काय खरं नाही बघा आयटीचे साहेब. तुमचा निखिल आयटीलाच ना पुण्यात?
हो रे, चांगले पगार असतात पण त्यांना.
अमेरिकेत काय लैच मंदी आलीय म्हणं. मग ह्यांचं अवघडच की सगळं.
___________________________________________________________________
लहानशा गावातली सिंगल ब्रँच कोऑपरेटिव्ह बँक अन धडपडून मिळालेली मॅनेजरची खुर्ची.
सोमवारची गर्दी अन कॅश कौंटरला टोकन घेऊन गावगन्ना पत्रकार कम संपादकाने घातलेला उगा वाद.
बँकेत खड़खडाट अशी प्रश्नचिन्ह टाकलेली बातमी अन ब्लॅकने खपलेला त्याचा पेपर.
खातेदारांची पैसे काढायला गर्दी अन संचालकांनी मारलेली कलटी.
मर्जिंगआधीच्या कोर्टातल्या सुनावण्या अन बिनपगारी ढकललेली वर्षे.
एकेक रुपया जोडत शिकवलेला मुलगा अन एका चिल्लर पतसंस्थेत गहाण टाकलेली जिंदगी.
___________________________________________________________________
हॅलो निखिल, बेटा ठिक चाललंय ना सगळं तिकडे?
प्रतिक्रिया
11 Aug 2015 - 11:54 pm | अभ्या..
सर्व वाचक, प्रतिसादक आणि मित्रांना धन्यवाद.
सर्वांना यातले बापाचे प्रेम जाणवले. अर्थात ती माया, जिव्हाळा अन आपल्याला भोगावा लागलेला त्रास लेकराच्या वाटेला येऊ नये ही कळकळ असतेच प्रत्येक बापाची.
पण....
या कथेला अजून एक पैलू आहे. कदाचित तो मला व्यक्त करायला जमला नाही. मी तोकडा पडलो शब्दांच्या मांडणी बाबतीत. :(
यातील बापाच्या बॅंकेची दुर्दशा केवळ एका आततायी माणसाने सोडलेल्या अफवेने आणि ती सत्य मानून बॅंकेतले पैसे काढायला धावणार्या खातेदारांनी झालेली. इतर कारणे पण असावीत पण आर्बीआयच्या कोऑपरेटीव्ह्स वरील रेगुलेशन च्या आधीची ही सत्यकथा. बँकेचा रेशिओ बिघडायचा अशा गोष्टींनी. बाप बिचारा अशा गोष्टी भोगलेला. अमेरिकेतील मंदीची काडीची माहीती नसताना अशा कुणीही ऊठवलेल्या अफवांचा परिणाम सुध्दा आपल्या लेकराच्या करीअरवर होइल काय ही त्याची खरी चिंता.
.
(नाण्याची प्रत्येक बाजू तपासून घ्यायची अन मगच मत प्रदर्शित करायचे हिच शिकवण मिळालेल्या अशाच एका बाबांचा मुलगा)
अभ्या..
पुनश्च धन्यवाद
आणि हो. याचे कमीतकमी ४ सिक्वल देऊ शकेन मी. ;)
12 Aug 2015 - 12:29 am | चौथा कोनाडा
सुरेख
15 Aug 2015 - 5:39 pm | वैभव जाधव
जबरदस्त कथा रे मित्रा. नंबर आलाच पाहिजे.
+१
15 Aug 2015 - 6:11 pm | नावातकायआहे
+१
15 Aug 2015 - 8:45 pm | संदीप डांगे
+१
15 Aug 2015 - 9:28 pm | सिरुसेरि
आयटी क्षेत्रावर जेव्हा मंदीचे सावट येते , तेव्हा नॉन आयटीतील माणसेच उत्साहाने चर्चा करताना आढळतात . हि व्रुत्ती या कथेतून एकदम सही रेखाटली आहे . आधी आयटी वर टिका करायची , आणी नंतर आपल्या मुला , बाळांना आयटी क्षेत्रातच घालायचे असेही प्रकार खुप दिसतात .