पदपथ झोपण्यासाठी नसतो, पण..

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
8 May 2015 - 12:27 pm
गाभा: 

मानवस्वरूपाभिमानी, दबंगोत्तम, वाण्टेडनामधारी युगपुरुष श्री सलमानानंद यांच्यावर येऊ घातलेल्या कारावासरूपी अग्निदिव्यामुळे सकल भूतलतारामंडलात होहो हाहाकार होऊ घातला आहे. पैकी काहीजण जालीय गुंजारवाद्वारे पदपथशयनाच्या प्रसाराबद्दल आपल्या रोषयुक्त भावना दाहक शब्दात प्रकट करीत आहेत.

तसेच काही स्वघोषित विवेकाधिपती याउलट भूमिका घेऊन सदर तारे-तारकांचा उद्धार करीत आहेत.

या दोहोंना विचारले जावेत असे काही प्रश्न:

१. पदपथ हा झोपण्यासाठी नसतो. पण गाडी चढवण्यासाठीही नसतो. या मुद्द्यावर मौनव्रत बाळगण्याचे काय कारण असेल?

२. पदपथ जसा झोपण्यासाठी नसतो, तसाच सामान्य रस्ता हा वाहने उभी करून ठेवण्यासाठी नसतो. मग रात्री (आणि दिवसाही) नागरी रस्त्यांच्या दोतरफा उभी करून ठेवलेली वाहने कोठून येतात?

३. गृहहीन निष्कांचन लोकांना आपण रोज रात्रीपुरते आपल्या घरासमोर पायरीवर अथवा सहकारी गृहनिर्माणाच्या प्रवेशद्वाराशी झोपू देऊ काय?

प्रतिक्रिया

हुप्प्या's picture

8 May 2015 - 5:03 pm | हुप्प्या

पदपथ हा मोटार चालवण्याकरता नाही हे खरे. पण ड्रायव्हरचे चित्त विचलित झाल्यास, तो वा ती झोपाळलेला असल्यास वा दमलेला/ली असल्यास, नवखा असल्यास, मोटरचा टायर फुटल्यास, ब्रेक निकामी झाल्यास, स्टियरिंग निकामी झाल्यास रस्त्याच्या दुतर्फा थोडी मोकळी जागा असावी असे विज्ञान सांगते. रस्त्यावरील नियमित वेगाच्या मर्यादेप्रमाणे ह्या मोकळ्या जागेचा आकार असावा. जास्त वेग असल्यास जास्त जागा. चालणार्‍या पादचार्‍यांनीही अशा प्रकारे काही अपघात होतो आहे का याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा असते. पदपथावर झोपलेला/ली व्यक्ती असे लक्ष ठेवू शकत नाही म्हणून ते जास्त धोक्याचे आहे.

२. वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवण्याचे नियम असतात. ते सरसकट बेकायदेशीर नसते. आपली ह्या नियमाविरुद्ध तक्रार असल्यास सरकारदरबारी गार्‍हाणे न्या. दाद मागा. वाहने मुख्यतः रस्त्यावर वावरतात त्यामुळे पार्क केलेली वाहने रस्त्याच्या कडेला आली तर आश्चर्ये ते काय?
काय्?

३. घरदार नसलेल्या लोकांना झोपायला जागा मिळवून देण्याची जबाबदारी घर असणार्‍यांची आहे का? का?
सरकारी मालकीचे पदपथ फुकटात अशा लोकांना झोपण्याकरता सरकारी दिवाणखाने म्हणून आंदण द्यावेत आणि सुरक्षितता म्हणून अशा पदपथाजवळच्या रस्त्यांवरील वाहतूक रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत पूर्ण बंद ठेवावी म्हणजे गरीबांची झोप होईल आणि सुरक्षितताही लाभेल. काय म्हणता?

खटासि खट's picture

10 May 2015 - 2:30 pm | खटासि खट

झोपाळलेल्या वैमानिकाकडून किंवा नशेतल्या सैनिकाकडून विमान /क्षेपणास्त्र इमारतीत घुसले तर ..?

मना सज्जना's picture

8 May 2015 - 8:11 pm | मना सज्जना

सेलिब्रिती असल्यामूले येवधि चरचा होत आहे हे मात्र खरे.

काळा पहाड's picture

10 May 2015 - 3:34 pm | काळा पहाड

२. पदपथ जसा झोपण्यासाठी नसतो, तसाच सामान्य रस्ता हा वाहने उभी करून ठेवण्यासाठी नसतो. मग रात्री (आणि दिवसाही) नागरी रस्त्यांच्या दोतरफा उभी करून ठेवलेली वाहने कोठून येतात?

गाडी खरेदी करणे स्वस्त (आणि सोपे) आहे. पार्किंग खरेदी करणे अवघड आहे. भारतीय हे मूलतःच दिखावूपणावर भर देणारी जमात असल्याने, बहुतांशी लोकांनी पार्किंग न घेता गाडी विकत घेतल्याने (किंवा पार्किंग विकत घेण्याची त्यांची लायकी नसल्याने) आणि रस्ता हा सर्वांचा अशी समजूत असल्याने मोठ्ठ्यात मोठ्ठ्या गाड्या खरेदी करून रस्त्यावर उभ्या करण्याची अहमहमिका लागलेली दिसते. या लोकांचं थोबाड उतरवायचं असेल तर खालील उपाय करावा. एक मोठ्ठ्यात मोठ्ठा खिळा खरेदी करावा. आजूबाजूला कोणी नसताना आपली दुचाकी या रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांजवळ नेवून त्या गाडीचा रंग किती पक्का आहे याची खातरजमा करावी. खातरजमा जितकी खोलवर करता येईल तितका खर्च सदर गाडी-अभिमानी पुरूष किंवा स्त्रीस येईल. मग तिथून सुंबाल्या करावा.
(संपादित)

बाळ सप्रे's picture

15 May 2015 - 3:06 pm | बाळ सप्रे

जिथे "नो पार्कींग" बोर्ड नाही तिथे रस्त्याच्या कडेला (वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही याची काळजी घेउन) गाडी पार्क करण्यात काहीही चूक नाही.
रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर खिळ्याने स्क्रॅच आणण्याच्या आपल्या नीच विचारसरणीचा निषेध !!!

काळा पहाड's picture

15 May 2015 - 3:20 pm | काळा पहाड

मी गाडी पर्मनंट (रात्री घरी जाताना घराजवळच्या रोडवर) पार्क करण्याबद्दल बोलतोय. रस्ता हा गाड्या पर्मनंट पार्क करण्यासाठी नसतो. जर पार्किंग नसेल तर गाड्या घ्यायच्या कशाला? मग बाकीच्या कुणी पार्किंग कशाला विकत घ्यायचं? सगळ्यांनीच रस्त्यावर पार्क करूया. बाकी हे जर चालवायचं असेल तर सरकारी जागेवर झोपडपट्ट्या का चालू द्यायच्या नाहीत? आणि वाहतुकीला अडथळा होत नाही असं काही नसतं. तीन लेन च्या रस्त्यात दोन्ही बाजूला पार्क करून मधल्या चिंचोळ्या जागेत रहदारी चालवावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या निषेधाबद्दल पुनर्विचार करावा ही विनंती.

बाळ सप्रे's picture

15 May 2015 - 4:19 pm | बाळ सप्रे

स्वतःचे पार्कींग नसताना गाडी घेउ नये हे बरोबर पण अशा गाडीवर आपणासारख्याने खिळ्याने स्क्रॅच आणून अद्दल घडवण्याचा विचार ही नीच विचारसरणीच !!
हा अभिजीतच्या "कुत्ते की मौत" शेर्‍यासारखाच निर्लज्जपणा !!

अनुप कुलकर्णी's picture

11 May 2015 - 1:52 pm | अनुप कुलकर्णी

पदपथ हा मोटार चालवण्याकरता नाही

याचा आमच्या बंगरुळातल्या बस चालकांतर्फे तीव्र निषेध

बाकी चालू द्या