[शतशब्दकथा स्पर्धा] बंटी आणि भोलू

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in स्पर्धा
4 Aug 2015 - 4:33 pm

बंटी ससुल्या आणि भोलू माकडोबा एकमेकांचे जिवलग मित्र. बंटी तिथे भोलू हे सगळ्या जंगलाला ठाउक होते.

बंटी कोवळी गाजरे तोडत असला की भोलू झाडावरुन आजूबाजूला लक्ष ठेवायचा. जरासा धोका दिसला तरी बंटीला सावध करायचा.

काळू कोल्हाने बंटीला पकडायचे अनेक प्रयत्न केले होते. प्रत्येकवेळी भोलू मुळे बंटी त्याच्या तावडीतून अलगद निसटत असे.

एकदातर काळू पानांचा अंगरखा घालून बंटीच्या वाटेवर दबा धरुन बसला होता. बेसावध बंटी काळूच्या तावडीत जवळजवळ सापडणारच.... तेवढ्यात....

भोलूने झाडावरचा एक मोठा पेरु काळूला फे़कुन मारला. काळू दचकला.... तेवढ्यात बंटी तिकडून निसटला.

काळूला झाडावर चढता येत नसल्याने काळू भोलूला काहिही करु शकत नव्हता.

एकदिवस काळूला एक नामी संधी मिळते.........

पैजारबुवा,

प्रतिक्रिया

जडभरत's picture

4 Aug 2015 - 5:07 pm | जडभरत

+१ मी पहिला

मुक्त विहारि's picture

4 Aug 2015 - 5:18 pm | मुक्त विहारि

एका महिन्यात, "मी पहिला" पर्यंत प्रगती.....

मस्त.....

(कधी काळी "मी पहिला" ह्या संस्थेचा सभासद असलेला) मुवि

(परत एकदा "मी पहिला" ही टाइमपास आणि कुणाच्याही इगोला धक्का न देणारी, चळवळ सुरु करावी का?)

टवाळ कार्टा's picture

9 Aug 2015 - 11:20 am | टवाळ कार्टा

"मी पयला" असे आहे ना ते?

मुक्त विहारि's picture

4 Aug 2015 - 5:13 pm | मुक्त विहारि

भाग जरा लवकर येवू द्या.

ही कथा वाचून मला अजून एक प्रश्न पडला
क्र. १. काळू बंटीला पकडण्यात यशस्वी होतो का ?
२. (शशक वाचण्यापुर्वीचा १ क्रमांकाचा प्रश्न ) कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं ???

चिगो's picture

4 Aug 2015 - 5:39 pm | चिगो

अरे व्वा.. हा पण एक मस्त प्रकार आहे..

बालशशक आवडली. नवीन आडैया. +१. सिक्वलात काय होईल अशी उत्सुकता आहे.

बालशशक! मस्त नावंय! या दालनात अजून लेखन व्हावे ही इच्छा!

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 9:28 pm | बहिरुपी

+१

मितान's picture

4 Aug 2015 - 6:13 pm | मितान

गोड गोष्ट :)

प्यारे१'s picture

4 Aug 2015 - 10:07 pm | प्यारे१

+1 स्वीट च!

पिलीयन रायडर's picture

5 Aug 2015 - 7:27 am | पिलीयन रायडर

प्रयत्न आवडला. पण पहिली कथा सुद्धा स्वतंत्रपणे एक कथा असायला हवी ना? सिक्वल नाही आला तरीही..

तुषार काळभोर's picture

5 Aug 2015 - 9:59 am | तुषार काळभोर

येगझॅक्टली !
मला पन असंच वाटतं.

योगी९००'s picture

5 Aug 2015 - 8:35 am | योगी९००

+१ आवल्ली..!!

उगा काहितरीच's picture

7 Aug 2015 - 10:20 pm | उगा काहितरीच

काहीही हं हा !

पैसा's picture

7 Aug 2015 - 11:28 pm | पैसा

+१

प्रकार आवडला. शेवट "काळूला संधी मिळते" असे नसते तर कथा जास्त आवडली असती.

बोका-ए-आझम's picture

8 Aug 2015 - 12:59 am | बोका-ए-आझम

चंपक किंवा ठकठक अशा मासिकांमधल्या कथा लहानपणी वाचल्या होत्या, त्याची आठवण झाली. लहान मुलांच्या लेव्हलला जाऊन त्यांना गुंगवणारी कथा लिहिणे म्हणजे गंमत नाही.

जुइ's picture

8 Aug 2015 - 2:50 am | जुइ

यात पण भाग आहेत?

जुइ's picture

8 Aug 2015 - 3:23 am | जुइ

बाकी कथा आवडली!

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 12:33 pm | विशाल कुलकर्णी

आवल्लीच +१

बबन ताम्बे's picture

10 Aug 2015 - 6:20 pm | बबन ताम्बे

आवडली. आमच्या गणूला वाचायला एकदा दिली पाहीजे.

विवेकपटाईत's picture

10 Aug 2015 - 7:43 pm | विवेकपटाईत

+१ लहान झाल्यासारखे वाटले