नमस्कार मित्रांनो
मिसळपाव वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न करतोय, त्यामुळे काही चुका झाल्यास पोटात घालाव्या,
मित्रांसोबत adventure टूर म्हणून बाइक घेऊन लेह लडाख ला जातोय. अंतर जालावर बरीच माहिती आहे, परंतु आपल्यापैकी कोणी अगोदर गेले असल्यास थोडी माहिती हवी होती.( हॉटेल्स आणि तत्सम )
आमचा टूर प्लान जो खालील प्रमाणे आहे.
१५ ऑगस्ट - अमृतसर
१६ ऑगस्ट-मनाली
१७ ऑगस्ट-मनाली
१८ ऑगस्ट- मनाली
इथपर्यंत मनाली चा अनुभव आहे, हॉटेल्स हि बुक झालेत.१९ ऑगस्ट पासून चा जो दौरा आहे त्याबद्दल मदत अपेक्षित.
१९ ऑगस्ट मनाली ते केलोंग आणि केलोंग ला मुक्काम
२० ऑगस्ट केलोंग ते पांग आणि पांग ला मुक्काम
२१ ऑगस्ट पांग ते लेह आणि लेह ला मुक्काम.
२२ ऑगस्ट ले ते पंगोंग आणि पंगोंग ला मुक्काम
२३ ऑगस्ट पंगोंग ते लेह आणि लेह ला मुक्काम
२४ ऑगस्ट लेह ते खारदुंगला पास आणि पुन्हा लेह ला परत येउन मुक्काम.
२५ ऑगस्ट लेह ते कारगिल आणि कारगिल ला मुक्काम
२६ ऑगस्ट कारगिल ते द्रास -झोजीला पास-सोनमर्ग- श्रीनगर- आणि श्रीनगर मुक्काम.
२७ ऑगस्ट श्रीनगर मुकाम
२८ ऑगस्ट श्रीनगर ते जम्मू प्रवास आणि जम्मू ला मुक्काम
आम्ही फक्त ३ जण स्वतंत्र बाइक घेऊन जातोय, टूर फारच लो-बजेट ( भिकार गटात मोडणारी आहे)
त्यामुळे स्टार प्रकारातील महागडी हॉटेल्स नकोयत. केवळ रात्री उबदार गादीवर झोपणे, स्वच्छ, स्नानगृह,आणि शौचालय असावे ,भूक लागल्यास काहीबाही पोटात टाकता येईल एवढीच माफक अपेक्षा.
जम्मू आणि श्रीनगर मध्ये फार फसवणूक होते हॉटेल्स बाबतीत असे ऐकिवात आहे , त्यामुळे आगावू बुकिंग केले नाही.
आणखीनही काही माहिती आपण देऊ शकत असल्यास जरूर सांगावी.
आपलाच
सतिश पाटील.
प्रतिक्रिया
6 Jul 2015 - 2:03 pm | टवाळ कार्टा
वाखू साठवलेली आहे
6 Jul 2015 - 2:46 pm | जिन्क्स
१९ ऑगस्ट मनाली ते केलोंग आणि केलोंग ला मुक्काम
२० ऑगस्ट केलोंग ते पांग आणि पांग ला मुक्काम
हे अंतर बरच कमी आहे. पांग ल मुक्काम करायचं काही खास कारण आहे का? तसेही पांग ला राहण्यासाठी हॉटेल्स वगेरे ची सोय नाही. आर्मी कँप मधे रहावे लागते (२०१२ चे अनुभव. एवढ्यात नविन काही सुरु झाले असल्यास कल्पना नाही. पांग ची उंची पण खूप आहे, विरळ हवामानामुळे रात्री त्रास होउ शकतो)
केलोंग - लेह हे अंतर २५० कि.मी. आहे आणि ते एका दिवसात आरामात कापू शकता.
http://www.khardunglaview.com/
हे पुण्यातल्या तरुणांनी लेह मधे सुरु केलेले हॉटेल आहे. व्यनी केल्यास मालकाचा नंबर देऊ शकतो.
तुमच्या प्रवासास शुभेच्छा. काही मदत लागल्यास व्यनी करावा.
6 Jul 2015 - 5:09 pm | सतिश पाटील
परंतु गुगल च्या नकाशात केलोंग ते लेह हे अंतर ३५८ किमी दाखवताय , म्हणून पांग चा मुक्काम विचाराधीन होता.
6 Jul 2015 - 8:50 pm | राघवेंद्र
लिन्क
6 Jul 2015 - 10:07 pm | विलासराव
मी २ ऑग्स्ट ला जम्मूवरन कारगिल लेह मनाली असा प्रवास करतोय.
आम्ही ४ जन आहोत.
तिथून बाइक मिळतात का?
नाहीतर लोकल वाहनाने फिरायचा मानस आहे?
बजट टूर.
तुमचे होटल्स पत्ते दिलात तर बरे होईल.
6 Jul 2015 - 10:45 pm | उगा काहितरीच
प्रवासाला शुभेच्छा ! (तुमच्या बाईक कोणत्या आहेत ? या अगोदरचा काही अनुभव आहे का ? प्रवासाला जाताना सामान वगैरे काय काय घेतलं ? हे पण कळू द्यावे की .)
7 Jul 2015 - 3:01 pm | सतिश पाटील
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.
जम्मू आणि श्रीनगर वरून बाइक भाड्याने मिळतात. परंतु बाइक चांगल्या कंडीशन मध्ये आहे का तेही आधी प्रत्यक्षात आपल्या पुढ्यात तपासून घ्यावे. बुलेट च्या क्लासिक आणि standard या साधारण १००० रुपये प्रती दिवस प्रमाणे मिळतात.
आम्ही बुक केलेले हॉटेल्स.
अमृतसर - हॉटेल एक्सिस इन- ८७६ रुपये प्रती दिवस ३ जणांचे
मनाली- हॉटेल मोहन प्यालेस - १८७० रुपये ३ दिवसांचे ३ जणांसाठी
आमच्या कडे असलेल्या बाइक- अवेंजर २२०, युनिकोर्न, डिस्कवर १२५ st .
पूर्वाश्रमीचा अनुभव म्हणजे, बाईकवर महाराष्ट्रात भरपूर फिरलो आहोत. आधी एका प्रख्यात टूर कंपनी मध्ये टूर म्यानेजर म्हणून ३ वर्षात ५५-६० वेळा मनाली आणि रोहतांग पास भटकून आलोय, पण ते ४ चाकी किंवा ६ चाकी गाडी मध्ये.
सामानाबद्दल म्हणाल तर जे अत्यावश्यक आहे तेवढे मोजकेच समान नेणार आहोत.
उदाहरणार्थ- 2 जोडी टी शर्ट, ३ जीन्स,१ स्पोर्ट शुस,१ गम बूट, ४ जोडी मोजे,१ जोडी चप्पल, १ पावसाचे ज्याकेट, १ स्वेटर, १ थंडीचे ज्याकेट,१ थर्मल वेअर,गाडीची कागदपत्रे, २ जोडी थंडीचे हातमोजे,२ जोडी गाडी चालवायचे हातमोजे,२ ब्याट्री, extra tube, पंचर काढायचे सामान,हेल्मेट, हेड्वेअर.प्रथमोपचार पेटी.स्लीपिंग ब्याग आणि छत्री.( पावसात वापरायची )
7 Jul 2015 - 9:35 pm | विलासराव
मस्तच माहिती.
मला उपयोग होईल.
हॉटेलचे नंबर मिळाले तर बरे होईल.
7 Jul 2015 - 4:22 pm | अकिलिज
मला नुसता प्रवासच दिसतोय. जरा मुक्काम केलेल्या ठीकाणी रहा. निसर्गाची मजा लुटा. भविष्यात अशी सहल पुन्हा होणे नाही.
कापूर घेऊन जा. उंचीवर कमी ऑक्सीजन मूळे नक्की काय त्रास होतो ते कळत नाही. कापराची एक वडी जरी हेल्मेटमध्ये ठेवली तरी लगेच त्रास कमी होतो.
शक्यतो सकाळी लवकर निघा, उशीराच्या आत मुक्कमी पोचा. संध्याकाळी बर्फ वितळून नद्या रस्त्यावरुन वाहू लागतात. त्या डेन्जरस असतात. पाणी गार आणि ओढ भरपूर.
लेहच्या परिसरात ( खार्डूग्ला पास वगैरे) फिरायला तिकडच्या सरकारी कार्यालयातून अनुमती घ्यायला लागते. त्याला अर्धा/एक दिवस जातो.
31 Jul 2015 - 1:39 pm | बाबा योगिराज
ज्जे बात. भेष्ट ओफ लक वो तुमाले.
फिरुन आल्यावर लय पोटात दुखनार हाये बगा तुमच्या.......
4 Aug 2015 - 11:20 am | सतिश पाटील
आमी तुमाले इचारले होते पण तुमी काही प्रतिसाद नै दिला,
आमी ऐकले कि तुमी बुलेट इक्ताय म्हणून..
4 Aug 2015 - 12:27 pm | बाबा योगिराज
आ रा रा रा,
मायला, आमच्या बुलेठ कड वाकड्या नजरेन पाउ नगासा.