11:59 am | तुडतुडी

+१

ऋतुराज चित्रे's picture

13 Aug 2015 - 12:01 pm | ऋतुराज चित्रे

त्याने आपला कोट तिच्या अंगावर पांघरला.पहाटे तिला घरी पोचवले.
आता कोट घेण्यासाठी तो आला होता

घरी पोचवले तेव्हाच का नाही कोट घेतला.
काळाचे अंतर कळत नाही.

थॉर माणूस's picture

13 Aug 2015 - 12:51 pm | थॉर माणूस

टाईम लीप घेतलाय बहुतेक. कदाचित काही काळानंतर, तीचा मृत्यू झाल्यावर तो परत आला असावा?

प्यारे१'s picture

13 Aug 2015 - 12:57 pm | प्यारे१

पार्टी मध्ये ड्रिंक्स होती. पहाटे तो त्या बाईला घरला सोडून गेला. यानंतर माणूस काय करेल सांगा बरं? आपल्या स्वताच्या घरी जाईल आणि गप गुदगुल्या होत होत मधूनच हसत झोपेल. दुपार नंतर कधीतरी जाग येणार तेव्हा लक्षात येणार संध्याकाळी पुन्हा कुठंतरी जायचंय कोट हवा. (इथे मत बदलू शकतं. तिलाच भेटायला जाईल की, फ्रेश आहे वगैरे वगैरे ) मग तो जाणार तिच्या घरी. थोडक्यात...

आता म्हणजे उतरल्यावर!

कोट घेण्याचा बहाणा असतो. त्यानिमित्ताने अजून एका भेटीची निश्चिती करता येते! सगळं विस्कटून सांगावे लागते आजकाल! श्या: पूर्वीचे मिपा राहिले नाही हेच खरे. ;-)

प्यारे१'s picture

13 Aug 2015 - 1:37 pm | प्यारे१

त्या छकु छकु ताहो है मध्ये भारी दाखवलंय.
थंडी का पावसामुळं शारुख आपला कोट काजोल ला देतो आणि नंतर शिंकत नि शेकत बसतो.

(लिहिता लिहिता हे सगळं समर कँपमध्ये होत असतं हे आठवल्यानं बावचळलो खरंतर)

खटपट्या's picture

13 Aug 2015 - 12:12 pm | खटपट्या

+१

भुमी's picture

13 Aug 2015 - 12:31 pm | भुमी

+१

मीता's picture

13 Aug 2015 - 12:54 pm | मीता

+१

पैसा's picture

13 Aug 2015 - 12:58 pm | पैसा

+१

वो कौन थी!

प्यारे१'s picture

13 Aug 2015 - 1:01 pm | प्यारे१

+१
हे राहीलं.

कविता१९७८'s picture

13 Aug 2015 - 1:35 pm | कविता१९७८

मस्तच

जेपी's picture

13 Aug 2015 - 1:44 pm | जेपी

+1

पद्मावति's picture

13 Aug 2015 - 2:19 pm | पद्मावति

+१

अत्रुप्त आत्मा's picture

13 Aug 2015 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

+१
बाकी प्रतिक्रियांशि - ह्या ह्या करून शमत! :-D

समांतर:- मलाही देवळाच्या अंगणात चाफ्याची फ़ुलं काढत असलेली हिरविण घेऊन कथा लिवायाचे स्फुरण चढत आहे! :-D

प्यारे१'s picture

13 Aug 2015 - 2:47 pm | प्यारे१

>>> हिरविण घेऊन
आँ????
घ्या आता!

जडभरत's picture

13 Aug 2015 - 3:35 pm | जडभरत

हिरवीण म्हणजे काय?

अन्या दातार's picture

13 Aug 2015 - 3:31 pm | अन्या दातार

+१

gogglya's picture

13 Aug 2015 - 3:49 pm | gogglya

+१

राघवेंद्र's picture

13 Aug 2015 - 7:38 pm | राघवेंद्र

+१

अनन्न्या's picture

13 Aug 2015 - 7:43 pm | अनन्न्या

+१

मितान's picture

14 Aug 2015 - 2:36 pm | मितान

+१ :))

त्रिवेणी's picture

14 Aug 2015 - 2:43 pm | त्रिवेणी

Mast g tayde
+१

त्रिवेणी's picture

14 Aug 2015 - 2:47 pm | त्रिवेणी

Mast g tayde
+१

विशाखा राऊत's picture

14 Aug 2015 - 2:58 pm | विशाखा राऊत

+१

रुस्तम's picture

14 Aug 2015 - 4:34 pm | रुस्तम

+१

चाफा's picture

14 Aug 2015 - 4:50 pm | चाफा

+१

मृत्युन्जय's picture

14 Aug 2015 - 6:45 pm | मृत्युन्जय

+१

बोबो's picture

14 Aug 2015 - 8:23 pm | बोबो

+१. बाकी कथा सुंदरच. उत्तरार्ध वाचायची उत्सुकता आहे…

अंतु बर्वा's picture

14 Aug 2015 - 8:58 pm | अंतु बर्वा

+१

टिल्लू's picture

15 Aug 2015 - 10:55 pm | टिल्लू

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2015 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

शेवट मस्त आहे !