गाभा:
मित्रहो आणि मैत्रीणींनो,
मी पुढल्या आठवड्यात गोव्यामधे सहकुटुंब सुट्टीसाठी येत आहे. आपल्यापैकी कुणी गोव्यात राहत असल्यास १२, १३, १४ मे पैकी एक संध्याकाळ कट्टा करू शकतो. हा माझा नंबर ९९३०९३०९०१.
कोण कोण आहे आणि कोण कोण उपलब्ध आहे हे नक्की कळवा.
आमचा मुक्काम BENAULIM SALCETTE येथे असणार आहे.
.
मुंबईतल्या मित्रांसाठी पि.एस.: गोव्याहून कुणासाठीही काहीही आणण्यात येणार नाहीये. धन्यवाद.
प्रतिक्रिया
4 May 2015 - 1:04 pm | कपिलमुनी
१५-१६ मे ला Betalbatim येथे आहे .
थोडक्यात चुकामूक :)
4 May 2015 - 3:35 pm | पैसा
आम्ही तुमच्या कोल्लापूरात येणार आणि तुम्ही गोंयात? सॉरी सायबा, मी ९ ला कोल्हापूर आणि तिथून १० ला लांजा. मग बरेच दिवस तिकडे असेन. कदाचित २० पर्यंत. त्यामुळे यावेळी भेट होणे शक्य दिसत नाही.
किती दिवस मुक्काम आहे? परत कधी आणि कसे निघणार?
4 May 2015 - 3:38 pm | प्रचेतस
वाटलंच मला.
कुणी तुमच्या गोव्यात यायचं म्हटलं तर तुम्ही लगेच लांज्याला पळता. =))
4 May 2015 - 3:45 pm | सोत्रि
अगदी अगदी वल्ली! स्वानुभवावरून बोलतोय बरं का मी, लांजा तर खूप लांब राहिला ह्यावेळी. ;)
- (अनुभवी हलकट) सोकाजी
4 May 2015 - 3:54 pm | पैसा
भेटून चहासाठी रडवणार्या पुणेकरांपेक्षा ते बरं!
4 May 2015 - 4:02 pm | सोत्रि
मी चन्नैकर झाल्यावर पुण्यास आलीस तर त्याचे बोल मला का?
मी शेंगा खाल्ल्या नाहीत सबब मी टरफल उचलणार नाही!
- (बाणेदार) सोकाजी
4 May 2015 - 5:54 pm | यशोधरा
पुणेकर पुण्यात आल्यावर भेटतात तरी, पण गोव्यात येऊनही, सांगूनही गोयंकार भेटत नाहीत हां! फोन पण लागत नै त्यांचा!! =)) स्वानुभव हो!
4 May 2015 - 7:10 pm | पैसा
आमी दोगांय गोंयकार मगो! सगळ्यांउजीर उलोचें नाका!
4 May 2015 - 7:18 pm | सूड
असं कसं असं कसं?
निरागस पुणेकरांच्या चहाचा अगदी मिपाच्या नाक्यानाक्यावर उल्लेख होतो आणि हे का बरं उलोचें नाका? =))))
4 May 2015 - 8:06 pm | यशोधरा
हांव आसाच गोयंकार, पुणि पुण्याचेही आसा नी :) आणि सद्दा तू मगेल्या पुण्याक नाव दवरता.. :(
4 May 2015 - 9:54 pm | पैसा
खोडी काढच्याक बरें दिसतां! =))
5 May 2015 - 7:31 am | यशोधरा
खबर आसा गें! =)) हावंय तेच करता नी! =))
4 May 2015 - 8:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हायला हे गोयंकर च्यासाठी लैचं रडतात राव...पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं ;)
4 May 2015 - 8:34 pm | सूड
गोयंकर नाय रे, गोंयकार!! आता हें धा पावट बरय!! ;)
4 May 2015 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा
@पुढच्या वेळेला आलात की सांगा एक मोठ्ठं घंगाळं भरुन च्यापानी करु कसं >>
4 May 2015 - 3:40 pm | अन्या दातार
कोणताही मिपाकर गोव्यात येणार असला की तुम्ही बाहेर. कस्सं जमतं हो तुम्हाला हे?? लै म्हन्जे लैच रोचक आहे ;)
4 May 2015 - 3:50 pm | पैसा
मी वास्कोला आहे. येणार नाही म्हणून फोन करणारे कोल्लापूरकर अस्तित्त्वात आहेत. झालंच तर मुवि, पिंगू, लीमाऊजेट अमोल खरे यांनी मला प्रत्यक्ष बघितलं आहे.
आता मी पैशे गोळा करायला जातेय. तिकडे मदतीला येतोस तर ये! =))
4 May 2015 - 3:56 pm | यसवायजी
काय ठरलं नक्की? पयशे तुम्ही गोळा करणार काय? मग फ्लेक्शचा खर्च भरूण द्यावा लागेल.
4 May 2015 - 4:06 pm | पैसा
फ्लेक्षची आड्डर कोणाला हय?
4 May 2015 - 4:01 pm | अन्या दातार
मग काय तर! वास्को कुठं, तुमचं फोंडा कुठं. अन त्यापुढे कोल्लापुर कुठं. कसं जमावं ते? आमच्यासोबत मुंबईकरही असत. दोष एकट्या कोल्लापूरकरांस का?
पुणे, मुंबई कट्ट्यांस काय?? शक्य आहे ते. =))
4 May 2015 - 4:05 pm | पैसा
प्रतेक्ष माझ्या घरात बघितलय! आणि त्या इंट्याला एक विसरलेच!
तुमचे मुंबैकर बिचारे एकसारखे बिझी बिझी. त्यांना काय म्हणायचं काम नै!
4 May 2015 - 4:08 pm | पैसा
आपले कोल्हापूर्/पुणे/मुंबै/गोवा वाद नंतर सोडवू. सध्या अॅड्याभौला गुहागर-दापोलीकडेही जायचे आहे. तिकडची काही माहिती असेल तर नक्की सांगा.
4 May 2015 - 8:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
गुहागरास घरगुती उतरायची सोय हवी असल्यास आमच्या दुर्गादेवी देवस्थानाचं विश्रामगृह आहे. शिवाय तिथे जागा मिळाली नाही तर देवीच्या मंदिरातुन बाहेर उजवीकडे पडुन ५० फुटावर एक जोशी नावाच्या काकु आहेत त्यांच्याकडे जेवाखायराहायची सोय उत्तम होते.
4 May 2015 - 8:20 pm | आदिजोशी
माहिती बद्दल धन्यवाद, पण दोन्ही ठिकाणी रहायची आणि खायची व्यवस्था आधीच झाली आहे.
4 May 2015 - 4:29 pm | प्रमोद देर्देकर
तो अॅड्या आधीच दापोली फिरलेला आहे, तरीही त्याला अजुन काय माहिती हवी आहे कुणास ठाऊक?
http://www.misalpav.com/node/19703 या इथे जास्त माहिती मिळेल.
4 May 2015 - 7:02 pm | आदिजोशी
मूळ विषय सोडून भलत्याच विषयांवर चर्चा घडवून मिपाच्या बँडविड्थचे सार्थक केल्याबद्दल समस्त मित्रांचे आभार :)
मला माहिती गोव्यातली हवी होती, दापोली गुहागरची नाही.
4 May 2015 - 7:11 pm | पैसा
तसं धाग्यात लिहायचं ना! धागा कट्ट्याचा. मग बँडविड्थ तर जळणारच!
4 May 2015 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
धाग्यावर विषय सोडून लिहीणे हा मिपाकरांचा आयडीसिद्ध अधिकार आहे आणि ते तो मिळविणारच !
5 May 2015 - 3:42 pm | प्रीत-मोहर
गोव्यातली काय माहिती हे कुठे लिहीलय पण?
5 May 2015 - 3:41 pm | प्रीत-मोहर
मी आहे गोव्यात. पण आम्ही १२ वीच्या पोरांचे रिज्ल्ट डिक्लेर करत असु तेव्हा पर्वरीत.
सो तुम्ही पणजी भागात येणार असलात तर कळवा. मिनी कट्टा करता येईल.
7 May 2015 - 7:00 pm | प्रसाद गोडबोले
अत्ता जमणार नाही .... पण पावसाळ्या नंतर एकदा कधी तरी जोरदार मिपाकट्टा व्हायलाच पाहिजे गोव्यात !!