आणि ............... श्री रुपनारायण !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in भटकंती
9 Jun 2015 - 5:08 pm

मागच्या रवीवारी पुन्हा एकदा कोकणवारीचा योग घडून आला. विशेष म्हणजे हा दौरा दोस्तांबरोबर होता, त्यामुळे रंगत अजुनच वाढली होती. निमित्त होते एका मित्राच्या आमंत्रणाचे. त्याच्या लाडक्या लेकीचा तिसरा वाढदिवस त्यामुळे तिच्या लाडक्या काका लोकांस आमंत्रण होते. नाहीतरी कोकणात जायला आम्ही निमीत्तच शोधत असतो. आताही पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालो. श्रीवर्धनला त्याच्या घरी एक दिवस मुक्काम केला आणि दुसर्‍या दिवशी परत येताना पुन्हा एकदा दिवे आगारला भेट दिली. माझ्या मागील लेखावर मिपाकरांनी आवर्जून दिवेआगारच्या रुपनारायणाचे दर्शन घेतलेस का अशी विचारणा केली होती. त्यामुळे हा रुपनारायण नव्याने बघायचे वेध लागले होते.

श्री. रुपनारायणाचे मंदीर
उजव्या बाजुचे मंदीर रुपनारायणाचे असुन, डाव्या बाजूला सुंदरनारायणाचे स्थान आहे.

1

r2

रुपनारायणासमोर नतमस्तक होताना आपल्याला जाणवते की ज्या कोणी हे नाव श्रीमुर्तीला दिले असेल तो किती रसिक माणुस असेल. श्री रुपनारायणाची देखणी मुर्ती इतकी संमोहक आहे की नमस्कार करताना सुद्धा डोळे मुर्तीवरच रोखलेले राहतात.

कानी मकर कुंडले, कमलनयना, नजर नासिकेच्या अग्रावर रोखलेली, गळ्यात मोत्यांचे दागिने परिधान केलेले. कमरेला कलमचुणीदार वस्त्र, त्यावर कमरपट्टा, मनगटात सुवर्णकडी, गळ्यात पोची हा दागिना , गंडामध्ये बाजुबंध, हातातील सर्व बोटात अंगठ्या, कमरेला अनेक सुवर्ण मोती अलंकार. हातात गदा आहे. बोटावरची नखे सुद्ध स्पष्टपणे दिसतात इतके सुंदर कोरीव काम आहे. हिरवट काळ्या संगमरवरातील हे अप्रतिम देखणं शिल्प तत्कालिन उच्चप्रतीच्या शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण ठरावे. विष्णुची रुपे ही त्याच्या हातातील आयुधांच्या क्रमावरुन ठरतात. हातातील आयुधांचा क्रम जसा बदलतो त्यानुसार विष्णुची २४ रुपे होतात असे इथे म्हणजे रुपनारायणाच्या मंदीरात असलेले माहिती पत्रक सांगते.

अप्रतिम देखणी मुर्ती आणि मुर्तीचे अजुन एक अतिशय महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे या मुर्तीवर श्री विष्णुचे १० अवतार कोरलेले आहेत. मस्तकावर कमलपुष्प, करंडक मुकुट त्यावरील कौस्तुभ चिन्ह व व्याघ्रमुख ही मुर्ती दक्षीण भारतीय शैलीची असल्याचे द्यौतक आहे. अलंकृत कायबंधन व किर्तीमुख कमरपट्यावर असून मुकुटातून केशसंभार बाहेर डोकावत आहे. म्हणून हा रुपनारायण.
(माहिती : मंदीरातील माहितीफलकावरुन साभार)

श्री रुपनारायण
R

तिथे उपलब्ध माहिती फ़लकावरुन असेही समजले की पोर्तुगिजांनी ही मुर्ती पळवून नेण्याचा प्रयत्नही केला होता. त्या हल्ल्यादरम्यान मुर्तीचे काही प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. श्रीमुर्तीचे नाक, हात असे अवयव भंगलेले असुन त्यावर केलेले रासयनिक उपचार सहजी ओळखू येतात.

R3

वर सांगितल्याप्रमाणे श्रींच्या मुर्तीवर श्रीविष्णुचे दशावतार कोरलेले आहेत.

मुर्तीच्या उजव्या हातास वर मत्स्यावतार, हा पहिला

थोडी उत्क्रांती, डाव्या हाताला कुर्मावतार (जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी फ़िरणारा) हा द्वितीयावतार

उजवीकडे तिसरा वराहावतार (अलीढासनामध्ये हातावर तोलुन धरलेली पृथ्वी )

चौथा नृसिंहावतार . हा मुर्तीच्या डाव्या बाजुला कंबरेपाशी आहे

पाचवा वामनावतार - हा देखील मुर्तीच्या उजव्या बाजुला शरीरमध्यावर आहे

सहावा परशुराम : हा डाव्या बाजूला खालच्या बाजूस रेखिलेला आहे

सातवा श्रीराम : तो उजव्या बाजूस खालच्या बाजुला कोरलेला दिसून येतो

आठवा कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णावतार उजवीकडे खांद्याजवळ आहे

इथे नववा अवतार गौतम बुद्ध असे संबोधलेय, (जे मला काही पटलेले नाहीये) माझ्या मते विष्णुचा अवतार म्हणुन ज्या बुद्धाचे वर्णन केले जाते तो व गौतम बुद्ध हे वेगवेगळे असावेत. या नवव्या अवताराचे काय माहीत नाही पण तथागत गौतम बुद्धाचा मात्र मी मनस्वी चाहता आहे)

दहावा अवतार कल्कीचा , डाव्या बाजुस तळाला पायाजवळ , अश्वारुढ अवस्थेत कोरलेला आहे. ही कल्कीची मुर्ती शिरविरहीत आहे.

ड१

रुपनारायणाच्या शेजारीच सुंदरनारायणाचेही नवे मंदीर बांधलेले आहे.

D2

हा सुंदरनारायण

D3

मंदीरासमोर तीर्थकुंड आणि दिपमाळा देखील बांधण्यात आलेल्या आहेत.

T

Q

'वल्ली' आणि 'पैसाताय'चे विशेष आभार रुपनारायणाची आठवण करुन दिल्याबद्दल. त्यामिषाने अजुन एकदा श्रींचे दर्शन झाले. श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्‍यावर सुद्धा बरेच फोटो 'बरे' आले आहेत. ते पुढच्या लेखात पोस्ट करेन.

तुर्तास इतकेच...

विशाल.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Jun 2015 - 5:17 pm | प्रचेतस

सुंदर लिहिलेस.
मूर्तींना वस्त्रे नेसवून आणि रंगकाम करून मूळचे सौंदर्य पार घालवलेले दिसते आहे. बहुधा गणेश मुखवटा हरपल्यानंतर आता हे विष्णूचे मार्केटिंग वाटते आहे.
बाकी आख्ख्या भारतात ह्या प्रकारच्या केवळ दोनच मूर्ती आहेत. एक कर्नाटकात कुठेतरी आणि ही एक दिवेआगरातली. शिलाहारांच्या काळात ही कोरलेली असावी.

विशाल कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 6:48 pm | विशाल कुलकर्णी

हो शिलाहारकालीनच आहे. आता सुवर्णगणेश नाहीये म्हटल्यावर कुणीतरी बकरा हवाच होता त्यांना, तो विष्णुला पकडले त्यांनी :)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 5:23 pm | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्स्त! आता मला तिकडे जायचे वेध लागले पुन्हा. या खेपेला याच्या जोडीनी ते दिवेआगराच्या अलिकडचं पांडवकालीन शिवमंदीर आणि त्या बाहेर असलेले भरपुर वीरगळ टिपणार आहे.

पांडवकालीन शिवमंदिर म्हणजे नक्की कुठल्या काळातलं?

सौंदाळा's picture

9 Jun 2015 - 6:57 pm | सौंदाळा

मला तिकडे जायचे वेध लागले पुन्हा. या खेपेला जोडीनी

असे वाचले घाई घाईत. लेखमालेचा परिणाम :)

आता हे मंदिर झालेलं दिसतंय.मी पाहिलेलं तेव्हा एका साध्याशा घुमटीत मूर्ती होती.असे वस्त्र पूजा काहीच नव्हते.तिचा देखणेपणा लपत नव्हता.तिथे उघड्यावर मांडलेल्या त्या मूर्तीची काळजीच वाटली होती!

वेल्लाभट's picture

9 Jun 2015 - 5:56 pm | वेल्लाभट

सहीच आहे हे देऊळ ! वाह वाह वाह
जायलाच हवं दिवेआगर ला गेलं की आता

कंजूस's picture

9 Jun 2015 - 6:53 pm | कंजूस

दिव्य आगर कुठंय ?
जुने काळया दगडातले मंदिर उडवले की काय? हे नवीन दहा वर्षांपुर्वी बांधायला घेतले होते. त्या चोरीला गेलेल्या गणपतीची तांब्याची संदुक तरी आहे ना?

सतिश गावडे's picture

9 Jun 2015 - 7:06 pm | सतिश गावडे

दिव्य आगर कुठंय ?

मुंबई - पनवेल - पेण - वडखळ - नागोठणे - वाकण - इंदापूर - माणगांव - गोरेगांव - म्हसळा - दिवेआगर

हे मंदिर बहुतेक नवीन बांधलंय. चार पाच वर्षांपूर्वी समुद्र किनारी जाताना असं काही बांधकाम चालू असल्याचे आठवते.

एक एकटा एकटाच's picture

9 Jun 2015 - 7:24 pm | एक एकटा एकटाच

मस्त लेख

आणि काढलेले फ़ोटोजही उत्तम.

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Jun 2015 - 7:36 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच रे विशाल.

आताचे मंदीर सुरेखच आहे पण पुर्वीचे मंदीरपण छोटेसे पण छान होते. माझ्याकडेही काही ह्या मुर्तीचे वस्त्रे न नेसवल्यावेळचे फोटो आहेत.. टाकतो.

तसेच दिवेआगरात शिरता शिरता एक मोठ्ठा उंच विरगळ आहे.. तो बघीतला का? असल्यास त्याचा पण फोटो टाक.
ह्या सारखेच अगदी आत गावात उत्तरेश्वराचे पण एक देऊळ आहे.. तेही एतकेच प्राचीन आहे आणी त्याचाही आता जिर्णोध्दार केलाय..

शिव कन्या's picture

9 Jun 2015 - 9:20 pm | शिव कन्या

विहीर आणि दीपमाल सुंदर.

अरे रूपनारायणाची ही मूर्ती तर रत्नागिरीजवळच्या कोळीसर्‍याच्या 'लक्ष्मीकेशवाच्या' मूर्तीसारखीच आहे बरीचशी. ती पण सुंदर तुकतुकीत मूर्ती आहे. कींवा होती म्हणायला हवं आता. कारण तीन-चार वर्षांपूर्वी "जीर्णोद्धार" करून त्या सुंदर मंदीराची रया घालवली आहे. सुंदर गाभार्‍याऐवजी जाळी, देवाआधी दिसेल अशी भलीमोठी दानपेटी, मूर्तीच्या बाजूने सिमेंट/PoP असे कशात तरी केलेले दशावतार (मला अजून प्रयोजन कळलेलं नाहिये त्यांच. मुळातल्या मूर्तीत देखणी शिल्प असताना हे??), देवाच्या डोक्यावरच लावलेला भगभगीत दिवा - मूर्ती अक्षरशः सुकल्येय त्या दिव्यामुळे, फरशी घालताना आपण त्यामुळे त्यात गोमुख अर्धवट गाडून टाकतोय याचा विचारच नाही केलेला, खाली हातपाय धुवायला झरा आहे तिथे केलेली जाळी आणि पायर्‍या......... असो. कालाय तस्मै नमः मुळातलं देखणं स्थान पहायला तरी मिळालं याचं समाधान मानायचं.

दिवेआगरची माहीती नंतर घेईन तुझ्याकडून.

(माझा आयडी 'मिसळपाव' असला तरी त्याचा संस्थळाशी / संपादकांशी काहिहि संबंध नाही. ईतर चार सभासदांसारखाच मीही एक)

गणपती नेलंनीत आता विष्णूचं मार्केटिंग का? वशाडी येवो.
मुर्तींना अशी रंगरंगोटी करुन काय मिळतं देव जाणे, त्या भुलेश्वरला पण असाच सावळा गोंधळ झाल्यासारखा वाटला.

स्नेहानिकेत's picture

9 Jun 2015 - 11:20 pm | स्नेहानिकेत

मस्त!!!!!

तथागत बुद्धालाचाच ९ वा अवतार मानले गेले आहे. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी विष्णू अवतारांसह बुद्धाचीही मूर्ती कोरलेली दिसते. ह्याच मूर्तीवर डाव्या बाजूस चतुर्मुख ब्रह्मा व उजव्या बाजूस शिवमूर्ती कोरलेली आहे. त्यांच्याच बाजूला अनुक्रमे कूर्म व मत्स्य हे अवतार आहेत. तर डाव्या बाजूस कल्कीचे मूर्तीचे बाजूस विष्णूमूर्तीला लागून गरुड आहे.

पैसा's picture

10 Jun 2015 - 8:49 am | पैसा

atishay dekhani moorti ahe. matr rangakam ani khare tar devalache nave bandhakamahi far avadale nahi. mool deul ase nasave.

प्रचेतस's picture

10 Jun 2015 - 8:52 am | प्रचेतस

मूळ देऊळ म्हणजे एक लहानशी घुमटी होती फक्त.

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2015 - 9:42 am | विशाल कुलकर्णी

इथे , या फोटोत निळ्या चौकटीतली घुमटी किंवा तत्सम अजुन एखादी छोटीशी घुमटी म्हणजे जुने मंदीर असावे बहुदा. कारण या मंदीरावर सुंदरनारायण असे लिहीलेले आढळले.

1

पैसा's picture

10 Jun 2015 - 9:57 am | पैसा

हीच घुमटी. मात्र मला वाटते की एवढ्या देखण्या मूर्तीला प्राचीन काळात तसेच देऊळ असणार. घुमटी म्हणजे फक्त गाभारा असेल मूळचा. त्यातूनही घुमटीसुद्धा तशी प्राचीन वाटत नाही.

घुमटी उत्तरकालीन आहे. पूर्वी नक्कीच जुनं मंदिर असणार ह्यात काहीच शंका नाही. नव्या मंदिराच्या पुढ्यातलं कुण्ड प्राचीनच आहे. जंजिर्‍याच्या सिद्दीचा इकडे उपद्रव फार. त्यानेच हे मंदिर उध्वस्त केले असू शकते.

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2015 - 10:08 am | विशाल कुलकर्णी

तीच शक्यता जास्त आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जुन्या मंदीराचे कुठलेही फोटो अथवा तसवीरी इथे कुठेच पाहायला मिळत नाही. त्यामुळे जुने मंदीर फार पूर्वीच उध्वस्त केले गेले असावे अशी शंका उभी राहायला वाव आहे. :(

नूतन सावंत's picture

10 Jun 2015 - 9:32 am | नूतन सावंत

सुरेख सहल.

आताचा चौकटीतलं देऊळच होतं पुर्वी(गणपती असतांना) दिव्य आगरात(दिवेआगरात).भाविक वाढू लागले तसे बाजेूला ते लाल मंदिर बांधायला घेतले होते.
या जुन्या मंदिरात पिकनिकला आलेल्या मुली समुद्रातून आंघोळ करून आल्यावर ओले कपडे बदलायच्या-रूपनारायणाच्या साक्षीने.आता श्री उभा आहे नवीन महालात हरीहरी करत.गेले ते दिवस.