शेअर सर्टिफिकेट

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in काथ्याकूट
30 Jun 2015 - 3:23 pm
गाभा: 

माझ्या काकांचा साताऱ्याला एक फ्लॅट आहे . त्या फ्लॅटच शेअर सर्टिफिकेट हरवल आहे .
२००४ साली फ्लॅट घेतलाय तेव्हा सटिफिकेट घेतलय की नाही हे काहीच आठवत नाहिये
सोसायटीकडे चौकशी केली ते म्हणताहेत की सगळ्यांना त्याच वेळी शेअर सर्टिफिकेट दिली होती

आता नव शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काय कराव लागेल ?
आणि जर सर्टिफिकेट नसेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो ? जर ते सर्टिफिकेट दुसऱ्या कोणाच्या हाती लागले तर ती व्यक्ती त्याचा काही गैरफायदा घेऊ शकते का ?
कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

30 Jun 2015 - 4:48 pm | अन्या दातार

फ्लॅटला शेअर सर्टीफिकेट? बात कुछ हजम नही हुई.

कपिलमुनी's picture

30 Jun 2015 - 4:52 pm | कपिलमुनी

को- ऑपरेटीव्ह सोसायटी मध्ये / सहकारी गृहरचना संस्थेमध्ये प्रत्येक फ्लॅटला शेअर सर्टीफिकेट मिळते.
फ्लॅटची खरेदी विक्री करताना ते जवळ असणे बंधनकारक असते.

शेअर सर्टीफिकेट नसेल तर फ्लॅट मालकाने तसे अ‍ॅफेडेव्हिट करून सोसायटीच्या ऑफिसमध्ये द्यावे आणि डुप्लिकेट शेअर सर्टीफिकेट ची मागणी करावी.

अ‍ॅफेडेव्हिट केलय पण चेअरमन म्हणाले की पोलिसात FIR दाखल करावी लागेल सर्टिफिकेट हरवलंय म्हणून
पण सर्टिफिकेट कधी आणि कुठे हरवलय तेच माहित नाही मग FIR नोंदवताना कुठली तारीख टाकायची ?

किणकिनाट's picture

30 Jun 2015 - 10:45 pm | किणकिनाट

मनरंग,

माझ्या माहितीप्रमाणे हल्ली लायसन्स, आर.सी. बुक , एव्हढेच काय पासपोर्ट गहाळचा F.I.R. लागत नाही. आपल्या लोकल पोलिस स्टेशन मधे जा. त्यांचेकडे गहाळ नोंद वही असते. त्यामधे हरवलेल्या डॉक्युमेंटची ते नोंद करून घेतात आणि लगेच तसे सर्टिफिकेट देतात. शेअर सर्टिफिकेटचे म्हणाल तर घरामधेच कुठेतरी गहाळ झाले आहे किंवा सापडत नाही एव्हढेच पुरेल.

आपल्या सोसायटी कार्यालयात आपल्या शेअर सर्टिफिकेट चा नंबर तसेच त्याची झेरॉक्स मिळू शकते. तेव्हढी माहिती गहाळ नोंदीसठी पुरते.

सौंदाळा's picture

30 Jun 2015 - 5:12 pm | सौंदाळा

सोसायटीकडे आपल्या शेअर सर्टिफिकेटची एक प्रत असते. योग्य कागदपत्रांच्या पुर्तीनंतर सोसायटीच्या चेअरमनला नविन शेअर सर्टिफिकेट द्यावेच लागेल.
सर्टिफिकेट दुसऱ्या कोणाच्या हाती लागले तर ती व्यक्ती त्याचा काही गैरफायदा घेऊ शकत नाही. (शक्यता नगण्य)

द-बाहुबली's picture

30 Jun 2015 - 8:58 pm | द-बाहुबली

आता नव शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काय कराव लागेल ?

माहित नाही. विश्वसातला असेल तर(च) सोसायटीच्या चेअरमन सोबत बोलुन घ्या अन्यथा सरळ तज्ञ वकीलाचा सल्ला घ्या. शेअर सर्टीफिकेट हे सोसायटीच्या जमीनीमधील तुमच्या घराच्या मालकी हक्काचा अतिशय महत्वाचा पुरावा आहे.

आणि जर सर्टिफिकेट नसेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो ?

ज्याच्या नावावर सर्टीफिकेट आहे त्याचा अचानक मृत्यु झाला तर कटकटी नक्किच वाढु शकतात, नॉमीनीला कगदपत्रांची उसापर करायची वेळ येते.

जर ते सर्टिफिकेट दुसऱ्या कोणाच्या हाती लागले तर ती व्यक्ती त्याचा काही गैरफायदा घेऊ शकते का ?

माहित नाही.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

10 Jul 2015 - 9:58 pm | अरवीन्द नरहर जोशि.

चेअरमन खात्री करून घेवून त्याच्या अधिकारात नवीन स्र्टिफ़िकेट देवू शकतात . नंतर कार्यकारिणीत ठराव पास करून घेता येतो .

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

10 Jul 2015 - 9:58 pm | अरवीन्द नरहर जोशि.

चेअरमन खात्री करून घेवून त्याच्या अधिकारात नवीन स्र्टिफ़िकेट देवू शकतात . नंतर कार्यकारिणीत ठराव पास करून घेता येतो .

जयन्त बा शिम्पि's picture

25 Jul 2015 - 1:58 am | जयन्त बा शिम्पि

शेअर सर्टिफिकेट हरवले तर चेअरमनला विश्वासात घेण्याची गरज नाही. प्रथम १००/- रुपयाच्या स्टेम्प पेपरवर , वकिलाच्या मदतीने एक अ‍ॅफेडेवीट करा. त्यानंतर ते अ‍ॅफेडेवीट घेवुन पोलिस स्टेशनला जावे. पोलिसदादा " ओळखीचा " असला तर ठीकच, नाहीतर त्याला आपली ओळख हातात हात घालून ' दाखवायची ' ! ! ओळख पटली तर पुढचे काम सोपे होते.
पोलिस दादा ' एफ आय आर ' लिहुन , लगेच त्याची एक प्रत आपणास देतो. त्या प्रातीची व अ‍ॅफेडेवीट ची झेरोक्स जोडुन सोसायटीच्या सेक्रेटरीकडे एक अर्ज द्यायचा. सेक्रेटरीने तो अर्ज व सोबतची कागदपत्रे , व्यवस्थापक समितीच्या सभेत सादर करुन , सभेची मंजुरी घेवुन , एका इंग्रजी व एका स्थानिक भाषेतील वर्तमानपत्रात , ( सर्वोत्तम फ्री प्रेस जर्नल व नवाकाळ - स्वस्तात मस्त ) सोसायटीतर्फे , सोसायटी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट देणार आहे, कोणाची काही हरकत आहे काय ? असल्यास पंधरा दिवसात लेखी पुराव्यासह हरकत नोंदवावी , अशी विचारणा करणारी जाहिरात , देवुन पंधरा दिवसांची मुदत देणार. जाहिरातीचा खर्च मात्र सभासदाकडुन वसूल करावा.
कोणाची काहीही हरकत नसल्यास, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट सेक्रेटरी देवु शकतो. मी नेन्सी कॉटेज सोसायटी, बोरिवली (पू) ( १९६ सभासद ) चा सेक्रेटरी आहे.
माझ्याकडे नुकताच एक अर्ज आलेला आहे. जाहिरातीचे दोन्ही नमुने मजकडे आहेत. ज्याला हवे, त्यांनी सम्पर्क साधावा.