Bioscope सर्वांगसुंदर चित्रपट , सर्वांगसुंदर अशासाठी कि कॅमेरा जितका प्रभावी आहे , तितकच पार्श्वसंगीत आणि चित्रपटातील गाणी . चार कविता आणि त्यावर आधारित चार कथा , चारही कथांचे दिग्दर्शक वेगळे ,प्लॉट वेगळा तरीहि पकड सुटत नाही शेवटपर्यंत . रवि जाधव , विजू माने , गजेंद्र अहिरे आणि गिरीश मोहिते . चारही ताकदीचे दिग्दर्शक आणि त्यांच्यावरची जबाबदारी तितक्याच सहजतेने पेलून जातात . एक वेगळाच अनुभव देऊन जातात , आणि आपण बाहेर येतो तेव्हा वेगळ्याच प्रभावाखाली असतो . ज्यांना शास्त्रीय संगीत आवडतं त्यांच्यासाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी
चित्रपटाची अजून एक जमेची बाजू अशी कि चारही कथा एकमेकांशी संबंधित नाहीत पण त्यांना एकमेकांसोबत गुंफणारा धागा म्हणजे गुलजार साहेबांची प्रत्येक दोन कथांच्या मध्ये येणारी गुंफण ,त्यांचा धीरगंभीर आवाज , आणि त्यांचेच शब्द.
दिल ए नादान
दिग्दर्शक :- गजेंद्र अहिरे
संगीत :- नरेंद्र भिडे
कलाकार :- सुहास पळशीकर आणि नीना कुलकर्णी
उर्दू कवी व शायर मिर्झा गालिब यांच्या एका शेर वर आधारित हि कथाइंदोर मध्ये घडणारी हि कथा कथेतील नीना कुलकर्णी आणि सुहास पळशीकर या दोघांचा अभिनय म्हणजे "आप अंदाजा नही लगा सकते और मै बयां नही कर सकता " दोघेही प्रचंड ताकदीचे कलाकार . एके काळची प्रख्यात गझल गायिका ,प्रचंड प्रसिद्धी अनुभवलेलि आणि तिला सारंगी वर संगत करणारा मियाजी यांच्या उतरत्या काळातली परिस्थिती उत्तम चित्रित करण्यात आली आहे . उर्दू संवाद ,सेट मधून उभं केलेलं वातावरण . शुभा जोशी यांच्या आवाजातली गझल गायकी . आपण एका वेगळ्याच वातावरणात निघून जातो . दिल्ली हून आलेलं रजिस्टर पोस्ट नक्की काय असेल याची वाट पाहणारे ते दोघे . आणि या रात्री मध्ये चित्रित केलेला त्या दोघांमधला पावसाचा प्रसंग निव्वळ अप्रतिम .
एक होता काऊ
दिग्दर्शक :- विजू माने
संगीत :- सोहम पाठक
कलाकार :- कुशल बद्रिके आणि स्पृहा जोशी
किशोर कदम (सौमित्र ) यांच्या "एके दिवशी पावसाळी " या कवितेवर आधारित कथा . एक साधारण दिसणारा ( काळा ) ग्यरेज मालक मुलगा , ज्याला सगळे कावळ्या म्हणून ओळखतात . कावळ्या इतकं भिनलंय कि आज तो स्वतःच नाव विसरून गेलाय ,पदोपदी चिडवण इतकं कि त्याला त्याच्या दिसण्याबद्दल एक न्यूनगंड निर्माण झालाय . त्याच्याच जवळपास राहणारी पाकळी नावाची सुंदर मुलगी ( स्पृहा ) दोघेही एकमेकांना आवडतात , पण त्याला आत्मविश्वास नसतो .एक प्रकारचा कमीपणा घेऊन असतो,आणि पदोपदी त्याला टोमणे मारणारे म्हणूनच तो व्यक्त नाही होऊ शकत पण तिने व्यक्त झालेलं त्याला समजत नाही . पार्श्वभूमीला ओरडणारा कावळा आणि त्याची कावकाव खूपच प्रभावशाली . आरशासमोर उभे राहून स्वतःला पाहणारा कुशालचा अभिनय खूपच सुंदर ,संवादाशिवाय खूपच चांगला व्यक्त झालाय तो . कथेच्या शेवतच्या सीन मध्ये स्पृहा आणि कुशल दोघांचा अभिनय आणि मृदुंगाचा ताल घेऊन वाजणारं पार्श्वसंगीत . हा सीन खरंच मस्त जमून आलाय . पैल तोगे काऊ असं पण कंपोज करता येईल असं वाटलं नव्हतं .हि कथा खूपच अंतर्मुख करून जाते .
बैल
दिग्दर्शक :- गिरीश मोहिते
संगीत :- अविनाश - विश्वजित
कलाकार :- मंगेश देसाई , स्मिता तांबे , सागर कारंडे
शेतकर्याची कथा , कवी लोकनाथ यशवंत यांच्या बैल या कथेवर आधारित . मुळात हि कविताच फार अप्रतिम आहे . मेहनत करून राबणारा शेतकरी आणि त्या बदल्यात मिळणारा खूपच कमी मोबदला यावर आधारित . मंगेश देसाई ने खचलेला शेतकरी खूपच छान उभा केला आहे मॉल मधला दुकानदार आणि त्याचा सीन शेतकर्याची होणारी फरफट दाखवून जातो . परिस्थिती मुळे लाचार आणि तोल सुटणारी शेतकर्याची बायको स्मिता तांबे ने खूप मस्त उभी केली आहे . बैलाच जगण आणि शेतकऱ्याच जगण यातलं साधर्म्य खूप छान व्यक्त झालंय .
मित्र
दिग्दर्शक रवि जाधव पार्श्वभूमी
संगीत :- सलिल कुलकर्णी
कलाकार :- वीणा जामकर ,मृणाल देशपांडे ,संदीप खरे
समलिंगी संबंधावर हि कथा आधारित आहे . यासाठी स्वातंत्र्यापुर्वीची पार्श्वभूमी घेण्यात आली आहे . पूर्ण चित्रीकरण कृष्णधवल ,त्यामुळे जुना काळ ,वातावरण उभं करण्यात चांगलाच हातभार लागला आहे वीणा जामकरच "वेगळ असण " आणि ते व्यक्त होणं खूपच प्रभावी वाटत . तिचं मैत्रिणीला गृहीत धरणं , संदीप ला नाकरण खूप चांगल्याप्रकारे सादर करण्यात आलं आह. तिचं तसं असण घरच्यांनी आणि मैत्रिणीने नाकारणं याचा १५ ऑगस्ट शी जोडलेला संबंध अगदी अप्रतिम . सलिल कुलकर्णीचे काम नेहमीप्रमाणे चोख .' उदासीत या ' हे गाणं योग्य परिणाम साधतं .
एक परिपूर्ण चित्रपट
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 5:14 pm | मुक्त विहारि
आमचा पास.....
8 Aug 2015 - 5:55 pm | चाणक्य
तुमच्या परीक्षणामुळे उत्सुकता वाढली आहे.थोडक्यात लिहीलेलं लिखाण आवडलं.
8 Aug 2015 - 6:05 pm | रेवती
चित्रपटाची माहिती आवडली. बायोस्कोप लिस्टमध्ये आहेच. परवाच समजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे नीळकंठ मास्तर! जालावर हे शिनेमे येतील तेंव्हाच पहायला मिळतील.
8 Aug 2015 - 8:01 pm | उगा काहितरीच
वेळ मिळाल्यास निश्चितपणे पहाण्यात येईन .
8 Aug 2015 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रपटाच्या सुंदर ओळखीसाठी धन्यवाद !
चला हवा येऊद्या मध्ये या चित्रपटाची ओळख पाहिल्यापासून थिएटरमध्ये जावून पहायचे ठरवले आहे. लवकरच बघण्यात येईल.
8 Aug 2015 - 9:58 pm | एस
+१
8 Aug 2015 - 10:02 pm | पैसा
नक्की बघणार.
9 Aug 2015 - 12:46 am | शब्दबम्बाळ
छान लिहिलंय!
शेवटच्या चित्रपटाच नाव बहुतेक "मित्रा" आहे.
बर्याच दिवसापासून या चित्रपटाविषयी माहिती हवी होती, ती दिल्याबद्दल धन्यवाद!
मागे काथ्याकुट मध्ये एक धागा पण काढला त्यासाठी पण प्रतिसादा अभावी कुपोषणाने वारला बिचारा! :P
10 Aug 2015 - 2:44 pm | प्रियाजी
झंदुबाम, तुम्ही बायोस्कोप या चित्रपटाची करून दिलेली ओळख खूप योग्य वाटली. मीही हा चित्रपट पाहिला. मलाही तो खूप आवडला. विषेषतः एक होता काउ मधील शेवटचा सीन ज्यात पाकळीही स्वतःच्या चेहर्याला काळे फासून कावळ्याकडे येते तेव्हा तर डोळ्यात पाणीच आले. अशीही एक अयशस्वी प्रेमकथा. पण मला एक गोष्ट खट्कली म्हणजे हिंदीतील निवेदन. कथा जोड्ताना तेच निवेदन मराठीत जास्त आवडले असते.