फ्रीलान्सिंग आणि भारतातील कर

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
23 Jul 2015 - 2:19 pm
गाभा: 

या धाग्यावरून स्फूर्ती घेऊन माझा पण एक प्रश्न डकवत आहे

मी सध्या काही काळ भारतातून भारतबाहेरील कंपन्यांसाठी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करतो.. कामाचा मोबदला अर्थात डॉलरमध्ये मिळतो, पण कोणतीही चांगली सोय नसल्यामुळे सध्या पायोनीअर या सर्व्हिसच्या माध्यमातून पैसे घेतो. आता प्रश्न असा आहे की या उत्पन्नाला कोणते कोणते कर लागू होतील?
याबद्दल जालावर पाहिले असता वेगवेगळी मते दिसतात. काही जण म्हणतात की ही एक्स्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, काही म्हणतात ही नाही म्हणून. त्यामुळे संभ्रमित झालो आहे.
याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?

प्रतिक्रिया

मी सध्या काही काळ भारतातून भारतातील कंपन्यांसाठी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करतो

कृपया भारतातून भारताबाहेरील असे वाचावे.

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 3:41 pm | द-बाहुबली

आपण कंपनी स्थापन केली असेल तर CA सोबत बोलुन घ्या फार क्लिश्ट प्रकरण नाही. पण इंडिडेव असाल तर बँकेत (अथवा ऑनलाइन खात्यावर जसे पेपल वगैरे वगैरे) जी रक्कम जमा होइल त्यावर रिट्रन फाइल करुन चिंतामुक्त व्हा. माझ्या अंदाजा नुसार आपण ४०,०००० ते ७०,००० च्या दरम्यान वर्षाला मिळवता. रक्क्म ५ लाखाच्या वर गेली तर रिटर्न फाइल करायला अजिबात चुकु नका. चुकलात अन काही लचांड मागे लागलेच तर CA गाठा, फार त्रास अजिबात नाही.

अंदरकी बात बोले तो... ४-५ लाख इनकम होउन एखादे वर्षी रिटर्न राहुन गेलं तरी फार फरक पडत नाही अ‍ॅज लाँग अ‍ॅज तो इनकम डॉलमधुन तुमच्याकडे आला आहे, सरकारला तुम्हे डॉलर भारतात आणल्याबद्दल कवतुक आहे असंच समजा अन पुन्हा ही चुक करु नका :)

आणी हो...
- मेक प्रॉफीट

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 3:45 pm | द-बाहुबली

सर्व निर्णय स्वजबाबदारीवर घेणे :) आम्ही उंटावरुन शेळ्या हाकतो.

माझा प्रमुख प्रश्न सर्व्हिस टॅक्स बद्दल आहे. सर्व्हिस टॅक्सचे नियम समजायला अत्यंत क्लिष्ट आहेत. (तसे सगळेच सरकारी नियम असतात म्हणा). पण माझा टर्न ओव्हर बघता मी सर्व्हिसटॅक्सच्या स्लॅबमध्ये येतो, आणि त्यामुळे मला जर "एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस" चा फायदा घ्यायचा असेल तर नेमके काय करावे लागेल असा प्रश्न माझ्यासमोर आहे.

पायोनीअरसारख्या सर्व्हिसेस तुमच्या अकाउंटला "रुपये" जमा करतात, आणि सर्व्हिस टॅक्स अ‍ॅक्ट सांगतो की तुम्हाला पैसे कन्व्हर्टिबल फॉरिन एक्स्चेंज मध्ये मिळाले पाहिजेत. याचा मेळ कसा घालायचा ते कळत नाहिये.

संदीप डांगे's picture

23 Jul 2015 - 4:15 pm | संदीप डांगे

मित्रा, जास्त डोकं चालवू नकोस... सीए गाठ.

संपूर्ण माहितीशिवाय इथे चर्चा करून उपयोग होणार नाही. आणि पेपाल आवडलं नाहीका?

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 4:16 pm | द-बाहुबली

जाणकारांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत. आमचं दाजीच सिए असल्याने एकुणच या प्रकरणात मी कधी लक्ष घातले नाही. पण उत्तर द्यायचा यत्न केला कारण मी सुध्दा आपल्या प्रमाणे फ्रीलांस डेवलपमेंटची कामे घेतो. जर आपण सर्व्हिसटॅक्सच्या स्लॅबमध्ये येताय असे म्हणत आहात तर आपला टर्न-ओवर सॉलीड असावा/ सॉलीडपेक्षा कमी असल्यासही इछ्चा असेल तर सुट टाळुन टेक्स भरता येतोच पण एकुणच या स्थितीमधे मी आपले शंकासमाधानास तुटपुंजा आहे. खर्‍या जाणकारांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत :)

सकृतदर्शनी आपण सर्वीस प्रोवायडर मला वाटत नाही.. असो.

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 4:26 pm | पाटीलअमित

मी पण फ्रीलाचिंग केले होते ,पण पैसे खूप वेळा लोक बुडवतात असा अनुभव आहे

उगा काहितरीच's picture

23 Jul 2015 - 5:21 pm | उगा काहितरीच

मला याबद्दल थोडी अधिक माहिती द्याल का ? मिही फ्री लान्सींग करू इच्छितो . तुम्ही नेमक्या कुठल्या साइट वरून प्रोजेक्ट घेता ? सुरक्षितता कशी ठेवायची वगैरे वगैरे. (इथे योग्य वाटत नसेल तर व्यनि पण करू शकता )

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 5:25 pm | पाटीलअमित

मी लौकरच माझ्या ब्लोग वर ह्याबद्दल सविस्तर लिहीन

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 6:43 pm | अस्वस्थामा

मी लौकरच माझ्या ब्लोग वर ह्याबद्दल सविस्तर लिहीन

याचा अर्थ "अधिक माहितीसाठे इच्छुकांनी व्यनि करा (अथवा माझ्या रिकाम्या ब्लॉगला भेट द्या)". ;)

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 6:44 pm | पाटीलअमित

"गरजू लोकांनी दररोज दरवाजा ठोठवावा "

रुस्तम's picture

23 Jul 2015 - 6:57 pm | रुस्तम

मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे

http://www.misalpav.com/node/32056

मी काहीही लिहील तर उत्तम लिहील त्यामुळे मला त्याची चिंता नाही.

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 7:55 pm | पाटीलअमित

जर तुम्ही नित वाचले असते तर कळाले असते कि सदर धागा माझ्याच धाग्यावरून प्रेरित आहे

आता हा हा हा करू शकता

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 7:21 pm | अस्वस्थामा

तुमी आयुर्हित काकांना ओळखता का हो ? ;)

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 7:56 pm | पाटीलअमित

का ?

:)) अगदी व्यनिहित काकांच्या पावलावर पाऊल आहे!

@आनन्दा: कृ० चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क साधावा.

सीएकडे "हा-प्रश्न-त्याचं-उत्तर-दे-भौ" अशा प्रकारे न जाता संपूर्ण माहिती+कागदपत्रे द्यायची तयारी असावी. आयकर, सेवाकर यापुरताच सल्ला मर्यादित न राहता तुमच्या व्यवसायाला योग्य असं कायदेशीर स्वरूप, अकाउंटिंग, आर्थिक शिस्त, अशा अनेक अंगांनी सल्ला मिळेल.

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 6:44 pm | अस्वस्थामा

तुम्ही नेमक्या कुठल्या साइट वरून प्रोजेक्ट घेता ?

या इथे अधिक माहितीसाठी पहा..

पाटीलअमित's picture

23 Jul 2015 - 6:45 pm | पाटीलअमित

तश्या ढिगाने आहेत . मी सर्व माहिती लौकरच टाकेन

sam de'silva's picture

24 Jul 2015 - 2:43 pm | sam de'silva

Loop me in if you get any info. I am also interested in this.

तुषार ताकवले's picture

23 Jul 2015 - 5:44 pm | तुषार ताकवले

आपला एप्रिल ते मार्च मधे रु दहा लाख उत्पन्न मिळाले तर सर्विस टॅक्स लागू होतो. विवाहित असाल तर काही उत्पन्न बायकोच्या नावावर घेऊ शकता.

अगदी अचूक पण लगेच उत्तरासाठी "Taxguru" कार्यक्रम शनिवारी सकाळी ७.३० ते ८.०० CNBC AWAAJ चंनेलवर असतो नंतर दोनतीनदा रिपीटही होतो.हिंदीत लखोटिया पटापट उत्तरे देतात .अगोदर इमेल करून प्रश्न विचारा अथवा थेट फोनवरूनही कार्यक्रमात विचारा.

Email: tax@moneycontrol.com
SMS :TG सवाल, नाम send to 51818

पत्ता: टॅक्स गुरु
। CNBC आवाज
एक्सप्रेस ट्रेड टॅावर
। प्लॅाट नं 15-16 सेक्टर -16 ए
। नोएडा- 201301