http://indiatoday.intoday.in/story/27-congress-mps-suspended-from-lok-sa...
आज लोकसभेत जे काही झाले ते अभूतपूर्व होते. संसदेचे कामकाज आक्रस्ताळीपणे बंद पाडून देशाचे आणि करदात्यांचे कोट्यावधी रुपये पाण्यात घालणार्या नतद्रष्ट कोंग्रेसी खासदारांना 5 दिवसासाठी निलंबित करून लोकसभा अध्यक्षा सुमित्राजी महाजन यांनी एक महत्त्वपूर्ण नवीन पायंडा पाडला . त्याबद्दल त्यांचे आभार आणि हार्दिक अभिनंदन .
मोदी सरकारकडून अशाच agressive attitude ची अपेक्षा सर्वच क्षेत्रात असून ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान माजवून मोदीजी सत्तेत आले ,त्या गांधी परिवाराच्या भ्रष्टाचारी कारभाराची कडक व निष्पक्ष चौकशी करावी आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणुकी पूर्वी राहुल, प्रियंका ,सोनिया आणि वाड्रा यांच्यावर जे गंभीर आरोप केलेले होते , त्या गुन्ह्यांची चौकशी करून कडक शिक्षा / कारवाई करावी अशी अपेक्षा आहे .
मग ह्या मोदी सरकारच्या अशा agressive attitude ला कोणी हुकुमशाही म्हणून हिणवले तरी बेहत्तर. देशातील भ्रष्टाचार समूळ उपटून काढण्यासाठी आणि देशाला वैभवच्या सुवर्णशिखरावर नेण्यासाठी अशी हुकूमशाहीच हवी , असेच मोदींना मत देणार्या बहुतांश जनतेचे मत असावे! असे मला वाटते.
प्रतिक्रिया
3 Aug 2015 - 6:39 pm | जेपी
आं अच्च झाल तर
-स्पा.
अरे ये पाडुंब्बा ला धरा रे =))
-गुरुजी.
हम्म...
-वशाडी फेम.
जरा ईस्कटुन सांगा की..
-लाडोबा.
अगदी अगदी ...
-बॅटुकेश्वर गॉथमकर.
3 Aug 2015 - 6:55 pm | गॅरी ट्रुमन
सुमित्रा महाजन यांचा आजचा निर्णय योग्यच आहे. यापूर्वीच्या लोकसभा अध्यक्षांनीही असा निर्णय घ्यायला हवा होता. अमेरिकन सिनेट किंवा इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समधील चर्चा या बहुतांश वेळा मुद्द्यांवर आधारीत असतात. एकदा एक सदस्य बोलायला उभा राहिला की त्याचे सगळे मुद्दे मांडून पूर्ण होईपर्यंत इतर सगळे ते मुद्दे ऐकून घेतात आणि आपल्याला त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करायची संधी मिळाली की मग तो करतात. भारतीय संसदेत जसे हमरातुमरीवर येतात तसे येत नाहीत.आपला विरोध प्रकट करायला फिलीबस्टरींगही करतात.पण जे काही चालू असते ते आरडाओरडा न करता.
अर्थातच संसद सदस्यांना दोष देऊन अर्थ नाही.शेवटी आपल्या समाजातच शिस्तीचा अभाव असेल तर आपले लोकप्रतिनिधीही तसेच असणार.
मी मोदींनाच मत दिले होते (ते भाजपला होते असे म्हणणार नाही) पण भारतात हुकुमशाही हवी असे मी तरी म्हणणार नाही. तो इलाज रोगापेक्षा गंभीर असेल.
3 Aug 2015 - 7:08 pm | अत्रन्गि पाउस
भले संसद वगैरे देश पातळी वर असेल असेल ...
पण छोट्या पातळीवर एक हुकुमशहा आणि बाकीची प्रजा असे बऱ्याचदा दिसते ... छोटी गावे , वस्त्या, पाडे ...
शहरात सुद्धा होर्डींग्स, banners वर दिसणारे चेहेरे हे एका पातळीवर हुकुम्शाहाच असतात कि ...
आणि आपली मानसिकता सुद्धा 'भो राम मामनुद्धर' अशीच आहे (रामाच्या जागी दुसरे कुणी)
3 Aug 2015 - 7:45 pm | विकास
पण भारतात हुकुमशाही हवी असे मी तरी म्हणणार नाही. तो इलाज रोगापेक्षा गंभीर असेल.
१०००% सहमत.
5 Aug 2015 - 4:57 am | रमेश आठवले
मी सुद्धा सहमत.
3 Aug 2015 - 7:07 pm | भीमराव
हे भाजिपाला वाले सुदा आसच करायचे कांग्रेस काळात, विरोधी पक्षाच्या शिटींग आरेंजमेंट मदिच काय तरी घोळ हाय. जो बी तेजाव बसल त्यो आसाच कालवा करून कामकाज बंद पाडाय बघतो.
3 Aug 2015 - 8:37 pm | बोका-ए-आझम
सूडबुद्धीने वागतात आणि त्यामध्ये देशाची पण पर्वा करत नाहीत हे तुम्हाला मान्य आहे तर! धन्यवाद.( पुढच्या निवडणुकीत ४४ चे ४ होणार तर!)
3 Aug 2015 - 7:16 pm | प्रसाद गोडबोले
राजकारण विषयक धागे दिसणार नाहीत असे काही मिपा मध्ये सेटिंग करता येईल का ? म्हणजे ह्या राजकारण विषयक धाग्यांना अनसब्स्क्राईब करता येईल .
काही चांगलं वाचायला म्हणून मिपावर यावे तर स्वगृहाव्र्र हेच - मोदी आणिबाणि काआँग्रेस भाजपा हिंदु दहशतवाद अन याकुब :-\
कंटाळा आला राव !
3 Aug 2015 - 7:38 pm | जेपी
सहमत व्हायची वेळ आली माज्यावर..अरेरे.
4 Aug 2015 - 11:37 am | सतरंगी_रे
म्हणूनच मि पा वरून कलटी मारायची आहे. सदस्यत्व रद्द करणेबाबतचा खरड केलाय. दोन दिवस झाले..... बघू अजून थोडी वाट!
4 Aug 2015 - 11:54 am | गॅरी ट्रुमन
हे वाचून तात्यांची खूप आठवण येत आहे. एकदा मिपाच्या मुखपृष्ठावर कोल्हापुरी चपलांच्या जोडाचा फोटो आला होता. आणि खाली लिहिले होते--"मिपा न आवडणार्यांसाठी सप्रेम भेट" :)
4 Aug 2015 - 7:40 pm | प्रदीप
इथून 'कल्टी' मारायची असेल तर सदस्यत्व रद्द करण्याची जरूरी नाही. कारण तुम्ही येथून गेलात की ते कुणीच वापरणार नाही. मिपाच्या कारभारावर विश्वास असेल तर हे समजणे अगदी सोपे आहे.
आणि ह्याहून महत्वाचे हे की इथे सदस्य्त्व असतांनाही प्रत्येक धागा वाचण्याची सक्ती अजिबात नाही. तेव्हा असले धागे का येतात, त्यांचा त्रास होतो आहे, असल्या बातांना अर्थ रहात नाही.
4 Aug 2015 - 8:20 pm | सतरंगी_रे
धन्स! ज्जे बात! चालू द्या !
3 Aug 2015 - 8:37 pm | अभिजित - १
मोदी सरकारकडून अशाच agressive attitude ची अपेक्षा सर्वच क्षेत्रात असून ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान माजवून .....
>>>>>>>>>> काही हि हं उ. ख. !!
असं काही हि होणार नाहीये हे अजून लक्षात येत नाहीये का तुमच्या ? झाले आता १ वर्ष .. करायचं असत तर कधीच सुरुवात झाली असती.
पण भारतात हुकुमशाही नको. तो इलाज रोगापेक्षा गंभीर असेल.
4 Aug 2015 - 9:59 am | dadadarekar
काँग्रेसच्या आणीबाणीच्या काळात बिळात लपलेल्या लोकाना आतामात्र हुकुमशाहीची स्व्व्प्ने पदु लागली.
डोळे पाणावले.
4 Aug 2015 - 10:25 am | चिनार
दादाचं बरोबर आहे... राहुल गांधींना पंतप्रधान करा..
4 Aug 2015 - 10:34 am | नाखु
एकच दुरुस्ती :
आणी जाता जाता राजकारण धाग्यांना खफसारखी सूचना लावणे (फक्त तीन दिवसांऐवजी ३ तासांची शर्त ठेवणे)
धुराळी धाग्याचा "वीट" करी नाखु
4 Aug 2015 - 10:47 am | गॅरी ट्रुमन
सगळे लोक माझ्यासारख्यांच्या मिसळपावीक जीवनावर का उठले आहेत हे समजत नाही. राजकारणावरील धाग्यांना ३ तासांचेच आयुष्य असेल तर माझ्यासारख्यांनी काय करायचे? :(
4 Aug 2015 - 2:24 pm | नाखु
धागा जीत्ता ठिवण्याची जिम्मेदारी आप्ली !!
वल्याबरूबर सुकं जळतं त्ये असं !
चावडीबाहेर्च्या पारावरचा नाखु
4 Aug 2015 - 2:50 pm | अस्वस्थामा
तुम्ही तुमचे धागे सत्संग म्हणून टाका मग.. हा.का.ना.का. ;)
(शिरेस प्रतिसाद आहे वो.)
4 Aug 2015 - 11:32 am | इरसाल
अजित डोवाल आणी नरेंद्र मोदी यांनी खालच्या तीन जणांशी चर्चा करुनच नागां बरोबर करार केला अस गोपनीय सुत्रांकडुन समजले.
१. दादा दरेकर
२. ललित शिंदे
३. लबाड कोल्हा११
आणी हो ते तहहयात बद्द्ल अतिशयच सहमत.
4 Aug 2015 - 11:40 am | बोका-ए-आझम
ग्रेटथिंकर आणि फुलथ्राॅटल जीनियस;;)
4 Aug 2015 - 12:12 pm | dadadarekar
..
4 Aug 2015 - 11:35 am | बोका-ए-आझम
कुठेही हुकूमशाही नको. अमुक एखाद्या धाग्याचा किंवा विषयाचा वीट येणे स्वाभाविक आहे पण न वाचण्याचा पर्याय उपलब्ध आहेच.
4 Aug 2015 - 12:13 pm | तुडतुडी
कुठेही हुकूमशाही नको.>>
काही चांगल्या गोष्टींसाठी हुकुमशाही असायला हवी . लातों के भूत बातों से नही मानते
काँग्रेस ला देशद्रोही पक्ष घोषित करून निवडणूक आयोगाने त्या पक्षाची मान्यता काढून घ्यावी . आणि काँग्रेस ला ह्या पुढे थारा मिळणार नाही ह्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला हवी
4 Aug 2015 - 12:48 pm | dadadarekar
१०० लोकांच्या जिवावरच मोदी सर्कार निवडुन आलय .
5 Aug 2015 - 12:51 am | बोका-ए-आझम
हे मान्य आहे पण मग लाथा लोकांना घालू द्या. आणि जेव्हा लिक लाथा घालतात तेव्हा जो नजारा असतो - १६ मे २०१४ सारखा, त्याला तोड नसते!
4 Aug 2015 - 12:22 pm | सनईचौघडा
कहर.
झालं सगळ्यावर तुडतुडी -ताईंचा एकच षटकार ! आता काय ते बोला....