मी सांगलीचा (आणि तसा ठाण्याचाही) आहे.पण सध्या नव्या मुंबईत राहतो.सांगलीत वर्षातून एकदा तरी येणे होते. कट्टा झाल्यास आणि त्यावेळी सांगलीत येणे असल्यास नक्कीच आवडेल.
माझा प्रोग्राम बदललाय. घरी पाहुणा येत असल्याने ९ तारखेला इथून बेळगावमार्गे थेट कोल्हापूर गाठेन. आणि तिथून १० ला लांजा. खिद्रापूरला किती वाजेपर्यंत पोचाल? लवकर निघालो तर येण्याचा प्रयत्न करीन नायतर थेट कोल्लापूर.
खिद्रापूरला एक च्या आत पोचायचे नियोजन आहे. २ तास कोपेश्वर आणि अर्धा तास जैन मंदिर असे जवळपास २:३०/ ३ तास खिद्रापुरात असू. कोल्हापूरला ५/६ पर्यंत पोहोचायाचा प्रयत्न आहे. संध्याकाळी कोल्हापूर कट्टा होणारच आहे अजून एक.
मुख्य हेतु सांगलीकरांची माहिती मिळावी हाच आहे. मी साधारणपणे १६ जून पासून २७ जून पर्यंत सांगलीत आहे. खादाडीचा धागा काढता येईल पण सध्या सांगलीत नसल्यामुळे फोटो कसे टाकणार ?
सांगलीत ते एक प्रकाशभाऊ पाटील ओळखीचे होते...
त्यांनी हजारदा बोलावलं पण जाणं काही जमलं नाही.
आता हळहळ तेव्हढी उरली.....
बाकी तो बॅटमॅन बोलावेल अशी काही शक्यता वाटत नाही!!!!
:)
भावानो
शिंदे किंवा गोविंदाची बुर्जी - मधुबन कॉर्नर
आनंदरावचा अंडा sandvich - वालचंद कॉलेज जवळ
सरोवरची पाव भाजी - वालचंद कॉलेज जवळ
गीता फरसाण मार्ट - पापडी चटणी (आपण तर फिदा)
गुड इवेनिंग (पेंडसे) ची साधी आणि फराळी मिसळ - मारुती रोड
हळद भवन कॅण्टीन ची ब्रेड उसळ
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिराजीचा चहा (दर्दी लोक २/३/४ सुद्धा सहज पिवू शकतात . ) - १ नंबर शाळा
सरकारी दवाखान्य जवळ बेल्वल्कारांचे हॉटेल अनुराधा - खास झणझणीत मटणासाठी
स्टार टेक्सासची दही पुरी आणि पाणिपुरी.
कॉलेज कॉर्नरचा सँडवीचवाला.
कपाले भडंगवाल्याच्या गाड्यावरचे गरमागरम भडंग - गाड्याची अवस्था न बघता भडंग खायचे असेल तरच जावे.
सुनील कडे मिळणारी कच्छी दाबेली - याच्या गाड्याचे नाव माहिती नाही. टाटा पेट्रोल पंपाजवळ असतो.
कोर्टाबाहेर मिळणारा (ICICI सर्कल समोर) गोटी सोडा. त्यातही त्या सोडेवाल्यापुढे "गोटी सोड्यात दम नसतो" असा एखादा डायलॉग आपल्या आपल्यात टाकला तर तो उचकतो आणि आणखी स्ट्राँग बाटली उघडतो. ;)
तो आनंदराव की अनंतराव? मी कॉलेजात असताना वालचंद कॉलेजच्या समोर मिरज रोडवर एक गाडीवाला होता त्याला आम्ही अनंतराव म्हणत असू.
इतर काही ठिकाणे--- (सध्या माहित नाही ही ठिकाणे अजून आहेत की नाहीत)
१. वालचंद कॉलेजजवळील निलेश, जुनेद आणि सफा बेकर्या विश्रामबाग
२. वालचंद कॉलेजजवळ बँक ऑफ इंडियाच्या बाहेर दोन टपरीवाले होते.त्यांच्याकडचे पोहे आणि चहा भरपूर वेळा घेतला आहे.
३. सांगली-मिरज रोडवर विश्रामबाग बस स्टॉपजवळ अय्यंगार बेकरी
४. अय्यंगार बेकरीजवळून जाणार्या सांगली-मिरज रोडला ९० अंशात असलेल्या एका रस्त्यावर सुप्रसिध्द कॉफी आणि आईसक्रिम मिळणारे एक दुकान आहे/होते. त्या दुकानात जायला ४-५ पायर्या उतरायला लागतात. स्नो-डेन की असे काहीतरी नाव होते त्याचे.
५. विश्रामबागमधील एन.आय.आय.टी जवळील हॉटेल चिनार. या हॉटेलात आम्ही मित्रमंडळी कित्येकवेळा गेलो असू.
६. हॉटेल चिनारसमोरच असलेला फ्रूट ज्युसवाला.
मी प्रॉपर साताऱ्याची आहे. सध्या पुण्यात असते आणि मिरजेची सून आहे ;)
कट्टा झाला तर नक्की आवडेल यायला… (नवऱ्यासोबत)
९-१० मे ला मी मिरजेतच आहे. तेव्हाच करू….
सांगलीला गेलाच तर हरिपूर्ला बागेचा गणपती पण बघता येईई, तसेच नरसोबाची वाडी देखील.
खादाडीबद्दल विशेष आत्ता लक्षात नाही, जी काही एकेकाळी प्रचंड आवडायची, त्यांचा दर्जा आत्ता उरला नाही. :-(
प्रतिक्रिया
4 May 2015 - 10:44 pm | सूड
एकोळी??
4 May 2015 - 10:46 pm | श्रीरंग_जोशी
सांगलीकर मिपाकर म्हंटलं की पहिलं नाव आठवतं अमितसांगली यांचं.
इतर अनेक मिपाकर सांगली किंवा जवळपासचे असतील असा अंदाज आहे.
4 May 2015 - 10:46 pm | क्लिंटन
मी सांगलीचा (आणि तसा ठाण्याचाही) आहे.पण सध्या नव्या मुंबईत राहतो.सांगलीत वर्षातून एकदा तरी येणे होते. कट्टा झाल्यास आणि त्यावेळी सांगलीत येणे असल्यास नक्कीच आवडेल.
5 May 2015 - 10:52 am | थोर्लेबजिराव
सहमत. सागलि ल कट्टा झाल्यास अनि तेवा साग्लित अस्ल्यस जरुर येनर...!!
5 May 2015 - 11:02 am | कपिलमुनी
सांगलीला कट्टा करू . पण आधी सांगलीमधली खादाडी असा एक धागा सांगलीकरांनी काढा ;)
5 May 2015 - 11:16 am | प्रचेतस
९ तारखेलाच एक धावता कट्टा करण शक्य आहे.
खिद्रापूरला जाताना सांगलीमार्गेच जाणार आहोत. पैसाताईही तेव्हा सांगलीतच असावी.
5 May 2015 - 11:30 am | यसवायजी
रात्र दिवस थोड़े आणी :))
5 May 2015 - 11:33 am | पैसा
माझा प्रोग्राम बदललाय. घरी पाहुणा येत असल्याने ९ तारखेला इथून बेळगावमार्गे थेट कोल्हापूर गाठेन. आणि तिथून १० ला लांजा. खिद्रापूरला किती वाजेपर्यंत पोचाल? लवकर निघालो तर येण्याचा प्रयत्न करीन नायतर थेट कोल्लापूर.
5 May 2015 - 11:40 am | प्रचेतस
खिद्रापूरला एक च्या आत पोचायचे नियोजन आहे. २ तास कोपेश्वर आणि अर्धा तास जैन मंदिर असे जवळपास २:३०/ ३ तास खिद्रापुरात असू. कोल्हापूरला ५/६ पर्यंत पोहोचायाचा प्रयत्न आहे. संध्याकाळी कोल्हापूर कट्टा होणारच आहे अजून एक.
5 May 2015 - 11:55 am | पैसा
मग माझं खिद्रापूर क्यान्सल झाल्यात जमा. कारण आम्ही १२ च्या दरम्यान घरून निघू. ६ पर्यंत कोल्लापूरात.
5 May 2015 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा
कट्टे कर आगोबा! :-D
5 May 2015 - 1:04 pm | बॅटमॅन
मी मिरजेत असलो तर भेटूच. बाकी असा कट्टा तरी आजवर झाल्याचे माहिती नाही.
5 May 2015 - 4:52 pm | पॉइंट ब्लँक
+१. ह्या धाग्याच्या निमित्ताने सांगली मिरजकर मंडळींची माहिती होईल. :)
5 May 2015 - 5:56 pm | दा विन्ची
मुख्य हेतु सांगलीकरांची माहिती मिळावी हाच आहे. मी साधारणपणे १६ जून पासून २७ जून पर्यंत सांगलीत आहे. खादाडीचा धागा काढता येईल पण सध्या सांगलीत नसल्यामुळे फोटो कसे टाकणार ?
9 May 2015 - 11:42 am | पिवळा डांबिस
सांगलीत ते एक प्रकाशभाऊ पाटील ओळखीचे होते...
त्यांनी हजारदा बोलावलं पण जाणं काही जमलं नाही.
आता हळहळ तेव्हढी उरली.....
बाकी तो बॅटमॅन बोलावेल अशी काही शक्यता वाटत नाही!!!!
:)
5 May 2015 - 7:22 pm | बाबा पाटील
पण तासगावकरांचा जावई मात्र आहे.त्यामुळे शक्य झाले तर कट्ट्याला नक्की येइल.
5 May 2015 - 10:30 pm | आर्य
मी १ ते ३ मे ला सांगली-मिरजेला गेलो होतो पण खादाडी केलल्या शिवाय येत नाही
या काही गोष्टी नक्की ट्राय करा.........गणपती दर्शना सोबतच
१. 'सांभा'ची भेळ आणि पाणी-पुरी (वखार भाग)
२. महाराष्ट्र बँकेचा वडा (भावे नाट्यमंदिरा जवळ)
३. गणेशचा नाष्टा - पोहे, वडा इ.(विश्रामबाग)
४. बसप्पा हलवाईचे - पेढे, खाजा इ. (विश्रामबाग / मिरज)
५. भडंग - भोरे / अंबा आणि इतरही
६. रामविश्वास - श्रीखंड / आम्रखंड
७. कृष्णाठच्या वांगी, गुळ, चुरमुरे आणि हळद नक्की सोबत न्या.
८. सुंगारेची भजी / स्टेशन चौकात भजी कढी
5 May 2015 - 11:00 pm | दा विन्ची
भावानो
शिंदे किंवा गोविंदाची बुर्जी - मधुबन कॉर्नर
आनंदरावचा अंडा sandvich - वालचंद कॉलेज जवळ
सरोवरची पाव भाजी - वालचंद कॉलेज जवळ
गीता फरसाण मार्ट - पापडी चटणी (आपण तर फिदा)
गुड इवेनिंग (पेंडसे) ची साधी आणि फराळी मिसळ - मारुती रोड
हळद भवन कॅण्टीन ची ब्रेड उसळ
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिराजीचा चहा (दर्दी लोक २/३/४ सुद्धा सहज पिवू शकतात . ) - १ नंबर शाळा
सरकारी दवाखान्य जवळ बेल्वल्कारांचे हॉटेल अनुराधा - खास झणझणीत मटणासाठी
6 May 2015 - 5:15 pm | मोदक
स्टार टेक्सासची दही पुरी आणि पाणिपुरी.
कॉलेज कॉर्नरचा सँडवीचवाला.
कपाले भडंगवाल्याच्या गाड्यावरचे गरमागरम भडंग - गाड्याची अवस्था न बघता भडंग खायचे असेल तरच जावे.
सुनील कडे मिळणारी कच्छी दाबेली - याच्या गाड्याचे नाव माहिती नाही. टाटा पेट्रोल पंपाजवळ असतो.
कोर्टाबाहेर मिळणारा (ICICI सर्कल समोर) गोटी सोडा. त्यातही त्या सोडेवाल्यापुढे "गोटी सोड्यात दम नसतो" असा एखादा डायलॉग आपल्या आपल्यात टाकला तर तो उचकतो आणि आणखी स्ट्राँग बाटली उघडतो. ;)
8 May 2015 - 11:17 pm | गॅरी ट्रुमन
तो आनंदराव की अनंतराव? मी कॉलेजात असताना वालचंद कॉलेजच्या समोर मिरज रोडवर एक गाडीवाला होता त्याला आम्ही अनंतराव म्हणत असू.
इतर काही ठिकाणे--- (सध्या माहित नाही ही ठिकाणे अजून आहेत की नाहीत)
१. वालचंद कॉलेजजवळील निलेश, जुनेद आणि सफा बेकर्या विश्रामबाग
२. वालचंद कॉलेजजवळ बँक ऑफ इंडियाच्या बाहेर दोन टपरीवाले होते.त्यांच्याकडचे पोहे आणि चहा भरपूर वेळा घेतला आहे.
३. सांगली-मिरज रोडवर विश्रामबाग बस स्टॉपजवळ अय्यंगार बेकरी
४. अय्यंगार बेकरीजवळून जाणार्या सांगली-मिरज रोडला ९० अंशात असलेल्या एका रस्त्यावर सुप्रसिध्द कॉफी आणि आईसक्रिम मिळणारे एक दुकान आहे/होते. त्या दुकानात जायला ४-५ पायर्या उतरायला लागतात. स्नो-डेन की असे काहीतरी नाव होते त्याचे.
५. विश्रामबागमधील एन.आय.आय.टी जवळील हॉटेल चिनार. या हॉटेलात आम्ही मित्रमंडळी कित्येकवेळा गेलो असू.
६. हॉटेल चिनारसमोरच असलेला फ्रूट ज्युसवाला.
(पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन
5 May 2015 - 11:00 pm | दा विन्ची
(आपुन शाकाहारी असल्याने बाकी विशेष माहिती नाही . )
6 May 2015 - 12:19 am | भाग्यश्री कुलकर्णी
मी मिरजकर.१० वी पर्यंत.आता येणे नाहीतच जमा.पण भविष्यात कट्टा झाला तर विचार करु यायचा.
6 May 2015 - 12:21 am | पद्मश्री चित्रे
मुलाच्या बुद्धिबळ स्पर्धे साठी मी ७ ते १० सांगली त असेन. ३/४ तासात जावून येण्याजोगे काही ठिकाण आहे का आजूबाजूच्या परिसरात ??
6 May 2015 - 9:29 am | पॉइंट ब्लँक
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, सांगलीचे गणेश मंदिर, तासगावचे गणेश मंदिर. नरसोबाची वाडी, अजून आठवली तर सांगतो.
6 May 2015 - 10:12 am | प्रमोद देर्देकर
! चला कट्टा करुया!
कट्यास अनेक हार्दिक शुभेच्छा!
(फटु आणि वृत्तांताच्या प्रतिक्षेत असलेला पम्या)
6 May 2015 - 1:37 pm | गणेशा
कट्टे करा.. मजा करा ... कोणी कोल्हापुरात करा कोणी सांगलीत ..
च्यामारी बारामतीला कट्टा झाला आहे का? असा धागा काढाव म्हणत होतो.. पण जळजळ शांत करुन घेतली उगाच..
कट्ट्याला शुभेच्छा
6 May 2015 - 1:53 pm | स्वधर्म
मी सांगलीकर असून सध्या पुण्यात राहतो. सांगलीला महिन्या-दोन महिन्यात येणे होतेच. कट्ट्याची तारीख कळली, तर नक्की जुळवून येइन.
8 May 2015 - 5:00 pm | psajid
कधी होतोय सांगा ! पोहोचण्याचा प्रयत्न करीन !
8 May 2015 - 11:02 pm | काव्यान्जलि
मी प्रॉपर साताऱ्याची आहे. सध्या पुण्यात असते आणि मिरजेची सून आहे ;)
कट्टा झाला तर नक्की आवडेल यायला… (नवऱ्यासोबत)
९-१० मे ला मी मिरजेतच आहे. तेव्हाच करू….
18 May 2015 - 1:53 pm | रंगासेठ
बरेच लोक आहेत सांगली मिरजेतील इथे :-)
सांगलीला गेलाच तर हरिपूर्ला बागेचा गणपती पण बघता येईई, तसेच नरसोबाची वाडी देखील.
खादाडीबद्दल विशेष आत्ता लक्षात नाही, जी काही एकेकाळी प्रचंड आवडायची, त्यांचा दर्जा आत्ता उरला नाही. :-(
18 May 2015 - 2:34 pm | अमोल केळकर
मी मुळचा सांगलीचा. आजच मुंबईला परत आलो
अमोल केळकर
सांगलीच्या संस्थानाच्या गणपतीचे इथे दर्शन घ्या
18 May 2015 - 2:37 pm | अमोल केळकर
सांगलीच्या संस्थानाच्या गणपतीचे इथे दर्शन घ्या
www.kelkaramol.blogspot.in