म्यानमार मधील कारवाई - काय सत्य काय खोटे?

सखारामगटणे's picture
सखारामगटणे in काथ्याकूट
13 Jun 2015 - 12:27 am
गाभा: 

अलिकडे म्यानमार मध्ये झालेल्या कारवाईनंतर वेगवेगळे मतप्रवाह काही समर्थनार्थ काही विरोधात सुरू झालेत.त्यातच खालील लेख वाचनात आला: #56InchRocks becomes 50 Shades of Red: Modi's Obama moment in Myanmar unravels

ह्या लेखामध्ये त्यानी खालील मुद्द्यांवर म्यानमार कारवाईची चिरफाड केली आहे

  1. आर्मी प्रोब्लेम: मोदी सरकार सैन्याच्या यशाला encash करत आहे
  2. Diplomacy प्रोब्लेम: म्यानमार ला आता सध्या मोदींच्या सार्क मधे चालू असलेल्या दौर्यांमध्ये पुरेसे फुटेज मिळाले नसल्याने किंवा अजून काही कारणांमुळे म्यानमार कारवाईबद्दल भारत आणि म्यानमार ह्यांनी परस्पर विरोधी स्पष्टीकरणं दिली आहेत
  3. फोटो प्रोब्लेम: म्यानमार कारवाईनंतरच्या जल्लोषाचा helicopter समोर बसलेल्या जवानांचा जो फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे तो जुना आहे, त्याचा ह्या कारवाईशी काही संबंध नाहीये.
  4. मृतदेहांची संख्या: ही कारवाईच्या दिवसापासून रोज बदलत आहे..१०० पासून आता ७-१० दरम्यान कुठेतरी आहे..

माझा ह्या विषयातला काही अभ्यास नाही पण ह्या कारवाईबद्दल वर्तमानपत्रात वाचल्यानंतर एक अभिमान वाटला होता सध्याच्या सरकारच्या कडक भुमिकांबद्दल पण वरील विविध मुद्द्यामुळे हे सरकार फक्त raising the eyeballs पुरतेच मर्यादीत आहे का ही शंका येते..

मिपावर ह्या विषयाचा अभ्यास असणारे काही ह्या शंकांचे निरसन करतील ह्या हेतूने हा धागा टाकत आहे..

प्रतिक्रिया

सव्यसाची's picture

13 Jun 2015 - 1:09 am | सव्यसाची

>>> आर्मी प्रोब्लेम: मोदी सरकार सैन्याच्या यशाला encash करत आहे

आर्मी चे यश आहेच. पण थोडा हा पण विचार केला पाहिजे कि जर राजकीय नेतृत्व अश्या ऑपरेशन ला तयार नसेल तर आर्मी पुढे जाऊ शकत नाही. हे ऑपरेशन यशस्वी झाले हे उत्तमच. पण जर का काही बरेवाईट झाले असते (हवामान, तिथली परिस्थिती इत्यादी आपल्या विरुद्ध गेले असते) तर सगळा दोष शेवटी सरकारच्याच माथी येणार होता. कितीतरी जुन्याआर्मी च्या चीफनी सांगितले आहे या ऑपरेशन नंतर, कि राजकीय नेतृत्वचा शब्द अंतिम असतो अश्या सगळ्या गोष्टी मध्ये.

>>> Diplomacy प्रोब्लेम: म्यानमार ला आता सध्या मोदींच्या सार्क मधे चालू असलेल्या दौर्यांमध्ये पुरेसे फुटेज मिळाले नसल्याने किंवा अजून काही कारणांमुळे म्यानमार कारवाईबद्दल भारत आणि म्यानमार ह्यांनी परस्पर विरोधी स्पष्टीकरणं दिली आहेत

म्यानमार हा देश सार्क मध्ये कधीपासून आला हे काही कळले नाही. जेव्हा पंतप्रधान ऑस्ट्रेलिया ला गेले होते तेव्हा आसियान साठी ही गेले होते. त्यावेळी त्यांची म्यानमार भेट झाली आहे. अजून कसले फुटेज अपेक्षित आहे कळले नाही. ह्या मुद्द्यात काय दम आहे म्हणून तो फर्स्ट पोस्त च्या आर्टिकल मध्ये घुसवला आहे कळल नाही.

>>> फोटो प्रोब्लेम: म्यानमार कारवाईनंतरच्या जल्लोषाचा helicopter समोर बसलेल्या जवानांचा जो फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे तो जुना आहे, त्याचा ह्या कारवाईशी काही संबंध नाहीये.

फोटो बद्दल सांगायचे तर संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आधीच सांगितले आहे कि असा फोटो संरक्षण मंत्रालयातून नाही देण्यात आला. आता तो आर्मी कडून मिळाला असे म्हणणे आहे आणि ते एक प्रातिनिधिक चित्र आहे असे आर्मी चे म्हणणे आहे. चुकीचा फोटो हा त्या ऑपरेशनचा प्रोब्लेम कसा होऊ शकतो हे मला कळले नाही.

>>> मृतदेहांची संख्या: ही कारवाईच्या दिवसापासून रोज बदलत आहे..१०० पासून आता ७-१० दरम्यान कुठेतरी आहे..

कितीजण मारले गेले यावर आर्मीने काहीच मत व्यक्त केले नव्हते. त्यांनी म्हटले होते "significant casualties have been inflicted upon them". पेपर मध्ये ज्या बातम्या आल्या त्या सर्व "सूत्रांच्या" आधारे आल्या. टाईम्स ने १०० चा आकडा दिला तो गृह मंत्रालयाच्या एका अधिकार्याच्या हवाल्याने दिला. आता हे ऑपरेशन होते आर्मी चे तिथे गृहमंत्रालय कसे आले हे काही कळले नाही. सरकारने पण कोणताही आकडा दिला नाही. सगळे आकडे माध्यमांचेच आणि आता हे लोक आपलेच आकडे खोटे ठरवत राहणार. इंडियन एक्स्प्रेस मध्ये जे काही आलाय त्यात एकही माणसाचे किंवा पदाचे नाव नाही. सगळे काही "खात्रीलायक सूत्रांच्या" आधारे.
एकीकडे सरकारला हे ऑपरेशन "गुप्त (covert)" राहू द्यावे असे सल्ले देणारे दुसर्या वेळी त्याच ऑपरेशन चे तपशील, ते पण "सूत्रांच्या" आधारे बाहेर काढतात तेव्हा वाईट वाटते.

सखारामगटणे's picture

13 Jun 2015 - 2:17 am | सखारामगटणे

लेखातले मुद्दे संक्षेपाने देताना झालेली चूक आहे. एकूणच मला ही तो मुद्दा असण्याचे कारण समजले नसल्याने इतर कोणी समजू शकत असेल तर जाणून घ्यायची इच्छा आहे..आपल्या मतांबद्दल धन्यवाद!

बन्डु's picture

13 Jun 2015 - 1:35 am | बन्डु

फेकूगिरी दिसते ही तर ;(

संदीप डांगे's picture

13 Jun 2015 - 1:42 am | संदीप डांगे

फर्स्ट पोस्ट हा काही फार चांगल्या पत्रकारितेचा नमुना नाही. बहुसंख्य मीडीयागृहांप्रमाणे तेही बायस्ड आणि नसलेली माती उकरणारे, नकारात्मक बातम्या पसरवणारे आहेत.

लष्करी कार्यवाहीचे इत्भंभूत डीटेल्स एखाद्या हॉटेलच्या मेनूकार्डसारखे जगजाहीर व्हावे असं वाटणं फार चुकीचं आहे. खोटा का होइना पण तो फोटोही रीलीज करणं चुकीचे आहे. माझ्या मते कारवाईत सामील असलेल्या कुठल्याही सैनिकाचे डीटेल्स कधीच जाहिर करायचे नसतात. ऑफिशियली थेट प्रवक्त्यांकडून आलेली माहिती छापणे त्यावर चर्चा करणे अभिप्रेत असते. सेन्सेशनलीजम च्या हव्यासापायी भारतीय मीडीया कुठल्याही थराला जाऊन भयंकर घोडचुका करत आहे हे काही नवीन नाही.

सामान्य नागरिकाला असली अनधिकृत माहिती देऊन खरंच काय साध्य होते. त्यावर अनावश्यक बाजूंनी काथ्याकूट केल्यावर काय साध्य होते. सरकारला धारेवर धरायचे महत्त्वाचे काम सोडून भा.मी. फक्त प्रेक्षकांना नवरसानुभूती देण्यात धन्यता मानत आहे. बातम्या देणारी वृत्तपत्रे आणि वाहिन्या केवळ मनोरंजनाचा बाजार झाल्या आहेत. त्यामुळे असल्या चिरफाडीला कवडीइतकेही महत्त्व देऊ नये असे माझे मत आहे. या बाबतीतल्या उपयुक्त माहितीसाठी सरकारी स्त्रोत वापरावे. मनस्तापापेक्षा ते बरं असतं.

बाकी या कारवाईचा ज्या पद्धतीने नमोभक्त सोशलमीडीयावर प्रचार करत आहेत. ते बघून तर फक्त कीव येते.

असं काहि ऑपरेशन झाल्याचं आर्मीने कबुल केलय. त्यातला पूर्ण तपशील इतक्या लवकर तरी बाहेर येणार नाहि. फेकु कितीही फेकाफेकी करतो म्हटलं तरी आर्मी बहुतेक खोटं बोलणार नाहि.

>>> आर्मी प्रोब्लेम: मोदी सरकार सैन्याच्या यशाला encash करत आहे
-- त्यात काहि चुकीचं आहे असं वाटत नाहि. आर्मीला सीमोलंघन करण्याचे पर्मीट सरकारनेच दिले व तसं करताना दुसर्‍या राष्ट्राची परवानगी देखील सरकारनेच मिळवली.

>>> Diplomacy प्रोब्लेम:
-- याबद्द्ल विद्वानांची मतं मनोरंजन म्हणुन बघण्यापलिकडे फार महत्वाची वाटत नाहि आपल्याला :)

>>> फोटो प्रोब्लेम:
>>> मृतदेहांची संख्या:
-- सरकारने (कि मोदिंनी) सदर घटनेचा वापर आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी वापरायचं ठरवलं असल्यास त्यात खोडा घालताना निदान मुद्दे तरी व्यवस्थीत मांडायचे ना संबंधीत लोकांनी.

रमेश आठवले's picture

13 Jun 2015 - 4:06 am | रमेश आठवले

या कारवाई वर पाकिस्तानची आमच्या विरुद्ध असे काही केले तर आम्ही अण्वस्त्रे वापरू असे म्हणण्या पर्यंत मजल गेली आहे. बाकीच्या भारता जवळच्या कोणत्याही देशाला या कारवाई वर अभिप्राय देण्याची गरज भासली नाही.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jun 2015 - 9:14 am | श्रीरंग_जोशी

मिपाकर रमताराम यांचा या घडामोडींबद्दलचा दिव्य मराठीमध्ये प्रकाशित झालेला हा लेख वाचनीय आहे.

चाले वाचाळांची दिंडी.

सुधीर's picture

13 Jun 2015 - 11:12 am | सुधीर

लिंक दिल्याबद्धल धन्यवाद. लेख आवडला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jun 2015 - 9:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

विंटरणॅशणल डिप्लोमसी नावाचा प्रकार असतो. काही गोष्टींची सत्या-असत्यता ही पोलादी पडद्याआड असलेलीचं चांगली असते. ही बातमी खरी असेल तर अतिशय उत्तम. फक्त म्यानमारऐवजी पाकिस्तान अशी बातमी असती तर जास्तं छान वाटलं असतं. बाकी राजकारण्यांनी लष्कराचं यश एनकॅश करायचा प्रयत्न हास्यास्पद आहे.

The person who says pen is mightier than sword has never faced one \m/

या विषयावर प्रताप भानू मेहता यांचे विचार वाचनीय आहे.
http://indianexpress.com/article/opinion/columns/ops-and-optics/99/

लेखकाच्या मते - "क्रॉस बॉर्डर गुप्त कारवाया या गुप्त ठेवल्या जातात कारण त्यामुळे १. तशा प्रकारच्या कारवायांसाठी लोकांच्या अपेक्षा बनू द्यायच्या नसतात. २. तुम्हाला तुमच्या शेजार्‍याच्या मैत्रीपूर्ण संबंधांनाही धक्का पोहचवायचा नसतो. कदाचित राज्यकर्त्यांना एकाच मजकूरात अनेक श्रोतूगणांना संदेश देण्याच्या चुकीमुळे, राठोड यांचा (अण्वस्त्र सज्ज) पाकिस्तानला दिलेला अप्रत्यक्ष इशारा एक प्रकारचा बालिशपणाच (स्वत:च अभिंनदन आणि पाठ थोपटून घेण्याचा - self-congratulation and chest-thumping) होता. खर्‍या ताकदीचा सच्चेपणा कधी समजावून सांगावा लागत नाही, तीची उपयुक्तता ही केवळ तीच्या असण्याने आणि वापरण्याने दिसून येते. (The hallmark of true power is that it never needs to be described; it is effective by its mere presence and exercise.) अटल बिहारी वाजपेयींनी हे म्हटलचं आहे. कहानी शुरु तो सबको करनी आती है| खतम कैसे करेंगे किसिको नही पता| अमेरिका हाच धडा अजूनही शिकलेली नाही"

पाकिस्तानच्या अण्वस्त्र सज्जतेमुळे आपले हात बांधले गेले आहेत. शिवाय चिनचे हितसंबंध पाकिस्तानला मदत करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे आपल्यासाठी सिमेपल्याडच्या कारवाया या गुप्त ठेवण्यातच अधिक फायदा आहे असे मलाही वाटते. त्यामुळे आंतराष्ट्रीय राजकारणात आपण आपली "पहिलं आक्रमण न करण्याची" प्रतिमा जपतो. अशा कारवाहींची जाहिर वाच्यता करून एका ठराविक मतदारांना भले खूश करता येईल पण त्यामुळे आंतराष्ट्रीय राजकारणात आपली बाजू लटकी होण्याची शक्यता अधिक असू शकते. सिमेपल्याडच्या गुप्त कारवाया याही अगोदर झाल्यात. त्या कारवाया करून 'ताकद' दाखवून द्यावीच लागते. पण फक्त निदान आपल्या संदर्भात तरी त्याची जाहीर वाच्यता न करण्यातच अधिक फायदा आहे असं मला वाटतं.

वगिश's picture

13 Jun 2015 - 1:58 pm | वगिश

The King who must say " I am the king" is not the King. - got.

सुबोध खरे's picture

13 Jun 2015 - 11:57 am | सुबोध खरे

एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते राहतात त्या) शहराच्या बाहेर पाऊल ठेवलेले नाही असे पत्रकार लष्कराच्या कारवाई बाबत कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांना किंवा संरक्षण मंत्र्यांना उपदेश करतान पाहून बरेच मनोरंजन झाले. त्यावर आपल्या लोकांची खास टिप्पणी पाहूनही.
अच्छा है बहुत अच्छा है.
काही बाबती मी फक्त एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून लिहू इच्छितो.
१) आतापर्यंत दहशतवादी लोकांवर कारवाई करण्यासाठी आपली सीमा ओलांडून परदेशात जाण्याची कारवाई करण्याचे सरकारने पहिल्यांदा धारिष्ट्य दाखवले.(याबद्दल यच्चयावत निवृत्त अधिकार्यांनी उघडपणे समाधान व्यक्त केलेले आहे. आजी अधिकारी असे मत खाजगीत व्यक्त करीत आहेत
२) किती दहशतवादी प्रत्यक्ष मारले गेले( चार की चाळीस हे महत्त्वाचे नाही यापेक्षा आता भारतात काड्या करून आपल्याला चार किमी सीमे "पलीकडे" जाऊन थंड झोपता येईल हि त्यांची शाश्वती नाहीशी झाली (आणी अशी कारवाई परत होईलच अशी पक्की खात्री झाल्याने त्यांचे मनोबल पूर्ण खच्ची होते.)
३) पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी आणी मुलकी अधिकारी त्यांना "विचारले नसताना" वक्तव्य देत आहेत ( आमच्या कडे अणू बोंब आहे आम्हाला गृहीत धरू नये ई ई) याचा अर्थ त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. जर खरोखरच भारतीय सैन्य दहशतवाद्यांचा पाठलाग करत पाकिस्तानी सीमेत घुसले तर पूर्ण युद्ध करण्याची आपली तयारी किती आहे हे त्यांना पूर्ण माहित आहे.म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे.
४) मोदि साहेबाना विरोध करायचा म्हणून कित्येक लोक तो करत आहेत. परंतु अजित डोव्हाल साहेब प्रत्यक्ष या कारवाईत सामील झालेले आहेत तेंव्हा यात होणारा नफा तोटा हा त्यांनी त्यात गृहीत धरल्याशिवाय ती केलेली नाहीच. (डोव्हाल साहेब यांच्या सारख्या उमद्या आधिकार्याच्या कारकिर्दीला राजकीय रंग चढवू नयेत.)
५) बंगला देशात मोदी साहेब गेले असतानाच हि कारवाई झाली याचा सरळ अर्थ हा आहे कि बांगला देश त्यांना संरक्षण देणार नाही हि हमी मिळवली गेली आणि ताबडतोब कारवाई झालेली आहे.
६) पुर्वांचलात AFPSA मागे घेण्याच्या अगोदर हि कारवाई करून दह्शतवाद्यांचे कंबरडे मोडले पाहिजे हि लष्कराला आणि सरकारला जाणीव आहे म्हणून हि धडक कारवाई चालू केली आहे
७) कोणताही सार्वभौम देश( म्यानमार सकट ) आपल्या देशात दुसर्या लष्कराची कारवाई झाली हे कधीच अधिकृतपणे म्हणून शकत नाही. तेंव्हा म्यानमारच्या सरकारने हि कारवाई भारतीय हद्दीत झाली हे म्हणणे अगदी साहजिक आहे.
मी वरील माहितीबद्दल कोणतीही पुष्टी किंवा खंडन करणार नाही. ज्याला यात रस असेल त्याने गाळलेल्या जागा भराव्यात किंवा ज्याला छिद्रान्वेष करायचा आहे त्याने तो करून या प्रतिसादाची चाळणी करावी .
बाकी सर्वश्री पु लं देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही बाबतीत आपण सर्वोच्च अधिकार्याला सल्ला देण्यापूर्वी आपण पुणे महानगर पालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात कामाला आहोत याचा विचार केला जावा.

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2015 - 2:24 pm | श्रीगुरुजी

डॉ. खरे,

उत्तम प्रतिसाद! आपण म्हटल्याप्रमाणे या मोहिमेत किती जण मारले गेले याचे वेगवेगळे आकडे माध्यमेच सांगत आहेत. प्रत्यक्ष लष्कराने किंवा सरकारने आकड्याविषयी फारशी वाच्यता केलेली नाही. किती जण मारले यापेक्षा भ्याड हल्ल्याचा निषेध, तीव्र निषेध, कडक इशारा इ. धोपटमार्गाने न जाता सीमा ओलांडून अतिरेक्यांना थेट ठार मारणे ही कृतीच सर्वाधिक महत्त्वाची आहे. यात लष्कराचे संपूर्ण श्रेय आहेच, परंतु या कारवाईला केंद्र सरकारने पाठबळ दिले होते हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

नांदेडीअन's picture

13 Jun 2015 - 4:40 pm | नांदेडीअन

१) आतापर्यंत दहशतवादी लोकांवर कारवाई करण्यासाठी आपली सीमा ओलांडून परदेशात जाण्याची कारवाई करण्याचे सरकारने पहिल्यांदा धारिष्ट्य दाखवले.

ही बातमी खरी आहे की खोटी ?
Myanmar strike: Not the first time Army conducted cross-border operations
http://indianexpress.com/article/india/india-others/army-crossed-border-...

जर बातमी खरी असेल, तर यापूर्वीच्या सरकारांना आत्तासारखा गाजावाजा का करावासा वाटला नसेल ?

फारएन्ड's picture

14 Jun 2015 - 12:24 am | फारएन्ड

गाजावाजा केला नसेल कारण तत्कालीन सरकारांना शांतताप्रिय देश, आपणहून काड्या करणार नाही अशी प्रतिमा ठळक करायची होती - त्यामुळे अशी प्रसिद्धी मिळणे हे त्याच्या विरूद्ध जात होते. आत्ताच्या सरकारला (किमान त्यातील मंत्र्यांना) त्याच्या उलट प्रतिमा निर्माण करायची असावी असे दिसते.

दुसरा कोन म्हणजे विशेषतः पाक विरूद्ध केल्या जाणार्‍या कारवाया कॉंग्रेस सरकारच्या वोटर बेस पैकी जो अशिक्षित, सहज भुलवला जाणारा मुस्लिम वोटर बेस आहे त्यांच्या मनात काही गैरसमज होउ नये याकरिता जास्त प्रसिद्ध केल्या जात नसतील (याचे संदर्भ अनेक ठिकाणी आहेत, खुद्द काँग्रेस वाल्यांच्या पुस्तकांतही - उदा: संजया बारूंचे मनमोहन सिंगांबद्दलचे पुस्तक). याउलट भाजपच्या मंत्र्यांना त्यांचा टीपिकल वोटर बेस- मध्यमवर्गीय हिंदुत्त्ववादी, ज्यांना असे करणे नक्की आवडेल असे लोक- भक्कम करायला अशा बातम्यांना प्रसिद्धी देणे जरूरीचे आहे म्हणून ते गाजावाजा करतात.

दोन्ही पक्षाची सरकारे आपापल्या वोटर बेस प्रमाणे हे ठरवत असतील याचीच शक्यता जास्त आहे. उगाच काँग्रेसला नैतिक वगैरे मखरात बसवायची गरज नाही :). मात्र यातील एकच अ‍ॅप्रोच धरून कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी ते कन्सिस्टंटली करणे जरूरीचे आहे. नाहीतर आंतरराष्ट्रीय फोरम्स वर कोणत्याही एका भूमिकेचे समर्थन करणे अवघड जाईल. स्वतः पहिले आक्रमण न करण्याने जो नैतिक अधिकार मिळतो तो ही नाही मिळणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तो न केल्याने नुकसानही होईल. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही, असे नको :)

hitesh's picture

14 Jun 2015 - 5:35 pm | hitesh

भारतीय मुस्लिमाना बांग्ला / पाकी अतिरेकी मारले तर सहानुभूती वाटते , हा खोडसाळ अपप्रचार आहे.

जम्मुकाशीर इन्फंट्रीतुन पाकविरोधात लढणारे व मरणारे साठ ञक्के सैनिक मुसलमान असतात.

शहीदांची यादी पहावी.

राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमविरोधी वक्तव्ये करणे कृप्या टाळावे.

विकास's picture

14 Jun 2015 - 5:39 pm | विकास

राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमविरोधी वक्तव्ये करणे कृप्या टाळावे.

१०००००% सहमत! तसेच हिंदूंबद्दल पण बोलणे टाळावे. विशेष करून तुमच्या सारखे अहिंदू जेंव्हा हिंदू धर्म आणि हिंदूंना नावे ठेवतात तेंव्हा ते तितकेच चुकीचे असते. तेंव्हा कृपया करून येथे कुठल्याही धाग्यात तसे बोलणे टाळावे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jun 2015 - 9:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहिंदु नव्हे बाटगा. अहिंदु परवडला असता एकवेळ.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2015 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथल्या तुमच्या बर्‍याचश्या सकारण/अकारण (सकारणपेक्षा अकारणच जास्त) प्रतिक्रिया तसे मत तयार करायला मदत करतात हे तुमच्या अजून ध्यानात आले नाही काय !?

"इथे राजकिय, वैयक्तीक किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कोणत्याही गट-समुहाविरुद्ध अतिरेकी विधाने टाळावी." हा सल्ला तुम्हाला चपखल बसतो आहे यात संशय आहे काय ?

त्यामुळे...

तुमचा सल्ला योग्य आहे, पण तो दुधारी आहे हे सुद्धा ध्यानात ठेवायला हवे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2015 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

या वरच्या पार्श्वभूमीवर हे तुम्ही नुकतेच प्रसिद्ध केलेले लिखाण परत एकदा वाचून काही बोध होतो का ते पहा !

विनोद१८'s picture

14 Jun 2015 - 10:18 pm | विनोद१८

तू का बरे कोणत्याही चर्चेत शेवटी येउन हिंदुंवर घसरतोस ?? तुझी हिंदुविरोधाची उबळ संपायची कधी ?? जरा नीट समजुन घे तुला तमाम मिपाकर चांगलेच ओळखतात, तुझे इथे उगविण्यामागचे हेतु आम्ही जाणतो. तुझ्या इथल्या सामाजिक द्वेषभाव पसरवून सामाजिक वातावरण बिघडविण्याच्या प्रयत्नांना कधीच यश येणार नाही याची खात्री बाळगुन जरा गप्प बस. तुला इथले संपादक जरी कंटाळलेले नसले तरी इतर सदस्य कंटाळ्ले असावेत. आता तुला जर यापेक्षा अधिक आपली शोभा करुन घ्यायची असेल तर तसे कळव तीही करुन मिळेल.

वि.सु. : तुला मिळालेल्या लेखनस्वातंत्र्याचा इतका गैरफायदा घेउ नकोस.

(नाना नेफळाप्रेमी) विनोद१८

फारएन्ड's picture

14 Jun 2015 - 11:35 pm | फारएन्ड

हितेशभाय, ते विधान मी केलेले नाही. काँग्रेस च्या अनेक लोकांमधे तशी भीती आहे - त्याचा संदर्भ आहे तो. ती अनेक ठिकाणी उघड झालेली आहे. प्रत्यक्षात तशी सहानुभूती आहे असा समज होण्याचे काहीच कारण नाही.

hitesh's picture

15 Jun 2015 - 6:52 am | hitesh

काँग्रेसचे लोक तुमच्या स्वप्नात येऊन तसा दृष्टांत देऊन गेले काय ?

तुमचे विचार काँग्रेसच्या नावाचे शेपूट जोडुन लिहू नका.

आजवर पाकिस्तानविरिधात लढलेल्या सर्व लढाया ( अपवाद कार्गिल) काँग्रेसच्याच काळात लढलेल्या आहेत..

फारएन्ड's picture

15 Jun 2015 - 10:06 am | फारएन्ड

तुम्हाला पटो वा ना पटो. आता "हे" म्हणजे काय, तर कोणत्याही मुस्लिम देशाविरूद्ध काही करायचे असेल तर आपल्या मुस्लिम वोटर बेस ला काय वाटेल याचा विचार करणे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना ते बघावेच लागते. भाजपवाले आपल्या वोटर बेस बद्दल तसे वागतील. त्यात काय आश्चर्य.

मुस्लिम लोकांना असे काही वाईट वगैरे वाटत असेल असे मला अजिबात वाटत नाही. सर्वसामान्य हिंदू आणि सर्वसामान्य मुस्लिम यांच्यात याबाबतीत काही फरक आहे असेही मला वाटत नाही.

hitesh's picture

15 Jun 2015 - 10:11 am | hitesh

काँग्रेसच्या काळातही अशा योजन्या सैन्याने अमलात आणल्या आहेत.

http://epaper.loksatta.com/c/5562273

फारएन्ड's picture

15 Jun 2015 - 12:07 pm | फारएन्ड

हो आहेत ना. मी कधी नाही म्हंटलो?

चिनार's picture

15 Jun 2015 - 12:22 pm | चिनार

उपकारच म्हणायचे हो कोन्ग्रेसचे आपल्यावर ..काय काय म्हणून सांगू !
आपल्याच देशात आम्हाला राहायला दिलं , आपल्याच देशातलं पाणी (गढूळ का होई ना) पण प्यायला दिलं..
काय काय म्हणून सांगू..अख्खा पुस्तक लिहावं लागेल..

चिनार's picture

15 Jun 2015 - 10:08 am | चिनार

हो..आणि भारत - पाकिस्तान फाळणी सुद्धा तत्कालीन कोन्ग्रेस नेच मंजूर केली होती !
तरीपण हितेश तुझं बरोबर आहे ..राहुल गांधींना पंतप्रधान करा !! (ते छोटा भीम ला पाठवून दहशतवादी संपवतील.)

मुक्त विहारि's picture

15 Jun 2015 - 10:34 am | मुक्त विहारि

किंवा मग दहशतवाद्यांना टॉम अँड जेरीचे व्यसन लावणे,

वगैरे वगैरे

हे असे हितोपदेश करणारी बरीच मंडळी असतील ना?

वप्रचियांआ. हिकन.

प्रदीप's picture

13 Jun 2015 - 5:49 pm | प्रदीप

एकंदर ज्यांनी पुणे( किंवा ते राहतात त्या) शहराच्या बाहेर पाऊल ठेवलेले नाही असे पत्रकार लष्कराच्या कारवाई बाबत कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांना किंवा संरक्षण मंत्र्यांना उपदेश करतान पाहून बरेच मनोरंजन झाले. त्यावर आपल्या लोकांची खास टिप्पणी पाहूनही.

अगदी अचूक आणि चोख! सगळाच प्रतिसाद आवडला, त्यातील हा भाग विशेष!


प्रथम आपल्या अतिशय संतुलीत, सुयोग्य व अप्रतिम अशा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.


अगदी 'सोनाराने कान टोचावेत' अशा पद्धतीचा नेमका चपखल मुद्देसुद असा आपण एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून अधिकारवाणीने लिहीलेला प्रतिसाद असुनही काही 'शहाणे, अतिशहाणे, विद्वान, विचारवंत व सर्वज्ञानी काथ्याकूट्कार' इ.इ. यांच्या गळी उतरावा व त्यांचे समाधान व्हावे असे मला वाटते, पण तसे होणे कठिण दिसते, कारण तसे झाले तर यांना चमकोगिरी करुन आपले अस्तित्व दाखवून द्यायची संधी गमावण्याची भिती असते, म्हणुनच यावर अधिकाधिक वितंड्वाद वाढविला जाईल असे वाटते.

तिमा's picture

13 Jun 2015 - 12:33 pm | तिमा

सौ सुनारकी एक खरे साहब की !
पण आपल्या उतावळ्या मिडियाला चाप लावायला हवा याच्याशी सहमत.

आनंदराव's picture

13 Jun 2015 - 12:51 pm | आनंदराव

डॉक्टर साहेबांचे परखड विश्लेषण आवडले.

अर्थात विरुद्ध मताचा आदर आहेच. कालचा इकॉनॉमिक टाइम्स मधल्या दोन बातम्या.
Chest Thumping will Hurt Future Ops: Army, Experts
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31818&articlexml=Che...

STATEMENTS `WERE AVOIDABLE' - A Section of Govt Unhappy with Rathore Remark
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31818&articlexml=STA...

लिओ's picture

13 Jun 2015 - 3:36 pm | लिओ

खरे साहेब

खटकलेल्या गोष्टि

१. हमी मिळावी म्हनुण भारतीय पन्त पर्‍धान बंगला देशात जातात यात छाती फुगण्यासारखे काय ? हे काम परराष्ट् मंत्री , एखादा मुसद्दी सचिव / अधिकारी करु शकला असता.

२. भारतीय सेना अशा कामगिरि करु शकते हा साक्षातकार फक्त आजच झाला असे बोलणे चुकिचे. यापुर्वी भारतीय सेनेने शत्रुस युध्दाशिवाय चेक-मेट केले आहे. (या विषयावर जास्त चर्चा नको.. It is classified and keep it classified ).

३. अजित डोव्हाल बरोबर इतर वरिष्ठ सेनाधिकारि व त्यांच्या जबाबदारीचे वर्णण केले असते तर चांगले झाले असते

४. एक निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून AFPSA कायदा कोणत्या परिस्थितीमुळे लागु केला आहे ( north-east राज्यात ) याचे विश्लेषण केले आणि AFPSA कायदा लागु केला म्हणुन होणारे फायदे तोटे व AFPSA कायदा हटवला म्हणुन होणारे फायदे तोटे ............................
गाळलेल्या जागा भराव्यात. (हा वेगळा धागा होउ शकतो)

सुधीर

चांगला प्रतिसाद
A Section of Govt Unhappy with Rathore Remark, but Same Section of Govt forget what one BJP MP of maharashtra says right after winning of 2014 election on times channel.

This is the difference one is discipline retired army officer and one is civilian.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Jun 2015 - 6:13 pm | निनाद मुक्काम प...

हमी मिळावी म्हनुण
ह्यासाठी ते बांगला देशात स्वतः गेले
तुम्ही राजकीय घडामोडींचे निरीक्षण केले असता आढळून असे येईल मोदी सरकारचे दुसर्या राष्ट्राशी संबंध वाढवण्यासाठी
जेव्हा दौरे आयोजित होतात तेव्हा काही महिन्याच्या पूर्वी सुषमाजी आधी तेथे जाऊन तेथील मंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा करून नमो ह्यांच्या दौर्यासाठी पार्श्वभूमी तयार करतात ,
म्हणूनच एका वर्षात त्यांचे नमो पेक्ष्या जास्त देशात जाणे झाले व त्या नमो पेक्ष्या जास्त दिवस बाहेर होत्या
व त्यांच्या परदेशी दौर्यांच्या प्रत्येक बातम्या पेपरात येतात
लोकांना त्यांना दिसत नाही पण नमो गेल्याचे दिसते
असो
मी नमो समर्थक
आपण
कोणाचे समर्थक
केजरीवाल कि योगेंद्र कि राहुल

त्यांच्या मतानुसार,

१. ज्या गोष्टी आपल्याला समजतात किंवा ज्या गोष्टी आपण बदलू शकतो, त्याच गोष्टींवर मत प्रदर्शन करणे उत्तम.

२. ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत, त्यावर टीका-टिपण्णी करण्यात वेळ वाया घालवू नये.

आणि

३. कूठल्या गोष्टी आपण बदलू शकतो आणि कुठल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्यातील तारतम्य वेळीच ओळखलेले उत्तम.आपला आणि इतरांचा वेळ वाचतो.

असो,

बाबा वाक्यं प्रमाणं

प्रतिसाद द्यावा असे मला मुळीच वाटत नाही तरीही
@लिओ
मोदी साहेब बांगला देशात काही चार दहशतवाद्यांवर कारवाईसाठी परवानगी/ हमी( इतक्या फडतूस कामासाठी कोंगो देशाचा पंतप्रधानही जाणार नाही) मागायला गेले नव्हते. तेथे काय काय महत्त्वाचे करार झाले ते आपण वृत्तपत्रात वाचा. अशा अनेक गोष्टीपैकी एक अट अशी होती कि पूर्वांचल मध्ये आम्ही धडक कारवाई सुरु करतो आहे तेंव्हा तेथील लोक बांगला देशात आश्रयासाठी येतील त्यांना आश्रय देऊ नका. त्याच वेळेस म्यानमार मध्ये त्यांच्या लष्कराशी बोलणी करून कारवाई केली म्हणजे आता दहशत वाद्यांना पूर्व आणि पश्चिम दोन्ही देशात मिळणारे अभयारण्य बंद केले.(उंदीर मारताना जसे त्याचे पळून जाण्याचे मार्ग बंद करून मारला जातो तशीच हि कार्यवाही आहे.) .

@ नांदेडीयन.किंवा इतर मोदी विरोधक तुम्ही तुम्हाला जे पाहिजे त्याच बातम्या शोधून काढणार याबद्दल मला शंका नव्हतीच. परंतु यावेळेस वायुदलाची हेलीकॉप्टर्स आणि ड्रोनस वापरली गेली जी इतर वेळेस वापरलेली नव्हती. हेलीकॉप्टरने हि कारवाई वेगाने करता येते आणि तीच कारवाई जमिनीवरून करणे जिकीरीचे होते.(वायुदलाच्या वापरासाठी दुसर्या देशाची मूक संमती जरूर असते अन्यथा हवेत उडणारे हेलीकॉप्टर सहज रडारवर दिसू शकते आणी पाडता येते.) यामुळे यावेळेस एकाही सैनिकाचे "रक्त" सांडले नाही तर पूर्वीच्या कारवायामध्ये आपल्या सैनिकांचे रक्त सांडले गेले ती शांततेची किंमत म्हणून लष्करी नेतृत्वाने मान्य केली. उगाच सर्व निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकारी या कारवाई बद्दल सरकारची प्रशंसा करीत नाहीत. दिल्लीत आरामखुर्चीवर बसलेले विचारवंत किंवा डाव्या विचारसरणीचे पत्रकार काहीही म्हणोत.
THE PROBLEM WITH LEFTIST IS THEY CAN SEE NOTHING "RIGHT" IN ANYTHING

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jun 2015 - 1:02 am | निनाद मुक्काम प...

आधीच्या प्रतिसादात मी २२ करारांची लिंक द्यायची विसरून गेलो
मात्र आंजा वर ती उपलब्ध आहे.
ह्या कारवाई चे प्रमख शिल्पकार हे अजित देवोल असून प्रती दहशतवादी मोहिम आखणे व त्याविरुद्ध मोहीम आखणे ह्यात त्यांना महारथ आहे जगभरातील गुप्तचर संस्थांची त्यांचे प्रत्यक्ष चांगले संबंध आहेत व हैदर सिनेमात दाखवले किंवा काही दिवसांच्या पूर्वी पर्रीकर म्हणाले काटेसे काटा त्या प्रकारच्या मोहिमा १९९० च्या काळात त्यांनी यशस्वीपणे काश्मिरात राबविल्या , दहशतवाद्यांच्या मधील फितूर दहशतवादी त्यांच्या विरुद्ध वापरून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले .
आताहि ब्रह्म देशात ते पुढील रणनीती ठरवायला गेले आहेत.
बाकी पाकिस्तानात अशी कारवाई करायला आपल्या लष्कराने जायची अजिबात आवश्यकता नाही
काट्याने काटा काढला जाईल

विकास's picture

14 Jun 2015 - 6:53 am | विकास

दोन्ही प्रतिसाद माहीतीपूर्ण.

पूर्वीच्या कारवायामध्ये आपल्या सैनिकांचे रक्त सांडले गेले ती शांततेची किंमत म्हणून लष्करी नेतृत्वाने मान्य केली.

हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सैनिकाचा जीवाचे मोल नाही हे कडवे सत्य आहे... त्याच बरोबर सैनिकाला मरणाशी दोन हात करतच लढावे लागते हे देखील वास्तव आहे. पण ह्या सरकारने या कारवाईतून जाहीर संदेश देण्याचा केलेला प्रयत्न स्वागतार्ह आहे. आम्ही सैनिकांना अथवा इतरांना फुकटचे हौताम्य पत्करायला लावणार नाही. तसेच जाहीर केल्याने आता "नंगे को ..." हे आम्ही देखील वागू शकतो हे दाखवले आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळेस ते सरकार असे वागेल असे वाटत नाही. "परकीय हात" म्हणून बोंबलत बसत वरकरणी शांतताप्रिय मुत्सदेगिरीपेक्षा, जाहीर आणि आक्रमक मुत्सदेगिरी कधी कधी करणे गरजेचे असते. या वेळेस ते सरकारने केले... सैन्याला या निर्णयामुळे आपल्याकडे आपले म्हणून पहाणारे सरकार आले असे वाटले असावे.

THE PROBLEM WITH LEFTIST IS THEY CAN SEE NOTHING "RIGHT" IN ANYTHING

१००००००% सहमत!

नांदेडीअन's picture

14 Jun 2015 - 7:31 am | नांदेडीअन

@ नांदेडीयन.किंवा इतर मोदी विरोधक
तुम्ही तुम्हाला जे पाहिजे त्याच बातम्या शोधून काढणार याबद्दल मला शंका नव्हतीच.

आणि तुमी तुम्हाला सोयीचे वाटेल असाच प्रतिसाद द्याल याबद्दल मलासुद्धा शंका नव्हतीच.

परंतु यावेळेस वायुदलाची हेलीकॉप्टर्स आणि ड्रोनस वापरली गेली जी इतर वेळेस वापरलेली नव्हती.

6 December 2003: The Indian Army deployed 12 battalions along the border with Bhutan to prevent rebel infiltration. India also provided helicopters in order to assist the Royal Bhutan Army troops with evacuating the injured. Clashes occurred in Kalikhola, Tintala and Bukka. Ten rebel camps were destroyed by the end of the day.
https://en.wikipedia.org/wiki/Operation_All_Clear

आणि १९९५ ला आपल्या आर्मीने ड्रोण वापरायला सुरूवात केली होती की नाही माहित नाही.
त्याबद्दल आपणच जास्त अधिकारवाणीने सांगू शकाल.

THE PROBLEM WITH LEFTIST IS THEY CAN SEE NOTHING "RIGHT" IN ANYTHING

The problem with the Extreme Rightist is that they think everyone else other than them is a leftist, a treasonist and a terrorist.

पिंपातला उंदीर's picture

13 Jun 2015 - 9:26 pm | पिंपातला उंदीर

कारवाई यशस्वी करण महत्वाच की त्यात कुठली साधनसामुग्री वापरली हे महत्वाच ? यापूर्वी अनेक वेळा आपण अशा कारवाया यशस्वी पणे पार पाडल्या आहेत हा उद्देश होता सांगायचा . पण पूर्वीच्या सरकारांना ढोल बजावण्यात रस नव्हता जो सोस या सरकारला नको तितका आहे . पहिले तुम्ही छातीठोक पणे म्हन्त्लात की अशी कारवाई पहिल्यांदाच झाली . मग तो दावा फोल ठरल्यावर आता साधनसामुग्रीची लिस्ट देत आहात . कूच जम्या नही . बाकी जो आपले मत मान्य करत नाही त्याला सरसकट leftist म्हण्याची परंपरा 'रिवर्स विचारवंतांमध्ये ' आली आहे का ? बाकी आपण आयुष्यात मारला तो तीर बाकी लोक उंदीर मारण्याच्या खात्यात काम करणारे कारकून या विनाकारण आलेल्या अहंभावाच काय कराव ?

उंदिर मामा पिंपातुन बाहेर निघा...
असो ते बॉलीवुडच्या स्क्रिप्ट काय झाल ते सांगा ना!!

सुबोध खरे's picture

13 Jun 2015 - 11:24 pm | सुबोध खरे

उंदीर मामा
मी तीर मारलेला नाही पण शेकड्यात उंदीर आणि हजारात झुरळे मात्र मारली आहेत मिपा धुडाळून पहा म्हणजे सापडेल

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2015 - 12:39 pm | श्रीगुरुजी

*LOL*

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2015 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

पुण्याचे वटवाघूळ's picture

15 Jun 2015 - 1:31 pm | पुण्याचे वटवाघूळ

मी तीर मारलेला नाही पण शेकड्यात उंदीर आणि हजारात झुरळे मात्र मारली आहेत मिपा धुडाळून पहा म्हणजे सापडेल

मस्त डॉक्टरसाहेब.

मिसळपाववरचे वाता॑वरण बिघडविणार्‍यांना असेल चोपले पाहिजे.

मूकवाचक's picture

16 Jun 2015 - 6:44 pm | मूकवाचक

=))

रमेश आठवले's picture

14 Jun 2015 - 12:10 am | रमेश आठवले

तीस वर्षा नंतर जनतेने एक स्पष्ट बहुमताचे केंद्र सरकार निवडून दिले आहे. जनतेच्या मानसाचा कौल जाणून घेऊन त्यावर खरे उतरणे ही ह्या सरकारची जबाबदारी आहे. मणिपूर मध्ये बाहेरून येउन अतिरेक्यांनी अठरा सैनिकांची हत्या केली आणि ते शेजारच्या देशात सुरक्षित वाटणार्या जागी पळून गेले, ह्या बातमीने जनमानसात उद्वेग , चीड , सूड, त्वेश या सारख्या भावना निर्माण झाल्या होत्या. सरकारने केलेल्या जबाबी कारवाई मुळे जर भारतातील जनतेच्या या भावनांचे सांत्वन होत असेल, तर सरकारने त्या कारवाईला योग्य ती प्रसिद्धी देणे गरजेचे आहे.
राजदीप सरदेसाई , करण थापर, कॉंग्रेस चे प्रतिनिधी आणि तत्सम लोकाना काय वाटते याची फिकर करणे आवश्यक नाही.

विनोद१८'s picture

14 Jun 2015 - 1:17 am | विनोद१८

सहमत, हा मुद्दाही पटण्यासारखा आहे.

अनुप ढेरे's picture

14 Jun 2015 - 3:14 pm | अनुप ढेरे

म्यानमार कारवाइची बातमी पब्लिक का केली याचा उहापोह करणार एक लेख,
http://scroll.in/article/733855/why-the-modi-government-decided-to-delib...

hitesh's picture

15 Jun 2015 - 6:53 am | hitesh

म्यानमारात अतिरेकी असताना म्यानमारचे सैन्य गप्प झोपले आणि भारतीय सैन्य लढायला गेले.

.
.

हे वाचून
.
.

दिल्लीवर अब्दालीचे आक्रमण होताना दिल्लीचा बादशा झोपुन होता आणि माना कापून घ्यायला पेशवे पुढे गेले होते.

.
.

याची आठवण होऊन गहिवरून आले.

माहितगार's picture

15 Jun 2015 - 9:42 am | माहितगार

@ hitesh

आपण जे कुणी असाल, आपल्या संगणकावरून आंतरजालावर टंकण्यासाठी जो दहा क्षणांचा निवांत मिळाला असेल, आपल्या आई वडलांच्या भावा बहिणीं इत्यादी आपले आप्त स्वकीय जीव लावावा असे दोन मित्र आणि त्यांचे परिवार असतील त्यांच्या पैकी कुणाच्याही पोटासाठी लागणारा एक घास शेतात उत्पादन होऊन ते त्यांच्या पोटात पडे पर्यंत जी काही उलाढाल होते ति सर्व प्रक्रीया होण्यासाठी एका किमान अटीची गरज असते ती म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि सीमेपलिकडून होणार्‍या आक्रमणांपासून संरक्षण. तुम्हाला तुमच्या परिवाराला निवांत लाभावा म्हणून काही सैनिक देशाच्या सीमेवर आपला प्राणपणाला लावत असतात. देशाच्या सीमेवर आपला प्राणपणाला लावताना होणारे संघर्ष जीवघेणेच असणे स्वाभाविक आहे.

देशाच्या सीमेवर लढणारा प्राण पणाला लावणारा प्रत्येक सैनिक दिल्लीत राज्य करणारा जागा आहे का झोपला आहे याची चिंता करत नाही. त्याची लढाई केवळ दिल्लीतील राज्यकर्त्यांसाठी नव्हे त्याच्या घरातल्यांच्यासहीत भारतातल्या प्रत्येक घरासाठी असते.

तुमचे आपापसातील व्यक्तीगत हेवे दावे चढाओढ टिका ताशेरे सारे काही चालू द्यात, माझ्याठी इतरांसाठी म्हणून नव्हे देशाच्या सीमेवर लढलेला प्रत्येक जण तुमच्या स्वतःच्याही घरादाराला शांतता लाभावी हे लक्षात घेऊन सीमेवर लढला आहे हे लक्षात घेऊन सीमेवर लढलेल्या लढणार्‍या सैनिकांचा अनमान आपल्या स्वतःच्या विचारांमधूनही होणार नाही याची काळजी घेतल्यास आपल्या लेखनातून नेमके कोणते अर्थ ध्वनीत होताहेत या कडे आपले ल़क्ष जाऊन आपण त्यात सुधारणा करू शकाल असा आशावाद वाटतो.

पण मोदीने जणू एकमेवाद्वितीय काम केले हा जो जयघोष सुरु आहे. तो निंदनीयच आहे. मोदी / भाज्पा यानेअ‍ॅ फुक्कटचॅ श्रेय लाटू नये.

यापूर्वीच्या सरकारान्नीही अशी कामे केलेली आहेत.

http://epaper.loksatta.com/c/5562273

माहितगार's picture

15 Jun 2015 - 10:25 am | माहितगार

सैनिकांच्या पराक्रमाबद्दल चांगलेच लिहिले आहे.

या बद्दल धन्यवाद.

उर्वरीत विवाद चर्चेत तुर्तास माझा सहभाग नाही.

आपल्या आवडीचे वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

सुबोध खरे's picture

15 Jun 2015 - 12:32 pm | सुबोध खरे

हितेश भाऊ
अगोदरच्या सरकारकडून अशी कामे करण्याची परवानगी मिळवण्यासाठी किती मिनतवार्या कराव्या लागत असत हे वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना माहित आहे. तेंव्हा अगदी नाईलाज म्हणून परवानगी मिळत असे आणी ती सुद्धा बरीच उशिरा.याचवेळेस सरकारने पुढाकार घेऊन( पाय न ओढता) संरक्षण सल्लागारा ना ( डोव्हाल साहेबाना) पुढे पाठवून काम केले. याच कारणासाठी बर्याचशा निवृत्त लष्करप्रमुखांनी मोदी सरकारचे जाहीर अभिनंदन केले आहे. जर आपल्याला त्यांच्या( निवृत्त लष्कर प्रमुख) पेक्षा जास्त ज्ञान माहिती किंवा शहाणपण असेल तर गोष्ट वेगळी.
जाता जाता-- हे लष्कर प्रमुख त्या सरकारच्याच काळात बढती मिळवून लष्कर प्रमुख झाले होते. नाहीतर परत तुम्ही म्हणाल त्यांना मोदी साहेबांनी वर चढवले म्हणून ते मोदी साहेबांचे तुणतुणे वाजवताहेत.
तुम्हा काळा चष्मा काढलात तरच सूर्यप्रकाश स्वच्च्छ दिसेल अन्यथा काळोखी ठरलेलीच आहे.

नितिन थत्ते's picture

16 Jun 2015 - 7:00 am | नितिन थत्ते

>>अगोदरच्या सरकारकडून अशी कामे करण्याची परवानगी मिळवण्यासाठी किती मिनतवार्या कराव्या लागत असत हे वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना माहित आहे. तेंव्हा अगदी नाईलाज म्हणून परवानगी मिळत असे आणी ती सुद्धा बरीच उशिरा.

हे विधान "अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली" या दाव्याला छेद देते.

अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली

हा दावा कोणी केला आहे..?

नितिन थत्ते's picture

16 Jun 2015 - 10:51 pm | नितिन थत्ते

ज्यांना मी प्रतिसाद दिला आहे त्यांनीच इथे पैल्याच मुद्द्यात हा दावा केला आहे.

यापुर्वी सरकारची मनधरणी करुन एखाद्यावेळी अशा कारवाईची पर्मीशन मिळत होती.
यंदा पहिल्यांदाच स्वतःहुन सरकारने कारवाईचे आदेश दिलेत ;)
(एका केसाचे उभे काप किती करता येतील???)

विकास's picture

17 Jun 2015 - 4:17 am | विकास

एका केसाचे उभे काप किती करता येतील???

त्यासाठीच हा "केस स्टडी" चर्चिला जात आहे. :D

यापुर्वी सरकारची मनधरणी करुन एखाद्यावेळी अशा कारवाईची पर्मीशन मिळत होती. यंदा पहिल्यांदाच स्वतःहुन सरकारने कारवाईचे आदेश दिलेत ;)

सहमत.

तरी देखील, मोदी सरकार (म्हणजे त्यात सर्व मंम आले) कसे या संदर्भात चुकीचे होते असे म्हणून सर्वे भवंन्तु सुखिनः होणार असेल तर त्याच्याशी देखील सहमत. ;)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

या सरकारान्नी शिरच्छेद करुन पाथवलेल्या सैनिकांबद्दल काय भुमिका घेतली होती हे जरा आठवा बघू हितेस?
साधे श्बदसुद्धा कडक नव्हते विरोधाचे.

अनन्त अवधुत's picture

16 Jun 2015 - 4:14 am | अनन्त अवधुत

आतिवास यांच्या लेखातला (http://www.misalpav.com/node/31660) गोरखा सैनिकांसोबताचा संवाद तुमच्या प्रतिक्रीयेतले "तुम्हाला तुमच्या परिवाराला निवांत लाभावा म्हणून काही सैनिक देशाच्या सीमेवर आपला प्राणपणाला लावत असतात." हेच वाक्य सांगतात.

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2015 - 5:40 am | श्रीरंग_जोशी

मी खाली टंकलेले सर्व विचार हे उपलब्ध माहिती व तर्कावर आधारीत आहेत. परराष्ट्रधोरण व संरक्षणधोरण हे विषय कुठल्याही पक्षाचे सरकार निष्काळजीपणे हाताळत नसते यावर माझा ठाम विश्वास आहे.

पूर्वीची सरकारे सीमेपलिकडे / नियंत्रणरेषेपलिकडे कारवाई करण्यासाठी सैन्याला परवानगी देण्यास वेळ लावत होते अन या ऑपरेशनच्या वेळी तीच परवानगी लगेच मिळाली यामध्ये एक महत्वाचा फरक असू शकतो.

यावेळचे ऑपरेशन म्यानमारच्या हद्दीत जाऊन करायचे होते. त्या देशाबरोबर आपला अशा कारवायांसाठी सहकार्य करण्याचा करार आहे.

भारताला आजवर या प्रकारची कारवाई करण्याची सर्वाधिक गरज कुठल्या शेजार्‍याबरोबर होती याची सर्वाधिक शक्यता म्हणजे पाकिस्तानबरोबर. भारताच्या सैन्याच्या पाकिस्तानबरोबरच्या नियंत्रणरेषेपलिकडे कारवाईदरम्यान पुरावे शिल्लक राहिले किंवा आपले सैनिक जीवंत अथवा मृत शत्रुच्या हाती लागले तर भारताची देश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा प्रश्नांकीत होऊ शकते.

तसे ऑपरेशन करायचे असल्यास अपयश येणे हे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलेच महाग पडू शकते. पाकिस्तानला भारताबरोबरील द्विपक्षिय चर्चेत अन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतावर आक्षेप घ्यायला आयतेच मुद्दे मिळू शकतात.

२००१ सालच्या एका लष्करी ऑपरेशनमध्ये पाकिस्तानबरोबरच्या नियंत्रणरेषेपलिकडे जाऊन भारतीय सैन्याच्या तुकडीने दहशतवाद्यांची केंद्रे उध्वस्त केली. एवढेच नाही तर कुठलाही पुरावा न ठेवता आपले सैनिक परत आले. याबाबतच्या बातम्या माध्यमांतून आल्यावर सैन्याच्या प्रवक्त्यांनी वा संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला नाही.

त्यावेळी पाकिस्तानात जनरल मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली लष्करी राजवट होती. मुशर्रफ हे युद्धखोर म्हणून ओळखले जात. या ऑपरेशनला परवानगी दिल्याबद्दल तत्कालीन सरकारचा अभिमान वाटतो.

चिनार's picture

18 Jun 2015 - 10:44 am | चिनार

श्रीरंग ,

परराष्ट्रधोरण व संरक्षणधोरण हे विषय कुठल्याही पक्षाचे सरकार निष्काळजीपणे हाताळत नसते यावर माझा ठाम विश्वास आहे.

मान्य ! पण प्रश्न फक्त निष्काळजी असण्याचा नाहीये. अनुभवहीनता किंवा अती आत्मविश्वास किंवा अजून काही यामुळे धोरण चुकू शकते. आणि याचा फटका कितीतरी वेळा भारताला बसला आहे. फक्त भारत पाकिस्तान संबंध जरी लक्षात घेतले तरी कित्येक वेळा बलाढ्य राष्ट्रांनी भारताला गोंजारून / चुचकारून मागल्या दाराने किवा नाकावर टिच्चून पाकिस्तानलाच मदत केलेली आहे. "आमचा परदेश दौरा खूप यशस्वी झाला", हे अभिमानाने सांगताना त्याचे दूरगामी परिणाम खरच आपल्याला फायदेशीर झाले का याचा विचार सरकारी पातळीवर केला जात असेल का ?

संरक्षण धोरणाविषयी बोलताना आपण बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा ह्या दोन्ही बाबींचा विचार केला पाहिजे. अंतर्गत सुरक्षा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते हे मान्य. पण सरकार खरच त्याविषयी इतके सजग असते तर देशाच्या मध्यवर्ती भागात नक्षलवाद फोफावला नसता.

इथे सरकार कोणत्या पक्षाचे आहे ते महत्वाचे नाही पण एकह्दे धोरण ठरवताना किंवा अंमलबजावणी करताना सरकारने त्या क्षेत्रातल्या अनुभवी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा

माहितगार's picture

18 Jun 2015 - 11:35 am | माहितगार

धोरण चुकू शकते

धोरण कुणाचेही चुकू शकते, इराकच्या बाबतीत धोरण सद्दाम हुसेनचेही चुकले आणि जॉर्ज बुशचेही चुकले, जॉर्ज बुशचे चुकलेले निस्तरायला बराक ओबामा निघाले पण ते त्यांना जमलेच असे नाही. त्यामुळे बलाढ्य लोक चुकत नाहीत असे नाही. स्वदेशीयांपुढे जाहीरपणे अभिमान दाखवणे ठिक पण देशाच्या नेत्याला स्वतःच्या देशाच्या प्रत्यक्ष मर्यादांची व्यवस्थीत जाणही हवी जी सद्दाम हुसेनने दाखवली नाही. वस्तुस्थितीत काही ठिकाणी बलाढ्य शक्तींपुढे वाकाव लागत.

भारतातयेणारे अतीरेकी असोत अथवा माओवादी परदेशात उत्पादीत शस्त्रे कोणत्या मार्गाने त्यांच्या पर्यंत पोहोचतात ? इतक्या वर्षांमध्ये केवळ एक पुरुलिया आर्म ड्रॉप केस धडधडीत रंगे हाथ शस्त्रास्त्र पुरवणार्‍या गुन्हेगारांसह पकडली गेली. गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात एकमेकांचा कट्ट्रर विद्वेष करणार्‍या ब्रिटन आणि रशिया या दोन्ही देशांनी अत्यंत आऊट ऑफ द वे जाऊन भारत सरकारकडे रदबदली करून त्या प्रकरणातील गुन्हेगार सोडवून घेतले. ते गुन्हेगार सोडवले जाताना भारतात केंद्रसरकारात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे होती. (चुभूदेघे) इतर बाबीत एक मेकांवर धावून जाणारे विरोधी पक्ष पण पुरुलिया केस मधील गुन्हेगार सोडवले जाण्याबाबत कुठे काही वाच्यता होते का ? महासत्तांचे दबाव असतात आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्व काही तुम्हाला हवे तसेच होते असे नाही महासत्तांचे दबाव बर्‍याचदा स्विकारावे लागतात. काही वेळा कमी बलाढ्य देशांचेही दबाव स्विकारावे लागतात.

आंतरराष्ट्रीय राजकारणात धोरणे चुकण्याची किंमत हि जबर असू शकते हे खरे. पण यात सर्वात महत्वाचे प्रत्यक्षात तुमचा स्वतःचा देश बलाढ्य असेल तर धोरणे कुठे चुकली तरी पचवता येतात. स्वतःचा देश आर्थीक आणि आणि सामरीक दृष्ट्या बलाढ्य व्हावा यासाठी पोकळ वल्गना या पर्याय असू शकत नाहीत.

लिहिताना जरासे आवांतर झाले असण्याची शक्यता वाटते त्यासाठी क्षमस्व

आंतरराष्ट्रीय काय मलातर गल्लीतले राजकारण सुद्धा कळत नाही . पण खालील वाक्य सर्व स्तराच्या राजकारणाला लागू पडत असाव.
In politics there are no close friends and no permanent enemies !
आणि इथेच कुठेतरी आपल्या देशाची गफलत होत असावी असे प्रांजळ मत

माहितगार's picture

18 Jun 2015 - 1:12 pm | माहितगार

In politics there are no close friends and no permanent enemies ! आणि इथेच कुठेतरी आपल्या देशाची गफलत होत असावी असे प्रांजळ मत

आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्रश्न भावनेवर खूपजास्त अवलंबून राहू शकत नाहीत. In politics there are no close friends and no permanent enemies ! हे आपण म्हणता ते बरोबर आहे. स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळात भारताचे आंतरराष्ट्रीय राजकारण प्रॅक्टीकलपेक्षा तत्वाला अधिक धरून होते. नरसिंहराव उत्तर काळात यात सावकाश पण बराच बदल होत आला आहे असे वाटते. तुम्हाला तुमच्या (शब्दशः नव्हे) तत्वाला चिटकून राहता येत नाही हि एक अप्रत्यक्ष हारच असते. त्यामुळे राजकारणात तत्व आणि प्रॅक्टीकल यात कुठे तरी एक समतोल साधला जावयास हवा, कोणतेही एक टोक गाठणे सर्वोत्तम ठरत नसावे.

स्वराजित's picture

17 Jun 2015 - 1:30 pm | स्वराजित
लिओ's picture

19 Jun 2015 - 6:00 pm | लिओ

@स्पंदना

तुम्हि जी प्रतिक्रिया हितेशला दिली आहे त्यावर काहि बोलु ईच्छीतो

आपली प्रतिक्रिया होती

"" या सरकारान्नी शिरच्छेद करुन पाथवलेल्या सैनिकांबद्दल काय भुमिका घेतली होती हे जरा आठवा बघू हितेस?
साधे श्बदसुद्धा कडक नव्हते विरोधाचे ""

येथे म्यानमार मधील कारवाई वर चर्चा सुरु आहे इतर संबधित मुद्दे पण चर्चिले गेले. शिरच्छेद करुन पाथवलेल्या सैनिकांबद्दल तत्कालीन सरकारने काय भुमिका घेतली हे तुम्ही सांगितले , तत्कालीन विरोधी पक्षाने / पक्षाच्या नेत्यांनी सरकारकडे काय मागणी केली ? हे शोधा. व येथे सांगा.

आपण अथवा कोणीहि म. टा. दिनाक २६ जुलै २०१४ (link : http://maharashtratimes.indiatimes.com/archivelist.cms?year=2014&month=7...) उघडुन " संजय राऊत " यांच्याविषयी एक बातमी आहे ती वाचा. (संबधित बातमीविषयी धागा करण्याची बिलकुल इच्छा नाही. )

आपण कितीही वादविवाद केले तर कोणतेही सत्ताधीश मनासारखे व तत्कालीन परिस्थितीनुसार वागतात. म. टा. बातमी हास्यास्पद होती वगैरे बोलले तरी नाकारु शकत नाहि.

लिओ's picture

5 Jan 2016 - 9:49 pm | लिओ

चर्चा येथुन सुरु व्हावी का / नवीन धागा निघावा ???

श्रीरंग_जोशी's picture

5 Jan 2016 - 9:55 pm | श्रीरंग_जोशी

या दोन्ही घटना पूर्णपणे वेगळ्या असल्याने पठाणकोट एअरबेसवरील अतिरेकी हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी नवा धागा योग्य राहील.

धाग्यातला मजकूर त्रोटक नसावा ही अपेक्षा.