मिसळपाव IPL ESPN Cricinfo Fantasy LEAGUE

साधा मुलगा's picture
साधा मुलगा in क्रिडा जगत
9 Apr 2015 - 5:25 pm

क्रिकेट विश्वचषक २०१५ च्या वेळी मिपावरील काही जणांनी ESPN Cricinfo वरील fantasy league मध्ये भाग घेतला होता. खरेतर आयत्या वेळी मिपाचा ग्रुप तयार करून ३-४ जणच त्यात सहभागी झाले.
म्हणून IPL साठी मी मुद्दामून वेगळा धागा काढत आहे.
ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी
league name: misalpav
password: misalpav
ज्यांना fantasy league हि काय भानगड आहे माहिती नाही त्यांच्यासाठी पुढील माहिती :
हि एक मनोरंजांसाठी काढलेली एक स्पर्धा अथवा खेळ आहे.
आपण आपल्या आवडत्या खेळाडूंची निवड करू शकता आणि LIVE सामन्यातील त्यांच्या कामगिरीनुसार आपल्याला गुण मिळत जातात.स्पर्धेअखेरिस ज्याचे सर्वात जास्त गुण तो जिंकतो.
प्रत्येक सामना सुरु होण्याआधी आपण आपली टीम निवडू शकता.
त्याचे सर्व नियम येथे मिळतील
http://games.espncricinfo.com/Fantasy/HowToPlay
खरेतर ८ एप्रिल पूर्वी सांगायला हवे होते पण अजूनही बरेच दिवस आहेत, लवकर जॉईन झालात तर चांगले.
कोणाला किती गुण मिळतील आणि अखेरीस कोण पहिला येईल हा सर्व नशिबाचा भाग आहे.
league join करण्यासाठी सूचना
१) पहिले espn cricinfo या साईट वर जा. fantasyपर्याय निवडा.
या साईटचे सभासद नसाल तर register व्हा. यासाठी आपण आपला email id , facebook,twitter अथवा google + account वापरू शकता.
२) नंतर आत प्रवेश मिळल्यावर उजव्या कोपर्यातील tutorial हा पर्याय आपल्याला मार्गदर्शन करेल.
त्यानंतर टीम बनवायचे सर्व नियम बघा आणि आपली टीम निवडा.
३) एकदा आपली टीम बनवलीत कि मग league चा पर्याय उपलब्ध होईल.
leagues option मध्ये जा.
join league option madhe ja.
league name: misalpav
password: misalpav
या league च्या विजेत्यास पुढील कट्ट्यावर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल.
काहीही अडचण आल्यास जरूर विचारा.
तेव्हा उत्सुक लोकांनी लवकरात लवकर सहभागी व्हा.

क्रिकेटआयपीएल२०-२० क्रिकेट

प्रतिक्रिया

..काय हे लोक्स..धागा थंड का बुवा?
आयपीएल फॅन्स नाहीत वाटतं कोणी.

..

साधा मुलगा's picture

10 Apr 2015 - 4:47 pm | साधा मुलगा

मिपावर IPL चे fans दिसत नाहीत.
या धाग्याचे उत्घाटन केल्याबद्दल धन्यवाद!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2015 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कटकटीचं म्हटलं की जरा टंकाळा येतो. टीम निवडा वगैरे असं
जरासं युजर फ्रेंडली पाहिजे होतं.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद, मी आज जॉइन झालो आहे.
आधीच्या दोन मॅच मिस झाल्या .
गेल्या दोन्ही मॅच चे प्रेडिक्शन बरोबर असल्याने येथे पुन्हा प्रेडिक्शन देवुया मजा येइन.

परंतु, मिपा वर आयपियल ला साथ बेह्टनार नाही यामुळॅ मी काही धागाच काढला नव्हता.. असो.
एक प्रश्न : फॅन्टशी लीग मध्ये आपण १२० वेळा प्लेअर इन्/आउट करु शकतो ना ? म्हणजे प्रत्येक मॅच ला प्लेअर चेन्ज केले तरी शेवटी करता येणार नाहीत.

साधा मुलगा's picture

11 Apr 2015 - 9:59 am | साधा मुलगा

cricinfo ने १२० वेळा खेळाडू बदली करण्याची संधी दिली आहे, सर्व सामन्यांसाठी. IPL मध्ये एकूण ६० सामने आहेत (अंतिम, उपांत्य सामने धरून). त्यामुळे प्रत्येक सामन्यामागे साधारण २ खेळाडू बदली करू शकता.

गणेशा's picture

10 Apr 2015 - 6:19 pm | गणेशा

२०-२० मॅच चे प्रेडिक्शन खुप अवघड असते, एखादा प्लेअर ही मॅच चा रीझल्ट बदलवु शकतो.
मागचे दोन्ही प्रेडिक्शन kkr आणि CSK बरोबर आले होते.
आजची मॅच मस्त आहे, तुल्यबळ संघ आहे, आणि राज्स्थान ची बॉलिंग पंजाब पेक्षा जास्त चांगली आहे.

तरीही मागील अनुभवावरुन पंजाब जिंकतील असे वाटत आहे.
३. KXIP Vs RR = KXIP

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2015 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं काही चुकलंय का माहिती नै... मी टीम तयार केली आणि जॉइन झालोय.
मदत करा. कमीत कमी पोच द्या. :)

-दिलीप बिरुटे

मेघवेडा's picture

10 Apr 2015 - 9:57 pm | मेघवेडा

जॉईणली हाय ळीग. :)

साधा मुलगा's picture

11 Apr 2015 - 10:07 am | साधा मुलगा

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2015 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाच टीम्स दिसत आहेत आता त्यांच्या म्याचेस कधी असतात ?

-दिलीप बिरुटे

साधा मुलगा's picture

11 Apr 2015 - 11:24 am | साधा मुलगा

अहो matches एकमेकात होणार नाहीत हो, जे खेळाडू आपण निवडले आहेत, त्यांचा प्रत्यक्ष सामन्यातील
कामगिरीनुसार पोइंत्स मिळत जातात. आता एखाद्याने असे खेळाडू निवडले जे त्या दिवशी चांगले खेळले तर त्याला जास्त पोइंत्स मिळतील. उदा. काल माझ्या संघात खेळणाऱ्या संघापैकी bailey, maxwell, faulkner असे खेळाडू होते, त्यांच्या कामगिरीनुसार मला अनुक्रमे २४,४ आणि १६१ असे पोइंत्स मिळाले.
म्हणजे १८९ पोइंत्स मला या सामन्यात मिळाले. असे प्रत्येक सामन्याचे पोइंत्स गोळा करून शेवटी ज्याचे जास्त पोइंत्स होतात तो जिंकतो.
हे घोड्यावर पैसे लावण्यासारखं प्रकार आहे. फक्त पैशाच्या जागी पोइंत्स मिळतात एवढेच. हा एक प्रकारचा जुगारच आहे, पण थोडी judgement , नशीब आणि प्रत्येक खेळाडू आणि टीमचे माहिती असेल तर खेळायला मजा येते.
हा प्रकार मी विश्वचषक स्पर्धेत खेळलो होतो, यामुळे अगदी काहीही संबंध नसलेल्या टीमच्या सामन्यामध्ये सुद्धा मला रस निर्माण झाला, आणि अगदी कंटाळवाणा वाटणाऱ्या world cup मध्ये मी अगदी प्रत्येक सामना पहिला.

असंका's picture

11 Apr 2015 - 11:42 am | असंका

टीमचे नाव काय घ्यावे?

साधा मुलगा's picture

12 Apr 2015 - 1:34 pm | साधा मुलगा

1. sadhamulga11 939
2. Ganesha's XI 589
3. Ravstarz 402
4. Eagle Team 389
5. my IPL 4 167
6. ShreeGurujee XI 152
7. misalpav 6

वेल्लाभट's picture

12 Apr 2015 - 1:55 pm | वेल्लाभट

थँक्स बट नो थँक्स.

गांगुलीच्या क्रिकेटमधील एक्झिट नंतर क्रिकेट बघण्यातील रस गमावलेला.
वेल्लाभट

साधा मुलगा's picture

13 Apr 2015 - 10:29 am | साधा मुलगा

1. PADDY XI 1325
2. sadhamulga11 1253
3. Ganesha's XI 801
4. my IPL 4 533
5. Ravstarz 483
6. Eagle Team 364
7. ShreeGurujee XI 191
8. Moz20 118
9. misalpav 48

चला नाही म्हणता म्हणता ९ लोक जमा झाले, त्यातही एका स्त्री सदस्याचा सहभाग आहे.

अविनाश पांढरकर's picture

13 Apr 2015 - 10:56 am | अविनाश पांढरकर

मी आज जॉइन झालो आहे.

जयराज's picture

13 Apr 2015 - 6:36 pm | जयराज

मीपण आजच जॉइन झालोय.

साधा मुलगा's picture

16 Apr 2015 - 10:33 am | साधा मुलगा

धन्यवाद दोघांनाही!

साधा मुलगा's picture

16 Apr 2015 - 10:42 am | साधा मुलगा

1. PADDY XI 1865
2. sadhamulga11 1654
3. Ganesha's XI 1269
4. Ravstarz 1180
5. my IPL 4 641
6. ShreeGurujee XI 626
7. misalpav 474
8. konoha 452
9. Moz20 426
10. asmi11 421
11. Eagle Team 419

..कोणती टीम कोणाची ते कळलं नाही. (काहींच्या बाबतीत).कंसातले आकडे नेमके कसले? ते लॉजिक तिथे लॉगिन न करणार्‍यांनाही इथे समजावलं कोणी तर बरं.

साधा मुलगा's picture

26 Apr 2015 - 11:42 am | साधा मुलगा

मिपाकरांनी आपल्या आवडीनुसार टीमला नावे दिलेली आहेत, काहींनी मिपावरील नाव वापरले आहे , तर काहींनी आपले खरे नाव वापरले आहे.
टीमच्या नावापुढे दिलेले आकडे हे त्या टीमला आत्तापर्यंत मिळालेले points आहेत. हे points सर्व सामन्यातील मिळालेल्या points ची बेरीज आहे.
प्रत्येक सामन्याचे points सुद्धा देऊ शकतो , पण त्यासाठी भरपूर टंकायला लागेल अंनि वेळ द्यावा लागेल.

साधा मुलगा's picture

26 Apr 2015 - 11:29 am | साधा मुलगा

1)PADDY XI 4131
2)Ravstarz 3124
3)ShreeGurujee XI 2917
4) Ganesha's XI 2774
5) sadhamulga11 2758
6) Moz20 2593
7) misalpav 2384
8) asmi11 2170
9) konoha 1889
10)Eagle Team 1572
11)my IPL 4 1286
मधे ५-६ दिवस कामामुळे थोडा ब्रेक घेतला, पण आता पुन्हा active झालो आहे.

पैसा's picture

26 Apr 2015 - 6:34 pm | पैसा

PADDY कोण हय? मेव्या का?

अविनाश पांढरकर's picture

28 Apr 2015 - 12:08 am | अविनाश पांढरकर

मी आहे PADDY.

साधा मुलगा's picture

31 May 2015 - 9:05 pm | साधा मुलगा

क्रमांक संघाचे नाव गुणसंख्या
1 PADDY_XI 11151
2 Moz20 9072
3 ShreeGurujeeXI 8907
4 Misalpav 8125
5 Ravstarz 6328
6 Sadhamulga11 5523
7 Ganesha’11 5446
8 Asmi11 4621
9 Konoha 4041
10 Eagle Team 3600
11 My IPL 4 3200

ऑफिसचे काम आणि थोडे आजारपण यामुळे मला पूर्ण वेळ खेळता आले नाही. तरी सर्व सहभागी मिपाकरांना मी धन्यवाद देतो. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत चिकाटीने खेळून पहिले आल्याबद्दल श्री.अविनाश पांढरकर यांचे विशेष अभिनंदन !. पुढील कट्ट्यावर यांचा सत्कार करण्यात यावा अशी मिपा कट्टेकर्यांना विनंती.

अविनाश पांढरकर's picture

1 Jun 2015 - 12:42 pm | अविनाश पांढरकर

धन्यवाद आणी सर्व सहभागी मिपाकरांना धन्यवाद!!!!!!

श्रीगुरुजी's picture

1 Jun 2015 - 3:01 pm | श्रीगुरुजी

मिपा लीगमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अविनाश पांढरकरांचे अभिनंदन!

मिपा लीगची माहिती देऊन लीगमध्ये सहभागी होण्यास उत्तेजन दिल्याबद्दल साधा मुलगा यांचे धन्यवाद!!

मी आयुष्यात प्रथमच लीगमध्ये सहभागी झालो. ४ थ्या सामन्यापासून लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे पहिल्या ३ सामन्यांचे शून्य गुण मिळाले. लीगच्या नियमांची, गुणांची, खेळाडूंची इ. नीट माहिती मिळेपर्यंत अजून ५-६ सामने गेले. साधारणपणे १० सामन्यापासून गुणांसाठी काय स्ट्रॅटेजी असायला हवी याची बर्‍यापैकी कल्पना आली.

अविनाश पांढरकरांचे अंदाज पहिलापासूनच अचूक होते. त्यामुळे ते सुरवातीपासूनच पहिल्या क्रमांकावर राहिले. मी काही काळ दुसर्‍या क्रमांकावर होतो. परंतु शेवटच्या काही सामन्यात माझे बरेचसे अंदाज चुकुन खूप कमी गुण मिळाले आणि Moz20 (सविता के) यांचे अंदाज अचूक ठरून त्या दुसर्‍या क्रमांकावर आल्या.

एकंदरीत खूप मजा आली. आता पुढच्या वेळी नीट अभ्यास करून पहिल्या सामन्यापासूनच लीगमध्ये उतरेन.