एका वृत्तपत्रीय बातमीनुसार
शासनाने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनल ऍक्ट संदर्भातील जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मुभा मिळाली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभही मिळणार आहे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या 80 हजारांच्या घरात आहे. त्यातील बहुतांशी डॉक्टर हे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देतात. या डॉक्टरांना ऍलोपॅथिक सेवा देण्याची मुभा कायद्याने प्राप्त नसल्याने त्यांना ही वैद्यकीय सेवा देता येत नव्हती. धावपळीच्या जगात "आजारावर त्वरित मात करणारेच उपचार करा‘, अशी मागणी वाढू लागली. अधिकृत परवानगी नसल्याने आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक सेवा देता येत नव्हती. परिणामी रुग्णांना अशा वैद्यकीय सेवेसाठी शहराकडे यावे लागे. यात त्यांचे श्रम, वेळ व पैसा खर्च होत होता. म्हणजे ग्रामीण रुग्ण त्यांचा वेळ श्रम पैसा खर्च करून शहरात जावून ऍलोपॅथिक उपचार घ्यायचे ? गावात आयुर्वेदिक डॉक्टर असताना सुद्धा ? म्हणून हि अधिसूचना ????
एम बी बी एस = बी ए एम एस ???
गाभा:
प्रतिक्रिया
4 May 2015 - 1:54 pm | पगला गजोधर
अरेरे काय ही अवस्था, एका महान प्राचीन परंपरा असलेल्या वैद्यकशास्त्रावर आलीय !
4 May 2015 - 3:33 pm | आयुर्हित
महान प्राचीन परंपरा असलेले वैद्यकशास्त्र आधुनिकतेची कास धरून एक नविन रुपडे घेवून तग धरून ठेवेलच या बद्दल खात्री आहे.
पण ज्यांचा आयुर्वेदावरच विश्वास नाही, पण डिग्री तर हातात आहे अश्या (तज्ञ?)डॉक्टरांना चांगलेच फावेल!
BAMS डॉक्टरांनी केलेल्या अलोपेथिक उपचार घेतलेल्या रुग्णांना मेडिकल इन्शुरन्सचा बेनेफिट मिळणार नाही, एवढे फक्त लक्षात ठेवावे!!
4 May 2015 - 4:37 pm | पगला गजोधर
"आधुनिकतेची कास" म्हणजे सरळ सरळ ऍलोपॅथिचे अनुसरण का ??? मग उद्या कंवर्टीबल बॉन्ड प्रमाणे, 'बी ए एम एस' सर्टीफिकेट 'एम बी बी एस' सर्टीफिकेटमधे कंन्वर्ट करा अशी अधिसूचना निघायला कितीसा वेळ लागणार !
5 May 2015 - 12:07 am | आयुर्हित
आधुनिकतेची कास म्हणाल तर आयुर्वेद हा NASA द्वारे अंतराळात ऍलोपॅथिच्या आधीच पोचलाय!
जगात ऍलोपॅथी सोडून अजून जवळपास १२५ पॅथी आहेतच कि, पण त्यामुळे कुठल्याही पॅथीचे महत्व कमी होत नाही व शहाण्यामाणसाने तसे करूही नाही.
5 May 2015 - 12:26 am | पगला गजोधर
ग्रेट, म्हणूनच फिरून परत एकदा तेच विचारेन, कि एवढ्या आधुनिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या डॉक्टरांना, दुसर्या पॅथीमधे घुसण्याची गरजच काय ?
5 May 2015 - 6:08 pm | आयुर्हित
डॉक्टरांना गरज नाही, पण ग्रामीण भागातील रुग्णांना आहे.
त्यामुळे स्पर्धा वाढून एकूण खर्च कमी होण्यास हातभार लागला तर अजून बरे होईल.
5 May 2015 - 7:01 pm | पगला गजोधर
आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदिक उपचारपद्धती, औषधे, शल्यकर्म, आहार विहार मार्गदर्शन, वैगरे गोष्टी वापरून (बी ए एम एस अभ्यासक्रमातल्या) जरूर रुग्णसेवा करावी. 'रुग्णानां गरज आहे' असे कारण सांगून उपचारपद्धती (पॅथी) बदलणे हे काही सयुक्तिक वाटत नाही. (डॉक्टरांनी कोणत्या पॅथीने उपचार करावेत, याचा दबाव रुग्ण, डॉक्टरांवर कसा टाकू शकतो बुआ ? म्हणजे ग्रामीण भागातील आयुर्वेदिक डॉक्टर अंडर-ड्युरेस उपचार करतात का ?) रुग्णाला जर ऍलोपॅथी उपचार करून घ्यायचे असतील तर रुग्ण ऍलोपॅथीक डॉक्टरकडे जाईलच की.
4 May 2015 - 1:56 pm | जेपी
100 तरी कुठे गेले नाहीत.
4 May 2015 - 2:30 pm | नाखु
मनस्वगत : कार्यकर्त्याना दोनदा ५० आणी १०० साठी तयारी करायला सांगू काय?
जनस्वगत : हाही धागा नेहमीप्रमाणे डॉकटर लोकांची नैतीकता इत्यादी गोष्टींवर घसरणार याची "निस्ता सेटलमांड" काळजी घेतीलच.
आपला प्रेक्षक
कधी रूग्ण सदा सुज्ञ
नाखु
4 May 2015 - 5:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
जनस्वगत भारी आहे ! =))
"निस्ता सेटलमांड" ही "(दश)कोटी" लै भारी :)
"निस्ता सेटलमांड" यांना त्यांच्या भगिनी "स्कोरा सेटलमांड" नेहमी साथ देतात हे सुद्धा नोंदवत आहे ;)
4 May 2015 - 2:21 pm | मृत्युन्जय
अति झाले आणि हसू आले. वैताग आला आहे या धाग्यांचा. फिर बोलेगा तो बोलोगे की बोलत है.
असो प्रासदांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
4 May 2015 - 3:29 pm | अत्रन्गि पाउस
+१
4 May 2015 - 5:11 pm | पगला गजोधर
जळजळतय नी मळमळतय …. अरे घेना मग धौतीयोग …. (संपूर्णपणे आयुर्वेदिक …. )
4 May 2015 - 5:20 pm | पगला गजोधर
नवीन अधिसूचनेनुसार "famotidine-Ca carb-mag hydrox" पन घेऊ शकतात लोकं ...
4 May 2015 - 5:34 pm | मृत्युन्जय
आजच रात्री घ्या. सकाळी ओके.
जळजळ मळमळ थांबली की मग बोलु
4 May 2015 - 5:50 pm | पगला गजोधर
:)
4 May 2015 - 5:49 pm | मृत्युन्जय
तुम्ही पण तुमची मळमळ थांबली की कळवा. आम्हाला जळजळ नाही कशाची. नाहितर काय ते एकदाचे ओकुन टाका. रोजच्या ओकार्या नकोत.
4 May 2015 - 6:09 pm | अत्रन्गि पाउस
हि नवसृजनाची चाहूल आहे नं ....मग ??
4 May 2015 - 6:28 pm | पगला गजोधर
:=))
4 May 2015 - 5:00 pm | पैसा
माझ्या माहितीत कित्येक बी ए एम एस आणि बी एच एम एस डॉक्टर्स अॅलोपथीची औषधे देतात. मी त्यांच्यापासून अर्थातच लांब रहाते. पण एका तालुक्याच्या ठिकाणी नवरा बायको दोघेही बी ए एम एस असताना अॅडमिट पेशंटसाठी कित्येक वर्षे नर्सिंग होम चालवत आहेत. तिथे प्रसूतीसाठीही बायका अॅडमिट असतात. हे कसे याबद्दल मला कुतुहल आहे. मात्र हे डॉक्टर जोडपे लांबच्या नात्यातले असल्याने त्यांना प्रत्यक्ष विचारू शकले नाहीये. यावरून अशी परवानगी फार पूर्वीपासून असावी असे वाटते.
4 May 2015 - 5:08 pm | पगला गजोधर
लपून छपून होत असेल तुरळक प्रमाणात, पण आता उघडपणे नियमानुसार होणार उपचार ….
4 May 2015 - 5:49 pm | आनन्दा
माझ्या माहितीनुसार इतर पॅथीच्या लोकांना आपत्कालीन स्थितीत (?) अॅलोपॅथिक औषधे देण्याची परवानगी आहेच. त्यासाठी त्यांना जनरल मेडिसीन नावाचा विषय पण असतो त्यांच्या कोर्स मध्ये. फक्त या वरच्या तरतूदीचा दुरुपयोग करून हे लोक सर्रास अॅलोपेथिक प्रॅक्टिसच करतात. नव्या वटहुकुमामुळे फार काही वेगळे होईल असे नाही.
4 May 2015 - 5:55 pm | पगला गजोधर
बरोबर आहे तुमचे !
4 May 2015 - 6:02 pm | अजया
हम्म!आजच हाॅस्पिटलमधुन परतताना एक क्ष आयुर्वेदिक डाॅक्टर एक सहा वर्षाचे मूल स्वतःच्या गाडीत टाकून धावत आले.ते स्वयंघोषित बालरोगतज्ञ आहेत.त्यामुळे बरीच जनता त्यांच्याकडे लहान मुलं घेऊन येतात.८०%मुलांना व्हायरल ताप सर्दी असते.ते आपले अापच बरे होतात.पण हे साहेब त्यांना मोठी अॅन्टिबायोटिक्स देतात.लहान मुलांना औषधाचा डोस सरसकट देता येत नाही.तो मुलाच्या वजनानुसार देण्याचे एक साधेसे गणित आहे .ते औषधाप्रमाणे बदलु शकते.हे डाॅक्टर अॅलोपथी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करुन शिकले आहेत.त्यामुळे त्याबाबतीत आनंदी आनंद आहे.तर या डाॅक्टरांनी ताप आलेला हा मुलगा अॅडमिट करुन घेतला.तो दिवसभरात मलूल होत गेला.त्याचे पोट फुगले.तर सायबांनी बस्ती दिली.ते पोटफुगी नसुन तापाने आलेल्या शाॅकची एक पायरी असते.हेही ते शिकलेले नाहीतच.मग मुलाचा पल्स लागेना झाल्यावर ते घेऊन आले होते.मुलाच्या बाबतीत लोक संवेदनाशील असतात.मार पडु शकतो.यासाठी आमच्या इथे अशावेळी एक रिस्पाॅन्स टिम केलीये डाॅ वाचवायला.दुर्दैवाने मी त्यात असल्याने थांबवले गेले.साहेबांना मुलाचा न लागणारा पल्स,त्याचा फिकुटलेला चेहेरा व इतर लक्षणे,लॅब टेस्ट यावरुनसुध्दा ते मूल सेप्टिक शाॅकमध्ये आहे हे कळले नव्हते.त्या बाळाला पुढे पाठवावे लागले.आॅक्सिजन,,सलाईन देऊन.तिथे ते दिड तासात गेले.तर या डाॅक्टरांनी त्या हाॅस्पिटलला बेकार ट्रिटमेंट आहे मॅडम असं उत्तर दिलं'आपण काय केलंय याची ना खंत ना खेद. कोणत्याच पॅथीचे,रोगांचे व्यवस्थित ज्ञान नसणारे हे लोक.जे शिकलंय ते तरी वापरा किंवा मग ही डिग्री काढुन टाकून सरसकट सर्व जागा एमबीबीएस करुन टाकाव्या.निदान हे प्रकार तरी कमी होतील.अर्धवट डाॅक्टर यमाचा सहोदर खरा.
4 May 2015 - 6:24 pm | पगला गजोधर
अजयाताईनी ह्या धाग्यामागच्या हेतूला बरोब्बर ट्विजरमधे पकडलं आहे :)
ताई तुमचं डायग्नोसिस पिनपॉइन्ट-करेक्ट असं तुमचा प्रतिसाद वाचून वाटतय !
4 May 2015 - 6:28 pm | पिलीयन रायडर
बाळ कसं आहे ते?
4 May 2015 - 6:30 pm | पगला गजोधर
4 May 2015 - 6:34 pm | पिलीयन रायडर
अरेरे.. मी हे नीट वाचलेच नाही...
त्या डॉक्टरवर केस होऊ शकत नाही का? त्याच्याकडे परवानगी नसताना अशी काय वाट्टेल ती ट्रिटमेंट कशी देऊ शकतो तो??
4 May 2015 - 6:53 pm | पगला गजोधर
आता तर, शासनाने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनल ऍक्ट संदर्भातील जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मुभा मिळाली आहे.
4 May 2015 - 6:44 pm | संदीप डांगे
अगदी सेम अशीच उदाहरणे अॅलोपॅथी डॉक्टरांचीपण मिळतात अजयाताई. त्यांची इज्जत काढली की काही डॉक्टरांचा मिपावर थयथयाट होतो असा अनुभव आहे. मग ते उलट्सुलट आणि दादागिरीछाप उच्छाद मांडतात.
माझं काय म्हणणं आहे की यच्चयावत सगळ्या अॅलोपॅथीवाल्यांचे निदान आणि उपचार अगदी अचूक असतात याचा काही विदा आहे का? बरोबर आले तर 'आम्ही केले' ची गावभर जाहिरात करतात, चुकले की 'तुमचा रोग मी तुम्हाला दिलेला नाही' ची पुचाट कारणे पुढे करतात. मग आधुनिक, शास्त्रोक्त, वैज्ञानिक, प्रयोगशाळा वैगेरे बरेच मोठे मोठे शब्द वापरून अशा कामटुकार डॉक्सना इथले डॉक पाठीशी घालतांना दिसतात आणि दुसर्या पॅथीच्या लोकांनी केलेल्या यशस्वी उपचारांना प्लासिबो म्हणतात.
कित्येक जीव चुकीच्या निदानाची शिक्षा भोगत आहेत. त्याविरूद्ध कुठेही दाद मागू शकत नाहीत. अशी भयावह परिस्थिती असतांना डॉक्स लोक एकमेकांवर फक्त शिंतोडे उडवायची कामे करतात हे बघून वाईट वाटते.
आमच्या सारख्या सामान्य लोकांनी करायचे तरी काय आता?
4 May 2015 - 6:58 pm | पगला गजोधर
अश्या अॅलोपॅथीपासून आयुर्वेदिकवाल्यांनी चार हात लांब राहावे की नै ! पण आंदोलन करून ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मुभा मिळवली ..
4 May 2015 - 7:38 pm | संदीप डांगे
सहमत आहे. एकतर आयुर्वेदीकवाल्यांना अॅलोपॅथीचे सर्टीफिकेट द्यायचे तर अॅलोपॅथीचे संपूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे. हे म्हणजे कंडक्टर जास्त ड्रायवर कमी म्हणून कंडक्टर लोकांना थेट ड्रायविंग सीटवर बसवण्यासारखे आहे. याला माझा व्यक्तिश: विरोध आहेच.
4 May 2015 - 8:27 pm | आनंदी गोपाळ
फक्त तुमच्यासाठी हा प्रतिसाद.
कधी चुकून आजारी पडलात, तर अॅलोपथीवाल्याकडे जाऊ नका.
बाय.
5 May 2015 - 10:41 am | कपिलमुनी
आपले काही व्यवसाय बंधू मूर्ख आहेत , चुकीच्या ट्रीटमेंट करतात हे कबूल करायला कसली लाज वाटते ?
5 May 2015 - 10:52 am | मृत्युन्जय
+१
5 May 2015 - 6:31 pm | बॅटमॅन
डॉक्टरांचा विषय निघाला की फक्त थयथयाट सोडून या साहेबांना काहीच सुचत नाही असे निरीक्षण आहे. काही योग्य मुद्दे असले तरी ते अशा वायझेडगिरीत वाहून जातात. काय पातळीचा प्रतिसाद आहे, वा!
आमचे निरुपद्रवी प्रतिसादही उडवले जातात तर हा सरळसरळ ट्रोलछाप प्रतिसाद का ठेवलाय याचे आश्चर्य वाटते. शेवटी संमंमध्येही माणसेच आहेत आणि त्यांचेही बायस आहेत, पण स्टिल....
5 May 2015 - 7:58 pm | हाडक्या
बॅट्या, नावापुढे डॉ. लागलं की बरंच कै खपून जात असावं असं वाटतं. ;)
जे यांना समर्थन द्यायला येतात इतर वेळी(योग्य मुद्दे असतील तर द्यावेच), अशा प्रतिसादांना (जेव्हा मुद्दे अयोग्य आहेत अथवा अश्लाघ्य भाषेत मांडले आहेत) ते इतर लोक आक्षेप घेत नाहीत म्हणजे त्यांची सहमती गृहित धरावी काय ?
5 May 2015 - 11:03 pm | आजानुकर्ण
हा हा. प्रा.डॉ. ऐकताय ना!
6 May 2015 - 3:10 pm | हाडक्या
हा हा हा.. कर्ण भौ.. काड्या सारना मना है.. ;)
(असे ही "ते" डॉ नव्हेत, ते प्रा डॉ आहेत.. त्याबद्दल हा व्हिडो पहावा.. ;) )
6 May 2015 - 6:47 pm | बॅटमॅन
हाहाहा, अगदी अगदी!!!!
सहमती गृहीतच धरावी असे वाटते आहे. नपेक्षा असे शांत बसले नसते.
5 May 2015 - 10:53 am | मृत्युन्जय
डांगे काकांशी कधी. सहमत होइन असे वाटले नव्हते. पण याखेपी +१
5 May 2015 - 11:19 am | बाळ सप्रे
अॅलोपथी डॉक्टरचेही निदान आणि उपचार नक्कीच चुकु शकते , परंतु अॅलोपथी न शिकलेल्याचे निदान व त्याने केलेले अॅलोपथिक उपचार चुकण्याची शक्यता फार जास्त असते एवढे मात्र नक्की !
6 May 2015 - 8:43 am | रमेश आठवले
नीम हकीम खतरेमे जान
4 May 2015 - 7:27 pm | अजया
माझा आक्षेप जी शिकलीच नाही ती विद्या वापरण्याला आहे.अॅलोपथीचे सगळे डाॅक्टर ते चांगले असे मी कुठेच म्हणलेले नाही.पण यावर आक्षेप घेतल्यावर मग काय अायुर्वेदिक औषध देऊन वाट बघत राहु का पेशंट बरा व्हायची ,असे म्हणणारे डाॅक्टर मी बघत आले आहे.जर त्याना समोरचे औषध त्याचा ग्रुप,डोसेज साईड इफेक्ट्स ड्रग इंटरअॅक्शन यांची माहिती नसताना ते ही प्रॅक्टिस कशाच्या आधारावर करतात? मेडिकल कंपन्यांची पत्रकं वाचुन?
मी सतरा वर्ष ग्रामिणसदृश भागात प्रॅक्टिस करत आहे.या भागात हेच डाॅक्टर्स प्रामुख्याने आहेत. मी त्यांची पॅथी कमी लेखत नाही.प्युअर आयु किंवा होमिऒ करणारेही चांगले डाॅक्टर्स माहिती आहेत.ते निदान आपल्या शिक्षणाची मर्यादा ओळखुन प्रॅक्टिस करतात.त्यांच्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.पण अर्धवट ज्ञानावर प्रॅक्टिस करणारे खतरनाकच!
4 May 2015 - 7:43 pm | संदीप डांगे
पण अर्धवट ज्ञानावर प्रॅक्टिस करणारे खतरनाकच
समजले तुम्हाला काय म्हणायचे ते. आणि सहमत आहेच.
5 May 2015 - 8:53 am | नाखु
_/\_
माहीती नसताना निव्वळ पेशंट्कडून पैसे मिळत आहेत म्हणून (अर्धवट ज्ञानावर आधारीत) उपचार करणे रुग्णालयांनी
गैर आहेच.
प्रंचड पोळलेला असूनही सरसकट सगळेच डॉक्टरांना एकाच तराजूत न तोलणारा
अनुभवी नाखु
5 May 2015 - 7:59 pm | हाडक्या
सहमत.
4 May 2015 - 7:48 pm | बाबा पाटील
माझ्या सर्कल मधले कित्येक एम.डी./एम.एस.आहेत,आयुर्वेदाची कुठलीही माहिती नसताना.लिव्ह ५२ / आरोग्यवर्धीनी/ एव्हडेच कशाला पुण्यातले एक नामवंत पेडियाट्रिशियनच्या प्रिशिप्शन वर कनकासव आणी सोमासव लिहिलेले पाहिले आहे,ही औषधे वापरताना त्याचे कार्मुकत्व काय आणी दोषाधिक्य काय याची घंटा माहिती नसते. संधीगत वात/आमवात यावर सरास आयुर्वेद औषधी देणारे एम.बी.बी.एस नगही पाहिले आहेत.आणी या दोघांना अक्कल शिकवणारे गुगलीया डॉ़क्टर म्हणजेच आय.टी.मधले उंटावरचे शहाणेही दररोज पाहात आहे.हा भारत आहे आणी इथे वाय.झेड.चा बाजार आहे.
4 May 2015 - 7:53 pm | संदीप डांगे
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे.
4 May 2015 - 8:28 pm | आनंदी गोपाळ
सहमत.
4 May 2015 - 10:32 pm | पगला गजोधर
ऍलोपॅथिक डॉक्टरांनी,आयुर्वेदिक प्रिशिप्शन देणे चूकच,..... म्हणूनच आयुर्वेदिक डॉक्टरांनी कार्मुकत्व, दोषाधिक्य, संधीगत वात/आमवात , लिव्ह ५२ / आरोग्यवर्धीनी/ अश्यासारख्या आयुर्वेदिक डोमेनमध्ये रुग्णसेवा करावी.......आंदोलने करून ऍलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मुभा मागण्यापेक्षा, ऍलोपॅथिक डॉक्टरांनी आयुर्वेद औषधी प्रीस्क्राइब करण्यावर बंदीची मागणी करणारी आंदोलने करणे सयुक्तिक ठरेल.
5 May 2015 - 10:45 am | कपिलमुनी
फक्त बाकी आयटी वाले अशा शहाण्यांना मूर्ख म्हणतात . पण एका डॉक्टरला नावे ठेवली की गोपाळ धावून येतात.
तुम्ही स्पष्टपणे अॅलोपथी असो की आयुर्वेद काही डॉक्टर चुकीची औषधे देतात हे प्रांजळपणे सांगितले.
आपल्या व्यवसायक्षेत्रामधल्या अपप्रवृती सांगितल्याच पाहिजेत . अॅलोपथी , आयुर्वेद , आय टी , बिल्डर किम्वा वकिल कोणीही असो.
5 May 2015 - 6:32 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. सर्व डाक्तरांचे तारणहारच जणू.
5 May 2015 - 10:57 pm | अत्रन्गि पाउस
काही केकवाल्यान्पायी सगळे शिव्या खायचे आणि काही गुंडान्पायी सगळे केकवाले सरसकट सगळ्या लोकांना जबाबदार धरून भ्रष्ट केकवाले अजूनच महाग / भेसळ वाले केक विकायचे ....चांगले केकवाले चांगले केक विकायचे ...
...गोंधळ सुरूच राहिला ..वाढतच राहीला आणि अजून बराच वेळ चालूच राहील असे वाटते
4 May 2015 - 8:56 pm | नूतन सावंत
१००% सहमत .
6 May 2015 - 11:23 am | जेपी
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.आनंदी गोपाळ यांचा सत्कार एक अविपत्तिकर चुर्णाची बाटली देऊन करण्यात येत आहे..
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम पॅथी(टीक्) कार्यकर्ते..
5 May 2015 - 10:51 pm | अत्रन्गि पाउस
फुटलोय हसून ...
7 May 2015 - 4:29 pm | नाखु
प्र्.का.टा.आ.
6 May 2015 - 11:25 am | जेपी
दुरुस्ती केली आहे.
6 May 2015 - 11:27 am | मृत्युन्जय
आता बूच मारल्यानंतरही दुरुस्ती करता येते काय?
6 May 2015 - 4:29 pm | जेपी
नाही.
6 May 2015 - 9:12 am | रमेश आठवले
आलोपाथिक डॉक्टरांना आयुर्वेदा च्या डॉक्टरांपेक्षा प्रवेश मिळण्यासाठी खूप जास्त स्पर्धेतून जावे लागते, शिक्षण काल वर्षभराने तरी जास्त असतो आणि पदवी मिळेपर्यंत बराच जास्त खर्च करावा लागतो . असे असताना सरकारने केवळ लोकानुनयाचे धोरण ठेऊन असा फतवा काढणे हा आलोपाथिक डॉक्टरांवर अन्याय आहे. - हे काय फळ मम तपाला - असेच त्याना वाटणार.
विंदा करंदीकर यांच्या ' सब घोडे बारा टक्के" या कवितेची आठवण झाली.
6 May 2015 - 11:17 am | अत्रन्गि पाउस
आलोपाथिक डॉक्टरांना आयुर्वेदा च्या डॉक्टरांपेक्षा प्रवेश मिळण्यासाठी खूप जास्त स्पर्धेतून जावे लागते, शिक्षण काल वर्षभराने तरी जास्त असतो आणि पदवी मिळेपर्यंत बराच जास्त खर्च करावा लागतो
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या परताव्याची हमी सरकारने घ्यावी कि काय ??
कठीण आहे