सल्ला पाहीजे

जयंत माळी's picture
जयंत माळी in काथ्याकूट
9 Jun 2015 - 7:38 pm
गाभा: 

माझी 12 वी 2013 ला झाली
नंतर मी ENGINEERING ला प्रवेश घेतला पण प्रथम वर्षात नापास झालो.
मी ENGINEERING सोडतोय
कृपया इतर काही संधीचे
मार्गदर्शन करावे

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 7:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सोडणं अत्यावश्यक आहे का? तु कुठे कमी पडतो आहेस ह्याचा विचार केला आहेस का? अगदी सोडायचचं असेल तर मग बी.एस.सी. बी.सी.एस. हे मेनस्ट्रीम ऑप्शन आहेत. तुझ्या आवडीनिवडी काय आहेत?

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 7:49 pm | श्रीरंग_जोशी

जी मंडळी बॅकलॉग क्लिअर करतात तीही आपल्यासारखीच हाडामासाचीच माणसं असतात. असाच विचार करून मी माझे एमसीए वर्ष वाया न घालवता चांगल्या गुणांनी वेळेत पूर्ण केले.

P&C (Probablilities & Combinatories) हा दुसर्‍या सेमचा पेपर शेवटून दुसर्‍या सेमला क्लिअर केला (४थ्या प्रयत्नात).

माझ्या शिक्षण प्रवासाबाबत येथे लिहिले आहे.

माझ्याहून अधिक अवलिया माणसांची उदाहरणे वाचण्यासाठी माझ्याउगा काहितरीच यांच्या खरडवह्यांमध्ये डोकवावे.

उगा काहितरीच's picture

12 Jun 2015 - 2:51 pm | उगा काहितरीच

श्रीरंगसर धन्यवाद ! माझा शैक्षणिक प्रवास कितीतरी खडतर होता. लवकरच त्यावर लिहीन्याचा मानस आहे.

कपिलमुनी's picture

9 Jun 2015 - 8:09 pm | कपिलमुनी

१. नापास झाला आहेस ?
२. या शाखेची आवड नाही म्हणून ?
३. लोग क्या कहेंगे ?
४. घरच्यांनी घातला म्हणून आलोय !
५. झेपत नाहीये ?

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 8:31 pm | श्रीरंग_जोशी

दत्ताजी शिंदे या शूर मराठा सरदाराचे 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे मृत्यूसमयीचे उद्गार हे आम्हा एमसीएच्या विद्यार्थ्यांचे अखंड प्रेरणास्थान होते.

एमसीएला प्रवेश घेतल्यावर कॉलेज सुरु होण्याच्या एक दिवस आधी तिथल्या होस्टेलला पोचलो तर बातमी कळली की आमच्या सिनियर बॅचने दुसर्‍या सेम मध्ये शून्य टक्के निकाल लावला आहे. त्या दिवसापासून पुढची तीन वर्षे मी अन माझे बहुतांश सहाध्यायी प्रेशर कुकरमधले आयुष्य जगलो.

एमसीएला सहा सेमिस्टर असतात मार्कलिस्टमध्ये दर वेळी ६ विषयांचे गुण अ‍ॅड होत राहतात. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट थेट सहाव्या (शेवटच्याच सेमिस्टरला) पाहायला मिळाली.

Statistics (विशेषकरून वर उल्लेखलेला P&C हा विषय) सुरुवातीला खूप अवघड वाटत होते. दोन अटेम्प्टस झाल्यावर कळू लागले तेव्हा तिसर्‍या वेळी फॉर्मुले पाठ नसल्याने गचकलो. चौथ्या वेळी उत्तरपत्रिका मिळाल्यावर महत्प्रयासाने पाठ केलेले फॉर्मुले शेवटच्या रफ पानावर लिहून काढले होते. जेणे करून प्रश्न सोडवताना गोंधळ उडणार नाही.

नववीपासून पाठांतर जमत नसल्याने बरेच शैक्षणिक नुकसान झाले फक्त वर्ष वाया गेले नव्हते. स्वतःच्या आळसावर अन भितीवर मात करून आव्हानाला थेट सामोरे गेल्यानेच तावून सुलाखून बाहेर पडलो.

धाग्यात खूपच त्रोटक पणे लिहिले असल्याने नेमकेपणाने काही सांगू शकत नाही. पण प्रामाणिक प्रयत्न केल्यास अशक्य असे काहीच नाही. आव्हानाचा यशस्वीपणे सामना केल्यास आयुष्यभरासाठी आत्मविश्वासाची पुंजी जमा होते.

अप्पा जोगळेकर's picture

9 Jun 2015 - 9:21 pm | अप्पा जोगळेकर

नमस्कार जयंत.
हा माझा स्वानुभव.
वर्ष २००२-२००३. मी बारावीपर्यंत स्वतःला तथाकथित हुशार समजणारा मुलगा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात नापास झालो.
पहिली सेम - ५ पैकी ५ विषयात फेल. मेकॅनिक्स - ५ मार्क, बीईई - १० मार्क, अप्लाईड सायन्स - ३४, मॅथ्स - ३१, सी प्रोग्रामिंग - २७.
दुसर्‍या सेमला १० पेपर दिले आणि ४ च क्लिअर झाले. ५ केटी रुलमुळे वर्ष वाया जाणार हे निश्चित झाले.
घरी आलो. बराच विचार करुन बापाला सांगितले की मी शिक्षण सोडणार. कांदे-बटाटे विकणारा अड्त्या होईन किंवा दुधाची डेअरी काढेन.
बापाचा सल्ला - आणखीन एक वर्ष कसून प्रयत्न कर. नाहीच जमलं तर बिनधास्त पणे बटाटे विक. मी अडवणार नाही.
मी सल्ला ऐकला आणि २००७ मधे प्रथम वर्गात उत्तीर्ण झालो. आमच्या कॉलेजमधे कँपस इंटर्व्हू होत नसत. तरीही २३ ऑगस्टला निकाल लागला आणि २७ ऑगस्टला नोकरी मिळालीसुद्धा.
गेल्या ७-८ वर्षात बर्‍यापैकी व्यावसायिक यश मिळवले आहे. पुढचे ठाउक नाही.

माझ्या माहितीत २-३ ड्रॉप लागूनदेखील नंतर प्रचंड यश मिळवल्याची उदाहरणे आहेत.

आणखीनेक प्रश्न स्वतःलाच विचार. हे क्षेत्र सोडून दुसरीकडे गेलास आणि तिथेही अपयश आले तर तेही सोडून देणार का ?
अप्स अ‍ॅन्ड डाउन्स इज पार्ट ऑफ द गेम.

थोड्याफार फरकाने माझेपण अप्पा साहेबंसारखेच झाले. माझी पूर्ण ऑल क्लिअरची मार्कलिस्ट शेवटल्या वर्षाला पाहायला मिळाली. फक्त मला जास्तीचे वर्ष लागले नाही आणि मी engineering सोडण्याचा कधीच विचार केला नाही. गेल्या ७-८ वर्षात मी सुद्धा बर्यापैकी प्रगती केली आहे.
दुसरी काही आवड असल्यास engineering जरूर सोडावे. पण जमत नाही हा विचार करून सोडू नये. एक नक्की सांगेल की engineering पूर्ण केल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटण्याचे चान्सेस जास्त असतात. कुठे न कुठे नोकरी जरूर मिळते.

नाखु's picture

10 Jun 2015 - 9:35 am | नाखु

दोघांचेही अभिनंदन.

शिकताना चुकतो तोच प्रयत्नार्थी
चुकांतून शिकतो तोच विद्यार्थी
चुकांबद्दल इतरांना सावध करतो तो साथी

आनंदीत नाखुस

स्वप्निल पेटकर's picture

9 Jun 2015 - 9:55 pm | स्वप्निल पेटकर

जर तुम्हाला इंटरेस्ट असेल इंजीनियरिंग मधे किंवा वाटत असेल की या फील्ड मधे तुम्ही काही करू शकता तर बिलकुल सोडू नका......आणि जर नसेल तर नका करू.....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 11:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तु उत्तम कन्सल्टंट बनु शकशील. आत्ताचं दहावी झालास ना? ह्या करियर पाथकडे पण लक्ष दे हो.

मी वाणिज्य शाखेची पदवी घेऊन मग संगणक व्यवस्थापन घेतले उच्च शिक्षणासाठी. त्यावेळी असेच खूप जड गेले हे शिक्षण आणि त्याबरोबर विषय राहणे इत्यादी या सर्व गोष्टी झाल्या. शेवटी असा विचार केला की हे काही रॉकेट सायन्स नव्हे इतरांना जमू शकते आपल्यालाही जमेल. मग मात्र नेटाने अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण केला. आता मा. त क्षेत्रात चांगला कामाचा अनुभव गाठीशी आहे.

सेम माझ्या सारखे झाले आहे. मी पन 2013 ल 12 वी दिली . physics chemestry maths काही येत नव्हते. पुन्हा fy डिप्लोमा घेतला. जिद्दीने अभ्यास करून all clear झालो. आज result लागला 80% पडले शिवाय प्रथम क्रमांक... जिद्द नको सोडू भाऊ तुला काय अडचण आहे ते सांग

संदीप डांगे's picture

10 Jun 2015 - 9:12 am | संदीप डांगे

अभिनंदन लालगरूड,

बाकी ते इंग्लिश स्पीकींगचे कुठवर आले?

लालगरूड's picture

10 Jun 2015 - 5:00 pm | लालगरूड

रोज प्रयत्न करतोय ... :-D

स्पंदना's picture

10 Jun 2015 - 4:47 am | स्पंदना

बाबा धागा टाकुन गायबलाय!!

रुस्तम's picture

10 Jun 2015 - 11:54 am | रुस्तम

बाबा गायबलाय!!

एक ओटो रिपेअरिंगचा कोर्स करा अन धंधा टाका.

कार कंपनीत NCTVT दिड वर्षाचा कोर्स केला तरी खुप कामाचा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

या जगात पडला नाही असा माणूस नाही. जो पडल्यावर उठून उभा राहतो, कपड्यांवरची माती झटकतो आणि परत धावू लागतो तो यशस्वी होतो.

इंजिनियरींगची अजिबात आवड नाही, पण घरच्यांच्या अथवा मित्रांच्या दबावाने इंजिनियरींग गेला असशील तर जरूर वाट बदल... पण नविन आवडती वाट कोणती ते आधी ठरवून, आणि त्या वाटेवरच्या प्रवासाचा नीट आराखडा बनवून मग तसे कर. एखाद्या चांगल्या व्यवसाय समुपदेशकाचा सल्लाही उपयोगी पडू शकेल.

मधुरा देशपांडे's picture

10 Jun 2015 - 6:09 pm | मधुरा देशपांडे

+११११
सहमत.
चिगोंची ही प्रेरणादायी लेखमाला अवश्य वाचा.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2015 - 9:10 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद...

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jun 2015 - 1:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

माझ्या मते एखाद वेळी नापास झालो म्हणुन ईंजिनीअरींग सोडणारा माणुस फक्त खालील व्यवसायांसारखे काहीतरी करु शकतो.

तुम्हाला बाकी काहीच जमणार नाही.

उगाच वरचे फुकटचे सल्ले ऐकुन वेळ वाया घालवू नका.

१. वडापावची गाडी टाकणे,
२. रेल्वे स्टेशन,एस्टी स्टँडवर हमाली करणे,
३. रस्त्यावर / देवळाजवळा भिक मागणे,
४. जुना पुराणा डबा बाटली भंगारची हतगाडी लावणे,
५. कचराकुंड्यांमधल प्लॅस्टीक किंवा लोखंडाच्या वस्तु गोळा करुन भंगारवाल्यांना विकणे,
६. हातभट्टी बनवणे व विकणे, दारुचे फुगे पोचवणे
७. एखाद्या नगरसेवकाचा पंटर म्हणुन हप्ते गोळाकरत गावभर बोंबलत फिरणे,
८. बस रेल्वे किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी पाकिट मारणे,
९. घरफोड्या करणे,
१०. रात्री बेरात्री एकट्या दुकट्या माणसाला चाकु दाखवुन लुबाडणे
११. दुचाकी मधले पेट्रोल चोरणे,
१२. रस्त्यावरुन चालणार्‍या बायकांच्या गळ्यातल्या सोनसाखळ्या हिसकावणे,
१३. कारच्या काचा फोडून आतले कारटेप व इतर मौल्यवान चिजवस्तु पळवणे
१४. मार्केट यार्डातल्या सडक्या / फेकलेल्या भाज्या गोळा करुन विकणे
१५. दुध पिशवीतले दुध काढुन पाणी भरणे व पिशवी परत सील करणे
१६. सिग्नल वर गजरे / सांताक्लॉजच्या टोप्या / गुलाबाची फुले ई. विकणे
१७. सिग्नल ला उभ्या असलेली कार स्वतःच्या शर्टाने पुसणे व मग कारवाल्या कडे दिनवाणे बघत त्याच्या काचेवर टकटक करुन भुक लागली अशा खुणा करत पैसे मागणे.
१८. एखाद्या प्रसिध्द देवळाच्या बाहेर उभे राहुन जाणार्‍या येणार्‍यांना गंध / टिळा इ. लावणे व त्यांच्या समोर थाळी वाजवणे.
१९. आळंदी, पंढरपुर, नाशिक येथे रहात असलात तर नदिमधे चाळणी टाकत नदीमधली वाळु चाळणे व लोकांनी नदित टाकलेले पैसे गोळा करणे.
२०. रेल्वे मधे डोळ्याला काळा गॉगल लावुन हातात लाल पांढरी काठी घेउन मान वाकडी करत "इट्ट्ला ऑज्युब तुजे सॉरकॉर" अशी गाणी म्हणत फिरणे
२१. वरचे काहीच जमले नाही तर लग्न करणे. बायकोला कामाला लावणे व तिच्या पैशाने दारु पिउन तिला रोज शिवीगाळ व मारहाण करणे.

तज्ञ मिपाकर या यादित भर घालतीलच.

पैजारबुवा,

सामान्यनागरिक's picture

10 Jun 2015 - 2:28 pm | सामान्यनागरिक

नापास होणार्यास हो ईतके मार्ग उपलब्ध आहेत हे बघुन थक्क झालो !!!
आमच्या वेळी पिताश्रींचे जोडे खाणे आणि चूपचाप परत जोमाने अभ्यासाला लागणे हाच एक पर्याय होता.

दुसर्यांदा नापास झाल्यावर पिताश्रींनी पार्श्वभागावर लत्ताप्रहार करुन पर्याय क्र. 2 या व्यवसायात जबरदस्तीने ढकलले असते. या भीतीनेच आम्ही नापास होऊ शकलो नाही.

एकुण काय हल्लीची पिढी भाग्यवान आहे.......

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jun 2015 - 2:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

नुसतीच भाग्यवान नाही तर धाडसी आणि निर्णयक्षम देखील,

पैजारबुवा,

प्रसाद१९७१'s picture

10 Jun 2015 - 3:22 pm | प्रसाद१९७१

ज्ञानोबा - पहीली २ कामे सुद्धा जमण्यासारखी नाहीत. ती काढुन टाका, बाकीची लिस्ट पर्फेक्ट

मोहनराव's picture

10 Jun 2015 - 3:45 pm | मोहनराव

जबराट मार्गदर्शन पैजारबुवा...
बाबाजी आता तर हजर व्हा!

अजून काही करिअर मार्गदर्शन:
-सोसायट्यांचे पाण्याचे मिटर चोरणे.
-गटारांवरची लोखंडी झाकणं चोरुन विकणे.
-कारचा लोगो पळवणे.यात चहापाणी बिडीकाडी सुटेल.
-टोलनाक्यावर उभे राहुन पळणार्या गाड्या अडवणे.
-सिग्नलवर अफू घातलेले मूल घेऊन उभे राहाणे.
-सोनाराच्या दुकानाबाहेरच्या गटारात चाळणी घेऊन काहीतरी शोधणे.
-कच-याच्या घंटागाडीवर राजाच्या ऐटीत कच-यावर बसुन गावभर फिरणे.

श्रीरंग_जोशी's picture

11 Jun 2015 - 5:34 am | श्रीरंग_जोशी

पैजारबुवा,

हा प्रतिसाद पटला नाही. धागाकर्त्यासारखे स्वतःच्या अपयशाबद्दल त्यातून जात असताना लिहायचे धाडस फार कमी लोक दाखवू शकतात. त्याने मदतच मागितली आहे काही वाईट काम केलेले नाही.

नर्मविनोदी शैलीने एखाद्याची थोडीफार खेचणे समजू शकतो. पण हे म्हणजे अतीच झाले.

खटपट्या's picture

11 Jun 2015 - 7:03 am | खटपट्या

सहमत..

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jun 2015 - 12:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

माझा प्रतिसाद जर तुम्हाला विनोदी वगेरे वाटला असेल तर ते मा़झे अपयश आहे हे मी कबुल करतो.

सदर प्रतिसाद हा लेखकाची खेचण्यासाठी दिलेला नसून त्याची कानउघाडणी करण्यासाठीच लिहीला होता. माझ्या प्रतिसादाच्या प्रत्येक वाक्यात उपरोध / उपहास ठासून भरलेला आहे.

अशा प्रकारे जाहिर पणे मार्गदर्शन मागण्याचा प्रकार म्हणजे केवळ सहानुभूती मिळवण्या साठी केलेला एक प्रयत्न आहे.

इंजिनिअरिंग म्हणजे तेथे शिकवल्या जाणार्‍या विषयांबरोबरच जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य यांचीही परिक्षा असते, हे लेखकाला माहित नव्हते असे समजणे फारच बाळबोध ठरेल. याउपरही पहिल्याच अपयशानंतर जर लेखक हातपाय गाळून शाखा बदलायचा विचार करत असेल तर अशा माणसाला काय बरे सल्ला द्यावा?

अशांना दोन थपडा देउन परत अभ्यासाला लावणे गरजेचे असते आणि मी माझ्या प्रतिसादामधून तोच प्रयत्न केला आहे असे मला प्रामाणिक पणे वाटते.

(टवाऴया कुठे कराव्या याची जाणिव असलेला) पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

12 Jun 2015 - 5:05 pm | श्रीरंग_जोशी

जे काही लिहिले होते ते थोडक्यात अन प्रतिकात्मक स्वरूपात लिहायला हवे होते असे म्हणायचे होते.
ते नेमकेपणाने सांगू शकलो नाही हे माझे अपयश.

इंजिनिअरिंगच्या शिक्षणाच्या आव्हानाला यशस्वीपणे तोंड दिल्यामुळे माणसाला जो आत्मविश्वास मिळतो तो भविष्यातल्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी फारच मोलाच असतो याबाबत सहमत.

अजुनही कामाच्या ठिकाणी प्रथमदर्शनी अत्यंत क्लिष्ट वाटणारी फंक्श्नॅलिटी कोडिंगद्वारे इंप्लिमेंट करायची असते तेव्हा चार अटेम्प्ट मध्ये आपण P&C क्लिअर करू शकतो तर ही गोष्टही नक्कीच करू शकतो हा आत्मविश्वास बळ देतो.

- शिक्षणाने इंजिनिअर नसलेला रंगा

सतिश गावडे's picture

12 Jun 2015 - 6:24 pm | सतिश गावडे

इंजिनिअरिंग म्हणजे तेथे शिकवल्या जाणार्‍या विषयांबरोबरच जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य यांचीही परिक्षा असते

याच कारणासाठी प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार वगळता इतर क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकिच्या पदवीधराला प्राधान्य दिले जाते.

संदीप डांगे's picture

13 Jun 2015 - 12:43 am | संदीप डांगे

अच्छा तर जिद्द, चिकाटी,कष्ट आणि मनोधैर्य ह्याची इतर कुठल्याही क्षेत्रातल्या पदवीधराने परिक्षा दिलेली नसते. तुमचे विधान जरा चमत्कारिक नाही का वाटत?

असो.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2015 - 12:57 am | टवाळ कार्टा

you can't compare engineering with anything else (except MBBS and army) dude

संदीप डांगे's picture

13 Jun 2015 - 1:19 am | संदीप डांगे

हा तुमचा भ्रम आहे.

चिगो's picture

13 Jun 2015 - 9:26 pm | चिगो

बाकी इंजिनीअर्स त्यांच्या 'इंजिनीअरींग'बद्दल फारच म्हणजे फारच 'टच्ची' असतात, हा अनुभव आहे.. आणि हेच लोक '४०ची किंमत फक्त एक इंजिनीअरच जाणू शकतो' वाला तो व्हॉट्सअ‍ॅपवरचा जोक फिरवत असतात, हेपण एक निरीक्षण..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jun 2015 - 10:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

४० मार्क की किमत आप क्या जानो चिगोबाबु =))

चिगो's picture

13 Jun 2015 - 10:54 pm | चिगो

४० मार्क की किमत आप क्या जानो चिगोबाबु =))

आमचं ४५ की काय होतं पासिंग.. त्यामुळं ४०वर लक्ष नसायचं हो. तशीही बरीच वर्षं झाली आता.. वयपण झालंय अंमळ.. ;-)

श्रीरंग_जोशी's picture

14 Jun 2015 - 8:53 pm | श्रीरंग_जोशी

४० मार्क की किमत आम्हालाही चांगलीच ठाऊक आहे.

आमचेही पासिंग मार्क्स ४०च असायचे पण ते ८० मार्कांच्या पेपरात. केस स्टडीजचे प्रश्न असलेल्या पेपरमध्ये ३६ मार्क मिळून बॅक आला की खूप वैताग वाटायचा. माझ्या एका अनुभवात दुसर्‍या प्रयत्नात पहिल्या वेळ इतका चांगला न सोडवूनही ४४ मार्क्स मिळाले होते.

सतिश गावडे's picture

14 Jun 2015 - 9:05 pm | सतिश गावडे

इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत. त्यामुळे इतक्या सार्‍या काहिश्या कुजकट वाटणार्‍या प्रतिसादांचं काही वाटलं नाही. :)

रंगाभाऊ, हा प्रतिसाद व्यक्तिशः तुम्हाला नाही. उपप्रतिसाद देण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचं फक्त शेपुट पकडलंय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jun 2015 - 9:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. त्यांची शेपटी आमच्या डोक्यास जोडलेली आहे.

श्रीरंग_जोशी's picture

14 Jun 2015 - 9:27 pm | श्रीरंग_जोशी

त्यांची शेपटी आमच्या डोक्यास जोडलेली आहे.

अफाट वाक्य आहे हे...

त्यांची नाडी xxxx xxxx जोडलेली आहे असे काहीसे विडंबन झकास होईल...

संदीप डांगे's picture

14 Jun 2015 - 11:35 pm | संदीप डांगे

इंजिनीयरींग करणं काय असतं हे इंजिनीयरिंग ने केलेले कधीच समजू शकणार नाहीत.

इंजिनीयरिंग केलेल्यांना, इंजिनीअर नसणार्‍या इतरांनी काय केलं हे कसं समजू शकतं? की इंजिनीअरींग केल्यावर सगळ्या क्षेत्राचं ज्ञान आपोआप येतं असं काही आहे का?

मला काहीही कुजकट टोमणे वैगेरे मारायचे नाही. आपण केलं तेच भारी, बाकीच्यांना काय सहज पदव्या मिळतात असा सूर तुमच्या, कॅप्टन आणि टकाच्या प्रतिसादात आहे. तुम्ही इंजिनीअरींगची पदवी बी.एस.सी. बीकॉम, बी.ए. लोकांशी कंपेअर करू नये असं वाटतं. याशिवाय जगात इतरही अनेक सुपरटेक्निकल क्षेत्रं आहेत जिथे तुम्ही नमूद केलेलं धैर्य चिकाटी वैगेरे सगळं लागतं आणि शिकणार्‍याला अंगी बाणवावं लागतं. आणि ते इंजिनीअर किंवा डॉक्टर नसतात.

मी बर्‍याच शहरांमधून फिरलोय. प्रत्येक शहरात राहणारा तिथला स्थानिक जो कधी शहर सोडून बाहेर गेला नाही तो आपल्या ट्रॅफिकच्या गोंधळाबद्दल हेच वाक्य म्हणतो, "इथे तुम्ही गाडी चालवली तर जगाच्या पाठीवर कुठंही चालवण्याची क्षमता तुमच्यात आहे असं समजा".

इंजिनीअर लोकांचही असंच झालंय का? ढासळणार्‍या धैर्याची पातळी उंचावून धरण्यासाठी असेल तर ठिक आहे. पण इतरांसोबत कंपेअर करू नका असं म्हणणं जरा अतिच होतंय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jun 2015 - 6:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी प्रतिसादामधे आधीचं लिहिलं आहे की मला कुठल्याही शाखेच्या पदवीला किंवा पदविकेला तुच्छ लेखायचं नाही. प्रत्येक शाखा आपल्या विशेष कौशल्याने अर्थव्यवस्थेचा कणा मजबुत करत असते. इंजिनिअरिंग ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते. असं क्रॉसब्रँचिंग बाकीच्या विद्याशाखांमधे कमी प्रमाणात आढळतं एवढचं म्हणायचं आहे. वाद नको.

संदीप डांगे's picture

15 Jun 2015 - 10:08 am | संदीप डांगे

वाद नकोच आहे. फक्त सरधोपट विधानांबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

असो.


ज्याच्यामधे तुम्हाला क्रॉसब्रँच विषय हाताळायलाच लागतात. फक्त पासिंग पुरते नाही तर पुढचं आख्खं करिअर अवघडतेच्या चढत्या क्रमानी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला लागते.

हेच माझ्याही क्षेत्रात होतंच. किंबहुना असं नाही राहिलं तर एका झटक्यात करीअर संपतं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Jun 2015 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दुसर्‍या शाखांच्या पदवीधरांना तुच्छ लेखायचा वगैरे प्रयत्न करत नाहीये कारण प्रत्येक शाखा अर्थव्यवस्थेचा कणा आपल्या विशेष कौशल्यांनी मजबुत करत असते. पण एक गोष्ट मात्र अगदी विशेष फरकानी जाणवते ती म्हणजे "कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन मेकिंग एबिलिटी". हि आणि अ‍ॅप्टिट्युड हा इंजिनिअरिंग पदवीधरांमधे जास्त प्रमाणामधे असतो. ज्याची बाकीच्या विद्याशाखांना वेगळी तयारी करुन घ्यायला लागते तो गुण इंजिनिअरिंगमधे आपोआप विकसित होत जातो. हा फरक मिटवणेबल असतो. पण त्याला कष्टाची तयारी पाहिजे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Jun 2015 - 7:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पैजारबुवा प्रतिसाद आवडला नाही. विनोद/ उपरोध म्हणुन एक वेळ समजु शकतो. पण करिअरसारख्या आयुष्य घडवु बिघडवु शकणार्‍या मुद्द्यावर असं नको.

इरसाल's picture

10 Jun 2015 - 1:51 pm | इरसाल

सिग्नलला, लाल, गुलाबी काळा पांढरा रुमाल धरुन उभे रहाणे.

चिनार's picture

10 Jun 2015 - 3:46 pm | चिनार

अगा अयायायायायाया ...
बेकार हाणलीत की हो..

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 4:08 pm | सतिश गावडे

हे काय असतं हो? डोक्यात काही उजेड पडत नाही.

चिनार's picture

10 Jun 2015 - 4:13 pm | चिनार

male prostitution ! हे याचं सभ्य नाव आहे.
गावरान नाव विचारू नको

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 4:18 pm | सतिश गावडे

=))

इरसाल's picture

10 Jun 2015 - 4:46 pm | इरसाल

इतक्यात दहीहंडी फोडाची काय गरज व्हती का ?

hitesh's picture

13 Jun 2015 - 6:46 am | hitesh

त्याला इतके रुमाल का ल्लागतात ?

ह्या क्षेत्रातली एवढी डीट्टेल माहिती नाही रे हितेश मला..एखाद्याच काम कमी रुमालात होत असेल तर मला काहीही हरकत नाही..

इरसाल's picture

16 Jun 2015 - 9:41 am | इरसाल

तुमचं ते पेटंट वाक्य राहिलेच......पंत......करा.

ह्यावेळी सांभाळून घ्या इरसाल भाऊ..
आधीच , "इतके रुमाल का लागतात ते तुमच्या युवराजांना विचारा" असा सल्ला देण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे मी !!

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 4:14 pm | सिरुसेरि

"मी ENGINEERING सोडतोय" -- यावर स्टीव वॉ म्हणाला असता - ' तु तर वर्ल्ड्कपच सोडतोयस ' .
बाकी , ENGINEERING कडे केवळ नोकरीची संधी म्हणुन न बघता , त्या पदवी अभ्यासक्रमामुळे वेगवेगळे विषय शिकण्याची संधी म्हणुन बघ व कार्यरत हो .

नाखु's picture

10 Jun 2015 - 4:15 pm | नाखु

बाबांचा निसो झाला काय?

साशंक नाखु

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 4:26 pm | सतिश गावडे

शिक्षण संपल्यानंतर नोकरी करणे हाच उद्देश असेल तर अभियांत्रिकीचे शिक्षण सर्वात उत्तम.
नोकरीच्या जेव्हढ्या संधी अभियांत्रिकिच्या शिक्षणामुळे उपलब्ध होतात तेव्हढ्या संधी जगाच्या पाठीवर इतर कुठल्याच शिक्षणाने मिळत नाहीत.

केटी, ब्याकलोग, मार्क्स वगैरे लोक पहिल्या नोकरीतच विचारतात. ती एकदा मिळाली की नंतर काळं कुत्रंही या गोष्टी विचारत नाही. फक्त नोकरी बदलताना आपण शिक्षनाने इंजिनियर आहोत हे सिद्ध करण्यासाठी पदवीचा कागद व्हेरिफ़िकेशनसाठी द्यावा लागतो एव्हढंच.

सांगण्याचा उद्देश हा की पुढे जाऊन नोकरीच करायची असेल तर केटया घेत, नापास होत का होईना, पण शिक्षन पुर्ण करा.

आनंदी गोपाळ's picture

10 Jun 2015 - 4:58 pm | आनंदी गोपाळ

त्या बिचार्‍या १९-२० वर्षांच्या पोराला काय काय सल्ले द्यायलात रे बाबानो...

जयंता,
नापास झालास ही अडचण सोडून इतर काही प्रॉब्लेम आहेत का रे? फी भरायची अडचण वगैरे? तसे असेल तर मोकळं लिही, घरचीच मंडळी आहे सगळी इथे.

लालगरूड's picture

10 Jun 2015 - 5:07 pm | लालगरूड

लेखक कुठे गेला. :O सगळेच मिपाकर engineer आहे का इथले :-D :-D

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 5:10 pm | सतिश गावडे

तुमच्या या प्रतिसादाच्या बरोबर वरचा प्रतिसाद डॉक्टरांचा आहे.

श्रीरंग_जोशी's picture

10 Jun 2015 - 6:12 pm | श्रीरंग_जोशी

शिक्षणाने मी इंजिनिअर नाहीये.

नाव आडनाव's picture

10 Jun 2015 - 5:54 pm | नाव आडनाव

मित्रा, तुला इंजीनिअरिंग अजिबात आवडत नसेल / घरचांनी बळजबरी अ‍ॅडमिशन घ्यायला लावलं असेल तर गोष्ट वेगळी.

पण नापास झाला हे एकंच कारण असलं तर अजिबात सोडू नको. माझ्या बॅचला आम्ही ७ जण नापास न होता इंजीनिअर झालो, पण आता १० वर्षानंतर बघितलं तर ह्या ७ जणांपेक्षा बाकीच्या बऱ्याच मित्रांना, जे नापास झाले होते, चांगला पगार आहे, चांगल्या नोकऱ्या आहेत. पहिल्या नोकरीनंतर कोणाला तुझ्या मार्कांचं काय पडलेलं नसतं.

इंजीनिअरिंग ब्रांच चा तुला प्रॉब्लेम वाटत असला तर त्यातही तुला ४ वर्षाच्या डिग्री नंतर ऑप्शन आहेतच. तुला सोफ्टवेअर चा ऑप्शन आहे. टी.ई.एस. (टेक्निकल एन्ट्री स्कीम), बरेच कोर्सेस आहेत ज्या साठी ४ वर्षांची डिग्री लागते. अजून बरेच ऑप्शन आहेत.

लोक काय बोलतील असं वाटत असेल तर ते तर एकदम सोडून दे, लै दिवस नाही लक्षात रहात लोकांच्या :) ४ वर्षानंतर चांगली नोकरी लागली तर ती लक्षात राहील नक्की.

बबन ताम्बे's picture

10 Jun 2015 - 8:10 pm | बबन ताम्बे

ते वाचताहेत ना हे सगळं?

ओके. माझ्याकडून दोन शब्द.

तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच असेल तर...
१. पहील्या वर्षी नापास झालात म्हणून नाउमेद होऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे.
जो विषय अवघड जात असेल त्याचा क्लास लावा.
२. चांगल्या मित्रां बरोबर रहाणे. लेक्चर बंक मारणा-या मित्रांची संगत सोडून देणे.
३.नियमीत अभ्यास करणे. पुस्तक हातात घेतल्यानंतर , झोप अथवा कंटाळा येत असेल तर निग्रहपुर्वक त्यावर मात करणे. वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला/औषधे घेणे.
४. सर्वात महत्वाचे - एकदा केलीली चूक पुन्हा न करणे.
५. उत्तम गुण मिळाले तर कदाचीत कँपस इन्टेर्व्हुमधेच सीलेक्ट व्हाल. नाही झाले तरीही इंजीनियर्सला अजूनही डीमांड आहे.

तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच नसेल तर,
१. अनिच्छेने इंजीनीयरींग करून पुढची ऐन उमेदीची वर्षे, पैसा वाया न घालवता आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेणे.
२. आवडीच्या क्षेत्रात मात्र झोकून देऊन उत्क्रूष्टरीत्या शिक्षण पुर्ण करणे.

भावा सोडायचच ठरवलं आहेस तर एक चान्स घेऊनच सोड. तु आत्ता १ च वर्ष वाय. डी. आहेस.
सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे. तु नक्की पास होशिल.
मि सोता फष्ट येर वाय.डी होतो पन नंतर परतेक वर्षी आल क्लेर विथ आबाव्ह ६० झालो ते हाच मंत्र वापरुन.
आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो.
भावा एकदाच नेटानं भिड परत, येश वाट बघतय दोन पावलावर.

सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे

आता ह्ये पन म्हाईत नसनारा म्हंजी मग त्यो विंजीनेरीगला का आला हो? ह्या असल्या गोष्टी त्यास्नी बारावीत कुनी सांगीतल्या नस्नार का ?

आन हल्ली पोरास्नी 'वन नाईट' म्हंजी कायतरी वंगाळ म्हाईत अस्तंय. उगा तसल्या गोष्टींची आट्वन करुन्श्यान दिऊ नगा.
आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो.
च्यायला, ह्या असल्या गोष्टी मास्तरं सांगत न्हाईत व्ह्य पयल्या लेक्चरामंदी ?

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2015 - 2:54 pm | टवाळ कार्टा

आन हल्ली पोरास्नी 'वन नाईट' म्हंजी कायतरी वंगाळ म्हाईत अस्तंय.

या बाबत आधीच्या पिढीतल्या लोकांना काय अर्थ माहित होता?

भीमराव's picture

12 Jun 2015 - 3:02 pm | भीमराव

@ कोमन म्यान
ते हायच वो पन हाजुक यक वेळ आठवन करुन दिली, उजळणी म्हणुन.
विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात.
आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा

विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात.

असेच्च वागायचे असेल तर नक्को करू इंजिनीअरींग...पुर्ण करायला खूप त्रास सुध्धा होईल आणि डोक्यात सुध्धा काहीही जाणार नाही...नावापुरते इंजिनीअर होशील

आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा

लोक काय बोलतात याला फाट्यावर मारायचे...सबमिशन वेळेत पूर्ण करण्यासारखे नाही दुसरे...जेव्हा दुसरे रात्र रात्र जागून सबमिशन पूर्ण करत असतात तेव्हा आपण तंगड्या पसरून लोळत पडलेलो असतो...इंटर्नल मध्ये कमी लागते तो बोनस

इरसाल's picture

12 Jun 2015 - 3:56 pm | इरसाल

हे कोमन म्यान काय हे ?

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2015 - 4:11 pm | टवाळ कार्टा

सगल्यांच्या तलवारी बसू शकतील अशी कॉमन म्यान

बॅटमॅन's picture

12 Jun 2015 - 4:41 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

मग खाटुक म्यान म्हणजे काय? खाटुकाची म्यान? हम्म...

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2015 - 4:51 pm | टवाळ कार्टा

नै...ती खाटूकची पर्सनल म्यान ;)

नाखु's picture

12 Jun 2015 - 5:55 pm | नाखु

तो "खाटुक कमॉन" चा अपभ्रंश आहे !!!!!

सरावाने दोन्ही क मधील एका क (चा) मोड ऊडाला !!! हा का ना का !!

बॅट्या दुखावला नाहीस ना रे !
आजकाल दुखावण्याची साथ आली आहे रे म्हणून विचार ना !

आला पावसाळा ! आरोग्य संभाळा !!
घोष वाक्य नाखुस

बॅटमॅन's picture

12 Jun 2015 - 6:32 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

नाखुस, तुमच्यावर रागवून चालेल कसं? रहायचंय म्हटलं आम्हांला इथं!

नाखु's picture

15 Jun 2015 - 9:28 am | नाखु

काळजी नसावी
मी स्वघोषीत प्रवक्ता * नाही त्या मुळे माझ्याकडून तुला कसलाही धोका+मोका नाही.

धन्यवाद
चिर्कुट नाखुस

*याचा सोदाहरण अर्थ गावडेसर लिखित "मिपा अर्थ्-अनर्थ मीमांसा आणि पदरमोड" या थोर ग्रंथात पान क्रं ५६ वर आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jun 2015 - 11:22 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ग्याजेट बेल्ट रे.

भीमराव's picture

12 Jun 2015 - 4:30 pm | भीमराव

सामान्य मानुस

बबन ताम्बे's picture

12 Jun 2015 - 4:48 pm | बबन ताम्बे

घाबरले की काय एव्हढे सल्ले पाहून?

की डायरेक्ट पुढच्या वर्षी पेढेच घेऊन येणारेत मिपाकरांना वाटायला?

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2015 - 4:53 pm | टवाळ कार्टा

पेढे???? =))

हो, पण तुमची शंका व्हॅलीड आहे. एका माहीतीतल्या पंटरचे इंजिनीयरींगचे इयर डाऊन मुलीत गुंतल्यामुळेच झाले आहे.
आता "गुंतल्यामुळे" या शब्दावर कोटी करायचा मोह टाळा . :-)

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2015 - 5:28 pm | टवाळ कार्टा

हा तो नव्हे :)

बबन ताम्बे's picture

12 Jun 2015 - 5:53 pm | बबन ताम्बे

पण त्यांनी खरे कारण कुठे सांगितलेय कशामुळे नापास झालेत म्हणून !

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2015 - 11:47 pm | टवाळ कार्टा

तेच तर ना...नाही संगीतले...तर मग आपण कोणताही निष्कर्श काढायला नक्कोच :)

जयंत माळी's picture

13 Jun 2015 - 11:02 am | जयंत माळी

धन्यवाद
आपल्या चांगल्या-वाईट सल्ल्यांचा विचार नक्कीच करेन.

स्टीव्ह जाॅब्ज चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायलाय का भाऊ?

सतिश गावडे's picture

14 Jun 2015 - 9:07 pm | सतिश गावडे

स्टीव्ह जाॅब्ज चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याआधी एकदा त्याचं अधिकृत चरित्र वाचावं. ते वाचल्यानंतर वाचणार्‍याचं मत बदलण्याची खुप शक्यता असते.

श्रीरंग_जोशी's picture

14 Jun 2015 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी

मिपाकर मृत्युन्जय यांच्या मला आलेल्या खरडीमुळे हे विचार मनात आले. ते इथे मांडावेसे वाटले.

मिपावर कुणी माहिती, मार्गदर्शन, मदत मागितली तर प्रतिसाद देणारे केवळ त्या व्यक्तिला केंद्रस्थानी ठेवूनच उत्तरे देतात असे नाही. याच धाग्यावर मी अन अनेकांनी लिहिलेले प्रतिसाद शिक्षण प्रवासात धक्के खाणार्‍या प्रत्येकाला प्रेरणा देऊ शकतात. एखाद्याला जेव्हा ठेच लागते तेव्हा आपल्या पूर्वीही इतरांना अशाच ठेचा लागल्या आहेत अन त्यातून ते शहाणे होवून निघाले आहेत ही बाब नक्कीच हिंमत वाढवणारी ठरते.

मिपाचे मिपाकर असलेले अन नसलेले वाचक पाहता अशा चर्चा किमान शेकडो किंवा कधी कधी हजारो लोक वाचत असतात. माझ्या ओळखीचे अनेक लोक बर्‍याच वर्षांपासून मिपा वाचतात आवडलेलं इतरांना सूचवतात. कदाचित त्यांनी आजवर मराठीतून एक वाक्यही टंकलं नसेल पण वाचनखंड मात्र पडत नसतो.

परंतु बहुधा काही जण केवळ धागाकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून प्रतिक्रिया देतात असेही दिसते. मी नवा असताना माझा तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता? हा अन काही महिन्यांपूर्वीचा मी उपवर तरुण असतो तर या काथ्याकुटांवरील काही प्रतिसाद वाचून असे वाटते की त्या प्रतिसादकांचे असे मत आहे की केवळ धागाकर्त्यालाच उर्जाबचत करायची आहे अन स्वतःचा विवाह जुळवायचा आहे :-) .

श्रीरंग_जोशी's picture

14 Jun 2015 - 9:48 pm | श्रीरंग_जोशी

आम्हाला अकरावीच्या इंग्रजीसाठी युवकभारती या पाठ्यपुस्तकात स्व. खुशवंतसिंह यांचा टेकिंग स्टडिज सिरियसली हा पाठ होता.

आपल्या नर्मविनोदी शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गांभीर्य वाढवण्याचा सल्ला दिला होता.

त्यात त्यांच्या आजीचे त्यांच्याबद्दलचे इंग्लंडवरून शिकून परत आल्यानंतरचे हिंदीतले वाक्य होते.

क्या पास करके आया पता नही पर टाइम बहुत पास करके आया है!

नमकिन's picture

15 Jun 2015 - 6:09 pm | नमकिन

उमेद व प्राण सोडु नकोस.