☼"ज्ञानोबा - तुकोबा"च्या मंत्रात "शिवाजी - संभाजी" हे दोन महामंत्र गुंजले अन धन्य झाले पुणेकर हा अविस्मरणीय सोहळा पाहून☼
संत पाऊली गोजीरी ,गंगा आली आम्हावरी
जेथे उडावी रजधुळी ,तेथे करावी अंघोळी
वारकरी सांप्रदाय हि महाराष्ट्राची परंपरा.
अन या परंपरेला शिवकाळात अभय दिल असेल तर ते फक्त शिवाजी संभाजी या पितापुत्रांनी.
अस म्हटल जात वारीला हि छ. शिवाजी महाराज भेट देत, साधु संतांच्या दर्शनाला जात.
आणि
हि परंपरा अखंड चालू होती.
याची जाणीव समाजाला रहावी म्हणून शिवप्रतिष्ठान वढू तुळापुर व शिवतीर्थ रायगडवरून ज्वालेच्या रुपात या महाराष्ट्राच्या दोन्ही छत्रपतींना वारीत आणते. व वारकऱ्यांच्या अखंड परंपरेला वंदन करते.
अधिक आषाढ कृ० ९, शुक्रवार, शके १९३७ पुणे येथे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन होते. वारकरी-धारकरी संगम म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम हा सोहळा
जेंव्हा परकीय आक्रमण आले होते, देश, धर्म, सांप्रदाय नष्ट होत चालले होते. या उभ्या महाराष्ट्राला संपूर्ण भारत देशाला, कोणीच वाली न्हवते तेंव्हा छत्रपती शिवाजीराजे भोसले जन्माला आले आणि त्यांनी अपार पराक्राम गाजवून, परकीयांना धूळ चारून देव, देश आणि धर्माच्या पाठीशी उभे राहून सर्वांचे रक्षण केले, साधुसंताना अभय दिले, ज्यांच्यामुळे पंढरीचा पाडुरंग, तुळजापूरची आई भवानी माता परकीय जाचातून वाचली, मुक्त झाली याच शिवरायांचा नामघोष. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांचा धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रूपाने दिंडीत सहभागी झाला होता.
म्हणे बाप माझा वसे पंढरीत,
आई राहते नित्य तुळजापुरात,
तया दर्शनासाठी आसुसलेला,
मराठा म्हणावे अशा वाघराला
भक्ती आणि शक्ती – वारकरी धारकरी संगम म्हणजे संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची भेटच जणू. भक्ती आणि शक्तीची भेट काल पुणेकरांनी डोळे भरून पाहिली.
नामदेव, एकनाथ, सावता माळी, ज्ञानेश्वर भावभक्तीची गंगा घरोघरी पोहोचवली. नामदेवांनी महाराष्ट्र धर्माचा झेंडा अखंड भारतात रोवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची ज्योत महाराष्ट्रातच चेतवली आणि दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्राचे श्रेष्ठत्व मान्य करायला लावले.
संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ शिवशंभू या पितापुत्रांच्याच काळात रोवली गेली. वारकरी आणि धारकरी म्हणजेच भक्तीशक्ती संगम सोहळा पुणे येथे पार पडला.
हर हर महादेव गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम हे गजर रंगून गेले, अभंग, कीर्तने आणि विठूमानाचा जयघोष झाला.
"याची देही याची डोळा । धारकरी वारकरी संगम सोहळा" पुणेकरांनी मनात साठवला.
माझा भाव तुझे चरणी । तुझे रूप माझे नयनी ॥
सापडलो एकामेकां । जन्मोजन्मी नोहे सुटका ॥
त्वा मोडिली माझी माया । मी तो जडलो तुझिया पाया ॥
त्वा मज मोकलिले विदेही । मी तुज घातले हृदयी ॥
नामा म्हणे गा सुजाणा । सांग कोणे ठकविले कोणा ॥
“जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल” नामघोषात “हर हर महादेव” अशी ललकार
डोक्यावर भगवा फेटा, मुखात शिवनामाचा, विठ्ठल रखुमाई नामघोष, छाती अभिमानाने फुगलेली आणि सोबत आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींची शिस्त आणि स्वतः गुरुजी.
असा हा वारकरी आणि धारकरी असा संगम याची देही याची डोळा पहायला रस्त्यावर अमाप गर्दी लोटली
विठ्ठल नामाची दिंडी चालली, धारकरी वारकरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
वारकरी सांप्रदाय म्हणजे पंढरपूर. तुकोबा, ज्ञानोबांची वारी, आणि धारकरी म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवाजी संभाजी रक्तगटाची ललकारी”
“भारत माता कि जय” आणि “जय जय विठ्ठल रखुमाई ।। जय जय विठ्ठल रखुमाई” हे दोन नामघोष पहिल्यांदाच एकमेकांत मिसळले होते.
हे विठ्ठला पांडूरंगा,
या देश आणि धर्मावरील संकटाला दूर कर, आम्हाला काही नको पण या हिंदुराष्ट्राच रक्षण कर, तूच माऊली तूच साऊली सकळांची, या झोपलेल्या देशाला महाराष्ट्राच्या तरुणाला पुन्हा जाग कर, हातात शिवनामाच शस्त्र आणि हृदयात शिवरायांच्या अभिमान जागव, देव, देश आणि धर्मासाठी जगायला आणि मरायला शिकव, अखंड हिंदुस्थान भगव्या झेंड्याखाली आन हेच मागणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरयांनी विठ्ठला, ज्ञानोबा, तुकोबाचरणी मागितले.
© लेखन - गणेश पावले
वारीतील काही क्षण
प्रतिक्रिया
11 Jul 2015 - 3:04 pm | कंजूस
वा छान!!
11 Jul 2015 - 3:14 pm | उगा काहितरीच
छान !
12 Jul 2015 - 9:44 am | ज्ञानोबाचे पैजार
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराजा माउली तुकाराम
तुकाराम महाराजांच्या पालखी चे दर्शन दर्शन झाल्याने मस्त वाटले.
पण वारी मध्ये तलवारी आल्या हे मात्र काही रुचले नाही. धारकर्यांचे फोटो बघुन मनास अत्यंत क्लेश झाले. पंढरीची वारी देखील आता हायजेक होणार अशी भीति वाटली.
मी या वर्षी सुध्दा माउलॆंच्या पालखी सोबत आळंदी ते पुणे चालत आलो. लवकरच त्याचा वृत्तांत लिहिणार आहे.
पैजारबुवा
12 Jul 2015 - 2:37 pm | अनुप ढेरे
तंतोतंत. वारीत तलवारी??? अजिबात आवडलेला नाही तो प्रकार.
12 Jul 2015 - 2:38 pm | टवाळ कार्टा
+१११११११११
13 Jul 2015 - 9:58 am | ganeshpavale
मित्रहो,
मान्य कि वारीत तलवारी काय कामाच्या….
वारकरी सांप्रदाय हि महाराष्ट्राची परंपरा.
अन या परंपरेला शिवकाळात अभय दिल असेल तर ते फक्त शिवाजी संभाजी या पितापुत्रांनी.
अस म्हटल जात वारीला हि छ. शिवाजी महाराज भेट देत, साधु संतांच्या दर्शनाला जात.
आणि
हि परंपरा अखंड चालू होती.
याची जाणीव समाजाला रहावी म्हणून शिवप्रतिष्ठान वढू तुळापुर व शिवतीर्थ रायगडवरून ज्वालेच्या रुपात या महाराष्ट्राच्या दोन्ही छत्रपतींना वारीत आणते. व वारकऱ्यांच्या अखंड परंपरेला वंदन करते.
13 Jul 2015 - 10:23 am | नाखु
एक किरकोळ शंका:
तलवारीविना वारी होतच नव्हती काय?
गणपती मिरवणूकीत दांडपट्टा भाला बरचीचे प्रात्यक्षीक संयुक्तीक आहे (एक वेगळे कला प्रदर्शन म्हणून पण वारीत खरेच का तलवार प्रदर्शन ???.
निर्लेप भक्ती हीच शक्ती वाला जुनाट नाखुस
13 Jul 2015 - 10:39 am | ganeshpavale
रायरेश्वरी शपथ घेताना फुले. बेलपत्र वाहून शपथ घेता आली असती. मग बोट कापून रक्ताचाच अभिषेक का केला? त्याला काही कारणे असतात.
वारीत ज्या तलवारी होत्या त्या वढू तुळापुर संभाजी महाराजांच्या समाधीस्थलावरून व रायगडहून पूजन करून आणल्या होत्या.…
15 Jul 2015 - 3:42 pm | सूड
बरं मग?
15 Jul 2015 - 12:02 pm | तुडतुडी
झकास . खूप सुंदर .
पूर्वीच्या काळी . मुसलमानी राजवटीच्या काळात वारीला संरक्षण द्यावं लागायचं . वारीबरोबर सशस्त्र सैनिक , भालदार , चोपदार घोडदलासहित असायचे . वारीचा मुक्काम पडला कि हे घोडेस्वार आजूबाजूला फिरून काही अपय नाही न बघायचे . आता ह्या सगळ्याची गरज उरली नहि. पण घोडेस्वाराने रिंगण घालायची परंपरा वारीत अजूनही दिसते . :-)
15 Jul 2015 - 12:04 pm | तुडतुडी
धारकरी हि सुधा पूर्वीच्या सशस्त्र सैनिकांची परंपरा .
15 Jul 2015 - 1:27 pm | जयंत कुलकर्णी
//अन या परंपरेला शिवकाळात अभय दिल असेल तर ते फक्त शिवाजी संभाजी या पितापुत्रांनी.
अस म्हटल जात वारीला हि छ. शिवाजी महाराज भेट देत...///
याचा कुठल्या बखरीत उल्लेख आहे का ?
15 Jul 2015 - 4:42 pm | कैलासवासी सोन्याबापु
हा काय प्रकार आहे? कुलकर्णी काका विचारत आहेत त्याबाबतीत काय म्हणणे आहे हे पाहून बोलणे उचीत ठरेल, पूर्वीच्याकाळी वारी ला गरज असेलही संरक्षणाची (जे त्या काळातल्या परिस्थिती नुसार संयुक्तिक होते) आज वारीत तलवारी कोणापासुन रक्षण म्हणुन आणल्या गेल्या होत्या? अन त्या आणून काय साधले गेले?