नमस्कार,हे माझे मिपा वरील पहिले लेखन आहे म्हणून काही चूक झाल्यास क्षमा असावी.
-----------------------------------------दुपार झाली आणि गणोबा ला खूप भूक लागली.सकाळी फक्त त्याने रात्रीची उरलेली अर्धी भाकर आणि वरण ऐवढच खालेलं होतं.
"ओ बाबा मले लय भूक लागली हाय पोटामंदे मंगाणपासुन कावळे बोंबलत हाय."
सखाराम ला पण खूप भूक लागली होती.म्हणून जेवण करण्यासाठी दोघे शेताच्या बांधावर बसले.आज चिंगीचा(मुलीचा) वाढदिवस आहे म्हणून त्याच्या अर्धांगिणीने शिरा बनविला होता. खूप दिवसा नंतर आज शिरा खायला मिळणार असल्यामुळे गणोबा खूप घाई करत होता.डबा उघडताचं काही सरकारी माणसे काहीतरी यंत्रे घेऊन त्याच्या जवाळ आली.
एक जण बोलला " सखाराम तुमचं शेत धरणाखाली येणार".
हे ऐकून सखाराम आणि गणोबाच्या घस्या खाली घास उतरत नव्हता.........
प्रतिक्रिया
9 Aug 2015 - 12:15 am | एस
चांगला प्रयत्न आहे. तंत्रात सफाई ही सरावानेच येईल. तेव्हा लिहीत रहा. मिपावर स्वागत.
9 Aug 2015 - 12:15 am | जडभरत
ईश्शशश!!!
आलेच घासातले खडे!!!
+१ ढिम्म यंत्रणेच्या निषेधासाठी!!!
9 Aug 2015 - 12:34 am | तीरूपुत्र
धन्यवाद.
9 Aug 2015 - 1:05 am | शलभ
+१
9 Aug 2015 - 9:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
चांगला प्रयत्न आहे. जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्या फक्त. मिपावर स्वागत. लिहित रहा. काही अडचण आल्यास कळवा.
9 Aug 2015 - 9:44 am | तीरूपुत्र
मी विदर्भाचा असल्यामुळे काही वर्हाडी शब्द येऊ शकतात.जर मी शुद्ध लेखना मध्ये चूका करत असेल तर मला थोडी मदत करावी.प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
9 Aug 2015 - 11:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
होउ द्यात चुका. चुकातुन शिका. :) कधीही मदत लागली तर साहित्य संपादक मंडळाकडे किंवा संपादक मंडळाशी संपर्क साधु शकता.
9 Aug 2015 - 9:47 am | जेपी
+१
9 Aug 2015 - 10:13 am | पैसा
+१
चांगला प्रयत्न.
अवांतरः तुमचा आयडी तीरुपुञ असाच घ्यायचा होता का? कारण त्याचा उच्चार कसा ते कळत नाहीये. का "तीरूपुत्र" असा हवा होता? बदलून घ्या पाहिजे तर.
9 Aug 2015 - 10:17 am | जडभरत
तीरुपुत्रच बरोबर वाटते.
9 Aug 2015 - 10:39 am | तीरूपुत्र
हो मला तीरुपुत्र पाहिजे.तो नको.आणि तो बदलून मिळेल का?
9 Aug 2015 - 11:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तीरुपुत्र मधला त्र असा टंकतात.
t आणि लगेच r=त्र
शिफ्ट+Y दाबलत तर ञ मिळेल!!
थोरल्या संपादक मंडळाला किंवा नीलकांत ना व्यनि करा. काम होईल.
10 Aug 2015 - 10:34 pm | राघवेंद्र
थोरले व धाकटे संपादक वरून, पूर्वीच्या मिपा ला खुर्द मिपा म्हणायचे काय ?
9 Aug 2015 - 10:47 am | टवाळ कार्टा
+१
9 Aug 2015 - 11:04 am | तीरूपुत्र
माहिती दिल्याबद्दल आपले आभार.धन्यवाद.
9 Aug 2015 - 11:27 am | मुक्त विहारि
+१ ====> उत्तम कथा
+१ =====> लिहायचा पहिलाच प्रयत्न असून देखील, विषयाची बर्यापैकी मांडणी.
9 Aug 2015 - 2:02 pm | नाव आडनाव
+१
10 Aug 2015 - 9:00 am | नूतन सावंत
मिपावर स्वागत.छान आहे प्रयत्न आणि वेगळ्या विषयासाठी+१
10 Aug 2015 - 11:07 am | बबन ताम्बे
आवडली.
10 Aug 2015 - 3:37 pm | gogglya
+१
10 Aug 2015 - 4:05 pm | मी-सौरभ
वेलकम टू मिपा
10 Aug 2015 - 5:03 pm | घरकोंबडी
+1
10 Aug 2015 - 8:01 pm | विवेकपटाईत
+ १, विदर्भ राज्य होणार, यात शंका नाही.
10 Aug 2015 - 8:30 pm | सव्यसाची
+१
10 Aug 2015 - 8:41 pm | तीरूपुत्र
विदर्भ राज्य होणार, यात शंका नाही.असे मला वाटतं नाही, आणि माझे त्याला समर्थन पण नाही.
10 Aug 2015 - 10:25 pm | योगी९००
+१ आवडली...
10 Aug 2015 - 11:50 pm | अंतु बर्वा
+१