गाभा:
पुढच्या बुधवारी वडोदराहून काढता पाय. गुरुवारी सकाळी पुण्यनगरीस आगमन.
गुरुवार आणी शुक्रवारी कामं उरकून जवळजवळ शुक्रवारी दुपारी मोकळा होइन, ते रवीवार रात्र पर्यंत.
आता हे दोन ते अडीच दिवस कसून उपयोगात घ्यायचे.आणी पूर्ण 'पुणे' पाहायचे.
पुण्यात मी दुसर्यांदा-असं म्हटलं तर पहिल्यांद्याच- कारण पहिल्यांदा जवळजवळ तीस वर्षां पूर्वी आलो होतो.
त्या वेळी काही पाहणं जमलं नाही म्हणून- पहिल्यांदाच येत आहे.
तरी मान्य पुणेकरांनी शहरा बद्दल तपशीलवार माहिती द्यावी.
अगदी वेळपत्रकासह माहिती दिल्यास कमी वेळात जास्त पहाणी होउ शकेल.
कट्टा प्रकार त्या दरम्यानास कुठे जमणार आहे का ..? मिपाकरांची प्रत्यक्ष भेट शक्य आहे की काय...?
हा फायदा मी मिळवू शकणार का..! कळवावे.
प्रतिक्रिया
6 May 2015 - 2:29 pm | रवीराज
पुर्ण पुणे फिरणार ? दोन तिन दिवसात...
6 May 2015 - 3:42 pm | मृत्युन्जय
पुण्यात फिरण्यासारखे आहे काय? खाण्याच्या ठिकाणांबद्दल माहिती हवी असल्यास देउ शकतो. राहणार कुठे आहात त्याप्रमाणे देतो.
बाकी बराच विचार केल्यानंतर पुण्यात फिरण्यासारखी ४ च ठिकाणे आठवली:
१. राज दिनकर केळकर संग्रहालय
२. सिंहगड (सकाळी ८ च्या आत जाउन परत येणार असाल तर. नंतर उन खुप वाढते)
३. पडका शनिवारवाडा
आणी
४. जोशी यांचे रेल्वे संग्रहालय.
वाटल्यास पु ल देश्पांडे उद्यान बघा. एकदम मस्त. पाषाण भागात कुठेसे एक ग्रामसृष्टी उद्यान पण सुरु होते आहे म्हणे आजपासुन. कसे आहे ते माहिती नाही.
सकाळी ६ च्या आत पोचणार असाल (सध्या तर ५.३० च) तर पीकॉक बे ला जा. मोर दिसतील बरेच. परिसर देखील सुंदर आहे.
येणारच आहात तर चतुशृंगी मंदिरात जा. देहू रोड चे अय्यप्पा मंदिर (हे सुंदर आहे), मारुती मंदिर वगैरेही चांगली आहेत. देवळात जायचे असल्यास. पुण्याच्या आजुबाजुला बरीच मंदिरे आहेत तशी. प्रति शिर्डी, हडशी, प्रती बालाजी (नारायणपूर) वगैरे. तिथे जायचे असेल तर अर्धा दिवस तरी किमान हवा (प्रत्येकी). कात्रज कोंढवा भागात इस्कॉन पण आहे म्हणे. कसे आहे ते माहिती नाही. पुण्यातल्या लोकांची सारसबागेतल्या गणपतीवर भारी भक्ती. बघा जायचे असेल तर.
बाकी पुणेकर इतर कुठे जाता येत नसल्याने कात्रज प्राणीसंग्रहालय, सारसबाग, खडकवासला, फिनिक्स मॉल, अमानॉरा मॉल, इशान्य मॉल अस्ल्या ठिकाणी जात असतात. होइतो टाळाच ही ठिकाणे.
बाकी तसे पुण्यात बघण्यासारखे काहिच नाही. हॉटेलात बसून निवांत रहा नाहितर एफ सी रोड वर फेरफटका मारा.हिरवळ बघुन चेहरा टवटवीत होइल.
6 May 2015 - 7:04 pm | रवीराज
किल्ले- राजगड, तोरणा, लोहगड, विसापुर, पुरंदर, शिवनेरी
मंदिर - दगडुशेठ हलवाई, पर्वती, बनेश्वर, भुलेश्वर, भीमाशंकर, रांजणगाव, थेउर, लेण्याद्री, निळकंठेश्वर, नारायणपुर, देहु, आळंदी
लेणी- कार्ला, भाजे, बेडसे
इतर- आगाखान पॅलेस, एनडीए, लवासा, अॅम्बी व्हॅली,
PMT च्या पुणेदर्शनने फिरा त्यापेक्षा.
7 May 2015 - 12:14 am | संतोषएकांडे
सुंदर प्रतिसाद मृत्युंजय. आभार..
6 May 2015 - 4:14 pm | प्रसाद१९७१
पुणे हे बघण्याचे नाही तर जगण्याचे शहर आहे.
बडोद्याहुन येत असाल तर काम झाले की परत जा.
6 May 2015 - 4:16 pm | कपिलमुनी
:)
7 May 2015 - 12:18 am | संतोषएकांडे
अस्सल पुणेकरपणा दिसून येतोय प्रतिसादात ब्वॉ...
ह.घ्या.
6 May 2015 - 4:14 pm | कपिलमुनी
तुम्हाला
१.सहकारनगरचेब्लेड्स ऑफ ग्लोरी हे क्रिकेट संग्रहालय बघता येइल.
२. एंम्प्रेस गार्डन आहे.
३. महादजी शिंदे छत्री - वानवडी बघता येइल :
( दुवा मायबोली या संकेतस्थळावरील असून रंगासेठ या आयडीचे लेखन आहे )
४.जंगली महारज रस्त्यावर पाताळेश्वर बघा
५. दगडूशेठ गणपती मंदीर
६. महात्मा फुले संग्रहालय
७. पेठेमध्ये एखाद्या वाड्याच्या गेटसमोर गाडी पार्क करून अस्सल पुणेरीपणा बघा
आणि जाताना चितळेंच्या बाकरवड्या घ्या ( हे म्हणजे अगदी मस्ट हं).
बाकी आठवेल तसे टंकतो
6 May 2015 - 4:46 pm | गणेशा
सहकारनगरला बराच काळ घालवला पण हे संग्रहालय तेथे आहे ते माहीत नव्हते.. अरे रे..
त्यावेळेस जेंव्हा डांबरी रोड नव्हता तळजाई ला वर पर्यंत आणि स्पोर्ट्स का काय साठी एक बिल्डिंग नव्हती तेंव्हा गर्द झाडीत फिरायला आवडायचे.. न चुकता रोज जायचो चालत (जॉब नसल्यामुळे) हे आठवले..
आठवलेच आहे.. तर तळजाई अॅड करु शकता सहज फेरफटका मारण्यासाठी.. कृष्णा वडा पन आवडायचा खुप (सारंग जवळ) म्हतारा मात्र लय खडुस होता तो.
पुण्यात २-३ दिवस टाईम असेल तर पुण्याच्या आजुबाजुला सुद्धा फिरा मस्त वाटेल.
7 May 2015 - 6:40 pm | बॅटमॅन
आयला, हे संग्रहालय आहे हे माहितीच नव्हते!!!!!!!!!
रच्याकने, पुण्यात लहानमोठी अनेक संग्रहालये आहेत असे दिसते. फक्त या संग्रहालयांसाठी एखादा वेगळा धागा कुणीतरी काढला तर मजा येऊन जाईल.
7 May 2015 - 6:44 pm | प्रचेतस
पैकी डेक्कन कालेजच्या सर्व विथिका पाहण्याचे भाग्य लागलय बे.
7 May 2015 - 6:50 pm | बॅटमॅन
एनी वशिला? काही प्राब्ळम?
7 May 2015 - 6:57 pm | प्रचेतस
अरे पुरातत्वशास्त्राचे एक वर्कशॉप होते तेव्हा पाहिले हे सर्व.
बघायला मिळेल पण वीकडेज ला जायला पाहिजे.
7 May 2015 - 7:05 pm | बॅटमॅन
ओहो ओक्के.
वीकडेजला जायचं म्हटलं तरी किती ते किती वेळ असते?
7 May 2015 - 7:11 pm | प्रचेतस
१०:३० ते ५
पण तिथे फोन करून एकदा आधी कन्फर्म करतो.
तिथल्या चाल्कोलिथिक आणि इनामगाव ह्या दोन विथिका विशेष बघणीय आहेत.
7 May 2015 - 7:26 pm | बॅटमॅन
अच्छा, धन्यवाद. नक्कीच बघणार.
बाकी टिपिकल भिकारचोटगिरीप्रमाणे फोटो काढणे बंद आहे की अलाउड आहे?
7 May 2015 - 7:27 pm | प्रचेतस
मी काढले होते.
पूर्वपरवानगी घेऊन काढता यावेत.
7 May 2015 - 7:37 pm | बॅटमॅन
अच्छा. पण तू पूर्वपरवानगी घेतली होतीस का?
अन पूर्वपरवानगी लेखी घ्यावी लागते का? त्यासाठी त्रास देतात का?
7 May 2015 - 7:40 pm | प्रचेतस
अरे तेव्हा सर्वांनाच परवानगी होती.
तोंडी परवानगी घेतली तरी चालेल. खळखळ करायचे नाहित
7 May 2015 - 7:40 pm | बॅटमॅन
वा! मग उत्तम आहे.
7 May 2015 - 7:29 pm | कपिलमुनी
तिथे एक कट्टा करू.
म्हणजे चर्चासत्र होइल :)
8 May 2015 - 1:23 am | संतोषएकांडे
वा वल्लीसा-बॅटमेनसा
तुमच्या चर्चेतुन एक बघेबल स्थळ लाभलं सा मला..
बघण्याचा आणी समजण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 'शक्य असल्यास.'
6 May 2015 - 4:32 pm | मोहनराव
पुणेरी पाहुणचार - या स्थळाला नक्की भेट द्या कुठेतरी जमुन आलं तर! जन्मभर लक्षात राहण्यासारखे स्थळ!! ;) ह. घ्या.
6 May 2015 - 4:52 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"चहा घेणार का?" हा प्रश्न पाहुण्याने 'चहा नको' म्हणावे अशा पद्धतीने आंबट सुरात विचारला जातो असा आमचा अनुभव आहे.असो.सगळीकडे थोड्याफार फरकाने माणसे अशी असतातच.
बाकरवडी,आंबाबर्फी मुद्दाम घेऊन जा रे संतोषा.
6 May 2015 - 11:59 pm | संतोषएकांडे
नक्कीच माई, आंबाबर्फी घेवून जाइन. अगं,पण बाकरवडी कशाला...? ती तर इथलीच जगप्रसिध्ध आहे की...! बडोद्याची...!
7 May 2015 - 10:36 am | माईसाहेब कुरसूंदीकर
बाकरवडी मुळची गुजरातची असे ह्यांनीही पूर्वी म्हंटले होते.बडोद्याहूनच मग बाकरवडी घेऊन ये हो,पुण्यातील मिपाकर मग तुझे आवडीने स्वागत करायला स्टेशन्वर वा विमानतळावर येतील.!!
8 May 2015 - 1:31 am | संतोषएकांडे
माई, तुच ठरव न गं कोणत्या मिपाकराला द्यायची बाकरवडी-बडोद्याची..
आणतो मी तिथे एक पाकीट बाकरवडी
आणी तुझ्याच हातानी देवूया प्रत्येक मिपाकराला एक एक वडी बाकरवडी..
प्रसाद म्हणून..(:
6 May 2015 - 5:47 pm | सौंदाळा
पर्वती
आगाखान पॅलेस
कात्रज सर्पोद्यान
तुमचे वय समजले तर अजुन काही सजेशन्स देऊ शकतो ;)
6 May 2015 - 5:51 pm | टवाळ कार्टा
अग्गाग्गा...आधी त्यांना पुण्यात तर येउदे...मग पोचवा की जिथे कुठे पोचवायचे तीथे =))
तुम्ही पुण्यातलेच दिसताय ;)
6 May 2015 - 6:06 pm | सौंदाळा
नाय ब्वा
आम्ही वल्ली मास्तरांचे शेजारी
7 May 2015 - 12:08 am | संतोषएकांडे
वयात काय आहे दादु, तरी एक अवघड कोडं देतो त्या वरून वय नक्की करा.
१९व्या वर्षी सरकारी हापीसात नोकरी लागली. सध्या ३३ वर्षाची झाली.बघा उलगडत असलं तर
बाकी देशाची आझादी आमच्याहून तब्बल १६ वर्ष मोठी...
7 May 2015 - 6:02 pm | सौंदाळा
वोक्के काका
मग तुम्ही सारसबाग, लाल महाल, केळकर संग्रहालय बघा, बरोबर कोणी पत्नी/मुलगी वगैर स्त्रीवर्ग असेल तर तुळशीबागेत जा
सायंकाळी / रात्री एखादे चांगले नाटक जर त्या दिवसात असेल तर जरुर बघा.
8 May 2015 - 1:33 am | संतोषएकांडे
सौंदाळ्या
आता त्या वयाला उलटव..म्हणजे येईल माझं खरं वय...हा..हा..हा..
8 May 2015 - 3:53 pm | सौंदाळा
कोडी कसली घालतोस मेल्या.
7 May 2015 - 6:27 pm | एस
वरील यादीतील आगाखान पॅलेस पाहण्यासारखा आहे.
7 May 2015 - 12:10 am | संतोषएकांडे
सर्व प्रतिसादकांचा धन्यवाद
7 May 2015 - 12:21 am | काळा पहाड
तुम्ही २-३ दिवसच आहात म्हणून पहिल्यांदा सिंहगड पहा. सकाळी सात वाजता जा. आठला परत या. पहाण्यासारखं काही राहिलेलं नसलं तरी. तानाजीची समाधी आहे तिथे. त्यापुढे नतमस्तक होता येईल.
दुसरं म्हणजे सारसबाग, तुळशीबाग, शनिवार वाडा, लालमहाल, कसबा गणपती, मंडई, टिळकवाडा (की केसरीवाडा?), दगडूशेठ इत्यादी
तिसरं कँपमध्ये एक फेरफटका मारा, मार्झोरीन ची सँडविचेस आणि बघायची तर संग्रहालये, पुल्देश्पांडे उद्यान इत्यादी.
7 May 2015 - 12:30 am | संतोषएकांडे
धन्यवाद का..प..
7 May 2015 - 12:58 am | उगा काहितरीच
सध्या पुण्यात ऊन जरा जास्तच आहे. म्हणून कुठेच फिरायला जाऊ नका.
7 May 2015 - 4:55 pm | नाखु
7 May 2015 - 6:35 pm | सूड
बघितलाय तो, अत्यंत कंटाळवाणा प्रकार असतो. एकदा ह्या झाडामागे, मग त्या झाडामागे नुस्ते लाईट्स चम्कत असतात. एक बाबाजी मराठी वाटावी अशा भाषेत बोलत असतो. दिलेले पैसे वाया जातील म्हणून मित्राने बळंच बसायला लावून तो जो काही शो होता तो वीसेक मिनीटं पाहायला लावला.