कधीतरी काहीतरी भाग 3

prasadoak7's picture
prasadoak7 in जनातलं, मनातलं
30 Jun 2015 - 11:42 pm

सायंकाळ झाली की दिवसभर सुनसान निस्तेज फुटपाथ ओसंडून वहायला लागतो. कामावरून जाताना रस्त्यातच भाजी खरेदी करूनच घरी जायच असा जणू अलिखित नियम आजकाल झाला आहे. हल्ली काही वर्षे आबाच रोजची भाजी आणत होते. खर तर हे माईंचे आवडते काम. पण काही वर्षांपूर्वी माई त्या आजारातून बर्‍या झाल्या तेव्हापासुन आबाच भाजी आणत. हळूहळू चालताना आबांना ते जुने दिवस आठवत होते. खरंतर माई पुर्णवेळ गृहीणी. घरची सर्व जबाबदारी आनंदाने त्या घेत होत्या. आबांची सकाळ छान गरमागरम चहाने झाली की त्याना कसे कृतकृत्य वाटे. सगळ आवरून कामाला निघताना आबांच्या हातात जेवणाचा डबा दिला की मग माईचा स्वतःचा दिवस सुरू होई. हाॅलची साफसफाई करताना नेहमी प्रमाणेच त्या भिंतीवर लावलेल्या लेकाच्या मोठ्या पोट्रेटसमोर क्षणभर का होईना आजही थबकतात. जवळपास पंधरा वर्षे झाली असतील. लाडका लेक परदेशात ऊच्च शिक्षणासाठी गेला आणी तिकडेच कायमसाठी स्थिरावला. त्याने हा निर्णय घेतला तेंव्हा माई किती अस्वस्थ झाल्या होत्या. पण आबानी हे सारे सहज स्विकारले. माईना जवळ बसवून कीती आश्वासक शब्दात त्यांनी तीची समजूत काढली होती. पण बुद्धीला पटत असणाऱ्या सगळ्याच गोष्टी मन थोडेच स्विकारते. मग आबांनी त्यांना एक पुस्तक आणून दिले होते. रोज एक एक पान वाचत जा असे सांगून त्यांनी डोक्यावरून मायेने फिरवलेला तो आबांचा हात किती धीर देऊन गेला. आजही नियमितपणे त्या रोज एक पान वाचत होत्या. त्या वाचनाने मनात घोंगावणारे ममतेचे वादळ कसे शांत शांत होत असे. मग हसत हसत त्या वेळाचे गणित स्वतःशीच मांडीत. इकडचे ११ म्हणजे त्याच्याकडचे रात्रीचे किती वाजले असतील ह्याचा हिशेब करून फोन लावत. आज थोडा वेळच बोलायचे असे मनात पक्के केले तरी दहा पंधरा मिनिटे जास्तच होत. हळूहळू सुनबाई पण हाय शाषूबाई म्हणायला शिकतेय. तिच मराठी आणि माईंच इंग्रजी संभाषण हयावरून आबा अनेकवेळा माईंची चेष्टा करायचे. पण कसेही असले तरी एक ना एक दिवस ती सगळी परत येतील ह्याबाबतीत माईचा आशावाद दुर्दम्य होता. आबा मात्र हसत हसत तिकडे दुर्लक्ष करत. नातवाची चाहूल लागल्याची बातमी कळल्यावर तर माईना आकाश ठेंगणे झाले होते. दोन महिने आधीच लेकाकडे त्याना जायचे होते. तसे तिकीट काढून पाठव म्हणुन लेकाला त्यानी ठणकावून सांगितले होते. सुनबाईसाठी अनेक सुचना त्यानी लेकाकडे केल्या होत्या. पण इकडे ह्यातल काही लागत नाही; हाॅस्पिटल सगळ्या गोष्टी जबाबदारीने करतात तेव्हा तू इकडे गडबडीत येण्याची गरज नाही असे जेव्हा लेकाने सांगितले तेव्हा माईंचा केवढा विरस झाला .

....क्रमशः

जीवनमान

प्रतिक्रिया

एस's picture

30 Jun 2015 - 11:53 pm | एस

वाचतोय.

परिच्छेद पाडून लिहिल्यास वाचकांना ते जास्त रुचेल असे सुचवतो.

शि बि आय's picture

2 Jul 2015 - 12:16 pm | शि बि आय

छान! लिहित राहा..