फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातली गोष्ट आहे. मी १४ फेब्रुवारी ला इंग्लंड ला येणार होतो. त्यामुळे आवश्यक असलेली खरेदी करण्यासाठी मी आणी पत्नी कॅम्प मधल्या महात्मा गांधी रोड वर फिरत होतो. बायको जरा पुढे गेली एक दुकान उघडे आहे का ते पाहायला आणी मी फुटपाथ वर उभा होतो.. अचानक एक लहान मुलगा १२-१३ वय असेल समोर आला. हातात फक्त एक प्लास्टिक ची पिशवी.
'दादा बूट पोलिश करून देऊ का? '
नको. मी करतो घरीच नेहमी. (म्हणजे ६ महिन्यातून एकदा)
'एकदा करा ना. अगदी चमकवून टाकतो बूट.'
मग बूट पोलिश करता करता सांगू लागला. 'हडपसर ला झोपडपट्टीत राहतो. रोज इकडे येतो बूट पोलिश करायला. सकाळी नी संध्याकाळी थोडा थोडा वेळ काम करून शाळेत जातो. माझ्याकडे बूट पोलिशचा खोका नाही. त्यामुळे असे पिशवीत सामान घेऊन फिरावे लागते गिर्हाईक शोधत. आणि त्यामुळे लोक माझ्याकडे येत नाहीत. खोका असला की मी पुणे स्टेशनला बसेन आणि मला जास्त गिर्हाईक मिळतील. घरात फक्त आई आणी लहान भावंडे आहेत. थोडे जास्त पैसे मिळाले तर सर्वाना पोटभर धान्य आणता येईल. मी गेले सहा महिने पैसे साठवायचा प्रयत्न करतोय पण फक्त २०० साठ्लेत. अजून ५०० हवेत. मला कराल का मदत?'
तेवढ्यात बायको परत आली. तिला त्या मुलाचा प्रोब्लेम सांगितला. नेहमी प्रमाणे प्रश्न पडला 'हा खरे बोलतोय कशावरून'?
'खोका कुठे मिळतो ?' अस्मादिक
'फातिमा नगर ला' . ७०० ला आहे. मी बघून ठेवलाय दुकानात.
'आम्ही पण हडपसर ला राहतो. चल आमच्याबरोबर गाडीतून. तुझ्या घरी जाऊ. तुझे साठलेले २०० घे. मी ५०० देतो. आपण दुकानात जाऊ आणी खोका घेऊ किंवा मी तुला माझा पत्ता देतो. तू उद्या ये माझ्या घरी. आपण जाऊन खोका घेऊन येऊ. '
तसेही केलेत तरी चालेल, तो बोलला.
प्रत्यक्षात मी फक्त बघत होतो तो ह्या गोष्टीला तयार होतोय का नाही.
ज्या अर्थी तो ह्याला तयार झाला त्या अर्थी त्याला खरोखर गरज होती आणी तो प्रामाणिक होता असा मी एक अंदाज बांधला. पाकिटातून ७०० रुपये काढून त्याला दिले आणी म्हटले ठेव तुझ्याजवळ. घे तुझा खोका.'
हा अनुभव सांगायचे कारण मला फक्त विचारायचे आहे मी असा विश्वास दाखवून योग्य केले का? तुम्ही अशा परीस्थितीत काय केले असते?
प्रतिक्रिया
5 Jul 2015 - 12:40 am | एस
तेच केले असते. अभिनंदन एक चांगले काम केल्याबद्दल.
5 Jul 2015 - 12:45 am | dadadarekar
..
5 Jul 2015 - 1:24 am | डॉ सुहास म्हात्रे
अश्या वेळी आपल्या अंतप्रेरणेवर (इन्स्टिंक्ट्स) भरवसा ठेवावा आणि आपल्या खिश्याला परवडेल तेवढी मदत करावी... आणि मग सर्वात महत्वाचे... विसरून जावे.
चांगल्या हेतूने मदत केली ना ? मग त्याबाबतीत मनाला रुखरुख कशाला लावून घ्यायची ?
5 Jul 2015 - 1:41 am | अभिजीत अवलिया
एकदा असेच एक जोडपे आणी लहान मुल कोथरूड डेपो जवळ भेटले होते. 'दादा जर ऐका ना आमचे. आम्हाला मुकादमाने इकडे बोलावले होते काम देतो म्हणून सांगून. आता फोन उचलत नाही. आम्हाला गावी परत जायला पण पैसा नाही. २ दिवस काही खाल्लेले नाही. मदत करा'. मी त्यांना अंदाजे गावी जायला किती पैसे लागतील विचारले. त्यानी सांगितले ३००-३५०. मी त्याना ५०० दिले आणी सांगितले अगोदर जेवा आणी उरलेल्या पैशातून गावी जा. नंतर काही दिवसांनी ते जोडपे मला परत तिथेच दिसले होते.
5 Jul 2015 - 10:10 am | सतिश गावडे
अशी मुलवाली जोडपी पुण्यात सर्रास दिसतात. तीच ती टिपिकल गोष्ट सांगतात. मी ही एकदा मदत केली होती मात्र हे सर्वत्र दिसू लागल्यावर त्यातील कांगावा लक्षात आला.
अर्थात यामुळे एखाद्या खर्या गरजूला मदत मिळणार नाही.
5 Jul 2015 - 2:45 pm | माहितगार
हे प्रकार बर्यापैकी प्रोफेशनली होतात, मी अहमदाबाद मध्ये एकदा असाच अनुभव घेतला एक मराठी कुटूंब हातात लहान छोकरी बॅग वगैरे उस्मानाबाद जिल्यातून कामासाठी आलो पण मुकादम वालेच काहीसे कारण व गावी परत जावयाचे असे सांगीतले, मी मराठी कुटूंब परगावी अडकले म्हणून मनमोकळे पणाने आर्थीक मदत केली पण नंतर केव्हा न केव्हा अहमदाबादच्या कोणत्या न कोणत्या कोपर्यात कुणाला न कुणाला मदत मागताना ते कुटूंब दिसत राहायचे. कुटूंब प्रमुख बहुधा माझा चेहरा विसरला असावा पण त्याची पत्नी मी दिसलो की चेहरा लपवत असे. मी मदत केल्या नंतर सहसा विसरून जातो पण अनफॉर्च्युनेटली ते कुटूंब अहमदाबाद मध्ये कुठे ना कुठे दिसत राहीले विसरावयाचे ठरवूनही झालेली फसवणूक विसरता नाही आली.
5 Jul 2015 - 3:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुन्हा तेच म्हणेन... अनुभवातून शहाणपण घेण्यासाठी तो खर्च झाला असे म्हणा. त्या व्यक्तीला परत मदत करू नका. फारतर समोर जाऊन जाब विचारा, पोलिसांना सांगतो म्हणा... पण मनाला रुखरुख लावून घेऊ नका ! आणि भविष्यात दुसर्या कुठल्या व्यक्तीला मदत करायची वेळ आली तर त्या वेळची परिस्थिती बघून निर्णय घ्या... मागच्या आठवणींच्या बॅगेजच्या रुखरुखीवर अवलंबून नाही. कारण त्यावेळचा माणुस आणि परिस्थिती दोन्हीही वेगळी असेल. त्या वेळीही एकदा मदत केल्यानंतर मनाला रुखरुख लावून घेऊ नका, हे फार महत्वाचे.
कोणीतरी म्हटले आहेच की, "मदद कर और कुवेमे डाल ।"
तुमच्या परिस्थितीत मनाला लागलेली रुखरुख ही पैश्याच्या अपव्ययापेक्षा जास्त स्वतःच्या मीपणाला (इगो) झालेल्या दुखापती मुळे असते (पक्षी : त्याने मला फसवले म्हणजे काय, आँ ?) ! अहो इथे भले भले हुशार उद्योगपती आणि अर्थतज्ञ लाखोच्या व्यवहारात फसतात, तर ५००-१००० ला आपण फसलो तर ते किती मनाला लावून घ्यायचे ? तुमच्या मोठेपणाची आणि मनःस्वास्थ्याची ५००-१००० इतकीच किंमत आहे का ? तसे असेल तर ५००-१००० (किंवा इतर कोणती) रक्कम दुसर्याला देणे थांबवून आपले मनःस्वास्थ्य राखा, ते जास्त परवडेल.
7 Jul 2015 - 8:00 pm | कानडाऊ योगेशु
पैसे गेल्याचे दु:ख नसते पण फसवले गेल्याचा राग येतो.
मुंबईत एकदा फसवला गेलो होतो असाच.
इकडे बेंगलोरमध्येही असा प्रकार माझ्याबाबतीत होत होता. पैसे मागणारा इसम मराठीच होता त्याला म्हटले पैसे देत नाही जेवायला देतो. मलाही जेवायचे होतेच. महाराष्ट्र मंडळाच्या हॉटेलात गेलो व त्याच्यासाठी एक प्लेट व माझ्यासाठी एक प्लेट मागवली.
दुसर्या प्रसंगात जरी तो इसम गरजु नसला तरी पैसे गेल्याच्या तणतणीतुन सुटका झाली.
5 Jul 2015 - 1:57 am | यशोधरा
तुम्ही चांगले काम केलेत पण खरेच घेऊन जायचे होते त्याला दुकानात.
आणि आता देऊन टाकले ना पैसे, तुम्ही चांगल्या उद्देशाने केलेत, आता त्यावर विचार करु नका. :)
5 Jul 2015 - 4:21 am | जुइ
यावर आता अधिक विचार करू नका.
5 Jul 2015 - 3:41 am | गवि
..योग्य काम..
5 Jul 2015 - 7:51 am | फारएन्ड
"तुमने तेंवर देखे इस लडके के? ये ज्यादा दिन जूते पॉलिश नहीं करेगा, लंबी रेस का घोडा है" :)
https://www.youtube.com/watch?v=jgqK2qPKVYE
5 Jul 2015 - 9:03 am | खटासि खट
चांगले केलेत. मला पण एक दोन फसवणुकीचे अनुभव आले होते. पण त्याचं भांडवल करू नये असा साक्षात्कार लिंबाच्या झाडाखाली झाला. कधी कुठल्या क्षणी खरा गरजवंत समोर उभा असेल हे कसं ठरवणार ? अर्थात मदत करायची इच्छा असल्यास.... नसेल तर बहाणे लाखो आहेतच
5 Jul 2015 - 9:47 am | विवेकपटाईत
एखाद वाईट अनुभव आला तरी चांगले काम करणे सोडणे योग्य नाही. ज्या अर्थी मुलगा बूट पोलिश करतो, तो पैश्यांचा दुरुपयोग करणार नाही.
5 Jul 2015 - 2:48 pm | माहितगार
कष्ट करणार्यांवर विश्वास ठेऊन साहाय्य करणे चांगले असेच वाटते.
5 Jul 2015 - 10:18 am | टवाळ कार्टा
योग्य केले....नेकी ़ कर और दर्या मे डाल
5 Jul 2015 - 11:00 am | वडाप
खोका परवडण्याचा प्रश्न नाहियै .जुन्या फळकुटांपासनं कुणीपण बनवतंय.तिकडं बसायच्ये रोज पैशे द्यावे लागतात दादा/मामांनला.
5 Jul 2015 - 11:14 am | ऋतुराज चित्रे
एखाद्याने मागितलेल्या मदतीबद्दल शंका असल्यास आपल्याकडे वेळ व इच्छा असेल तर तुमच्या मनात आलेला पहिला विचार योग्य होता. परंतू तुम्हाला त्याच्या प्रामाणिकतेची खात्री वाटल्यामुळे तुम्ही पैसे देण्याचा मार्गं स्विकारला. त्यामुळे ट.का. म्हणतो त्याप्रमाणे ..नेकी ़ कर और दर्या मे डाल.
5 Jul 2015 - 2:32 pm | कंजूस
तिकीटाला परत जायला पैसे नाहीत सांगणारी ( मराठी ) जोडपी कन्याकुमारीस कायम वास्तव्याला आहेत.आपले बोलणे ऐकून मराठीतच बोलतात.देवदर्शनाला निघालो आणि पैसे संपले/चोरीला गेलो वगैरे.
5 Jul 2015 - 4:11 pm | अजया
असेच एक कुटुंब खारघर आयनाॅक्सच्या बाहेर कायम असते.मला दोन तीनदा हटकलंय!एकदा मात्र मी कार दुसरीकडे लावुन तिथे चालत जात होते तेव्हा मात्र दुर्लक्ष केले!कारवाले लोक त्यांचे लक्ष्य असतात बहुतेक!
5 Jul 2015 - 6:12 pm | सभ्य माणुस
चांगल्या भावनेने मदत केली तर विचार करु नका. station वर किंवा bus stand वर नेहमी मी मदत करतो(कुवतीप्रमाने). मला माझे मित्र बोलतात की तुला "उल्लू" बनवल जाते. पण 10 पैकी 5 रुपये तरी खर्या गरजवंताला जातात असे मला तरी वाटते.
6 Jul 2015 - 2:18 pm | ब़जरबट्टू
माझे विचार थोडे वेगळे आहेत. चुकीचे वाटू शकतात, वाईट वाटून घेऊ नका.
मी घटना घडली तेव्हाची परीस्थिती लक्षात घेतोय, माझ्यामते मी तरी पैसे दिलेच असते, शंका असती तरी, याला
मी १४ फेब्रुवारी ला इंग्लंड ला येणार होतो.
हे कारण आहे. एक विदेशवारीचे थ्रिल असते, एक Onsite चा आनंद असतो, मनात Pound Vs Rs. चे हिशोब असतात.. त्यात जर पहिल्यांदा Onsite असेल तर सांगायलाच नको. डेली मिळणा-या अलाउंसपुढे ७००-१००० द्यायला खुप मन तुटत नाही. सहसा मन आनंदी असते, त्यामुळे अश्यावेळी मन उदार होतेच. विचार करा, नेहमीसारखा दिवस असता तर तुम्ही त्या मुलाला शु तरी पोलिश करू दिले असते का ?मी करतो घरीच नेहमी
त्याच्याशी संवाद तर दुरच राहिला. मुळात खरेदी करतांना कधीतरी शु पालिश केल्याचे आठवते का ? एखाद्या इन्टरव्यूला केले असेल कदाचित...मी कबूल केलेलेच आहे, माझे विचार चक्रम वाटू शकतात, मी फक्त स्वःताला तुमच्या जागी ठेऊन अंदाज बांधलेत. अर्थात मुळात तुमच्या स्वभावातच तो द्याभाव असावा लागतो.. फक्त मन प्रसन्न असते, तेव्हा आपण कर्ण बनतो..
आणि महत्वाचे म्हणजे "नेकी करो, दर्या मे डालो...
6 Jul 2015 - 2:58 pm | खटपट्या
घड्याळ विकणार्या बायकाही अशाच सगळीकडे फीरत असतात. "घरी जायला पैसे नाहीत, माझ्याकडचे घड्याळ विकत घेता का?" असे विचारत असतात.
6 Jul 2015 - 3:13 pm | मृत्युन्जय
तुम्ही केलेत ते योग्य केलेत असे वाटते.
7 Jul 2015 - 6:38 pm | जगप्रवासी
छान केलंत