[शतशब्दकथा स्पर्धा] देऊळ

लॉर्ड फॉकलन्ड's picture
लॉर्ड फॉकलन्ड in स्पर्धा
6 Aug 2015 - 8:16 pm

क्लबहाऊसमध्ये सोसायटीच्या आवारात कोणते देऊळ उभारायचे यासाठी सदस्यांची मीटिंग सुरू होती.

"मारूतीचे देऊळ बांधूया" बिराजदार म्हणाले.

"नको. मारूतीमंदीर म्हणजे खेड्यात असल्यासारखं वाटतं" जोशी म्हणाले.

"दत्तमंदीरच पाहिजे" पराडकरांची सूचना.

"दत्त, विठोबा असल्या देवांची देवळे म्हणजे एखाद्या जुन्या पेठेत राहिल्यासारखं वाटेल" इति गोखले.

"रामाचे देऊळ बांधू." संघात जाणार्‍या देशपांंड्यांनी प्रस्ताव मांडला.

"अजिबात नको. रामाच्या देवळामुळे देशात प्रॉब्लेम झालेत." त्वेषाने लिमये उद्गारले.

"महालक्ष्मीचे देऊळ सगळ्यांना आवडेल" ही सौ. भोसल्यांची सूचना लगेच फेटाळली गेली.

"दत्त, मारूती, विठ्ठल, राम, देवी असे जुनेपुराणे देव नको. आपल्याला इंटेलिजंट, सुशिक्षित, पॉलिश्ड असा देव पाहिजे. बाकीचे देव आपल्या पॉश सोसायटीला शोभणार नाहीत." अध्यक्ष म्हणाले.

सर्वसंमतीने गणपतीचे देऊळ बांधायचे ठरले.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Aug 2015 - 8:19 pm | मुक्त विहारि

+१

राघवेंद्र's picture

6 Aug 2015 - 8:21 pm | राघवेंद्र

मला वाटले Lotus Temple सारखे काहितरी.

एस's picture

6 Aug 2015 - 8:36 pm | एस

मस्त.

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 9:17 pm | प्यारे१

+१

गणपती बहुतेक लाडका असल्यानं मंदीर त्याचंच असतं सोसायटीमध्ये. (जेव्हा मालक/ बिल्डर त्या सोसायटीमध्ये नसतात तेव्हा) बाकी जैनांच्या सोसायटीबाबत बोलणं नाही.

dadadarekar's picture

6 Aug 2015 - 10:27 pm | dadadarekar

अरेरे ! मशीद हा ऑप्शन न ठेवल्याबद्दल निषेध !

पैसा's picture

8 Aug 2015 - 1:57 pm | पैसा

सोसायटीतल्या लोकांची नावं वाचलीत का? भारीच बुवा विनोदी तुम्ही!

नीलमोहर's picture

6 Aug 2015 - 11:10 pm | नीलमोहर

+१

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Aug 2015 - 11:15 pm | माम्लेदारचा पन्खा

तसे साईबाबा पण प्रत्येक गल्लीचे तारणहार आहेत सध्या.......

होते तेव्हा कोणी पाणीही विचारलं नाही...आता घालतायत सोन्याचे मुकुट....

मूर्ख शिरोमणी लेकाचे सगळे !!

अमृत's picture

7 Aug 2015 - 8:38 am | अमृत

माझ्यामते सगळ्यात आधी गणपतीचंच नाव येतं सहसा. बाकी काही आडनावं फारच फेवरेट असतात लेखकांची.

चिनार's picture

7 Aug 2015 - 9:16 am | चिनार

+१

समीरसूर's picture

7 Aug 2015 - 9:51 am | समीरसूर

+1

मस्त! देवांमध्ये खरोखर हा भेदभाव केला जातो. मुळात मंदिर (किंवा मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, जैन मंदिर, अग्यारी, वगैरे) बांधणे हा वेळेचा, पैशाचा, ऊर्जेचा, आणि अपव्यय आहे असे माझे ठाम मत आहे.

मुक्त विहारि's picture

8 Aug 2015 - 1:50 pm | मुक्त विहारि

ह्या बाबतीत आमचा अनुभव फार उत्तम आहे.

जडभरत's picture

7 Aug 2015 - 10:17 am | जडभरत

+१

सौंदाळा's picture

7 Aug 2015 - 10:18 am | सौंदाळा

+१

थॉर माणूस's picture

7 Aug 2015 - 10:27 am | थॉर माणूस

आता देऊळ बंद पण येणार का स्पर्धेत? :D

+१

अविनाश पांढरकर's picture

7 Aug 2015 - 11:08 am | अविनाश पांढरकर

+१

तुडतुडी's picture

7 Aug 2015 - 11:35 am | तुडतुडी

होते तेव्हा कोणी पाणीही विचारलं नाही...आता घालतायत सोन्याचे मुकुट....>>>+१११११११११
दत्त, मारूती, विठ्ठल, राम, देवी असे जुनेपुराणे देव >>>
माज आलाय सगळ्यांना .
कथेसाठी +१

आक्का, माज कुणाला? देवांना का? तुम्हाला कुणाचा अनुभव आला का? प्लीज शेयर करा ना!

माधुरी विनायक's picture

7 Aug 2015 - 1:10 pm | माधुरी विनायक

+१

जगप्रवासी's picture

7 Aug 2015 - 1:15 pm | जगप्रवासी

मला वाटल होत की आता दक्षिणेकडच्या तिरुपती मंदिराची प्रतिकृती उभारतील.

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2015 - 1:28 pm | चौथा कोनाडा

छान शशक ! देवळाच्या अनुषंगाने 'सोसायटी" बदलाचा वेध घेतलेला आवडला.

आता जागतिक स्पर्धेत जुने भोळे-भावडे देव मागे पडणार ! ग्लोबल एलेफण्ट गॉड बाजी मारणार !
मारुती राया, तुच लक्ष घाल बाबा आता ! अन आम्हा सर्वांचे कल्याण तुच करी रामराया !

gogglya's picture

7 Aug 2015 - 4:12 pm | gogglya

+१

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 8:03 pm | बहिरुपी

+१

बोका-ए-आझम's picture

8 Aug 2015 - 12:33 am | बोका-ए-आझम

+१

नूतन सावंत's picture

8 Aug 2015 - 1:30 pm | नूतन सावंत

+१

पैसा's picture

8 Aug 2015 - 1:55 pm | पैसा

+१

मस्तय!

तुमचा अभिषेक's picture

8 Aug 2015 - 2:44 pm | तुमचा अभिषेक

+१

उगा काहितरीच's picture

8 Aug 2015 - 8:11 pm | उगा काहितरीच

कथेसाठी +१ पण...