[शतशब्दकथा स्पर्धा] वड्यांवरची मालकी

शब्दानुज's picture
शब्दानुज in स्पर्धा
4 Aug 2015 - 6:51 pm

सकाळी नाष्ट्यासाठी एका वड्याच्या गाड्यावर थांबलो होते. त्याच्याकडुन प्लेट घेताना नेमकी ती खाली मातीत पडली.

लगोलग तो रडु लागला," साहेब 'त्यानं' वडे मोजुन ठेवले व्हते .. आता तेवढं पैसं नाही दिलं तर.."
पाकीट काढलं आणि पैसे देऊन मी निघालो. जाताना बघीतले तर मातीतले वडे तो वेचुन खात होता. समोरच्या वड्यातल्या ढिगापैकी त्याच्यासाठी एकही नव्हता. त्याला त्याच्याच गाडीवर पोटभर जेऊ घातलं आणि मी निघालो.

पाच पाऊल जाताच त्याने आवाज देऊन मी विसरलेलं पैशाने भरलेलं पाकीट मला परत आणून दिलं....

घरी परतलो आणि कपडे बदलताना लक्ष्ात आलं की रस्त्यावरुन येताना माझं पाकीट कोणीतरी मारलं आहे.

प्रत्येकजण इथे भुकेला आहे. प्रत्येकाची भुक मात्र निरनिराळी..

प्रतिक्रिया

नूतन सावंत's picture

8 Aug 2015 - 9:28 am | नूतन सावंत

सुरेख.+१

एक एकटा एकटाच's picture

8 Aug 2015 - 11:36 pm | एक एकटा एकटाच

+१

सुहास झेले's picture

9 Aug 2015 - 1:36 am | सुहास झेले

वाह !!