विम्बल्डन २०१३

सोत्रि's picture
सोत्रि in काथ्याकूट
24 Jun 2013 - 10:48 pm
गाभा: 


तुतारी वाजली आहे, रणशिंग फुंकले गेले आहे, आजपासून विम्बल्डन २०१३ सुरु झाले आहे. मला ह्या, साहेबाच्या देशातल्या हिरव्यागार हिरवळीच्या मैदानावर होणार्‍या टेनिसचे अपार कौतुक आहे. टेनीसमधल्या अमेरिकन, फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन ओपन ह्या इतर स्पर्धाचे आकर्षण जरी असले तरीही ह्या विम्बल्डनची मजा काही औरच असते. साहेबाचा 'जेंटलमंस गेम' असे बिरुद मिरवणारा क्रिकेट हा खेळ जेंटल,शिस्तबद्ध आणि पारंपारिक राहिला नसला तरीही टेनीस हा खेळ विम्बल्डनवर अजूनही आपली परंपरा जपून आहे, पारंपारिक पोषाखामध्ये स्टार खेळाडूंनी काही झगमगते 'स्टारडम' आणण्याचा प्रयत्न केला असला तरीही. त्यामुळेच अजुनही विम्बल्डनची जादू मनावर अजूनही भुरळ घालतेच आहे.

महिलांच्या एकेरी स्पर्धेत शारापोवाने अपेक्षित विजय मिळवून स्पर्धेतील रंगत वाढवली आहे.
आता नुकताच राफेल नदाल आणि स्टीव्ह डोर्सिस ह्यांच्यातला सामना संपला. स्टीव्ह डोर्सिसने सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवून एका खळबळजनक विजयाची नोंद विम्बल्डन २०१३ मध्ये केली आहे.

तुम्हीही ह्यापुढे जमतील त्या मॅचेस बघून ह्या स्पर्धेचा आढावा घ्यायचा प्रयत्न करा. त्या त्या मॅचेसवर आणि आपापल्या आवडत्या खेळाडूंवर चर्चा करुयात.

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Jun 2013 - 11:28 pm | पैसा

धाग्यासाठी धन्यवाद आणि नादाल हरल्याबद्दल शोक व्यक्त करते. अपडेट आणि दंगा सुरू ठेवूच!

अनुप ढेरे's picture

24 Jun 2013 - 11:33 pm | अनुप ढेरे

नदाल हरल्याबद्दल प्रचंड आनंद झालेला आहे.
एकच वादा... रॉजर दादा !!!

सोत्रि's picture

24 Jun 2013 - 11:37 pm | सोत्रि

एकच वादा... रॉजर दादा !!!

+१

-(विम्बल्डनप्रेमी) सोकाजी

कपिलमुनी's picture

27 Jun 2013 - 2:28 pm | कपिलमुनी

जिनके खुद के घर शीशे के होते है !!
वो दुसरों पे पत्थर नही फेका करते ..
roFL

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2013 - 11:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नदाल हरल्याने काय आनंद झाला सांगु...... कुठे गेले नदालचे चाहते कोणास ठाऊक ?

बाकी, सोत्रीशेठ धागा काढल्याबद्दल खूप खूप आभार.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

25 Jun 2013 - 8:39 am | कपिलमुनी

राफा हरल्याने आनंद ? कोणीतरी जिंकले असते तर आनंद ठीक आहे ..पण हरल्याबद्दल आनंद ?
या वर्षी राफा ग्रास कोर्ट वर फार खेळला नव्ह्ता..आणि पूर्ण फिट नाहिये..

पिंपातला उंदीर's picture

25 Jun 2013 - 8:47 am | पिंपातला उंदीर

ते कळण्यासाठी तुम्हाला फेडेरर-राफा खुन्नस माहीत पायजेल. कुठलाही आडपडदा न बाळगता मी असे जाहीर करतो की राफा हारल्याने मला अत्याधिक आनंद झाला आहे. एकच वादा रोजर दादा आहेच.

कपिलमुनी's picture

25 Jun 2013 - 8:12 pm | कपिलमुनी

सरळ सरळ सांगा की राफा पुढे आला असता तर फेडररची फेफे उडाली असती..
सुंठेवाचून खोकला गेला म्हणून खुश..कारण मॅच झाली असती तर रॉजरदादाचा वय आणि दम बघता लैच वाईट अवस्था झाली असती ..

पिंपातला उंदीर's picture

25 Jun 2013 - 8:21 pm | पिंपातला उंदीर

त्यासाठी पुढ याव लागत हो. जेनवा राफा पहिला राउंड क्रॉस करेल तेन्वा या चर्चा करायला. राफा ला बहुतेक पात्रता फेरी खेळावी लागेल पुढच्या वर्षी हे हे आणि रोजर दादा या वयात पण पहिल्या राउंड ला आउट होत नाहीत

सोत्रि's picture

25 Jun 2013 - 9:33 pm | सोत्रि

रोजर दादा या वयात पण पहिल्या राउंड ला आउट होत नाहीत

टाळ्या टाळ्या टाळ्या

-(खुन्नस असलेला) सोकाजी

कपिलमुनी's picture

27 Jun 2013 - 3:18 pm | कपिलमुनी

दुसर्‍या राउंडात पडलेच ना बाहेर ..
म्हातारा घोडा पळून पळून पळणार किती ?

राफा फ्रेंच ओपन मधे तरी इतका ढासळत नाही

कपिलमुनी's picture

25 Jun 2013 - 8:15 pm | कपिलमुनी

फेडेरर-राफा खुन्नस माहीत पायजेल.

खुन्नस मॅच होउन जिंकण्यासाठी लढण्यात असते .. दुसरा हारला म्हणून आनंद मानण्यात नसते ..
असो रॉजर च्या फॅन ना काय माहीत खुन्नस काय असते ते !!

येडगावकर's picture

25 Jun 2013 - 9:51 am | येडगावकर

राफा हरल्यामुळे एक बर झालं, आता ती ट्रॉफी, टॉफी सारखी खातानाची पोझ दिलेला फोटो येणार नाही ह्यावर्षी! एकदम फालतु फोटो असतो तो! (हे.आ.मा.म.) आणि प्रत्येक स्पर्धा जिंकल्यावर तो आपली तीच पोझ देतो!

उदय के'सागर's picture

25 Jun 2013 - 10:46 am | उदय के'सागर

मी एक भारतीय असूनही मला 'क्रिकेट पेक्षा टेनिसच जास्त आवडते' असे म्हणण्याचे धाडस येथे करतो (अर्थात कुठल्याही खेळाची तुलना करणे अयोग्यच, पण माझं आपलं हे मत). नुकतीच फ्रेंच ओपन संपून त्याची नशा उतरत नाही तर 'विम्बल्डन' सुरु झाले... व्वा... मज्जा येणार... :)

नदाल हरल्याने एक वाईट वाटले की आता तसे 'अटीतटीचे', 'खिळवून' ठेवणारे सामने पहायला मिळणार नाही. पण मग लक्षात आलं की आता 'नोवॅक', ' मरे' हे लोक ही काही कमी झुंज देत नाहीत... त्यांचे सामनेही खेळाचा आनंद देणारे असतात.... :) 'अ‍ॅन्डी मरे' जिंकावा ह्यावेळी ह्या सदिच्छा...

खबो जाप's picture

25 Jun 2013 - 10:51 am | खबो जाप

आपण बाबा फक्त शारापोवा ची म्याच बघतो, खेळताना आणि मोडेलिंग करताना सुद्धा

महिला एकेरीतला नुकताच संपलेला एक सामना लॉरा रॉब्सन विरुद्ध मारिया किरिलेन्को.
हा सामना लॉरा रॉब्सनने सरळ २ सेट मध्ये ६-३ आणी ६-४ असा जिंकला. मॅचमध्ये थरार किंचीत होता कारण लॉरा रॉब्सनचा पूर्ण कंट्रोल मॅचभर होता. महिला टेनीसमध्येही एस(बिनतोड सर्व्हिस)चा सढळ वापर जरा चकित करुन गेला.

लॉरा रॉब्सन
मारिया किरिलेन्को

Laura
maria

प्यारे१'s picture

26 Jun 2013 - 12:45 am | प्यारे१

ह्या टेनिस पण खेळतात????

पण मी मॅच बघीतली असल्याने त्या दोघी खेळतात यावर विश्वास बसला. ;)

वेल्लाभट's picture

25 Jun 2013 - 10:08 pm | वेल्लाभट

....अ‍ॅण्ड राफा डिड्न्ट फायर....
:(

पुरुष एकेरीतला चालू असलेला एक सामना रिचर्ड गॅस्केट विरुद्ध मार्शल ग्रॅनोलर्स.
गॅस्केट याने पहिला सेट 6-7 सात असा गमावला असला तरीही पुढ्चे दोन सेट 6-4 आणि 7-5 असे जिंकून सामन्यावर पकड मजबूत केली आहे. आत्तच त्याने तिसरा सेट 6-4 असा जिंकून सामना खिशात टाकला आहे.

रिचर्ड गॅस्केट
मार्शल ग्रॅनोलर्स


प्राथमिक फेरीतले सामने बघण्यातली मजा खेळाबरोबरच देशविदेशातल्या खेळाडूंची वेगवेगळी नावे ऐकणे आणि वाचण्यातही खुप आहे. मला तर त्यात खुपच मज्जा येते :)

पैसा's picture

25 Jun 2013 - 11:22 pm | पैसा

सोत्रि अण्णा, फोटो टाकून मजा आणताय! नावांबद्दल सहमत. कधी कधी असे कोपर्‍यातले खेळाडू भयंकर चुरशीने लढतात. त्यात हा गॅस्केट पाहून कूकरची गास्केट आठवली!

सोत्रि's picture

25 Jun 2013 - 11:57 pm | सोत्रि

त्यात हा गॅस्केट पाहून कूकरची गास्केट आठवली!

ज्योताय, अगदी अगदी!!! नेमके हेच मनात आले होते. पण फोटो टाकण्याच्या नादात राहून गेले. बरे झाले तु त्याची आठवण करून दिलीस ते :D

-(नावातल्या गमती जमती आवडणारा) सोकाजी

अप्रतिम's picture

25 Jun 2013 - 11:27 pm | अप्रतिम

विम्बल्डन म्याचेस ऑनलाईन पहायला कुठे मिळतील???

महिला एकेरीतला अजुन एक नुकताच संपलेला सामना नादिया पेत्रोव्हा विरुद्ध क्रिस्तीना प्लिस्कोव्हा.
ह्या सामन्यात नाजूक चणीच्या क्रिस्तीना प्लिस्कोव्हाचा मल्लसदृश्य थोराड देहयष्टीच्या नादिया पेत्रोव्हापुढे काय निभाव लागणार असे वाटत असतानाच तिने पहिल्या सेट मध्ये ६-३ असा विजय मिळावून आघाडी घेतली. दोन सेटमध्ये सामना निकाली निघणार का ही उत्सुकता वाटेपर्यंत सामन्यावर ताबा मिळवून दुसरा सेट ६-२ असा जिंकून सामना खिशात घातला आणि डेव्हिड आणि गोलीयेथ ह्या गोष्टीची आठवण झाली ;)

नादिया पेत्रोव्हा
क्रिस्तीना प्लिस्कोव्हा


अभ्या..'s picture

26 Jun 2013 - 1:28 am | अभ्या..

काय अन्ना एकदम कोर्टाभायेरचे रंगीत्संगीत फोटो टाकायलाव?
ईसपीएन हाय का फ्याशन टीव्ही? आँ
पण हायेत ते लैच विंट्रेस्टींग हायेत बर्का. ;)

पुरुष एकेरीतला एक चालू असलेला सामना ज्युलियन बेन्नेटु विरुद्ध फरनॅन्डो व्हरडॅस्को.
हा सामना फरनॅन्डो व्हरडॅस्कोने पहिले दोन सेट 7-6, 7-6 असे जिंकून जवळजवळ खिशात टाकला आहे. बेन्नेटुचा गेम एवढा टुकार आहे की ह्या सामन्यात काही मजा नाही. खेळताना चुका कशा करु नयेत ह्यासाठी बेन्नेटुचा गेम आदर्श ठरावा.

तिसर्‍या सेटच्या पाचव्या गेममध्ये फरनॅन्डो व्हरडॅस्कोने मध्ये ब्रेक मिळवला पण लगेच पुढचा गेम ज्युलियन बेन्नेटु जिंकून ब्रेक मिळवला आणि अचानकच ज्युलियन बेन्नेटु सामन्यात परत येतोय की असे वाटेपर्यंत त्याने पुढचा गेम एकदम बावळटपणे गमावला. हा सामना अगदीच पकाऊ झाला आहे, काहीच थरार नाही. हा सामना फरनॅन्डो व्हरडॅस्को जिंकल्यात जमा आहे.

ज्युलियन बेन्नेटु
फरनॅन्डो व्हरडॅस्को


सामान्य वाचक's picture

26 Jun 2013 - 11:04 pm | सामान्य वाचक

रॉजर दादा लई पळापळी करुन राहीले कोर्टावर.
त्यो सर्जेइ दमवतो आहे दादा ना.

सामान्य वाचक's picture

26 Jun 2013 - 11:04 pm | सामान्य वाचक

रॉजर दादा लई पळापळी करुन राहीले कोर्टावर.
त्यो सर्जेइ दमवतो आहे दादा ना.

सामान्य वाचक's picture

26 Jun 2013 - 11:17 pm | सामान्य वाचक

१ - १ सेट झाला

अनुप ढेरे's picture

26 Jun 2013 - 11:30 pm | अनुप ढेरे

आजचा दिवस फार विचित्र आहे. आजच्या दिवसात (आत्तापर्यंत) ७ लोकं दुखापतीमूळे बाहेर गेली आहेत. आणि शिरापोहा पण हारली आहे. (तिला पण बहुदा दुखापत झाली होती थोडी !)

उन्मेष दिक्षीत's picture

27 Jun 2013 - 1:10 am | उन्मेष दिक्षीत

रॉजर दादा हरले ..!

कंजूस's picture

27 Jun 2013 - 5:14 am | कंजूस

बाहेर पाऊस कोसळत असतो विँबल्डनच्यावेळी .सामन्यांच्या वेळाही छान असतात .पुरुषांचे एकेरी सामने टिव्हिसमोर पाय टाकून चारचार तास घरातल्या उबदार कोचावर बसून पाहतांना दोनतीनदा न सांगता चहापण मिळतो .:-)महिलांचे सामने मात्र दीड तासात संपतात त्याचवेळी छत्रीचा तुटलेला दांडा ,गळणारा नळ ,मुलांच्या पुस्तकाला कवर घालणे ही कामे न चुकता पुढे कशी येतात ?:-(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2013 - 7:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रीशेठ, आज कोणते सामने होणार आहेत कोणता प्रमुख खेळाडू खेळणार आहे, कोणता सामना कसा रंगतदार होईल अशी माहिती दिली तर आम्ही वाचक सामनेही पाहू आणि तुमच्या धाग्यात प्रतिसादाचीही भर घालू.

बाकी, शारोपाव इतक्या लवकर कोर्ट सोडेल असं वाटलं नव्हतं. काल घसरुन पडलेल्या खेळाडुंचेच फोटो आज जास्त दिसताहेत.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

27 Jun 2013 - 8:17 am | मदनबाण

माझा आवडता खेळ ! एकेकाळी मार्टिना नवरातिलोव्हा, मोनिका सेलेस, बोरिस बेकर आणि माझी आवडती स्टेफी ग्राफ यांचे सामने पाहण्यात दिवस गेले...
सध्या मी कांदापोव्हाचा पंखा आहे ! ;) काय दिसते बाँ... एकदम चिकनी सुपारी बघा ! ;)
हल्लीच तिचा शुगरपोव्हा हा ब्रांड बाजारात आला आहे... ;)
Sharavpova

(पोव्हा प्रेमी);)

शारापोव्हा

सुधीर's picture

27 Jun 2013 - 9:11 am | सुधीर

नव्या तार्‍याच्या उगमाची वेळ झाली काय?

पिंपातला उंदीर's picture

27 Jun 2013 - 6:10 pm | पिंपातला उंदीर

नक्कीच. पीट सँप्रास असाच उतरणीला लागला होता आणि रोजर चा उदय झाला होता. कपिल मुनी यांच्या मताशी पण सहमत. राफा-रोजर युगाचा अस्त जवळ आहे. तेंडुलकर आणि रोजर मध्ये मला अनेक साम्य आढळतात. विक्रमांची रास, प्रचंड लोकप्रियता, ऑफ फील्ड असणारा प्रचंड सभ्यपणा आणि नम्रता. आणि आता करियर च्या संध्या च्छाया पण. दोघांी रसिकाणा अनेक चांगले क्षण दिले ते लक्षात ठेवल्या जातील. सूर्यास्त कुणालाच टळला नाही

तेंडुलकर आणि रोजर मध्ये मला अनेक साम्य आढळतात. विक्रमांची रास, प्रचंड लोकप्रियता, ऑफ फील्ड असणारा प्रचंड सभ्यपणा आणि नम्रता. आणि आता करियर च्या संध्या च्छाया पण. दोघांी रसिकाणा अनेक चांगले क्षण दिले ते लक्षात ठेवल्या जातील. सूर्यास्त कुणालाच टळला नाही

सुंदर आणि वास्तवदर्शी प्रतिसाद. सहमत.
तो नवा तारा कोण असेल बरं...
ब्रिटिश लोक ७-८ वर्षापुर्वी विम्बल्ड्न आले की हेन्मन, हेन्मन ओरडायचे आता मरे मरे ओरडतात.
फेडरर आणि राफा सोडुन जोकोविच, त्सोंगा, मरे, फेरर चांगले वाटतात सध्या.

ब़जरबट्टू's picture

27 Jun 2013 - 9:14 am | ब़जरबट्टू

आम्हालाबी "शिरापोहा" च आवडते... :)

सौंदाळा's picture

27 Jun 2013 - 10:04 am | सौंदाळा

रॉजरदादा रजनीअण्णाला म्हणतात मला टेनिसबद्दल कोणताही प्रश्न विचार मी ताबडतोब उत्तर देऊ शकतो.
रजनीअण्णा: टेनिसच्या नेटला किती भोक असतात सांग पटकन..
रॉजरदादा गार आणि रजनीअण्णाला साष्टांग दंडवत. :)
असो.
लेखात सोत्रिंच्या अप-टु-डेट प्रतिसादांमुळे मज्जा येत आहे.
लगे रहो सोत्रि.. आम्ही वाचतोय.

रॉजर ने आता निवृत्ती घ्यावी. ३१ व्या वर्षीच इतका ढेपाळलाय.
बाकी फेडेक्सला हरताना पाहणे हे दु:खदायक होतं. नदाल पाठोपाठ फेडरर ची एक्झिट.

आता फायनल जोकोविच- मरे अशी होणार की काय?

कपिलमुनी's picture

1 Jul 2013 - 4:45 pm | कपिलमुनी

रॉजर , फेडरर आणि शारापोव्हा बाहेर पडल्यावर धाग्याची धग थंड झाली

सुधीर's picture

2 Jul 2013 - 9:11 am | सुधीर

सेरेना पण बाहेर. या वर्षीची विम्बल्डन "दिग्गजांना बाहेर काढणारी" विम्बल्डन आहे वाटतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jul 2013 - 7:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता विम्बल्डन बघायचं कोणासाठी ? आता कोणत्या खेळाडुचा खेळ बघावा असे झाले आहे.

-दिलीप बिरुटे

सातत्याने चांगली कामगिरी करत पहिले मानांकन राखणारा जोकोविच आणि 'जायंट किलर' डेल पोट्रो यांच्यातला उपांत्य फेरीचा अटीतटीचा सामना अफलातून झाला. ही लढतच निर्णायक ठरेल असे वाटते आहे. त्या अर्थाने 'फायनल मॅच' कालच झाली असे म्हणायला हरकत नाही.

सामन्याची क्षणचित्रे:

जर्मनीच्या डस्टिन ब्राउनचा खेळ असाच बहरत राहिला, तर ग्रासकोर्टवर त्याचेच साम्राज्य येउ शकेल. त्याचा खेळ पाहताना ऐन बहरात असलेल्या बोरीस बेकरची आठवण होते. बेकरची आठवण करून देणारी ही एक थक्क करून टाकणारी व्हॉली -

सुधीर's picture

6 Jul 2013 - 9:17 am | सुधीर

हा खेळ खूप रंगतदार झाला अशी बातमी वाचली आज. जोकोविच नाव कोरणार बहुतेक या वेळेला.

मूकवाचक's picture

3 Jul 2015 - 11:02 am | मूकवाचक

डस्टिन ब्राउनच्या अफलातून आक्रमक खेळापुढे टिकाव न धरू शकल्याने नदाल विंबल्डनमधून दुसर्‍याच फेरीत बाहेर पडला आहे.

वेल्लाभट's picture

3 Jul 2015 - 11:12 am | वेल्लाभट

केबलवाल्याच्या अवकृपेमुळे विंबल्डन ला मुकतो आहे.
पण मॅच समरी वाचली. तूनळीवर मॅच बघणे मस्ट आहे.

रमेश आठवले's picture

2 Jul 2013 - 11:21 pm | रमेश आठवले

या वर्षी आत्तापर्यन्त ७ खेळाडू या ग्रास कोर्ट खेळता खेळता पाय घसरून पडले आणि त्यापैकी काहीना निवृत्त व्हावे लागले असे वाचनात आले. यामुळे या वर्षीच्या स्पर्धेस tumbledon स्पर्धा म्हणावी असे वाटते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जोकोविच आणि मरेत अंतिम सामना होतोय. वर उल्लेख झालाच आहे तेव्हा रंगतदार सामन्याची अपेक्षा करु या.
बाकी, मरेला माझी पसंती असली तरी जोकोविच जिंकावा वाटतोय. :)

-दिलीप बिरुटे

सुधीर's picture

7 Jul 2013 - 5:29 pm | सुधीर

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरे...
(छायाचित्र. विम्बलडनच्या अधिकृत संस्थळावरुन साभार)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 7:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामना सुरु झाला आणि जोकोवीचची सर्वीस असूनही मरेला ब्रेक पॉइंट मिळुन गुण घ्यायची संधी होती घालवली बेट्याने. १-०. मरेची सर्वीस आली तेव्हा बिनतोड खेळ करत त्याने गुण मिळवले.१-१

जोकोवीची सर्वीस. मरेनं जोकोवीचला दमवलं. मरे पुन्हा ब्रेक पॉइंटला पोहचलाय...ड्युस. अ‍ॅदव्हेन्टेज. ड्युस. मरेला अ‍ॅडव्हेन्टेज. ड्युस. पुन्हा मरेला अ‍ॅडव्हेन्टेज. श्या, ड्युस. व्वा भाई वा. काय पॉइंट घेतलाय..पुन्हा अ‍ॅडव्हेंटेज मरे.. आणि घेतला एकदाचा ब्रेक पॉइंट... वॉव. मरे २ :१

सामना संपल्यावर करुच चर्चा... मरेचा खेळ पाहता मरे वरचढ दिसतोय... अर्थात अजून खेळ खूप बाकी आहे तेव्हा माझ्या शुभेच्छा. मरेला. :)

- दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

7 Jul 2013 - 7:26 pm | प्रचेतस

मरेला ब्रेक मिळाला एकदाचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाब्बास मरे 5:3

स्वतःची सर्व्हिस वाचवत ५-३ ने आघाडीवर गेला मरे.
पहिला सेट घेतोय वाट्टं आता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरे पहिला सेट जिंकल्यानंतर दुसरया सेट मधे सर्व्हिस राखू शकला नाही, दुस-या सेट मधे मरे 1:4 असा पिछाडीवर पडला. चांगला खेळ तोय पण........पाहु आगे आगे कया होता है

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 8:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरे ने पिछाड़ी भरुन काढून दूसरा सेट 7 :5 जिंकला. मजा आली या सेटला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jul 2013 - 10:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ‍ॅ.मरे अखेर पुरुष एकेरीतील विजयी ठरला. सुरेख खेळला. तिसर्‍या रंगतदार आणि म्हटलंच तर एकतर्फी सामन्यात अ‍ॅ.मरेने बाजी मारली. ६:४ अशा फरकाने तिसरा सेट जिंकला. चार वेळेस मॅच पॉइंटला झुंजावं लागलं. जोकोवीच त्या तुलनेत लढलाच नाही, असे वाटले. मजा आली.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

7 Jul 2013 - 10:20 pm | प्रचेतस

उपांत्य सामन्यातल्या डेल पोट्रो विरुद्ध झालेल्या कडव्या लढतीमुळे जोकोविचची बरीच दमछाक झाल्याने त्याच्या खेळावर परिणाम झालेला असावा. यंदाच्या स्पर्धेतील तीच सर्वोत्तम लढत असावी.

मरेने त्याचा सर्वोत्तम खेळ फायनल साठी राखून ठेवलेला असावा
मरेचे अभिनंदन.

सोत्रि's picture

7 Jul 2013 - 10:44 pm | सोत्रि

मरेने त्याचा सर्वोत्तम खेळ फायनल साठी राखून ठेवलेला असावा
मरेचे अभिनंदन.

- (विम्ब्ल्डनप्रेमी) सोकाजी

संजय क्षीरसागर's picture

8 Jul 2013 - 12:25 am | संजय क्षीरसागर

एवढा एकच सामना बघितला पण फुल पैसे वसूल!

रुस्तम's picture

8 Jul 2013 - 1:38 am | रुस्तम

+१

रुस्तम's picture

8 Jul 2013 - 1:39 am | रुस्तम

+१

सुधीर's picture

8 Jul 2013 - 11:45 am | सुधीर

७७ वर्षांनी कुणीतरी ब्रिटीश माणूस जिंकला. आनंदी आनंद असेल इंग्लंडात.

काय पण खेळला मरे …. एकदम आक्रमक टेनिस …. जोकोविच कडे काही उत्तर नाहि.

पिलीयन रायडर's picture

10 Jul 2013 - 12:00 pm | पिलीयन रायडर

आजच हे वाचलं...

Murray is indeed the first Brit to win Wimbledon in 77 years unless you think women are people........
Four British women have won Wimbledon women's singles since Fred Perry (1936)...
Dorothy Round Little in 1937
Angela Mortimer in 1961
Ann Haydon-Jones in 1969
... Virginia Wade in 1977

http://www.guardian.co.uk/sport/shortcuts/2013/jul/08/virginia-wade-wimb...
आणि हे ही पहा कन्फर्म करायला...
http://en.wikipedia.org/wiki/List_of_Wimbledon_ladies%27_singles_champions

सुधीर's picture

10 Jul 2013 - 3:16 pm | सुधीर

चार ब्रिटीश महिला जिंकल्या आहेत हे ही आजच कळलं. (समालोचकाने हे सांगितलं होतं का ते आठवत नाही आणि वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्सने पण अशीच दखल घेतली होती) दुर्दैवाने असा भेदभाव अगोदरपासून आहे. मला आठवतय, मागे स्त्री आणि पुरुष विजेत्यांची बक्षिसाची रक्कम समान नसण्यावरून गाजावाजा झाला होता.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2013 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/tennis/tennis-smiley-emoticon.gif

हल्ली वेळ मिळेल तसे विम्बल्डन पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. स्टार स्पोर्ट्स { Star Sports HD 4 आणि दुसरा बहुतेक. नक्की नब्बर परत पहायला हवा ! } चॅनलवर पाहतो आहे.
Djokovic ची मॅच पहायला मजा आली, त्याचा उडी मारुन रिव्हर्स हॅड मारलेला शॉट फारच आवडला. :)
बाकी सुंदर लेडीज टेनिस प्लेअर्सच्या सामन्यांची अर्थातच वाट पाहतो आहे. ;)

अवांतर :- सध्या बीबीसीच्या न्यूज देणार्‍या रिपोर्टस पैकी एका अफगाणी सौदर्यांच्या प्रेमात पडलो आहे ! ;) तिचे नाव यालदा हकिम आहे. ;)
P1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة

टवाळ कार्टा's picture

3 Jul 2015 - 1:30 pm | टवाळ कार्टा

आयला...माशाल्ला :)